07-12-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - सर्व काही कर्मांवर अवलंबून आहे, नेहमी यावर लक्ष ठेवा की मायेच्या वशीभूत होऊन कोणतेही उलटे कर्म होऊ नये ज्याची सजा भोगावी लागेल”

प्रश्न:-
बाबांच्या नजरेमध्ये सर्वात जास्त बुद्धिवान कोण आहेत?

उत्तर:-
ज्यांच्यामध्ये पवित्रतेची धारणा आहे तेच बुद्धिवान आहेत आणि जे पतित आहेत ते बुद्धिहीन आहेत. लक्ष्मी-नारायणाला सर्वात जास्त बुद्धिवान म्हणणार. तुम्ही मुले आता बुद्धिवान बनत आहात. पवित्रताच सर्वात मुख्य आहे म्हणून बाबा सावध करतात - ‘मुलांनो, या डोळ्यांनी धोका देऊ नये, यासाठी यांची काळजी घ्या’. या जुन्या दुनियेला बघत असताना देखील पाहू नका. नवीन दुनिया स्वर्गाची आठवण करा.

ओम शांती।
गोड-गोड सिकीलधी मुले (खूप-खूप वर्षांनी भेटलेली मुले) हे तर समजतात या जुन्या दुनियेमध्ये आता आपण थोड्या दिवसांचे यात्रेकरू आहोत. दुनियेतील मनुष्य समजतात की अजून ४० हजार वर्षे इथे रहायचे आहे. तुम्हा मुलांना तर निश्चय आहे ना. या गोष्टी विसरू नका. इथे बसलेले आहात तरी देखील तुम्हा मुलांना आतून आनंदाने भरून आले पाहिजे. या डोळ्यांनी जे काही पाहता सर्वकाही नष्ट होणार आहे. आत्मा तर अविनाशी आहे. आपण आत्म्यांनी ८४ जन्म घेतले आहेत. आता बाबा आले आहेत घरी घेऊन जाण्याकरिता. जुनी दुनिया जेव्हा पूर्ण होते तेव्हा बाबा नवीन दुनिया बनविण्यासाठी येतात. नवी सो जुनी, जुनी सो नवी दुनिया कशी होते हे तुमच्या बुद्धीमध्ये आहे. आपण अनेक वेळा चक्र फिरलो आहोत. आता चक्र पूर्ण होते. नवीन दुनियेमध्ये आपण देवता फार थोडे असतो. मनुष्य असणार नाहीत. बाकी सर्व काही कर्मांवर अवलंबून आहे. मनुष्य उलटे कर्म करतात तर ते नक्कीच आतल्याआत खात राहते; म्हणून बाबा विचारतात की या जन्मामध्ये अशी कोणती पापे तर केली नाहीत ना? हे आहे पतित घाणेरडे रावण राज्य. ही अंध:कारमय दुनिया आहे. आता बाबा तुम्हा मुलांना वारसा देत आहेत. आता तुम्ही भक्ती करत नाही. भक्तीच्या अंधारामध्ये धक्के खाऊन आलेले आहात. आता बाबांचा हात मिळाला आहे. बाबांचा सहारा नसल्यामुळे तुम्ही विषय वैतरणी नदीमध्ये गटांगळ्या खात होता. अर्धा कल्प आहेच भक्ती, ज्ञान मिळाल्यामुळे तुम्ही सतयुगी नवीन दुनियेमध्ये निघून जाता. आता तर हे आहे पुरुषोत्तम संगमयुग, जेव्हा तुम्ही घाणेरडे पतितापासून गुल-गुल, काट्यांपासून फूल बनत आहात. हे असे कोण बनवतात? बेहदचे बाबा. लौकिक पित्याला तर बेहदचे बाबा म्हणणार नाही. तुम्ही ब्रह्मा आणि विष्णूच्या देखील ऑक्युपेशनला जाणले आहे. तर तुम्हाला किती शुद्ध नशा असला पाहिजे. मूल वतन, सूक्ष्म वतन, स्थूल वतन… हे सर्व संगमावरच होते. बाबा बसून आता तुम्हा मुलांना समजावून सांगत आहेत - जुन्या आणि नवीन दुनियेचे हे संगमयुग आहे. बोलावतात देखील की, ‘पतितांना पावन बनविण्यासाठी या’. बाबांचा देखील या संगमावरच पार्ट चालतो. क्रियेटर, डायरेक्टर आहेत ना! तर जरूर त्यांची काही ॲक्टिव्हिटी (क्रियाकलाप) असेल ना. सर्वजण जाणतात की, त्यांना मनुष्य म्हटले जात नाही, त्यांना तर स्वतःचे शरीरच नाही. बाकी सर्वांना मनुष्य अथवा देवता म्हणणार. शिवबाबांना ना देवता म्हणणार, ना मनुष्य म्हणणार. हे तर टेंपररी शरीर लोनवर घेतलेले आहे. गर्भातून थोडेच जन्मले आहेत. बाबा स्वतः म्हणतात - ‘मुलांनो, शरीराशिवाय मी राजयोग कसा शिकवणार. भले मनुष्यमात्र मला म्हणतात की दगड-धोंड्यामध्ये परमात्मा आहे परंतु आता तुम्ही मुले जाणता की मी कसा येतो’. आता तुम्ही राजयोग शिकत आहात. कोणता मनुष्य काही शिकवू शकत नाही. देवता तर राजयोग शिकू शकत नाहीत. इथे या पुरुषोत्तम संगमयुगावर राजयोग शिकून देवता बनतात.

