08-07-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - हे तुमचे जीवन अतिशय अमूल्य आहे, कारण तुम्ही श्रीमतावर विश्वाची सेवा
करता, या नरकाला स्वर्ग बनवता”
प्रश्न:-
आनंद नाहीसा
होण्याचे कारण तथा त्याचे निवारण काय आहे?
उत्तर:-
आनंद नाहीसा होतो १) देह-अभिमानामध्ये आल्याकारणाने, २) मनामध्ये जेव्हा कोणती शंका
उत्पन्न होते तेव्हा देखील आनंद नाहीसा होतो म्हणून बाबा सल्ला देतात, जेव्हापण
कोणती शंका उत्पन्न होईल तर लगेच बाबांना विचारा. देही-अभिमानी होऊन राहण्याचा
अभ्यास करा तर सदैव आनंदीत रहाल.
ओम शांती।
उच्च ते उच्च भगवान आणि मग भगवानुवाच, मुलांसमोर. मी तुम्हाला उच्च ते उच्च बनवितो
तर तुम्हा मुलांना किती आनंद झाला पाहिजे. समजता देखील बाबा आपल्याला साऱ्या
विश्वाचा मालक बनवत आहेत. मनुष्य म्हणतात - परमपिता परमात्मा उच्च ते उच्च आहेत.
बाबा स्वतः म्हणतात - मी काही विश्वाचा मालक बनत नाही. भगवानुवाच - मला मनुष्य
म्हणतात - उच्च ते उच्च भगवान आणि मी म्हणतो की, माझी मुले उच्च ते उच्च आहेत.
सिद्ध करून सांगतात. पुरुषार्थ देखील ड्रामा अनुसार करवून घेतात, कल्पा
पूर्वीप्रमाणे. बाबा समजावून सांगत राहतात, कोणतीही गोष्ट समजली नाही तर विचारा.
लोकांना तर काहीच माहिती नाहीये. दुनिया काय आहे, वैकुंठ काय आहे. भले कितीही कोणी
नवाब, मुगल इत्यादी होऊन गेले आहेत, भले अमेरिकेमध्ये कितीही पैसेवाले आहेत परंतु
या लक्ष्मी-नारायणासारखे तर कोणी असू शकत नाही. ते तर व्हाइट हाऊस इत्यादी बनवतात
परंतु तिथे तर रत्नजडित गोल्डन हाऊस बनते. त्याला म्हटलेच जाते सुख-धाम. तुमचाच
हिरो-हिरोइनचा पार्ट आहे. तुम्ही डायमंड बनता. गोल्डन एज (सतयुग) होते. आता आहे -
आयरन एज (कलियुग). बाबा म्हणतात - तुम्ही किती भाग्यशाली आहात. स्वयं भगवान बसून
समजावून सांगत आहेत तुम्हाला किती आनंदात राहिले पाहिजे. तुमचे हे शिक्षण आहेच नवीन
दुनियेकरिता. तुमचे हे जीवन अतिशय अमूल्य आहे कारण तुम्ही विश्वाची सेवा करता.
