08-03-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - रुहानी सेवा करून आपले आणि दुसऱ्यांचे कल्याण करा, बाबांसोबत सच्च्या
दिलाने रहा तर बाबांच्या हृदयामध्ये स्थान मिळेल”
प्रश्न:-
देही-अभिमानी
बनण्याची मेहनत कोण करू शकतात? देही-अभिमानी असणाऱ्यांची लक्षणे सांगा?
उत्तर:-
ज्यांचे अभ्यासावर आणि बाबांवर अतूट प्रेम आहे ते देही-अभिमानी बनण्याची मेहनत करू
शकतात. ते शीतल असतील, कोणाशीही अधिक बोलणार नाहीत, त्यांचे बाबांवर प्रेम असेल,
चलन खूप रॉयल असेल. त्यांना नशा असतो की आम्हाला स्वयं भगवान शिकवतात, आम्ही त्यांची
मुले आहोत. ते सुखदायी असतील. प्रत्येक पाऊल श्रीमतावर उचलतील.
ओम शांती।
मुलांनी सेवा समाचार देखील ऐकला पाहिजे आणि मग मुख्य-मुख्य जे महारथी सेवाभावी आहेत
त्यांनी आपले मत व्यक्त केले पाहिजे. बाबा जाणतात की सेवाभावी मुलांचेच विचार सागर
मंथन चालेल. मेळा अथवा प्रदर्शनीची ओपनिंग कोणाद्वारे करावी! कोणते-कोणते पॉईंट
ऐकवायला पाहिजेत. शंकराचार्य इत्यादी जर तुमच्या या गोष्टींना समजले तर म्हणतील -
इथले नॉलेज तर खूप उच्च आहे. यांना शिकवणारा कोणी तिखा (हुशार) दिसतोय. भगवान शिकवत
आहेत, हे काही मानणार नाहीत. तर प्रदर्शनी इत्यादीचे उद्घाटन करण्यासाठी जे येतात
त्यांना काय-काय समजावता, तो समाचार सर्वांना सांगितला पाहिजे किंवा तो टेपमध्ये
थोडक्यात टेप केला पाहिजे. जसे गंगे दीदीने शंकराचार्यांना समजावून सांगितले, अशी
काही सेवाभावी मुले तर बाबांच्या हृदयामध्ये घर करतात. तसे तर स्थूल सेवा देखील आहे
परंतु बाबांचे लक्ष रुहानी सेवेवर जाईल, जे अनेकांचे कल्याण करतात. भले कल्याण तर
प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. ब्रह्माभोजन बनविण्यामध्ये देखील कल्याण आहे, जर
योगयुक्त होऊन बनवले तर. असे योगयुक्त भोजन बनवणारा असेल तर भंडाऱ्यामध्ये अतिशय
शांती होईल. आठवणीच्या यात्रेवर राहील. कोणीही आले तर लगेच त्यांना समजावून सांगेल.
