08-05-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड मुलांनो - आता
तुम्ही शूद्र घराण्यातून निघून ब्राह्मण घराण्यामध्ये आला आहात, बाबांनी ब्रह्मा
मुखाद्वारे तुम्हाला ॲडॉप्ट केले आहे - तर याच आनंदामध्ये रहा”
प्रश्न:-
असे कोणते गूढ
रहस्य, फक्त ब्राह्मण कुळातील मुलेच समजू शकतात?
उत्तर:-
निराकार
शिवबाबा आमचे पिता आहेत आणि हे ब्रह्माबाबा आमची माता आहे. निराकार भगवान कसे
माता-पिता, बंधू-सखा बनतात, हे गूढ गुप्त रहस्य ब्राह्मण कुळातील मुलेच समजू शकतात.
त्यातूनही जे दैवी कुळामध्ये उच्च पद प्राप्त करणारे आहेत तेच हे रहस्य यथार्थ
रीतीने समजतील.
ओम शांती।
मुले बसली आहेत - मुले समजतात की आमचे बापदादा आलेले आहेत. बाबा तर दादांमध्ये
अवतरीत होतात, म्हणून म्हणणार की, ‘बाप-दादा’ आले आहेत. ते टीचर देखील आहेत. बाबा,
दादांशिवाय तर काही बोलू शकणार नाहीत. बुद्धी चालली पाहिजे कारण ही नवीन गोष्ट आहे
ना. अज्ञान काळात आठवण करतात एकाची. म्हणतील आमचे गुरू अमुक ठिकाणी आहेत. त्यांच्या
शरीराचे नाव माहित असते. आमचे वडील, आमची आई अमुक ठिकाणी आहे. त्यांचे नाव-रूप सर्व
काही आहे. मनुष्यांनी मग थोडक्यात लिहिले आहे. मनुष्यांनी जे बनवले आहे, त्यामध्ये
काही ना काही राँग आहे. भले गायन आहे - ‘त्वमेव माताश्च पिता…’ हे एकासाठीच गायले
जाते. ब्रह्मा करिता देखील गायले जात नाही; ब्रह्माचे नाव-रूप बुद्धीत येत नाही, ना
विष्णूचे, ना शंकराचे. गातात तर खरे - ‘तुम मात-पिता हम बालक तेरे’. तरीही बुद्धी
वरच्या दिशेलाच जाईल. श्रीकृष्णाची आठवण कोणी करू शकणार नाही. आठवण तरीही
निराकाराचीच करतील, त्यांचीच महिमा आहे. तर बाबा समजावून सांगत आहेत - इथे जेव्हा
बसता तेव्हा लौकिक नात्यांमधून बुद्धियोग काढून, पारलौकिक बाबांची आठवण करा. या वेळी
हे (ब्रह्मा बाबा) सन्मुख आहेत. भक्तीमार्गामध्ये जे गातात तेव्हा डोळे वर करून
म्हणतात - ‘तुम मात-पिता…’, ‘हे भगवान’, असे म्हणून आठवण करतात. ‘भगवान’, असे जेव्हा
म्हणतात तेव्हा शिवलिंगाची देखील आठवण करत नाहीत. पोपटासारखे असेच गातात.
लक्ष्मी-नारायणाकरिता देखील असे म्हणू शकत नाहीत, हे तर महाराजा-महाराणी आहेत.
त्यांचे मूलच त्यांना ‘माता-पिता’ म्हणेल, ‘बंधू’ म्हणणार नाही. भक्त लोक गातात - ‘पतित-पावन’,
परंतु हे बुद्धीमध्ये येत नाही की शिवलिंग असेल, असेच फक्त म्हणतात - ‘हे भगवान!’
‘हे भगवान’, हे कोणी म्हटले आणि कोणाला म्हटले? काहीच ठाऊक नाही. जर हे ज्ञान असते
की, मी आत्मा आहे, त्यांना बोलावत आहे, तर हे समजतील की ते निराकार परमात्मा आहेत.
त्यांचे रूपच लिंग आहे. यथार्थ रीतीने कोणीही बाबांची आठवण करत नाहीत.