बबांना बोलावतातच यासाठी की, येऊन हेलला हेवन बनवा (नरकाला स्वर्ग बनवा). हेवनली
गॉड फादर असे म्हणतात ना. बाबा म्हणतात - तुम्ही स्वर्गामध्ये होता ना, आता
नरकामध्ये आहात. पुन्हा मग स्वर्गामध्ये असाल. नरकाची सुरुवात होते, तेव्हा मग
स्वर्गातील सर्व गोष्टी विसरून जातात. तरीही हे तर होणारच. तरीही तुम्हाला
सतयुगामधून कलियुगामध्ये जरूर यायचे आहे. बाबा पुन्हा-पुन्हा मुलांना सांगत राहतात
मनामध्ये कोणतीही शंका असेल, ज्यामुळे आनंद टिकून रहात नाही तर ती लगेच सांगा. बाबा
बसून शिकवत आहेत तर शिकले देखील पाहिजे ना. आनंद टिकून रहात नाही कारण तुम्ही
देह-अभिमानामध्ये येता. आनंद तर झाला पाहिजे ना. बाबा तर फक्त ब्रह्मांडाचे मालक
आहेत, तुम्ही तर विश्वाचे सुद्धा मालक बनता. भले बाबांना क्रियेटर म्हटले जाते परंतु
असे नाही की प्रलय होतो आणि मग नवीन दुनिया रचतात. नाही, बाबा म्हणतात - मी फक्त
जुन्याला नवीन बनवतो. जुन्या दुनियेचा विनाश घडवून आणतो. तुम्हाला नवीन दुनियेचा
मालक बनवतो. मी काही करत नाही, हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. पतित
दुनियेमध्येच मला बोलावतात. पारसनाथ बनवतो. तर मुले स्वतः पारसपुरीमध्ये येतात. तिथे
तर मला कधी बोलावत सुद्धा नाहीत. कधी बोलावता का की, ‘बाबा, पारसपुरीमध्ये येऊन थोडी
व्हिजिट तरी करा?’ बोलावतच नाही. गायन देखील आहे - ‘दुःख में सिमरण सब करें, सुख
में करे न कोई’, पतित दुनियेमध्ये आठवण करतात. आठवणही करत नाहीत आणि बोलावत सुद्धा
नाहीत. फक्त द्वापरमध्ये मंदिर बनवून त्यामध्ये मला ठेवून देतात. दगडाचे नाही तर मग
हिऱ्याचे लिंग बनवून ठेवतात - पूजा करण्यासाठी, किती वंडरफुल गोष्टी आहेत. चांगल्या
रीतीने कान उघडून ऐकल्या पाहिजेत. कानांना देखील प्युअर (पवित्र) केले पाहिजे.
प्युरिटी फर्स्ट (पहिली पवित्रता). असे म्हणतात - वाघिणीचे दूध सोन्याच्या
भांड्यामध्येच टिकू शकते. यामध्ये देखील पवित्रता असेल तर धारणा होईल. बाबा म्हणतात
- काम महाशत्रू आहे, यावर विजय प्राप्त करायचा आहे. तुमचा हा अंतिम जन्म आहे. हे
देखील तुम्ही जाणता, ही तीच महाभारत लढाई देखील आहे. कल्प-कल्प जसा विनाश झाला होता,
हूबेहूब आता देखील होईल, ड्रामा अनुसार.
तुम्हा मुलांना
स्वर्गामध्ये पुन्हा आपले महाल बनवायचे आहेत. जसे कल्पापूर्वी बनवले होते. स्वर्गाला
म्हणतातच पॅराडाईज. पुराणांमध्ये ‘पॅराडाईज’ शब्द आलेला आहे. असे म्हणतात -
मानसरोवरामध्ये पऱ्या राहत होत्या. त्यामध्ये कोणी डुबकी मारली तर परी बनत असे.
वास्तविक आहे ज्ञान मानसरोवर. त्यामध्ये तुम्ही कशापासून काय बनता. सुंदर असणाऱ्याला
परी म्हणतात, असे नाही की पंख असणारी कोणती परी असते. जसे तुम्हा पांडवांना महावीर
म्हटले जाते, त्यांनी मग पांडवांची खूप भली मोठी चित्रे, गुहा इत्यादी दाखवल्या
आहेत. भक्तीमार्गामध्ये किती पैसे बरबाद करतात. बाबा म्हणतात मी तर मुलांना किती
श्रीमंत बनवले. तुम्ही इतक्या सर्व पैशांचे काय केले. भारत किती श्रीमंत होता. आता
भारताची काय हालत झाली आहे. जो १०० टक्के सॉल्व्हंट (पवित्र) होता, आता १०० टक्के
इनसॉल्व्हंट (अपवित्र) बनला आहे. आता तुम्हा मुलांना किती तयारी केली पाहिजे. मुले
इत्यादींना देखील हेच सांगायचे आहे की, शिवबाबांची आठवण करा तर तुम्ही
श्रीकृष्णासारखे बनाल. तुम्हा मुलांना किती आनंद झाला पाहिजे, परंतु अपार आनंद
त्यांनाच होईल जे सदैव दुसऱ्यांच्या सेवेमध्ये राहतात. मुख्य धारणा आहे वर्तन अतिशय
रॉयल असावे. खान-पान खूप सुंदर असावे. तुम्हा मुलांकडे जेव्हा कोणी येतात तर त्यांची
हरप्रकारे सेवा केली पाहिजे. स्थूल देखील तर सूक्ष्म देखील. भौतिक आणि रुहानी दोन्ही
केल्यामुळे खूप आनंद होईल. कोणीही आला तर त्याला तुम्ही खरी सत्यनारायणाच कहाणी ऐकवा.
