08-11-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो - तुम्ही हे राजयोगाचे शिक्षण शिकत आहात राजाई प्राप्त करण्यासाठी, हे तुमचे नवीन शिक्षण आहे.

प्रश्न:-
या शिक्षणामध्ये कित्येक मुले चालता-चालता नापास का होतात?

उत्तर:-
कारण या शिक्षणामध्ये माये सोबत बॉक्सिंग आहे. मायेच्या या बॉक्सिंगमध्ये बुद्धीला खूप मोठी दुखापत होते. दुखापत होण्याचे कारण आहे बाबांसोबत सच्चे (इमानदार) नाहीत. इमानदार मुले नेहमी सुरक्षित राहतात.

ओम शांती।
हा तर सर्व मुलांना निश्चय असणार की आम्हा आत्म्यांना परमात्मा पिता शिकवत आहेत. ५ हजार वर्षानंतर एकदाच बेहदचे बाबा येऊन बेहदच्या मुलांना शिकवतात. कोणी नवीन व्यक्ती या गोष्टी ऐकेल तर तो समजू शकणार नाही. रूहानी बाबा, रुहानी मुले, काय असतात हे देखील त्याला समजू शकणार नाही. तुम्ही मुले जाणता की आपण सर्व भाऊ-भाऊ आहोत. ते आमचे पिता देखील आहेत, टीचर देखील आहेत, सुप्रीम गुरु सुद्धा आहेत; तुम्हा मुलांना हे नक्कीच आपणहून लक्षात राहील. इथे बसून समजत असाल - सर्व आत्म्यांचे एकच रुहानी पिता आहेत. सर्व आत्मे त्यांचीच आठवण करतात. कोणत्याही धर्माचा असो, सर्व मनुष्य मात्र आठवण जरूर करतात. बाबांनी समजावून सांगितले आहे - आत्मा तर सर्वांमध्ये आहे ना. आता बाबा म्हणतात - ‘देहाचे सर्व धर्म सोडून स्वतःला आत्मा समजा. आता तुम्ही आत्मे इथे पार्ट बजावत आहात’. पार्ट कसा बजावता, ते देखील समजावून सांगितले गेले आहे. मुले देखील नंबरवार पुरुषार्थानुसारच समजतात. तुम्ही राजयोगी आहात ना. शिकणारे सर्व योगीच असतात. शिकविणाऱ्या टीचर सोबत योग जरूर ठेवावा लागतो. एम ऑब्जेक्ट विषयी देखील माहीत असते की, या शिक्षणाने आपण अमुक एक बनणार. हे शिक्षण तर एकच आहे, याला म्हटले जाते - राजांचाही राजा बनण्याचे शिक्षण. राजयोग आहे ना. राजाई प्राप्त करण्याकरिता बाबांसोबत योग. दुसरा कुठलाही मनुष्य हा राजयोग कधीही शिकवू शकणार नाही. तुम्हाला काही कोणी मनुष्य शिकवत नाहीत. परमात्मा तुम्हा आत्म्यांना शिकवत आहेत. तुम्ही मग दुसऱ्यांना शिकवता. तुम्ही देखील स्वतःला आत्मा समजा. आम्हा आत्म्यांना बाबा शिकवत आहेत, हे लक्षात न राहिल्यामुळे ती शक्ती भरत नाही, त्यामुळे अनेकांच्या बुद्धीमध्ये हे टिकत नाही. म्हणून बाबा नेहमी म्हणतात, योग-युक्त होऊन, आठवणीच्या यात्रेमध्ये राहून समजावून सांगा. आम्ही भाऊ-भावांना शिकवत आहोत. तुम्ही देखील आत्मा आहात, ते (बाबा) सर्वांचे पिता, टीचर, गुरु आहेत. आत्म्याला पहायचे आहे. भले गायन आहे सेकंदामध्ये जीवनमुक्ती; परंतु यामध्ये मेहनत खूप आहे. आत्म-अभिमानी न बनल्यामुळे तुमच्या शब्दांमध्ये ताकद रहात नाही कारण ज्या प्रकारे बाबा समजावून सांगतात त्या पद्धतीने कोणीही समजावून सांगत नाहीत. काहीजण तर खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगतात. कोण काटा आहे, कोण फूल आहे - सर्वकाही समजून तर येते; शाळेमध्ये मुले पाचवी सहावी पर्यंत शिकून मग वरच्या वर्गात जातात. चांगली-चांगली मुले जेव्हा पास होऊन वरच्या वर्गात जातात तेव्हा त्या दुसऱ्या वर्गाच्या टीचरला देखील लगेच समजते. ही मुले खूप कुशाग्र पुरुषार्थी आहेत, यांनी चांगला अभ्यास केलेला आहे तेव्हाच तर वरच्या नंबरमध्ये आले आहेत. टीचरला तर नक्कीच लक्षात येत असेल ना. ते आहे लौकिक शिक्षण, इथे काही ती गोष्ट नाहीये. हे आहे पारलौकिक शिक्षण. इथे काही असे म्हणू शकणार नाही की, ‘हे आधी पासून खूप चांगला अभ्यास करत आले आहेत म्हणूनच आताही चांगला अभ्यास करत आहेत’. नाही. त्या (लौकिक) परीक्षेमध्ये पास होतात तर टीचर समजतात की यांनी खूप मेहनत घेऊन अभ्यास केला आहे, त्यामुळे वरचा नंबर घेतला आहे. इथे तर आहेच नवीन शिक्षण, जे आधी कधीही कोणी शिकलेले नाहीत. नवीन शिक्षण आहे, शिकवणारा सुद्धा नवीन आहे. सर्वच नवीन आहेत. नवीन असणाऱ्यांनाच शिकवतात. त्यांच्यामध्येही जे चांगल्या प्रकारे शिकतात तर म्हणणार हे चांगले पुरुषार्थी आहेत. हे आहे नवीन दुनियेकरिता नवीन नॉलेज दुसरे तर कोणी शिकवणारे नाही आहे. जे जितके जास्त लक्षपूर्वक शिकतात, तितका वरचा नंबर प्राप्त करतात. काही तर अतिशय गोड आज्ञाधारक असतात. पाहूनच लक्षात येते, हा शिकवणारा खूप चांगला आहे, याच्यामध्ये कुठलेही अवगुण नाहीत. वर्तनावरून, बोलण्यावरून समजून येते. बाबा सर्वांना विचारतात सुद्धा - ‘हे कसे शिकवतात, यांच्यामध्ये कोणता अवगुण तर नाही ना’. बरेचजण असेही म्हणतात की, ‘आम्हाला विचारल्याशिवाय कधीही समाचार देऊ नका’. कोणी चांगले शिकवतात आणि काहीजण तितकेसे तीक्ष्ण-बुद्धीचे नसतातही. मायेचा वार खूप होतो. बाबा हे जाणतात, की माया यांना खूप धोका देत आहे. भले दहा वर्षे जरी शिकवले आहे; परंतु माया अशी जबरदस्त आहे - देह-अहंकार आला आणि हा अडकला. बाबा समजावून सांगत आहेत - जे कोणी पैलवान (शक्तिशाली) आहेत, त्यांच्यावर मायेचा वार होतो. माया देखील बलवाना सोबत अजूनच बलवान होऊन लढते.

