08-01-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - बाबांचे श्रीमत तुम्हाला २१ पिढ्यांचे सुख देते, इतके अनोखे मत बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही देऊ शकत नाही, तुम्ही श्रीमतावर चालत रहा”

प्रश्न:-
आपणच आपल्याला राजतिलक देण्याचा सोपा पुरुषार्थ कोणता आहे?

उत्तर:-
१. आपणच आपल्याला राजतिलक देण्यासाठी बाबांची जी शिकवण मिळते त्यानुसार नीट चाला. यामध्ये आशीर्वाद किंवा कृपेची गोष्ट नाही. २. फॉलो फादर करा, दुसऱ्याला पहायचे नाही, मनमनाभव, याद्वारे आपल्याला आपणहूनच तिलक मिळतो. अभ्यास आणि आठवणीच्या यात्रेद्वारेच तुम्ही बेगर टू प्रिन्स बनता.

गीत:-
ओम् नमः शिवाय…

ओम शांती।
जेव्हा बाबा आणि दादा ओम् शांती म्हणतात तर दोन वेळेस देखील म्हणू शकतात कारण दोघेही एका मध्येच आहेत. एक आहेत अव्यक्त, दुसरे आहेत व्यक्त, दोघे एकत्र आहेत. दोघांचा आवाज एकत्र सुद्धा होतो. वेग-वेगळा देखील होऊ शकतो. हे एक आश्चर्य आहे. दुनियेमध्ये हे कोणीही जाणत नाहीत की परमपिता परमात्मा यांच्या शरीरामध्ये बसून ज्ञान ऐकवतात. हे कुठेही लिहिलेले नाही आहे. बाबांनी कल्पापूर्वी देखील सांगितले होते, आता देखील म्हणतात की, मी या साधारण शरीरामध्ये अनेक जन्मांच्या अंताला यांच्यामध्ये प्रवेश करतो, यांचा आधार घेतो. गीतेमध्ये काही ना काही अशी महावाक्ये आहेत जी काही सत्य देखील आहे. हे शब्द सत्य आहेत - ‘मी अनेक जन्मांच्या अंताला प्रवेश करतो, जेव्हा की हे (ब्रह्मा बाबा) वानप्रस्थ अवस्थेमध्ये आहेत’. यांच्यासाठी हे म्हणणे योग्य आहे. सतयुगामध्ये सर्वात पहिला जन्म देखील यांचाच आहे. आणि आता अखेरीला वानप्रस्थ अवस्थेमध्ये आहेत, ज्यांच्यामध्येच बाबा प्रवेश करतात. तर यांच्यासाठीच म्हणतात, हे स्वतः मात्र जाणत नाहीत की, आपण किती पुनर्जन्म घेतले. शास्त्रांमध्ये ८४ लाख पुनर्जन्म लिहिले आहेत. हा सर्व आहे भक्तिमार्ग. याला म्हटले जाते - ‘भक्ती कल्ट (भक्ती पंथ)’. ज्ञान काण्ड (ज्ञानाचा पार्ट) वेगळा आहे, भक्ती काण्ड (भक्तीचा पार्ट) वेगळा आहे. भक्ती करत-करत उतरतच येतात (पतनच होते). हे ज्ञान तर एकदाच मिळते. बाबा एकदाच सर्वांची सद्गती करण्यासाठी येतात. बाबा येऊन सर्वांच्या भविष्याचे प्रारब्ध एकदाच घडवतात. तुम्ही शिकताच मुळी भविष्य नवीन दुनियेकरिता. बाबा येतातच नवीन राजधानी स्थापन करण्यासाठी म्हणून याला ‘राजयोग’ म्हटले जाते. याचे खूप महत्त्व आहे. अनेकांची इच्छा असते की, भारताचा प्राचीन राजयोग कोणीतरी शिकवावा; परंतु आजकाल हे संन्यासी लोक बाहेरच्या देशात जाऊन म्हणतात की, आम्ही प्राचीन राजयोग शिकविण्यासाठी आलो आहोत. तर त्यांना देखील वाटते आपण शिकावे कारण ते समजतात योगाद्वारेच पॅराडाईज स्थापन झाला होता. बाबा समजावून सांगतात - योगबलाने तुम्ही मालक बनता. पॅराडाईज स्थापन केला आहे बाबांनी. तो कसा स्थापन करतात, ते कोणीही जाणत नाहीत. हा राजयोग, रूहानी बाबाच शिकवतात. कोणीही देहधारी मनुष्य शिकवू शकत नाही. आजकाल भेसळ आणि भ्रष्टाचार तर मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे ना म्हणून बाबा म्हणतात - मी पतितांना पावन बनविणारा आहे. तर जरूर पतित बनविणारा देखील कोणी असेल. आता तुम्हीच ठरवा - बरोबर असेच आहे ना? मीच येऊन वेद-शास्त्र इत्यादींचे सार ऐकवितो. ज्ञानानेच तुम्हाला २१ जन्मांचे सुख मिळते. भक्तिमार्गामध्ये आहे अल्पकाळ क्षणभंगुर सुख, हे आहे २१ पिढीचे सुख, जे बाबाच देतात. बाबा तुम्हाला सद्गती देण्यासाठी जे श्रीमत देतात ते सर्वात न्यारे (अनोखे) आहे. हे बाबा सर्वांचे हृदय जिंकणारे आहेत. जसे ते जड दिलवाला मंदिर आहे, हे मग आहे चैतन्य दिलवाला मंदिर. ॲक्युरेट तुमच्या ॲक्टिव्हिटीचीच (कर्मांचीच) चित्रे बनलेली आहेत. यावेळी तुमची ॲक्टिव्हिटी सुरू आहे. दिलवाला बाबा मिळाले आहेत - सर्वांची