07-09-25    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   31.12.2006  ओम शान्ति   मधुबन


“दृढता आणि परिवर्तन शक्तीद्वारे ‘कारण’ आणि ‘समस्या’ या शब्दांना निरोप देऊन ‘निवारण’ आणि ‘समाधान’ स्वरूप बना”


आज नवयुग रचता बापदादा आपल्या चोहो बाजूच्या मुलांना नवीन वर्ष आणि नवीन युग दोन्हीची मुबारक देण्यासाठी आले आहेत. चोहो बाजूची मुले देखील मुबारक देण्यासाठी पोहोचले आहेत. केवळ नवीन वर्षाची मुबारक देण्यासाठी आला आहात का नवयुगाची देखील मुबारक देण्यासाठी आला आहात? जसा नवीन वर्षाचा आनंद होतो आणि आनंद देतात. तर तुम्हा ब्राह्मण आत्म्यांना नवीन युग सुद्धा इतके लक्षात आहे? नवयुग डोळ्यासमोर आले का? जसे नवीन वर्षासाठी मनामध्ये येत आहे की, आले की आले, तसेच आपल्या नवीन युगासाठी इतका अनुभव करता का की आले की आले? त्या नवयुगाची स्मृती इतकी समीप येते का? तो शरीर रुपी आपला ड्रेस चमकत असलेला डोळ्यासमोर येत आहे का? बापदादा डबल मुबारक देत आहेत. मुलांच्या मनामध्ये, डोळ्यांमध्ये नवयुगाची दृश्ये इमर्ज आहेत, आपल्या नवीन युगामध्ये तन-मन-धन-जन किती श्रेष्ठ आहे, सर्व प्राप्तींचे भांडार आहे. आनंद होत आहे की आज जुन्या दुनियेमध्ये आहोत आणि आता-लगेच आपल्या राज्यामध्ये असणार! लक्षात आहे आपले राज्य? जसे आज डबल कार्यासाठी आला आहात, जुन्याला निरोप द्यायला आणि नवीन वर्षाला शुभेच्छा देण्यासाठी आला आहात. तर केवळ जुन्या वर्षाला निरोप देण्यासाठी आला आहात की जुन्या दुनियेचे जुने संस्कार, जुने स्वभाव, जुने वर्तन यांना देखील निरोप देण्यासाठी आला आहात? जुन्या वर्षाला निरोप देणे तर सोपे आहे, परंतु जुन्या संस्कारांना निरोप देणे सुद्धा इतके सोपे वाटते का? काय समजता? मायेला सुद्धा निरोप देण्यासाठी आला आहात की वर्षाला निरोप देण्यासाठी आला आहात? निरोप द्यायचा आहे ना! का मायेवर थोडे प्रेम आहे? थोडे-थोडे ठेवू इच्छिता का?

बापदादा आज चोहो बाजूच्या मुलांकडून जुने संस्कार, स्वभावाला निरोप द्यायला लावू इच्छित आहेत. देऊ शकता का? हिंमत आहे की विचार करता निरोप देण्याची इच्छा आहे परंतु मग माया येते! काय आजच्या दिवशी दृढ संकल्पाच्या शक्तीद्वारे जुन्या संस्कारांना निरोप देऊन नवीन युगाच्या संस्कारांचे, आयुष्याचे अभिनंदन करण्याची हिंमत आहे? आहे का हिंमत? जे समजतात होऊ शकते, होऊ शकते, का होणारच आहे, आहात हिंमतवाले? जे समजतात की, हिंमत आहे त्यांनी हात वर करा. हिंमत आहे? अच्छा ज्यांनी हात वर केलेला नाही ते विचार करत आहेत का? डबल फॉरेनर्सनी हात वर केला, ज्यांच्यामध्ये हिंमत आहे त्यांनी हात वर करा, सर्वांनी नाही. अच्छा, डबल फॉरेनर्स तर हुशार आहेत. डबल नशा आहे म्हणून. बघा, बापदादा दर महिन्याला रिझल्ट बघतील. बापदादांना आनंद होत आहे की हिंमतवान मुले आहेत. चतुराईने उत्तर देणारी मुले आहेत. का? कारण जाणतात की एक पाऊल आमचे हिंमतीचे आणि हजारो पावले बाबांची मदत तर मिळणारच आहे. अधिकारी आहात. हजार पावले मदतीचे अधिकारी आहात. फक्त हिंमतीला माया हलविण्याचा प्रयत्न करते. बापदादा पाहतात की हिंमत चांगली ठेवतात, बापदादा अंतःकरणापासून मुबारक सुद्धा देतात परंतु हिंमत ठेवून मग त्या सोबत आपल्या आत व्यर्थ संकल्प उत्पन्न करतात - करत तर आहोत, व्हायला तर हवे, करणार तर जरूर, माहित नाही… ‘माहित नाही’ असा संकल्प येणे हा हिंमतीला कमजोर करतो. ‘तर-तर’ होते ना, ‘करत तर आहोत, करायचे तर आहेच… पुढे उडायचे तर आहे…’ हे ‘तर’ हिंमतीला डळमळीत करतात. ‘तर’ चा विचार करू नका, करायचेच आहे. का नाही होणार! जेव्हा बाबा सोबत आहेत, तर बाबांच्या सोबत ‘तर-तर’ येऊ शकत नाही.