तुम्हाला समजते आहे की, बाबांनी ज्यांच्यामध्ये प्रवेश केला आहे हेच नंबरवन आहेत. त्यानंतर नंबरवार तर पुष्कळ आहेत ना. बाबा एक-दोघांचे उदाहरण म्हणून देतात. नंबरवार तर खूप असतात. जसे दिल्लीमध्ये गीता बच्ची खूप हुशार आहे. अतिशय गोड मुलगी आहे. बाबा नेहमी म्हणतात - ‘गीता तर सच्ची गीता आहे’. मनुष्य ती गीता वाचतात परंतु हे समजत नाहीत की, भगवंताने कसा राजयोग शिकवून राजांचाही राजा बनवले होते. खरोखर सतयुगामध्ये तर एकच धर्म होता, कालचीच तर गोष्ट आहे. बाबा म्हणतात - ‘काल मी तुम्हाला इतके श्रीमंत बनवून गेलो होतो. तुम्ही पद्मा-पदम भाग्यशाली होता आणि आता तुम्ही काय बनले आहात. तुम्हाला जाणवते ना’. ती गीता (जुन्या दुनियेतील गीता) ऐकवणाऱ्यांकडून कोणाला तसा अनुभव येतो का, काहीच समजत नाहीत. उच्च ते उच्च म्हणून ‘श्रीमत भगवत गीता’च गायली जाते. ते (दुनियावाले) तर गीतेचे पुस्तक बसून वाचतात किंवा ऐकवतात. बाबा तर पुस्तक वाचत नाहीत. फरक तर आहे ना. त्यांची (दुनिया वाल्यांची) आठवणीची यात्रा तर नाहीच आहे. ते तर खालीच घसरत जातात (पतनच होत जाते). सर्वव्यापीच्या ज्ञानामुळे सर्व बघा कसे बनले आहेत. तुम्ही जाणता कल्प-कल्प असेच होणार. बाबा म्हणतात - ‘तुम्हाला शिकवून विषय सागरामधून पार करून देतो’. किती फरक आहे. शास्त्र वाचणे हा तर भक्तिमार्ग झाला ना. बाबा म्हणतात - हे वाचल्यामुळे मला कोणीही भेटू शकत नाही. ते दुनियावाले समजतात की कोणत्याही दिशेने जा, पोहचायचे तर सर्वांना एकाच ठिकाणी आहे. कधी म्हणतात - भगवंत कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन शिकवतील. जेव्हा म्हणता बाबांना येऊन शिकवायचे आहे, तर मग तुम्ही हे काय शिकवता आहात? बाबा समजावून सांगतात - ‘गीतेमध्ये पिठात मिठाप्रमाणे काही शब्द बरोबर आहेत ज्यांचा तुम्ही आधार घेऊ शकता’. सतयुगामध्ये तर कोणतीही शास्त्रे इत्यादी असतच नाहीत. ही आहेतच भक्तिमार्गाची शास्त्रे. असे म्हणता येणार नाही की, ही अनादि आहेत, सुरुवातीपासून चालत आली आहेत. नाही. ‘अनादि’ याचा अर्थच समजत नाही. बाबा समजावून सांगतात हा ड्रामा तर अनादि बरोबर आहे. बाबा तुम्हाला राजयोग शिकवतात. बाबा म्हणतात - ‘आता मी तुम्हाला शिकवत आहे नंतर मग गायब होतो’. तुम्ही म्हणाल आमचे राज्य अनादि होते. राज्य तर तेच आहे फक्त पावन असलेले बदलून मग पतित बनते त्यामुळे नाव बदलते. देवता म्हणण्या ऐवजी हिंदू म्हटले जाता. आहात तर आदि सनातन देवी-देवता धर्माचेच ना. जसे दुसरे सतोप्रधाना पासून सतो, रजो, तमो मध्ये येतात, तुम्ही देखील असेच उतरत जाता. रजोमध्ये येता तेव्हा अपवित्रतेमुळे देवता म्हणण्या ऐवजी हिंदू म्हणून संबोधले जाता. नाहीतर ‘हिंदू’ हे तर हिंदुस्थानचे नाव आहे. तुम्ही खरे तर देवी-देवता होता ना. देवता सदैव पावन असतात. आता तर मनुष्य पतित बनले आहेत. त्यामुळे नाव सुद्धा हिंदू ठेवले आहे. तुम्ही विचारा - हिंदू धर्म केव्हा आणि कोणी स्थापन केला? तर सांगू शकणार नाहीत. आदि सनातन देवी-देवता धर्म होता, ज्याला पॅराडाईज स्वर्ग इत्यादी खूप चांगली-चांगली नावे देतात. जे होऊन गेले आहे त्याची तर पुनरावृत्ती होणारच आहे. यावेळी तुम्ही सुरुवातीपासून अंता पर्यंत सर्वकाही जाणता. जाणून घेत रहाल तरच जिवंत रहाल. बरेचजण तर मरून सुद्धा जातात (बाबांना सोडून देतात). बाबांचे बनतात तर मायेचे युद्ध सुरू होते. युद्ध सुरू झाल्याने ट्रेटर (विद्रोही) बनतात. रावणाचे होते, रामाचे बनले. पुन्हा मग रावण, रामाच्या मुलांवर विजय प्राप्त करून स्वतःकडे घेऊन जातो. कोणी आजारी पडतात. मग ना तिकडचे राहत, ना इकडचे. ना आनंद होत, ना दुःख वाटत; मध्येच अडकून राहतात. तुमच्याकडे देखील असे बरेचजण आहेत जे मधल्यामध्ये आहेत. बाबांचे सुद्धा पूर्ण बनत नाहीत आणि पूर्ण रावणाचे सुद्धा बनत नाहीत.