सद्गती करणारे, सर्वांचे दुःख हरण करून सुख देणारे. किती उच्च ते उच्च गायले गेले आहेत. उच्च ते उच्च आहे भगवान शिवची महिमा. भले चित्रांमध्ये शंकर इत्यादींच्या पुढ्यात सुद्धा शिवलिंगाचे चित्र दाखवले आहे. वास्तविक देवतांच्या पुढ्यात शिवाचे चित्र ठेवणे तर निषिद्ध आहे. ते देवता काही भक्ती करत नाहीत. भक्ती ना देवता करत, ना संन्यासी करू शकत. ते आहेत ब्रह्म ज्ञानी, तत्व ज्ञानी. जसे हे आकाश तत्व आहे, तसे ते ब्रह्म तत्व आहे. ते काही बाबांची तर आठवण करत नाहीत, ना त्यांना हा मंत्र मिळतो. हा महामंत्र बाबाच येऊन संगमयुगावर देतात. सर्वांचे सद्गती दाता बाबा एकदाच येऊन ‘मनमनाभव’चा मंत्र देतात. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, देहा सहीत देहाचे सर्व धर्म त्यागून, स्वतःला अशरीरी आत्मा समजून बाबांची आठवण करा’. किती सोप्या पद्धतीने समजावून सांगतात. रावण राज्य असल्या कारणाने तुम्ही आता देह-अभिमानी बनले आहात. आता बाबा तुम्हाला आत्म-अभिमानी बनवितात. स्वतःला आत्मा समजून मज पित्याची आठवण करत रहा तर आत्म्यामध्ये जी भेसळ पडली आहे, ती निघून जाईल. सतोप्रधाना मधून सतोमध्ये आल्याने कला कमी होतात ना. सोन्याचे देखील कॅरेट असते ना. आता तर कलियुग अंतामध्ये सोने बघायला सुद्धा मिळत नाही, सतयुगामध्ये तर सोन्याचे महाल असतात. किती रात्रं-दिवसाचा फरक आहे! त्याचे नावच आहे - गोल्डन एजेड वर्ल्ड (स्वर्णिम युगाची दुनिया). तिथे दगड-विटा इत्यादीचे बांधकाम नसते. बिल्डिंग बनते तेव्हा त्यामध्ये देखील सोने-चांदी सोडून दुसरी कसलीही कचरा-पट्टी असत नाही. तिथे सायन्स द्वारे खूप सुख आहे. हा देखील ड्रामा बनलेला आहे. यावेळी विज्ञान घमेंडी आहे, सतयुगामध्ये विज्ञानाला घमेंडी म्हणणार नाही. तिथे तर विज्ञानामुळे तुम्हाला सुख मिळते. इथे आहे अल्पकाळाचे सुख मग यामुळेच अतोनात दुःख मिळते. बॉम्ब इत्यादी हे सर्व विनाशासाठी बनवतच राहतात. इतरांना बॉम्ब्स बनविण्यासाठी विरोध करतात आणि मग स्वतः मात्र बनवत राहतात. समजतात देखील या बॉम्बने आपलाच मृत्यू होणार आहे परंतु तरी देखील बनवत राहतात म्हणजे बुद्धी मेलेली आहे ना. हे सर्व ड्रामामध्ये नोंदलेले आहे. बनविल्या शिवाय राहू शकत नाहीत. मनुष्य समजतात की या बॉम्ब्सनी आपलाच मृत्यू होणार आहे परंतु माहित नाही की हे विध्वसंक कार्य करण्यासाठी कोण प्रेरीत करत आहे, आम्ही बनवल्याशिवाय राहू शकत नाही. जरूर बनवावेच लागेल. विनाशाची देखील ड्रामामध्ये नोंद आहे. भले कितीही कोणी पीस प्राइज देतील परंतु पीस स्थापन करणारे एक बाबाच आहेत. शांतीचे सागर बाबाच शांती, सुख, पवित्रतेचा वारसा देतात. सतयुगामध्ये आहे बेहदची संपत्ती. तिथे तर दुधाच्या नद्या वाहतात. विष्णूला क्षीरसागरामध्ये दाखवतात. ही तुलना केली जाते. कुठे तो क्षीर सागर, कुठे हा विषय सागर. भक्तिमार्गामध्ये मग तलाव इत्यादी बनवून त्यामध्ये दगडावर विष्णूला झोपवतात. भक्तीमध्ये किती खर्च करतात. किती वेस्ट ऑफ टाईम, वेस्ट ऑफ मनी करतात. किती खर्च करून देवींच्या मुर्त्या बनवतात आणि मग समुद्रामध्ये विसर्जित करतात तर पैसे वेस्ट झाले ना. ही आहे बाहुल्यांची पूजा. कोणाच्याही ऑक्युपेशन विषयी कोणालाच काहीच माहिती नाही आहे. आता तुम्ही कोणाच्याही मंदिरामध्ये जाल तर तुम्ही प्रत्येकाचे ऑक्युपेशन जाणता. मुलांना सेवेसाठी कुठेही जाण्याची मनाई नाही. अगोदर तर मंदिरांमध्ये अज्ञानी बनून जात होता, आता ज्ञानी बुद्धिमान बनून जाता. तुम्ही म्हणाल आम्ही यांच्या ८४ जन्मांना जाणतो. भारतवासीयांना तर श्रीकृष्णाच्या जन्मा विषयी सुद्धा काहीच माहिती नाही आहे. तुमच्या बुद्धीमध्ये हे सारे नॉलेज आहे. नॉलेज सोर्स ऑफ इन्कम आहे. वेद-शास्त्र इत्यादींमध्ये काही एम ऑब्जेक्ट नाहीये. शाळांमध्ये नेहमी एम ऑब्जेक्ट असते. या शिक्षणाने तुम्ही किती श्रीमंत बनता.

