08-03-26 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
18.01.2009 ओम शान्ति
मधुबन
४० वर्षांच्या
अव्यक्त पालने च े रिटर्न - ४ गोष्टी - शुभचिंतक बना, शुभचिंतन करा, शुभ वृत्तीने
शुभ वायुमंडळ बनवा तसेच (0) झिरो आणि हीरोच्या स्मृतीमध्ये रहा
आज बापदादा चोहो
बाजूंच्या आपल्या सेवेमध्ये साथीदार असणाऱ्या मुलांना भेटण्यासाठी आले आहेत.
सुरुवातीचे सेवेमधील साथीदार आणि त्याचसोबत इतरही सेवेमध्ये साथीदार बनून खूप चांगली
सेवेची वृद्धी करत आहेत, तर बापदादा आपल्या साथीदारांना बघून खुश होत आहेत. आणि
मनामध्ये गाणे गात आहेत - वाह! माझ्या विश्व परिवर्तन सेवेमधील साथीदारांनो वाह!
आज अमृतवेलेपासून चोहो
बाजूंना स्नेहाच्या माळा बापदादांना अर्पण करत होते. तीन प्रकारच्या माळा होत्या;
एक होती बाप समान बनण्याच्या उमंग-उत्साहाची, दुसरी होती अतिशय दुरावलेल्या
बंधनवाल्या बांधेली गोपिकांची, त्यांच्या माळा तर होत्याच परंतु चमकणाऱ्या अति
अमूल्य अश्रूंच्या माळा सुद्धा होत्या. एक-एक अश्रू मोत्याप्रमाणे चमकत होता आणि
तिसरी माळा काही-काही मुलांच्या तक्रारींची होती.
आज अमृतवेलेपासून
सर्वांमध्ये विशेष स्नेह सामावलेला दिसून येत होता. बापदादांनी विराट रूपाप्रमाणे
आपल्या भुजा फ़ैलावून सर्व मुलांना बाहूंमध्ये सामावून घेतले. तसेही आजचा दिवस स्नेहा
सोबत सर्व पॉवर्सची विल देण्याचा (सर्व शक्तींना प्रदान करण्याचा) सुद्धा होता. एका
कन्येला हातामध्ये हात घेऊन, सोबतच सर्व मुलांना (शक्ती सेना आणि पांडवांना) विल
पॉवर्सना विल केले. बापदादांनी पाहिले की अनेक मुले पांडव देखील आणि शक्ती देखील,
गुप्तपणे अंतर्मुखी बनून पुरुषार्थामध्ये तीव्र गतीने चालत आहेत. बाहेरून दिसून येत
नाहीत परंतु पुरुषार्थी चांगले आहेत. बापदादांनी आज सर्व मुलांचे विशेष रूप पाहिले,
स्नेहाचा सब्जेक्ट सर्वांच्या चेहऱ्यांना तेजस्वी करत होता. ज्ञानी तू आत्मा मुले
तर आहेतच परंतु स्नेहाचा सब्जेक्ट आवश्यक आहे, कारण स्नेही मेहनत कमी आणि प्रेमाच्या
अनुभवामध्ये सहज राहतात. स्नेहाची शक्ती कशीही पहाडासमान समस्या असो, पहाडाला देखील
रुई समान बनवते. पहाडाला देखील पाण्यासारखे हलके बनवते. स्नेह एक छत्रछाया आहे.
छत्रछायेमुळे तो नेहमी सुरक्षित राहतो. सोपे होते. स्नेहाने परमात्म्याला अथवा
भगवंताला सुद्धा आपला दोस्त बनवतात. खुदा दोस्तचे जे यादगार आहे. खुदाला दोस्त
बनवून कोणतीही समस्या दोस्तीच्या नात्याने सोपी करून टाकतात. बाबांना आपला साथी (दोस्त)
बनवतात. ज्ञान बीज आहे, परंतु प्रेमाचे पाणी बीजामध्ये प्राप्तीची फळे लावते. तर अशा
बाबांची स्नेही मुले बाबांची आठवण करणे मेहनत समजत नाहीत परंतु विसरणे कठीण समजतात.
