08-09-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - पुण्य आत्मा बनण्याकरिता जितके होईल तितके चांगले कर्म करा, ऑलराऊंडर
बना, दैवी गुण धारण करा”
प्रश्न:-
कोणती मेहनत
केल्याने तुम्ही मुले पद्मा-पदमपती बनता?
उत्तर:-
सर्वात मोठी मेहनत आहे विकारी दृष्टीला पवित्र दृष्टी बनविणे. डोळेच खूप धोका देतात.
डोळ्यांना पवित्र बनविण्याकरिता बाबांनी युक्ती सांगितली आहे की मुलांनो आत्मिक
दृष्टीने पहा. देहाला पाहू नका. मी आत्मा आहे, हा अभ्यास पक्का करा, याच
मेहनतीद्वारे तुम्ही जन्म-जन्मांतरासाठी पद्मपती बनाल.
गीत:-
धीरज धर मनुवा…
ओम शांती।
हे कोणी म्हटले? शिवबाबांनी शरीराद्वारे म्हटले. कोणतीही आत्मा शरीराशिवाय बोलू शकत
नाही. बाबा देखील शरीरामध्ये प्रवेश करून आत्म्यांना समजावून सांगतात - मुलांनो, आता
तुमचे शारीरिक कनेक्शन नाहीये. हे आहे रूहानी कनेक्शन. आत्म्याला ज्ञान मिळते -
परमपिता परमात्म्याकडून. जे पण देहधारी आहेत, सर्व शिकत आहेत. बाबांना तर स्वत:चा
देह नाही आहे. तर थोड्या वेळासाठी याचा (ब्रह्मा तनाचा) आधार घेतला आहे. आता बाबा
म्हणतात - ‘स्वतःला आत्मा निश्चय करून बसा’. बेहदचे बाबा आम्हा आत्म्यांना समजावून
सांगत आहेत. त्यांच्याशिवाय असे कोणीही समजावून सांगू शकत नाही. आत्मा, आत्म्याला
कशी समजावून सांगेल. आत्म्यांना समजावून सांगणारा परमात्मा पाहिजे. त्यांना कोणीही
जाणत नाही. त्रिमूर्तीमधून देखील शिवाला गायब केले आहे. ब्रह्माद्वारे स्थापना कोण
करतील. ब्रह्मा काही नवीन दुनियेचे रचयिता नाही आहेत. बेहदचे पिता रचयिता सर्वांचे
एकच शिवबाबा आहेत. ब्रह्मा देखील फक्त आताच तुमचा पिता आहे पुन्हा नसणार. तिथे तर
लौकिक पिताच असतो. कलियुगामध्ये असतात लौकिक आणि पारलौकिक. आता संगमावर लौकिक,
अलौकिक आणि पारलौकिक तीन पिता आहेत. बाबा म्हणतात - सुखधाममध्ये माझी कोणी आठवणच
करत नाही. विश्वाचा मालक बाबांनी बनवले मग ओरडतील कशाला? तिथे इतर कोणतेही खंड
नसतात. केवळ सूर्यवंशीच असतात. चंद्रवंशी देखील नंतर येतात. आता बाबा म्हणतात -
‘मुलांनो, धीर धरा, बाकी थोडे दिवस बाकी आहेत. पुरुषार्थ चांगल्या रीतीने करा. दैवी
गुण धारण केले नाहीत तर पद देखील भ्रष्ट होईल. ही खूप मोठी लॉटरी आहे. बॅरिस्टर,
सर्जन इत्यादी बनणे देखील लॉटरी आहे ना. खूप पैसे कमावतात. अनेकांवर हुकूम गाजवतात.
जे चांगल्या रीतीने शिकतात आणि शिकवतात, ते उच्च पद प्राप्त करतील. बाबांची आठवण
केल्याने विकर्म विनाश होतील. बाबांना देखील घडोघडी विसरून जातात. माया आठवण
विसरायला लावते. ज्ञान विसरायला लावत नाही. बाबा म्हणतात देखील आपली उन्नती करायची
असेल तर चार्ट ठेवा - संपूर्ण दिवसभरामध्ये कोणते पाप कर्म तर केले नाही ना? नाही
तर शंभर पटीने पाप बनेल. यज्ञाची सांभाळ करणारे बसले आहेत त्यांच्या सल्ल्यानुसार
करा. म्हणतात देखील - ‘जे खाऊ घालाल, जिथे बसवाल’. तर इतर सर्व इच्छा सोडून
द्यायच्या आहेत. नाहीतर पाप बनत जाईल. आत्मा पवित्र कशी बनेल. यज्ञामध्ये कोणतेही
पाप कर्म करायचे नाहीये. इथे तुम्ही पुण्य आत्मा बनता. छोटी-मोठी चोरी इत्यादी करणे
पाप आहे. मायेची प्रवेशता आहे. ना योगामध्ये राहू शकणार, ना ज्ञानाची धारणा करू
शकणार. आपल्या मनाला विचारले पाहिजे - आपण जर आंधळ्याची काठी बनलो नाही तर कोण झालो?