ज्ञानाद्वारे होते सद्गती. या ज्ञानाद्वारेच तुम्ही श्रीमंत बनता. तुम्ही कोणत्याही मंदिरामध्ये जाल तर लगेच ओळखाल - हे कोणाचे यादगार आहे! जसे दिलवाडा मंदिर आहे - ते आहे जड, हे आहे चैतन्य. हुबेहूब जसे इथे चित्रातील झाडामध्ये दाखवले आहे, तसेच मंदिर बनलेले आहे. खाली तपस्येमध्ये बसले आहेत, वरती छतावर सारा स्वर्ग आहे. खूप खर्च करून बनवले आहे. इथे तर काहीच नाही. भारत १०० प्रतिशत सॉल्व्हंट, पावन होता, आता भारत १०० प्रतिशत इनसॉल्व्हंट, पतित आहे कारण इथे सर्व विकारातून जन्म घेतात. तिथे विकाराची गोष्ट नसते. गरुड पुराणामध्ये रोमांचक गोष्टी यासाठी लिहिल्या आहेत की लोकांनी थोडे सुधारावे. परंतु ड्रामामध्ये मनुष्यांचे सुधारणे नाहीच आहे. आता ईश्वरीय स्थापना होत आहे. ईश्वरच स्वर्ग स्थापन करतील ना. त्यांनाच हेवनली गॉडफादर म्हटले जाते. बाबांनी समजावून सांगितले आहे - त्या लष्करी सेना ज्या लढाया करतात, ते सर्व काही राजा-राणी बनण्यासाठी करतात. इथे तुम्ही मायेवर विजय प्राप्त करता स्वतःसाठी. जितके कराल तितके मिळवाल. तुम्हा प्रत्येकाला आपले तन-मन-धन भारताला स्वर्ग बनविण्यासाठी खर्च करावे लागते. जितके कराल तितके उच्च पद प्राप्त कराल. इथे काही रहायचे तर नाहीये. आता साठीच गायन आहे - ‘किनकी दबी रहेगी धूल में…’ आता बाबा आले आहेत, तुम्हाला राज्य-भाग्य देण्यासाठी. म्हणतात आता तन-मन-धन सर्व यामध्ये लावा. याने (ब्रह्माने) सर्व काही अर्पण केले ना. याला म्हटले जाते महादानी. विनाशी धनाचे दान करता तर अविनाशी धनाचे देखील दान करायचे असते, जितके जे दान करतील. नामीग्रामी दानी असतात तर म्हणतात अमका खूप दानशूर होता. नाव तर होते ना. ते इनडायरेक्ट ईश्वर अर्थ करतात. परंतु राजाई स्थापन होत नाही. आता तर राजाई स्थापन होते म्हणून पूर्णतः महादानी बनायचे आहे. भक्तिमार्गामध्ये गातात देखील - ‘हम वारी जायेंगे…’ यामध्ये खर्च काहीच नाही. गव्हर्मेंटचा किती खर्च होतो. इथे तुम्ही जे काही करता स्वतःसाठी, भले मग ८ च्या माळेमध्ये या, किंवा १०८ च्या माळेमध्ये, किंवा १६,१०८ मध्ये या. पास विद् ऑनर बनायचे आहे. असा योग जमा करा जे कर्मातीत अवस्थेला प्राप्त कराल मग कोणतीही सजा होणार नाही.