तर या नवीन वर्षामध्ये काय करणार? हिंमतीच्या पावलाला मजबूत बनवा. हिंमतीचा पाय असा मजबूत बनवा जो माया स्वतः हलेल परंतु पाय हलू नये. तर नवीन वर्षामध्ये नवीनता करणार, की जसे कधी डगमगता तर कधी मजबूत राहता, असे तर करणार नाही ना! तुम्हा सर्वांचे कर्तव्य अथवा ऑक्युपेशन काय आहे? स्वतःला काय म्हणवता? आठवा जरा. विश्व कल्याणी, विश्व परिवर्तक, हे तुमचे ऑक्युपेशन आहे ना! तर बापदादांना कधी-कधी गोड-गोड हसू येते. विश्व परिवर्तक टायटल तर आहे ना! विश्व परिवर्तक आहात? की लंडन परिवर्तक, इंडिया परिवर्तक आहात? विश्व परिवर्तक आहात ना, सर्व? भले गावामध्ये राहता किंवा लंडन अथवा अमेरिकेमध्ये राहता परंतु विश्व कल्याणकारी आहात ना? असाल तर मान हलवा. पक्के ना! की ७५ टक्केच आहात. ७५ टक्के विश्व कल्याणी आणि २५ टक्के माफ आहे, असेका? तुमचे चॅलेंज कोणते आहे? प्रकृतीला देखील चॅलेंज केले आहे की, प्रकृतीला देखील परिवर्तन करायचेच आहे. तर आपले ऑक्युपेशन (मुख्य कार्य) आठवा. कधी-कधी स्वतःसाठी देखील विचार करता - करायला तर नाही पाहिजे परंतु होते. तर विश्व परिवर्तक, प्रकृति परिवर्तक, स्व परिवर्तक बनू शकत नाही? शक्ति सेना, तुम्हाला काय वाटते? या वर्षामध्ये तुमचे विश्व परिवर्तक हे ऑक्युपेशन लक्षात ठेवा. स्वयं प्रति अथवा आपल्या ब्राह्मण परिवारा प्रति देखील परिवर्तक बना कारण पहिले तर चॅरिटी बिगिन्स ॲट होम आहे ना! तर आपल्या ऑक्युपेशनचे प्रॅक्टिकल स्वरूप प्रत्यक्ष करणार ना! स्व परिवर्तन जे स्वतः देखील हवे आहे आणि बापदादा देखील इच्छितात, जाणता तर आहात ना! बापदादा विचारत आहेत की तुम्हा सर्व मुलांचे लक्ष्य काय आहे? तर मेजॉरिटी एकच उत्तर देतात की, बाप समान बनायचे आहे. बरोबर आहे ना! बाप समान बनायचेच आहे ना, की बघू, विचार करू...! तर बाबा देखील हेच इच्छित आहेत की या नविन वर्षामध्ये ७० वर्षे पूर्ण होत आहेत, (२००६ मध्ये) आता ७१ व्यावर्षामध्ये काहीतरी चमत्कार करून दाखवा. सर्वजण इतके सेवेच्या उमंगामध्ये विविध प्रोग्राम बनवत रहातात, सफल सुद्धा होत असतात, बापदादांना आनंद सुद्धा होतो की जी मेहनत करतात त्याची सफलता मिळते. व्यर्थ जात नाही परंतु सेवा कशासाठी करता? तर काय उत्तर देता? बाबांना प्रत्यक्ष करण्यासाठी. तर आज बाबा मुलांना प्रश्न विचारत आहेत, की बाबांना प्रत्यक्ष तर करायचेच आहे, करणारच आहात. परंतु बाबांना प्रत्यक्ष करण्यापूर्वी स्वतःला प्रत्यक्ष करा. शिव शक्ती, तुम्ही बोला या वर्षी शिव शक्तिच्या रूपामध्ये स्वतःला प्रत्यक्ष करणार? करणार ना? जनक तू बोल? करणार? (करायचेच आहे) सोबत बसलेल्या, पहिल्या लाईनमध्ये, दुसऱ्या लाईनमध्ये बसलेल्या टीचर्सनी हात वर करा जे या वर्षामध्ये करून दाखवतील. करणार, असे नाही, करून दाखवायचेच आहे. अच्छा - सर्व टीचर्सनी हात वर केला की काहींनी हात वर केलेला नाहीये.