आता तुम्हा मुलांना अपार आनंद झाला पाहिजे - आता आपण ८४ चे चक्र पूर्ण केले आहे. बाबा कल्प-कल्प येतात, बाबा स्वतः म्हणतात - हा अनेक जन्मांतील अखेरचा जन्म आहे. श्रीकृष्ण तर सतयुगाचा प्रिन्स होता तोच परत ८४ चे चक्र फिरतो. शिवबाबा काही ८४ च्या चक्रामध्ये येणार नाहीत. श्रीकृष्णाची आत्माच सुंदर पासून श्याम बनते, या गोष्टी कोणालाही माहिती नाहीत. तुमच्यामध्ये देखील नंबरवारच जाणतात. माया खूप बलवान आहे. कोणालाही सोडत नाही. बाबा सर्व काही जाणतात. माया ग्राह (माया मगर) एकदम खाऊनच टाकते. हे बाबांना चांगलेच माहीत आहे. असे समजू नका की, बाबा काही अंतर्यामी आहेत. नाही, बाबा सर्वांच्या ॲक्टिव्हिटीला (वर्तणुकीला) जाणतात. समाचार तर येतात ना. माया एकदम कच्चाच पोटात घालते. अशा खूप गोष्टी तुम्हा मुलांना समजतही नाहीत. बाबांना तर सर्व समजते. तर मग मनुष्य समजतात की, परमात्मा अंतर्यामी आहे. बाबा म्हणतात मी अंतर्यामी नाही. प्रत्येकाच्या वर्तनावरून समजून तर येते ना. खूपच घाणेरडे वर्तन करतात म्हणून बाबा वारंवार मुलांना सावध करतात. मायेपासून सावध रहायचे आहे. मग भले बाबा समजावून सांगतात तरी देखील बुद्धीमध्ये शिरतच नाही, काम महाशत्रू आहे, कळणार देखील नाही की, आपण कधी विकारामध्ये गेलो, असे देखील होते; म्हणून बाबा म्हणतात कोणतीही चूक इत्यादी झाली असेल तर स्पष्टपणे सांगा, लपवू नका. नाहीतर १०० पटीने पाप होईल. ते आतल्याआत खात राहील. वृद्धी होत राहील. एकदम खालीच कोसळाल. मुलांनी बाबांसोबत अतिशय प्रामाणिक रहायचे आहे नाहीतर खूप मोठा तोटा होईल. ही तर रावणाची दुनिया आहे. रावणाच्या दुनियेची आठवण आपण का करावी. आपल्याला तर नवीन दुनियेमध्ये जायचे आहे. बाबा नवीन घरे इत्यादी बांधतात तर मुले समजतात की, आमच्यासाठी नवीन घर बनत आहे. आनंद होतो. ही तर बेहदची गोष्ट आहे. आमच्यासाठी नवीन दुनिया स्वर्ग बनत आहे. आता आपण नवीन दुनियेमध्ये जाणार आहोत मग जितकी बाबांची आठवण कराल तितके गुलगुल बनाल. आपण विकारांच्या वश होऊन काटे बनलो आहोत. तुम्ही मुले जाणता - जे आता येत नाही आहेत ते मायेच्या वश झाले आहेत. बाबांचे राहिलेले नाहीत. ट्रेटर (द्रोही) बनले आहेत. जुन्या शत्रूकडे निघून गेले आहेत. बऱ्याच जणांना अशाप्रकारे माया गिळून टाकते. पूर्णत: संपून जातात. खूप चांगले-चांगले आहेत जे असे सांगून जातात की, ‘आम्ही असे करणार, हे करणार. आम्ही तर यज्ञासाठी प्राण देखील द्यायला तयार आहोत’. आज ते राहिलेले नाहीत. तुमचे युद्ध आहेच मुळी माये सोबत. दुनियेमध्ये हे कोणीही जाणत नाहीत की, माये सोबत कसे युद्ध होते. शास्त्रांमध्ये मग दाखवले आहे देवतांचे आणि असुरांचे युद्ध झाले. आणि मग कौरवांचे आणि पांडवांचे युद्ध झाले. कोणालाही विचारा की या दोन गोष्टी शास्त्रांमध्ये कशा काय आहेत? देवता तर अहिंसक असतात. ते असतातच मुळी सतयुगामध्ये. ते मग काय कलियुगामध्ये युद्ध करण्यासाठी येतील. कौरव आणि पांडव याचा देखील अर्थ समजत नाहीत. शास्त्रांमध्ये जे लिहिले आहे तेच वाचून ऐकवत राहतात. बाबांनी (ब्रह्मा बाबांनी) तर पूर्ण गीता वाचलेली आहे. जेव्हा हे ज्ञान मिळाले तेव्हा विचार सुरु झाला की गीतेमध्ये या युद्ध इत्यादीच्या गोष्टी कशा काय लिहिल्या आहेत? श्रीकृष्ण काही गीतेचा भगवान नाही आहे. यांच्यामध्ये (ब्रह्मा तनामध्ये) बाबा बसले होते तर यांच्याद्वारे त्या भक्तिमार्गाच्या गीतेपासून मुक्त केले. आता बाबांद्वारे किती ज्ञानाचा प्रकाश मिळाला आहे. आत्म्यालाच कळते तेव्हाच तर बाबा म्हणतात - ‘स्वतःला आत्मा समजा, बेहदच्या बाबांची आठवण करा’. भक्तीमध्ये तुम्ही आठवण करत होता, म्हणत होता - ‘तुम्ही याल तेव्हा बलिहार जाऊ’. परंतु ते कसे येतील, कसे बलिहार जाणार, हे काही थोडेच समजत होते.