स्नेही कधीही स्नेहाला विसरू शकत नाही. मनापासून स्नेहाने ‘माझे बाबा’ म्हटले, आणि
सर्व खजिन्यांची चावी मिळून जाते. तर दोन्ही, बापदादा असे स्नेही, ज्यांच्यापुढे
बापदादा सुद्धा हजूर हाज़िर होतात. आठवण तर सर्वच करतात परंतु कोणी थोड्या-थोड्या
मेहनतीने करतात आणि कोणी सदैव स्नेहाच्या सागरामध्ये लवलीन राहतात. दुनियावाले
म्हणतात की आत्मा परमात्म्यामध्ये लीन होते परंतु आत्मा परमात्म्याच्या प्रेमात
लवलीन होते. ‘लीन’ होत नाही तर ‘लवलीन’ होते.
तर आजचा दिवस
प्रेमामध्ये लवलीन होऊन राहण्याचा आहे. मेहनत संपून प्रेमाच्या रूपामध्ये बदलते. तर
बापदादांनी सर्व मुलांचा रिझल्ट सुद्धा पाहिला, होमवर्क मेजॉरिटी मुलांनी केला आहे.
बाप समान बनण्याचे लक्ष्य वारंवार रिवाइज सुद्धा केले, रियलाइज सुद्धा केले (उजळणी
सुद्धा केली आणि अनुभव सुद्धा केला). ७५ टक्के मुलांचा रिझल्ट चांगला राहिला. आणि
असे बाबा समान बनायचेच आहे, कोणतेही वादळ येवो, आहेच कलियुगाच्या समाप्तीचा काळ, मग
वादळे तर येतीलच, परिवर्तनाची वेळ आहे ना, परंतु तुम्हा मुलांसाठी तुफान काय आहे!
तुफान, तुफान नाही तर तोहफा (भेट) आहे कारण बापदादांच्या वरदानाचा हात सर्व
पुरुषार्थी मुलांच्या मस्तकावर आहे. ज्यांनी दृढ संकल्प अर्थात दृढतेची चावी
कार्यामध्ये लावली त्यांनी आत्ताच्या रिझल्ट प्रमाणे सफलता देखील प्राप्त केली आहे
परंतु कायमसाठी तुफानाला तोहफा बनवून, समस्येला समाधानाचे रूप देऊन पुढे चालत रहा.
तर बापदादा आताच्या रिझल्टवर खुश आहेत. जी योग तपस्या केली आहे त्यामध्ये लक्ष्य
दृढ ठेवले आहे, बनायचेच आहे.
