09-01-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्हाला विकर्मांच्या सजेपासून मुक्त होण्याचा पुरुषार्थ करायचा आहे, या
अंतिम जन्मामध्ये सर्व हिशोब चुकता करून पावन बनायचे आहे'’
प्रश्न:-
धोकेबाज माया
कोणते वचन मोडण्याचा प्रयत्न करते?
उत्तर:-
तुम्ही प्रतिज्ञा केली आहे - कोणत्याही देहधारीवर आम्ही मन जडू देणार नाही. आत्मा
म्हणते मी एका बाबांचीच आठवण करणार, आपल्या देहाची देखील आठवण करणार नाही. बाबा,
देहा सहीत सर्वांचा संन्यास करवितात. परंतु माया हीच प्रतिज्ञा तोडते. देहामध्ये
मोह उत्पन्न होतो. जे दिलेले वचन मोडतात त्यांना सजा देखील खूप खावी लागते.
गीत:-
तुम्हीं हो
माता पिता तुम्ही हो…
ओम शांती।
उच्च ते उच्च भगवंताची महिमा देखील केली आहे आणि मग निंदा सुद्धा केली आहे. आता
सर्वश्रेष्ठ बाबा स्वतः येऊन परिचय देतात आणि मग जेव्हा रावण राज्य सुरू होते तर
स्वतःची श्रेष्ठता दाखवतात. भक्तिमार्गामध्ये भक्तीचेच राज्य आहे म्हणून म्हटले जाते
रावण राज्य. ते राम राज्य, हे रावण राज्य. राम आणि रावणाची तुलना केली जाते. बाकी
तो राम तर त्रेताचा राजा झाला, त्याच्यासाठी म्हटले जात नाही. रावण आहे अर्ध्या
कल्पाचा राजा. असे नाही की राम अर्ध्या कल्पाचा राजा आहे. नाही, या गोष्टी तपशीलवार
समजून घ्यायच्या आहेत. बाकी ती गोष्ट समजण्यासाठी तर एकदम सोपी आहे. आपण सर्व
भाऊ-भाऊ आहोत. आपल्या सर्वांचे पिता ते एक निराकार आहेत. बाबांना ठाऊक आहे यावेळी
माझी सर्व मुले रावणाच्या जेलमध्ये आहेत. कामचितेवर बसून सर्व काळे झाले आहेत. हे
बाबाच जाणतात. आत्म्यामध्येच सारे नॉलेज आहे ना. यामध्ये देखील सर्वात जास्त
महत्त्व द्यायचे आहे - आत्मा आणि परमात्म्याला जाणणे. छोट्याशा आत्म्यामध्ये किती
पार्ट नोंदलेला आहे जो बजावत राहते. देह-अभिमानामध्ये येऊन पार्ट बजावतात तर
स्वधर्माला विसरून जातात. आता बाबा येऊन आत्म-अभिमानी बनवतात कारण आत्माच म्हणते
की, आपण पावन बनावे. तर बाबा म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा. आत्मा बोलावते
हे परमपिता, हे पतित-पावन, आम्ही आत्मे पतित बनलो आहोत, येऊन आम्हाला पावन बनवा.
संस्कार तर सर्व आत्म्यामध्येच आहेत ना. आत्मा स्पष्ट म्हणते - आम्ही पतित बनलो
आहोत. पतित त्यांना म्हटले जाते जे विकारामध्ये जातात. पतित मनुष्य, मंदिरामध्ये
जाऊन पावन निर्विकारी देवतांच्या समोर त्यांची महिमा गातात. बाबा समजावून सांगत
आहेत - ‘मुलांनो, तुम्हीच पूज्य देवता होता. ८४ जन्म घेत-घेत जरूर खाली उतरावे
लागेल. हा खेळच पतितापासून पावन, पावनपासून पतित होण्याचा आहे. बाबा येऊन सारे
ज्ञान इशाऱ्याने समजावून सांगतात. आता सर्वांचा अंतिम जन्म आहे. सर्वांना हिशोब
चुकता करून जायचे आहे. बाबा साक्षात्कार घडवतात. पतिताला आपल्या विकर्मांचा दंड
जरूर भोगावा लागतो. शेवटचा कोणता तरी जन्म देऊनच सजा देतील. मनुष्य तनामध्येच सजा
भोगणार म्हणून शरीर जरूर धारण करावे लागते. आत्मा फील करते, आपण सजा भोगत आहोत. जसे
काशी-कलवट करतेवेळी सजा भोगतात, केलेल्या पापांचा साक्षात्कार होतो. तेव्हाच तर
म्हणतात क्षमा करा भगवान, आम्ही पुन्हा असे करणार नाही. हे सर्व साक्षात्कारा
मध्येच क्षमा मागतात. अनुभव करतात, दुःख भोगतात. सर्वात जास्त महत्त्व आहे आत्मा आणि
परमात्म्याचे. आत्माच ८४ जन्मांचा पार्ट बजावते. तर सर्वात पॉवरफुल आत्मा झाली ना.
