08-11-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्ही देही-अभिमानी बना तर सर्व आजार नष्ट होतील आणि तुम्ही डबल सिरताज विश्वाचे मालक बनाल”

प्रश्न:-
बाबांच्या सन्मुख कोणत्या मुलांनी बसले पाहिजे?

उत्तर:-
ज्यांना ज्ञान डान्स करायला येतो. ज्ञान डान्स करणारी मुले जेव्हा बाबांच्या सन्मुख असतात तर बाबांची मुरली सुद्धा अशी चालते. जर कोणी समोर बसून इकडे-तिकडे बघत राहतात तर बाबा समजून जातात या मुलाला काहीही समजत नाहीये. बाबा ब्राह्मणींना देखील म्हणतील तुम्ही हे कोणाला आणले आहे, जे बाबांच्या समोर सुद्धा जांभई देतात. मुलांना तर असे बाबा मिळाले आहेत, की आनंदामध्ये डान्स केला पाहिजे.

गीत:-
दूरदेश का रहने वाला…

ओम शांती।
गोड-गोड मुलांनी गाणे ऐकले. रुहानी मुले समजतात की रुहानी बाबा ज्यांची आपण आठवण करत आलो आहोत, दुःख हर्ता, सुख कर्ता किंवा तुम मात-पिता… पुन्हा येऊन आम्हाला भरभरून सुख द्या, आम्ही दुःखी आहोत, ही सारी दुनिया दुःखी आहे कारण ही आहे कलियुगी जुनी दुनिया. जुनी दुनिया अथवा जुन्या घरामध्ये इतके सुख असू शकत नाही, जितके नवीन दुनियेमध्ये, नवीन घरामध्ये असते. तुम्ही मुले समजता आम्ही विश्वाचे मालक आदि सनातन देवी-देवता होतो, आम्हीच ८४ जन्म घेतले आहेत. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, तुम्ही आपल्या जन्मांना जाणत नाही की किती जन्म पार्ट बजावला आहे. मनुष्य समजतात ८४ लाख पुनर्जन्म आहेत. एक-एक पुनर्जन्म किती वर्षांचा असतो. ८४ लाखाच्या हिशोबाने तर सृष्टी चक्र खूपच मोठे होईल. तुम्ही मुले जाणता आम्हा आत्म्यांचे पिता आम्हाला शिकविण्याकरिता आले आहेत. आम्ही देखील दूर देशाचे राहणारे आहोत. आम्ही काही इथले रहिवासी नाही आहोत. इथे आम्ही पार्ट बजावण्यासाठी आलो आहोत. बाबांची देखील आम्ही परमधाममध्ये आठवण करतो. आता या परक्या देशामध्ये आलो आहोत. ‘शिव’ यांना ‘बाबा’ म्हणणार. रावणाला ‘बाबा’ म्हणणार नाही. भगवंताला ‘बाबा’ म्हणणार. बाबांची महिमा वेगळी आहे, ५ विकारांची कोणी महिमा करेल का! देह-अभिमान तर खूप मोठा रोग आहे. आपण देही-अभिमानी बनलो तर कोणताही रोग राहणार नाही आणि आम्ही विश्वाचे मालक बनू. या गोष्टी तुमच्या बुद्धीमध्ये आहेत. तुम्ही जाणता शिवबाबा आम्हा आत्म्यांना शिकवतात. जे पण इतर अनेक सत्संग इत्यादी आहेत, त्या कुठल्याही सत्संगामध्ये असे समजणार नाहीत की आपल्याला बाबा येऊन राजयोग शिकवणार. राजाईसाठी शिकवणार. राजा बनविणारा तर राजाच पाहिजे ना. सर्जन शिकवून आपल्या सारखे सर्जन बनवतील. अच्छा, डबल मुकुटधारी बनवणारा कुठून येईल, जो आम्हाला डबल मुकुटधारी बनवेल म्हणून मग लोकांनी डबल मुकुट श्रीकृष्णावर ठेवला आहे. परंतु श्रीकृष्ण कसे शिकवतील! जरूर बाबा संगमावर आले असतील, येऊन राजाई स्थापन केली असेल. बाबा कसे येतात, हे तुमच्या शिवाय इतर कोणाच्याही बुद्धीमध्ये नसेल. दूर देशाहून बाबा येऊन आम्हाला शिकवतात, राजयोग शिकवतात. बाबा म्हणतात - मला काही लाईटचा अथवा रत्नजडित ताज नाहीये. ते कधी राजाई घेत नाहीत. डबल मुकुटधारी बनत नाहीत, इतरांना बनवतात. बाबा म्हणतात - मी जर राजा बनलो असतो तर मग रंक देखील बनावे लागले असते. भारतवासी राव होते, आता रंक आहेत. तुम्ही देखील डबल मुकुटधारी बनता तर तुम्हाला बनवणारा सुद्धा डबल मुकुटधारी असायला हवा, ज्यामुळे मग तुमचा योग सुद्धा लागेल. जो जसा असेल तसा आप समान बनवेल. संन्यासी प्रयत्न करून संन्यासी बनवतील. तुम्ही गृहस्थी, ते संन्यासी तर मग तुम्ही फॉलोअर्स तर नाही झालात. म्हणतात अमका शिवानंद यांचा फॉलोअर आहे. परंतु ते संन्यासी डोके फिरवणारे आहेत, तुम्ही तर फॉलो करत नाही! तर तुम्ही मग फॉलोअर का म्हणता. फॉलोअर तर ते जे लगेच कपडे उतरवून कफनी घालतील. तुम्ही तर गृहस्थीमध्ये विकार इत्यादी मध्ये राहता मग शिवानंदचे फॉलोअर्स कसे म्हणवून घेता. गुरुचे तर काम आहे सद्गती करणे. गुरु असे तर नाही म्हणणार की अमक्याची आठवण करा. मग तर स्वतः गुरु नाही झाला. मुक्तीधाम मध्ये जाण्यासाठी युक्ती हवी.

