07-11-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - हे संगमयुग सर्वोत्तम बनण्याचा शुभ काळ आहे, कारण याच वेळी बाबा तुम्हाला
नरापासून नारायण बनण्याचे शिक्षण देतात”
प्रश्न:-
तुम्हा
मुलांकडे असे कोणते नॉलेज आहे, ज्यामुळे तुम्ही कोणत्याही परिस्थितीत रडू शकत नाही?
उत्तर:-
तुमच्याकडे या पूर्वनियोजित ड्रामाचे नॉलेज आहे, तुम्ही जाणता यामध्ये प्रत्येक
आत्म्याचा स्वतःचा पार्ट आहे, बाबा आम्हाला सुखाचा वारसा देत आहेत तर मग आपण रडू कसे
शकतो? चिंता होती पार ब्रह्ममध्ये रहाणाऱ्याची, तो मिळाला, आणखी काय पाहिजे!
बख्तावर (सौभाग्यशाली) मुले कधी रडत नाहीत.
ओम शांती।
रुहानी बाबा बसून मुलांना एक गोष्ट समजावून सांगतात. चित्रांमध्ये देखील असे लिहायचे
आहे की, त्रिमूर्ती शिवबाबा मुलांप्रती सांगत आहेत. तुम्ही देखील कोणाला समजावून
सांगता, तर तुम्ही आत्मे म्हणाल - ‘शिवबाबा असे म्हणतात’. हे बाबा (ब्रह्मा बाबा)
देखील म्हणतील - बाबा तुम्हाला सांगत आहेत. इथे मनुष्य मनुष्याला समजावून सांगत
नाहीत परंतु परमात्मा आत्म्यांना समजावून सांगतात किंवा आत्मा, आत्म्याला समजावून
सांगते. ज्ञान सागर तर शिवबाबाच आहेत आणि ते आहेत रुहानी पिता. यावेळी रुहानी
मुलांना रुहानी बाबांकडून वारसा मिळतो. शारीरिक अहंकार इथे सोडावा लागतो. या वेळी
तुम्हाला देही-अभिमानी बनून बाबांची आठवण करायची आहे. कर्म देखील भले करा, काम-धंदा
इत्यादी भलेही करत रहा, बाकी जेवढा वेळ मिळेल त्यात स्वतःला आत्मा समजून बाबांची
आठवण कराल तर विकर्म विनाश होतील. तुम्ही जाणता शिवबाबा यांच्यामध्ये आलेले आहेत.
ते सत्य आहेत, चैतन्य आहेत. सत् चित् आनंद स्वरूप म्हणतात. ब्रह्मा, विष्णू, शंकर
किंवा कोणत्याही मनुष्य मात्राची ही महिमा नाहीये. सर्वश्रेष्ठ भगवान एकच आहेत, ते
आहेत सुप्रीम सोल (परम आत्मा). हे ज्ञान देखील तुम्हाला फक्त यावेळीच आहे. नंतर
कधीही मिळणार नाही. दर ५ हजार वर्षांनंतर बाबा येतात, तुम्हाला आत्म-अभिमानी बनवून
बाबांची आठवण करवून घेण्यासाठी, ज्याद्वारे तुम्ही तमोप्रधानापासून सतोप्रधान बनता,
दुसरा कोणताही उपाय नाही. भले मनुष्य बोलावतात देखील - ‘हे पतित-पावन या’, परंतु
अर्थ समजत नाहीत. ‘पतित-पावन सीताराम’ म्हणाले तरी ठीक आहे. तुम्ही सर्व सीता अथवा
भक्तीणी आहात. ते आहेत एक राम भगवान, तुम्हा भक्तांना फळ पाहिजे भगवंताकडून. मुक्ती
किंवा जीवनमुक्ती हे आहे फळ. मुक्ती-जीवनमुक्तीचे दाता ते एक बाबाच आहेत.
