07-07-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्ही खूप रॉयल विद्यार्थी आहात, तुम्हाला पिता, टीचर आणि सद्गुरुच्या आठवणीमध्ये रहायचे आहे, अलौकिक सेवा करायची आहे”

प्रश्न:-
जे स्वतःला बेहदचा पार्टधारी समजून चालतात, त्यांचे लक्षण सांगा?

उत्तर:-
त्यांच्या बुद्धीमध्ये कोणतीही सूक्ष्म अथवा स्थूल देहधारीची आठवण असणार नाही. ते एका बाबांची आणि शांतीधाम घराची आठवण करत राहतील कारण बलिहारी एकाचीच आहे. जसे बाबा संपूर्ण दुनियेची खिदमत (सेवा) करतात, पतितांना पावन बनवतात, तशी मुले देखील बाबांप्रमाणे खिदमतगार (सेवाधारी) बनतात.

ओम शांती।
सर्वप्रथम बाबा मुलांना सावधान करतात. इथे बसता तर स्वतःला आत्मा समजून बाबांसमोर बसला आहात? हे देखील बुद्धीमध्ये आणा की आम्ही बाबांच्या देखील समोर बसलो आहोत, टिचरच्याही समोर बसलो आहोत. नंबर वन गोष्ट आहे - आम्ही आत्मा आहोत, बाबा देखील आत्मा आहेत, टीचर देखील आत्मा आहेत, गुरु देखील आत्मा आहेत. एकच आहेत ना. ही नवी गोष्ट तुम्ही ऐकता. तुम्ही म्हणाल - ‘बाबा, आम्ही तर कल्प-कल्प हे ऐकतो’. बुद्धीमध्ये हे लक्षात रहावे, बाबा शिकवतात आणि मी आत्मा या ऑर्गन्स द्वारे ऐकते. हे ज्ञान याचवेळी उच्च ते उच्च भगवंताद्वारे तुम्हा मुलांना मिळते. ते सर्व आत्म्यांचे पिता आहेत, जे वारसा देतात. काय ज्ञान देतात? सर्वांची सद्गती करतात म्हणजेच घरी घेऊन जातात. कितीजणांना घेऊन जातील? हे सर्व तुम्ही जाणता. मच्छरांसदृश्य सर्व आत्म्यांना जायचे आहे. सतयुगामध्ये एकच धर्म, पवित्रता-सुख-शांती सर्व असते. तुम्हा मुलांना चित्रावरून समजावून सांगणे खूप सोपे आहे. मुले देखील नकाशावरून समजतात ना. इंग्लंड आहे, हे आहे मग ते लक्षात राहते. हे देखील असेच आहे. एका-एका स्टुडंटला समजावून सांगायचे असते, महिमा देखील एकाचीच आहे - शिवाय नमः उच्च ते उच्च भगवान. रचता पिता घरचा मोठा असतो ना. तो हद चा, हा आहे सर्व बेहदच्या घराचा पिता. हे मग टीचर देखील आहेत. तुम्हाला शिकवतात. तर तुम्हा मुलांना खूप आनंद झाला पाहिजे. तुम्ही स्टुडंट देखील रॉयल आहात. बाबा म्हणतात - ‘मी साधारण तनामध्ये येतो’. प्रजापिता ब्रह्मा देखील जरूर इथे हवेत. त्यांच्याशिवाय काम कसे होऊ शकते. आणि जरूर वृद्धच हवेत कारण दत्तक आहेत ना. तर वृद्ध हवेत. श्रीकृष्ण काही ‘मुलांनो-मुलांनो’ असे म्हणू शकणार नाही. वृद्ध शोभतात. मुलाला थोडेच कोणी बाबा म्हणेल. तर मुलांना देखील लक्षात आले पाहिजे की, आपण कोणाच्या समोर बसलो आहोत. आतून आनंद देखील झाला पाहिजे. स्टुडंट कुठेही बसले असतील त्यांच्या बुद्धीमध्ये बाबांची देखील आठवण येते. टिचरची देखील आठवण येते. त्यांच्यासाठी (दुनियावाल्यांसाठी) तर पिता वेगळा आणि टीचर वेगळा असतो. तुमचे तर एकच पिता-टीचर-गुरु आहेत. हे बाबा (ब्रह्मा बाबा) देखील स्टुडंट आहेत. शिकत आहेत. फक्त लोनवर रथ (शरीर) दिलेला आहे बाकी काही फरक नाही. बाकी तुमच्यासारखेच आहेत. यांची आत्मा देखील तेच समजते जे तुम्ही समजता. बलिहारी आहेच मुळी एकाची. त्यांनाच प्रभू ईश्वर म्हणतात. हे (ब्रह्मा बाबा) देखील म्हणतात स्वतःला आत्मा समजून एका परमात्म्याची आठवण करा, बाकी सर्व सूक्ष्म आणि स्थूल देहधाऱ्यांना विसरून जा. तुम्ही शांतीधामचे राहणारे आहात. तुम्ही आहात बेहदचे पार्टधारी. या गोष्टी इतर कोणीही जाणत नाही. दुनियाभरामध्ये कोणालाच माहीत नाही आहे, इथे जे येतात ते समजतात. आणि बाबांच्या सेवेमध्ये येतात जातात. ईश्वरीय खिदमतगार (ईश्वरीय सेवाधारी) झाले ना. बाबा देखील आले आहेत सेवा करण्याकरिता. पतितांना पावन बनविण्याची सेवा करतात. राज्य गमावून मग जेव्हा दुःखी होतात तेव्हा बाबांना बोलावतात. ज्याने राज्य दिले आहे, त्यालाच बोलावतील.