तुम्ही सर्व आहात वॉरियर्स (योध्ये). तुमचे युद्ध आहे रावणासोबत, कोणत्या मनुष्या सोबत नाही. नापास झाल्या कारणाने दोन कला कमी झाल्या. त्रेताला दोन कला कमी असणारा स्वर्ग म्हणणार. बाबांना पूर्णत: फॉलो करण्याचा पुरुषार्थ तर केला पाहिजे ना. यामध्ये मन-बुद्धीने सरेंडर व्हावे लागते. बाबा हे सर्व काही तुमचे आहे. बाबा म्हणतील - हे सेवेमध्ये लाव. मी तुम्हाला जे मत देतो, ते कार्य करा, युनिव्हर्सिटी उघडा, सेंटर्स उघडा. अनेकांचे कल्याण होईल. फक्त एवढाच मेसेज द्यायचा आहे - ‘बाबांची आठवण करा आणि वारसा घ्या’. मेसेंजर, पैगंबर तुम्हा मुलांना म्हटले जाते. सर्वांना हा मेसेज द्या की, बाबा, ब्रह्मा द्वारे म्हणत आहेत - ‘माझी आठवण करा तर तुमची विकर्म विनाश होतील, जीवनमुक्ती मिळेल. आता आहे जीवनबंध नंतर जीवनमुक्त व्हाल. बाबा म्हणतात - ‘मी भारतामध्येच येतो’. हा ड्रामा अनादि बनलेला आहे. कधी बनला, केव्हा पूर्ण होणार? हा प्रश्न उठू शकत नाही. हा तर ड्रामा अनादि चालतच राहतो. आत्मा किती छोटा बिंदू आहे. तिच्यामध्ये हा अविनाशी पार्ट नोंदलेला आहे. किती गुह्य गोष्टी आहेत. ताऱ्याप्रमाणे छोटा बिंदू आहे. माता देखील इथे मस्तकावर टिळा लावतात. आता तुम्ही मुले पुरुषार्थाने आपणच आपल्याला राजतिलक देत आहात. तुम्ही बाबांच्या शिकवणीनुसार चांगल्या रीतीने चालाल तर जसे काही तुम्ही स्वतःला राज-तिलक देत आहात. असे नाही की यामध्ये आशीर्वाद किंवा कृपा होईल. तुम्हीच स्वतःला राज-तिलक देता. खरे तर हा राज-तिलक आहे. फॉलो फादर करण्याचा पुरुषार्थ करायचा आहे, दुसऱ्यांना पहात बसायचे नाही. हे आहे मनमनाभव, ज्यामुळे आपल्याला आपोआपच तिलक मिळतो, बाबा देत नाहीत. हा आहेच राजयोग. तुम्ही बेगर टू प्रिन्स बनता. तर किती चांगला पुरुषार्थ केला पाहिजे. मग यांना (ब्रह्मा बाबांना) देखील फॉलो करायचे आहे. ही तर समजण्या सारखी गोष्ट आहे ना. शिक्षणाने कमाई होते. जितका-जितका योग तितकी धारणा होईल. योगामध्येच मेहनत आहे म्हणून भारताचा राजयोग गायला गेला आहे. बाकी गंगा स्नान करत-करत आयुष्य जरी निघून गेले तरी देखील पावन बनू शकणार नाही. भक्ती मार्गामध्ये ईश्वर अर्थ गरिबांना देतात. इथे मग स्वतः ईश्वर येऊन गरिबांनाच विश्वाची बादशाही देतात; गरीब निवाज आहेत ना. भारत जो १०० टक्के सॉल्व्हंट होता, तो या यावेळी १०० टक्के इनसॉल्व्हंट आहे. दान नेहमी गरिबांना दिले जाते. बाबा किती श्रेष्ठ बनवतात. अशा बाबांना शिव्या देतात. बाबा म्हणतात - अशी जेव्हा ग्लानी करतात तेव्हा मला यावे लागते. हा देखील ड्रामा बनलेला आहे. हे पिता देखील आहेत, टीचर देखील आहेत. शीख लोक म्हणतात - ‘सद्गुरु अकाल’. बाकी भक्तिमार्गाचे गुरु तर पुष्कळ आहेत. अकालला (आत्म्याला) तख्त केवळ इथेच मिळते. तुम्हा मुलांचे तख्त देखील युज करतात. म्हणतात मी यांच्यामध्ये प्रवेश करून सर्वांचे कल्याण करतो. यावेळी यांचा हा पार्ट आहे. या खूप समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. नवीन कोणी समजू शकणार नाही. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) अविनाशी ज्ञान धनाचे दान करून महादानी बनायचे आहे. जसे ब्रह्मा बाबांनी आपले सर्वकाही यामध्ये लावले, असे फॉलो फादर करून राजाई मध्ये उच्च पद घ्यायचे आहे.

