08-09-24    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   15.12.2001  ओम शान्ति   मधुबन


एकव्रता बनून पवित्रतेच्या धारणेद्वारे आत्मिक स्थितीमध्ये राहून मनसा सेवा करा


आज रुहानी बाबा चोहो बाजूच्या रुहानी मुलांच्या रूहानियतला (आत्मिक स्थितीला) बघत आहेत. प्रत्येक मुलामध्ये रूहानियतची झलक किती आहे? रूहानियत नेत्रांद्वारे प्रत्यक्ष होते. रूहानियतची शक्ती असणारी आत्मा सदैव नेत्रांद्वारे इतरांना देखील आत्मिक शक्ती देते. आत्मिक हास्य इतरांना देखील आनंदाची अनुभूती करविते. त्यांचे वर्तन, चेहरा फरिश्त्यासमान डबल लाईट दिसतो. अशा रुहानियतचा आधार आहे - पवित्रता. जितकी-जितकी मन-वाणी-कर्मामध्ये पवित्रता असेल तितकीच रूहानियत दिसून येईल. पवित्रता ब्राह्मण जीवनाचा शृंगार आहे. पवित्रता ब्राह्मण जीवनाची मर्यादा आहे. तर बापदादा प्रत्येक मुलाच्या पवित्रतेच्या आधारावर रूहानियतला बघत आहेत. रुहानी स्थितीवाली आत्मा या लोकमध्ये राहत असताना देखील अलौकिक फरिश्त्यासमान दिसून येईल.

तर स्वतःला बघा, चेक करा - माझ्या संकल्पामध्ये, बोलमध्ये रूहानियत आहे? रूहानी संकल्प स्वतःमध्ये देखील शक्ति भरतात आणि दुसऱ्यांना देखील शक्ती देतात. ज्याला दुसऱ्या शब्दांमध्ये म्हणता - ‘रूहानी संकल्प मनसा सेवेसाठी निमित्त बनतात’. रूहानी बोल स्वतःला आणि दुसऱ्यांना सुखाचा अनुभव करवतात. शांतीचा अनुभव करवतात. एक ‘रूहानी’ शब्द अन्य आत्म्यांना त्यांच्या जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी आधार बनतो. रूहानी बोल बोलणारा वरदानी आत्मा बनतो. रूहानी कर्म सहजच स्वतःला देखील कर्मयोगी स्थितीचा अनुभव करवितो आणि दुसऱ्यांना देखील कर्मयोगी बनविण्याचे एक उदाहरण बनतात. जे कोणी त्यांच्या संपर्कामध्ये येतात ते सहजयोगी, कर्मयोगी जीवनाचे अनुभवी बनतात. परंतु सांगितले आहे, रूहानियतचे (आत्मिक स्थितीचे) बीज आहे - पवित्रता. पवित्रता स्वप्नामध्ये देखील भंग होऊ नये तेव्हा रूहानियत दिसून येईल. पवित्रता केवळ ब्रह्मचर्य नव्हे, परंतु प्रत्येक शब्द - ब्रह्माचारी असावा, प्रत्येक संकल्प - ब्रह्माचारी असावा, प्रत्येक कर्म - ब्रह्माचारी असावे. जसे लौकिकमध्ये काही-काही मुलांचा चेहरा वडिलांसारखा असतो तर म्हटले जाते कि हा तर वडिलांसारखाच दिसतो. तसे ब्रह्माचारी ब्राह्मण-आत्म्याच्या चेहऱ्यावर रूहानियतच्या आधारावर ब्रह्माबापसमान अनुभव व्हावा. जेणेकरून संपर्कामधील आत्मे अनुभव करतील की, हे तर पित्यासारखेच आहेत. चला १०० टक्के जरी नसले तरी देखील वेळेनुसार किती परसेंट दिसायला हवे? कुठेपर्यंत पोहोचले आहात? ७५ परसेंट, ८० परसेंट, ९० परसेंट, कुठेपर्यंत पोहोचले आहात? या समोर पुढच्या लाईनने सांगा, बघा बसण्यामध्ये तर तुम्हाला पुढे नंबर मिळाला आहे. तर ब्रह्माचारी बनण्यामध्ये देखील पुढचा नंबर असणार ना! पुढे आहे कि नाही?

