08-10-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्ही या पाठशाळेमध्ये आला आहात स्वर्गाचा पासपोर्ट घेण्याकरिता, आत्म-अभिमानी बना आणि आपले नाव रजिस्टरमध्ये नोंद करा तर स्वर्गामध्ये याल”

प्रश्न:-
कोणती स्मृती न राहिल्या कारणाने मुले बाबांचा रिगार्ड ठेवत नाहीत?

उत्तर:-
बऱ्याच मुलांना हीच स्मृती राहत नाही की ज्यांना सारी दुनिया बोलावत आहे, आठवण करत आहे, तेच उच्च ते उच्च बाबा आम्हा मुलांच्या सेवेमध्ये उपस्थित झाले आहेत. हा निश्चय नंबरवार आहे, जितका ज्यांना निश्चय आहे तितका रिगार्ड ठेवतात.

गीत:-
जो पिया के साथ है…

ओम शांती।
सर्व मुले ज्ञान सागरच्या सोबत तर आहेतच. इतकी सारी मुले एका ठिकाणी तर राहू शकत नाहीत. भले जे सोबत आहेत ते जवळ राहून डायरेक्ट ज्ञान ऐकतात आणि जे दूर आहेत त्यांना उशिराने मिळते. परंतु असे नाही की जवळचे जास्त उन्नतीला प्राप्त करतात आणि दूरचे कमी उन्नतीला प्राप्त करतात. नाही, प्रॅक्टिकलमध्ये पाहिले जाते की जे दूर आहेत तेच जास्त अभ्यास करतात आणि उन्नतीला प्राप्त करतात. इतके जरूर आहे बेहदचे बाबा इथेच आहेत. ब्राह्मण मुलांमध्ये देखील नंबरवार आहेत. मुलांना दैवी गुण देखील धारण करायचे आहेत. काही-काही मुलांकडून खूप मोठ्या चुका होतात. समजतात देखील बेहदचे बाबा ज्यांना संपूर्ण सृष्टी आठवण करतेय, ते आपल्या सेवेमध्ये उपस्थित आहेत आणि आपल्याला सर्वश्रेष्ठ बनण्याचा मार्ग सांगत आहेत. खूप प्रेमाने समजावून सांगतात तरी देखील इतका रिगार्ड देत नाहीत. बंधनात असणाऱ्या माता किती मार खातात, तडफडतात तरी देखील आठवणीमध्ये राहून चांगले ज्ञान धारण करतात. पद देखील उच्च बनते. बाबा सर्वांसाठीच म्हणत नाहीत. नंबरवार पुरुषार्थ नुसार तर आहेतच. बाबा मुलांना सावध करतात, सगळेच काही एक सारखे असू शकत नाहीत. बंधनवाल्या माता बाहेर राहून देखील खूप कमाई करतात. हे गाणे तर भक्तीमार्गातील लोकांनी बनवले आहे. परंतु तुमच्यासाठी अर्थ लावण्यासारखे देखील आहे, त्यांना काय माहित, पिया कोण आहे, कोणाचा पिया आहे? आत्मा स्वतःला जाणत नाही तर बाबांना कशी जाणेल. आहे तर आत्माच ना. मी कोण आहे, कुठून आली आहे - हे देखील ठाऊक नाहीये. सर्व आहेत देह-अभिमानी. आत्म-अभिमानी कोणीही नाहीत. जर आत्म-अभिमानी बनतील तर आत्म्याला आपल्या पित्याविषयी देखील माहित होईल. देह-अभिमानी असल्या कारणाने ना आत्म्याला, ना परमपिता परमात्म्याला जाणतात. इथे तर तुम्हा मुलांना बाबा सन्मुख बसून शिकवतात. हे बेहदचे स्कूल आहे. एकच एम ऑब्जेक्ट आहे - स्वर्गाची