07-11-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - शिवबाबा आले आहेत तुमचे सर्व भंडारे भरपूर करण्यासाठी, म्हटले देखील जाते - भण्डारा भरपूर काल कंटक दूर ’’

प्रश्न:-
ज्ञानवान मुलांच्या बुद्धीमध्ये कोणत्या एका गोष्टीचा निश्चय पक्का असेल?

उत्तर:-
त्यांना दृढ निश्चय असेल की, आमचा जो पार्ट आहे तो कधीही घासला अथवा पुसला जात नाही. मज आत्म्यामध्ये ८४ जन्मांचा अविनाशी पार्ट नोंदलेला आहे, हेच ज्ञान जर बुद्धीमध्ये असेल तर ज्ञानवान आहेत. नाहीतर संपूर्ण ज्ञान बुद्धीतून नाहीसे होते.

ओम शांती।
बाबा येऊन रूहानी मुलांप्रती काय म्हणतात? काय सेवा करतात. यावेळी बाबा हे रूहानी शिक्षण शिकविण्याची सेवा करतात. हे देखील तुम्ही जाणता. पित्याचा देखील पार्ट आहे, टिचरचा देखील पार्ट आहे आणि गुरुचा देखील पार्ट आहे. तिन्ही पार्ट चांगले बजावत आहेत. तुम्ही जाणता ते पिता देखील आहेत, सद्गती देणारे गुरु देखील आहेत आणि सर्वांसाठी आहेत. लहान, मोठे, वृद्ध, तरुण सर्वांसाठी एकच आहेत. सुप्रीम पिता, सुप्रीम टीचर आहेत. बेहदचे शिक्षण देतात. तुम्ही कॉन्फरन्समध्ये देखील सांगू शकता की, ‘आम्ही सर्वांच्या बायोग्राफीला जाणतो. परमपिता परमात्मा शिवबाबांची जीवन कहाणी देखील जाणतो’. क्रमवारीने सर्व बुद्धीमध्ये लक्षात ठेवले पाहिजे. संपूर्ण विराट रूप जरूर बुद्धीमध्ये राहत असेल. आपण आता ब्राह्मण बनलो आहोत, नंतर मग आपण देवता बनणार मग क्षत्रिय, वैश्य, शूद्र बनणार. हे तर मुलांच्या लक्षात आहे ना. या गोष्टी तुम्हा मुलांव्यतिरिक्त इतर कोणाच्या लक्षातही नसतील. ‘उत्थान आणि पतन’चे संपूर्ण रहस्य बुद्धीमध्ये असावे. आपण उत्थान मध्ये होतो मग पतन मध्ये आलो, आता मध्यभागी आहोत. शूद्र देखील नाही आणि पूर्ण ब्राह्मण देखील बनलेलो नाही आहोत. जर आता आपण पक्के ब्राह्मण असतो तर मग शूद्रपणाचे कृत्य केले नसते. ब्राह्मणांमध्ये देखील मग शूद्रपणा दिसून येतो. हे देखील तुम्ही जाणता - आपण कधी पासून पापे करण्यास सुरुवात केली आहे? जेव्हा पासून काम चितेवर चढले आहात; तर तुमच्या बुद्धीमध्ये संपूर्ण चक्र आहे. वरती आहे परमपिता परमात्मा बाबा, मग तुम्ही आहात आत्मे. या गोष्टी तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये जरूर लक्षात राहिल्या पाहिजेत. आता आपण ब्राह्मण आहोत, देवता बनत