तुम्हा मुलांना समजावून सांगितले जाते, तुमचे घर आहे मुक्तीधाम अथवा निराकारी दुनिया. आत्म्याला म्हटले जाते निराकारी सोल. शरीर आहे ५ तत्वांनी बनलेले. आत्मे कुठून येतात? परमधाम निराकारी दुनियेमधून. तिथे खूप आत्मे राहतात. त्याला म्हटले जाते स्वीट सायलेन्स होम. तिथे आत्मे दुःख-सुखा पासून न्यारे असतात. हे चांगल्या रीतीने पक्के करायचे आहे. आपण आहोत स्वीट सायलेन्स होममध्ये राहणारे. इथे ही नाटकशाळा आहे, जिथे आम्ही पार्ट बजावण्यासाठी येतो. या नाटकशाळेमध्ये सूर्य, चंद्र, तारे इत्यादी दिवे आहेत. कोणी मोजूही शकणार नाही की ही नाटकशाळा किती मैलांची आहे. विमानामधून वर जातात परंतु त्यामध्ये पेट्रोल इत्यादी इतके घालू शकत नाहीत की जाऊन पुन्हा परत देखील येऊ शकतील. इतके दूर जाऊ शकत नाहीत. ते समजतात इतके मैल आहे, परत मागे फिरलो नाही तर खाली पडू. समुद्राचा अथवा आकाश तत्वाचा अंत गाठू शकत नाहीत. आता बाबा तुम्हाला आपला अंत देतात (तळ गाठू देतात). आत्मा या आकाश तत्वाच्याही पार पलीकडे निघून जाते. किती मोठे रॉकेट आहे. तुम्ही आत्मे जेव्हा पवित्र बनाल तेव्हा मग तुम्ही रॉकेट सारखे उडू लागाल. किती छोटे रॉकेट आहे. सूर्य-चंद्राच्याही पार पलीकडे मूलवतनमध्ये निघून जाल. सूर्य-चंद्राचा अंत शोधून काढण्यासाठी खूप प्रयत्न करतात. दूरचे तारे इत्यादी किती छोटे दिसतात. आहेत तर खूप मोठे. जसे तुम्ही पतंग उडवता तर वरती गेल्यावर किती छोटे-छोटे दिसतात. बाबा म्हणतात - तुमची आत्मा तर सर्वात वेगवान आहे. सेकंदामध्ये एका शरीरातून निघून दुसऱ्या गर्भामध्ये जाऊन प्रवेश करते. कोणाचा कर्मांचा हिशोब जर लंडनमध्ये असेल तर सेकंदामध्ये लंडनला जाऊन जन्म घेईल. सेकंदामध्ये जीवनमुक्ती देखील गायली गेली आहे ना. बाळ गर्भातून बाहेर आले आणि मालक बनले, वारस झालाच. तुम्ही मुलांनी देखील बाबांना जाणले जणू विश्वाचे मालक बनलात. बेहदचे बाबाच येऊन तुम्हाला विश्वाचा मालक बनवतात. शाळेमध्ये बॅरिस्टरी शिकतील तर बॅरिस्टर बनतील. इथे तुम्ही डबल मुकुटधारी बनण्यासाठी शिकता. जर पास झालात तर डबल मुकुटधारी जरूर बनाल. तरीही स्वर्गामध्ये तर जरूर याल. तुम्ही जाणता बाबा तर कायम तिथेच राहतात. ‘ओ गॉड फादर’ म्हटले तरी देखील दृष्टी जरूर वरच्या दिशेने जाईल. गॉड फादर आहेत तर जरूर त्यांचा काहीतरी पार्ट असेल ना. आता पार्ट बजावत आहेत. त्यांना बागवान (माळी) देखील म्हणतात. काट्यापासून फूल बनवतात. तर तुम्हा मुलांना आनंद झाला पाहिजे. बाबा या परक्या देशामध्ये आले आहेत. ‘दूर देश का रहने वाला आया देश पराये’. दूरदेशी राहणारे तर बाबाच आहेत. आणि आत्मे देखील तिथेच राहतात. इथे मग पार्ट बजावण्यासाठी येतात. परक्या देशात - याचा अर्थ कोणीही जाणत नाहीत. मनुष्य तर भक्ती मार्गामध्ये जे ऐकतात ते सत-सत म्हणत राहतात. तुम्हा मुलांना बाबा किती चांगल्या रीतीने समजावून सांगतात. आत्मा इम्प्युअर (अपवित्र) असल्याने उडू शकत नाही. प्युअर (पवित्र) बनल्याशिवाय परत जाऊ शकत नाही. पतित-पावन एका बाबांनाच म्हटले जाते. त्यांना यायचे देखील आहे संगमावर. तुम्हाला किती आनंद झाला पाहिजे. बाबा आम्हाला डबल मुकुटधारी बनवत आहेत, यापेक्षा उच्च दर्जा कोणाचा असू शकत नाही. बाबा म्हणतात - ‘मी काही डबल मुकुटधारी बनत नाही. मी येतोच मुळी एकदा. परक्या देशामध्ये, परक्या शरीरामध्ये. हे दादा देखील म्हणतात मी शिव थोडाच आहे. मला तर लखीराज म्हणत होते मग सरेंडर झालो तर बाबांनी ब्रह्मा नाव ठेवले. यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) प्रवेश करून यांना म्हटले की तू आपल्या जन्मांना जाणत नाहीस. ८४ जन्मांचा हिशोब असायला हवा ना. ते लोक तर ८४ लाख म्हणतात जे एकदमच इम्पॉसिबल आहे. ८४ लाख जन्मांचे रहस्य समजावून सांगण्यामध्येच शेकडो वर्षे लागतील. लक्षात देखील राहणार नाही. ८४ लाख योनीमध्ये तर पशु-पक्षी इत्यादी सर्व येतात. मनुष्याचाच जन्म दुर्लभ गायला