08-12-24 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
13.02.2003 ओम शान्ति
मधुबन
“वर्तमान समयी आपले
दयाळू आणि दाता स्वरूप प्रत्यक्ष करा”
आज वरदाता बाबा आपल्या
ज्ञान दाता, शक्ती दाता, गुण दाता, परमात्म संदेश वाहक मुलांना पाहत आहेत.
प्रत्येकजण मास्टर दाता बनून आत्म्यांना बाबांच्या समीप आणण्यासाठी मनापासून
प्रयत्न करत आहेत. विश्वामध्ये अनेक प्रकारचे आत्मे आहेत, काही आत्म्यांना ज्ञान
अमृत पाहिजे, बाकी आत्म्यांना शक्ती हव्या आहेत, गुण हवे आहेत, तुम्हा मुलांपाशी
सर्व खजिने अखंड आहेत. प्रत्येक आत्म्याची कामना पूर्ण करणारे आहात. दिवसेंदिवस
समाप्तीचा वेळ समीप येत असल्या कारणाने आता आत्मे कोणतातरी नवीन आधार शोधत आहेत. तर
तुम्ही आत्मे नवीन आधार देण्याच्या निमित्त बनलेले आहात. बापदादा मुलांच्या
उमंग-उत्साहाला पाहून आनंदित होतात. एका बाजूला गरज आहे आणि दुसऱ्या बाजूला
उमंग-उत्साह आहे. गरजेच्या वेळी एका थेंबाचे देखील खूप महत्व असते. तर यावेळी तुम्ही
दिलेल्या ओंजळीचे, संदेशाचे देखील खूप महत्व आहे.
वर्तमान समय तुम्हा
सर्व मुलांचे दयाळू आणि दाता स्वरूप प्रत्यक्ष होण्याचा वेळ आहे. तुम्हा ब्राह्मण
आत्म्याच्या अनादि स्वरूपामध्ये देखील ‘दाता’पणाचे संस्कार भरलेले आहेत म्हणूनच
कल्प वृक्षाच्या चित्रामध्ये तुम्हाला वृक्षाच्या मुळाशी दाखवले आहे कारण
मुळाद्वारेच संपूर्ण वृक्षाला सर्व काही मिळते. तुमचे आदि स्वरूप - देवता रूप,
त्याचा अर्थच आहे - ‘देव ता’ अर्थात देणारा. तुमचे मध्यकालचे स्वरूप - पूज्य
रूपातील चित्र आहे; तर मध्यकाळामध्ये देखील पूज्य रूपामध्ये तुम्ही वरदान देणारे,
दुवा देणारे, आशीर्वाद देणारे दात्याचे रूप आहात. तर तुम्हा आत्म्यांचे विशेष
स्वरूपच ‘दाता’पणाचे आहे. तर आता देखील परमात्म संदेशवाहक बनून विश्वामध्ये
बाबांच्या प्रत्यक्षतेचा संदेश पसरवत आहात. तर प्रत्येक ब्राह्मण मुलाने चेक करावे
की अनादि, आदि ‘दाता’पणाचे संस्कार प्रत्येकाच्या जीवनामध्ये सदैव इमर्ज रूपामध्ये
असतात का? ‘दाता’पणाचे संस्कार असणाऱ्या आत्म्यांची निशाणी आहे - ते कधीही हा
संकल्पसुद्धा करणार नाहीत की, ‘कोणी देईल तेव्हा देऊ, कोणी करेल तेव्हा करू’, नाही.
निरंतर खुला भांडार आहे. तर बापदादा चोहो बाजूच्या मुलांचे ‘दाता’पणाचे संस्कार बघत
होते. काय पाहिले असेल? नंबरवार तर आहेतच ना! कधीही असा संकल्प करू नका - असे झाले
तर मी देखील असे करेन. ‘दाता’पणाचे संस्कार असणाऱ्यांना सर्व बाजूने सहयोग आपोआप
प्राप्त होतो. ना केवळ आत्म्यांद्वारे परंतु प्रकृती देखील समयानुसार सहयोगी बनते.