संपूर्ण ड्रामामध्ये आत्मा आणि परमात्म्याचे महत्त्व आहे. ज्याला इतर कोणीही जाणत
नाहीत. एकही मनुष्य हे जाणत नाही की, आत्मा काय आहे, परमात्मा काय आहेत? ड्रामा
अनुसार हे देखील होणारच आहे. तुम्हा मुलांना देखील ज्ञान आहे की, ही काही नवीन
गोष्ट नाही, कल्पापूर्वी देखील हे झाले होते. म्हणतात देखील ज्ञान, भक्ती, वैराग्य.
परंतु अर्थ समजत नाहीत. बाबांनी (ब्रह्मा बाबांनी) या साधू इत्यादींचा संग खूप
केलेला आहे, फक्त शब्द बोलतात. आता तुम्ही मुले चांगल्या रीतीने जाणता की, आपण
जुन्या दुनियेमधून नवीन दुनियेमध्ये जात आहोत तर जुन्या दुनियेचे जरूर वैराग्य करावे
लागेल. याच्याशी काय मन लावायचे आहे. तुम्ही प्रतिज्ञा केली आहे - कोणत्याही
देहधारीवर मन जडू देणार नाही. आत्मा म्हणते आम्ही एका बाबांचीच आठवण करणार. आपल्या
देहाची सुद्धा आठवण करणार नाही. बाबा देहा सहित सर्वांचा संन्यास करायला लावतात. मग
दुसऱ्यांच्या देहाचा आपण मोह का ठेवायचा. कोणामध्ये मोह असेल तर त्याची आठवण येत
राहील. मग ईश्वराची आठवण येऊ शकणार नाही. प्रतिज्ञा तोडतात तर सजा देखील खूप खावी
लागते, पद सुद्धा भ्रष्ट होते म्हणून जितके होईल तितकी बाबांचीच आठवण करायची आहे.
माया तर खूप धोकेबाज आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मायेपासून स्वतःला वाचवायचे आहे.
देह-अभिमान अतिशय अवघड आजार आहे. बाबा म्हणतात - आता देही-अभिमानी बना. बाबांची
आठवण करा तर देह-अभिमानाचा आजार निघून जाईल. संपूर्ण दिवस देह-अभिमानामध्ये राहतात.
खूप मुश्किलीने बाबांची आठवण करतात. बाबांनी सांगितले आहे - ‘हथ कार डे दिल यार
डे’. जसे आशिक-माशुक आपला कामधंदा करताना सुद्धा आपल्या माशुकचीच आठवण करत असतात.
आता तुम्हा आत्म्यांना परमात्म्या सोबत प्रीत ठेवायची आहे तर त्यांचीच आठवण केली
पाहिजे ना. तुमचे एम ऑब्जेक्टच आहे की आपल्याला देवी-देवता बनायचे आहे, त्याच्यासाठी
पुरुषार्थ करायचा आहे. माया धोका तर जरूर देईल, स्वतःला तिच्यापासून वाचवायचे आहे.
नाहीतर अडकून मराल, मग बदनामी सुद्धा होईल, नुकसानही खूप होईल.