बादशाही प्राप्त करणे. स्वर्गामध्ये देखील अनेक प्रकारची पदे आहेत. कोणी राजा-राणी कोणी प्रजा. बाबा म्हणतात - मी आलो आहे तुम्हाला पुन्हा एकदा डबल मुकुटधारी बनविण्याकरिता. सगळेच काही डबल मुकुटधारी बनू शकत नाहीत. जे चांगल्या प्रकारे अभ्यास करतात ते स्वतःला समजू शकतात की आपण हे बनू शकतो. सरेंडर देखील आहेत, निश्चय देखील आहे. सर्व समजतात यांच्याकडून कोणते असे छी-छी काम होत नाही. काहींमध्ये तर खूप अवगुण असतात. ते समजतात की आपण थोडेच इतके कोणते उच्च पद प्राप्त करू शकणार, त्यामुळे मग पुरुषार्थच करत नाहीत. बाबांना जर विचाराल की, मी हे बनू शकतो का? तर बाबा लगेच सांगतील. स्वतःला जर बघतील तर लगेच समजतील खरोखर मी काही उच्च पद प्राप्त करू शकणार नाही. लक्षण देखील पाहिजेत ना. सतयुग-त्रेतामध्ये तर अशा गोष्टी घडत नाहीत. तिथे आहे प्रारब्ध. त्यानंतर देखील जे राजे येतात, ते देखील प्रजेवर खूप प्रेम करतात. हे तर माता-पिता आहेत. हे देखील तुम्ही मुलेच जाणता. हे तर बेहदचे पिता आहेत, हे साऱ्या दुनियेला रजिस्टर करणारे (अधिकृतपणे नोंदणी करणारे) आहेत. तुम्ही देखील इतरांना रजिस्टर करता (नोंदणी करता) ना. पासपोर्ट देत आहात. स्वर्गाचा मालक बनण्याकरिता इथूनच तुम्हाला पासपोर्ट मिळतो. बाबांनी सांगितले होते सर्वांचा फोटो असायला पाहिजे, जे वैकुंठाच्या लायक आहेत कारण तुम्ही मनुष्यापासून देवता बनता. बाजूला ताज आणि तख्त असणारा फोटो असावा. आपण हे बनत आहोत. प्रदर्शनी इत्यादी मध्ये देखील हे सॅम्पल ठेवायला हवे - हा आहेच राजयोग. समजा कोणी बॅरिस्टर बनतो तर तो एकीकडे ऑर्डीनरी ड्रेसमध्ये असावा, एकीकडे बॅरिस्टरच्या ड्रेसमध्ये असावा. तसे एकीकडे तुम्ही साधारण, एकीकडे डबल मुकुटधारी. तुमचे एक चित्र आहे ना - ज्यामध्ये विचारता ‘काय बनू इच्छिता? हे बॅरिस्टर इत्यादी बनायचे आहे की राजांचाही राजा बनायचे आहे?’ अशी चित्रे असली पाहिजेत. बॅरिस्टर जज इत्यादी तर इथलेच आहेत. तुम्हाला राजांचाही राजा नवीन दुनियेमध्ये बनायचे आहे. एम ऑब्जेक्ट समोर आहे. आम्ही हे बनत आहोत. स्पष्टीकरण किती सुंदर आहे. चित्र देखील खूप चांगली फुल साईजची असावीत. ते लोक बॅरिस्टरी शिकतात तर योग बॅरिस्टरसोबत असतो, बॅरिस्टरच बनतात. यांचा योग परमपिता परमात्म्यासोबत आहे तर डबल मुकुटधारी बनतात. आता बाबा समजावून सांगतात मुलांनी कृतीमध्ये आणले पाहिजे. लक्ष्मी-नारायणाच्या चित्रावर समजावून सांगणे खूप सोपे होईल. आपण हे बनत आहोत तर तुमच्यासाठी जरूर नवीन दुनिया पाहिजे. नरका नंतर आहे स्वर्ग.