तुम्ही मुले जाणता बाबा सुखधामचा मालक बनविण्यासाठी आले आहेत. दुनियेमध्ये हे कोणालाच माहित नाही आहे. आहेत तर सर्व भारतवासी एका धर्माचे. हा आहेच मुख्य धर्म. तर जरूर तो जेव्हा नसेल तेव्हाच तर बाबा येऊन स्थापन करतील. मुले समजतात भगवान ज्याला संपूर्ण दुनिया अल्लाह गॉड म्हणून बोलावते, ते इथे ड्रामा अनुसार कल्पापूर्वी प्रमाणे आले आहेत. हा आहे गीतेचा एपिसोड, ज्यामध्ये बाबा येऊन स्थापना करतात. गायले देखील जाते - ‘ब्राह्मण आणि देवी-देवता…’ क्षत्रिय म्हणत नाहीत. ‘ब्राह्मण देवी-देवता नमः’ म्हणतात कारण क्षत्रिय तर तरीही २ कला कमी झाल्या ना. स्वर्ग म्हटलेच जाते नव्या दुनियेला. त्रेताला नवी दुनिया थोडीच म्हणणार. सर्वप्रथम सतयुगामध्ये आहे एकदम नवीन दुनिया. ही आहे जुन्यात जुनी दुनिया. मग नवीन ते नवीन दुनियेमध्ये जाऊ. आपण आता त्या दुनियेमध्ये जातो तेव्हाच तर मुले म्हणतात आम्ही नरापासून नारायण बनतो. कथा देखील आम्ही सत्य नारायणाची ऐकतो. प्रिन्स बनण्याची कथा म्हणत नाहीत. सत्यनारायणाची कथा आहे. ते नारायणाला वेगळे समजतात परंतु नारायणाची काही जीवन कहाणी तर नाहीये. ज्ञानाच्या गोष्टी तर खूप आहेत ना म्हणून ७ दिवस दिले जातात. ७ दिवस भट्टीमध्ये रहावे लागेल. परंतु असेही नाही इथेच भट्टीमध्ये रहायचे आहे. असे तर मग भट्टीचा बहाणा करून पुष्कळजण येतील. अभ्यास सकाळी आणि संध्याकाळी केला जातो. दुपारी वायूमंडळ चांगले नसते, रात्री सुद्धा १० ते १२ पर्यंतचा वेळही एकदम खराब आहे. इथे तुम्हा मुलांना देखील आठवणीमध्ये राहून सतोप्रधान बनण्याची मेहनत करायची आहे. तिथे तर संपूर्ण दिवस काम-धंद्यामध्ये व्यस्त राहता. असे देखील खूप असतात जे कामधंदा करत असताना जास्त चांगली नोकरी करण्यासाठी मग पुढचे शिक्षण देखील करतात. इथे देखील तुम्ही शिकता तर टीचरची आठवण करावी लागेल जे शिकवतात. ठीक आहे, टीचर समजूनच आठवण करा तरी देखील तिघांचीही एकत्र आठवण येईल - पिता, टीचर, गुरु, तुमच्यासाठी खूप सोपे आहे तर लगेच लक्षात आले पाहिजे. हे आमचे पिता देखील आहेत, टीचर आणि गुरु देखील आहेत. उच्च ते उच्च पिता आहेत ज्यांच्याकडून आपण स्वर्गाचा वारसा घेत आहोत. आम्ही स्वर्गामध्ये जरूर जाणार. स्वर्गाची स्थापना जरूर होणार आहे. तुम्ही पुरुषार्थ फक्त उच्च पद मिळविण्यासाठी करता. हे देखील तुम्ही जाणता. लोकांना देखील माहित होईल, तुमचा आवाज पसरत राहील. तुम्हा ब्राह्मणांचा अलौकिक धर्म आहे - श्रीमतानुसार अलौकिक सेवेमध्ये तत्पर राहणे. हे देखील लोकांना माहित होईल की तुम्ही श्रीमतावर किती श्रेष्ठ काम करत आहात. तुमच्यासारखी अलौकिक सेवा कोणीही करू शकत नाही. तुम्ही ब्राह्मण धर्मवालेच असे कर्म करता. तर अशा कामामध्ये व्यस्त झाले पाहिजे, यातच बिझी राहिले पाहिजे. बाबा देखील बिझी राहतात ना. तुम्ही राजधानी स्थापन करत आहात. ते (दुनियावाले) तर पंचायत मिळून फक्त पालना करत राहतात. इथे तुम्ही गुप्त वेशामध्ये काय करत आहात. तुम्ही आहात इनकॉग्निटो, अननोन वॉरियर्स, नॉन व्हायलेंस (गुप्त, गुप्त योद्धे, अहिंसक). याचा अर्थ देखील कोणी समजत नाही. तुम्ही आहात डबल अहिंसक सेना. मोठी हिंसा तर ही विकाराची आहे, जी पतित बनवते. यालाच जिंकायचे आहे. भगवानुवाच काम महाशत्रू आहे, यावर विजय प्राप्त केल्यानेच तुम्ही जगतजीत बनाल. हे लक्ष्मी-नारायण जगतजीत आहेत ना. भारत जगतजीत होता. हे विश्वाचे मालक कसे बनले! हे देखील बाहेरचे समजू शकत नाहीत. या गोष्टी समजण्यासाठी बुद्धी खूप विशाल पाहिजे. मोठ्या-मोठ्या परीक्षांचा अभ्यास करणाऱ्यांची विशाल-बुद्धी असते ना. तुम्ही श्रीमतावर आपले राज्य स्थापन करता. तुम्ही कोणालाही समजावून सांगू शकता की, विश्वामध्ये शांती होती ना, दुसरे कोणते राज्य नव्हते. स्वर्गामध्ये अशांती असू शकत नाही. स्वर्गाला म्हणतातच गार्डन ऑफ अल्लाह (ईश्वराचा बगीचा). फक्त बगीचा थोडाच असेल. मनुष्य देखील हवेत ना. आता तुम्ही मुले जाणता आपण बहिश्तचे (स्वर्गाचे) मालक बनत आहोत. तुम्हा मुलांना किती अभिमान वाटला पाहिजे आणि उच्च विचारांचे असले पाहिजे. तुम्हाला बाहेरच्या कोणत्याही सुखाची इच्छा नाहीये. यावेळी तुम्हाला अगदी सिंपल (साधेपणाने) रहायचे आहे. आता तुम्ही सासरी जाता. हे आहे माहेर घर. इथे तुम्हाला दोन पिता भेटले आहेत. एक निराकार उच्च ते उच्च, दुसरा मग साकार तोही उच्च ते उच्च. आता तुम्ही सासरी ‘विष्णुपुरी’मध्ये जाता. त्याला ‘कृष्णपुरी’ म्हणणार नाही. लहान मुलाची कधी ‘पुरी’ नसते. ‘विष्णुपुरी’ अर्थात लक्ष्मी-नारायणाची पुरी. तुमचा आहे राजयोग. तर जरूर नरापासून नारायण बनाल.