बाबा समजू शकतात - कोणती मुले सेवाभावी आहेत, जे दुसऱ्यांना देखील समजावून सांगू
शकतात; त्यांनाच जास्त करून सेवेसाठी बोलावतात देखील. तर सेवा करणारेच बाबांच्या
हृदयामध्ये स्थान पटकावतात. बाबांचे लक्ष सर्व सेवाभावी मुलांकडेच जाते. बरेच जण तर
सन्मुख मुरली ऐकत असताना देखील काहीच समजू शकत नाहीत. धारणा होत नाही कारण अर्ध्या
कल्पाचा देह-अभिमानाचा आजार खूप गंभीर आहे. त्याला नाहीसा करण्यासाठी असे फार थोडे
आहेत जे चांगल्या प्रकारे पुरुषार्थ करतात. बऱ्याच जणांकडून देही-अभिमानी बनण्याची
मेहनत केली जात नाही. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, देही-अभिमानी बनणे खूप मेहनतीचे काम
आहे. भले कोणी चार्ट सुद्धा पाठवतात परंतु पूर्ण नसतो. तरी देखील थोडेतरी अटेंशन
राहते. बऱ्याचजणांचे देही-अभिमानी बनण्यावर लक्ष कमी आहे. देही-अभिमानी खूप शीतल
असतील. ते कधी जास्त बोलणार नाहीत. त्यांचे बाबांवर इतके प्रेम असेल की काही विचारू
नका. आत्म्याला एवढा आनंद झाला पाहिजे जो कधी कोणत्या मनुष्याला झाला नसेल. या
लक्ष्मी-नारायणाला काही ज्ञान तर नाही आहे. ज्ञान तुम्हा मुलांनाच आहे, ज्यांना
भगवान शिकवतात. भगवान आम्हाला शिकवत आहेत, हा नशा देखील तुमच्यामध्ये कोणा
एक-दोघांनाच राहतो. एवढा नशा असेल तर बाबांच्या आठवणीमध्ये राहील, ज्याला
देही-अभिमानी म्हटले जाते. परंतु तो नशा राहत नाही. आठवणीमध्ये राहणाऱ्याचे वर्तन
खूप चांगले रॉयल असेल. आपण भगवंताची मुले आहोत यामुळे गायन देखील आहे - ‘अतींद्रिय
सुख गोप-गोपींना विचारा, जे देही-अभिमानी होऊन बाबांची आठवण करतात’. आठवण करत नाहीत
म्हणून शिवबाबांच्या हृदयामध्ये स्थान मिळवू शकत नाहीत. शिवबाबांच्या हृदयामध्ये
नाही तर मग दादाच्या (ब्रह्माबाबांच्या) हृदयामध्ये सुद्धा स्थान मिळवू शकत नाहीत.
त्यांच्या हृदयामध्ये असतील तर जरूर यांच्या हृदयामध्ये देखील असतील. बाबा
प्रत्येकाला जाणतात. मुले स्वतः देखील समजतात की आपण काय सेवा करतो. मुलांमध्ये
सेवेची खूप आवड असली पाहिजे. कोणाला तर सेंटर उभे करण्याची सुद्धा आवड असते. कोणाला
तर चित्र काढण्याची आवड असते. बाबा देखील म्हणतात - मला ज्ञानी तू आत्मा मुले प्रिय
वाटतात, जी बाबांच्या आठवणीमध्ये देखील राहतात आणि सेवा करण्यासाठी सुद्धा धडपडत
राहतात. काही तर अजिबातच सेवा करत नाहीत, बाबांचे म्हणणे सुद्धा मानत नाहीत. बाबा
तर जाणतात ना - कोणी कुठे सेवा केली पाहिजे. परंतु देह-अभिमानामुळे आपल्या मतावर
चालतात तर मग ते हृदयामध्ये स्थान मिळवू शकत नाहीत. अज्ञान काळामध्ये देखील एखादा
मुलगा गैरवर्तन करणारा असतो तर तो वडीलांचा आवडता रहात नाही. त्याला कुपुत्र समजतात.
संगदोषामुळे खराब होतात. इथे देखील जे सेवा करतात तेच बाबांना प्रिय वाटतात. जे सेवा
करत नाहीत त्यांच्यावर बाबा प्रेम थोडेच करतील. समजतात नशिबानुसारच शिकतील, तरीही
प्रेम कोणावर असेल? तो तर नियम आहे ना. चांगल्या मुलांना खुप प्रेमाने बोलावतील.
म्हणतील तुम्ही खुप सुखदाई आहात, तुम्ही पिता स्नेही आहात. जे बाबांची आठवणच करत
नाहीत त्यांना थोडेच ‘पिता स्नेही’ म्हणणार. ‘दादा स्नेही’ बनायचे नाही आहे, स्नेही
बनायचे आहे बाबांचे. जे बाबांचे स्नेही असतील त्यांचे बोलणे-चालणे अतिशय गोड आणि
सुंदर असेल. विवेक असे सांगतो - भले टाइम आहे परंतु शरीराचा काही भरवसा थोडाच आहे.