आहोत नंतर मग वैश्य, शूद्र डिनायस्टीमध्ये येणार. बाबा येऊन आपल्याला शूद्रापासून ब्राह्मण बनवतात मग आपण ब्राह्मणा पासून देवता बनणार. ब्राह्मण बनून कर्मातीत अवस्थेला प्राप्त करून मग परत जाणार. तुम्ही बाबांना देखील जाणता. बाजोली किंवा ८४ च्या चक्राला देखील जाणता. बाजोलीवरून (कोलांटी उडीच्या खेळाच्या आधारे) तुम्हाला खूप सोपे करून समजावून सांगतात. तुम्हाला खूप हलके बनवतात जेणेकरून स्वतःला बिंदू समजून लगेच पळाल. स्टुडंट वर्गात बसलेले असतात तेव्हा बुद्धीमध्ये अभ्यासच लक्षात राहतो. तुम्हाला देखील हा अभ्यास लक्षात राहिला पाहिजे. आता आपण संगमयुगावर आहोत मग असे चक्र फिरणार. हे चक्र सतत बुद्धीमध्ये फिरत राहिले पाहिजे. हे चक्र इत्यादीचे नॉलेज तुम्हा ब्राह्मणांकडेच आहे, ना कि शूद्रांकडे. देवतांना देखील हे ज्ञान नाहीये. आता तुम्हाला समजते आहे भक्तिमार्गामध्ये जी चित्रे बनली आहेत ती सर्व डिफेक्टेड (सदोष) आहेत. तुमच्याकडे आहेत ॲक्युरेट चित्रे कारण तुम्ही ॲक्युरेट बनता. आता तुम्हाला ज्ञान मिळाले आहे तेव्हाच तर समजता की भक्ती कशाला म्हटले जाते आणि ज्ञान कशाला म्हटले जाते? ज्ञान देणारे बाबा ज्ञानाचे सागर आता भेटले आहेत. शाळेमध्ये शिकता तेव्हा एम ऑब्जेक्ट विषयी तर समजते ना. भक्तिमार्गामध्ये तर एम ऑब्जेक्टच नसते. हे तुम्हाला थोडेच माहीत होते की आपण उच्च देवी-देवता होतो आणि मग खाली कोसळलो (पतन झाले). आता जेव्हा ब्राह्मण बनलो आहोत तेव्हा माहीत झाले आहे. ब्रह्माकुमार-कुमारी जरूर पूर्वी देखील बनलो होतो. प्रजापिता ब्रह्माचे नाव तर प्रसिद्ध आहे. प्रजापिता तर मनुष्य आहे ना. त्यांची इतकी ढीगभर मुले आहेत तर नक्कीच ॲडॉप्टेड असली पाहिजेत. किती ॲडॉप्टेड आहेत. आत्म्याच्या रूपामध्ये तर सर्व भाऊ-भाऊ आहात. आता तुमची बुद्धी किती दूर पर्यंत जाते. तुम्ही जाणता - ज्याप्रमाणे वर आकाशामध्ये तारे उभे आहेत, दुरून किती लहान दिसतात. तुम्ही देखील अतिशय छोटीशी आत्मा आहात. आत्मा कधी लहान-मोठी होत नाही. हां, तुमचा मर्तबा खूप उच्च आहे. त्यांना (आकाशातील ताऱ्यांना) देखील सूर्य देवता, चंद्र देवता म्हणतात. सूर्याला पिता, चंद्राला माता म्हणतील. बाकी आत्मे सर्व आहेत नक्षत्र-तारे. तर सर्व आत्मे एकसारखे छोटेच आहेत. इथे येऊन पार्टधारी बनतात. देवता तर तुम्हीच बनता.