जातो. पशु थोडेच नॉलेज समजू शकतील. तुम्हाला बाबा येऊन नॉलेज शिकवतात. स्वतः सांगतात - मी रावण राज्यामध्ये येतो. मायेने तुम्हाला किती पत्थर-बुद्धी बनवले आहे. आता पुन्हा बाबा तुम्हाला पारस-बुद्धी बनवत आहेत. उतरत्या कलेमध्ये तुम्ही पत्थर-बुद्धी बनलात. आता पुन्हा बाबा चढत्या कलेमध्ये घेऊन जातात, नंबरवार तर असतात ना. प्रत्येकाने आपल्या पुरुषार्थावरून ओळखायचे आहे. मुख्य गोष्ट आहे आठवणीची. रात्री जेव्हा झोपता तेव्हा देखील हाच विचार करा. बाबा मी तुमच्या आठवणीमध्ये झोपतो. जणूकाही मी या शरीराला सोडून देतो. तुमच्याकडे येतो. अशी बाबांची आठवण करत-करत झोपी जा तर मग पहा किती मजा येते. होऊ शकते साक्षात्कार देखील होईल. परंतु या साक्षात्कार इत्यादी मध्येच खुश व्हायचे नाही. बाबा आम्ही तर तुमचीच आठवण करतो. तुमच्याकडे येऊ इच्छितो. बाबांची आठवण करत-करत तुम्ही अतिशय आरामात निघून जाल. होऊ शकते सूक्ष्मवतनमध्ये देखील जाल. मुलवतनमध्ये तर जाऊ शकणार नाही. अजून परत जाण्याची वेळ कुठे आली आहे. हां, बिंदूचा साक्षात्कार झाला की मग छोट्या-छोट्या आत्म्यांचे झाड दिसून येईल. जसा तुम्हाला वैकुंठाचा साक्षात्कार होतो ना. असे नाही, साक्षात्कार झाला म्हणजे तुम्ही वैकुंठामध्ये जाणार. नाही, त्यासाठी तर मग मेहनत करावी लागेल. तुम्हाला सांगितले जाते - तुम्ही सर्वप्रथम स्वीट होममध्ये जाल. सर्व आत्मे पार्ट बजावण्यापासून मुक्त होतील. जोपर्यंत आत्मा पवित्र बनत नाही तोपर्यंत जाऊ शकत नाही. बाकी साक्षात्काराने मिळत तर काहीच नाही. मीरेला साक्षात्कार झाला, वैकुंठामध्ये थोडीच गेली. वैकुंठ तर सतयुगामध्येच असतो. आता तुम्ही तयारी करत आहात वैकुंठाचा मालक बनण्यासाठी. बाबा ध्यान इत्यादीमध्ये इतके जाऊ देत नाहीत कारण की तुम्हाला तर शिकायचे आहे ना. बाबा येऊन शिकवतात, सर्वांची सद्गती करतात. विनाश देखील समोर उभा आहे. बाकी असुर आणि देवतांचे युद्ध असे तर काहीच नाहीये. ते आपसामध्ये युद्ध करतात तुमच्यासाठी कारण तुम्हाला नविन दुनिया पाहिजे. बाकी तुमचे युद्ध आहे माये सोबत. तुम्ही खूप नामीग्रामी वॉरियर्स (खूप प्रसिद्ध योद्धे) आहात. परंतु कोणीही जाणत नाहीत की देवींचे इतके गायन का केले जाते. आता तुम्ही भारताला योगबलाने स्वर्ग बनवता. तुम्हाला आता बाबा मिळाले आहेत. तुम्हाला समजावून सांगत राहतात - ज्ञानाद्वारे नविन दुनिया जिंदाबाद होते. हे लक्ष्मी-नारायण नविन दुनियेचे मालक होते ना. आता जुनी दुनिया आहे. जुन्या दुनियेचा विनाश पूर्वी देखील मुसळांद्वारे (मिसाईल्स द्वारे) झाला होता. महाभारत युद्ध झाले होते. त्यावेळी बाबा राजयोग देखील शिकवत होते. आता प्रॅक्टिकल मध्ये बाबा राजयोग शिकवत आहेत ना. बाबाच तुम्हाला सत्य सांगतात. सत्य बाबा येतात तर तुम्ही सदैव आनंदाने डान्स करता. हा आहे ज्ञान डान्स. तर जे ज्ञान डान्सचे शौकीन आहेत, त्यांनीच समोर बसले पाहिजे. जे समजणारे नसतील, त्यांना जांभई येईल. बाबा समजून जातात, यांना काहीच समजत नाहीये. अजिबात ज्ञान समजले नाही तर मग इकडे-तिकडे बघत राहतील. बाबा देखील ब्राह्मणीला म्हणतील - तुम्ही कोणाला आणले आहे. जे शिकतात आणि शिकवतात त्यांनी समोर बसले पाहिजे. त्यांना खुशी होत राहील. आम्हाला देखील डान्स करायचा आहे. हा आहे ज्ञान डान्स. श्रीकृष्णाने तर ना ज्ञान ऐकवले, ना डान्स केला. मुरली तर ही ज्ञानाची आहे ना. तर बाबांनी सांगितले आहे - रात्री झोपते वेळी बाबांची आठवण करत, चक्राची बुद्धीमध्ये आठवण करत रहा. बाबा, मी आता या शरीराला सोडून तुमच्याकडे येत आहे. अशी आठवण करत-करत झोपी जा मग बघा काय होते ते. अगोदर कब्रस्तान बनवत होते, मग कोणी शांतीमध्ये जात होते, कोणी रास करू लागत होते. जे बाबांना जाणतच नाहीत, तर ते आठवण कशी करू शकतील. मनुष्य-मात्र बाबांना जाणतच नाहीत तर बाबांची आठवण कशी करणार, म्हणून बाबा म्हणतात - ‘मी जो आहे, जसा आहे, मला कोणीही जाणत नाहीत’.