अच्छा - मधुबन वाले. करायचेच आहे, करावे लागेल कारण की मधुबन तर जवळ आहे ना. तारीख लिहून ठेवा, ३१ तारीख आहे. वेळ देखील नोट करा (९ वाजून २० मिनिटे) आणि पांडव सेना, पांडवांनी काय दाखवायचे आहे? विजयी पांडव. कधी-कधीचे विजयी नाही, आहेतच विजयी पांडव. तर या वर्षामध्ये असे बनून दाखवा की म्हणाल - ‘काय करणार? माया आली ना, इच्छा तर नव्हती परंतु आली!’ बापदादांनी यापूर्वी देखील सांगितले आहे - माया शेवटच्या क्षणापर्यंत आपले येणे बंद करणार नाही. परंतु मायेचे काम आहे येणे आणि तुमचे काम काय आहे? विजयी बनणे. तर असा विचार करू नका, आमची थोडीच इच्छा असते परंतु माया येते. होऊन जाते… आता बापदादा या वर्षासोबत, या शब्दांना निरोप देऊ इच्छितात. १२ वाजता या वर्षाला निरोप द्याल ना! तर जी घंटा वाजवाल ना, आज जेव्हा घंटा वाजवाल तर ती कशाची घंटा वाजवणार? दिवसाची, वर्षाची की मायेच्या निरोपाची घंटा वाजवणार. दोन गोष्टी आहेत - एक तर परिवर्तन शक्ती, त्याची कमजोरी आहे. प्लॅन खूप छान बनवता, ‘असे करणार, असे करणार, असे करणार…’ बापदादा देखील खुश होतात, खूप चांगले प्लॅन बनवले आहेत परंतु परिवर्तन शक्तीची कमतरता असल्याकारणाने थोडे परिवर्तन होते, थोडे राहून जाते. आणि दुसरी कमतरता आहे - दृढतेची. संकल्प चांगले-चांगले करता, आज देखील बघा किती कार्ड, किती निकाल, किती आश्वासने बघितली, बापदादांनी बघितली आहेत. खूप छान-छान पत्रे आली आहेत. (कार्ड, पत्र इत्यादी सर्व स्टेजवर सजवून ठेवली आहेत.) तर करणार, दाखवणार, व्हायचेच आहे, बनायचेच आहे, पद्म-पद्मपटीने प्रेमपूर्वक आठवण, सर्व बापदादांकडे पोहोचले आहे. तुम्ही जे सन्मुख बसला आहात, त्यांच्या हृदयातील आवाज देखील बाबांपाशी पोहोचला. परंतु आता बापदादा या दोन शक्तींवर अंडरलाईन करत आहेत. एक दृढतेची कमतरता आहे. या कमतरतेचे कारण आहे - निष्काळजीपणा, दुसऱ्यांना बघणे. होऊन जाईल, करत तर आहोत, करणार, जरूर करणार...