ड्रामामध्ये उच्च पार्टवाले देखील असतात तर कनिष्ठ पार्टवाले देखील असतात. हा बेहदचा
ड्रामा आहे, याला दुसरे कोणीही समजू शकणार नाही. तुम्ही यावेळी तमोप्रधान
कनिष्ठपासून सतोप्रधान पुरुषोत्तम बनत आहात. सतोप्रधानलाच सर्वोत्तम म्हटले जाते.
या वेळी तुम्ही सर्वोत्तम नाही आहात. बाबा तुम्हाला सर्वोत्तम बनवतात. हे ड्रामाचे
चक्र कसे फिरत रहाते, ते कोणीही जाणत नाही. कलियुग, संगमयुग नंतर असते सतयुग.
जुन्याला नवीन कोण बनवणार? बाबांशिवाय कोणीही बनवू शकणार नाही. बाबाच संगमावर येऊन
शिकवतात. बाबा ना सतयुगामध्ये येतात, ना कलियुगामध्ये येतात. बाबा म्हणतात - माझा
पार्टच संगमयुगावर आहे म्हणून संगमयुग कल्याणकारी युग म्हटले जाते. हे आहे
ऑस्पिशिअस (शुभ), अतिशय श्रेष्ठ शुभ काळ संगमयुग. जेव्हा बाबा येऊन तुम्हा मुलांना
नरापासून नारायण बनवतात. मनुष्य तर मनुष्यच आहेत, परंतु दैवी गुणवाले बनतात, त्याला
म्हटले जाते आदि सनातन देवी-देवता धर्म. बाबा म्हणतात - मी हा धर्म स्थापन करतो,
ज्याच्यासाठी पवित्र जरूर बनावे लागेल. पतित-पावन एक बाबाच आहेत. बाकी सर्व आहेत
ब्राइड्स (वधू), भक्तीणी. पतित-पावन सीताराम म्हणणे देखील ठीक आहे. परंतु शेवटी जे
रघुपति राघव राजा राम म्हणतात ते चूक आहे. मनुष्य निरर्थक जे तोंडाला येते ते बोलत
रहातात, धून लावतात (तल्लीन होऊन जातात). तुम्ही जाणता चंद्रवंशी धर्म देखील आता
स्थापन होत आहे. बाबा येऊन ब्राह्मण कूळ स्थापन करतात, त्याला डिनायस्टी (घराणे)
म्हणणार नाही. हा परिवार आहे, इथे ना तुम्हा पांडवांचे, ना कौरवांचे राज्य आहे. गीता
ज्यांनी वाचली असेल, त्यांना या गोष्टी लवकर समजतील. ही देखील गीता आहे. कोण ऐकवतात?
स्वयं भगवान. तुम्हा मुलांनी सर्वप्रथम तर याचे स्पष्टीकरण द्यायचे आहे की, गीतेचा
भगवान कोण? ते म्हणतात - श्रीकृष्ण भगवानुवाच. आता श्रीकृष्ण तर असणार सतयुगामध्ये.
त्याच्यामध्ये जी आत्मा आहे, ती तर अविनाशी आहे. शरीराचेच नाव बदलते. आत्म्याचे कधी
नाव बदलत नाही. श्रीकृष्णाच्या आत्म्याचे शरीर सतयुगामध्येच असते. नंबरवन मध्ये तोच
जातो. लक्ष्मी-नारायण आहेत नंबर वन, नंतर आहेत सेकंड, थर्ड. तर त्यांचे मार्क्स
देखील तितके कमी असतील. ही माळा बनते ना. बाबांनी सांगितले आहे रुंड माळा देखील असते,
आणि रुद्र माळा देखील असते. विष्णूच्या गळ्यामध्ये रुंड माळा दाखवतात. तुम्ही मुले
नंबरवार विष्णुपुरीचे मालक बनता. तर तुम्ही जणू विष्णूच्या गळ्यातील हार बनता.
