07-07-24    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   11.11.20  ओम शान्ति   मधुबन


संपूर्णतेच्या समीपतेद्वारे प्रत्यक्षतेच्या श्रेष्ठ समयाला जवळ आणा


आज बापदादा आपल्या होलीएस्ट, हाईएस्ट, लकीएस्ट, स्वीटेस्ट मुलांना पाहत आहेत. संपूर्ण विश्वामध्ये वेळोवेळी होलीएस्ट आत्मे होत आले आहेत. तुम्ही देखील होलीएस्ट आहात परंतु तुम्ही श्रेष्ठ आत्मे प्रकृतीजीत बनून, प्रकृतीला देखील सतोप्रधान बनविता. तुमची पवित्रतेची शक्ती प्रकृतीला देखील सतोप्रधान, पवित्र बनविते म्हणून तुम्ही सर्व आत्मे प्रकृतीचे हे शरीर देखील पवित्र प्राप्त करता. तुमच्या पवित्रतेची शक्ती विश्वातील जड, चैतन्य सर्वांना पवित्र बनविते म्हणून तुम्हाला शरीर देखील पवित्र प्राप्त होते. आत्मा देखील पवित्र, शरीर देखील पवित्र आणि प्रकृतीची साधने देखील सतोप्रधान पावन असतात म्हणून विश्वामध्ये होलीएस्ट आत्मे आहात. होलीएस्ट आहात? स्वतःला असे समजता का की आम्ही विश्वातील होलीएस्ट आत्मे आहोत? हाईएस्ट देखील आहात, का हाईएस्ट आहात? कारण उच्च ते उच्च भगवंताला ओळखले आहे. उच्च ते उच्च बाबांद्वारे उच्च ते उच्च आत्मे बनले आहात. साधारण स्मृती, वृत्ती, दृष्टी, कृती सर्व बदलून श्रेष्ठ स्मृती स्वरूप, श्रेष्ठ वृत्ती, श्रेष्ठ दृष्टी बनली. कोणालाही भेटता तर कोणत्या वृत्तीने भेटता? बंधुत्वाच्या वृत्तीने, आत्मिक दृष्टीने, कल्याणाच्या भावनेने, प्रभू परिवाराच्या भावनेने. तर हाईएस्ट झालात ना? बदलून गेलात ना! आणि लकीएस्ट किती आहात? कोणा ज्योतिष्याने तुमच्या नशिबाची रेषा आखलेली नाहीये, स्वयं भाग्य विधात्याने तुमच्या भाग्याची रेषा आखली. आणि गॅरंटी किती मोठी दिली आहे? २१ जन्मांच्या भाग्याच्या रेषेची अविनाशी गॅरंटी घेतली आहे. एका जन्माची नाही, २१ जन्म कधी दुःख आणि अशांतीची अनुभूती होणार नाही. सदैव सुखी रहाल. तीन गोष्टी जीवनात आवश्यक असतात - हेल्थ, वेल्थ आणि हैप्पी (आरोग्य, वैभव आणि आनंद). हे तिनही तुम्हा सर्वांना बाबांद्वारे वारशामध्ये प्राप्त झाले आहे. गॅरंटी आहे ना २१ जन्मांची? सर्वांनी गॅरंटी घेतली आहे? मागे बसलेल्यांना गॅरंटी मिळाली आहे? सगळे हात वर करत आहेत, खूप छान. संतान बनणे अर्थात बाबांद्वारे वारसा मिळणे. संतान बनत नाही आहात, बनत आहात का? संतान बनत आहात कि बनले आहात? संतान बनायचे नसते. जन्म घेतला आणि बनला. जन्म घेताच बाबांच्या वारशाचे अधिकारी बनलात. तर असे श्रेष्ठ भाग्य बाबांकडून आता प्राप्त केले. आणि मग रिचेस्ट देखील आहात. ब्राह्मण आत्मा, क्षत्रिय नाही ‘ब्राह्मण’. ब्राह्मण आत्मा निश्चयाने अनुभव करते कि मी श्रेष्ठ आत्मा, मी अमकी नाही, मी आत्मा रिचेस्ट इन द वर्ल्ड आहे. ब्राह्मण आहे तर रिचेस्ट इन द वर्ल्ड आहे कारण ब्राह्मण आत्म्यासाठी परमात्म आठवणीने प्रत्येक पावलामध्ये पदम आहे. तर संपूर्ण दिवसामध्ये किती पावले उचलत असाल? विचार करा. प्रत्येक पावलामध्ये पदम, तर संपूर्ण दिवसामध्ये किती पदम झाले? बाबांद्वारे असे आत्मे बनलात. मी ब्राह्मण आत्मा काय आहे, हे लक्षात राहणे हेच भाग्य आहे. तर आज बापदादा प्रत्येकाच्या मस्तकावर भाग्याचा चमकणारा तारा पाहत आहेत. तुम्ही देखील आपल्या भाग्याचा तारा बघत आहात ना?