तुम्ही मुले जाणता की
आपण आत्मा बिंदू आहोत, आपले बाबा देखील बीजरूप नॉलेजफुल आहेत. या अतिशय वंडरफुल
गोष्टी आहेत. आत्मा काय आहे, तिच्यामध्ये कसा अविनाशी पार्ट भरलेला आहे - या गुढ
गोष्टींना चांगली-चांगली मुले देखील नीटसे समजत नाहीत. स्वतःला यथार्थ रीतीने आत्मा
समजून आणि बाबांना देखील बिंदू प्रमाणे समजून आठवण करा, ते ज्ञानाचे सागर आहेत,
बिजरूप आहेत… असे समजून फार मुश्किलीने कोणी आठवण करतात. स्थूल विचाराने नाही,
यामध्ये महीन बुद्धीने काम करावे लागेल - आपण आत्मा आहोत, आपले बाबा आलेले आहेत, ते
बिजरूप नॉलेजफुल आहेत. आम्हाला ज्ञान ऐकवत आहेत. धारणा देखील मज छोट्याशा
आत्म्यामध्ये होते. असे खूप आहेत जे स्थूल रीतीने केवळ म्हणतात - आत्मा और परमात्मा…
परंतु यथार्थ रीतीने बुद्धीमध्ये काही येत नाही. काहीच नसण्यापेक्षा तर स्थूल रीतीने
आठवण करणे देखील ठीक आहे. परंतु ती यथार्थ आठवण जास्त लाभदायक आहे. ते इतके उच्च पद
प्राप्त करू शकणार नाहीत. यामध्ये खूप मेहनत आहे. मी आत्मा छोटीशी बिंदू आहे, बाबा
देखील छोट्याशा बिंदू प्रमाणे आहेत, त्यांच्यामध्ये संपूर्ण ज्ञान आहे, हे देखील इथे
तुम्ही बसले आहात त्यामुळे थोडेफार बुद्धीमध्ये येते परंतु चालता-फिरता ते चिंतन
चालेल, ते होत नाही. विसरून जातात. संपूर्ण दिवस हेच चिंतन रहावे - हीच आहे खरी-खरी
आठवण. कोणी खरे सांगत नाहीत की, आपण कसे आठवण करतो. चार्ट भले पाठवतात परंतु हे
लिहीत नाहीत की, असे स्वतःला बिंदू समजून बाबांना देखील बिंदू समजून आठवण करतो.
पूर्ण सच्चाईने लिहीत नाहीत. भले खूप चांगली मुरली चालवतात परंतु योग खूप कमी आहे.
देह-अभिमान खूप आहे, या गुप्त गोष्टी पूर्णपणे समजत नाहीत, चिंतन करत नाहीत.
आठवणीनेच पावन बनायचे आहे. पहिले तर कर्मातीत अवस्था पाहिजे ना. तेच उच्च पद
प्राप्त करू शकतील. बाकी मुरली वाजविणारे तर पुष्कळ आहेत. परंतु बाबा जाणतात
योगामध्ये राहू शकत नाहीत. विश्वाचे मालक बनणे काही मावशीचे घर थोडेच आहे. ती अल्प
काळाची पदे मिळविण्यासाठी देखील किती शिकतात. परंतु सोर्स ऑफ इन्कम आता झाले आहे.
अगोदर थोडेच बॅरिस्टर इत्यादी इतकी कमाई करत होते. आता किती कमाई झाली आहे.
मुलांना आपल्या
कल्याणासाठी एक तर स्वतःला आत्मा समजून यथार्थ रीतीने बाबांची आठवण करायची आहे आणि
‘त्रिमूर्ती शिव’चा परिचय इतरांना देखील द्यायचा आहे. केवळ ‘शिव’ म्हटल्याने समजणार
नाहीत. त्रिमूर्ती तर जरूर पाहिजे. मुख्य आहेतच दोन चित्रे त्रिमूर्ती आणि झाड. शिडी
पेक्षाही झाडाच्या चित्रामध्ये जास्त नॉलेज आहे. हे चित्र तर सर्वांकडे असायला हवे.
एकीकडे त्रिमूर्ती गोळा, दुसरीकडे झाड. हा पांडवसेनेचा झेंडा असला पाहिजे. ड्रामा
आणि झाडाचे नॉलेज देखील बाबाच देतात. लक्ष्मी-नारायण, विष्णू इत्यादी कोण आहेत? हे
कोणीच समजत नाहीत. महालक्ष्मीची पूजा करतात, असे समजतात की, लक्ष्मी येईल. आता
लक्ष्मीकडे धन कुठून येणार? ४ भुजा वाली, ८ भुजा वाली किती चित्रे बनवली आहेत. समजत
काहीच नाहीत. ८-१० भुजा वाला कोणी मनुष्य तर असू शकत नाही. ज्याला जसे आले तसे
बनविले, आणि सुरूवात झाली. कोणी सल्ला दिला की, हनुमानाची पूजा करा; बस्स, सुरूवात
केली. दाखवतात संजीवनी बुटी घेऊन आला… त्याचा देखील अर्थ तुम्ही मुलेच समजता.