आता तुम्ही मुले समजता जसे बाबा आहेत तसे आपण आत्मे देखील आहोत. बाबांचा आहे अलौकिक जन्म, तुम्हा मुलांना किती सुंदर रित्या शिकवतात. तुम्ही स्वतः म्हणता - ‘हे तर तेच आमचे बाबा आहेत. जे कल्प-कल्प आमचे पिता बनतात. आपण सर्व त्यांना ‘बाबा-बाबा’ म्हणतो’. बाबा देखील मुलांनो-मुलांनो म्हणतात, तेच टीचर रूपामध्ये राजयोग शिकवतात. तुम्हाला विश्वाचा मालक बनवतात. तर अशा बाबांचे बनून मग त्याच टीचर कडून शिक्षण देखील घेतले पाहिजे. ऐकूनच प्रफुल्लित झाले पाहिजे. जर छी-छी बनलात (विकारी बनलात) तर तो आनंद होणारही नाही. भले कितीही डोके आपटले, मग ते काही आपले भाऊबंद नाहीत. इथे मनुष्यांची किती आडनावे असतात. त्या सर्व आहेत हदच्या गोष्टी. तुमचे आडनाव बघा किती मोठे आहे. मोठ्यात मोठा ग्रेट-ग्रेट ग्रँड फादर ब्रह्मा. त्यांना कोणीही ओळखत नाही. शिवबाबांना तर सर्वव्यापी म्हटले आहे. ब्रह्मा विषयी देखील कोणाला माहिती नाही आहे. चित्र देखील आहे - ब्रह्मा, विष्णू, शंकर. मग ब्रह्माला सूक्ष्म वतनमध्ये घेऊन गेले आहेत. बायोग्राफी (चरित्र) काहीच जाणत नाहीत. सूक्ष्म वतनमध्ये मग ब्रह्मा कोठून आला? तिथे कसे दत्तक घेतील. बाबांनी समजावून सांगितले आहे - हा (ब्रह्मा तन) माझा रथ आहे. अनेक जन्मांच्या शेवटच्या जन्मामध्ये अंताला मी यांच्यामध्ये प्रवेश केला आहे. हे पुरुषोत्तम संगमयुग गीतेचा एपिसोड आहे, ज्यामध्ये पवित्रता मुख्य आहे. पतिता पासून पावन कसे बनायचे आहे, हे कोणालाच माहीत नाही आहे. साधू-संत इत्यादी कधीही असे म्हणणार नाहीत की, ‘देहासहित देहाच्या सर्व संबंधांना विसरून एका मज पित्याची आठवण करा तर मायेची पाप कर्म भस्म होतील’. ते (दुनियावाले) तर बाबांनाच जाणत नाहीत. गीतेमध्ये बाबांनी म्हटले आहे - ‘या साधू इत्यादींचा देखील उद्धार मी येऊन करतो’.

