08-07-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - बाबांप्रमाणे अपकारींवर सुद्धा उपकार करायला शिका, निंदकाला देखील आपला मित्र बनवा”

प्रश्न:-
बाबांची कोणती दृष्टी पक्की आहे? तुम्हां मुलांना कोणती दृष्टी पक्की करायची आहे?

उत्तर:-
बाबांची दृष्टी पक्की आहे की जे काही आत्मे आहेत ती सर्व माझी मुले आहेत म्हणून ‘मुलांनो-मुलांनो’ म्हणत राहतात. तुम्ही कधीही कोणाला ‘मुलांनो-मुलांनो’ म्हणू शकत नाही. तुम्हाला ही दृष्टी पक्की करायची आहे की ही आत्मा आमचा भाऊ आहे. भावाला बघा, भावाशी बोला, यामुळे आत्मिक प्रेम राहील. क्रिमिनल विचार (विकारी विचार) नष्ट होतील. निंदा करणारा सुद्धा मित्र बनेल.

ओम शांती।
रूहानी बाबा बसून समजावून सांगतात. रूहानी बाबांचे नाव काय आहे? नक्कीच ‘शिव’ म्हणणार. ते सर्वांचे रूहानी पिता आहेत, त्यांनाच भगवान म्हटले जाते. तुम्हा मुलांमध्ये देखील नंबरवार पुरुषार्थानुसार समजतात. हि जी आकाशवाणी म्हणतात, आता आकाशवाणी कोणाची असते? शिवबाबांची. या मुखाला आकाश तत्त्व म्हटले जाते. आकाश तत्त्वातून वाणी तर सर्व मनुष्यांची निघते. जे काही सर्व आत्मे आहेत, ते सर्व आपल्या पित्याला विसरले आहेत. अनेक प्रकारची महिमा करत राहतात. जाणत काहीच नाहीत. गायन (महिमा) देखील इथे करतात. सुखामध्ये तर कोणीही बाबांची आठवत करत नाहीत. सर्व इच्छा तिथे पूर्ण होतात. इथे तर खूप इच्छा असतात. पाऊस पडला नाही तर यज्ञ करतात. असे नाही कि यज्ञ केल्यावर नेहमीच पाऊस पडतो. नाही, कुठे दुष्काळ पडतो भले यज्ञ करतात, परंतु यज्ञ करूनही काहीही साध्य होत नाही. हा तर ड्रामा आहे. आपत्ती ज्या येणार आहेत त्या तर येतच राहतात. किती खंडीने माणसे मरतात, किती जनावरे इत्यादि मरत असतात. मनुष्य किती दुःखी होतात. पाऊस बंद करण्यासाठी सुद्धा यज्ञ आहे काय? जेव्हा एकदम मुसळधार पाऊस पडेल तर यज्ञ करतील? या सर्व गोष्टी आता तुम्ही समजता, बाकीच्यांना काय माहीत.

बाबा स्वतः बसून समजावून सांगतात, मनुष्य बाबांची महिमा सुद्धा करतात आणि शिव्या सुद्धा देतात. आश्चर्य आहे, बाबांची निंदा केव्हापासून सुरू झाली? जेव्हापासून रावण राज्य सुरू झाले आहे. मुख्य निंदा हि केली आहे की, ईश्वराला सर्वव्यापी म्हटले आहे, यामुळेच कोसळले आहेत (पतन झाले आहे). गायन आहे - ‘निंदा हमारी जो करे मित्र हमारा सो’. आता सर्वात जास्त निंदा कोणी केली आहे? तुम्ही मुलांनी. आणि आता मित्र देखील तुम्हीच बनता. तशी तर निंदा सारी दुनिया करते. त्यामध्ये देखील नंबरवन तुम्ही आहात आणि मग तुम्हीच मित्र बनता. सर्वात जवळचे मित्र आहात तुम्ही मुले. बेहदचे बाबा म्हणतात - ‘माझी निंदा तुम्ही मुलांनी केली आहे’. अपकारी देखील तुम्ही मुले बनता. ड्रामा कसा बनलेला आहे. या आहेत विचार सागर मंथन करण्याच्या गोष्टी. विचार सागर मंथनाचा केवढा अर्थ निघतो. कोणीही समजू शकत नाही. बाबा म्हणतात कि, ‘तुम्ही मुले शिकून उपकार करता’. गायन देखील आहे - ‘यदा-यदाहि धर्मस्य…’ भारताची गोष्ट आहे. खेळ पहा कसा आहे! शिवजयंती अथवा शिवरात्री सुद्धा साजरी करतात. वास्तविक अवतार आहे एक. अवताराला देखील दगड-धोंड्यात आहे असे म्हटले आहे. बाबा तक्रार करतात. गीता पठण करणारे श्लोक वाचतात परंतु म्हणतात आम्हाला माहीत नाही.