आंधळेच म्हणणार ना. याच वेळेसाठी गायले गेले आहे - धृतराष्ट्राची मुले. ते आहेत
रावण राज्यामध्ये. तुम्ही आहात संगमावर. रामराज्या मध्ये पुन्हा सुख प्राप्त करणारे
आहात. परमपिता परमात्मा कसे सुख देतात, कोणाच्या बुद्धीमध्ये येत नाही. कितीही
चांगल्या रीतीने समजावून सांगा तरी देखील बुद्धीमध्ये बसत नाही. स्वतःला जेव्हा
आत्मा समजतील तेव्हा परमात्म्याचे ज्ञान देखील समजू शकतील. आत्माच जसा पुरुषार्थ
करते, तशीच बनते. गायन देखील आहे - ‘अन्तकाल जो स्त्री सिमरे…’ बाबा म्हणतात - ‘जे
माझी आठवण करतील तेच मला प्राप्त करतील’. नाही तर खूप-खूप सजा खाऊन याल. सतयुगामध्ये
सुद्धा नाही, त्रेताच्यासुद्धा शेवटी याल. सतयुग-त्रेताला म्हटले जाते - ब्रह्माचा
दिवस. एकटा ब्रह्मा तर नसेल. ब्रह्माची तर भरपूर मुले आहेत ना. ब्राह्मणांचा दिवस
नंतर मग ब्राह्मणांची रात्र होईल. आता बाबा आले आहेत रात्रीपासून दिवस बनविण्याकरिता.
ब्राह्मणच दिवसामध्ये जाण्याकरिता तयारी करतात. बाबा किती समजावून सांगतात, दैवी
धर्माची स्थापना तर जरूर होणारच आहे. कलियुगाचा विनाश देखील जरूर होणार आहे. ज्यांना
थोडा जरी मनामध्ये संशय असेल तर ते पळून जातील. आधी निश्चय नंतर संशय होतो. इथून
मरून मग जुन्या दुनियेमध्ये जाऊन जन्म घेतात. विनशन्ती होतात. बाबांच्या श्रीमतावर
चालावे तर लागेल ना. पॉईंट्स तर खूप चांगले-चांगले मुलांना देत राहतात.
सर्वप्रथम तर हे
समजावून सांगा - तुम्ही आत्मा आहात, देह नाही. नाही तर सर्व लॉटरी गायब होईल. भले
तिथे राजा किंवा प्रजा सर्व सुखी राहतात तरी देखील पुरुषार्थ तर उच्च पद प्राप्त
करण्याचा करायचा आहे ना. असे नाही, सुखधामामध्ये तर जाणार ना. नाही, उच्च पद घ्यायचे
आहे, राजा बनण्यासाठी आला आहात. असे हुशार देखील पाहिजेत. बाबांची सेवा केली पाहिजे.
रूहानी सेवा नाहीतर स्थूल सेवा सुद्धा आहे. काही ठिकाणी मेल्स देखील आपसामध्ये
क्लास चालवत असतात. एक बहीण मध्ये-मध्ये जाऊन क्लास घेते. झाड हळू-हळू वृद्धीला
प्राप्त होते ना. सेंटर्सवर कितीतरी येतात परंतु मग चालता-चालता गायब होतात.
विकारामध्ये गेल्याने मग सेंटरवर सुद्धा यायला लाज वाटते. ढिले पडतात. म्हणतील - हा
रोगी झाला. बाबा सर्व गोष्टी समजावून सांगत राहतात. दररोज आपला पोतामेल ठेवा. जमा
आणि तोटा होतो ना. घाटा आणि फायदा. आत्मा पवित्र बनली अर्थात २१ जन्मांसाठी जमा झाले.