बापदादा हेच इच्छितात की या वर्षी एका शब्दाला कायमसाठी निरोप द्या. तो कोणता? सांगू, बोलू? द्यावा लागेल. यावर्षी बापदादा ‘कारण’ शब्दाला निरोप दिला जावा असे इच्छितात. निवारण व्हावे, कारण समाप्त. समस्या समाप्त, समाधान स्वरूप. भले मग स्वतःचे कारण असेल, किंवा साथीदाराचे कारण असेल, किंवा संघटनचे कारण असेल, किंवा कोणते परिस्थितीचे कारण असेल, ब्राह्मणांच्या डिक्शनरीमध्ये ‘कारण’ शब्द, ‘समस्या’ शब्द परिवर्तीत होऊन, ‘समाधान’ आणि ‘निवारण’ व्हावा; कारण अनेकांनी आज अमृतवेलेला देखील बापदादांशी रुहरिहानमध्ये याच गोष्टी केल्या, की नवीन वर्षामध्ये काही नवीनता करावी. तर बापदादा इच्छितात की हे नवीन वर्ष असे साजरे करा जेणेकरून हे दोन शब्द समाप्त होतील. पर-उपकारी बना. स्वतः कारण बनता किंवा दुसरे कोणी कारण बनते, परंतु पर-उपकारी बनून, दयाळू आत्मा बनून, शुभ भावना, शुभकामना असणाऱ्या हृदयाचे बनून सहयोग द्या, स्नेह घ्या.

तर या नवीन वर्षाला काय नाव द्याल? पूर्वी प्रत्येक वर्षाला नाव देत होतो, लक्षात आहे ना? तर बापदादा या वर्षाला ‘श्रेष्ठ शुभ संकल्प, दृढ संकल्प, स्नेह सहयोग संकल्प वर्ष’ - हे नाव नाही, परंतु असे पाहू इच्छितात. दृढतेची शक्ती, परिवर्तनाच्या शक्तीला कायमचे साथीदार बनवा. कोणी काहीही निगेटिव्ह देईल परंतु जसे तुम्ही दुसऱ्यांचा कोर्स करता की, निगेटिव्हला पॉझिटिव्ह मध्ये बदला, तर काय तुम्ही स्वतः निगेटिव्हला पॉजिटीव्हमध्ये चेंज करू शकत नाही? दुसरा पराधीन असतो, पराधीन असणाऱ्यावर दया केली जाते. तुमची जड चित्रे (मुर्त्या) तुमचीच चित्रे आहेत ना. भारतामध्ये डबल फॉरेनर्सची देखील चित्रे आहेत ना, ज्यांची पूजा केली जाते. दिलवाडा मंदिरामध्ये तर आपले चित्र पाहिले आहे ना! खूप सुंदर. जर तुमची जड चित्रे दयाळू आहेत, कोणत्याही चित्रासमोर जातात तर काय मागतात? दया करा, कृपा करा, रहम करा, मर्सी, मर्सी… तर नेहमी अगोदर स्वतःवर दया करा, मग ब्राह्मण परिवारावर दया करा, जर कोणी पराधीन आहे, संस्कारांच्या वश आहे, कमजोर आहे, त्यावेळी तो बेसमज होतो, तर तुम्ही क्रोध करू नका. क्रोधा बद्दल रिपोर्ट जास्त येतो. क्रोध नसेल तर त्याच्या मुला-बाळांवर खूप प्रेम आहे. आवेश येतो, हा आवेश क्रोधाचा मुलगा आहे. तर जसे परिवारामध्ये असते ना, मोठ्या मुलांवर प्रेम कमी असते आणि नातवंडावर प्रेम जास्त असते. तर क्रोध बाप आहे आणि आवेश अजूनच उलटा नशा आहे, नशेचे प्रकार देखील विविध असतात, बुद्धीचा नशा, ड्युटीचा नशा, सेवेच्या कोणत्या विशेष कर्तव्याचा नशा, हा अहंकार असतो. तर दयाळू बना, कृपाळू बना. पहा, नवीन वर्षामध्ये एकमेकांचे तोंड गोड देखील करतात, शुभेच्छा देतील, तर तोंड गोड देखील करतात ना! तर संपूर्ण वर्ष कडवटपणा दाखवू नका. ते तोंड गोड करतात, तुम्ही केवळ तोंड गोड करत नाही परंतु तुमचा चेहेरा सुद्धा गोड (प्रेमळ) असावा. सदैव आपला चेहरा आत्मिक स्नेहवाला असावा, हसरा असावा. कडवटपणा नको. मेजॉरिटी जेव्हा बापदादांसोबत रुहरिहान करतात ना तर आपली खरी गोष्ट ऐकवतात बाकी दुसरे तर कोणी ऐकतच नाही. तर मेजॉरिटींच्या रिझल्टमध्ये इतर विकारांपेक्षा क्रोध किंवा क्रोधाची मुले-बाळे यांचा रिपोर्ट जास्ती आहे.