अव्यक्त पालनेची ४०
वर्षे पूर्ण झाली आहेत. तर ४० वर्षांमध्ये आधी काय येते - बिंदू, झिरो. तर ‘झिरो’
आठवण करून देतो की मी ‘हीरो’, सच्चा हीरो, महान हीरो आहे आणि हीरो पार्टधारी बनून
प्रत्येक कार्य हीरो समान करायचे आहे. तर ‘झिरो’ आणि ‘हीरो’ हे सदैव लक्षात रहावे
आणि बाकीच्या ज्या चार गोष्टी आहेत, त्यामध्ये चार गोष्टी नॅचरल जीवनामध्ये करायच्या
आहेत, दृढतापूर्वक करायच्या आहेत, करणार? तयार आहात? कोणताही पेपर येवो परंतु चार
गोष्टी आपल्या जीवनामध्ये करायच्याच आहेत. पक्के? पक्के? पक्के? मागे बसलेले, पक्के
आहात ना! कच्चा असणाऱ्याला माया खाऊन टाकते त्यामुळे पक्के रहा. एक गोष्ट - सदा
शुभचिंतक, कोणाची कमजोरी पाहून किंवा ऐकून दयाळू बनून शुभचिंतक बनून त्यांना सहयोग
द्यायचाच आहे. कमजोरीला बघायचे नाहीये परंतु सहयोग द्यायचाच आहे. याला म्हणतात -
शुभचिंतक. पक्के राहील ना! आधार देणारे, दयाळू बनून सहयोग द्या. त्याला दूर लोटू नका
किंवा घृणा करू नका, क्षमा करा. परवश असणार्याची कधी घृणा केली जात नाही. आधार दिला
जातो. तर शुभचिंतक आणि दुसरे आहे शुभ चिंतन. आजकाल बापदादा बघतात - मेजॉरिटी
मुलांमध्ये कधी-कधी व्यर्थ संकल्प खूप चालतात, यामध्ये आपली जमा झालेली शक्ती
व्यर्थ जाते, म्हणूनच शुभ चिंतनासाठी स्वमानाचे कोणते ना कोणते आपले टायटल घेऊन
मनाला होमवर्क द्या, मनाचे टाईमटेबल बनवा, कामाचे तर टाईमटेबल बनवता परंतु मनाचे
टाईमटेबल बनवा. अमृतवेलेला भेटीचा सोहळा पार पाडल्या नंतर मनाला कोणता ना कोणता
स्वमान द्या, परंतु जसे सांगितले आहे की १२-१३ वेळा सर्वांना वेळ मिळतो, त्यामध्ये
रियलाईज सुद्धा करा, रिवाईज सुद्धा करा (अनुभव सुद्धा करा आणि उजळणी सुद्धा करा)
तेव्हा मग मन बिझी राहिल्याने व्यर्थ संकल्पामध्ये वेळ जाणार नाही, मेहनत करावी
लागणार नाही, प्रत्येक वेळी संगमयुग जे मजेचे युग आहे, त्याच मजेमध्ये रहाल. तर
दुसरे सांगितले - शुभचिंतन. चेक करा आणि चेंज करा. तिसरे आहे - शुभ वृत्ती. अशुभ
वृत्ती वायुमंडळामध्ये देखील अशुद्धता पसरविते म्हणूनच - शुभ वृत्ती. आणि चौथे आहे
- प्रत्येकाने ही जबाबदारी घ्यायची आहे की मला, खास माझे काम आहे, दुसऱ्याला बघायचे
नाहीये, माझे काम आहे - शुभ वायुमंडळ बनविणे. जसे कधीही वायुमंडळामध्ये जेव्हा
दुर्गंधी पसरलेली असते तेव्हा काय करता? सुगंध पसरवता (सेंटचा स्प्रे मारता) ना!
दुर्गंधी सहन होत नाही, कोणते ना कोणते सुगंधाचे साधन वापरता; अगदी तसेच साधारण
वायुमंडळ अथवा अशुभ वायुमंडळ बदलायचेच आहे. भले छोटा आहे किंवा नवीन आहे, परंतु
सर्वांची जबाबदारी आहे. दृढ संकल्प करायचा आहे की मला शुभ वायुमंडळ बनवायचेच आहे.