आता तुम्ही पुरुषोत्तम संगमयुगावर आहात. उत्तम पुरुष बनण्याकरिता पुरुषार्थ करत आहात. या व्यवस्थित समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. बाबा विचारतात तेव्हा हात तर पुष्कळ मुले वर करतात. परंतु समजून येते - एवढे डोकेच नाही आहे. भले बाबा म्हणतात - शुभ बोला. म्हणतात तर सगळेच की, ‘आम्ही नरा पासून नारायण बनणार’. कथाच मुळी नरा पासून नारायण बनण्याची आहे. अज्ञान काळामध्ये (भक्तीमार्गात) देखील सत्यनारायणाची कथा ऐकतात ना. तिथे तर कोणी विचारू शकत नाही. हे तर बाबाच विचारतात. तुम्ही काय समजता - इतकी हिंमत आहे? तुम्हाला पावन देखील जरूर बनायचे आहे. कोणी येतात तेव्हा विचारले जाते - या जन्मामध्ये कोणती पाप कर्म तर केलेली नाहीत ना? जन्म-जन्मांतरीचे पापी तर आहातच. या जन्मातील पापे सांगा तर हलके व्हाल, नाहीतर मन आतल्याआत खात राहील. खरे सांगितल्याने हलके व्हाल. बरीच मुले खरे सांगत नाहीत त्यामुळे माया एकदम जोरदार ठोसा मारते. तुमची एकदम जोरदार बॉक्सिंग आहे. त्या बॉक्सिंगमध्ये तर शरीराला दुखापत होते, या बॉक्सिंगमध्ये बुद्धीला दुखापत होते, हे बाबा देखील जाणतात. हे ब्रह्मा म्हणतात - ‘मी अनेक जन्मांच्या अंतिम जन्मामध्ये आहे. सर्वात पावन होतो, आता सर्वात पतित आहे. आता पुन्हा पावन बनतो’. असे तर म्हणत नाही की, मी महात्मा आहे. बाबा देखील खात्री देतात, हे (ब्रम्हा) सर्वात जास्त पतित आहेत. बाबा म्हणतात - ‘मी परक्या देशामध्ये, परक्या शरीरामध्ये येतो. यांच्या अनेक जन्मांच्या अंतिम जन्मामध्ये मी यांच्या तनामध्ये प्रवेश करतो, ज्यांनी पूर्ण ८४ जन्म घेतले आहेत’. आता हे देखील पावन बनण्याकरिता पुरुषार्थ करत आहेत, खूप सावध देखील रहावे लागते. बाबा तर जाणतात ना. हा बाबांचा बच्चा (ब्रह्मा बाबा) अतिशय जवळचा आहे; हा तर बाबांपासून कधीही वेगळा होऊ शकत नाही. ब्रह्मा बाबा म्हणतात - ‘विचार सुद्धा येऊ शकत नाही की सोडून जावे. एकदम माझ्या बाजूला बसलेले आहेत. माझे तर बाबा आहेत ना. माझ्या घरातच (तनामध्ये) बसले आहेत’. बाबा जाणतात मस्करी सुद्धा करतात - ‘बाबा, आज आम्हाला स्नान तर करवा, भोजन तर खाऊ घाला. मी लहान मुलगा आहे, अनेक प्रकारे बाबांची आठवण करतो. तुम्हा मुलांनाही सांगतो की, अशा प्रकारे आठवण करा - बाबा, तुम्ही तर अतिशय गोड आहात. एकदम आम्हाला विश्वाचा मालक बनवता’. या गोष्टी दुसऱ्या कोणाच्याही बुद्धीमध्ये असू शकत नाहीत. बाबा सर्वांना रिफ्रेश करत असतात. सर्वजण