आता तुम्हाला किती समज आली आहे. तुम्ही आहात गुप्त वॉरियर्स (गुप्त योद्धे). वॉरियर्स हे नाव ऐकून देवींना मग तलवार, बाण इत्यादी दिले आहेत. तुम्ही वॉरियर्स आहात योगबलाचे. योगबलाद्वारे विश्वाचे मालक बनता. बाहुबळाने भले कोणी कितीही प्रयत्न करू दे परंतु विजय मिळवू शकत नाहीत. भारताचा योग प्रसिद्ध आहे. हा बाबाच येऊन शिकवतात. हे देखील कोणाला ठाऊक नाही आहे. उठता-बसता बाबांचीच आठवण करत रहा. मुले म्हणतात - योग लागत नाही. ‘योग’ शब्द काढून टाका. मुले तर आपल्या वडिलांची आठवण करतात ना. शिवबाबा म्हणतात - ‘मामेकम् (मज एकाची) आठवण करा’. मीच सर्वशक्तिमान आहे, माझी आठवण केल्याने तुम्ही सतोप्रधान बनाल. जेव्हा सतोप्रधान बनाल तेव्हा मग आत्म्यांची वरात निघेल. जशी मधमाशांची वरात असते ना. ही आहे शिवबाबांची वरात. शिवबाबांच्या मागे सर्व आत्मे मच्छरांप्रमाणे पळत जातील. बाकी सर्व शरीरे नष्ट होतील. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) रात्री झोपण्यापूर्वी बाबांशी गोड-गोड गोष्टी करायच्या आहेत. ‘बाबा, मी या शरीराला सोडून तुमच्याकडे येत आहे’, अशी आठवण करून झोपायचे आहे. आठवणच मुख्य आहे, आठवणीमुळेच पारस-बुद्धी बनाल.