शास्त्रांमध्ये तर काय-काय कहाण्या लिहिल्या आहेत. विष्णूच्या नाभीतून ब्रह्मा
निघाला मग ब्रह्माच्या हातामध्ये शास्त्रे दिली आहेत. आता विष्णूच्या नाभीतून
ब्रह्मा कसे निघतात, किती मोठे रहस्य आहे. इतर कोणीही या गोष्टींना अजिबात समजू
शकणार नाही. नाभीतून निघण्याची तर गोष्टच नाही. ब्रह्मा सो विष्णू, विष्णू सो
ब्रह्मा बनतात. ब्रह्माला विष्णू बनण्यामध्ये सेकंद लागतो. सेकंदामध्ये जीवनमुक्ती
म्हटले जाते. बाबांनी ब्रह्माबाबांना साक्षात्कार घडवला - ‘तू विष्णूचे रूप बनतोस’.
सेकंदामध्ये निश्चय झाला. विनाशाचा देखील साक्षात्कार झाला, नाही तर कलकत्त्यामध्ये
जणू राजेशाही थाटामध्ये राहत होते. कसलीच चिंता नव्हती. खूप रॉयल्टीने राहत होते.
आता बाबा तुम्हाला हा ज्ञान रत्नांचा व्यापार शिकवतात. तो व्यापार तर याच्यापुढे
काहीच नाही. परंतु यांच्या (ब्रह्माबाबांच्या) पार्टमध्ये आणि तुमच्या पार्टमध्ये
फरक आहे. बाबांनी यांच्यामध्ये प्रवेश केला आणि एका झटक्यात सर्व सोडून दिले. भट्टी
बनणार होती. तुम्ही देखील सर्व काही सोडले. नदी पार करून भट्टीमध्ये येऊन बसलात.
काय-काय झाले, कशाचीच पर्वा नव्हती. असे म्हणतात - श्रीकृष्णाने पळवून नेले? का
पळवून नेले. त्यांना पट्टराणी बनविण्यासाठी. ही भट्टी देखील बनली, तुम्हा मुलांना
स्वर्गाची महाराणी बनविण्यासाठी. शास्त्रांमध्ये तर काय-काय लिहिले आहे,
प्रॅक्टिकलमध्ये काय-काय आहे. ते तर आता तुम्हाला समजले आहे. पळवून नेण्याची तर
गोष्टच नाही. कल्पापूर्वी देखील शिव्या मिळाल्या होत्या. नाव बदनाम झाले होते. हा
तर ड्रामा आहे, जे काही होते ते कल्पापूर्वीप्रमाणे.
आता तुम्ही चांगल्या
रीतीने जाणता कल्पापूर्वी ज्यांनी राज्य घेतले होते ते जरूर येतील. बाबा म्हणतात -
मी देखील कल्प-कल्प येऊन भारताला स्वर्ग बनवतो. पूर्ण ८४ जन्मांचा हिशोब सांगितला
आहे. सतयुगामध्ये तुम्ही अमर राहता. तिथे अकाली मृत्यू होत नाही. शिवबाबा काळावर
विजय प्राप्त करून देतात. म्हणतात - मी काळांचाही काळ आहे. कहाण्या देखील आहेत ना.
तुम्ही काळावर विजय प्राप्त करता. तुम्ही अमरलोक मध्ये जाता. अमरलोक मध्ये उच्चपद
प्राप्त करण्यासाठी एकतर पवित्र बनायचे आहे, दुसरे मग दैवी गुण देखील धारण करायचे
आहेत. आपला रोज पोतामेल ठेवा. रावणाद्वारे तुमचा घाटा झाला आहे. माझ्याद्वारे फायदा
होतो. व्यापारी लोक या गोष्टींना चांगल्या रीतीने समजून घेतील. ही आहेत ज्ञान-रत्ने.