आता हे आहे पुरुषोत्तम संगमयुग. हे शिक्षण किती श्रेष्ठ बनविणारे आहे, यामध्ये पैसे इत्यादीची गरज नाही. शिक्षणाची आवड असायला हवी. एक मनुष्य खूप गरीब होता, शिक्षणासाठी पैसे नव्हते. मग शिकत-शिकत मेहनत करून इतका श्रीमंत झाला की जो क्वीन व्हीक्टोरियाचा मिनिस्टर बनला. तुम्ही देखील आता किती गरीब आहात. बाबा किती श्रेष्ठ शिकवण देत आहेत. यामध्ये केवळ बुद्धीने बाबांची आठवण करायची आहे. दिवा इत्यादी लावण्याची देखील गरज नाही. कुठेही बसून आठवण करा. परंतु माया अशी आहे जी बाबांची आठवण विसरायला लावते. आठवणीमध्येच विघ्न पडतात. हेच तर युद्ध आहे ना. आत्मा पवित्र बनतेच मुळी बाबांची आठवण केल्याने. अभ्यासामध्ये माया काही बाधा आणत नाही. अभ्यासापेक्षाही आठवणीचा नशा श्रेष्ठ आहे, म्हणून प्राचीन योग गायला गेला आहे (प्रसिद्ध आहे). योग आणि ज्ञान म्हटले जाते. योगासाठी ज्ञान मिळते - अशाप्रकारे आठवण करा. आणि मग सृष्टीचक्राचे देखील ज्ञान आहे. रचयिता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताला बाकी कोणीच जाणत नाहीत. भारताचा प्राचीन योग शिकवतात. प्राचीन तर म्हटले जाते नव्या दुनियेला. त्याला मग लाखो वर्षे देण्यात आली आहेत. कल्पाचा कालावधी देखील अनेक प्रकारे सांगतात. कोणी काय म्हणतात, कोणी काय म्हणतात. इथे तुम्हाला एकच बाबा शिकवत आहेत. तुम्ही बाहेर (परदेशात) जरी गेलात, तरी तुम्हाला चित्र मिळतील. हे तर व्यापारी आहेत ना. बाबा म्हणतात - कपड्यावर छापू शकता. जर कोणाकडे मोठी स्क्रीन प्रेस नसेल तर अर्धे-अर्धे करून छापा. मग असे जोडा जे समजणार सुद्धा नाही. बेहदचे पिता, मोठे सरकार म्हणतात - कोणी छापून दाखवेल तर मी त्यांचे नाव बाला (प्रसिद्ध) करेन. ही चित्रे कपड्यावर छापून कोणी परदेशामध्ये घेऊन जातील तर तुम्हाला एका-एका चित्राचे कोणी ५-१० हजार सुद्धा देतील. पैसे तर तिथे पुष्कळ आहेत. बनू शकतात, इतक्या मोठ्या-मोठ्या प्रेस आहेत, शहरांची दृश्ये अशी काही छापतात, काही विचारू नका. हे देखील छापू शकता. ही तर अशी फर्स्ट क्लास गोष्ट आहे - म्हणतील खरे ज्ञान तर यामध्येच आहे, इतर कोणाकडेच हे नाही. कोणाला माहीतच नाही - मग समजावून सांगणारा देखील इंग्लिशमध्ये हुशार पाहिजे. इंग्लिश तर सर्व जाणतात. त्यांना देखील संदेश तर द्यायचा आहे ना. तेच विनाशासाठी ड्रामा अनुसार निमित्त बनलेले आहेत. बाबांनी सांगितले आहे त्यांच्याकडे बॉम्ब्स इत्यादी असे काही आहेत जे दोघे (अमेरिका आणि रशिया) जर आपसामध्ये एक झाले तर विश्वाचे मालक बनू शकतात. परंतु हा ड्रामाच कसा बनलेला आहे जे तुम्ही योगबलाद्वारे विश्वाची बादशाही घेता. शस्त्रास्त्रे इत्यादीने काही विश्वाचा मालक बनू शकत नाहीत. ते आहे सायन्स, तुमचा आहे सायलेन्स. फक्त बाबांची आणि चक्राची आठवण करा, आप समान बनवा.