तुम्ही मुले आहात खरेखुरे खुदाई खिदमतगार (खरेखुरे ईश्वरीय सेवाधारी). बाबा खरा खुदाई खिदमतगार त्याला म्हणतात जो कमीतकमी ८ तास आत्म-अभिमानी राहण्याचा पुरुषार्थ करतो. कोणतेही कर्मबंधन राहत नाही तेव्हा खिदमतगार बनू शकता आणि कर्मातीत अवस्था होऊ शकते. नरापासून नारायण बनायचे असेल तर कर्मातीत अवस्था जरूर हवी. कर्मबंधन असेल तर सजा भोगावी लागेल. मुले स्वतः समजतात - आठवणीची मेहनत खूप कठीण आहे. युक्ती खूप सोपी आहे, फक्त बाबांची आठवण करायची आहे. भारताचा प्राचीन योग प्रसिद्ध आहे. योगासाठीच नॉलेज आहे, जे बाबा येऊन शिकवतात. श्रीकृष्ण काही योग थोडाच शिकवतात. श्रीकृष्णाला मग स्वदर्शन चक्र दिले आहे. ते देखील चित्र किती चुकीचे आहे. आता तुम्हाला कोणत्या चित्र इत्यादीची देखील आठवण करायची नाहीये. सर्व काही विसरा. कोणातही बुद्धी जाऊ नये, लाइन क्लिअर असावी. हा आहे अभ्यासाचा वेळ. दुनियेला विसरून स्वतःला आत्मा समजा आणि बाबांची आठवण करा, तेव्हाच पापे नष्ट होतील. बाबा म्हणतात - सर्वात आधी तुम्ही अशरीरी आला होता, आता तुम्हाला परत जायचे आहे. तुम्ही ऑलराऊंडर आहात. ते असतात हदचे ॲक्टर्स, तुम्ही आहात बेहदचे. आता तुम्ही समजता आपण अनेकदा पार्ट बजावला आहे. अनेकदा तुम्ही बेहदचे मालक बनता. या बेहदच्या नाटकामध्ये मग छोटी-छोटी नाटके देखील अनेक वेळा चालत राहतात. सतयुगापासून कलियुगापर्यंत जे काही झाले आहे ते रिपीट होत राहते. सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुमच्या बुद्धीमध्ये आहे. मूलवतन, सूक्ष्मवतन आणि सृष्टीचे चक्र, बस्स, इतर कोणत्याही धामशी तुमचे काहीच काम नाही. तुमचा धर्म खूप सुख देणारा आहे. त्यांची जेव्हा वेळ येईल तेव्हा ते येतील. नंबरवार जसे-जसे आले आहेत, त्याच पद्धतीने मग परत जातील. आम्ही बाकीच्या धर्मांचे काय वर्णन करणार! तुम्हाला फक्त एका बाबांचीच आठवण करायची आहे. चित्र इत्यादी हे सर्व विसरून एका बाबांचीच आठवण करायची आहे. ब्रह्मा-विष्णू-शंकराची देखील नाही फक्त एकाचीच. ते समजतात - परमात्मा लिंग आहे. आता लिंगाप्रमाणे कोणती गोष्ट असू कशी शकते. ते मग ज्ञान कसे ऐकवतील. काय प्रेरणेने कोणता लाऊड स्पीकर ठेवतील जे तुम्ही ऐकाल. प्रेरणेने तर काहीच होत नाही. असे नाही, शंकराला प्रेरित करतात. हे सर्व ड्रामामध्ये आधीपासूनच नोंदलेले आहे. विनाश तर होणार आहेच. जसे तुम्ही आत्मे शरीराद्वारे बोलता, तसे परमात्मा देखील तुम्हा मुलांशी बोलतात. त्यांचा पार्टच दिव्य अलौकिक आहे. पतितांना पावन बनविणारे एकच बाबा आहेत. म्हणतात - माझा पार्ट सर्वात वेगळा आहे. कल्पापूर्वी जे आले असतील ते येत राहतील. जे काही होऊन गेले ड्रामा, त्यामध्ये जराही बदल होत नाही. मग पुरुषार्थाची काळजी घ्यायची आहे. असे नाही ड्रामा अनुसार आमचा कमी पुरुषार्थ चालतो; मग तर पद देखील खूप कमी दर्जाचे होईल. पुरुषार्थाला तीव्र केले पाहिजे. ड्रामावर सोडून द्यायचे नाही. आपल्या चार्टला बघत रहा. वाढवत रहा. नोंद ठेवा - माझा चार्ट वाढत जात आहे, कमी तर होत नाहीये. खूप खबरदारी घेतली पाहिजे. इथे तुमचा आहे ब्राह्मणांचा संग. बाहेर सर्व आहे कुसंग. ते सर्वजण उलटेच ऐकवतात. आता बाबा तुम्हाला कुसंगातून बाहेर काढतात.

