08-02-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्ही खुदाई खिदमतगार (ईश्वरीय सेवाधारी) खरे सॅल्वेशन आर्मी आहात, तुम्हाला सर्वांना शांतीचे सॅल्वेशन द्यायचे आहे”

प्रश्न:-
तुम्हा मुलांकडे जेव्हा कोणी शांतीची सॅल्वेशन (शांतीसाठी मदत) मागतात तेव्हा त्यांना काय सांगितले पाहिजे?

उत्तर:-
त्यांना म्हणा - बाबा म्हणतात - तुम्हाला आता इथेच शांती हवी आहे काय. हे काही शांतीधाम नाही आहे. शांती तर शांतीधाममध्येच असू शकते, ज्याला मूलवतन म्हटले जाते. आत्म्याला जेव्हा शरीर नसते तेव्हा शांती असते. सतयुगामध्ये पवित्रता-सुख-शांती सगळे आहे. बाबाच येऊन हा वारसा देतात. तुम्ही बाबांची आठवण करा.

ओम शांती।
आत्मिक बाबा बसून आत्मिक मुलांना समजावून सांगत आहेत. सर्व मनुष्य हे जाणतात की माझ्यामध्ये आत्मा आहे. जीव-आत्मा असे म्हणतात ना. पहिले आपण आत्मा आहोत, नंतर शरीर मिळते. कोणीही आपल्या आत्म्याला पाहिलेले नाहीये. फक्त एवढे समजतात की आत्मा आहे. जसे आत्म्याला जाणतात, पाहिलेले नाहीये, तसे परमपिता परमात्म्यासाठी देखील म्हणतात परम-आत्मा अर्थात परमात्मा, परंतु त्यांना पाहिलेले नाही आहे. ना स्वतःला, ना बाबांना पाहिलेले आहे. म्हणतात की, आत्मा एक शरीर सोडून दुसरे घेते. परंतु यथार्थ रीत्या जाणत नाहीत. ८४ लाख योनी देखील म्हणतात, वास्तविक ८४ जन्म आहेत. परंतु हे देखील जाणत नाहीत की कोणते आत्मे किती जन्म घेतात? आत्मा बाबांना बोलावते परंतु ना पाहिले आहे, ना यथार्थ रित्या माहीती आहे. पहिले तर आत्म्याला यथार्थ रीतीने जाणा तेव्हाच मग बाबांना जाणाल. स्वतःलाच जाणत नाहीत तर समजावणार कोण? याला म्हटले जाते - सेल्फ रियलाईझ (आत्म-साक्षात्कार) करणे. ते तर बाबांशिवाय कोणी करवू शकत नाही. आत्मा काय आहे, कशी आहे, आत्मा कुठून येते, कसे जन्म घेते, इतक्या छोट्याशा आत्म्यामध्ये ८४ जन्मांचा पार्ट कसा भरलेला आहे, हे कोणीही जाणत नाही. स्वतःला जाणत नाहीत तर बाबांनाही जाणत नाहीत. हे लक्ष्मी-नारायण देखील मनुष्याचे पद आहे ना. यांनी हे पद कसे मिळवले? हे कोणीही जाणत नाही. जाणून तर मनुष्यानेच घ्यायला हवे ना. म्हणतात - हे वैकुंठाचे मालक होते परंतु त्यांनी हे मालकाचे पद मिळवले कसे, मग ते गेले कुठे? काहीही जाणत नाहीत. आता तुम्ही तर सर्वकाही जाणता. आधी काहीच जाणत नव्हता. जसे मुलगा आधी जाणतो का की बॅरिस्टर काय असतो? शिकत-शिकत बॅरिस्टर बनतो. तर हे लक्ष्मी-नारायण देखील शिकल्याने बनले आहेत. बॅरिस्टरी, डॉक्टरी इत्यादी सर्वांची पुस्तके असतात ना. तर यांचे पुस्तक आहे गीता. ती देखील कोणी ऐकवली? राजयोग कोणी शिकवला? हे कोणीही जाणत नाही. त्यामध्ये नाव बदलेले आहे. शिव जयंती देखील साजरी करतात, तेच येऊन तुम्हाला कृष्णपुरीचा मालक बनवतात. श्रीकृष्ण स्वर्गाचा मालक होता ना परंतु स्वर्गाला सुद्धा जाणत नाहीत. नाहीतर मग असे का म्हणतात की, श्रीकृष्णाने द्वापरमध्ये गीता ऐकवली. श्रीकृष्णाला द्वापरमध्ये घेऊन गेले आहेत, लक्ष्मी-नारायणाला सतयुगामध्ये, रामाला त्रेतामध्ये; उपद्रव लक्ष्मी-नारायणाच्या राज्यामध्ये दाखवत नाहीत. श्रीकृष्णाच्या राज्यामध्ये कंस, रामाच्या राज्यामध्ये रावण इत्यादी दाखवले आहेत. हे कोणालाच माहित नाही आहे की, राधे-कृष्णच लक्ष्मी-नारायण बनतात. अगदीच अज्ञान अंध:कार आहे. अज्ञानाला अंध:कार म्हटले जाते. ज्ञानाला प्रकाश म्हटले जाते. आता सोझरा (उष:काल) करणारा कोण? ते आहेत बाबा. ज्ञानाला दिवस, भक्तीला रात्र म्हटले जाते. आता तुम्ही समजता हा भक्तीमार्ग देखील जन्म-जन्मांतर चालत आला आहे. शिडी उतरत आले आहेत. कला कमी होत जाते. इमारत नवीन बनते मग दिवसेंदिवस आयुष्य कमी होत जाईल. ३/४ जुना झाला तर त्याला जुनेच म्हटले जाईल. मुलांना पहिला तर हा निश्चय हवा की, हे सर्वांचे पिता आहेत, जे सर्वांची सद्गती करतात, सर्वांना शिक्षण सुद्धा देतात. सर्वांना मुक्तिधामला घेऊन जातात. तुमच्याकडे एम ऑब्जेक्ट