बापदादा मुलांना पाहून खुश होतात का मुले बाबांना पाहून खुश होतात? कोण खुश होते? बाबा कि मुले? कोण? (मुले) बाबा खुश होत नाहीत? बाबा मुलांना पाहून खुश होतात आणि मुले बाबांना पाहून खुश होतात. दोघेही खुश होतात कारण मुले जाणतात कि हे प्रभु मिलन, हे परमात्म प्रेम, हा परमात्म वारसा, या परमात्म प्राप्ती आताच प्राप्त होतात. “अब नहीं तो कब नहीं” असे आहे ना?

बापदादा आता फक्त एका गोष्टीची मुलांकडून उजळणी करून घेत आहेत - ती कोणती गोष्ट असेल? समजला तर आहात. बापदादा हीच उजळणी करवून घेत आहेत कि, आता श्रेष्ठ समयाला समीप आणा. हा विश्वातील आत्म्यांचा आवाज आहे. परंतु आणणारे कोण आहेत? तुम्ही आहात कि आणखी कोणी आहेत? अशा आनंददायी श्रेष्ठ वेळेला समीप आणणारे तुम्ही सर्व आहात ना? जर असाल तर हात वर करा. अच्छा मग दुसरी गोष्ट सुद्धा आहे, ती देखील समजली आहे तेव्हाच हसत आहात ना? अच्छा, त्याची तारीख कोणती आहे? डेट तर फिक्स करा ना. आता डेट फिक्स केलीत ना कि फॉरेनर्सचा टर्न होणार आहे. तर मग ही डेट तर नक्की केलीत. तर ती वेळ समीप आणणाऱ्या आत्म्यांनो, सांगा बरे याची डेट कोणती आहे? ती नजरेत आहे का? आधी तुमच्या नजरेत येईल तेव्हा मग विश्वासमोर येईल. बापदादा जेव्हा अमृतवेलेला विश्वामध्ये फेरी मारतात तेव्हा बघून-बघून आणि ऐकून-ऐकून दया येते. मजेतही आहेत परंतु मजे सोबत गोंधळलेले देखील आहेत. तर बापदादा विचारत आहेत कि हे दात्याची मुले मास्टर दाता आपण कधी आपल्या मास्टर दातेपणाचा पार्ट तीव्र गतीने विश्वासमोर प्रत्यक्ष करणार? की अजून पडद्यामागे तयार होत आहात? तयारी करत आहात का? विश्व परिवर्तनाच्या निमित्त आत्म्यांनो आता विश्वाच्या आत्म्यांवर दया करा. होणार तर आहेच, हे तर निश्चित आहे आणि होणार देखील तुम्हा निमित्त आत्म्यांद्वारेच आहे. फक्त उशीर कोणत्या