सर्वप्रथम शिवाच्या गळ्यातील हार बनता, त्याला रुद्र माळा म्हटले जाते, ज्याचा जप
करतात. माळेचे पूजन केले जात नाही, स्मरण केले जाते. माळेचा मणी तेच बनतात जे
विष्णुपुरीच्या राजधानीमध्ये नंबरवार येतात. माळेमध्ये सर्वात पहिले असते फूल, मग
युगल मणी. प्रवृत्ती मार्ग आहे ना. प्रवृत्ती मार्ग सुरू होतो ब्रह्मा, सरस्वती आणि
मुलांपासून. हेच मग देवता बनतात. लक्ष्मी-नारायण आहेत पहिले. वरती आहे फूल शिवबाबा.
माळा फिरवत-फिरवत मग शेवटी फुलाला डोके टेकवतात. शिवबाबा फूल आहेत, जे
पुनर्जन्मामध्ये येत नाहीत, यांच्यामध्ये प्रवेश करतात. ते तुम्हाला समजावून सांगत
आहेत. यांची (ब्रह्मा बाबांची) आत्मा तर त्यांची आपली आहे. ती आपला शरीर निर्वाह
करते, तिचे काम आहे फक्त ज्ञान देणे. जसे कोणाची पत्नी किंवा वडील इत्यादीचा मृत्यू
झाला तर त्यांच्या आत्म्याला ब्राह्मणाच्या शरीरामध्ये बोलावतात. पूर्वी येत असे,
आता ती काही शरीर तर सोडून येत नाही. हे ड्रामामध्ये अगोदरच नोंदलेले आहे. हा सर्व
आहे भक्तिमार्ग. ती आत्मा तर गेली, जाऊन दुसरे शरीर घेतले. तुम्हा मुलांना आता हे
सर्व ज्ञान मिळत आहे, त्यामुळे कोणी मेले तरी देखील तुम्हाला काही चिंता नाही.
‘अम्मा मरे तो भी हलुआ खाना’ (शांता बहिणीचे उदाहरण आहे). मुलीने जाऊन त्यांना
समजावले की तुम्ही रडता कशाला? तिने तर जाऊन दुसरे शरीर घेतले. रडल्याने थोडीच परत
येईल. बख्तावर (सौभाग्यशाली) असणारे थोडेच रडतात. तर तिथे सर्वांचे रडणे बंद करून
समजावून सांगू लागली. अशा अनेक मुली जाऊन समजावून सांगतात. आता रडणे बंद करा. खोट्या
ब्राह्मणांना देखील खाऊ घालू नका. आम्ही खऱ्या ब्राह्मणांना घेऊन येतो. आणि मग
ज्ञान ऐकवू लागतात. समजतात हे सांगत तर बरोबर आहेत. ज्ञान ऐकता-ऐकता शांत होतात. ७
दिवसांसाठी कोणी भागवत इत्यादी ठेवतात तरीही लोकांचे दुःख दूर होत नाही. या मुली तर
सर्वांचे दुःख दूर करतात. तुम्ही समजता की रडण्याची तर गरजच नाही. हा तर
पूर्वनियोजित ड्रामा आहे. प्रत्येकाला आपला पार्ट बजावायचाच आहे. कोणत्याही
परिस्थितीमध्ये रडता कामा नये. बेहदचे पिता-टीचर-गुरु मिळाले आहेत, ज्यासाठी तुम्ही
इतका त्रास सहन करत राहता. पार ब्रह्ममध्ये राहणारा परमपिता परमात्मा मिळाला तर आणखी
काय हवे. बाबा देतातच सुखाचा वारसा. तुम्ही बाबांना विसरून जाता तेव्हा रडावे लागते.
बाबांची आठवण कराल तर आनंद होईल. ओहो! आम्ही तर विश्वाचे मालक बनत आहोत. मग २१ पिढी
कधी रडणार नाही. २१ पिढी अर्थात पूर्ण वृद्ध होइपर्यंत अकाली मृत्यू होत नाही, तर
आतून किती गुप्त आनंद वाटला पाहिजे.
तुम्ही जाणता आपण
मायेवर विजय प्राप्त करून जगतजीत बनणार. शस्त्रे इत्यादींचा काहीच प्रश्न नाही.