आहे. तुम्ही हे शिक्षण शिकून जाऊन आपल्या तख्तावर बसाल. बाकीच्या सर्वांना मुक्तिधामला घेऊन जातील. चक्राच्या चित्रावर जेव्हा समजावून सांगता तेव्हा त्यामध्ये दाखवता की, सतयुगामध्ये हे अनेक धर्मच नाही आहेत. त्यावेळी ते आत्मे निराकारी दुनियेमध्ये राहतात. हे तर तुम्ही जाणता की, हे आकाश पोलार (पोकळ) आहे. वायूला वायू म्हणणार, आकाशाला आकाश. असे नाही की सगळेच परमात्मा आहेत. मनुष्य समजतात की वायूमध्ये देखील भगवान आहे, आकाशामध्ये सुद्धा भगवान आहेत. आता बाबा बसून सर्व गोष्टी समजावून सांगतात. बाबांकडे जन्म तर घेतला मग शिकवतात कोण? बाबाच रुहानी टिचर बनून शिकवतात. नीट अभ्यास करून पूर्ण केलात की मग सोबत घेऊन जातील नंतर मग तुम्ही याल पार्ट बजावण्याकरिता. सतयुगामध्ये सर्वात आधी तुम्हीच आला होता. आता मग सर्व जन्मांच्या शेवटी येऊन पोहोचले आहात, मग पुन्हा पहिले याल. आता बाबा म्हणतात दौडी लावा (वेगाने पुरुषार्थ करा). चांगल्या रीतीने बाबांची आठवण करा, इतरांना सुद्धा शिकवायचे आहे. नाही तर एवढ्या सगळ्यांना शिकवणार कोण? बाबांचे मददगार जरूर बनणार ना. खुदाई खिदमतगार (ईश्वरीय सेवाधारी) असे नाव देखील आहे ना. इंग्रजीमध्ये म्हणतात सॅल्वेशन आर्मी (मुक्ती दल). कोणती मदत पाहिजे? सर्व म्हणतात शांतीचे सॅल्वेशन (शांतीसाठी मदत) पाहिजे. बाकी ते (दुनियेतील आर्मीवाले) काही शांतीसाठी मदत थोडीच देतात. जे शांतीसाठी मदत मागतात त्यांना तुम्ही बोला - ‘बाबा म्हणतात - आता इथेच तुम्हाला शांती पाहिजे काय? हे काय शांतीधाम थोडेच आहे. शांती तर शांतीधाममध्येच असू शकते, ज्याला मुलवतन म्हटले जाते’. आत्म्याला शरीर नसते तेव्हा शांतीमध्ये असते. बाबाच येऊन हा वारसा देतात. तुमच्यामध्ये देखील समजावून सांगण्याची छान युक्ती पाहिजे. प्रदर्शनीमध्ये जर आपण उभे राहून सर्वांचे ऐकले तर खूप जणांच्या चुका निघतील कारण की प्रदर्शनी समजावून सांगणारे तर नंबरवार आहेत ना. सर्वजण एकसारखे असते तर मग ब्राह्मणीने असे का लिहिले असते की, अमक्याने येऊन भाषण करावे. अरे, तुम्ही देखील ब्राह्मण आहात ना. बाबा अमका आमच्या पेक्षा हुशार आहे. हुशारी वरूनच मनुष्य दर्जा प्राप्त करतात ना. नंबरवार तर आहेत ना. जेव्हा परीक्षेचा रिझल्ट निघेल तेव्हा मग तुम्हाला आपोआप साक्षात्कार होईल; मग समजतील आम्ही तर श्रीमतावर चालत नाही. बाबा म्हणतात - कोणतेही विकर्म करू नका. देहधारीवर आकर्षित होऊ नका. हे तर ५ तत्वांनी बनलेले शरीर आहे ना. ५ तत्वांची थोडीच पूजा करायची आहे किंवा आठवण करायची आहे. भले या डोळ्यांनी बघा परंतु आठवण बाबांचीच करायची आहे. आत्म्याला आता नॉलेज मिळाले आहे. आता आपल्याला घरी जायचे आहे नंतर मग वैकुंठामध्ये येणार. आत्म्याला समजू शकतो, बघू शकत नाही; अगदी तसेच हे देखील समजू शकता. हां दिव्य दृष्टीद्वारे आपले घर अथवा स्वर्ग पाहू शकता. बाबा म्हणतात - मुलांनो, मनमनाभव, मध्याजी भव अर्थात बाबांची आणि विष्णुपुरीची आठवण करा. तुमचे एम ऑब्जेक्टच हे आहे. मुले जाणतात आपल्याला आता स्वर्गामध्ये जायचे आहे, बाकी सर्वांना मुक्ती मध्ये जायचे आहे. सर्वच काही सतयुगामध्ये येऊ शकत नाहीत. तुमचा आहे देवी-देवता धर्म. हा झाला मानवाचा धर्म. मुलवतन मध्ये तर मनुष्य नाही आहेत ना. इथे आहे मनुष्य सृष्टी. मनुष्यच तमोप्रधान आणि मग सतोप्रधान बनतात. तुम्ही पहिले शूद्र वर्णामध्ये होता, आता ब्राह्मण वर्णामध्ये आहात. हे वर्ण फक्त भारतवासींचे आहेत. इतर कोणत्याही धर्माला ब्राह्मण वंशी, सूर्यवंशी असे म्हटले जाणार नाही. यावेळी सर्व शूद्र वर्णाचे आहेत. जडीजडीभूत अवस्था झाली आहे. तुम्ही जुने बनलात तर संपूर्ण झाड जडीजडीभूत तमोप्रधान बनले आहे आता पुन्हा संपूर्ण झाड थोडेच सतोप्रधान बनेल. सतोप्रधान नवीन झाडामध्ये तर फक्त देवी-देवता धर्मवालेच आहेत मग तुम्ही सूर्यवंशीचे चंद्रवंशी बनता. पुनर्जन्म तर घेता ना. मग वैश्य, शूद्र वंशी... या सर्व नवीन गोष्टी आहेत.