गोष्टीचा आहे? बापदादा हा एक सोहळा पाहू इच्छितात, कि प्रत्येक ब्राह्मण मुलाच्या हृदयामध्ये संपन्नता आणि संपूर्णतेचा झेंडा फडकलेला दिसावा. जेव्हा प्रत्येक ब्राह्मणामध्ये आतून संपूर्णतेचा झेंडा फडकेल तेव्हाच विश्वामध्ये बाबांच्या प्रत्यक्षतेचा झेंडा फडकेल. तर हा झेंडा रोहणाचा सोहळा बापदादा पाहू इच्छितात. जसा शिवरात्रीला शिव अवतरणाचा झेंडा फडकवता, तसा आता शिव शक्ती पांडव अवतरणाचा आवाज बुलंद व्हावा. एक गाणे लावता ना - ‘शिव शक्तियाँ आ गई…’. आता विश्वाने हे गाणे गावे कि, ‘शिव सोबत शक्ती आणि पांडव प्रत्यक्ष झाले’. पडद्यामागे कधी पर्यंत राहणार! पडद्यामागे राहणे चांगले वाटते? थोडे-थोडे चांगले वाटते! चांगले वाटत नाही ना, तर मग हा पडदा कोण काढणार? बाबा काढणार का? कोण काढणार? ड्रामा काढणार कि तुम्ही काढणार? जर तुम्ही काढणार आहात तर उशीर कशासाठी? तर मग असेच समजू ना कि तुम्हाला पडद्यामागे राहणे चांगले वाटते? बस, बाप-दादांची आता फक्त हि एकच श्रेष्ठ आशा आहे, सर्वांनी गाणे गावे वाह! ‘आले, आले, आले’. हे होऊ शकते का? पहा सर्व दादी म्हणत आहेत होऊ शकते मग होत का नाहीये? कारण काय आहे? जर सर्वच होय-होय करत आहेत, तर मग कारण काय आहे? (सर्वजण संपन्न बनलेले नाहीत) का बनले नाही आहेत? डेट सांगा ना! (डेट तर बाबा तुम्ही सांगावी) बापदादांचा महामंत्र लक्षात आहे? बापदादा काय म्हणतात? ‘कधी’ नाही ‘आत्ता’. (दादी जी म्हणत आहेत - बाबा अंतिम डेट तुम्हीच सांगा) अच्छा, बापदादा जी डेट सांगतील त्यामध्ये स्वतःला मोल्ड करून निभावणार? पांडव निभावणार का? नक्की? जर खाली-वर केलेत तर काय करावे लागेल? (तुम्ही डेट द्याल तर कोणी खाली-वर करणार नाही) अभिनंदन. अच्छा. आता डेट सांगतो, बघा. पहा, बापदादा तरी देखील दयाळू आहेत, तर बापदादा डेट सांगत आहेत लक्ष देऊन ऐका.