बाबांच्या आठवणीनेच जमा होईल. पाप नष्ट होतील. म्हणतात देखील ना - हे पतित-पावन बाबा
येऊन आम्हाला पावन बनवा. असे थोडेच म्हणतात की, येऊन विश्वाचा मालक बनवा. नाही, हे
तुम्ही मुलेच जाणता - मुक्ती आणि जीवनमुक्ती दोन्ही आहेत पावनधाम. तुम्ही जाणता आपण
मुक्ती-जीवनमुक्तीचा वारसा प्राप्त करतो. जे पूर्ण रीतीने अभ्यास करणार नाहीत ते
शेवटी येतील. स्वर्गामध्ये तर यायचे आहे, सर्व आपापल्या वेळेवर येतील. या गोष्टी
समजावून सांगितल्या जातात. लगेचच तर कोणी समजू शकणार नाहीत. इथे तुम्हाला बाबांची
आठवण करण्यासाठी किती वेळ मिळतो. जे पण येतील त्यांना हे सांगा की, पहिले स्वतःला
आत्मा समजा. हे ज्ञान बाबाच देतात. जे सर्व आत्म्यांचे पिता आहेत. आत्म-अभिमानी
बनायचे आहे. आत्मा ज्ञान घेते, परमात्मा बाबांची आठवण केल्यानेच विकर्म विनाश होतील
आणि मग सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान देतात. रचयित्याची आठवण केल्यानेच पापे
भस्म होतील. मग रचनेच्या आदि-मध्य-अंताच्या ज्ञानाला समजल्याने तुम्ही चक्रवर्ती
राजा बनाल. बस्स, हे मग इतरांना देखील ऐकवायचे आहे. चित्रे देखील तुमच्याजवळ आहेत.
हे तर संपूर्ण दिवस बुद्धीमध्ये राहिले पाहिजे. तुम्ही स्टूडंट देखील आहात ना. बरेच
गृहस्थी देखील स्टूडंट असतात. तुम्हाला देखील गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना
कमलपुष्प समान बनायचे आहे. बहिण-भावाची कधीही क्रिमिनल दृष्टी होऊ शकत नाही. ही तर
ब्रह्माची मुख वंशावळी आहे ना. क्रिमिनलला सिविल (अपवित्रला पवित्र) बनविण्याकरिता
खूप मेहनत घ्यावी लागते. अर्ध्याकल्पाची सवय लागलेली आहे, त्याला काढण्यासाठी खूप
मेहनत आहे. सर्वजण लिहितात - हा पॉईंट जो बाबांनी सांगितला आहे, क्रिमिनल दृष्टीला
बदलण्याचा, हा खूप कठीण आहे. वारंवार बुद्धी निघून जाते. खूप संकल्प येतात. आता
डोळ्यांना काय करावे? सूरदासाचा दृष्टांत देतात. ती तर एक कथा बनवली आहे. बघितले
डोळे आपल्याला धोका देत आहेत तर डोळेच काढून टाकले. आता काही त्या गोष्टी नाही आहेत.
हे डोळे तर सर्वांना आहेत परंतु क्रिमिनल (विकारी) आहेत, त्यांना सिविल (निर्विकारी)
बनवायचे आहे. लोक समजतात घरामध्ये राहत असताना, हे होऊ शकत नाही. बाबा म्हणतात होऊ
शकते कारण कमाई पुष्कळ आहे. तुम्ही जन्म-जन्मांतरासाठी पदमपती बनता. तिथे मोजदादच
नसते. आजकाल बाबा नावच पदमपती, पद्मावती देतात. तुम्ही अगणित पदमपती बनता. तिथे
मोजदाद नसतेच मुळी. मोजदाद तेव्हा होते जेव्हा रुपये-पैसे इत्यादी निघतात. तिथे तर
सोन्या-चांदीच्या मोहरा उपयोगात आणतात. पूर्वी राम-सीतेच्या राज्यातील मोहरा इत्यादी
मिळत होत्या. बाकी सूर्यवंशी राजाईतील मोहरा कधी पाहिलेल्या नाहीत. चंद्रवंशींच्या
मोहरा बघतच आलो आहोत. पहिले तर सर्व सोन्याची नाणीच होती, त्यानंतर चांदीची. हे
तांबे इत्यादी तर नंतर निघाले आहे. आता तुम्ही मुले बाबांकडून पुन्हा वारसा घेत
आहात. सतयुगामध्ये जे रीति-रिवाज चालणार असतील ते तर चालणारच. तुम्ही आपला
पुरुषार्थ करा. स्वर्गामध्ये फार थोडे असतात, आयुष्य देखील जास्त असते. अकाली मृत्यू
होत नाही. तुम्ही समजता आपण काळावर विजय प्राप्त करतो. मृत्यूचे नावच नाही. त्याला
म्हणतात - अमरलोक, हे आहे - मृत्यूलोक. अमरलोक मध्ये हाहाकार नाही. एखाद्या वृद्धाचा
मृत्यू झाला तर अजूनच आनंद होईल की, जाऊन छोटे बाळ बनणार. इथे तर मेल्यानंतर रडू
लागतात. तुम्हाला किती चांगले ज्ञान मिळते, किती धारणा झाली पाहिजे. इतरांना देखील
समजावून सांगावे लागते. बाबांना कोणी म्हणेल - मी रूहानी सेवा करू इच्छितो, तर बाबा
लगेच म्हणतील - भले करा. बाबा कोणाला मना करत नाहीत. ज्ञान नाही तर बाकी अज्ञानच आहे.