तुम्ही मुले योगबलाद्वारे विश्वाची बादशाही घेत आहात. ते आपसामध्ये लढतील जरूर. मधल्यामध्ये लोणी तुम्हालाच मिळणार आहे. श्रीकृष्णाच्या मुखामध्ये लोण्याचा गोळा दाखवतात. एक म्हण देखील आहे - ‘दोन बोके आपसामध्ये भांडले आणि मधल्यामध्ये लोणी तिसऱ्यानेच खाऊन टाकले’. आहे देखील असेच. साऱ्या विश्वाच्या राजाईचे लोणी तुम्हाला मिळते. तर तुम्हाला किती आनंद झाला पाहिजे. वाह बाबा! तुमची तर कमाल आहे. नॉलेज तर तुमचेच आहे. खूप चांगले स्पष्टीकरण आहे. आदि सनातन देवी-देवता धर्मवाल्यांनी विश्वाची बादशाही कशी प्राप्त केली. याचा कोणी विचारही केला नसेल. त्यावेळी दुसरा कोणताही खंड नसतो. बाबा म्हणतात - मी विश्वाचा मालक बनत नाही. तुम्हाला बनवतो. तुम्ही शिक्षणाद्वारे विश्वाचे मालक बनता. मी परमात्मा तर आहेच अशरीरी. तुम्हा सर्वांना शरीर आहे. देहधारी आहात. ब्रह्मा-विष्णु-शंकराला देखील सूक्ष्म शरीर आहे. जसे तुम्ही आत्मा आहात तसा मी देखील परमात्मा आहे. माझा जन्म दिव्य आणि अलौकिक आहे, इतर कोणीही असा जन्म घेत नाही. हे मुकरर (निश्चित केलेले) आहे. हे सर्व ड्रामामध्ये नोंदलेले आहे. कोणीही मरतो तर ते देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. ड्रामा विषयी किती स्पष्टीकरण मिळते. समजतील नंबरवार. कोणी तर डल-बुद्धी (मंद-बुद्धी) असतात. तीन ग्रेड्स असतात. शेवटच्या ग्रेड वाल्याला डल म्हटले जाते. स्वतः देखील समजतात की हे फर्स्ट ग्रेडमध्ये आहेत, हे सेकंडमध्ये आहेत. प्रजेमध्ये देखील असेच आहेत. शिक्षण तर एकच आहे. मुले जाणतात हे शिकून आपण सो डबल मुकुटधारी बनणार. आपण डबल मुकुटधारी होतो, मग सिंगल मुकुट आणि मग नो मुकुटधारी बनलो. जसे कर्म तसे फळ म्हटले जाते. सतयुगामध्ये असे म्हणणार नाही. इथे जर चांगली कर्म कराल तर एका जन्मासाठी चांगले फळ मिळेल. कोणी अशी कर्म करतात जे जन्मापासूनच रोगी असतात. हा देखील कर्मभोग आहे ना. मुलांना कर्म, अकर्म, विकर्मा विषयी देखील समजावून सांगितले आहे. इथे जसे कर्म करतात तर त्याचे चांगले किंवा वाईट फळ प्राप्त करतात. कोणी श्रीमंत बनतात तर जरूर चांगली कर्म केली असतील. आता तुम्ही जन्म-जन्मांतरीचे प्रारब्ध बनवत आहात. गरीब-श्रीमंत हा फरक तर तिथे आताच्या पुरुषार्थानुसार असतो ना. ते प्रारब्ध आहे अविनाशी २१ जन्मांसाठी. इथे मिळते अल्पकाळासाठी. कर्म तर सुरूच आहे ना. हे कर्मक्षेत्र आहे. सतयुग आहे स्वर्गाचे कर्मक्षेत्र. तिथे विकर्म होत नाहीत. या सर्व गोष्टी बुद्धीमध्ये धारण करायच्या आहेत. कोणी असे विरळे आहेत जे नेहमी पॉईंट्स लिहीत राहतात. चार्ट देखील लिहिता-लिहिता मग थकतात. तुम्हा मुलांनी पॉईंट्स लिहिले पाहिजेत. अतिशय सूक्ष्म-सूक्ष्म पॉईंट्स आहेत, जे सगळेच पॉईंट्स काही तुम्हाला आठवू शकणार नाहीत, निसटून जातील. मग पश्चाताप कराल की हा पॉईंट तर मी विसरून गेलो. सर्वांची हीच हालत होते. विसरतात खूप, मग दुसऱ्या दिवशी आठवणीत येईल. मुलांना आपल्या उन्नतीसाठी विचार करायचा आहे. बाबा जाणतात कोणी विरळेच यथार्थ रीतीने लिहीत असतील. बाबा व्यापारी देखील आहेत ना. ते आहेत विनाशी रत्नांचे व्यापारी. हे आहेत ज्ञान रत्नांचे व्यापारी. योगामध्येच खूप मुले फेल होतात. ॲक्युरेट आठवणीमध्ये कोणी तास-दीड तास देखील मुश्किलीने राहू शकतात. ८ तास तरी पुरुषार्थ करायचा आहे. तुम्हा मुलांना शरीर निर्वाह देखील करायचा आहे. बाबांनी आशिक-माशुकचे उदाहरण दिले आहे. बसल्या-बसल्या आठवण केली आणि लगेच समोर येतात. हा देखील एक साक्षात्कार आहे. तो तिची आठवण करतो, ती त्याची आठवण करते. इथे तर मग एक आहे माशुक, तुम्ही सर्व आहात आशिक. तो सलोना माशुक तर सदैव गोरा आहे. एव्हर प्युअर (सदा पावन). बाबा म्हणतात - मी प्रवासी सदैव सुंदर आहे. तुम्हाला देखील सुंदर बनवतो. या देवतांची नॅचरल ब्युटी आहे. इथे तर कसली-कसली फॅशन करतात. विचित्र ड्रेस घालतात. तिथे तर एकरस नॅचरल ब्युटी असते. अशा दुनियेमध्ये आतापासून तुम्ही जाता. बाबा म्हणतात - मी जुन्या पतित देशामध्ये, पतित शरीरामध्ये येतो. इथे काही पावन शरीर नाही आहे. बाबा म्हणतात - मी यांच्या अनेक जन्मांच्या अंतामध्ये प्रवेश करून प्रवृत्ती मार्गाची स्थापना करतो. पुढे चालून तुम्ही सेवायोग्य बनत जाल. पुरुषार्थ कराल मग समजाल. आधी देखील असा पुरुषार्थ केला होता, आता करत आहात. पुरुषार्था शिवाय तर काहीही मिळू शकत नाही. तुम्ही जाणता आपण नरापासून नारायण बनण्याचा पुरुषार्थ करत आहोत. नवीन दुनियेची राजधानी होती, आता नाही आहे, आता पुन्हा होईल. आयरन एजच्या नंतर पुन्हा गोल्डन एज जरूर येईल. राजधानी स्थापन होणारच आहे. कल्पापूर्वी प्रमाणे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) सरेंडर होण्या सोबतच निश्चय-बुद्धी बनायचे आहे. कोणतेही छी-छी काम करू नका. आतमध्ये कोणताही अवगुण राहू नये तेव्हाच चांगले पद मिळू शकते.