ही प्रतिज्ञा प्रत्यक्षता करेल. प्रतिज्ञा करता, बापदादा खुश होतात परंतु
प्रतिज्ञेमध्ये कधी-कधी दृढता नसते म्हणूनच जी सफलता तुम्हाला पाहिजे असते, जितकी
पाहिजे असते तितकी मिळत नाही. संपूर्ण विश्वाचा, प्रकृतीचा, आत्मांचा, आत्मांमध्ये
ब्राह्मण आत्मे सुद्धा येतात, प्रत्येकाने आपल्या सेवास्थानाचे असे वायुमंडळ दृढतेने
बनवा, काही त्याग करावा लागला तर करा, ‘याने त्याग केला तर मी करेन’, नाही. ‘सिस्टम
ठीक झाली तर…’ असे ‘तर-तर’ करू नका. मला तर करायचेच आहे. विश्व परिवर्तक आहे, हा
तुमचा स्वमान आहे ना! सर्वजण विश्व परिवर्तक आहात ना! हात वर करा. अच्छा, विश्व
परिवर्तक! खूप छान. तर आधी बापदादा हे पाहू इच्छित आहेत - आहे देखील, होणार सुद्धा
परंतु या वर्षामध्ये बापदादा छोट्या किंवा मोठ्या सेवाकेंद्रावर फेरी मारतील तर
वायुमंडळ कसे असायला हवे? जसा आजचा दिवस स्नेहाचा आणि शक्तीचा आहे, तसे
गावा-गावातील सेंटर, मोठे सेंटर सर्वांचे वायुमंडळ चैतन्य मंदिर असावे. निगेटिव्हला
पॉझिटिव्ह बनविणे यामध्ये - ‘आधी मी’. ‘आधी तुम्ही’ करू नका, ‘आधी मी’, कारण बापदादा
आणि ॲडव्हान्स पार्टी आणि आजकाल तर प्रकृती सुद्धा वाट पाहत आहे. इंतजाम (व्यवस्था)
करणारे तुम्ही आहात, तुम्हाला इंतजार करायचा नाहीये, इंतजाम करायचा आहे (तुम्हाला
वाट पहायची नाहीये, तर व्यवस्था करायची आहे).
आज चोहो बाजूंना भीती
पसरलेली आहे, सर्वांच्या दुनियेतील बहुसंख्या लोकांच्या मनात एकच संकल्प आहे की
‘उद्या काय होईल!’ तुम्हाला माहित आहे उद्या काय होणार आहे! तर परिवर्तन करण्यामध्ये
आधी मी निमित्त बनेन, हा संकल्प कोण करतं? यामध्ये हात वर करा. करावे लागेल, करावे
लागेल. बदलावे लागेल. रक्षक बनावे लागेल. काहीतरी सोडावे लागेल आणि प्रेम घ्यावे
लागेल. मनाचा हात वर केलात की हा स्थूल हात वर केलात? कोणी मनाचा हात वर केला? कारण
मन बदलले तर जग बदलेल. तर या वर्षामध्ये कोणते स्लोगन असेल? कोणते स्लोगन असेल? “नो
प्रॉब्लेम”. विजयाचा झेंडा मनात फडकेल आणि सर्वजण मनामध्ये सदैव आनंदाचा डान्स
करतील, मनाचा डान्स आहे आनंद. तर प्रत्येक वेळी आनंदाचा डान्स करतील. आणि दात्याची
मुले आहात तर जो कोणी येईल त्या प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गुणाची गिफ्ट द्या.
तर एका सेकंदामध्ये तो दृढ संकल्प, दात्याचा संकल्प लिफ्ट बनेल आणि सेकंदामध्ये
परमधाम, सूक्ष्म वतन, स्थूल मधुबन साकार वतन, जिथे इच्छा होईल तिथे बिना मेहनत
सेकंदामध्ये पोहोचाल. कोणीही समोर येवो त्यांना रिकाम्या हाताने पाठवू नका, कोणत्या
ना कोणत्या गुणाची, चेहऱ्याद्वारे, वर्तनाद्वारे, मुखाद्वारे गुणाची सौगात
दिल्याशिवाय भेटू नका.
तर या वर्षाच्या
प्रत्येक महिन्याचा रिझल्ट स्वतःकडे सुद्धा ठेवा आणि यज्ञामध्ये टीचर द्वारे ओ. के.