तर बापदादा या नवीन वर्षामध्ये या कडवटपणाला घालवू इच्छितात. अनेकांनी आपला वायदा देखील लिहिला आहे की, इच्छा नसते परंतु येतो. तर बापदादांनी कारण ऐकवले की दृढतेची कमतरता आहे. बाबांसमोर संकल्पाद्वारे प्रतिज्ञा सुद्धा घेतात, परंतु दृढता अशी शक्ती आहे की जी दुनियावाले देखील म्हणतात प्राण - गेला तरी चालेल पण वचन मोडता नये’. मरावे लागेल, झुकावे लागेल, बदलावे लागेल, सहन करावे लागेल परंतु वचनामध्ये दृढ राहणारा प्रत्येक पावलावर सफलतामूर्त आहे कारण दृढता सफलतेची चावी आहे. ही चावी सर्वांकडे आहे, परंतु ऐनवेळी हरवून जाते. तर काय विचार आहे?

नवीन वर्षामध्ये नवीनता करायचीच आहे - स्वतःच्या, सहयोगींच्या आणि विश्वाच्या परिवर्तनाची. मागे बसलेले ऐकत आहेत ना? तर करायचे आहे ना, असा विचार करू नका की अगोदर मोठे करतील ना, आम्ही तर छोटे आहोत. छोटे समान बाबा. प्रत्येक मुलगा बाबांचा अधिकारी आहे, भले मग पहिल्यांदा जरी आले आहात परंतु ‘माझे बाबा’ म्हटलेत तर अधिकारी झालात. श्रीमतावर चालण्याचे सुद्धा अधिकारी आणि सर्व प्राप्तींचे देखील अधिकारी. टीचर्स आपसात प्रोग्राम बनवा, फॉरेनवाल्यांनी देखील बनवा, भारतवाल्यांनी सुद्धा मिळून बनवा. बापदादा बक्षीस देतील, कोणता झोन, भले फॉरेन असो, किंवा इंडिया असो, कोणता झोन नंबरवन घेईल, त्याला गोल्डन कप देणार. केवळ स्वतःला बनवायचे नाही, साथीदारांना देखील बनवायचे कारण बापदादांनी पाहिले आहे की मुलांच्या परिवर्तनाशिवाय विश्वाचे परिवर्तन सुद्धा मंदावले आहे. आणि आत्मे नवीन-नवीन प्रकारच्या दुःखासाठी पात्र बनत आहेत. दुःख-अशांतीची नवीन-नवीन कारणे बनत आहेत. तर बाबा आता मुलांच्या दुःखाची हाक ऐकून परिवर्तन इच्छित आहेत. तर हे मास्टर सुखदाता मुलांनो, दुःखी असणाऱ्यांवर दया करा. भक्त देखील भक्ती करून थकले आहेत. भक्तांना सुद्धा मुक्तीचा वारसा द्या. दया येते की नाही? आपल्याच सेवेमध्ये, आपल्याच दीनचर्येमध्ये बिझी आहात? निमित्त आहात, असे नाही मोठे निमित्त आहेत, प्रत्येक मुलगा ज्याने ‘माझे बाबा’ म्हटले आहे, मानले आहे ते सर्व निमित्त आहेत. तर नवीन वर्षामध्ये एकमेकांना गिफ्ट सुद्धा देतात ना. तर तुम्ही भक्तांची आशा पूर्ण करा, त्यांना गिफ्ट द्या. दुःखी असणाऱ्यांना दुःखातून सोडवा, मुक्तिधाममध्ये शांती द्या - ही गिफ्ट द्या. ब्राह्मण परिवारामध्ये प्रत्येक आत्म्याला हृदयापासूनच्या स्नेहाची आणि सहयोगाची गिफ्ट द्या. तुमच्यापाशी गिफ्टचा स्टॉक आहे? स्नेह आहे? सहयोग आहे? मुक्ती देण्याची शक्ती आहे? ज्यांच्यापाशी भरपूर स्टॉक आहे, त्यांनी हात वर करा. आहे स्टॉक. स्टॉक कमी आहे? पहिल्या लाइनवाल्यांपाशी स्टॉक कमी आहे का? हे बृजमोहन हात वर करत नाही आहेत. स्टॉक तर आहे ना, स्टॉक आहे? सर्वांनी हात वर केला? स्टॉक आहे? तर स्टॉक ठेवून काय करत आहात? जमा करून ठेवला आहे! टीचर्स स्टॉक आहे ना? तर द्या ना, मोठ्या मनाचे बना. मधुबनवाले काय करणार? आहे स्टॉक, मधुबनमध्ये आहे? मधुबनमध्ये तर चोहो बाजूला स्टॉक भरलेला आहे. तर आता दाता बना, फक्त जमा करू नका. दाता बना, देत जा. ठीक आहे. अच्छा.