बाबा समजावून सांगत आहेत - सुरुवातीपासून आत्तापर्यंत जे काही आत्मे पार्ट बजावत आहेत - सर्वांचा हा अंतिम जन्म आहे. यांचा (ब्रह्मा बाबांचा) देखील हा अंतिम जन्म आहे. हेच मग ब्रह्मा बनले आहेत. लहानपणी खेड्यातील मुलगा होता. सुरुवातीपासून शेवटपर्यंत ८४ जन्म यानेच पूर्ण केले आहेत. आता तुम्हा मुलांच्या बुद्धीचे कुलूप उघडले आहे. आता तुम्ही बुद्धिवान बनता. पूर्वी बुद्धिहीन होता. हे लक्ष्मी-नारायण आहेत - बुद्धिवान. बुद्धिहीन पतितांना म्हटले जाते. मुख्य आहे पवित्रता. लिहितात देखील – ‘मायेने आम्हाला पाडून घातले (पतन केले). दृष्टी विकारी बनली’. बाबा तर घडोघडी सावध करत राहतात - ‘मुलांनो, मायेकडून कधीही हार खायची नाही. आता घरी जायचे आहे. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. ही जुनी दुनिया नष्ट झाली की झाली’. आपण पावन बनतो तर आपल्याला पावन दुनिया देखील पाहिजे ना! तुम्हा मुलांनाच पतितापासून पावन बनायचे आहे. बाबा काही योग लावणार नाहीत. बाबा पतित थोडेच बनतात जे योग लावतील. बाबा तर म्हणतात, ‘मी तुमच्या सेवेमध्ये उपस्थित आहे’. तुम्हीच मागणी केली आहे की येऊन आम्हा पतितांना पावन बनवा. तुमच्याच सांगण्यावरून मी आलो आहे. तुम्हाला खूप सोपा रस्ता सांगतो फक्त मनमनाभव. भगवानुवाच आहे ना. फक्त श्रीकृष्णाचे नाव दिल्याने बाबांना सर्वजण विसरून गेले आहेत. फर्स्ट आहेत बाबा, सेकंड आहे श्रीकृष्ण. ते (शिवबाबा) परमधामाचे मालक, तो (श्रीकृष्ण) आहे वैकुंठाचा मालक. सूक्ष्म वतनमध्ये तर काहीच नसते. सर्वांमध्ये नंबर वन आहे - श्रीकृष्ण, ज्याच्यावर सर्वजण प्रेम करतात. बाकीचे तर सर्व मागाहून येतात. स्वर्गामध्ये तर सर्वजण जाऊ सुद्धा शकत नाहीत.