हा सूक्ष्म हिशोब आहे की, जो सदैव दाता बनतो, त्या पुण्याचे फळ वेळेवर सहयोग,
वेळेवर सफलता त्या आत्म्याला सहजच प्राप्त होते म्हणून ‘दाता’पणाचे संस्कार सदैव
इमर्ज रूपामध्ये ठेवा. पुण्याचे खाते एकाचे १० पटीने फळ देते. तर पूर्ण दिवसभरामध्ये
नोट करा - संकल्पाद्वारे, वाणीद्वारे, संबंध-संपर्काद्वारे पुण्य आत्मा बनून
पुण्याचे खाते किती जमा केले? मनसा सेवा देखील पुण्याचे खाते जमा करते. वाणीद्वारे
एखाद्या कमजोर आत्म्याला आनंदी करणे, चिंताग्रस्त असणाऱ्याला स्वमानाच्या
स्मृतीमध्ये आणणे, निराश आत्म्याला आपल्या वाणीद्वारे उमंग-उत्साहामध्ये आणणे,
संबंध-संपर्काने आत्म्याला आपल्या श्रेष्ठ संगाचा रंग अनुभव करविणे, या विधीने
पुण्याचे खाते जमा करू शकता. या जन्मामध्ये इतके पुण्य जमा करता जे अर्धे कल्प
पुण्याचे फळ खाता आणि अर्धे कल्प तुमची जड चित्रे (मुर्त्या) पापी आत्म्यांना
वायुमंडळाद्वारे पापांपासून मुक्त करतात. पतित-पावनी बनता. तर बापदादा प्रत्येक
मुलाचे जमा झालेले पुण्याचे खाते बघत असतात.
बापदादा मुलांचा
वर्तमान समयातील सेवेचा उमंग-उत्साह पाहून खुश होत आहेत. मेजॉरिटी मुलांमध्ये सेवेचा
उमंग चांगला आहे. सर्व आपापल्या वतीने सेवेचा प्लॅन प्रॅक्टिकलमधे आणत आहेत. यासाठी
बापदादा अंतःकरणापासून मुबारक देत आहेत. चांगले करत आहात आणि चांगले करत रहाल.
सर्वात चांगली गोष्ट ही आहे - सर्वांचा संकल्प आणि वेळ बिझी झाला आहे. प्रत्येकाचे
हे लक्ष्य आहे की, चोहो बाजूच्या सेवेने आता तक्रारींची पूर्तता करायची आहे.
ब्राह्मणांच्या दृढ
संकल्पामध्ये खूप शक्ती आहे. जर ब्राह्मण दृढ संकल्प करतील तर काय होऊ शकणार नाही!
सर्वकाही होईल फक्त योगाला ज्वाला स्वरूप बनवा. योग ज्वाला स्वरूप बनला तर
ज्वालेच्या मागे आत्मे आपोआपच येतील कारण ज्वाला (प्रकाश) मिळाल्याने त्यांना मार्ग
दिसू लागेल. आता योग तर लावत आहात परंतु योग, ‘ज्वाला रूप’ होणे आवश्यक आहे. सेवेचा
उमंग-उत्साह चांगला वाढत आहे परंतु योगामध्ये ‘ज्वाला रूप’, याला आता अंडरलाईन
करायची आहे. तुमच्या दृष्टीमध्ये अशी झलक यावी ज्यामुळे तुमच्या दृष्टीनेच ते
कोणत्या ना कोणत्या अनुभूतीचा अनुभव करतील.
फॉरेनवाल्यांनी ही जी
सेवा केली होती - ‘कॉल ऑफ टाइम’ वाल्यांची, त्याची विधी बापदादांना आवडली की
छोट्याशा संघटनला समीप आणले. असे प्रत्येक झोन, प्रत्येक सेंटर वेगवेगळी सेवा तर
करत आहेत परंतु कोणीतरी सर्व वर्गांचे (सर्व क्षेत्रातील लोकांचे) संघटन बनवा.