आता प्रत्येकजण आपल्याला मनाचा मालक अनुभव करून एका सेकंदामध्ये मनाला एकाग्र करू शकता का? ऑर्डर करू शकता? एका सेकंदामध्ये आपल्या स्वीट होममध्ये पोहोचा. एका सेकंदामध्ये आपले राज्य स्वर्गामध्ये पोहोचा. मन तुमची ऑर्डर मानते की गडबड करते? मालक जर योग्य असेल, शक्तिशाली असेल, तर मन मानत नाही, असे होऊ शकत नाही. तर आता अभ्यास करा एका सेकंदामध्ये सगळे आपल्या स्वीट होममध्ये पोहोचा. असा अभ्यास संपूर्ण दिवसभरामध्ये मधून-मधून करण्याचे अटेंशन ठेवा. मनाची एकाग्रता स्वतःला देखील आणि वायुमंडळाला देखील पॉवरफुल बनवते. अच्छा.

चोहो बाजूच्या सर्वांचे अति स्नेही, सर्वांचे सहयोगी श्रेष्ठ आत्म्यांना, चोहो बाजूच्या विजयी मुलांना, चोहो बाजूच्या परिवर्तन शक्तिशाली मुलांना, चोहो बाजूच्या सदैव स्वतःला प्रत्यक्ष करून बाबांना प्रत्यक्ष करणाऱ्या मुलांना, सदैव समाधान स्वरूप विश्व परिवर्तक मुलांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि अंतःकरणातून आशीर्वाद स्वीकार असो. त्या सोबत सर्व मुलांना जे बाबांचे सिरताज आहेत, अशा सिरताज मुलांना बापदादांचा नमस्ते.

वरदान:-
मुरलीधरच्या मुरलीवर प्रेम करणारे सदा शक्तीशाली आत्मा भव

ज्या मुलांचे अभ्यासावर अर्थात मुरलीवर प्रेम आहे त्यांना सदैव ‘शक्तीशाली भव’चे वरदान मिळते, त्यांच्या समोर कोणतेही विघ्न टिकू शकत नाही. मुरलीधरवर प्रेम करणे अर्थात त्यांच्या मुरलीवर प्रेम असणे. जर कोणी म्हणेल की, मुरलीधरवर तर माझे खूप प्रेम आहे परंतु अभ्यास करायला वेळ नाहीये, तर बाबा मानणार नाहीत; कारण जिथे लगन (आवड) असते तिथे कोणताही बहाणा असत नाही. अभ्यास आणि परिवाराचे प्रेम जणू किल्ला बनतो, ज्यामुळे ते सेफ (सुरक्षित) राहतात.

सुविचार:-
प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वतःला मोल्ड करा तर रियल गोल्ड बनाल.

अव्यक्त इशारे:- आता लगनच्या (उत्कटतेच्या) अग्नीला प्रज्वलित करून योगाला ज्वाला रूपी बनवा.

योगाला ज्वाला रूप शक्तीशाली बनविण्यासाठी योगामध्ये बसते वेळी सामावून घेण्याच्या शक्तीला यूज करा. सेवेचे संकल्प सुद्धा सामावून जावेत इतकी शक्ती असावी जे स्टॉप म्हटले आणि स्टॉप झाले. फुल ब्रेक लागावा, ढिला ब्रेक नाही. जर एक सेकंदाऐवजी जास्त वेळ लागत असेल तर सामावण्याची शक्ती कमजोर आहे असे म्हटले जाईल.