बापदादा प्रत्येक मुलाच्या पवित्रतेच्या आधारावर रूहानियत पाहू इच्छितात. बापदादांकडे सर्वांचा चार्ट आहे. बोलत नाहीत परंतु चार्ट आहे, काय-काय करतात, कसे करतात, बापदादांकडे सगळा चार्ट आहे. पवित्रतेमध्येसुद्धा अजूनही काही-काही मुलांची परसेंटेज खूप कमी आहे. समयानुसार विश्वातील आत्मे तुम्हा आत्म्यांना रूहानियतचे (आत्मिक स्थितीचे) उदाहरण म्हणून पाहू इच्छितात. याचे सहज साधन आहे - फक्त एक शब्द लक्षात ठेवा, पुन्हा-पुन्हा त्या एका शब्दाला आपली आपणच अंडरलाईन करा, तो एक शब्द आहे - ‘एकव्रता भव’. जिथे ‘एक’ आहे तिथे एकाग्रता आपोआपच येते. आपोआप अचल, अडोल बनतात. ‘एकव्रता’, बनल्यामुळे एकमतावर चालणे खूप सोपे होते. जर आहेतच एकव्रता त्यामुळे एकाच्या मताद्वारे सहजच सद्गती एकमती (सुकर) होते. आपोआप एकरस स्थिती बनते. तर चेक करा - मी ‘एकव्रता’ आहे का? पूर्ण दिवसभरामध्ये मन-बुद्धी एकव्रता राहते का? आकडेमोड करताना देखील गणतीची सुरुवात ‘एक’ पासून सुरु होते. एक बिंदू (एक शून्य) आणि एक अंक, एक आकडा लिहित जा, एक बिंदू लिहित जा तर किती वाढत जाईल! म्हणजे बाकी काहीही आठवत नसेल, तरी एक शब्द तर लक्षात राहील ना! तुम्हा एकव्रता आत्म्यांना काळ आणि आत्मे हाक मारत आहेत. तर, हे देव आत्म्यांनो, काळाची हाक, आत्म्यांची हाक ऐकू येत नाही का? प्रकृती देखील तुम्हा प्रकृतिपतींना पाहून बोलावत आहे - हे प्रकृतिपती आत्म्यांनो, आता परिवर्तन करा. हे तर मधे-मधे छोटे-छोटे धक्के बसतच आहेत. बिचाऱ्या आत्म्यांना पुन्हा-पुन्हा दुःखाचे, भीतीचे धक्के खायला लावू नका. मुक्ति देणाऱ्या आत्म्यांनो, मास्टर मुक्तिदाता या आत्म्यांना तुम्ही मुक्ति कधी देणार? काय मनामध्ये दया येत नाही? का बातम्या ऐकून गप्प बसता, बस्स, ऐकले आणि काम संपले; त्यामुळे बापदादा प्रत्येक मुलाचे आता मर्सिफुल (दयाळू) स्वरूप पाहू इच्छित आहेत. आपल्या हदच्या गोष्टी आता सोडून द्या, दयाळू बना. मनसा सेवेमध्ये लागा. सकाश द्या, शांती द्या, आधार द्या. जर दयाळू बनून इतरांना आधार देण्यामध्ये बिझी रहाल तर हदच्या आकर्षणांपासून, हदच्या गोष्टींपासून आपोआप दूर रहाल. मेहनत करण्यापासून वाचाल. वाणीद्वारे सेवेकरिता खूप वेळ दिलात, वेळ सफल केलात, संदेश दिलात. आत्म्यांना संबंध-संपर्कामध्ये आणलेत, ड्रामानुसार आतापर्यंत जे केले ते खूप चांगले केले. परंतु आता वाणी सोबतच मनसा सेवेची जास्त गरज आहे. आणि ही मनसा सेवा प्रत्येक नवा, जुना, महारथी, घोडेस्वार, प्यादे सर्वजण करू शकतात. यामध्ये मोठे करतील, आम्ही तर छोटे आहोत, आम्ही तर आजारी आहोत, आम्ही तर साधन-सुविधावाले नाही... असा कोणताही आधार घ्यायचा नाही. हे छोटी-छोटी मुले सुद्धा करू शकतात. मुलांनो, मनसा सेवा करू शकता ना? (हो बाबा) त्यामुळे आता वाणी आणि मनसा सेवेचा बॅलन्स ठेवा. मनसा सेवेचा तुम्हा करणाऱ्यांना देखील खूप फायदा आहे. तो कसा? ज्या आत्म्याला मनसा सेवेद्वारे अर्थात संकल्पाद्वारे शक्ती द्याल, सकाश द्याल ती आत्मा तुम्हाला आशीर्वाद देईल. आणि तुमच्या खात्यामध्ये तुमचा स्वतःचा पुरुषार्थ तर आहेच परंतु आशीर्वादांचे खाते देखील जमा होईल. तर तुमचे जमेचे खाते दुपटीने वाढत जाईल, त्यामुळे भले नवीन आहेत, नाहीतर जुने आहेत, कारण या वेळी नवीन भरपूर आले आहेत ना! नवीन जे पहिल्यांदा आले आहेत, त्यांनी हात वर करा. पहिल्यांदा आलेल्या मुलांना देखील बापदादा विचारत आहेत की, ‘तुम्ही आत्मे मनसा सेवा करू शकता का?’ (बापदादांनी पांडवांना, मातांना सर्वांना वेगळे-वेगळे विचारले की, तुम्ही मनसा सेवा करू शकता का?) हा तर खूप चांगला हात वर केला, भले कोणी टी.व्ही. वर बघत-ऐकत आहेत, तर कोणी सन्मुख ऐकत आहेत, आता बापदादा सर्व मुलांना ही जबाबदारी देत आहेत कि रोज संपूर्ण दिवसभरामध्ये यथार्थरित्या किती तास मनसा सेवा केली, त्याचा प्रत्येकाने आपल्याकडे चार्ट ठेवा. असे म्हणू नका - ‘हो केली’; तुम्ही नेमकी किती तास मनसा सेवा केली, त्याचा प्रत्येकाने चार्ट ठेवा. नंतर बापदादा अचानक चार्ट मागवतील. तारीख सांगणार नाहीत. अचानक मागवणार, बघणार कि जबाबदारीचा ताज घातला आहे कि हलत राहिला आहे? जबाबदारीचा ताज घालायचा आहे ना! टीचर्सनी तर जबाबदारीचा ताज घातलेला आहे ना! आता त्यामध्ये हे ॲड करा. ठीक आहे ना! डबल फॉरेनर्स हात वर करा. हा जबाबदारीचा ताज आवडला असेल, तर असा हात वर करा. टीचर्सनी सुद्धा हात वर करा, तुम्हाला पाहून सर्वांना प्रेरणा मिळेल. तर चार्ट ठेवणार ना? अच्छा, बापदादा अचानक एक दिवस विचारणार, आपला-आपला चार्ट लिहून पाठवा, मग बघतील कारण वर्तमान समयी याची खूप आवश्यकता आहे. आपल्या परिवाराचे दुःख, यातना तुम्ही बघू शकता! बघू शकता? दुःखी आत्म्यांना एक ओंजळभर तरी द्या. जे तुमचे गाणे आहे - ‘एक बूंद की प्यासी हैं हम…’. आताच्या काळात सुख-शांतीच्या एका थेंबासाठी आत्मे तहानलेले आहेत. सुख-शांतिच्या अमृताचा एक थेंब मिळाला तरी सुद्धा आनंदी होतील. बापदादा पुन्हा-पुन्हा सांगत आहेत - वेळ तुमची वाट पाहत आहे. ब्रह्माबाबा आपल्या घराचे गेट उघडण्याची वाट पाहत आहेत. प्रकृती तीव्र गतीने सफाई करण्याची वाट पाहत आहे. तर हे फरिश्त्यांनो आता आपल्या डबल लाईटद्वारे प्रतिक्षा समाप्त करा. ‘एव्हररेडी’ शब्द तर सर्व बोलता परंतु ‘संपन्न’ आणि ‘संपूर्ण’ बनण्यामध्ये एव्हररेडी बनले आहात? फक्त शरीर सोडण्यासाठी एव्हररेडी बनायचे नाहीये, परंतु बापसमान बनून जाण्यामध्ये एव्हररेडी बनायचे आहे.