बापदादांनी सांगितले होते की, विखुरलेली सेवा खूप आहे, परंतु विखुरलेल्या सेवेमधून
काही समीप येणाऱ्या योग्य आत्म्यांचे संघटन तयार करा आणि वेळोवेळी त्या संघटनला
समीप आणत रहा तसेच त्यांच्यामध्ये सेवेचा उमंग वाढवा. बापदादा पाहतात की असे आत्मे
आहेत परंतु अजून ती शक्तिशाली पालना, संघटीत रूपामध्ये मिळत नाही आहे. वेगवेगळी
यथाशक्ती पालना मिळत आहे, संघटनमध्ये एकमेकांना पाहून देखील उमंग येतो. ‘हे असे करू
शकतात, मी देखील करू शकतो, मी देखील करेन’, तर उमंग येतो. बापदादा आता सेवेचे
प्रत्यक्ष संघटित रूप पाहू इच्छितात. मेहनत चांगली करत आहात, प्रत्येकजण आपल्या
वर्गाची (प्रभागाची), स्थानाची, झोनची, सेंटरची सेवा चांगली करत आहात, बापदादा खुश
होतात. आता त्यातले काही बाबांसमोर आणा. प्रवृत्तीवाल्यांचा सुद्धा उमंग
बापदादांपाशी पोहोचतो आणि डबल फॉरेनर्सचा देखील डबल कार्य करत असताना सेवेमध्ये,
स्वतःच्या पुरुषार्थामध्ये उमंग चांगला आहे, हे पाहून देखील बाप-दादा खुश आहेत.
विदेशातील ब्राह्मण
आत्मे वर्तमान वायुमंडळाला पाहून घाबरत तर नाही आहात ना? ‘उद्या काय होईल, उद्या
काय होईल…’, असा तर विचार करत नाही ना? उद्या चांगलेच होणार आहे. चांगले आहे आणि
चांगलेच होणार आहे. जितकी दुनियेमध्ये हलचल (भयग्रस्त स्थिती) निर्माण होईल तितकीच
तुम्हा ब्राह्मण आत्म्यांची स्टेज (स्थिती) अचल असेल. असे आहे ना? डबल विदेशी
भयग्रस्त आहात की अचल आहात? अचल आहात? भयग्रस्त तर नाही आहात ना! जे अचल आहेत
त्यांनी हात वर करा. अचल आहात? उद्या काही झाले तर? तरीही अचल आहात ना! काय होणार,
काहीही होणार नाही. तुम्हा ब्राह्मणांवर परमात्म छत्रछाया आहे. जसे वॉटरप्रूफ असते
कितीही पाणी असेल परंतु वॉटरप्रूफ द्वारे वॉटरप्रूफ होतात. असेच कितीही भयग्रस्त
परिस्थिती असेल परंतु ब्राह्मण आत्मे परमात्म छत्रछायेखाली कायम प्रूफ (सुरक्षित)
आहेत. बेफिक्र बादशाह (निश्चिंत बादशहा) आहात ना! की थोडी-थोडी काळजी वाटते, काय
होईल? नाही. निश्चिंत. स्वराज्य अधिकारी बनून, निश्चिंत बादशहा बनून, अचल-अडोलच्या
सीट वर सेट रहा. सीट वरून खाली उतरू नका. अपसेट होणे अर्थात सीट वर सेट नाही आहात
त्यामुळे अपसेट आहात. जे सीट वर सेट आहेत ते स्वप्नामध्ये देखील अपसेट होऊ शकत
नाहीत.