बसल्या-बसल्या अपघात होतात. कोणाचे हार्ट फेल होते. कोणाला रोग होतो, मृत्यु तर
अचानक होतो ना म्हणून श्वासावर तर अजिबात भरवसा नाही आहे. नैसर्गिक आपत्तींची देखील
आता प्रॅक्टिस होत आहे. अवेळी पाऊस पडल्याने देखील नुकसान करतो. ही दुनियाच दुःख
देणारी आहे. बाबा देखील अशा वेळी येतात जेव्हा अतिव दुःख आहे, रक्ताच्या नद्या
वाहणार आहेत. प्रयत्न केला पाहिजे की, आपण आपला पुरुषार्थ करून २१ जन्मांचे कल्याण
तर करूया. बऱ्याचजणांमध्ये आपले कल्याण करण्याची सुद्धा काळजी दिसून येत नाही.
बाबा इथे बसून मुरली
चालवतात तरी देखील बुद्धी सेवाभावी मुलांकडे राहते. आता शंकराचार्यांना
प्रदर्शनीमध्ये बोलावले आहे, नाही तर हे लोक असे कुठे जात नाहीत. मोठ्या घमेंडीमध्ये
राहतात, तर त्यांना मान देखील द्यावा लागेल. वरती सिंहासनावर बसवावे लागेल. असे नाही,
सोबत बसू शकतो. नाही, त्यांना खूप रिगार्ड पाहिजे असतो. जर निर्माण असेल तर मग चांदी
इत्यादीचे सिंहासन सुद्धा सोडून देईल. बाबा बघा कसे साधारण राहतात. कोणीही जाणत
नाहीत. तुम्हा मुलांमध्ये सुद्धा कोणी विरळेच जाणतात. बाबा किती निरहंकारी आहेत. हे
तर पिता आणि मुलाचे नाते आहे ना. जसे लौकिक बाबा मुलांसोबत राहतात, खातात-खाऊ
घालतात. हे आहेत बेहदचे बाबा. संन्यासी इत्यादींना बाबांचे प्रेम मिळत नाही. तुम्ही
मुले जाणता की कल्प-कल्प आम्हाला बेहदच्या बाबांचे प्रेम मिळते. बाबा गुल-गुल (फूल)
बनविण्याची खूप मेहनत करतात. परंतु ड्रामा अनुसार सगळेच काही फूल बनत नाहीत. आज खूप
चांगले-चांगले असणारे उद्या विकारी बनतात. बाबा म्हणणार नशिबामध्ये नाही आहे तर आणखी
काय करणार. खूपजणांचे वर्तन खराब होते. आज्ञेचे उल्लंघन करतात. ईश्वराच्या मतावर
सुद्धा चालले नाहीत तर त्यांचे काय हाल होतील! उच्च ते उच्च बाबा आहेत, आणखी तर कोणी
नाही आहेत. मग देवतांच्या चित्रामध्ये बघाल तर हे लक्ष्मी-नारायणच उच्च ते उच्च
आहेत. परंतु मनुष्य हे देखील जाणत नाहीत की यांना असे कोणी बनवले. बाबा बसून तुम्हा
मुलांना रचता आणि रचनेचे नॉलेज अतिशय चांगल्या प्रकारे समजावून सांगतात. तुम्हाला
तर आपले शांतीधाम, सुखधामच आठवते. सेवा करणाऱ्यांची नावे स्मृतीमध्ये येतात. जरूर
बाबांची जी आज्ञाधारक मुले असतील, त्यांच्याकडेच मन ओढ घेईल. बेहदचे बाबा एकदाच
येतात. ते लौकिक पिता तर जन्म-जन्मांतर मिळतात. सतयुगामध्ये देखील मिळतात. परंतु
तिथे हे बाबा मिळत नाहीत. आत्ताच्या शिक्षणाद्वारे तुम्ही पद प्राप्त करता. हे
देखील तुम्ही मुलेच जाणता की, बाबांकडून आपण नवीन दुनियेसाठी शिकत आहोत. हे
बुद्धीमध्ये लक्षात राहिले पाहिजे. आहे खूप सोपे. समजा बाबा खेळत आहेत, अचानक कोणी
आले तर बाबा लगेच तिथल्या तिथेच त्यांना नॉलेज देऊ लागतील. विचारतील - तुम्ही
बेहदच्या बाबांना जाणता का? जुन्या दुनियेला नवीन बनवण्याकरिता बाबा आलेले आहेत.