त्यांच्याकडून काय प्राप्ती होईल, कधी होईल - हे काहीच जाणत नाहीत. तुम्ही देखील
जाणत नव्हता. आता तर बाबांचे बनला आहात. तुम्ही जाणता आम्हाला शिवबाबांनी ब्रह्मा
द्वारे आपली संतान बनवले आहे. हे ब्रह्मा आई आहेत. या ब्रह्मा मातेद्वारे शिवबाबांनी
ॲडॉप्ट केले आहे. यावेळी तुम्ही चांगल्या रीतीने जाणता. आपण शिवबाबांची संतान आहोत.
साकारमध्ये मग प्रजापिता ब्रह्माची मुले आहोत. प्रजापिता ब्रह्मा द्वारे शिवबाबा,
मनुष्य सृष्टी रचतात. असे नाही की कोणती नवीन सृष्टी रचतात? नाही, या वेळी येऊन
दत्तक घेतात, ॲडॉप्ट करतात. आता माता-पिता म्हणतात तर हे शिव पिता झाले आणि ब्रह्मा
माता झाली. त्यांना म्हटले जाते माता-पिता. बाबा, ब्रह्मा द्वारे म्हणतात - तुम्ही
आत्मे माझी संतान आहात. मग आत्म्याला बसून ओळख देतात की, आत्मा काय आहे? म्हणतात
देखील की भृकुटीच्या मध्यभागी राहते, ताऱ्या प्रमाणे आहे, बाकी काहीच जाणत नाहीत.
हे सांगू शकत नाहीत की आत्मा ८४ जन्म भोगते. आत्मा शरीराद्वारे पार्ट बजावते.
भिन्न-भिन्न नाव, रूप, देश, काळानुसार आत्मा एक शरीर सोडते, तेव्हा सर्व परिवारच
बदलून जातो. कोणी ॲडॉप्ट करतात तर परिवारच बदलून जातो. आई-वडील ज्यांच्या पोटी जन्म
घेतला, त्यांना देखील ओळखतात. आणि मग जे ॲडॉप्ट करतात, त्यांच्या परिवारातील बनतात.
इथे तुम्ही शूद्र घराण्यातून निघून आता ब्राह्मण घराण्यामध्ये आला आहात. ब्रह्मा
तनाद्वारे तुम्हाला ॲडॉप्ट केले. तुम्ही तर ब्राह्मण कुळामध्ये आला आहात. या गोष्टी
शास्त्रांमध्ये लिहिल्या जाऊ शकत नाहीत, या समजावून सांगितल्या जातात. लिहिण्याने
कोणाला समजत नाही.
आता तुम्ही मुलेच जाणता - आपण परमपिता परमात्म्याची संतान बनलो आहोत. ही झाली आई.
ब्रह्माला ‘प्रजापिता’च म्हटले जाते. यांच्याद्वारे तुम्हा मुलांना ॲडॉप्ट करतो -
या किती गुप्त गोष्टी आहेत. सन्मुख आल्याशिवाय कोणीही समजू शकणार नाही. समजतील
देखील तेच जे या ब्राह्मण कुळातील असतील, दैवी कुळामध्ये उच्च पद मिळविणारे असतील.