बापदादा सर्व मुलांकडून हीच श्रेष्ठ भावना ठेवतात, आशा ठेवतात - कमीत-कमी ६ महिन्यांमध्ये, ६ महिने कधीपर्यंत पूर्ण होतील? (मे मध्ये) मे मध्ये “मी”, “मी” समाप्त. बापदादा तरीही अवधी देत आहेत कि कमीत-कमी या ६ महिन्यांमध्ये, जे बापदादांनी या अगोदर देखील सांगितले आहे आणि यापूर्वीच्या सीझनमध्ये सुद्धा काम दिले होते, कि स्वतःला जीवनमुक्त स्थितीच्या अनुभवामध्ये आणा. सतयुगाच्या सृष्टीतील जीवन-मुक्ती नाही, संगमयुगातील जीवनमुक्त स्टेज. कोणतेही विघ्न, परिस्थिती, साधन किंवा मी आणि माझेपणा, बॉडी-कॉन्शिअसवाला ‘मी’ आणि बॉडी-कॉन्शिअसवाल्या सेवेचा ‘माझे’, या सर्व प्रकारच्या प्रभावापासून मुक्त रहा. असे म्हणू नका कि, ‘मी तर मुक्त राहू इच्छित होतो परंतु हे विघ्न आले ना, हि गोष्टच खूप मोठी झाली ना. छोटी गोष्ट तर चालून जाते, हि खूप मोठी गोष्ट होती, हा खूप मोठा पेपर होता, मोठे विघ्न होते, मोठी परिस्थिती होती’. कितीही मोठ्यात मोठी परिस्थिती, विघ्न, साधनांचे आकर्षण सामना करु देत, सामना करेल हे आधीच सांगत आहे परंतु कमीत-कमी ६ महिन्यांमध्ये ७५ टक्के मुक्त होऊ शकता का? बापदादा १०० टक्के म्हणत नाहीत, ७५ टक्के, पाऊण पर्यंत जेव्हा याल तेव्हाच तर पुर्णत्वाकडे पोहोचाल ना! तर ६ महिन्यांमध्ये, एक महिना नाही तर ६ महिने देत आहे, वर्षाचा अर्धा भाग. तर काय हि डेट निश्चित करू शकता? बघा, दादींनी म्हटले आहे फिक्स करा, दादींचा आदेश तर मानायचा आहे ना! रिझल्ट पाहून तर बापदादा स्वतःच आकर्षित होतील, सांगण्याची देखील गरज भासणार नाही. तर ६ महिने आणि ७५ टक्के, १०० म्हणत नाही आहेत. त्यासाठी मग पुढे वेळ देईन. तर, तुम्ही यासाठी एव्हररेडी आहात? एव्हररेडी नाही ६ महिन्यांमध्ये रेडी. मान्य आहे कि थोडी हिम्मत कमी आहे, माहित नाही काय होईल? वाघ देखील येईल, मांजर देखील येईल, सगळे येतील. विघ्न सुद्धा येतील, वेगवेगळ्या परिस्थिती देखील येतील, साधने देखील वाढतील परंतु साधनांच्या प्रभावापासून मुक्त रहा. मान्य असेल तर हात वर करा. टी.व्ही. फिरवा. व्यवस्थित हात वर करा, खाली करू नका. सिन खूप छान वाटत आहे. अच्छा, इन ॲडव्हान्स अभिनंदन.

असे म्हणू नका की, आम्हाला तर खूप मरावे लागेल, मरा किंवा जगा परंतु बनायचे आहे. हे मरणे गोड मरणे आहे, या मरण्यामध्ये दुःख होत नाही. हे मरणे अनेकांच्या कल्याणाकरिता मरणे आहे, त्यामुळे या मरण्यामध्ये मजा आहे. दुःख नाही, सुख आहे. कोणतीही सबब सांगू नका, ‘असे झाले ना, म्हणून असे झाले’. बहाणेबाजी चालणार नाही. बहाणेबाजी करणार का? नाही करणार ना! उडत्या कलेचा डाव खेळा दुसरा कोणताही डाव नको. उतरत्या कलेचा डाव, बहाण्यांचा डाव, कमजोरीचा डाव हे सर्व बंद. उडत्या कलेचा डाव. ठीक आहे ना! सर्वांचे चेहरे तर खुलले आहेत. जेव्हा ६ महिन्यानंतर भेटायला याल तेव्हा चेहरे कसे असतील. तेव्हा देखील फोटो काढणार.