माता काय समजता? सीट
वर सेट व्हायला, बसायला येते ना? अवस्था डगमग तर होत नाही ना! बापदादा कंबाइंड आहेत,
जर सर्वशक्तिवान तुमच्या सोबत कंबाइंड आहेत (एकत्र आहेत) तर तुम्हाला कसली भीती आहे!
जर स्वतःला एकटे समजलात तर डगमगाल. कंबाइंड (एकत्र) रहाल तर मग कितीही खळबळ माजू दे
परंतु तुम्ही अचल रहाल. बरोबर आहे मातांनो? ठीक आहे ना, कंबाइंड आहात ना! एकट्या तर
नाही आहात ना? बाबांची जबाबदारी आहे, जर तुम्ही सीट वर सेट असाल तर बाबांची जबाबदारी
आहे, अपसेट असाल तर तुमची जबाबदारी आहे.
आत्म्यांना
संदेशाद्वारे ओंजळ देत रहाल तर दाता स्वरूपामध्ये स्थित रहाल, तर ‘दाता’पणाच्या
पुण्याचे फळ - शक्ती मिळत राहील. चालता-फिरता स्वतःला मी आत्मा करावनहार आहे आणि ही
कर्मेंद्रिये करनहार कर्मचारी आहेत, हा आत्मा असल्याच्या स्मृतीचा अनुभव सदैव इमर्ज
रूपामध्ये असावा; असे नाही की, मी तर आहेच आत्मा. नाही, स्मृतीमध्ये इमर्ज असावे.
मर्ज रूपामध्ये राहते परंतु इमर्ज रूपामध्ये राहील्याने तो नशा, आनंद आणि
कंट्रोलिंग पॉवर राहते. मजा देखील वाटते, का! साक्षी होऊन कर्म करता. तर वारंवार
चेक करा की, करावनहार होऊन कर्म करवून घेत आहे का? ज्याप्रमाणे राजा आपल्या
कर्मचाऱ्यांना ऑर्डरमध्ये ठेवतो, ऑर्डरने करवून घेतात, तसे ‘आत्मा करावनहार आहे’ या
स्वरूपाची स्मृती राहिली तर सर्व कर्मेंद्रिये ऑर्डरमध्ये राहतील. मायेच्या
ऑर्डरमध्ये राहणार नाहीत, तुमच्या ऑर्डरमध्ये राहतील. नाहीतर माया बघते की करावनहार
आत्मा निष्काळजी झाली आहे तर माया ऑर्डर करू लागते. कधी संकल्प शक्ती, कधी मुखाची
शक्ती मायेच्या ऑर्डरप्रमाणे चालू लागते म्हणून सदैव प्रत्येक कर्मेंद्रियाला आपल्या
ऑर्डर प्रमाणे चालवा. असे म्हणणार नाही - ‘करायचे तर नव्हते, परंतु झाले’. जे करू
इच्छिता तेच होईल. आत्तापासून राज्य अधिकारी बनण्याचे संस्कार भराल तेव्हाच तिथे
देखील राज्य चालवाल. स्वराज्य अधिकारीच्या सीटवरून कधीही खाली येऊ नका. जर
कर्मेंद्रिये ऑर्डरमध्ये राहिली तर प्रत्येक शक्ती देखील तुमच्या ऑर्डरमध्ये राहील.
