08-05-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - देही अभिमानी बनून बाबांची आठवण करा तर आठवणीचे बळ जमा होईल, आठवणीच्या
बळाने तुम्ही साऱ्या विश्वाचे राज्य घेऊ शकता”
प्रश्न:-
कोणती गोष्ट
तुम्हा मुलांच्या ध्यानी-मनी सुद्धा नव्हती, जी प्रॅक्टिकलमध्ये झाली आहे?
उत्तर:-
तुमच्या ध्यानी-मनी सुद्धा नव्हते की आपण भगवंताकडून राजयोग शिकून विश्वाचे मालक बनू.
राजाईसाठी शिक्षण घेणार. आता तुम्हाला अथाह खुशी आहे की सर्वशक्तिमान बाबांकडून बळ
घेऊन आपण सतयुगी स्वराज्य अधिकारी बनतो.
ओम शांती।
इथे मुली बसतात प्रॅक्टिस करण्यासाठी. वास्तविक इथे (संदलीवर) त्यांना बसले पाहिजे
जे देही-अभिमानी बनून बाबांच्या आठवणीमध्ये बसतील. जर आठवणीमध्ये बसत नसतील तर
त्यांना टीचर म्हटले जाऊ शकत नाही. आठवणीमध्ये शक्ती असते, ज्ञानामध्ये शक्ती नसते.
याला म्हटलेच जाते - आठवणीचे बळ. ‘योगबळ’ हा संन्याशांचा शब्द आहे. बाबा कठीण शब्द
वापरत नाहीत. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, आता बाबांची आठवण करा’. जशी छोटी मुले
आई-वडिलांची आठवण करतात ना. ते तर देहधारी आहेत. तुम्ही मुले आहात विचित्र. हे
चित्र (शरीर) तुम्हाला इथे मिळते. तुम्ही विचित्र देशाचे रहिवासी आहात. तिथे चित्र
(शरीर) असत नाही. सर्वप्रथम हे पक्के करायचे आहे - आपण तर आत्मा आहोत म्हणून बाबा
म्हणतात - ‘मुलांनो, देही-अभिमानी बना, स्वतःला आत्मा निश्चय करा. तुम्ही निर्वाण
देशातून आला आहात. ते तुम्हा सर्व आत्म्यांचे घर आहे. इथे पार्ट बजावण्याकरिता येता’.
सर्वप्रथम कोण येतात? हे देखील तुमच्या बुद्धीमध्ये आहे. दुनियेमध्ये असा कोणीही
नाही ज्याला हे ज्ञान असेल. आता बाबा म्हणतात - शास्त्र इत्यादी जे काही वाचता ते
सर्व विसरा. श्रीकृष्णाची महिमा, अमक्याची महिमा किती करतात. गांधीजींची देखील किती
महिमा करतात. जणू काही ते रामराज्य स्थापन करून गेले आहेत. परंतु शिवभगवानुवाच - आदि
सनातन राजा-राणीच्या राज्याचा जो कायदा होता, बाबांनी राजयोग शिकवून राजा-राणी बनवले,
त्या ईश्वरीय रिती-रिवाजाला देखील तोडून टाकले. म्हणाले - आम्हाला राज्य नको,
आम्हाला प्रजेचे प्रजेवर राज्य पाहिजे. आता त्याची काय हालत झाली आहे! दुःखच दुःख,
भांडण-तंटे करत राहतात. अनेक मते झाली आहेत. आता तुम्ही मुले श्रीमतावर राज्य घेता.