राजयोग शिकवतात. भारतवासीयांनाच शिकवायचा आहे. भारतच स्वर्ग होता. जिथे या
देवी-देवतांचे राज्य होते. आता तर नरक आहे. नरकापासून पुन्हा स्वर्ग बाबाच बनवणार.
अशा काही मुख्य गोष्टी लक्षात ठेवून कोणीही आले तर त्यांना बसून समजावून सांगा. तर
किती आनंदित होतील. फक्त बोला - ‘बाबा आलेले आहेत’. ही तीच महाभारत लढाई आहे जी
गीतेमध्ये गायली गेली आहे. गीतेचे भगवान आलेले होते, गीता ऐकवली होती. कशासाठी?
मनुष्याला देवता बनविण्यासाठी. बाबा फक्त एवढेच म्हणतात - मज पित्याची आणि वारशाची
आठवण करा. हे दुःखधाम आहे. एवढे जरी बुद्धीमध्ये राहिले तरी सुद्धा आनंद होईल. आपण
आत्मे बाबांसोबत जाणार आहोत शांतीधाममध्ये; तिथून मग सर्वात पहिले सुखधाममध्ये
पार्ट बजावण्यासाठी येणार. जसे कॉलेजमध्ये शिकवतात तर समजतात आम्ही हे-हे शिकतो मग
हे बनणार. बॅरिस्टर बनणार अथवा पोलीस सुपरिंटेंडेंट (पोलीस अधीक्षक) बनणार, इतका
पैसा कमावणार. खुशीचा पारा चढलेला राहील. तुम्हा मुलांना देखील असा आनंद झाला पाहिजे.
आम्ही बेहदच्या बाबांकडून हा वारसा प्राप्त करतो आणि मग आम्ही स्वर्गामध्ये आपले
महाल बनवणार. सारा दिवस बुद्धीमध्ये हे चिंतन राहिले तर आनंद सुद्धा होईल. आपले आणि
दुसऱ्यांचे सुद्धा कल्याण करा. ज्या मुलांकडे ज्ञान धन आहे त्यांचे कर्तव्य आहे दान
करणे. जर धन असेल, आणि दान करत नसतील तर त्यांना कंजूस म्हटले जाते. त्यांच्याकडे
धन असून देखील जणू काही नाहीच आहे. जर धन आहे तर जरूर दान करा. चांगली-चांगली महारथी
मुले जी आहेत ती कायम बाबांच्या हृदयामध्ये चढून राहतात. काहीजणांच्या बाबतीत हा
मनात विचार येतो - हे कदाचित सोडून जातील. परिस्थितीच अशी आहे. देहाचा अहंकार खूप
वाढलेला आहे. कोणत्याही वेळी हात सोडून देतील आणि जाऊन आपल्या घरी राहतील. भले मुरली
खूप चांगली चालवतात परंतु देह-अभिमान खूप आहे, थोडी जरी बाबांनी सावधानी दिली तरी
लगेच नाराज होतील. नाहीतर गायन आहे - ‘प्यार करो चाहे ठुकराओ…’ इथे बाबा राईट गोष्ट
करतात तरी देखील राग येतो. अशीही काही मुले आहेत, कोणी तर आतमध्ये खूप धन्यवाद
मानतात, कोणी आतल्याआत जळून मरतात. मायेचा देह-अभिमान खूप आहे. बरीच अशी देखील मुले
आहेत जी मुरलीच ऐकत नाहीत आणि कोणी तर मुरली शिवाय राहू शकत नाहीत. मुरली वाचत
नसतील तर हा मग आपलाच हट्ट आहे की, आमच्यामध्ये तर ज्ञान खूप आहे आणि प्रत्यक्षात
काहीच नसते.