तर तुम्हा गोड-गोड मुलांना अत्यानंद झाला पाहिजे. बाबांकडे अशी बरीच मुले येतात जी कधीच पवित्र राहत नाहीत. बाबा समजावून सांगतात - ‘विकारामध्ये जाता तर मग बाबांकडे येता कशाला?’ म्हणतात - “काय करू, राहू शकत नाही. परंतु इथे येतो कदाचित कधीतरी तीर लागेल (मनाला भिडेल). तुमच्याशिवाय आमची सद्गती कोण करणार म्हणून येऊन बसतो. माया किती बलवान आहे. निश्चय देखील आहे - बाबा आपल्याला पतिता पासून पावन गुल-गुल (फूल) बनवत आहेत. परंतु काय करू, तरी देखील खरे बोलल्याने कधीतरी सुधरेन. मला हा निश्चय आहे की तुमच्याकडूनच मला सुधारायचे आहे.” बाबांना अशा मुलांची दया येते तरीही पुन्हा असेच होणार. नथिंग न्यू. बाबा तर दररोज श्रीमत देतात. कोणी अमलात आणतात देखील, यामध्ये बाबा काय करू शकतात. बाबा म्हणतील कदाचित यांचा पार्टच असा आहे. सगळेच काही राजा-राणी बनत नाहीत. राजधानी स्थापन होत आहे. राजधानीमध्ये सर्व पाहिजेत. तरी देखील बाबा म्हणतात - ‘मुलांनो, हिम्मत सोडू नका. पुढे जाऊ शकता’. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1) कायम शुद्ध नशा रहावा की बेहदचे बाबा आम्हाला पतित विकारी पासून गुल गुल, काट्यांपासून फूल बनवत आहेत. आता आपल्याला बाबांचा हात मिळाला आहे, ज्याच्या आधारे आपण विषय वैतरणी नदी पार करणार आहोत.

वरदान:-
पॉवरफुल ब्रेक द्वारे सेकंदामध्ये निगेटिव्हला पॉझिटिव्ह मध्ये परिवर्तन करणारे स्व परिवर्तक भव जेव्हा निगेटिव्ह किंवा व्यर्थ संकल्प चालतात, तर त्याची गती खूप फास्ट असते. फास्ट गतीच्या वेळी पॉवरफुल ब्रेक लावून परिवर्तन करण्याचा अभ्यास पाहिजे. तसेही जेव्हा घाट चढतात तर आधी ब्रेक चेक करतात. तुम्ही तुमची उच्च स्थिती बनविण्यासाठी संकल्पांना सेकंदामध्ये ब्रेक लावण्याचा अभ्यास वाढवा. जेव्हा आपले संकल्प किंवा संस्कार एका सेकंदामध्ये निगेटिव्ह पासून पॉझिटिव्हमध्ये परिवर्तन कराल तेव्हा स्व परिवर्तना द्वारे विश्व परिवर्तनाचे कार्य संपन्न होईल.

बोधवाक्य:-
स्वयं प्रति आणि सर्व आत्म्यां प्रति श्रेष्ठ परिवर्तनाच्या शक्तीला कार्यामध्ये आणणारेच खरे कर्मयोगी आहेत.