संजीवनी बुटी तर आहे मनमनाभव! विचार केला जातो जोपर्यंत ब्राह्मण बनत नाहीत, बाबांचा
परिचय मिळत नाही तोपर्यंत वर्थ नॉट ए पेनी आहेत. लोकांना आपल्या पदाचा किती अभिमान
आहे. त्यांना तर समजावून सांगताना मोठी अडचण होते. राजाई स्थापन करण्यामध्ये किती
मेहनत घ्यावी लागते. ते आहे बाहुबळ, हे आहे योगबळ. या गोष्टी शास्त्रांमध्ये काही
नाहीत. वास्तविक तुम्ही कोणते शास्त्र इत्यादी रेफर करू शकत नाही (संदर्भ देऊ शकत
नाही). जेव्हा तुम्हाला विचारतात - तुम्ही शास्त्रांना मानता का? तर बोला - हो, ही
तर सर्व भक्तिमार्गाची आहेत. आता आम्ही ज्ञान मार्गावर चालत आहोत. ज्ञान देणारे
ज्ञानाचे सागर एक बाबाच आहेत, त्याला रुहानी ज्ञान म्हटले जाते. रूह बसून रूहला
ज्ञान देते. ते मनुष्य, मनुष्याला देतात. मनुष्य कधी स्पिरिच्युअल नॉलेज देऊ शकत
नाही. ज्ञानाचे सागर पतित-पावन, लिब्रेटर, सद्गती दाता एक बाबाच आहेत.
बाबा समजावत राहतात
असे-असे करा. आता पहा शिव जयंतीवर किती गदारोळ माजवतात. ट्रान्सलाईटची चित्रे छोटी
देखील असावीत जी सर्वांना मिळतील. तुमची तर आहे एकदम नवीन गोष्ट. कोणी समजू शकत नाही.
अनेक वर्तमानपत्रांमध्ये टाकायला पाहिजे. जाहिरात केली पाहिजे. सेंटर्स उघडणारे
देखील तसे पाहिजेत. आता तुम्हा मुलांना इतका नशा चढलेला नाही आहे. नंबरवार
पुरुषार्थानुसार समजावून सांगतात. इतके सारे ब्रह्माकुमार-ब्रह्माकुमारी आहेत. अच्छा,
ब्रह्माचे नाव काढून कोणाचेही नाव टाका. राधे-कृष्णाचे नाव टाका. अच्छा मग
ब्रह्माकुमार-कुमारी कुठून येतील? कोणीतरी ब्रह्मा पाहिजे ना, जेणेकरून मुख वंशावली
बी. के. बनतील. पुढे चालून मुलांना खूप काही समजेल. खर्च तर करावाच लागतो. चित्र तर
खूप क्लियर आहेत. लक्ष्मी-नारायणाचे चित्र खूप चांगले आहे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या सेवायोग्य, आज्ञाधारक, फरमानबरदार नंबरवार पुरुषार्थानुसार
मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा
आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) कर्मातीत
बनण्याकरिता बाबांना महीन बुद्धीद्वारे ओळखून यथार्थ आठवण करायची आहे. शिक्षणा सोबत
योगावर पूर्ण अटेंशन द्यायचे आहे.
२) स्वतःला मायेच्या
धोक्यापासून वाचवायचे आहे. कोणाच्याही देहामध्ये मोह ठेवायचा नाही. खरी प्रीत एका
बाबांसोबत ठेवायची आहे. देह-अभिमानामध्ये यायचे नाही.
वरदान:-
ब्रह्म-मुहूर्ताच्या वेळी वरदान घेणारे आणि दान देणारे बाप समान वरदानी, महादानी भव
ब्रह्म-मुहूर्ताच्या
वेळी विशेष ब्रह्मलोक निवासी बाबा ज्ञान सूर्याची लाईट आणि माइटची किरणे मुलांना
वरदान रूपामध्ये देतात. त्याच सोबत ब्रह्मा बाबा भाग्य विधात्याच्या रूपामध्ये
भाग्य रुपी अमृत वाटतात; फक्त बुद्धी रुपी कलश (Pause घेणे) अमृत धारण करण्यायोग्य
असावा. कोणत्याही प्रकारचे विघ्न अथवा व्यत्यय नसावा, तर संपूर्ण दिवसाकरिता
श्रेष्ठ स्थिती किंवा कार्याचा मुहूर्त काढू शकता कारण अमृतवेलेचे वातावरणच वृत्तीला
बदलणारे असते म्हणून त्यावेळी वरदान घेत असताना दान द्या अर्थात वरदानी आणि महादानी
बना.
बोधवाक्य:-
क्रोधीचे काम
आहे क्रोध करणे आणि तुमचे काम आहे स्नेह देणे.
आपल्या शक्तिशाली
मन्साद्वारे सकाश देण्याची सेवा करा:-
आता स्व कल्याणाचा असा
श्रेष्ठ प्लॅन बनवा जेणेकरून विश्व सेवेमध्ये आपोआप सकाश मिळत राहील. आता
उमंग-उत्साहाने आपल्या मनामध्ये ही पक्की प्रतिज्ञा करा की, आम्ही बाप समान बनून
दाखवणार. ब्रह्मा बाबांचे देखील मुलांवर अति प्रेम आहे म्हणून एका-एका मुलाला इमर्ज
करून विशेष समान बनण्याची सकाश देत राहतात.