२) ज्ञान रत्नांचा व्यापार करण्यासाठी बाबा जे चांगले-चांगले पॉईंट्स ऐकवतात, ते लिहून घ्यायचे आहेत. मग ते आठवून इतरांना ऐकवायचे आहेत. नेहमी आपल्या उन्नतीचा विचार करायचा आहे.

वरदान:-
बालक आणि मालकपणाच्या समानते द्वारे सर्व खजिन्यांमध्ये संपन्न भव

जसे बालकपणाचा नशा सर्वांना आहे तसे बालक सो मालक अर्थात बाप समान संपन्न स्थितीचा अनुभव करा. मालकपणाची विशेषता आहे - जितके मालक तितकेच विश्व सेवाधारीचे संस्कार नेहमी इमर्ज रूपामध्ये असावेत. मालकपणाचा नशा आणि विश्व सेवाधारीचा नशा समान रूपामध्ये असावा तेव्हा म्हणणार बाप समान. बालक आणि मालक दोन्ही स्वरूपे नेहमीच प्रत्यक्ष कर्मामध्ये यावीत तेव्हाच बाप समान सर्व खजिन्यांनी संपन्न स्थितीचा अनुभव करू शकाल.

बोधवाक्य:-
ज्ञानाच्या अखुट खजिन्याचे अधिकारी बना तेव्हाच अधीनता नष्ट होईल.

अव्यक्त इशारे:- स्वयं प्रति आणि सर्वांप्रती मनसा द्वारे योगाच्या शक्तींचा प्रयोग करा.

जशी वाचा सेवा नॅचरल झाली आहे, तशी मनसा सेवा देखील सोबतच आणि नॅचरल व्हावी, वाणी सोबतच मनसा सेवा देखील करत रहा तर तुम्हाला कमी बोलावे लागेल. बोलण्यामध्ये जी एनर्जी लावता ती मनसा सेवेच्या सहयोगामुळे वाणीची एनर्जी जमा होईल आणि मनसाची शक्तिशाली सेवा जास्त सफलता अनुभव करवेल.