नवीन असणाऱ्या कोणाच्याही बुद्धीमध्ये या गोष्टी बसणार नाहीत. ना त्याच्या
बुद्धीमध्ये बसणार, ना तो कोणाला समजावून सांगू शकणार. तुमच्यामध्ये देखील नंबरवार
पुरुषार्थानुसार आहेत, ज्यांच्या बुद्धीमध्ये हे बसते. गायले जाते - ‘त्वमेव
माताश्च पिता…’ आठवण केली जाते शिवबाबांची. मग म्हणतात - ‘तुम मात-पिता’. एकच तर
पिता आहेत मग ‘माता-पिता’ कसे काय झाले? या गोष्टी इतर कोणीही समजावून सांगू शकत
नाही. जसे शास्त्रांमध्ये व्यासांनी जे लिहिले आहे ते मनुष्यांनी तोंडपाठ केले आहे;
तुम्हाला देखील असेच म्हणतील की, ‘तुम्हाला कोणीतरी सांगितले आहे, तुम्ही ते
तोंडपाठ केले आहे’. नवीन व्यक्तीला समजणे खूप कठीण आहे. इथे राहणारे देखील काहीजण
कोणाला एवढे सुद्धा समजावून सांगू शकत नाहीत. तुम्ही आत्मा आहात - तुमचे पिता,
परमपिता परमात्मा आहेत. ते बेहदचे बाबाच बेहदचा वारसा देतात. वारसा दिला होता मग
पुनर्जन्म घेता-घेता ८४ जन्म पूर्ण झाले, आता बाबा पुन्हा वारसा देण्यासाठी आले
आहेत. हे कोणाला समजावून सांगणे किती सोपे आहे. ‘तुम मात-पिता’, हे कोणाला म्हटले
जाते - ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. ब्रह्मा द्वारे ॲडॉप्ट करतात मग आई
देखील जरूर पाहिजे. तर जी अनन्य कन्या असते, ड्रामा प्लॅननुसार तिला ‘जगत-अंबा’चे
टायटल दिले जाते. पुरुषाला ‘जगत-अंबा’ म्हणू शकत नाही, यांना (ब्रह्मा बाबांना)
जगतपिता म्हणणार. यांचे ‘प्रजापिता’ हे नाव प्रसिद्ध आहे. अच्छा, ‘प्रजा-माता’ कुठे
आहे? तर ॲडॉप्ट केले जाते मातेला. आदि देव तर आहेतच मग आदि देवीला नियुक्त केले जाते.
जगत-अंबा तर एकच आहे - त्यांचीच महिमा आहे. जगत-अंबेच्या नावावर किती मोठी जत्रा
भरते. परंतु त्यांच्या ऑक्युपेशनला कोणीही जाणत नाही. कलकत्त्यामध्ये कालीचे मंदिर
आहे. मुंबईमध्ये देखील जगत-अंबेचे मंदिर आहे. रूप वेगवेगळे आहे. जगत-अंबा आहे कोण?
हे कोणीही जाणत नाही. तिला देखील ‘भगवती’ म्हणतात. आता जगत-अंबेला भगवती म्हणू शकत
नाही. ती तर ब्राह्मणी आहे, ज्ञान-ज्ञानेश्वरी आहे, तिला बाबांकडून ज्ञान मिळाले आहे.
तुम्ही सर्व जगत-अंबेची मुले आहात. ज्ञान ऐकून
मग ऐकवता. तुमचा धंदाच हा झाला. तुम्हाला स्वयं ईश्वर शिकवतात, कोणी मनुष्य शिकवत
नाही. हे ब्रह्मा बाबा देखील मनुष्यच तर आहेत. मनुष्य कोणालाही पावन बनवू शकत नाही.
मनुष्यांची बुद्धी इतकी मंद (डल) झाली आहे की काहीच समजत नाहीत. पतित-पावन तर एक
बाबाच आहेत. ते येतातच, पतितांना पावन बनविण्यासाठी. ही सारी दुनिया तमोप्रधान आहे,
सर्व पतित आहेत. नवी दुनिया पावन, जुनी दुनिया पतित. जुन्या दुनियेमध्ये आहेत -
नरकवासी. नवीन दुनियेमध्ये आहेत - स्वर्गवासी. बुद्धी देखील म्हणते की सतयुगामध्ये
फक्त भारतवासी देवी-देवता असतील इतर कोणीही नव्हते. आता तुम्हा मुलांना हे ज्ञान
मिळाले आहे. नवीन दुनियेमध्ये आधी सूर्यवंशी देवता होते, मग चंद्रवंशी झाले, तर
सूर्यवंशी पास्ट झाले. चंद्रवंशी नंतर मग वैश्य वंशी... येतात; खरोखर
लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते. अच्छा, त्यांच्या आधी काय होते? हे कोणीही समजू
शकणार नाही. तुम्हा मुलांना बाबांनी चक्राचे रहस्य समजावून सांगितले आहे. द्वापर
मध्ये आहेत वैश्य वंशी. कलियुगामध्ये असतात शूद्र वंशी.