पुरुषार्थ तर करतात, परंतु वर्तन देखील तसे हवे ना. चूक झाली तर लगेच तसे बाबांना लिहिले पाहिजे - ‘बाबा, माझ्याकडून ही चूक झाली’. काहीजण लिहितात देखील - ‘बाबा, माझ्याकडून ही चूक झाली आहे, माफ करा’. माझी संतान बनल्यानंतर मग चुका कराल तर शंभर पटीने वृद्धी होईल. मायेसमोर हार पत्करतात तर मग जसे असतात तसेच पुन्हा बनतात. पुष्कळजण असे हरतात. ही मोठी बॉक्सिंग आहे. राम आणि रावणाचे युद्ध आहे ना. दाखवतात देखील मदतीला वानर सेना घेतली. हा सर्व मुलांचा खेळ बनलेला आहे. जशी लहान मुले बेसमज असतात ना. बाबा देखील म्हणतात ही तर यांची (दुनियावाल्यांची) पै-पैशाची बुद्धी आहे; म्हणतात - प्रत्येकजण ईश्वराचे रूप आहे. तर मग प्रत्येकजण ईश्वर बनून क्रियेट देखील करतात, पालना करतात आणि मग विनाश देखील करतात. आता ईश्वर कोणाचा विनाश थोडेच करतात. हा तर किती अज्ञानीपणा आहे; म्हणून तर म्हटले जाते बाहुल्यांची पूजा करत राहतात. आश्चर्य आहे. मनुष्यांच्या बुद्धीला काय होऊन जाते. किती खर्च करत असतात. बाबा तक्रार करतात - ‘मी तुम्हाला इतके मोठे बनवून गेलो, तुम्ही काय केलेत!’ तुम्ही देखील जाणता आम्हीच देवता होतो मग चक्र फिरतो, आता आपण ब्राह्मण बनलो आहोत. पुन्हा हम सो देवता… बनणार. हे तर बुद्धीमध्ये पक्के आहे ना. इथे बसता तर बुद्धीमध्ये हे ज्ञान राहिले पाहिजे. बाबा देखील नॉलेजफुल आहेत ना. भले शांतीधाममध्ये राहतात तरी देखील त्यांना नॉलेजफुल म्हटले जाते. तुमच्या देखील आत्म्यामध्ये हे सर्व ज्ञान असते ना. म्हणतात की या ज्ञानाने तर आमचे डोळे उघडले. बाबा तुम्हाला ज्ञान-चक्षु देतात. आत्म्याला सृष्टीच्या आदि, मध्य, अंता विषयी माहित झाले आहे. चक्र तर फिरतच राहते. ब्राह्मणांनाच स्वदर्शन चक्र मिळते. देवतांना शिकवणारा काही कोणी असत नाही. त्यांना शिकण्याची आवश्यकताच नाही. शिकायचे तर तुम्हाला आहे जे मग तुम्ही देवता बनता. आता बाबा बसून नवीन-नवीन गोष्टी समजावून सांगतात. हे नवीन शिक्षण शिकून तुम्ही श्रेष्ठ बनता. फर्स्ट सो लास्ट. लास्ट सो फर्स्ट. हा अभ्यास आहे ना. आता तुम्ही समजता बाबा प्रत्येक कल्पात येऊन पतिता पासून पावन बनवतात, नंतर मग हे ज्ञान नाहीसे होईल. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) अतिशय आज्ञाधारक, गोड बनून रहायचे आहे. देह-अहंकारामध्ये यायचे नाही. बाबांची संतान बनल्यानंतर मग कोणतीही चूक करायची नाही. मायेच्या बॉक्सिंगमध्ये अतिशय सावध रहायचे आहे.