इतकी तुमच्यामध्ये ताकद असते की तिथे लष्कर इत्यादी असत नाही. घाबरण्याची कोणती
गोष्ट नाही. या लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते, अद्वैत राज्य होते. दोन राज्ये
नव्हतीच मुळी ज्यामुळे टाळी वाजेल. त्याला म्हटलेच जाते - अद्वैत राज्य. तुम्हा
मुलांना बाबा देवता बनवतात. मग द्वैत पासून दैत्य बनतात रावणा द्वारा. आत्ता तुम्ही
मुले जाणता आपण भारतवासी साऱ्या विश्वाचे मालक होतो. तुम्हाला विश्वाचे राज्य फक्त
आठवणीच्या बळाने मिळाले होते. आता पुन्हा मिळत आहे. कल्प-कल्प मिळते, केवळ आठवणीच्या
बळाने. शिक्षणामध्ये देखील बळ आहे. जसे बॅरिस्टर बनतात तर ते बळ आहे ना. ते आहे पै-पैशाचे
बळ. तुम्ही योगबलाने विश्वावर राज्य करता. सर्वशक्तिमान बाबांकडून बळ मिळते. तुम्ही
म्हणता - बाबा, आम्ही कल्प-कल्प तुमच्याकडून सतयुगाचे स्वराज्य घेतो मग गमावतो,
पुन्हा घेतो. तुम्हाला पूर्ण ज्ञान मिळाले आहे. आता आपण श्रीमतावर श्रेष्ठ विश्वाचे
राज्य घेतो. विश्व देखील श्रेष्ठ बनते. हे रचता आणि रचनेचे ज्ञान तुम्हाला आत्ता आहे.
या लक्ष्मी-नारायणाला देखील ज्ञान नसेल की आपण राज्य कसे मिळवले! इथे तुम्ही शिकता
आणि मग जाऊन राज्य करता. कोणी चांगल्या श्रीमंत घरामध्ये जन्म घेतात तर म्हटले जाते
ना की, याने मागील जन्मामध्ये चांगले कर्म केले आहे, दान-पुण्य केले आहे. जसे कर्म
तसा जन्म मिळतो. आता तर हे आहेच रावण राज्य. इथे जे काही कर्म करतात ते विकर्मच होते.
शिडी उतरायचीच आहे. सर्वात श्रेष्ठ उच्च ते उच्च देवी-देवता धर्मवाल्यांना देखील
शिडी उतरायची आहे. सतो, रजो, तमो मध्ये यायचे आहे. प्रत्येक गोष्ट नव्या पासून मग
जुनी होते. तर तुम्हा मुलांना आता अथाह खुशी झाली पाहिजे. तुमच्या ध्यानी-मनी सुद्धा
(संकल्प-स्वप्नामध्ये सुद्धा) नव्हते की आपण विश्वाचे मालक बनतो.
भारतवासी जाणतात की या लक्ष्मी-नारायणाचे साऱ्या विश्वावर राज्य होते. पूज्य होते
ते पुन्हा पुजारी बनले आहेत. गायले देखील जाते आपेही पूज्य, आपेही पुजारी. आता
तुमच्या बुद्धीमध्ये हे असले पाहिजे. हे नाटक तर अतिशय वंडरफुल आहे. आपण कसे ८४
जन्म घेतो त्याला कोणीही जाणत नाहीत. शास्त्रांमध्ये ८४ लाख जन्म दाखवले आहेत. बाबा
म्हणतात - या सर्व भक्तीमार्गातील थापा आहेत. रावण राज्य आहे ना. राम राज्य आणि
रावण राज्य कसे असते, हे तुम्हा मुलांशिवाय कोणाच्याही बुद्धीमध्ये नाही आहे.
रावणाला दरवर्षी जाळतात, म्हणजे शत्रू आहे ना. ५ विकार मानवाचे शत्रू आहेत. रावण
कोण आहे, त्याला कशासाठी जाळतात हे कोणीही जाणत नाहीत. जे स्वतःला संगमयुगी समजतात
त्यांच्या स्मृतीमध्ये राहते की आपण आता पुरुषोत्तम बनत आहोत. भगवान आम्हाला राजयोग
शिकवून नरापासून नारायण, भ्रष्टाचारी पासून श्रेष्ठाचारी बनवतात. तुम्ही मुले जाणता
आपल्याला उच्च ते उच्च निराकार भगवान शिकवत आहेत. किती अथाह खुशी झाली पाहिजे.
शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या बुद्धीमध्ये असते ना - आपण विद्यार्थी आहोत. ते तर
आहेत कॉमन टीचर, शिकवणारे. इथे तर तुम्हाला भगवान शिकवतात. जेव्हा शिक्षणामुळे इतके
उच्च पद मिळते तर किती चांगले शिकले पाहिजे. आहे खूप सोपे फक्त सकाळी अर्धा-पाऊण
तास शिकायचे आहे. पूर्ण दिवस धंदा इत्यादीमध्ये आठवण विसरायला होते म्हणून इथे सकाळी
येऊन आठवणीमध्ये बसतात. म्हटले जाते - बाबांची अतिशय प्रेमाने आठवण करा - ‘बाबा,
तुम्ही आम्हाला शिकवण्यासाठी आले आहात, आता आम्हाला माहिती झाले आहे की तुम्ही ५०००
वर्षा नंतर येऊन शिकवता’. बाबांकडे मुले येतात तर बाबा विचारतात - ‘यापूर्वी कधी
भेटला होतात?’ असा प्रश्न कोणताही साधू-संन्यासी इत्यादी कधी विचारू शकत नाही. तिथे
तर सत्संगामध्ये ज्याला हवे ते कोणीही जाऊन बसतात. खूप जणांना बघून सर्व आत शिरतात.
तुम्ही देखील आता समजता - आपण गीता, रामायण वगैरे किती आनंदाने जाऊन ऐकत होतो. समजत
तर काहीच नव्हते. तो सर्व आहे भक्तीचा आनंद. खूप आनंदाने नाचत राहतात. परंतु मग खाली
उतरत येतात. तऱ्हेतऱ्हेचे हठयोग इत्यादी करतात. तंदुरुस्तीसाठीच सर्व करतात. तर बाबा
समजावून सांगतात हे सर्व आहेत भक्तिमार्गाचे रिती-रिवाज. रचता आणि रचनेला कोणीही
जाणत नाहीत. तर मग बाकी राहिलेच काय! रचता आणि रचनेला जाणल्यामुळे तुम्ही काय बनता
आणि न जाणल्यामुळे तुम्ही काय बनता? तुम्ही जाणल्यामुळे सॉल्व्हंट (पावन) बनता, न
जाणल्यामुळे तेच भारतवासी इनसॉल्व्हंट (पतित) बनले आहेत. थापा मारत राहतात.
दुनियेमध्ये काय-काय होत राहते. किती धन, सोने इत्यादी लुटतात! आता तुम्ही मुले
जाणता - तिथे तर आपण सोन्याचे महाल बांधणार. बॅरिस्टरी इत्यादी शिकतात तर आतून वाटत
असते ना की, आपण ही परीक्षा पास करून मग असे करणार, घर बांधणार. तुमच्या बुद्धीमध्ये
का येत नाही की, आपण स्वर्गाचे प्रिन्स-प्रिन्सेस बनण्यासाठी शिकत आहोत. किती आनंद
झाला पाहिजे. परंतु बाहेर गेल्यावर आनंद नाहीसा होतो. लहान-लहान मुली या ज्ञानामध्ये
येतात. नातेवाईक काहीच समजत नाहीत, म्हणतात की, जादू आहे. म्हणतात - आम्ही शिकू
देणार नाही. या परिस्थितीमध्ये जोपर्यंत सगीर (अल्पवयीन) आहेत तोपर्यंत आई-वडिलांचे
म्हणणे ऐकावे लागेल. आम्ही स्वीकारू शकत नाही. खूप कटकट होते. सुरुवातीला किती कटकट
झाली. मुलगी म्हणत असे - ‘मी अठरा वर्षांची आहे’; वडील म्हणत - ‘नाही, ही सोळा
वर्षांची आहे, अल्पवयीन आहे, भांडण करून पकडून घेऊन जात होते. अल्पवयीन असणे
म्हणजेच वडिलांच्या हुकुमावर चालायचे आहे. सज्ञान आहे म्हणजे मग जी इच्छा असेल ते
करेल. कायदे देखील आहेत ना. बाबा म्हणतात - तुम्ही जेव्हा बाबांकडे येता तर हा नियम
आहे की, आपल्या लौकिक पित्याची चिट्ठी (संमती पत्र) घेऊन या. शिवाय मॅनर्स देखील
बघावे लागतात. मॅनर्स चांगले नसतील तर परत जावे लागेल. खेळामध्ये देखील असेच असते.