ज्या शक्तीची ज्यावेळी आवश्यकता आहे त्यावेळी ती शक्ती ‘जी हाजिर’ म्हणत उपस्थित
व्हावी. असे नाही, काम पूर्ण झाले आणि तुम्ही ऑर्डर करा सहनशक्ती ये; काम पूर्ण
झाल्यावर येईल. प्रत्येक शक्ती तुमच्या आदेशानुसार उपस्थित होईल कारण ही प्रत्येक
शक्ती ईश्वरीय देणगी आहे. तर ईश्वरीय देणगी तुमची वस्तू झाली. तर आपल्या वस्तूला
कसेही युज करा, कधीही युज करा, तर अशाप्रकारे या सर्व शक्ती तुमच्या ऑर्डरप्रमाणे
राहतील, सर्व कर्मेंद्रिये तुमच्या ऑर्डरनुसार राहतील, यालाच म्हटले जाते -
स्वराज्य अधिकारी, मास्टर सर्वशक्तिवान. पांडव असे आहेत का? मास्टर सर्वशक्तिवान
देखील आहेत आणि स्वराज्य अधिकारी देखील आहेत. असे म्हणू नका की तोंडातून निघून गेले,
कोणी ऑर्डर दिली जे निघून गेले! बघायची इच्छा नव्हती, परंतु बघितले. करायची इच्छा
नव्हती, परंतु केले. हे कोणाच्या ऑर्डरनुसार होते? याला ‘अधिकारी’ म्हणणार की
‘अधीन’ म्हणणार? तर अधिकारी बना, अधीन नाही. अच्छा.
बापदादा म्हणतात - जसे
आत्ता मधुबनमध्ये तुम्ही सर्वजण खूप आनंदी आहात, तसेच सदैव खुश-आबाद (आनंदी आणि
समाधानी) रहा. रुहे गुलाब (सुगंधी गुलाब) आहात. बघा, चोहो बाजूला बघा सर्व सुगंधी
गुलाब, फुललेले गुलाब आहेत. कोमेजलेले नाहीत, फुललेले गुलाब आहेत. तर सदैव असेच
आनंदी आणि प्रसन्न चेहऱ्याने रहा. जर कोणी तुमच्या चेहऱ्याकडे पाहिले तर त्यांनी
तुम्हाला विचारावे की, ‘तुम्हाला असे काय मिळाले आहे, खूप खुश आहात!’ प्रत्येकाच्या
चेहऱ्यावरून बाबांचा परिचय मिळावा. जशी चित्रे परिचय देतात तसे तुमच्या चेहऱ्याने
बाबांचा परिचय द्यावा की, ‘बाबा मिळाले आहेत’. अच्छा.
सगळे ठीक आहात?
विदेशवाले देखील पोहोचले आहेत. चांगले वाटते ना इथे? (मोहिनी बहेन, न्यूयॉर्क) चला,
हादरवून टाकणाऱ्या गोष्टी ऐकण्यापासून तरी वाचलात. चांगले केलेत, सर्व एकत्र पोहोचले
आहात, खूप चांगले केलेत. अच्छा - डबल फॉरेनर्स, डबल नशा आहे ना! म्हणा - ‘इतका नशा
आहे की मन म्हणते - असे जर कोणी आहेत तर ते आम्ही डबल विदेशी आहोत’. डबल नशा आहे,
स्वराज्य अधिकारी सो विश्व अधिकारी. डबल नशा आहे ना! बापदादांना देखील चांगले वाटते.
जर कोणत्याही ग्रुपमध्ये डबल विदेशी नसले तर चांगले वाटत नाही. साऱ्या विश्वाचे पिता
आहेत ना तर विश्वातील सर्व पाहिजेत ना! सर्व पाहिजेत. माता नसतील तरी देखील रौनक (शोभा)
नाही. पांडव नसले तरी देखील शोभा कमी होते. बघा ज्या सेंटरवर कोणी पांडव नसतील फक्त
माता असतील तर चांगले वाटेल! आणि फक्त पांडव असतील, शक्ती नसतील, तरी देखील सेवा
केंद्र सजलेले वाटत नाही. दोन्ही पाहिजेत. मुले देखील पाहिजेत. मुले म्हणतात, आमचे
नाव का नाही घेतले. मुलांची देखील शोभा आहे.
