09-03-25    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   20.03.2004  ओम शान्ति   मधुबन


“या वर्षाला विशेष जीवनमुक्त वर्षाच्या रूपामध्ये साजरे करा, एकता आणि एकाग्रतेद्वारे बाबांची प्रत्यक्षता करा”


आज स्नेहाचे सागर चोहो बाजूंच्या स्नेही मुलांना बघत आहेत. बाबांचे देखील मुलांवर हृदयापासून अविनाशी प्रेम आहे आणि मुलांचे सुद्धा दिलाराम बाबांवर हृदयापासून प्रेम आहे. हे परमात्म प्रेम, हृदयापासूनचे प्रेम फक्त बाबा आणि ब्राह्मण मुलेच जाणतात. परमात्म स्नेहाचे पात्र केवळ तुम्ही ब्राह्मण आत्मेच आहात. भक्त-आत्मे परमात्म प्रेमासाठी तहानलेले आहेत, बोलावत आहेत. तुम्ही भाग्यवान ब्राह्मण-आत्मे त्या प्रेमाच्या प्राप्तिसाठी पात्र आहात. बापदादा जाणतात की मुलांचे विशेष प्रेम का आहे, कारण या वेळीच सर्व खजिन्यांच्या मालकाद्वारे सर्व खजिने प्राप्त होतात. जे खजिने फक्त आत्ताचा एक जन्मच चालत नाहीत परंतु अनेक जन्मांपर्यंत हे अविनाशी खजिने तुमच्या सोबत चालतात. तुम्ही सर्व ब्राह्मण आत्मे या दुनियेसारखे रिकाम्या हाताने जाणार नाही, सर्व खजिने सोबत राहतील. तर अशा अविनाशी खजिन्यांच्या प्राप्तीचा नशा राहतो ना! आणि सर्व मुलांनी अविनाशी खजिने जमा केलेले आहेत ना! जमा केल्याचा नशा, जमा केल्याचा आनंद सुद्धा कायम राहतो. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर खजिन्यांच्या जमेची झलक दिसून येते. जाणता ना - बाबांद्वारे कोणते खजिने प्राप्त आहेत? कधी आपल्या जमेचे खाते चेक करता का? बाबा तर सर्व मुलांना प्रत्येक खजिना अक्षय देतात. कोणाला कमी, कोणाला जास्त देत नाहीत. प्रत्येक मूल अक्षय, अखंड, अविनाशी खजिन्यांचा मालक आहे. बालक बनणे अर्थात खजिन्यांचा मालक बनणे. तर इमर्ज करा बापदादांनी किती खजिने दिले आहेत.

सर्वात पहिला खजिना आहे - ज्ञान-धन, तर सर्वांना ज्ञान-धन मिळाले आहे का? मिळाले आहे की मिळायचे आहे? अच्छा, जमा देखील आहे? की थोडे जमा आहे थोडे संपून गेले आहे? ज्ञान-धन अर्थात बुद्धिवान बनून, त्रिकालदर्शी बनून कर्म करणे. नॉलेजफुल बनणे. फुल नॉलेज आणि तिन्ही काळांचे नॉलेज याला समजून घेऊन ज्ञान-धनाला कार्यामध्ये लावणे. या ज्ञानाच्या खजिन्यामुळे प्रत्यक्ष जीवनामध्ये, प्रत्येक कार्यामध्ये युज केल्यामुळे विधीने सिद्धी मिळते ज्याद्वारे अनेक बंधनांपासून मुक्ति आणि जीवनमुक्ती मिळते. असा अनुभव करता का? असे नाही की सतयुगामध्ये जीवनमुक्ती मिळेल, आत्ता सुद्धा या संगमाच्या जीवनामध्ये देखील अनेक हदच्या बंधनांपासून मुक्ति मिळते. जीवन, बंधन-मुक्त बनते. जाणता ना, किती बंधनांपासून फ्री झाला आहात! किती प्रकारच्या ‘हाय-हाय’ पासून मुक्त झाला आहात! आणि सदैव ‘हाय-हाय’ समाप्त, ‘वाह! वाह!’ चे गाणे गात राहता. जर कोणत्याही गोष्टीमध्ये थोडाजरी मुखावाटेच नाही परंतु संकल्प मात्र देखील, स्वप्न मात्र देखील ‘हाय…’ मनामध्ये येत असेल तर जीवन-मुक्त नाही आहात. ‘वाह! वाह! वाह!’ असे आहे? मातांनो, ‘हाय-हाय’ तर करत नाही ना? नाही? कधी-कधी करतात? पांडव करता का? मुखावाटे भले करत नसाल परंतु मनामध्ये संकल्प मात्र देखील जर कोणत्याही गोष्टीसाठी ‘हाय’ असेल तर ‘फ्लाय’ नाही. ‘हाय’ अर्थात बंधन आणि ‘फ्लाय’ आहे उडती कला अर्थात जीवन-मुक्त, बंधन-मुक्त. तर चेक करा कारण की ब्राह्मण आत्मे जोपर्यंत स्वतः बंधन मुक्त होत नाहीत, कोणतीही सोन्याची, हिऱ्याची रॉयल बंधनाची दोरी बांधलेली असेल तर सर्व आत्म्यांसाठी मुक्तीचे गेट उघडू शकत नाही. तुमच्या बंधनमुक्त बनण्याने सर्व आत्म्यांसाठी मुक्तीचे गेट उघडणार आहे. तर गेट उघडण्याची अथवा सर्व आत्म्यांना दुःख, अशांतीपासून मुक्त करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे.