तुम्हीच सर्वात प्रिय मुले आहात. कोणाशीही बोलतील तर ‘बाळा-बाळा’ म्हणत राहतील. बाबांची तर ती दृष्टी पक्की झाली आहे. सर्व आत्मे माझी संतान आहे. तुमच्यामध्ये असा एकही नसेल ज्याच्या मुखातून ‘बाळा’ हा शब्द निघेल. बाबा हे तर जाणतात कोण कोणत्या पदावर आहे, कोणी काय आहे. सर्व आत्मे आहेत. हा देखील ड्रामा पूर्वनियोजित आहे, त्यामुळे काहीही सुख-दुःख वाटत नाही. सर्व माझी मुले आहेत. कोणी सफाई कामगाराचे शरीर धारण केले आहे, कोणी अमक्याचे शरीर धारण केले आहे. बाळांनो-बाळांनो म्हणायची सवय झाली आहे. बाबांच्या दृष्टीने सर्वजण आत्मे आहेत. त्यातसुद्धा गरीब जास्त आवडतात कारण ड्रामा अनुसार त्यांनी खूप निंदा केली आहे. आता पुन्हा माझ्याजवळ आले आहेत. फक्त हे लक्ष्मी-नारायण आहेत ज्यांची कधी निंदा केली जात नाही. श्रीकृष्णाची देखील खूप निंदा केली आहे. आश्चर्य आहे ना. श्रीकृष्णच मोठा झाला तर त्याची निंदा नाहीये. हे ज्ञान किती विचित्र आहे. अशा गूढ गोष्टी कोणाला समजतात थोड्याच, यासाठी हवे सोन्याचे भांडे. ते आठवणीच्या यात्रेनेच बनू शकते. इथे बसून देखील यथार्थ आठवण थोडीच करतात. हे समजत नाहीत की आपण छोटी आत्मा आहोत, आठवण देखील बुद्धीने करायची आहे. हे लक्षात येत नाही. मी छोटीशी आत्मा आहे ते माझे पिता देखील आहेत, शिक्षक देखील आहेत हे लक्षात येणे देखील अशक्य होऊन जाते. ‘बाबा-बाबा’ तर म्हणतात, दुःखामध्ये सर्वच आठवण करतात. भगवानुवाच आहे ना - ‘दुःखामध्ये सगळेच आठवण करतात, सुखामध्ये कोणीही करत नाही’. आठवण करण्याची आवश्यकताच नसते. इथे तर इतकी दुःखे, आपत्ती इत्यादि येतात, आठवण करतात, ‘हे भगवान दया करा, कृपा करा’. आता सुद्धा मुले बनतात तरीही लिहितात - ‘कृपा करा, शक्ती द्या, दया करा’. बाबा लिहितात - ‘शक्ती स्वतःच योगबलाने घ्या. स्वतःवर कृपा, दया आपली आपणच करा. आपल्याला स्वतःच राजतिलक द्या. युक्ती सांगतो - कसा लावून घ्यायचा. टीचर शिकण्याची युक्ती सांगतात. विद्यार्थ्यांचे काम आहे शिकणे, सांगितल्याप्रमाणे चालणे. टीचर कोणी गुरू थोडेच आहेत जे कृपा आशिर्वाद करतील. जी चांगली मुले असतील ती धाव घेतील. प्रत्येकजण मुक्त आहे, जेवढे धावायचे असेल तेवढे धावा. आठवणीची यात्रा हेच धावणे आहे.