आपण खूप शक्तिशाली बनत आहोत. बाबांची आठवण केल्याने आपण सतोप्रधान देवता बनतो. नंबरवार थोड-थोडा फरक तर राहतो ना. काही आत्मे पवित्र बनून सतोप्रधान देवता बनतात, काही आत्मे पूर्ण पवित्र बनत नाहीत. ज्ञानाला जरासुद्धा जाणत नाहीत. बाबांनी समजावून सांगितले आहे की, बाबांचा परिचय तर जरूर सर्वांना मिळाला पाहिजे. शेवटी मग बाबांना तर जाणतील ना. विनाशाच्या वेळी सर्वांना माहीत होते की, बाबा आलेले आहेत. आता देखील काहीजण म्हणतात भगवान नक्कीच कुठेतरी आलेले आहेत परंतु कळून येत नाही. समजतात कोणत्याही रूपामध्ये येईल. मनुष्य मत तर खूप आहेत ना, तुमचे आहे एकच ईश्वरीय मत. तुम्ही ईश्वरीय मता द्वारे काय बनता? एक आहे मनुष्य मत, दुसरे आहे ईश्वरीय मत आणि तिसरे आहे देवता मत. देवतांना देखील मत (श्रीमत) कोणी दिले? बाबांनी. बाबांचे श्रीमत आहेच श्रेष्ठ बनविणारे. ‘श्री श्री’, बाबांनाच म्हणणार, ना की मनुष्यांना. ‘श्री श्री’च येऊन श्री बनवितात. देवतांना श्रेष्ठ बनविणारे बाबाच आहेत, त्यांना श्री श्री म्हणणार. बाबा म्हणतात - मी तुम्हाला असे लायक बनवतो. त्या लोकांनी मग स्वतःलाच ‘श्री श्री’ चे टायटल दिले आहे. कॉन्फरन्समध्ये देखील तुम्ही समजावून सांगू शकता. तुम्हीच समजावून सांगण्यासाठी निमित्त बनलेले आहात. श्री श्री तर आहेतच एक शिवबाबा जे असे श्री देवता बनवतात. ते लोक शास्त्र इत्यादींचे शिक्षण शिकून टायटल (उपाधी) घेतात. तुम्हाला तर श्री श्री बाबाच, ‘श्री’ अर्थात ‘श्रेष्ठ’ बनवत आहेत. ही आहेच तमोप्रधान भ्रष्टाचारी दुनिया. भ्रष्टाचारातून जन्म घेतात. कुठे बाबांचे टायटल आणि कुठे हे पतित मनुष्य स्वतःला देतात. खरे-खरे श्रेष्ठ महान आत्मे तर देवी-देवता आहेत ना. सतोप्रधान दुनियेमध्ये कोणीही तमोप्रधान मनुष्य असू शकत नाहीत. रजोमध्ये रजो मनुष्यच असतील, ना की तमोगुणी. वर्ण देखील गायले जातात ना. आता तुम्ही समजता, पूर्वी तर आपण काहीच समजत नव्हतो. आता बाबा किती हुशार बनवतात. तुम्ही किती श्रीमंत बनता. शिवबाबांचा भंडारा भरपूर आहे. शिव बाबांचा भंडारा कोणता आहे? (अविनाशी ज्ञान रत्नांचा). ‘शिवबाबा का भण्डारा भरपूर काल कंटक दूर’. बाबा तुम्हा मुलांना ज्ञान रत्न देतात. स्वतः आहेत सागर. ज्ञान रत्नांचा सागर आहेत. मुलांची बुद्धी बेहदमध्ये गेली पाहिजे. इतके करोडो आत्मे सर्व आपापल्या शरीर रुपी तख्तावर विराजमान आहेत. हे बेहदचे नाटक आहे. आत्मा या तख्तावर विराजमान होते. एक तख्त दुसऱ्याशी मेळ खाऊ शकत नाही. सर्वांची फीचर्स वेग-वेगळी आहेत, याला म्हटले जाते कुदरत (प्रकृतीचा चमत्कार). प्रत्येकाचा कसा अविनाशी पार्ट आहे. इतक्या छोट्याशा आत्म्यामध्ये ८४ चे रेकॉर्ड भरलेले असते. अति सूक्ष्म आहे. यापेक्षा सूक्ष्म आश्चर्य अजून कोणते असू शकत नाही. इतक्या छोट्याशा आत्म्यामध्ये संपूर्ण पार्ट भरलेला आहे, जो पार्ट इथेच बजावते. सूक्ष्म वतनमध्ये तर काही पार्ट बजावत नाही. बाबा किती चांगल्या रीतीने समजावून सांगतात. बाबांद्वारे तुम्हाला सर्व काही माहित होते. हेच नॉलेज आहे. असे नाही की सर्वांच्या अंतर्मनाला जाणणारे आहेत. हे नॉलेज जाणतात, जे नॉलेज तुमच्यामध्ये देखील इमर्ज होत आहे. ज्या नॉलेजमुळेच तुम्ही इतके उच्च पद प्राप्त करता. हे देखील समजते ना. बाबा आहेत बीजरूप. त्यांच्यामध्ये झाडाचे आदि-मध्य-अंताचे नॉलेज आहे. मनुष्यांनी तर लाखो वर्षे कालावधी असल्याचे सांगितले आहे, तर ज्ञान येऊ शकत नाही. आता तुम्हाला हे सर्व ज्ञान संगमयुगावर मिळत आहे. बाबांकडून तुम्हाला संपूर्ण चक्रा विषयी माहिती मिळते. यापूर्वी तुम्ही काहीच जाणत नव्हता. आता तुम्ही संगमावर आहात. हा तुमचा आहे अंतिम जन्म. पुरुषार्थ करत-करत मग तुम्ही पूर्ण ब्राह्मण बनाल. आता नाही आहात. आता तर चांगली-चांगली मुले देखील ब्राह्मणा पासून पुन्हा शूद्र बनतात. याला म्हटले जाते माये समोर हार खाणे. बाबांच्या गोदीवर असूनही पराजित होऊन रावणाच्या गोदीमध्ये निघून जातात. कुठे श्रेष्ठ बनविणारी बाबांची गोद, आणि कुठे भ्रष्ट बनविणारी गोद. सेकंदामध्ये जीवनमुक्ती सेकंदामध्ये पूर्ण दुर्दशा होऊन जाते. ब्राह्मण मुले चांगल्या प्रकारे जाणतात की कशी दुर्दशा होते. आज बाबांचे बनतात उद्या मग मायेच्या तावडीत सापडून रावणाचे बनतात. मग तुम्ही वाचविण्याचा प्रयत्न करता तर काहीजण वाचतात देखील. तुम्ही पाहता बुडत आहेत तर वाचविण्याचा प्रयत्न करत रहा. किती संघर्ष होतो.