डबल फॉरेनर्स आले आहेत ना तर डबल प्रतिज्ञा करण्याचा दिवस आला. दुसऱ्या कोणालाही पाहू नका, सी फादर, सी ब्रह्मा मदर (बाबांना पहा, ब्रह्मा आईला पहा). दुसरा करो ना करो, करतील तर सर्वच तरीही त्यांच्याप्रती देखील दया भाव ठेवा. कमजोर असणाऱ्यांना शुभ भावनेचे बळ द्या, कमजोरी पाहू नका. अशा आत्म्यांना आपल्या धैर्याने उचलून धरा, उन्नत करा. हा धैर्याचा हात सदैव स्वयंप्रति आणि सर्वांप्रति पुढे करत रहा. हा हिंमतीचा हात खूप शक्तिशाली आहे. आणि बापदादांचे वरदान आहे - हिंमतीचे एक पाऊल मुलांचे, हजार पावले बाबांच्या मदतीची. नि:स्वार्थ पुरुषार्थामध्ये आधी मी. नि:स्वार्थ पुरुषार्थ, स्वार्थी पुरुषार्थ नाही, नि:स्वार्थ पुरुषार्थ यामध्ये जो ओटे (स्वतःहून पुढे येईल) तो ब्रह्मा बाप समान.

ब्रह्मा बाबांवर प्रेम तर आहे ना! तेव्हाच तर ब्रह्माकुमारी किंवा ब्रह्माकुमार म्हणतात ना! जेव्हा चॅलेंज करता कि सेकंदामध्ये जीवन-मुक्तीचा वारसा घ्या तर आता सेकंदामध्ये स्वतःला मुक्त करण्याकडे लक्ष द्या. आता वेळेला समीप आणा. तुमच्या संपूर्णतेची समीपता, श्रेष्ठ समयाला समीप आणेल. मालक आहात ना, राजा आहात ना! स्वराज्य अधिकारी आहात? तर ऑर्डर करा. राजा ऑर्डर तर करतो ना! हे करायचे नाही, हे करायचे आहे. बस्स, ऑर्डर करा. आता-लगेच पहा मनाला, कारण मन आहे मुख्यमंत्री. तर हे राजा, आपल्या मन-मंत्र्याला सेकंदामध्ये ऑर्डर करून अशरीरी, विदेही स्थितीमध्ये स्थित करू शकतोस का? करा ऑर्डर एका सेकंदामध्ये. (५ मिनिटे ड्रिल केले) अच्छा.

सदैव लवलीन आणि लक्की आत्म्यांना बापदादांद्वारे प्राप्त झालेल्या सर्व प्राप्तींनीयुक्त अनुभवी आत्म्यांना, स्वराज्य अधिकारी बनून अधिकाराद्वारे स्वराज्य करणाऱ्या शक्तीशाली आत्म्यांना, सदैव जीवनमुक्त स्थितीच्या अनुभवी हाईएस्ट आत्म्यांना, भाग्यविधात्याद्वारे श्रेष्ठ भाग्याच्या रेषे द्वारे लकीएस्ट आत्म्यांना, सदैव पवित्रतेच्या दृष्टी, वृत्ती द्वारे स्व परिवर्तन विश्व परिवर्तन करणाऱ्या होलीएस्ट आत्म्यांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.

डबल विदेशी पाहुण्यांसोबत (‘कॉल ऑफ टाइम’च्या प्रोग्राममध्ये आलेल्या पाहुण्यांसोबत संवाद):-