एक-एक आत्मा स्वतंत्र आहे. भावा-बहीणीच्या नात्यातून देखील सोडवले. भाऊ-भाऊ समजले तरीही विकारी दृष्टी सुटत नाही. ती आपले काम करत राहते. या वेळी मनुष्यांची सर्व इंद्रिये विकारी आहेत. कोणाला लाथ मारली, बुक्का मारला म्हणजे विकारी अवयव झाले ना. प्रत्येक इंद्रिय विकारी आहे. तिथे कोणतेही इंद्रिय विकारी असणार नाही. इथे प्रत्येक इंद्रियाद्वारे वाईट काम करत राहतात. सर्वात जास्त विकारी इंद्रिय कोणते आहे? डोळे. विकाराची इच्छा पूर्ण झाली नाही तर मग हात चालवू लागतात. सर्वात आधी आहेत डोळे. तेव्हाच सूरदासाची देखील गोष्ट आहे. शिवबाबांनी तर कोणती शास्त्रे वाचलेली नाही आहेत. या रथाने (ब्रह्माने) वाचली आहेत. शिवबाबांना तर ज्ञानाचा सागर म्हटले जाते. हे तुम्हाला माहीत आहे की शिवबाबा काही पुस्तक घेत नाहीत. मी तर नॉलेजफुल आहे, बीजरूप आहे. हे सृष्टी रूपी झाड आहे, त्याचे रचयिता आहेत बाबा, बीज. बाबा समजावून सांगत आहेत - माझे निवासस्थान मूलवतनमध्ये आहे. आता मी या शरीरामध्ये विराजमान झालो आहे; इतर कोणीही असे म्हणू शकणार नाही की मी या मनुष्य सृष्टीचे बीजरूप आहे. मी परमपिता परमात्मा आहे, असे कोणी म्हणू शकणार नाही. कोणी चांगला समजूतदार असेल, त्याला कोणी म्हटले की, ईश्वर सर्वव्यापी आहे तर लगेच विचारेल, ‘काय तुम्ही सुद्धा ईश्वर आहात? काय तुम्ही अल्ला-सांई आहात?’ असू शकत नाही. परंतु या वेळी कोणीही समजूतदार नाहीये. अल्ला विषयी देखील माहित नाही, स्वतःच म्हणतात मी अल्ला आहे. आणि ते देखील इंग्रजीत म्हणतात - ‘ओमनी प्रेझेंट’ (सर्वव्यापी आहे). अर्थ समजला तर कधीच म्हणणार नाहीत. मुले आता जाणतात शिवबाबांची जयंती म्हणजेच नव्या विश्वाची जयंती. त्यामध्ये पवित्रता-सुख-शांती सर्वकाही येते. शिवजयंती नंतर मग श्रीकृष्ण जयंती त्यानंतर दसरा जयंती. शिवजयंती नंतर दीपावली जयंती, शिवजयंती नंतर मग स्वर्ग जयंती. सर्व जयंत्या एकत्र येतात. या सर्व नवीन गोष्टी बाबा बसून समजावून सांगतात. शिवजयंती सो शिवालय जयंती, वेश्यालय मरंती. या सर्व नवीन गोष्टी बाबा बसून समजावून सांगतात. शिवजयंती सो नव्या विश्वाची जयंती. विश्वामध्ये शांती व्हावी असे वाटते ना. तुम्ही कितीही चांगल्या प्रकारे समजावता, तरी जागेच होत नाहीत. अज्ञानरुपी अंधारामध्ये झोपून पडले आहेत ना. भक्ती करत शिडी खालीच उतरत जातात (पतन होत जाते). बाबा म्हणतात मी येऊन सर्वांची सद्गती करतो. स्वर्ग आणि नरकाचे रहस्य बाबा तुम्हा मुलांना समजावून सांगतात. वर्तमानपत्रे जी तुमची निंदा करतात त्यांना लिहून पाठवले पाहिजे - ‘निंदा हमारी जो करे मित्र हमारा सोय’. आम्ही तुमची देखील सद्गती नक्की करणार, जितकी हवी तितकी निंदा करा. ईश्वराची निंदा करतात, आमची केली तर काय झाले. तुमची सद्गती आम्ही नक्कीच करणार. इच्छा नसली तरीही नाकाला पकडून घेऊन जाऊ. घाबरण्याची तर गोष्टच नाही, जे काही करतो ते कल्पापूर्वी सुद्धा केले आहे. आम्ही बी.के. तर सर्वांची सद्गती करणार. व्यवस्थित समजावून सांगितले पाहिजे. अबलांवर अत्याचार तर कल्पापूर्वीसुद्धा झाले होते, हे मुले विसरून जातात. बाबा म्हणतात - ‘बेहदची सर्व मुले माझी निंदा करतात’. सर्वात आवडते मित्र मुलेच वाटतात. मुले तर फुलासमान असतात. आई-वडील आपल्या मुलांचे चुंबन घेतात, त्यांना कडेवर घेतात, त्यांची सेवा करतात. बाबासुद्धा तुम्हां मुलांची सेवा करतात.