२) ५ विकारांच्या रोगापासून वाचण्यासाठी देही-अभिमानी रहाण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. असीम आनंदामध्ये (अपार आनंदामध्ये) रहायचे आहे, ज्ञान डान्स करायचा आहे. क्लासमध्ये आळस पसरवायचा नाही.

वरदान:-
सेवे द्वारे अनेक आत्म्यांचा आशीर्वाद प्राप्त करून सदैव पुढे जाणारे महादानी भव

महादानी बनणे अर्थात दुसऱ्यांची सेवा करणे, दुसऱ्यांची सेवा केल्यामुळे आपली सेवा स्वतः होते. महादानी बनणे अर्थात स्वतःला मालामाल करणे, जितके आत्म्यांना सुख, शक्ती आणि ज्ञानाचे दान द्याल तितके आत्म्यांचा प्राप्तीचा आवाज किंवा आभार जे निघतात ते तुमच्यासाठी आशीर्वादाचे रूप होईल. हे आशीर्वादच पुढे जाण्याचे साधन आहे, ज्यांना आशीर्वाद मिळतात ते सदैव आनंदी राहतात. तर दररोज अमृतवेलेला महादानी बनण्याचा प्रोग्राम बनवा. कोणती वेळ अथवा दिवस असा नसावा ज्यादिवशी दान केले नसेल.

बोधवाक्य:-
आताचे प्रत्यक्ष फळ आत्म्याला उडत्या कलेचे बळ देते.

अव्यक्त इशारे:- अशरीरी आणि विदेही स्थितीचा अभ्यास वाढवा.

बाबांच्या समीप आणि समान बनण्यासाठी देहामध्ये असूनही विदेही बनण्याचा अभ्यास करा. जसे कर्मातीत बनण्याचे उदाहरण साकारमधे ब्रह्मा बाबांना बघितले, असे फॉलो फादर करा. जोपर्यंत हा देह आहे, कर्मेंद्रियांसोबत या कर्मक्षेत्रावर पार्ट बजावत आहात, तोपर्यंत कर्म करताना कर्मेंद्रियांचा आधार घ्या आणि न्यारे बना, हाच अभ्यास विदेही बनवेल.