चे कार्ड पाठवा, लांबलचक पत्र पाठवू नका, ओ. के. चे कार्ड पाठवा. कार्ड सुद्धा मोठे
पाठवू नका, जे दुनियेमध्ये कार्ड चालते ते नाही, टीचरकडून जे वरदानाचे कार्ड मिळते
ते पाठवा. गुणांची सौगात, शक्तींची सौगात किती आहे? लिस्ट मोजली तर किती मोठी लिस्ट
आहे. आणि जितकी द्याल तितकी कमी होणार नाही वाढतच जाईल. जसे म्हणतात ना - छू मंतर;
तर हा शिव मंत्र कधी कोणता गुण तुमच्यामधून कमी होणार नाही आणखीनच वाढेल कारण म्हण
आहे - ‘दे दान तर सुटेल ग्रहण’. अच्छा.
यावेळी जे पहिल्यांदा
आले आहेत त्यांनी उठून उभे रहा. छान आहे (मध्य प्रदेशचे राज्यपाल समोर बसले आहेत)
या संघटनमध्ये आला आहात, चांगले आहे. बापदादा तुम्हा सर्वांना, येणाऱ्यांना हे
वरदान देत आहेत की सदैव बाबांना गुड मॉर्निंग आणि गुड नाईट जरूर करा; कारण सर्वात
आधी डोळे उघडताच बाबांना पहाल तर संपूर्ण दिवस चांगला जाईल. तर पहिल्यांदा येणाऱ्या
मुलांना बापदादांची पद्मपटीने प्रेमपूर्वक आठवण आणि अभिनंदन असो. अच्छा.
आता सर्वजण ज्या चार
गोष्टी सांगितल्या आणि पाचवा झिरो आणि हीरो सांगितले, तर या गोष्टींचे सदैव मनन करत
मग्न अवस्थेमध्ये राहणारे ब्राह्मण सो फरिश्ता आत्मे, देवता बनणे तर तुमचा
जन्मसिद्ध अधिकार आहे, फरिश्ता सो देवता आहातच, तर सदैव स्नेहाच्या प्रेमामध्ये लीन,
लवलीन राहणारे, सदैव दृढतेच्या संकल्पाच्या चावीला मनामध्ये, बुद्धीमध्ये
स्मृतीमध्ये ठेवणारे, कारण या चावीच्या मागे माया खूप घिरट्या घालत असते. तर मन आणि
बुद्धीने सदैव समर्थ राहणाऱ्या चोहो बाजूंच्या मुलांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण
आणि नमस्ते.
दादींसोबत संवाद (दादी
जानकीजी सोबत):-
फेरी मारून आलात खूप
छान. जे करत आहात ते खूप छान आहे. बाबांना चित्र आठवले की जगदंबा मध्यभागी उभी आहे
झेंडा फडकवत आहेत आणि मागे सर्वजणी शक्ती सोबत उभ्या आहेत. तर आता ते चित्र बापदादा
विश्वासमोर दाखवू इच्छित आहेत. सर्व ब्राह्मणांमधून अशी शक्ती सेना तयार करा जी
निमित्त बनेल, घिरट्या मारत वायुमंडळाला पॉवरफुल बनवेल आणि दृढ संकल्प करेल की,
‘आम्ही हा दृढ संकल्प करतो की आम्ही वायुमंडळाला बदलून दाखवू’. हा झेंडा उचला. असा
ग्रुप तयार करा जो घिरट्या मारून वायुमंडळ ठीक करेल, आपल्या स्थितीने, वाणीने आणि
संगाने वायुमंडळ ठीक करेल. असा ग्रुप तयार करून दाखवा. तर बापदादांना चित्र आठवले
तर हे प्रत्यक्षात झाले पाहिजे. असे म्हणू नका वेळ मिळत नाही. कोणीही म्हणणार नाही
की, वेळ मिळत नाही. वेळ मिळेल जर शुभ भावना असेल तर, असा ग्रुप बापदादांना बनवून
द्या. अच्छा.