आम्हाला शिकवणारा ज्ञानाचा सागर आहे. तेच पतित-पावन सर्वांचे सद्गती दाता आहेत. बाबा म्हणतात तुम्हाला ज्ञान मी देतो. तुम्ही देवी-देवता बनता त्यानंतर मग हे ज्ञान रहात नाही. ज्ञान दिले जाते अज्ञानी असणाऱ्यांना. सर्व मनुष्य अज्ञानरुपी अंधारामध्ये आहेत, तुम्ही आहात ज्ञानरूपी प्रकाशामध्ये. यांच्या (ब्रह्मा बाबांच्या) ८४ जन्मांची कहाणी तुम्ही जाणता. तुम्हा मुलांना सारे ज्ञान आहे. लोक तर म्हणतात भगवंताने ही सृष्टी रचलीच कशासाठी. काय मोक्ष मिळू शकत नाही! अरे, हा तर पूर्व नियोजित खेळ आहे. अनादि ड्रामा आहे ना. तुम्ही जाणता - आत्मा एक शरीर सोडून जाऊन दुसरे घेते, यामध्ये चिंता करण्याची गरजच काय? आत्म्याने जाऊन आपला दुसरा पार्ट बजावला. रडायचे तेव्हा जेव्हा गोष्ट परत मिळणार असेल. परत तर येत नाही मग रडून तरी काय फायदा. आता तुम्हा सर्वांना मोहजीत बनायचे आहे. कब्रस्तानमध्ये मोह कशाला म्हणून ठेवायचा! यामध्ये तर दुःखच दुःख आहे. आज मुलगा आहे, उद्या मुलगा देखील असा बनतो जो वडिलांचा अपमान करायला सुद्धा वेळ लावणार नाही. वडिलांशी भांडण देखील करतात. याला म्हटलेच जाते अनाथांची दुनिया. कोणी मालक नाही आहे जो चांगली शिकवण देईल. बाबा जेव्हा अशी हालत बघतात तेव्हा धणका (भगवंताचे) बनविण्याकरिता येतात. बाबाच येऊन सर्वांना ईश्वराचा बनवतात. मालक येऊन सर्व भांडणे मिटवतात. सतयुगामध्ये कोणतेही भांडण होत नाही. संपूर्ण दुनियेची भांडणे मिटवतात, आणि मग जयजयकार होतो. इथे मेजॉरिटी मातांची आहे. यांना दासी देखील समजतात. लग्न गाठ बांधते वेळी तिला म्हणतात, तुझा पतिच ईश्वर, गुरु इत्यादी सर्व काही आहे. पहिले मिस्टर नंतर मिसेस. आता बाबा येऊन मातांना पुढे करतात. तुमच्यावर कोणीही विजय प्राप्त करू शकत नाही. तुम्हाला बाबा सर्व कायदे शिकवत आहेत. मोहजीत राजाची एक गोष्ट आहे. त्या सर्व बनवलेल्या कहाण्या आहेत. सतयुगामध्ये तर अकाली मृत्यु होतच नाही. आपल्या वेळेवर एक शरीर सोडून दुसरे शरीर घेतात. साक्षात्कार होतो - आता हे शरीर वृद्ध झाले आहे आता पुन्हा नविन घ्यायचे आहे, जाऊन छोटे बाळ बनायचे आहे. आनंदाने शरीर सोडतात. इथे तर कितीही वृद्ध झाले, रोगी असतील आणि समजतील सुद्धा की कुठे हे शरीर सुटले तर चांगले आहे तरी देखील मृत्यूच्या वेळी मात्र रडणार जरूर. बाबा म्हणतात आता तुम्ही अशा जागी जात आहात जिथे रडण्याचे नावच नाही. तिथे तर आनंदच आनंद असतो. तुम्हाला किती बेहदचा अपार आनंद झाला पाहिजे. अरे, आम्ही विश्वाचे मालक बनत आहोत! भारत साऱ्या विश्वाचा मालक होता. आता तुकडे-तुकडे झाले आहेत. तुम्हीच पूज्य देवता होता मग पुजारी बनता. भगवान थोडेच आपणच पूज्य, आपणच पुजारी बनतील. जर ते देखील पुजारी बनले तर मग पूज्य कोण बनवणार? ड्रामामध्ये बाबांचा पार्टच वेगळा आहे. ज्ञानाचा सागर एकच आहेत, त्या एकाचीच महिमा आहे जेव्हा की ज्ञानाचा सागर आहेत तर केव्हा येऊन ज्ञान देतील, ज्यामुळे सद्गती होईल. जरूर इथे यावे लागेल. पहिले तर बुद्धीमध्ये हे पक्के करा की, आम्हाला शिकवणारे कोण आहेत?