बाबा बसून मुलांना समजावतात. इथे शाळेमध्ये तुम्ही शिकता ना. तुम्हाला माहित आहे की, आपण हे चक्र कसे फिरतो. तुम्हा मुलांना श्रीमत मिळते - असे-असे करा. भगवानुवाच तर जरूर आहे; त्यांचे श्रीमत झाले ना. मी तुम्हा मुलांना आता शूद्रा पासून देवता बनविण्यासाठी आलो आहे. आता कलियुगामध्ये आहे शूद्र संप्रदाय. तुम्ही जाणता कलियुग पूर्ण होत आहे. तुम्ही संगमावर बसले आहात. हे बाबांकडून तुम्हाला नॉलेज मिळाले आहे. जी काही शास्त्रे बनविली आहेत त्या सर्वांमध्ये आहे मनुष्य मत. ईश्वर काही शास्त्र बनवत नाहीत. एका गीतेलाच किती नावे दिली आहेत. गांधी गीता, टागोर गीता इत्यादी इत्यादी. पुष्कळ नावे आहेत. इतके मनुष्य गीता का वाचतात? समजत तर काहीच नाही. तेच-तेच अध्याय घेऊन आपापले अर्थ काढत राहतात. ते तर सर्व मनुष्यांनी बनवलेले झाले ना. तुम्ही म्हणू शकता - मनुष्य मताने बनविलेली गीता वाचल्याने आज तुमचे हे हाल झाले आहेत. गीताच पहिल्या नंबरचे शास्त्र (धर्मग्रंथ) आहे ना. ते आहे देवी-देवता धर्माचे शास्त्र. हे तुमचे ब्राह्मण कुळ आहे. हा देखील ब्राह्मण धर्म आहे ना. असे किती धर्म आहेत, ज्याने जो धर्म रचला आहे त्याचे ते नाव चालत राहते. जैन लोक महावीर म्हणतात. तुम्ही मुले सर्व महावीर-महावीरणी आहात. तुमचे यादगार (स्मारक) मंदिरामध्ये आहे. राजयोग आहे ना. खाली योग तपस्येला बसले आहात, वरती राजाईचे चित्र आहे. राजयोगाचे ॲक्युरेट मंदिर आहे. मग कोणी काय नाव दिले आहे, कोणी काय. यादगार बनवले आहे मात्र एकदम ॲक्युरेट, बुद्धीचा वापर करून बरोबर बनविले आहे, आणि मग त्यांनी जे नाव सांगितले ते ठेवले आहे. हे मॉडेल रूपामध्ये बनविले आहे. स्वर्ग आणि राजयोग संगमयुगातील बनविलेला आहे. तुम्ही आदि-मध्य-अंताला जाणता. आदिला देखील तुम्ही पाहिले आहे. आदि संगमयुगाला म्हणा नाहीतर सतयुगाला म्हणा. संगमयुगाचे दृश्य खाली दाखवतात आणि राजाई वरती दाखवली आहे. तर सतयुग आहे - ‘आदि’ आणि ‘मध्य’ आहे द्वापर. अंताला तुम्ही बघतच आहात. हे सर्व नष्ट होणार आहे. पूर्ण यादगार बनलेले आहे. देवी-देवताच मग वाम मार्गामध्ये जातात. द्वापर पासून वाममार्ग सुरू होतो. यादगार पूर्णपणे ॲक्युरेट आहे. यादगार म्हणून पुष्कळ मंदिरे बनविली आहेत. सर्व निशाण्या इथेच आहेत. मंदिरे देखील इथेच बनतात. भारतवासीच देवी-देवता राज्य करून गेले आहेत ना. त्याच्यानंतर मग किती मंदिरे बनवतात. शीख लोक जेव्हा पुष्कळ होतील तेव्हा ते आपले मंदिर बनवतील. मिलेट्रीवाले देखील आपले मंदिर बनवतात. भारतवासी आपल्या श्रीकृष्णाचे किंवा लक्ष्मी-नारायणाचे मंदिर बनवतील. हनुमानाचे, गणेशाचे बनवतील. हे संपूर्ण सृष्टीचे चक्र कसे फिरते, कशी स्थापना, विनाश, पालना होते - हे तुम्हीच जाणता. याला म्हटले जाते अंध:कारमय रात्र. ब्रह्माचा दिवस आणि रात्र यांचेच गायन आहे कारण ब्रह्माच चक्रामध्ये येतात. आता तुम्ही ब्राह्मण आहात नंतर देवता बनाल. मुख्य तर ब्रह्मा झाले ना. ब्रह्माला ठेवावे की विष्णूला ठेवावे! ब्रह्मा आहे रात्रीचा; विष्णू आहे दिवसाचा. तेच रात्री मधून मग दिवसामध्ये येतात. दिवसा मधून मग ८४ जन्मा नंतर रात्रीमध्ये येतात. किती सोपे स्पष्टीकरण आहे. परंतु मुले एवढे सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेऊ शकत नाहीत. व्यवस्थित शिकत नाहीत त्यामुळे नंबरवार पुरुषार्था नुसार पद प्राप्त करतात. जितकी आठवण कराल तितके सतोप्रधान बनाल. सतोप्रधान तोच भारत तमोप्रधान. मुलांमध्ये किती ज्ञान आहे. हे नॉलेज लक्षात ठेवायचे आहे. हे ज्ञान आहेच मुळी नवीन दुनियेकरिता, जे बेहदचे बाबा येऊन देतात. सर्व मनुष्य बेहदच्या बाबांची आठवण करतात. इंग्रज लोक देखील म्हणतात - ओ गॉड फादर, लिब्रेटर, गाईड अर्थ तर तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे. बाबा येऊन दुःखाची दुनिया आयरन एज मधून बाहेर काढून गोल्डन एज मध्ये घेऊन जातात. गोल्डन एज जरूर भूतकाळात होऊन गेले आहे तेव्हाच तर आठवण करतात ना. तुम्हा मुलांनी आतून अतिशय आनंदी राहिले पाहिजे आणि दैवी कर्म देखील केली पाहिजेत. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) बाबांकडून जो अविनाशी ज्ञान रत्नांचा अखुट खजिना मिळत आहे - त्याला स्मृतीमध्ये ठेवून बुद्धीला बेहदमध्ये घेऊन जायचे आहे. या बेहद नाटकामध्ये आत्मे कसे आपापल्या तख्तावर विराजमान आहेत - या कुदरतला (प्रकृतीच्या चमत्काराला) साक्षी होऊन पहायचे आहे.