तुम्ही आहात शिव-शक्ती. तुमच्याकडे आहे ज्ञान कटारी, ज्ञान बाण. त्यांनी मग
भक्तीमार्गामध्ये देवींना स्थूल बाण, खड्ग इत्यादी दिली आहेत. बाबा म्हणतात - ज्ञान
तलवारीने विकारांना जिंकायचे आहे, बाकी देवी काही हिंसक थोड्याच आहेत. हा सर्व आहे
भक्तीमार्ग. साधू-संत इत्यादी आहेत निवृत्ती मार्ग वाले, ते प्रवृत्ती मार्गाला
मानतच नाहीत. तुम्ही तर संन्यास करता साऱ्या जुन्या दुनियेचा, जुन्या शरीराचा. आता
बाबांची आठवण कराल तर आत्मा पवित्र होईल. ज्ञानाचे संस्कार घेऊन जाल. त्यानुसार
नवीन दुनियेमध्ये जन्म घ्याल. इथे जरी जन्म घेतलात तरीही एखाद्या चांगल्या घरामध्ये
राजाकडे अथवा रिलीजस (धार्मिक) घरामध्ये ते संस्कार घेऊन जाल. सर्वांचे लाडके बनाल.
म्हणतील - ही तर देवी आहे. श्रीकृष्णाची किती महिमा गातात. दाखवतात की, बालपणी
त्याने लोणी चोरले, मटकी फोडली, असे केले… किती कलंक लावले आहेत. अच्छा, मग
श्रीकृष्णाला सावळे का बनवले आहे? तिथे तर श्रीकृष्ण गोरा असणार ना. मग शरीर बदलत
राहते, नाव देखील बदलत राहते. श्रीकृष्ण तर सतयुगाचा पहिला प्रिन्स होता, त्याला
सावळे का बनवले? कोणीही सांगू शकणार नाही. तिथे साप इत्यादी असत नाहीत जे काळे
होतील. इथे विष चढते तर काळे पडतात. तिथे तर अशी गोष्ट होऊ शकत नाही. तुम्ही आता
दैवी संप्रदायाचे बनणार आहात. या ब्राह्मण संप्रदाया विषयी कोणालाच माहिती नाहीये.
सर्वप्रथम बाबा ब्रह्मा द्वारे ब्राह्मणांना ॲडॉप्ट करतात. प्रजापिता आहेत तर
त्यांची प्रजा देखील असंख्य आहे. ब्रह्माची मुलगी सरस्वती म्हणतात ना. पत्नी तर
नाहीये. हे कोणालाही ठाऊक नाही आहे. प्रजापिता ब्रह्माची तर आहेच मुखवंशावळी.
पत्नीचा प्रश्नच नाही. यांच्यामध्ये बाबा प्रवेश करून म्हणतात - तुम्ही माझी मुले
आहात. मी यांचे नाव ब्रह्मा ठेवले आहे, जी पण मुले बनली सर्वांची नावे बदलली आहेत.
तुम्ही मुले आता मायेवर विजय प्राप्त करता, याला म्हटलेच जाते - जय आणि पराजयचा खेळ.
बाबा किती स्वस्त सौदा करवतात. तरीही माया हरवते तर मग पळून जातात. ५ विकार रुपी
माया हरवते. ज्यांच्यामध्ये ५ विकार आहेत, त्यांनाच आसुरी संप्रदाय म्हटले जाते.
मंदिरामध्ये देवींच्या समोर जाऊन महिमा गातात - ‘तुम्ही सर्वगुण संपन्न…’ बाबा
तुम्हा मुलांना समजावून सांगत आहेत - तुम्हीच पूज्य देवता होता नंतर मग ६३ जन्म
पुजारी बनलात, आता पुन्हा पूज्य बनता. बाबा पूज्य बनवतात, रावण पुजारी बनवतो. या
गोष्टी काही शास्त्रांमध्ये नाहीत. बाबा कोणते शास्त्र थोडेच शिकले आहेत. ते तर
आहेतच ज्ञानाचा सागर. वर्ल्ड ऑलमाइटी ऑथॉरिटी आहेत. ऑलमाइटी अर्थात सर्वशक्तीमान.