हे मधुबनचे सर्वजण पुढे बसतात, चांगले आहे. सेवा देखील करतात. मधुबनवाले एव्हररेडी आहात? हसत आहेत, अच्छा, पहिल्या लाइनमधले महारथी एव्हररेडी आहात? बापसमान बनण्यामध्ये एव्हररेडी आहात? असेच गेलात तर ॲडव्हान्स पार्टीमध्ये जाल. एडव्हान्स पार्टी तर इच्छा नसतानाही वाढत जात आहे. आता वाणी आणि मनसा सेवेच्या बॅलन्समध्ये बिझी झालात तर ब्लेसिंग (आशीर्वाद) खूप मिळतील. डबल खाते जमा होईल - पुरुषार्थाचे सुद्धा आणि आशीर्वादांचे सुद्धा. तर संकल्पा द्वारे, बोल द्वारे, वाणी द्वारे, कर्मा द्वारे, संबंध-संपर्काद्वारे दुवा द्या आणि दुवा घ्या. एकच काम करा, फक्त दुवा (आशीर्वाद) द्या. भले कोणी शाप जरी दिले तरी देखील तुम्ही आशीर्वाद द्या कारण तुम्ही आशीर्वादांच्या सागराची मुले आहात. कोणी नाराज झाले तरी तुम्ही नाराज होऊ नका. तुम्ही राजी (आनंदी) रहा. असे होऊ शकते का? शंभरजण तुम्हाला नाराज करतील आणि तुम्ही आनंदी रहा, हे होऊ शकते? होऊ शकते? दुसऱ्या लाईन मधले सांगा, हे होऊ शकते का? आता अजूनच नाराज करतील, बघा! पेपर तर येणार ना. माया सुद्धा ऐकत आहे ना! बस हे व्रत घ्या, दृढ संकल्प करा - “मला दुवा द्यायच्या आहेत आणि घ्यायच्या आहेत, बस्स”. हे होऊ शकते? माया भले नाराज करू दे! तुम्ही तर आनंद देणारे आहात ना? तर एकच काम करा बस्स. नाराज ना व्हायचे आहे, ना करायचे आहे. त्याला करायचे असेल तर तो करू देत, मी नाराज होणार नाही. आम्ही ना करणार, ना होणार. प्रत्येकाने आपली जबाबदारी घ्या. दुसऱ्याला पाहू नका, ही करते, हा करतो; आम्ही साक्षी होऊन खेळ बघणारे आहोत, फक्त आनंदाचा खेळ बघणार काय, मध्ये-मध्ये दुःखाचा खेळ सुद्धा बघितला पाहिजे ना. परंतु प्रत्येकाने स्वतःला आनंदी ठेवा.