२) बुद्धीमध्ये सदैव हे लक्षात राहावे की आपण संगमयुगी ब्राह्मण आहोत, आपल्याला बाबांची श्रेष्ठ गोद मिळाली आहे. आपण रावणाच्या गोदीमध्ये जाऊ शकत नाही. आपले कर्तव्य आहे - बुडणाऱ्यांना वाचविणे.

वरदान:-
व्यर्थ संकल्प रुपी पिलर्सना आधार बनविण्याऐवजी सर्व नात्यांच्या अनुभवाला वाढविणारे सच्चे स्नेही भव

माया कमजोर संकल्पांना मजबूत बनविण्यासाठी खूप रॉयल पिलर्स लावते, वारंवार हेच संकल्प देते की, ‘असे तर होतेच, मोठे-मोठे देखील असे करतात, अजून संपूर्ण तर बनलो नाही आहोत, कोणती ना कोणती कमजोरी तर जरूर रहाणारच…’ हे व्यर्थ संकल्प रुपी पिलर्स कमजोरीला अजून जास्त मजबूत करतात. आता अशा पिलर्सचा आधार घेण्या ऐवजी सर्व संबंधांच्या (नात्यांच्या) अनुभवांना वाढवा. साकार रूपामध्ये सोबत असल्याचा अनुभव करत खरे स्नेही बना.

बोधवाक्य:-
संतुष्टता सर्वात मोठा गुण आहे, जे नेहमी संतुष्ट राहतात तेच प्रभू प्रिय, लोक प्रिय आणि स्वयं प्रिय बनतात.