बाबा म्हणतात - मी सर्व वेद-शास्त्र इत्यादींना जाणतो. ही सर्व आहे भक्तीमार्गाची
सामग्री. मी या सर्व गोष्टींना जाणतो. द्वापर पासूनच तुम्ही पुजारी बनता.
सतयुग-त्रेतामध्ये तर पूजा केली जात नाही. ते आहे पूज्य घराणे. मग असते पुजारी घराणे.
यावेळी सगळे पुजारी आहेत. या गोष्टी कोणालाच माहित नाहीत. बाबाच येऊन ८४ जन्मांची
कहाणी सांगतात. पूज्य आणि पुजारी हा तुमच्यावरच सारा खेळ आहे. हिंदू धर्म म्हणतात.
खरेतर भारतामध्ये आदि सनातन देवी-देवता धर्म होता, ना की हिंदू धर्म. किती गोष्टी
समजावून सांगाव्या लागतात. हे शिक्षण आहे देखील सेकंदाचे. तरीही किती वेळ लागतो.
म्हणतात - सागराची शाई बनवा, साऱ्या जंगलाला कलम बनवा तरीही लिहून पूर्ण होणार नाही.
शेवट पर्यंत तुम्हाला ज्ञान ऐकवत राहणार. तुम्ही याची पुस्तके किती बनवाल.
सुरुवातीला देखील बाबा पहाटे उठून लिहीत असत, मग मम्मा ऐकवत असे, तेव्हापासून छापतच
आले आहे. किती कागद संपले असतील. गीता तर एकच इतकी छोटी आहे. गीतेचे लॉकेट देखील
बनवतात. गीतेचा खूप प्रभाव आहे, परंतु गीता ज्ञान दात्याला विसरून गेले आहेत. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) ज्ञान
तलवारीने विकारांना जिंकायचे आहे. ज्ञानाचे संस्कार भरायचे आहेत. जुनी दुनिया आणि
जुन्या शरीराचा संन्यास करायचा आहे.
२) भाग्यवान
बनल्याच्या आनंदात राहायचे आहे, कोणत्याही गोष्टीची चिंता करायची नाही. कोणी शरीर
सोडले तरीही दुःखाचे अश्रू ढाळायचे नाहीत.
वरदान:-
कंट्रोलिंग
पॉवर द्वारे एका सेकंदाच्या पेपरमध्ये पास होणारे पास विद ऑनर भव
आता-आता शरीरामध्ये
येणे आणि आता-आता शरीरापासून न्यारे बनून अव्यक्त स्थितीमध्ये स्थित होणे. जितका
गोंधळ असेल तितकी स्वतःची स्थिती अति शांत असावी. या करिता समेटण्याची शक्ती पाहिजे.
एका सेकंदामध्ये विस्तारामधून सार मध्ये जावे आणि एका सेकंदामध्ये सार मधून
विस्तारामध्ये यावे, अशी कंट्रोलिंग पॉवर असणारेच विश्वाला कंट्रोल करू शकतात. आणि
हाच अभ्यास अंतिम एका सेकंदाच्या पेपरमध्ये पास विद् ऑनर बनवेल.
बोधवाक्य:-
वानप्रस्थ
स्थितीचा अनुभव करा आणि इतरांना करवा तेव्हाच लहान मुलांसारखे खेळ खेळणे समाप्त
होईल.
अव्यक्त इशारे:-
अशरीरी आणि विदेही स्थितीचा अभ्यास वाढवा.
विदेही बनण्यामध्ये
“हे अर्जुन बना”. अर्जुनाची विशेषता - सदैव बिंदू रूपामध्ये स्मृती स्वरूप बनून
विजयी बनला. असे नष्टोमोहा स्मृती स्वरूप बनणारे अर्जुन. सदैव गीता ज्ञान ऐकणारे आणि
मनन करणारे अर्जुन. असे विदेही, जिवंतपणी सर्व मेलेले आहेत, असे बेहदच्या वैराग्य
वृत्ती वाले अर्जुन बना.