२) आपल्या वाणीमध्ये ताकद भरण्याकरिता आत्म-अभिमानी राहण्याचा अभ्यास करायचा आहे. स्मृतीमध्ये रहावे - ‘बाबांनी शिकवलेले आम्ही ऐकवत आहोत’, तर त्यामध्ये शक्ती भरेल.

वरदान:-
अविनाशी नशेमध्ये राहून रुहानी आनंदाचा आणि प्रसन्नतेचा अनुभव करणारे ब्राह्मण सो फरिश्ता भव

तुम्ही ब्राह्मण सो फरिश्ते देवतांपेक्षा देखील उच्च आहात, देवताई जीवनामध्ये बाबांचे ज्ञान इमर्ज होणार नाही. परमात्मा मिलनाची अनुभूती सुद्धा असणार नाही त्यामुळे आता सदैव हा नशा रहावा की आम्ही देवतांपेक्षा देखील उच्च ब्राह्मण सो फरिश्ता आहोत. हा अविनाशी नशाच रूहानी आनंद आणि प्रसन्नतेचा अनुभव करविणारा आहे. जर हा नशा कायम राहत नसेल तर कधी आनंदात रहाल, कधी गोंधळून जाल.

बोधवाक्य:-
आपल्या सेवेला देखील बाबांसमोर अर्पण करा तेव्हाच म्हणणार समर्पित आत्मा.