आता तुम्हाला हे ज्ञान मिळाले आहे, जे तुम्ही सोबत घेऊन जाता. जे घेत नाहीत त्यांचा देखील ड्रामामध्ये पार्ट आहे. तोच पार्ट बजावतील. हिशोब चुकता करून घरी निघून जातात. स्वर्ग तर पाहू शकत नाहीत. सगळे थोडाच स्वर्ग बघतील. हा ड्रामा पूर्व नियोजित आहे. खूप पापे करतात, येतीलही उशिरा. तमोप्रधान खूप उशिरा येतील. हे रहस्य देखील व्यवस्थित समजून घ्यायचे आहे. चांगल्या-चांगल्या महारथी मुलांवर देखील ग्रहचारी बसते तर पटकन राग येतो आणि मग पत्रसुद्धा लिहीत नाहीत. बाबा देखील म्हणतात कि, ‘त्यांची मुरली बंद करून टाका’. अशा मुलांना खजिना देण्याने फायदाच काय. मग कोणाचे डोळे उघडले कि मग म्हणतील, चूक झाली. काहीजण तर पर्वाच करत नाहीत. एवढी चूक करता कामा नये. पुष्कळजण असे आहेत जे बाबांची आठवण देखील करत नाहीत, कोणाला आप समान सुद्धा बनवत नाहीत. नाही तर बाबांना लिहिले पाहिजे - ‘बाबा, मी तुमची नेहमी आठवण करतो’. कितीतरी मग असे आहेत जे सर्वांची नावे लिहितात - अमक्याला आठवण द्या, ही आठवण खरी थोडीच आहे. खोटे चालू शकत नाही. आतून मन खात राहील. मुलांना मुद्दे तर चांगले-चांगले समजावून सांगत राहतात. दिवसेंदिवस बाबा गूढ गोष्टी समजावून सांगत राहतात. दुःखाचे डोंगर कोसळणार आहेत. सतयुगामध्ये दुःखाचे नाव सुद्धा नाही. आता आहे रावणराज्य. म्हैसूरचा राजासुद्धा रावण वगैरे बनवून दसरा जोरात साजरा करतो. रामाला भगवान म्हणतात. रामाच्या सीतेची चोरी झाली. आता तो तर सर्वशक्तीमान होता, त्याची चोरी कशी होऊ शकते. ही सर्व आहे अंधश्रद्धा. या वेळी सर्वांमध्ये ५ विकारांची घाण आहे. आणि मग भगवानाला सर्वव्यापी म्हणणे हे फार मोठे खोटे आहे, म्हणून तर बाबा म्हणतात - ‘यदा यदाहि…’ मी येऊन सचखंड, सत्य धर्म स्थापन करतो. सचखंड सतयुगाला, झूठखंड कलियुगाला म्हटले जाते. आता बाबा झूठखंडला सचखंड बनवतात. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-

वरदान:-
वरून अवतरित होऊन अवतार बनून सेवा करणारे साक्षात्कारमूर्त भव जसे बाबा सेवेकरीता वतन मधून खाली येतात, तसेच आपण देखील सेवेकरीता वतनमधून आलो आहोत, असा अनुभव करून सेवा कराल तर कायम न्यारे आणि बाप समान विश्वाचे प्रिय बनाल. वरून खाली येणे अर्थात अवतार बनून अवतरित होऊन सेवा करणे. सर्वांची इच्छा आहे की अवताराने यावे आणि आम्हाला सोबत घेऊन जावे. तर खरे अवतार तुम्ही आहात जे सर्वांना मुक्तीधामला सोबत घेऊन जाल. जेव्हा अवतार समजून सेवा कराल तेव्हा साक्षात्कार मूर्त बनाल आणि अनेकांच्या इच्छा पूर्ण होतील.

बोधवाक्य:-
तुम्हाला कोणी चांगले देवो किंवा वाईट तुम्ही सर्वांना स्नेह द्या, सहयोग द्या, दया करा.