त्रिमूर्ती, गोळा आणि झाड - ही आहेत मुख्य चित्रे. झाडाला पाहिल्याने लगेच समजून जातील आपण तर अमक्या धर्माचे आहोत. आपण सतयुगामध्ये येऊ शकत नाही. हे चक्र तर खूप मोठे असायला हवे. लिखाण देखील पूर्ण स्पष्ट असावे. शिवबाबा ब्रह्मा द्वारे देवता धर्म म्हणजेच नवीन दुनियेची स्थापना करत आहेत, शंकराद्वारे जुन्या दुनियेचा विनाश नंतर विष्णू द्वारे नवीन दुनियेची पालना करवून घेतात, हे सिद्ध व्हावे. ब्रह्मा सो विष्णू, विष्णू सो ब्रह्मा, दोघांचे कनेक्शन आहे ना. ब्रह्मा-सरस्वती तेच पुन्हा लक्ष्मी-नारायण बनतात. चढती कला एका जन्मामध्ये होते नंतर मग उतरत्या कलेमध्ये ८४ जन्म लागतात. आता बाबा म्हणतात - ती शास्त्रे इत्यादी बरोबर आहेत की मी बरोबर आहे? खरी सत्य नारायणाची कथा तर मी ऐकवतो. आता तुम्हाला निश्चय आहे की, सत्य बाबांद्वारे आम्ही नरापासून नारायण बनत आहोत. पहिली तर ही देखील मुख्य गोष्ट आहे की, एकाच व्यक्तीला कधी बाबा, टीचर, गुरु म्हटले जात नाही. गुरूला कधी बाबा किंवा टीचर म्हणाल का? इथे तर शिवबाबांकडे जन्म घेता मग शिवबाबा तुम्हाला शिकवतात नंतर सोबतही घेऊन जाणार. असा कोणी मनुष्य काही असत नाही, ज्याला पिता, टीचर, गुरु म्हटले जाईल. हे तर एक बाबाच आहेत, त्यांना म्हटले जाते सुप्रीम फादर. लौकिक पित्याला कधी सुप्रीम फादर म्हणणार नाही. तरीही सर्वजण त्यांची आठवण करतात. ते पिता तर आहेतच. दुःखामध्ये सर्वजण त्यांची आठवण करतात, सुखामध्ये कोणीही करत नाहीत. तर ते बाबाच येऊन स्वर्गाचा मालक बनवतात. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) ५ तत्वांनी बनलेल्या या शरीराला बघत असताना आठवण मात्र बाबांची करायची आहे. कोणत्याही देहधारीशी लगाव ठेवायचा नाही. कोणतेही विकर्म करायचे नाही.