माता, पांडव हे होऊ शकते का? बापदादा नकाशा बघतील. बापदादांकडे खूप मोठा टी.व्ही. आहे, खूप मोठा आहे. प्रत्येकाला बघू शकतात, कोणत्या वेळी कोण काय करत आहे, बापदादा बघतात परंतु बोलत नाहीत, तुम्हाला सांगत नाहीत. बाकी रंग खूप बघतात. लपून-छपून काय करता ते देखील बघतात. मुलांमध्ये चतुराई देखील खूप आहे ना! खूप चतुर आहेत. जर बापदादांनी मुलांची चतुराई ऐकवली ना तर ऐकूनच तुम्ही थोडा विचार करू लागाल म्हणून ऐकवत नाहीत. तुम्हाला विचारात कशाला पाडायचे. परंतु करतात खूप हुशारीने. जर सर्वात हुशार बघायचा असेल तरी देखील ब्राह्मणांमध्ये बघा. परंतु आता कशामध्ये हुशार बनणार? मनसा सेवेमध्ये. पुढचा नंबर घ्या, मागे राहू नका; यामध्ये कोणतीही सबब राहत नाही. ‘वेळ मिळत नाही, चान्स मिळत नाही, तब्येत ठीक नाही, मला विचारलेच नाही’, यातील कोणतीही सबबच नाही. सर्वजण करू शकता. मुलांनी धावण्याच्या शर्यतीचा खेळ खेळला आहे ना, आता यामध्ये शर्यत लावा. मनसा सेवेमध्ये धाव घ्या. अच्छा.

कर्नाटकचा टर्न आहे - कर्नाटकवाले जे सेवेमध्ये आले आहेत, त्यांनी उभे रहा. इतके सर्व सेवेमध्ये आले आहेत. चांगले आहे, हा देखील सोपा श्रेष्ठ पुण्य जमा करण्याचा गोल्डन चान्स मिळतो. भक्तीमध्ये म्हटले जाते - ‘एका ब्राह्मणाची जरी सेवा कराल तरी खूप मोठे पुण्य मिळते’. आणि इथे किती खऱ्या ब्राह्मणांची सेवा करत आहात. तर हा चांगला चान्स मिळतो आहे ना! चांगले वाटले कि थकायला झाले? थकलात तर नाही! मजा आली ना! जर साफ मनाने पुण्य समजून सेवा केली तर त्याचे प्रत्यक्ष फळ आहे - त्याला थकवा जाणवणार नाही, आनंद होईल. हे पुण्य जमा झाल्याचे प्रत्यक्ष फळ अनुभवास येईल. जर थोडेजरी कोणत्या कारणाने थकायला होत असेल किंवा थोडीशी जाणीव होत असेल तर समजा साफ मनाने सेवा केलेली नाही आहे. सेवा अर्थात प्रत्यक्ष फळ, मेवा. सेवा करत नाही परंतु मेवा खाता. तर कर्नाटकच्या सर्व सेवाधारींनी आपल्या चांगल्या सेवेचा पार्ट बजावला आणि सेवेचे फळ खाल्ले.