तर जिथे शंकराचार्य
इत्यादी प्रदर्शनीमध्ये येतात, तिथे सेवा चांगली होते; तर तो समाचार सर्वांना पाठवला
पाहिजे म्हणजे सर्वांना माहिती होईल की, कशी सेवा झाली आणि तेही शिकतील. अशा प्रकारे
ज्यांना सेवेचे विचार येतात त्यांनाच बाबा सेवाभावी समजतील. सेवेमध्ये कधीही थकून
जाता कामा नये. हे तर अनेकांचे कल्याण करणे आहे ना. बाबांना तर हीच चिंता असते की,
सर्वांना हे नॉलेज मिळावे. मुलांची देखील उन्नती व्हावी. रोज मुरलीमध्ये समजावून
सांगत राहतात - ही रुहानी सेवा आहे मुख्य. ऐकायचे आहे आणि ऐकवायचे आहे. आवड असली
पाहिजे. बॅज घेऊन रोज मंदिरांमध्ये जाऊन समजावून सांगा - हे लक्ष्मी-नारायण कसे बनले?
आणि मग कुठे गेले, कसे राज्य-भाग्य प्राप्त केले? मंदिराच्या दारात जाऊन बसा. कोणीही
आले तर बोला, हे लक्ष्मी-नारायण कोण आहेत, यांचे भारतामध्ये केव्हा राज्य होते?
हनुमान सुद्धा चप्पलांजवळ जाऊन बसत होता ना. त्याचे देखील रहस्य आहे ना. दया येते.
सेवेच्या युक्त्या तर बाबा खूप सांगतात, परंतु अंमलात मात्र कोणी फार मुश्किलीने
आणतात. सेवा पुष्कळ आहे. आंधळ्यांची काठी बनायचे आहे. जे सेवा करत नसतील, बुद्धी
स्वच्छ नसेल तर मग धारणा होत नाही. नाही तर सेवा खूप सोपी आहे. तुम्ही हे ज्ञान
रत्नांचे दान करता. कोणी श्रीमंत आला तर बोला - आम्ही तुम्हाला ही सौगात देत आहोत.
यांचा अर्थ देखील तुम्हाला समजावून सांगतो. या बॅजचा बाबांना खूप आदर आहे. बाकी
कोणाला इतका आदर वाटत नाही. यांच्यामध्ये खूप चांगले ज्ञान भरलेले आहे. परंतु
कोणाच्या नशिबातच नसेलतर बाबा तरी काय करू शकतात. बाबांना आणि शिक्षणाला सोडणे - हा
तर मोठ्यात मोठा आत्मघात आहे. बाबांचे बनून मग सोड चिठ्ठी देणे - यासारखे मोठे पाप
दुसरे कोणतेही नाही. त्यांच्या सारखा दुर्दैवी कोणीच नाही. मुलांनी श्रीमतावर चालले
पाहिजे ना. तुमच्या बुद्धीमध्ये आहे की, आपण विश्वाचे मालक बनणार आहोत, काही छोटी
गोष्ट थोडीच आहे. आठवण कराल तर आनंद सुद्धा वाटेल. आठवण न राहिल्याने पापे भस्म
होणार नाहीत. ॲडॉप्ट झालात तर आनंदाचा पारा चढला पाहिजे. परंतु माया खूप विघ्न आणते.