अज्ञानामुळे मग खूप डिससर्विस (चुकीची कृत्ये) करतात. सेवा तर चांगल्या प्रकारे केली
पाहिजे ना तेव्हाच लॉटरी मिळेल. खूप जबरदस्त लॉटरी आहे. ही आहे ईश्वरीय लॉटरी.
तुम्ही राजा-राणी बनाल तर तुमची नातवंडे सर्व खात येतील. इथे तर प्रत्येकजण आपल्या
कर्मानुसार फळ प्राप्त करतात. कोणी खूप धन-दान करतात तर राजा बनतात, तर बाबा मुलांना
सर्व काही समजावून सांगतात. चांगल्या रीतीने समजून घेऊन मग धारणा करायची आहे. सेवा
देखील करायची आहे. शेकडों लोकांची सेवा होते. काही ठिकाणी भक्तीभाव असणारे खूप
चांगले असतात. खूप भक्ती केली असेल तेव्हाच ज्ञान सुद्धा रुचेल. चेहऱ्यावरूनच समजून
येते. ऐकल्यावर आनंदित होत राहतील. ज्यांना समजणार नाही ते इकडे-तिकडे बघत राहतील
किंवा डोळे बंद करून बसतील. बाबा सर्व बघत असतात. जर कोणाला शिकवत नसतील तर जसेकी
काहीच समजलेले नाही. एका कानाने ऐकून दुसऱ्या कानातून सोडून देतात. आता ही वेळ आहे
बेहदच्या बाबांकडून बेहदचा वारसा घेण्याची. जितका घ्याल जन्म-जन्मांतर
कल्प-कल्पांतर मिळेल. नाहीतर मग खूप पश्चाताप करतील नंतर सर्वांना साक्षात्कार होईल.
आपण व्यवस्थित अभ्यास केला नाही म्हणून पद देखील प्राप्त करू शकणार नाही. बाकी जाऊन
काय बनतील? नोकर-चाकर, साधारण प्रजा. ही राजधानी स्थापन होत आहे. जसे-जसे करतात त्या
अनुसार फळ मिळते. नवीन दुनियेसाठी केवळ तुम्हीच पुरुषार्थ करता. मनुष्य दान-पुण्य
करतात, ते देखील या दुनियेसाठी, ही तर कॉमन गोष्ट आहे. आपण चांगले काम करतो तर
त्याचे दुसऱ्या जन्मामध्ये चांगले फळ मिळेल. तुमची तर आहे २१ जन्मांची गोष्ट. जितके
होईल चांगले कर्म करा, ऑलराऊंडर बना. नंबरवन पहिले ज्ञानी तू आत्मा आणि योगी तू
आत्मा पाहिजेत. ज्ञान देखील पाहिजे, भाषण करण्याकरिता महारथींना बोलावतात ना जे
सर्व प्रकाराची सेवा करतात, मग पुण्यतर होतेच. सब्जेक्ट्स आहेत ना. योगमध्ये राहून
कोणतेही काम कराल तर चांगले मार्क मिळू शकतात. स्वतःच्या मनाला विचारले पाहिजे आपण
सेवा करतो का? की फक्त खातो, झोपतो आहोत? इथे तर हे शिक्षण आहे इतर कोणती गोष्ट नाही.
तुम्ही मनुष्यापासून देवता नरापासून नारायण बनता. अमर कथा तिजरीची कथा हीच एक आहे.