कोणी विरळा व्यापारी याचा व्यापार करेल. तुम्ही व्यापार करण्यासाठी आला आहात. कोणी
तर चांगल्या रीतीने व्यापार करून स्वर्गाचा सौदा २१ जन्मांसाठी घेतात. २१ जन्म तर
काय ५०-६० जन्म तुम्ही अतिशय सुखात राहता. पद्मपती बनता. देवतांच्या पावलांमध्ये
पद्म दाखवतात ना. अर्थ थोडाच समजतात. तुम्ही आता पद्मपती बनत आहात. तर तुम्हाला किती
आनंद झाला पाहिजे. बाबा म्हणतात मी किती साधारण आहे. तुम्हा मुलांना स्वर्गामध्ये
घेऊन जाण्यासाठी आलो आहे. बोलावता देखील - हे पतित-पावन या, येऊन पावन बनवा. पावन
रहातातच मुळी सुखधाममध्ये. शांतीधामचा काही इतिहास-भूगोल तर असू शकत नाही. ते तर
आत्म्यांचे झाड आहे. सूक्ष्मवतनची कोणती गोष्टच नाही. बाकी हे सृष्टीचक्र कसे फिरते
ते तुम्ही जाणले आहे. सतयुगामध्ये लक्ष्मी-नारायणाची डायनेस्टी होती (घराणे होते).
असे नाही, फक्त एकच लक्ष्मी-नारायण राज्य करतात. वृद्धी तर होते ना. मग द्वापरमध्ये
तेच पूज्य सो मग पुजारी बनतात. मनुष्य मग परमात्म्यासाठी म्हणतात - आपेही पूज्य. जसे
परमात्म्याला सर्वव्यापी म्हणतात, या गोष्टींना तुम्ही समजू शकता. अर्धे कल्प तुम्ही
गात आला आहात - ‘उच्च ते उच्च भगवान’ आणि आता भगवानुवाच - ‘उच्च ते उच्च मुले आहात’.
तर अशा बाबांच्या सल्ल्यानुसार चालले देखील पाहिजे ना. गृहस्थ व्यवहार देखील
सांभाळायचा आहे. सगळेच काही इथे राहू शकणार नाहीत. सर्वजण राहू लागले तर किती मोठे
घर बनवावे लागेल. हे देखील तुम्ही एक दिवस बघाल की खालपासून वरपर्यंत किती मोठी
रांग लागलेली असेल, दर्शन करण्यासाठी. कोणाला दर्शन झाले नाही तर अपशब्द देखील बोलू
लागतात. त्यांना वाटते की महात्म्याचे दर्शन करावे. आता बाबा तर आहेत मुलांचे.
मुलांनाच शिकवतात. तुम्ही ज्यांना रस्ता सांगता तर कोणी मग चांगल्या रीतीने चालू
लागतात आणि कोणी तर धारणाच करू शकत नाहीत, असे कितीतरी आहेत जे ऐकतात देखील आणि मग
बाहेर जातात तर पुन्हा जसे आहेत तसेच बनतात, तो आनंद नाही, अभ्यास नाही, योग नाही.
बाबा किती समजावून सांगतात, चार्ट ठेवा. नाहीतर खूप पश्चाताप करावा लागेल. आपण
बाबांची किती आठवण करतो, चार्ट बघितला पाहिजे. भारताच्या प्राचीन योगाची खूप महिमा
आहे. तर बाबा समजावून सांगत आहेत - कोणतीही गोष्ट समजली नाही तर बाबांना विचारा. आधी
तुम्ही काहीच जाणत नव्हता. बाबा म्हणतात - हे आहे काट्यांचे जंगल. काम महाशत्रू आहे.
हे शब्द खुद्द गीतेमधील आहेत. गीता वाचत होते परंतु काही समजत थोडेच होते. बाबांनी
(ब्रह्मा बाबांनी) पूर्ण आयुष्य गीता वाचली. समजत होते - गीतेचे महात्म्य खूप चांगले
आहे. भक्तीमार्गामध्ये गीतेचा किती मान आहे. गीता मोठी देखील असते, छोटी देखील असते.