चांगले खेळत नसतील तर त्यांना म्हणतील - बाहेर जा, तुम्ही इज्जत घालवता. आता तुम्ही
मुले जाणता आपण युद्धाच्या मैदानावर आहोत. कल्प-कल्प बाबा येऊन आपल्याला मायेवर
विजय प्राप्त करून देतात. मुख्य गोष्ट आहेच मुळी पवित्र बनण्याची. पतित बनले आहेत
विकारामुळे. बाबा म्हणतात - काम महाशत्रू आहे. हा आदि-मध्य-अंत दुःख देणारा आहे. जे
ब्राह्मण बनतील तेच मग देवी-देवता धर्मामध्ये येतील. ब्राह्मणांमध्ये देखील नंबरवार
असतात. शमेवर परवाने येतात. कोणी तर जळून मरतात, कोणी फेरी मारून निघून जातात. इथे
देखील आले आहेत, कोणी तर एकदम फिदा होतात, कोणी ऐकून मग निघून जातात. आधी तर रक्ताने
देखील लिहून देत होते - ‘बाबा, आम्ही तुमचे आहोत’. तरी देखील माया पराजीत करते. इतके
मायेचे युद्ध चालते, यालाच युद्ध स्थळ म्हटले जाते. हे देखील तुम्हीच समजता. परमपिता
परमात्मा ब्रह्मा द्वारे सर्व वेद-शास्त्रांचे सार समजावून सांगतात. चित्र तर
पुष्कळ बनवली आहेत ना. नारदाचे देखील उदाहरण याच वेळचे आहे. सर्वजण म्हणतात - आम्ही
लक्ष्मी अथवा नारायण बनणार. बाबा म्हणतात - आपल्या आतमध्ये डोकावून पहा - आपण लायक
आहोत? आपल्यामध्ये कोणते विकार तर नाहीत? नारद भक्त तर सर्वच आहेत ना. हे तर एक
उदाहरण दिले आहे.
भक्तीमार्गवाले म्हणतात - ‘आम्ही श्री लक्ष्मीला वरू शकतो?’ बाबा म्हणतात की,
‘नाही, जेव्हा ज्ञान ऐकाल तेव्हा सद्गती प्राप्त करू शकाल. मी पतित-पावनच सर्वांची
सद्गती करणारा आहे.’ आता तुम्ही समजता बाबा आपल्याला रावण राज्यातून लिब्रेट करत
आहेत. ती आहे भौतिक यात्रा. भगवानुवाच - मनमनाभव. बस्स, यामध्ये ठोकरे खाण्याची गरज
नाही. ती सर्व आहे भक्तिमार्गातील दगदग. अर्धा कल्प ब्रह्माचा दिवस, अर्धा कल्प आहे
ब्रह्माची रात्र. तुम्ही समजता आपणा सर्व बी. के. चा आता अर्धा कल्प दिवस असेल. आपण
सुखधाममध्ये असणार. तिथे भक्ति असणार नाही. आता तुम्ही मुले जाणता आपण सर्वात
श्रीमंत बनतो, तर किती आनंद झाला पाहिजे. तुम्ही सर्वजण आधी ओबडधोबड दगड होता, आता
बाबा निसण्यावर चढवत आहेत (धार काढणाऱ्या दगडावर घासत आहेत). बाबा सोनार देखील आहेत
ना. ड्रामा अनुसार बाबांनी रथ देखील अनुभवी घेतला आहे. गायन देखील आहे - गावातील
मुलगा. श्रीकृष्ण गावातील मुलगा कसा असू शकतो. तो तर सतयुगामध्ये होता. त्याला तर
झोपाळ्यावर झोके देतात. मुकुट घालतात मग गावातील मुलगा असे का म्हणतात? गावातील मुले
तर सावळी असतात. आता सुंदर बनण्यासाठी आला आहात. बाबा ज्ञानाच्या निसण्यावर चढवतात
ना. हा सतचा संग कल्प-कल्प कल्पामध्ये एकदाच मिळतो. बाकी सगळी आहे खोटी संगत म्हणून
बाबा म्हणतात - ‘हियर नो इविल…’ अशा गोष्टी ऐकू नका जिथे माझी आणि तुमची निंदा करत
राहतात.