२) या पूर्वनियोजित ड्रामामध्ये प्रत्येक आत्म्याचा अनादि पार्ट आहे, आत्मा एक शरीर सोडून दुसरे घेते, त्यामुळे कोणी शरीर सोडले तर चिंता करायची नाही, मोहजीत बनायचे आहे.

वरदान:-
संपूर्ण आहुती द्वारे परिवर्तन समारोह साजरे करणारे दृढ संकल्पधारी भव जशी म्हण आहे, “धरत परिये धर्म न छोडिये”, तर कोणतीही परिस्थिती आली, मायेचे महावीर रूप समोर आले तरीही धारणा सुटू नयेत. संकल्पाद्वारे त्याग केलेल्या बेकार वस्तू संकल्पामध्ये देखील स्वीकार केल्या जाऊ नयेत. सदैव आपल्या श्रेष्ठ स्वमान, श्रेष्ठ स्मृती आणि श्रेष्ठ जीवनाच्या समर्थ स्वरूपा द्वारे श्रेष्ठ पार्टधारी बनून श्रेष्ठतेचा खेळ खेळत रहा. कमजोरींचे सर्व खेळ समाप्त व्हावेत. जेव्हा अशा संपूर्ण आहुतीचा संकल्प दृढ असेल तेव्हा परिवर्तन समारोह होईल. या समारोहाची डेट आता संघटित रूपामध्ये निश्चित करा.

बोधवाक्य:-
रियल डायमंड बनून आपल्या व्हायब्रेशनचे तेज विश्वामध्ये पसरवा.

अव्यक्त इशारे - एकांतप्रिय बना एकता आणि एकाग्रतेला धारण करा:- साधारण सेवा करणे ही काही मोठी गोष्ट नाहीये परंतु बिघडलेल्याला बनवणे, अनेकतेमध्ये एकता आणणे ही मोठी गोष्ट आहे. बापदादा हेच म्हणत आहेत की, पहिले एक मत, एक बल, एक भरवसा आणि एकता - साथीदारांमध्ये, सेवेमध्ये, वायुमंडळामध्ये असावे.