कच्चे असणाऱ्यांना खाली पाडते. जे बाबांची श्रीमत घेत नाहीत तर ते काय पद मिळवणार.
थोडेसेच मत घेतलेत तर मग असेच हलके पद प्राप्त कराल. चांगल्या रीतीने मत घेतलेत तर
उच्च पद प्राप्त कराल. ही बेहदची राजधानी स्थापन होत आहे. यामध्ये खर्च इत्यादीचा
सुद्धा काही प्रश्नच नाही. कुमारी येतात, शिकून अनेकांना आप समान बनवतात, यामध्ये
फी इत्यादीचा तर प्रश्नच नाही. बाबा म्हणतात - तुम्हाला स्वर्गाची बादशाही देतो. मी
स्वर्गात सुद्धा येत नाही. शिवबाबा तर दाता आहेत ना. त्यांना खर्ची काय देणार. यांनी
(ब्रह्माबाबांनी) सर्व काही त्यांना (शिवबाबांना) दिले, वारसदार बनवले. तर
परताव्यामध्ये बघा राजाई मिळते ना. हे सर्वात पहिले उदाहरण आहे. साऱ्या विश्वावर
स्वर्गाची स्थापना होते. खर्च पैशाचा सुद्धा नाही. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) पिता स्नेही
बनण्यासाठी खूप-खूप सुखदाई बनायचे आहे. आपले बोलणे-चालणे अतिशय गोड आणि रॉयल ठेवायचे
आहे. सेवाभावी बनायचे आहे. निरहंकारी बनून सेवा करायची आहे.
२) शिक्षण आणि बाबांना
सोडून कधी आत्म-घाती महापापी बनायचे नाही. मुख्य आहे रुहानी सेवा, या सेवेमध्ये
कधीही थकून जायचे नाही. ज्ञान रत्नांचे दान करायचे आहे, कंजूष बनायचे नाही.
वरदान:-
सदैव निज-धाम
आणि निज-स्वरूपाच्या स्मृति द्वारा उपराम, न्यारे-प्यारे भव निराकारी दुनिया आणि
निराकारी रूपाची स्मृतीच सदैव न्यारा आणि प्रिय बनवते. आपण आहोतच निराकारी दुनियेचे
निवासी, इथे सेवा अर्थ अवतरित झालो आहोत. आपण या मृत्युलोकचे नाही परंतु अवतार आहोत
फक्त एवढी छोटीशी गोष्ट जरी लक्षात राहिली तरी उपराम व्हाल. जे स्वतःला अवतार न
समजता गृहस्थी समजतात तर अशा गृहस्थीची गाडी चिखलामध्ये अडकून राहते, ‘गृहस्थी’
आहेच ओझ्याची स्थिती आणि ‘अवतार’ एकदम हलका आहे. अवतार समजल्याने आपले निज-धाम
निजी-स्वरूप लक्षात राहील आणि उपराम व्हाल.
बोधवाक्य:-
ब्राह्मण ते
आहेत जे प्रत्येक कार्य शुद्ध आणि विधीपूर्वक करतील.
अव्यक्त इशारे -
सत्यता आणि सभ्यता रुपी कल्चरला धारण करा:- जो निर्माण असतो तोच नव-निर्माण करू शकतो.
शुभ-भावना आणि शुभ-कामनेचे बीजच आहे निमित्त-भाव आणि निर्मान-भाव. हदचा मान नाही,
परंतु निर्मान. आता आपल्या जीवनामध्ये सत्यता आणि सभ्यतेचे संस्कार धारण करा. जर
इच्छा नसतानाही कधी क्रोध अथवा चिडचिडेपणा आला तर हृदयापासून म्हणा “मीठा बाबा”, तर
एक्स्ट्रा मदत मिळेल.