अच्छा, आत्ता एका
सेकंदामध्ये निराकारी आत्मा बनून निराकार बाबांच्या आठवणीमध्ये लीन व्हा. (ड्रिल)
चोहो बाजूंचे सर्व
स्वराज्य अधिकारी, सदैव साक्षीपणाच्या सीटवर सेट राहणारे अचल अडोल आत्मे, सदैव
‘दाता’पणाच्या स्मृतीने सर्वांना ज्ञान, शक्ती, गुण देणाऱ्या दयाळू आत्म्यांना,
सदैव आपल्या चेहऱ्याद्वारे बाबांचे चित्र दाखविणाऱ्या श्रेष्ठ आत्म्यांना, सदैव
आनंदी आणि प्रसन्न राहणाऱ्या सुगंधी गुलाब असणाऱ्या, आत्मिक गुलाब असणाऱ्या मुलांना
बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.
दादींसोबत संवाद:-
(सेवे सोबतच सर्वत्र १०८ तासांचे योगाचे प्रोग्राम देखील खूप चांगले चालू आहेत) या
योग ज्वाळेमधूनच विनाश ज्वाळा फोर्समध्ये येईल. आता बघा प्रोग्राम बनवतात आणि मग
विचारात पडतात. योगाद्वारे विकर्म विनाश होतील, पाप कर्माचे ओझे भस्म होईल,
सेवेद्वारे पुण्याचे खाते जमा होईल. तर पुण्याचे खाते जमा करत आहात परंतु मागील ज्या
काही संस्कारांचे ओझे आहे, ते योग ज्वाळेमुळे भस्म होईल. साधारण योगाने नाही. आत्ता
काय आहे, योग तर लावता परंतु पाप भस्म होतील असे ज्वाळारूप नाही आहे म्हणून थोडा
वेळ निघून जातो मग पुन्हा डोके वर काढतो; म्हणून रावणाला बघा, मारतात, जाळतात आणि
मग हाडे देखील पाण्यामध्ये टाकतात. पूर्णतः भस्म व्हावा, मागील संस्कार, कमजोर
संस्कार पूर्णपणे भस्म व्हावेत, परंतु भस्म झालेले नाहीत. मरतात परंतु भस्म होत
नाहीत, मेल्यानंतर पुन्हा जिवंत होतात. संस्कार परिवर्तनाने संसार परिवर्तन होणार.
आत्ता संस्कारांची लीला चालू आहे. संस्कार मधून-मधून इमर्ज होतात. नामोनिशाणही नष्ट
व्हावे, संस्कार परिवर्तन व्हावे - ही आहे विशेष अंडरलाईन करण्याची गोष्ट. संस्कार
परिवर्तन नसल्याने व्यर्थ संकल्प देखील आहेत. व्यर्थ वेळ देखील आहे, व्यर्थ नुकसान
देखील आहे. होणार तर आहेच. संस्कार मिलनाची महा-रास गायलेली आहे. आता रास होते,
महारास झालेली नाही. (महारास का होत नाही आहे?) अंडरलाईन नाही आहे, दृढता नाही आहे.
विभिन्न प्रकारचा निष्काळजीपणा आहे. अच्छा!
वरदान:-
कर्मयोगी बनून
प्रत्येक संकल्प, बोल आणि कर्म श्रेष्ठ बनविणारे निरंतर योगी भव
कर्मयोगी आत्म्याचे
प्रत्येक कर्म योगयुक्त, युक्तियुक्त असेल. जर कोणतेही कर्म युक्तियुक्त होत नसेल
तर समजा योगयुक्त नाही आहे. जर साधारण अथवा व्यर्थ कर्म होत असेल तर निरंतर योगी
म्हटले जाणार नाही. कर्मयोगी अर्थात प्रत्येक सेकंद, प्रत्येक संकल्प, प्रत्येक बोल
सदैव श्रेष्ठ असावेत. श्रेष्ठ कर्माची निशाणी आहे - स्वतः देखील संतुष्ट आणि दुसरेही
संतुष्ट. अशी आत्माच निरंतर योगी बनते.
सुविचार:-
स्वयं प्रिय, लोक
प्रिय आणि प्रभू प्रिय आत्माच वरदानी मूर्त आहे.