लोकांनी कुसंगतीमध्ये येऊन आपले राहणीमान, आपली वेशभूषा इत्यादी सर्व बदलून टाकले आहे, देश-वेशच बदलून टाकला आहे, हा देखील जसा आपल्या धर्माचा अपमान केला आहे. बघा कशी-कशी हेअर स्टाईल करतात. देह-अभिमान येतो. शंभर-दीडशे रुपये फक्त हेअर स्टाईल करण्यासाठी देतात. याला म्हटले जाते अति देह-अभिमान. ते मग कधी ज्ञान घेऊ शकणार नाहीत. बाबा म्हणतात - अगदी सिंपल (साधारण) बना. उंची साडी नेसल्याने देखील देह-अभिमान येतो. देह-अभिमान तोडण्यासाठी सर्व हलके केले पाहिजे (साधारण राहिले पाहिजे). उत्तम दर्जाची वस्तू देह-अभिमानामध्ये आणते. तुम्ही यावेळी वनवासामध्ये आहात ना. प्रत्येक वस्तूमधून मोह काढून टाकायचा आहे. अतिशय साधारण रहायचे आहे. लग्न इत्यादी मध्ये भले रंगीत कपडे इत्यादी घालून जा, तोड निभावण्यासाठी घातले, परत घरी येऊन काढून टाकले. तुम्हाला तर वाणीपासूनही दूर जायचे आहे. वानप्रस्थी सफेद पोशाखामध्ये असतात. तुम्ही प्रत्येक जण लहान-थोर सर्व वानप्रस्थी आहात. लहान मुलांना देखील शिवबाबांचीच आठवण करून द्यायची आहे. यातच कल्याण आहे. बस्स, आता आम्हाला जायचे आहे शिवबाबांकडे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) कायम लक्ष रहावे की माझे कोणतेही वर्तन देह-अभिमानवाले असू नये. अगदी साधारण रहायचे आहे. कोणत्याही वस्तूमध्ये मोह ठेवायचा नाही. कुसंगती पासून आपले रक्षण करायचे आहे.