श्रीकृष्ण इत्यादी देवतांची तीच चित्रे पैशा-पैशाला मिळत असतात, त्याच चित्रांची मग
किती मोठी-मोठी मंदिरे बनवतात. तर बाबा समजावून सांगतात - तुम्हाला तर विजयी माळेचा
मणी बनायचे आहे. अशा गोड-गोड बाबांना ‘बाबा-बाबा’ देखील म्हणतात. समजतात देखील की
हे स्वर्गाची राजाई देतात तरी देखील सुनन्ती, कथन्ती अहो माया सोडचिठ्ठी देवन्ती.
बाबा म्हटले तर बाबा अर्थात बाबा. भक्तीमार्गामध्ये गायले जाते - पतींचाही पती,
गुरूंचाही गुरु एकच आहे. ते आमचे पिता आहेत. ज्ञानाचा सागर पतित-पावन आहेत. तुम्ही
मुले म्हणता - बाबा आम्ही कल्प-कल्प तुमच्याकडून वारसा घेत आलो आहोत. कल्प-कल्प
भेटतो. तुम्हा बेहदच्या बाबांकडून आम्हाला जरूर बेहदचा वारसा मिळेल. मुख्य आहेच
अल्फ (बाबा). त्यामध्ये बे (बादशाही) मर्ज आहे. बाबा अर्थात वारसा. तो आहे हदचा, हा
आहे बेहदचा. हदचे बाबा तर पुष्कळ आहेत. बेहदचे बाबा तर एकच आहेत. अच्छा!
गोड-गोड ५०००
वर्षानंतर परत येऊन भेटणाऱ्या मुलांप्रती बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) स्थूल,
सूक्ष्म सेवा करून अपार आनंदाचा अनुभव करायचा आहे आणि करवायचा आहे. आपले वर्तन आणि
खाणे-पिणे यामध्ये खूप रॉयल्टी ठेवायची आहे.
२) अमरलोक मध्ये उच्च
पद प्राप्त करण्यासाठी पवित्र बनण्यासोबतच दैवी गुण देखील धारण करायचे आहेत. आपला
पोतामेल बघायचा आहे की आपण बाबांची किती आठवण करतो? अविनाशी ज्ञान रत्नांची कमाई जमा
करत आहोत? कान पवित्र बनले आहेत ज्यामध्ये धारणा होऊ शकेल?
वरदान:-
सेवा करत
असताना आठवणीच्या अनुभवांची शर्यत करणारे सदा लवलीन आत्मा भव
आठवणीमध्ये राहता
परंतु आठवणीद्वारे ज्या प्राप्ती होतात, त्या प्राप्तींच्या अनुभूतीला पुढे वाढवत
जा, यासाठी आता विशेष वेळ आणि अटेंशन द्या ज्यामुळे समजेल की ही अनुभवांच्या
सागरामध्ये हरवून गेलेली लवलीन आत्मा आहे. जसे पवित्रता, शांतीच्या वातावरणाची भासना
येते तसे श्रेष्ठ योगी, प्रेमामध्ये मग्न राहणारे - असा अनुभव व्हावा. नॉलेजचा
प्रभाव आहे परंतु योगाच्या सिद्धी स्वरूपाचा प्रभाव पडावा. सेवा करत असताना
आठवणीच्या अनुभवांमध्ये बुडून रहा, आठवणीच्या यात्रेच्या अनुभवांची शर्यत लावा.
बोधवाक्य:-
सिद्धीला
स्वीकारणे अर्थात भविष्य प्रारब्धाला इथेच समाप्त करणे आहे.
अव्यक्त इशारे -
संकल्पांची शक्ती जमा करून श्रेष्ठ सेवेच्या निमित्त बना:-
जितके-जितके तुम्ही
मुले श्रेष्ठ संकल्पाच्या शक्तीने संपन्न बनत जाल तितके श्रेष्ठ संकल्पाच्या
शक्तिशाली सेवेचे स्वरूप स्पष्ट दिसून येईल. प्रत्येकजण अनुभव करेल की आपल्याला कोणी
बोलावत आहे, कोणा दिव्य बुद्धीद्वारे, शुभ संकल्पाचे बोलावणे येत आहे. कोणी मग
दिव्य दृष्टीद्वारे बाबांना आणि स्थानाला बघतील. दोन्ही प्रकारच्या अनुभवांद्वारे
खूप तीव्र गतीने आपल्या श्रेष्ठ स्थानावर पोहोचतील.