सर्वजण आपल्या स्वीट होममध्ये, स्वीट परिवारामध्ये पोहोचले आहात ना! हा छोटासा स्वीट परिवार सुंदर वाटतो ना! आणि तुम्ही देखील किती सुंदर झाला आहात! सर्वात अगोदर परमात्म्याचे प्रिय बनलात. बनला आहात ना! बनले आहात कि बनणार आहात? बघा, तुम्हा सर्वांना पाहून सगळे किती आनंदित होत आहेत. का आनंदित होत आहेत? सर्वांचे चेहरे पहा खूप आनंदित होत आहेत. का आनंदित होत आहेत? कारण जाणता कि हे सर्व गॉडली मेसेंजर (ईश्वरीय दूत) बनून आत्म्यांना संदेश देण्यासाठी निमित्त आत्मे आहेत. (पाचही खंडातील आहेत) तर पाचही खंडांमध्ये संदेश पोहोचणार , सोपे आहे ना. प्लॅन खूप चांगला बनवला आहे. यामध्ये परमात्म शक्ती भरून आणि परिवाराचा सहयोग घेऊन पुढे जात रहा. सर्वांचे संकल्प बापदादांपाशी पोहोचत आहेत. संकल्प खूप चांगले-चांगले चालले आहेत ना! प्लॅन बनत आहेत. तर प्लॅनला प्रॅक्टिकलमध्ये आणण्याची हिम्मत तुमची आणि मदत बाबांची आणि ब्राह्मण परिवाराची. फक्त निमित्त बनायचे आहे बस जास्त मेहनत करण्याची गरज नाही. मी परमात्म कार्यासाठी निमित्त आहे. कोणत्याही कार्यात याल तर, ‘बाबा, मी इन्स्ट्रुमेंट सेवेसाठी तयार आहे, मी इन्स्ट्रुमेंट आहे’, तर चालवणारा आपोआप चालवेल. हा निमित्त भाव तुमच्या चेहेऱ्यावर निर्माण आणि निर्मान भाव प्रत्यक्ष करेल. करावनहार निमित्त बनवून कार्य करून घेईल. माइक तुम्ही आणि माइट (शक्ती) बाबांची. तर सोपे आहे ना! तर निमित्त बनून आठवणीमध्ये उपस्थित रहा, बस्स. तर तुमचा चेहरा, तुमचे फीचर्स आपोआपच सेवेसाठी निमित्त बनतील. केवळ वाणीद्वारे सेवा करणार नाहीत परंतु फीचर्स मधून देखील तुमची आंतरिक ख़ुशी चेहेऱ्यावर दिसून येईल. यालाच म्हटले जाते अलौकिकता. आता अलौकिक झालात ना. लौकिकपणा संपला ना. ‘मी आत्मा आहे’ - हा झाला अलौकिकपणा. ‘मी अमका आहे’ - हा आहे लौकिकपणा. तर कोण आहात? अलौकिक कि लौकिक? अलौकिक आहात ना! चांगले आहे. बापदादा आणि परिवारा समोर पोहोचलात, हि खूप चांगली हिम्मत ठेवलीत. बघा, तुम्ही देखील कोटींमध्ये काही निघालात ना. केवढा ग्रुप होता, त्यामधून किती आले आहात, तर कोटींमध्ये काही निघालात ना. छान आहे - बापदादांना ग्रुप पसंत आहे. आणि हे पहा किती खुश होत आहेत. तुमच्या पेक्षा जास्त हे खुश होत आहेत कारण सेवेचे रिटर्न समोर पाहून खुश होत आहेत. खुश होत आहात ना - मेहनतीचे फळ मिळाले. अच्छा. आता तर बालक सो मालक आहात. बालक मास्टर आहे. मुलांना नेहमी म्हटले जाते मास्टर. अच्छा!

वरदान:-
सफल करण्याच्या विधीद्वारे सफलतेचे वरदान प्राप्त करणारे वरदानी मूर्त भव

संगमयुगावर तुम्हा मुलांना वारसा देखील आहे तर वरदान देखील आहे कि “सफल करा आणि सफलता मिळवा” सफल करणे आहे - ‘बीज’ आणि सफलता आहे - ‘फळ’. जर बीज चांगले असेल तर फळ मिळणार नाही असे होऊ शकत नाही. तर जसे दुसऱ्यांना सांगता कि समय, संकल्प, संपत्ती सगळे सफल करा. असे आपल्या सर्व खजिन्यांच्या लिस्टला चेक करा कि कोणता खजिना सफल झाला आणि कोणता व्यर्थ गेला. सफल करत रहा तर सर्व खजिन्यांनी संपन्न वरदानी मूर्त बनाल.

सुविचार:-
परमात्म ॲवार्ड घेण्यासाठी व्यर्थ आणि निगेटिव्हला अव्हाइड करा (नकारात्मकतेला टाळा).