२) आठवणीच्या मेहनतीद्वारे सर्व कर्मबंधनांना तोडून कर्मातीत बनायचे आहे. कमीतकमी आठ तास आत्म-अभिमानी राहून खरेखुरे खुदाई खिदमतगार (खरेखुरे ईश्वरीय सेवाधारी) बनायचे आहे.

वरदान:-
विशाल बुद्धी आणि विशाल मनाने आपलेपणाची अनुभूती करविणारे मास्टर रचयिता भव

मास्टर रचयित्याची पहिली रचना - हा देह आहे. जे या देहाच्या मालकीपणामध्ये संपूर्ण सफलता प्राप्त करतात, ते आपल्या स्नेह आणि संपर्काद्वारे सर्वांना आपलेपणाचा अनुभव करवितात. त्या आत्म्याच्या संपर्काने सुखाची, दातापणाची, शांती, प्रेम, आनंद, सहयोग, हिंमत, उत्साह, उमंग कोणत्या ना कोणत्या विशेषतेची अनुभूती होते. त्यांनाच म्हटले जाते - विशाल बुद्धी, विशाल दिलवाले.

बोधवाक्य:-
उमंग-उत्साहाच्या पंखांद्वारे कायम उडत्या कलेची अनुभूती करत चला.

अव्यक्त इशारे - संकल्पांची शक्ती जमा करून श्रेष्ठ सेवेच्या निमित्त बना:-

स्वतःला श्रेष्ठ संकल्पांनी संपन्न बनविण्याकरिता ट्रस्टी बनून रहा; ट्रस्टी बनणे अर्थात डबल लाईट फरिश्ता बनणे. अशा मुलांचा प्रत्येक श्रेष्ठ संकल्प सफल होतो. एक श्रेष्ठ संकल्प मुलाचा आणि हजार श्रेष्ठ संकल्पांचे फळ बाबांद्वारे प्राप्त होते. एकाचे हजार पटीने मिळते.