अच्छा सर्व टीचर्स ठीक आहेत. टीचर्सना तर किती वेळा सीझनमध्ये टर्न मिळतो. हा टर्न मिळणे देखील भाग्याचे लक्षण आहे. आता टीचर्सना मनसा सेवेमध्ये शर्यत लावायची आहे. परंतु असे करू नका कि संपूर्ण दिवस बसून रहाल की, ‘मी मनसा सेवा करत आहे’. कोणी कोर्स करण्यासाठी आला आणि तुम्ही म्हणाल - नाही, ‘नाही मी तर मनसा सेवा करत आहे’. जेव्हा कर्मयोगाचा वेळ येईल तेव्हा म्हणाल - ‘मनसा सेवा करत आहे’, नाही. बॅलन्स पाहिजे. काहींना मग जास्तच नशा चढतो ना! तर असा नशा चढवू नका. बॅलन्सद्वारे ब्लेसिंग आहेत. बॅलन्स नाही तर ब्लेसिंग नाही. अच्छा.

आता सर्वांनी एका सेकंदामध्ये मनसा सेवेचा अनुभव करा. आत्म्यांना शांती आणि शक्तीची एक ओंजळ द्या. अच्छा.

चोहो बाजूंच्या सर्व श्रेष्ठ रुहानियतचा अनुभव करविणाऱ्या रुहानी आत्म्यांना, संकल्प आणि स्वप्नामध्ये देखील पवित्रतेचा पाठ गिरवणाऱ्या सर्व ब्रह्माचारी मुलांना, सर्व दृढ संकल्पधारी, मनसा सेवाधारी तीव्र पुरुषार्थी आत्म्यांना, सदैव दुवा देणाऱ्या आणि घेणाऱ्या पुण्य आत्म्यांना बापदादांची, दिलाराम बाबांची दिल आणि जान, सिक आणि प्रेम सहित प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.

(दादी जी, दादी जानकीजीं सोबत वैयक्तिक संवाद)

बापदादांनी त्रिमूर्ति ब्रह्माचे दृश्य दाखवले. तुम्ही सर्वांनी बघितले का? कारण बापसमान, बाबांच्या प्रत्येक कार्यामध्ये सोबती आहात ना! म्हणून हे दृश्य दाखवले. बापदादांनी तुम्हा दोघींना विशेष पॉवर्सची विल केली आहे. विल पॉवर सुद्धा दिली आणि पॉवर्सची विल देखील केली, म्हणून त्या पॉवर्स आपले काम करत आहेत. करावनहार करून घेत आहेत, आणि तुम्ही निमित्त बनून करत आहात. मजा येत आहे ना! करन करावनहार बाबा करवून घेत आहेत, म्हणून करणारे करत आहेत, तुम्ही निश्चिंत होऊन करत आहात. काळजी राहत नाही ना! निश्चिंत बादशहा. अच्छा. तब्येतीचे सुद्धा नॉलेजफुल, थोडी-थोडी खोडसाळपणा करते. यामध्ये देखील नॉलेजफुल बनायलाच पाहिजे कारण सेवा खूप करायची आहे ना. तर तब्येत देखील साथ देते; म्हणजेच डबल नॉलेजफुल. अच्छा, ओम् शांती.

वरदान:-
ईश्वरीय संगतीमध्ये राहून चुकीच्या संगतीच्या वारापासून वाचणारे सदा काळचे सतसंगी भव

कशीही खराब संगत असो परंतु तुमची श्रेष्ठ संगत त्याच्या पुढे कित्येक पटीने शक्तिशाली आहे. ईश्वरीय संगतीच्या समोर ती संगत काहीच नाही. सर्व कमजोर आहेत. परंतु जेव्हा स्वतः कमजोर बनता तेव्हा चुकीच्या संगतीचा वार होतो. जे सदैव एका बाबांच्या संगतीमध्ये राहतात अर्थात सदा काळचे सतसंगी आहेत ते इतर कोणत्या संगतीच्या रंगामध्ये प्रभावित होऊ शकत नाहीत. व्यर्थ गोष्टी, व्यर्थ संगत अर्थात कु-संगत त्यांना आकर्षित करू शकत नाही.

सुविचार:-
वाईटाला देखील चांगल्यामध्ये परिवर्तन करणारेच प्रसन्नचित्त राहू शकतात.