मनुष्य तर सर्व खोट्या कथा जाऊन ऐकतात. तिसरा नेत्र तर बाबांशिवाय कोणीही देऊ शकत
नाही. आता तुम्हाला तिसरा नेत्र मिळाला आहे ज्याद्वारे तुम्ही सृष्टीच्या
आदि-मध्य-अंताला जाणता. या शिक्षणामध्ये कुमार-कुमारींनी खूप वेगाने पुढे गेले
पाहिजे. चित्र देखील आहे, कोणालाही विचारले पाहिजे - ‘गीतेचे भगवान कोण आहेत?’
मुख्य गोष्टच ही आहे. भगवान तर एकच आहेत, ज्यांच्याद्वारे वारसा मिळतो मुक्तीधामचा.
आपण तिथे राहणारे आहोत, इथे आलो आहोत पार्ट बजावण्याकरिता. आता पावन कसे बनावे.
पतित-पावन तर एक बाबाच आहेत. पुढे चालून तुम्हा मुलांची अवस्था देखील खूप चांगली
होईल. बाबा विविध प्रकारे शिकवण देत राहतात. एक तर बाबांची आठवण करायची आहे तर
जन्म-जन्मांतरीची पापे नष्ट होतील. आपल्या मनाला विचारायचे आहे - आपण किती आठवण करतो?
चार्ट ठेवणे चांगले आहे. आपली उन्नती करा. स्वतःवर दया करून आपल्या वर्तणुकीवर लक्ष
देत रहा. जर आपण चूका करत राहिलो तर रजिस्टर खराब होईल, यामध्ये दैवी वर्तन असले
पाहिजे. गायन देखील आहे ना - जे खाऊ घालाल, जिथे बसवाल, जे डायरेक्शन द्याल तेच
करणार. डायरेक्शन तर जरूर शरीराद्वारे देतील ना. गेट वे टू स्वर्ग, हे शब्द चांगले
आहेत. हे द्वार आहे स्वर्गात जाण्याचे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) पुण्य आत्मा
बनण्याकरिता इतर सर्व इच्छा सोडून हे पक्के करायचे आहे की बाबा, जे खाऊ घालाल, जिथे
बसवाल; कोणतेही पाप कर्म करायचे नाही.
२) ईश्वरीय लॉटरी
प्राप्त करण्याकरिता रुहानी सेवेमध्ये तत्पर रहायचे आहे. ज्ञानाची धारणा करून
इतरांना करवायची आहे. चांगले मार्क्स घेण्याकरिता कोणतेही कर्म आठवणीमध्ये राहून
करायचे आहे.
वरदान:-
माया आणि
प्रकृतीला दासी बनविणारे सदा स्नेही भव
जी मुले सदा स्नेही
आहेत ती लवलीन असल्याकारणाने मेहनत आणि कठीणाई पासून सुरक्षित राहतात. त्यांच्यापुढे
प्रकृती आणि माया दोन्ही आतापासूनच दासी बनतात अर्थात सदा स्नेही आत्मा मालक बनते
तर प्रकृती मायेची हिंमत होत नाही जे सदा स्नेहीचा वेळ अथवा संकल्प आपल्याकडे वळवेल.
त्यांचा प्रत्येक क्षण, प्रत्येक संकल्प आहेच बाबांची आठवण आणि सेवे प्रती. स्नेही
आत्म्यांच्या स्थितीचे गायन आहे - ‘एक बाप दुसरा न कोणी’; बाबाच संसार आहेत. ते
संकल्पाने देखील अधीन होऊ शकत नाहीत.
बोधवाक्य:-
नॉलेजफुल बना
तर समस्या देखील मनोरंजनाचा खेळ अनुभव होतील.
अव्यक्त इशारे:- आता
लगनच्या (उत्कटतेच्या) अग्नीला प्रज्वलित करून योगाला ज्वाला रूपी बनवा.
या कलियुगी तमोप्रधान
जड-जडीभुत जुन्या वृक्षाला भस्म करण्याकरिता संघटित रूपामध्ये फुलफोर्सने योग ज्वाला
प्रज्वलित करा परंतु अशी ज्वाळा स्वरूपाची आठवण तेव्हा राहील जेव्हा आठवणीची लिंक
सदैव जोडलेली राहील. जर वारंवार लिंक तुटत असेल, तर त्याला जोडण्यासाठी वेळ देखील
लागतो, मेहनत देखील लागते आणि शक्तिशाली ऐवजी कमजोर होता.