२) सजे पासून वाचण्यासाठी असे योगबळ कमवायचे आहे जे कर्मातीत अवस्थेला प्राप्त कराल. पास विथ ऑनर बनण्याचा पुरुषार्थ पूर्णपणे करायचा आहे. दुसऱ्यांना बघत बसायचे नाही.

वरदान:-
कडक नियम आणि दृढ संकल्पा द्वारे निष्काळजीपणाला नष्ट करणारे ब्रह्मा बाप समान अथक भव

ब्रह्मा बाबा समान अथक बनण्यासाठी निष्काळजीपणाला नष्ट करा, यासाठी काही कडक नियम बनवा. दृढ संकल्प करा, अटेंशन रुपी चौकीदार नेहमी अलर्ट राहील तर निष्काळजीपणा नष्ट होईल. अगोदर स्वतःवर मेहनत करा नंतर मग सेवेमध्ये, तेव्हा धरणी परिवर्तन होईल. आता केवळ “नंतर करू, होऊन जाईल” या आरामदायी संकल्पांचे डनलपला सोडा. ‘करायचेच आहे’, हे स्लोगन डोक्यामध्ये लक्षात राहील तर परिवर्तन होईल.

बोधवाक्य:-
समर्थ बोल असल्याची निशाणी आहे - ज्या बोलामध्ये आत्मिक भाव आणि शुभ भावना असेल.

आपल्या शक्तिशाली मन्साद्वारे सकाश देण्याची सेवा करा:-

जसा-जसा वेळ जवळ येत आहे तितके व्यर्थ संकल्प देखील वाढत आहेत, परंतु हे चुकते होण्यासाठी बाहेर निघत आहेत. त्यांचे काम आहे येणे आणि तुमचे काम आहे उडत्या कलेद्वारे, सकाश द्वारे परिवर्तन करणे. घाबरू नका, त्याच्या प्रभावामध्ये येऊ नका.