यूथ ग्रुप सोबत संवाद:-
या वर्षामध्ये
ज्याकाही ब्राह्मणांच्या मर्यादा आहेत, प्रत्येक मर्यादेला पूर्ण रीतीने - मन्सा
द्वारे, वाचे द्वारे, कर्मणा द्वारे आणि संबंध-संपर्काद्वारे, चारही रूपामध्ये पालन
करणारा असावा - असा ग्रुप तयार करा, या वर्षभरामध्ये कोणतीही मर्यादा भंग होऊ नये.
असा ग्रुप बनवा, आपापसात बनवा. जो ओटे सो अर्जुन (जो पुढाकार घेईल तोच अर्जुन).
पसंत आहे? कोण करणार? तुम्ही करणार? हात वर करा. करणार? सर्व युवा करणार? किती आहेत?
(४००) आपापसात ग्रुप-ग्रुपमध्ये पक्के करा मग गव्हर्नमेंटला दाखवू की हे मर्यादा
पुरुषोत्तम आहेत. गव्हर्नमेंटला सुद्धा हवे आहे परंतु ते करू शकत नाहीत, तुम्ही
करून दाखवा. उदाहरण बनून दाखवा. होमवर्क मिळाला ना! बापदादा हेच इच्छित आहेत की चोहो
बाजूंच्या ब्राह्मण आत्म्यांनी या वर्षामध्ये कमाल करून दाखवावी. व्यर्थ संकल्पाची
धमाल देखील नसावी. शुद्ध संकल्प इतके जमा करा की व्यर्थ संकल्पाला येण्यास वेळच मिळू
नये. आहे ना खजिना? शुद्ध संकल्पाचा इतका खजिना जमा आहे? आहे, हात वर करा. शक्ती
सुद्धा आहेत, चांगले आहे, शक्तींनी सुद्धा एक्झाम्पल बनावे आणि पांडवांनी सुद्धा
एक्झाम्पल बनावे. अच्छा. बापदादा खुश आहेत.
वरदान:-
सूक्ष्म
संकल्पांच्या बंधनातून देखील मुक्त बनून उच्च स्टेजचा अनुभव करणारे निर्बंधन भव
जी मुले जितकी
निर्बंधन आहेत तितकी ती उच्च स्टेजवर स्थित राहू शकतात, म्हणूनच चेक करा की,
मन्सा-वाचा आणि कर्मणामध्ये कोणता सूक्ष्ममध्ये देखील धागा जोडलेला तर नाहीये! एका
बाबांशिवाय इतर कोणीही आठवू नये. स्वतःचा देह जरी आठवला तरी देहा सोबत देहाची नाती,
पदार्थ, दुनिया सर्व एकामागून एक येतील. ‘मी निर्बंधन आहे’ - या वरदानाला
स्मृतीमध्ये ठेवून संपूर्ण दुनियेला मायेच्या जाळ्यातून मुक्त करण्याची सेवा करा.
सुविचार:-
देही-अभिमानी स्थिती
द्वारे तनाची आणि मनाची खळबळ समाप्त करणारेच अचल राहतात.
हे अव्यक्त इशारे:-
“निश्चयाच्या फाउंडेशनला मजबूत करून सदैव निर्भय आणि निश्चिंत रहा”
समस्यांचे काम आहे
येणे, निश्चयबुद्धी आत्म्याचे काम आहे समाधान स्वरूप बनून समस्येला परिवर्तन करणे.
कशासाठी? तुम्हा प्रत्येक ब्राह्मण आत्म्याने ब्राह्मण जन्म घेताच मायेला चॅलेंज
केले आहे की, आम्ही मायाजीत बनणारे आहोत. तर समस्येचे स्वरूप हेच मायेचे स्वरूप आहे.
जर चॅलेंज केले आहे तर माया सामना तर करणारच; परंतु तुम्ही तिला निश्चयबुद्धी विजयी
स्वरूपाने, नथिंग न्यू समजून पार करा तर तुम्ही निश्चिंत बादशहा होऊन रहाल.