ज्या कुमारी ज्ञानामध्ये येतात त्या तर म्हणू शकतात की आमचा बाबांच्या
प्रॉपर्टीमध्ये हिस्सा आहे, तर मग का नाही आम्ही त्यातून भारताच्या सेवेसाठी सेंटर
उघडावे. कन्येसाठी दान (हुंडा) तर द्यायचेच आहे. तो हिस्सा आम्हाला द्या म्हणजे
आम्ही सेंटर उघडू. अनेकांचे कल्याण होईल. अशी युक्ती रचली पाहिजे. हे आहे तुमचे
ईश्वरीय मिशन. तुम्ही पत्थर-बुद्धीला पारस-बुद्धी बनवता. जे आपल्या धर्माचे असतील
ते येतील. एकाच घरामध्ये देवी-देवता धर्माचे फूल उमलेल. बाकीचे काही येणार नाहीत.
मेहनत करावी लागते ना. बाबा सर्व आत्म्यांना पावन बनवून सर्वांना घेऊन जातात म्हणून
बाबांनी सांगितले होते - संगमाच्या चित्रासमोर घेऊन या. या बाजूला आहे कलियुग, त्या
बाजूला आहे सतयुग. सतयुगामध्ये आहेत देवता, कलियुगामध्ये आहेत असुर. याला म्हटले
जाते पुरुषोत्तम संगमयुग. बाबाच पुरुषोत्तम बनवतात. जे शिकतील ते सतयुगामध्ये येतील,
बाकी सगळे मुक्तिधाममध्ये निघून जातील. आणि मग आपापल्या वेळेनुसार येतील. हे
गोळ्याचे चित्र खूप चांगले आहे. मुलांना सेवेची आवड असली पाहिजे. आम्ही अशी-अशी सेवा
करून, गरिबांचा उद्धार करून त्यांना स्वर्गाचा मालक बनवणार. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) आपणच
आपल्याला बघायचे आहे की, मी श्री लक्ष्मी, श्री नारायणा समान बनू शकतो का?
माझ्यामध्ये कोणता विकार तर नाही आहे? फक्त फेरी मारणारे परवाने आहोत का फिदा होणारे?
असे कोणते मॅनर्स (संस्कार) तर नाही ना की ज्यामुळे बाबांची इज्जत जाईल.
२) अथाह खुशीमध्ये
राहण्यासाठी - पहाटे प्रेमाने बाबांची आठवण करायची आहे आणि अभ्यास करायचा आहे.
भगवान आपल्याला शिकवून पुरुषोत्तम बनवत आहेत, आपण संगमयुगी आहोत, याच नशेमध्ये
रहायचे आहे.
वरदान:-
सर्व गुणांच्या
अनुभवांद्वारे बाबांना प्रत्यक्ष करणारे अनुभवी मूर्त भव
जे बाबांचे गुण गाता
त्या सर्व गुणांचे अनुभवी बना, जसे बाबा आनंदाचा सागर आहेत तर त्याच आनंदाच्या
सागराच्या लाटांमध्ये तरंगत रहा. जे कोणी संपर्कामध्ये येतील त्यांना आनंद, प्रेम,
सुख… सर्व गुणांची अनुभूती करवा. असे सर्व गुणांचे अनुभवी मूर्त बना जेणेकरून
तुमच्या द्वारे बाबांचा चेहरा प्रत्यक्ष व्हावा कारण तुम्ही महान आत्मेच परम
आत्म्याला आपल्या अनुभवीमूर्तद्वारे प्रत्यक्ष करू शकता.
बोधवाक्य:-
कारणाला
निवारणामध्ये परिवर्तन करून अशुभ गोष्टीला देखील शुभ करून स्वीकारा.
अव्यक्त इशारे -
रूहानी रॉयल्टी आणि प्युरीटीची पर्सनॅलिटी धारण करा:-
ब्राह्मणांचे आयुष्य,
जीवनाचे जीवन-दान पवित्रता आहे. आदि-अनादि स्वरूपच पवित्रता आहे. जेव्हा स्मृती आली
की मी अनादि-आदि पवित्र आत्मा आहे. स्मृती येणे अर्थात पवित्रतेची समर्थी (शक्ती)
येणे. स्मृती स्वरूप, समर्थ स्वरूप आत्मे मुळात पवित्र संस्कारवाले आहेत. तर निजी (मूळ)
संस्कारांना इमर्ज करून या पवित्रतेच्या पर्सनॅलिटीला धारण करा.