आता तुम्ही जाणता - आपण ब्राह्मण बनलो आहोत. तुम्हाला बाबांनी आपले बनवले आहे
अर्थात शूद्र धर्मातून देवता धर्मामध्ये ट्रान्सफर केले आहे. आता सूर्यवंशी,
चंद्रवंशी तर राहिलेले नाहीत. ना लक्ष्मी-नारायणाचे राज्य आहे, ना रामराज्य आहे. आता
आहे कलियुगाचा अंत. कलियुगा नंतर जरूर सतयुग येईल. कलियुगामध्ये ही जुनी, पतित
दुनिया आहे, महान दुःखी आहेत, म्हणूनच देवतांची जाऊन महिमा गातात, डोके टेकवतात.
अच्छा, लक्ष्मी-नारायण यांना हे राज्य कोणी दिले? कोणीतरी आहे जो सांगू शकेल.
कोणाच्याही डोक्यात हा विचार येणार नाही, कारण बुद्धीमध्ये आहे की कलियुग अजून बाळ
आहे. ४० हजार वर्षे शिल्लक आहेत म्हणून हे विचारच येत नाहीत. आता तुम्हाला हा विचार
येतो. बरीच मुले म्हणतात - आम्हाला आठवण राहत नाही. का राहत नाही? कारण पहाटे लवकर
उठून आठवणीमध्ये बसून धारणा करत नाहीत. समजतात देखील, परंतु कोणाला समजावून सांगू
मात्र शकत नाहीत. हे तर जरूर होणार. सगळेच काही एकरस (एकसारखे) हुशार बनू शकत नाहीत.
हुशार देखील हवेत आणि बुद्धू देखील हवेत. खूप हुशार असणारे तर जाऊन राजा-राणी बनतील.
जितके-जितके जे जास्त ज्ञान समजतात आणि समजावून सांगतात त्यांचे नाव प्रसिद्ध होते.
प्रदर्शनी होतात तेव्हा लिहितात - ‘बाबा, अमक्या बहिणीला पाठवा’. तर तुम्ही समजावून
सांगू शकत नाही काय? तर म्हणतात - ‘बाबा, त्यांची प्रॅक्टिस जास्त आहे. आम्ही थोडे
कच्चे आहोत’. बाबा स्वतः देखील म्हणतात - कुठूनही निमंत्रण मिळाले तर लिहून पाठवा,
कोण-कोण आहेत, म्हणजे मग आम्ही पाहू की कोणा-कोणाला पाठवायला हवे. संन्यासी देखील
त्या निमंत्रणामध्ये आहेत का? मग तर खूप चांगल्या ब्रह्माकुमारीला पाठवावे लागेल.
अच्छा, कुमारका आहे, मनोहर आहे, गंगे आहे - यापैकी कोणाला तरी पाठवा. मुले तर खूप
आहेत. जगदीशला पाठवा, रमेशला पाठवा. तुम्ही देखील समजता, एका पेक्षा एक हुशार आहेत.
जसे जज मॅजिस्ट्रेट असतात. एका पेक्षा एक हुशार असतात. गव्हर्नमेंटला ठाऊक असते, एका
पेक्षा एक हुशार आहेत, म्हणून तर केस एकाकडून वरती दुसऱ्याकडे जाते, मग
हायकोर्टामध्ये जा, मग त्यांच्याही वर. त्यांनी देखील जर नीट निर्णय दिला नाही तर
मग त्यांच्याही वर जातील. त्यांच्यावर तुम्ही दया करा. आता या सर्व गोष्टी इथे
होतात. सतयुग, त्रेतामध्ये होत नाहीत. मग द्वापर मध्ये राजा-राणीचे राज्य असते. तिथे
महाराजा-महाराणीच केस सांभाळतात. केसेस असतीलही फार थोड्या. आता तर तमोप्रधान पतित
आहेत ना. तर बादशहाकडे केस जाते तेव्हा ते थोडी सजा देतात. मोठी चूक असेल तर मोठी
सजा देतील. येथे तर किती जज, वकील पुष्कळ आहेत. इतका कारभारात फरक आहे, सतयुगामध्ये
काय असते हे कोणालाच ठाऊक नाही. आता बाबांनी समजावून सांगितले आहे - कोणालाही विचारा,
या लक्ष्मी-नारायणाला ओळखता का? जसे बिर्ला आहेत, खूप मंदिरे बांधत असतात तर एखादा
चांगला मुलगा असेल त्याने त्यांना पत्र लिहावे. तुम्ही लक्ष्मी-नारायणाची मंदिरे तर
खूप बांधता. यांना ही राजधानी कशी मिळाली, जेव्हा की सतयुगाच्या आधी कलियुग होते?
कलियुगामध्ये तर काहीच नाहीये. देवतांनी तर कोणाशीही युद्ध केले नसेल. युद्ध करून
कोणीही विश्वाचा मालक बनू शकत नाही. विश्वाचे मालक जे होते त्यांचे हे
लक्ष्मी-नारायणाचे चित्र ठेवलेले आहे. आता तर आहे कलियुग. इथे युद्ध चालते
शस्त्रांद्वारे. बाबांनी समजावून सांगितले आहे ख्रिश्चन धर्माचेच जर आपसात एकोपा
करतील, आपसात प्रेम ठेवतील तर विश्वाचे मालक बनू शकतात. परंतु विश्वाचे मालक तर
लक्ष्मी-नारायणच बनतात. बुद्धी म्हणते की हे आपसामध्ये एकत्र आले - तर मालक बनू
शकतात परंतु सतयुगामध्ये किंग-क्वीन तर कोणी बनू शकणार नाही. ड्रामाच असा बनलेला आहे.
आता आम्ही पुन्हा योगबलाने स्वर्गाचा वारसा घेत आहोत. तुम्ही सांगू शकता -
कल्पापूर्वी देखील संगमावर बाबांकडून पद मिळवले आहे. ८४ जन्म पूर्ण झाले, पुन्हा
वारसा घेत आहोत. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) स्वतःमध्ये
धारणा करण्यासाठी आणि इतरांकडून करवून घेण्यासाठी - पहाटे लवकर उठून बाबांच्या
आठवणीमध्ये बसायचे आहे. जे समजले आहे ते इतरांना समजावून सांगण्याची प्रॅक्टिस
करायची आहे.
२) लौकिक नात्यामधून
बुद्धियोग काढून एका पारलौकिक बाबांची आठवण करायची आहे. बाबांकडून जे ज्ञान मिळाले
आहे, ते ऐकून सर्वांना ऐकवायचे आहे. हाच तुमचा धंदा आहे.
वरदान:-
सामावून
घेण्याच्या शक्तीद्वारे एकमताचे वातावरण बनविणारे दृष्टान्त रूप भव
जे एक समान मणी आहेत,
एकाचीच लगन (एकाचाच ध्यास) आहे आणि एकरस स्थितीमध्ये स्थित आहेत, एकाच्याच मतावर
चालणारे आहेत, आपापसामध्ये संकल्पांमध्ये सुद्धा एकमत आहे, तेच माळेमध्ये गुंफले
जातात. परंतु एकमताचे वातावरण तेव्हाच बनेल जेव्हा सामावून घेण्याची शक्ती असेल. जर
एखाद्या गोष्टीमध्ये भिन्नता निर्माण झाली तर त्या भिन्नतेला सामावून घ्या तेव्हाच
आपसामध्ये एकतेद्वारे समीप याल आणि सर्वांसमोर दृष्टान्त रूप बनाल.
बोधवाक्य:-
प्रत्येक
संकल्प, वाणी आणि कर्मामध्ये रुहानियत धारण करा, तेव्हाच सेवेमध्ये रौनक (आकर्षकपणा)
येईल.
हे अव्यक्त इशारे -
सदैव अचल, अडोल एकरस स्थितीचा अनुभव करा.
कोणताही वेदनादायक
सीन बघत असतानाही - नथिंग न्यू; ज्यांचा हा ‘नथिंग न्यू’ चा पाठ पक्का आहे ते घाबरू
शकत नाहीत. ‘काय झाले, कसे झाले, असे झाले…’ अशा बातम्या ऐकताना, बघताना देखील
ड्रामाच्या पूर्वनिर्धारित भावीला शक्तिशाली बनून बघत चला आणि इतरांनाही शक्ती देत
चला. दुनियावाले घाबरतील आणि तुम्ही एकरस स्थितीमध्ये राहून त्या आत्म्यांमध्ये
शक्ती भराल. जो पण कोणी संपर्कात येईल, त्याला शक्तींचे आणि शांतीचे दान देत चला.