तर चेक करा - आपली जबाबदारी कितपत निभावली आहे? तुम्ही सर्वांनी बापदादांसोबत विश्व परिवर्तनाचे कार्य करण्याचा ठेका उचलला आहे. ठेकेदार आहात, जबाबदार आहात. जर बाबांनी म्हटले तर सर्वकाही करू शकतात परंतु बाबांचे मुलांवर प्रेम आहे, एकटे करू इच्छित नाहीत, तुम्हा सर्व मुलांना अवतरित होताच आपल्यासोबत अवतरित केले आहे. शिवरात्री साजरी केली होती ना! तर कोणाची साजरी केलीत? फक्त बापदादांची केलीत का? तुम्हा सर्वांची साजरी केलीत ना! बाबांचे सुरुवातीपासून शेवटपर्यंत सोबती आहात. तर हा नशा आहे - सुरुवातीपासून शेवटपर्यंत सोबती आहोत, भगवंताचे सोबती आहोत.

तर बापदादांना आता या वर्षाच्या सीझनचा शेवटचा पार्ट बजावण्यामध्ये सर्व मुलांकडून हेच हवे आहे - सांगू, काय हवे आहे? करावे लागेल. फक्त ऐकावे लागणार नाही परंतु करावेच लागेल. ठीक आहे टीचर्स? टीचर्स हात वर करा. टीचर्स पंखे सुद्धा हलवत आहेत, गरम होत आहे. अच्छा, सर्व टीचर्स करणार आणि करवून घेणार का? करवून घेणार, करणार ना? चांगले आहे. वारासुद्धा घेत आहेत, हातही हलवत आहेत. दृश्य छान वाटत आहे. खूप छान. तर बापदादा या सीझनच्या समाप्ती समारोहाला एक नवीन प्रकारची दीपमाळा साजरी करू इच्छितात. समजले! नवीन प्रकारची दीपमाळा साजरी करू इच्छितात. तर तुम्ही सर्वजण दीपमाळा साजरी करण्यासाठी तयार आहात का? जे तयार आहेत त्यांनी हात वर करा. असेच हो म्हणू नका. बापदादांना खुश करण्यासाठी हात वर उचलू नका, मनापासून हात वर करा. अच्छा. बापदादा आपल्या मनातील आशा पूर्ण करणारे दीपक जागृत झालेले पाहू इच्छितात. तर बापदादांच्या आशेच्या दीपकांची दीपमाळा साजरी करू इच्छितात. समजले, कोणती दीपावली? स्पष्ट झाले?

तर बापदादांच्या आशेचे दीपक कोणते आहेत? मागच्या वर्षापासून, या वर्षाचा सिझन देखील पूर्ण झाला. बापदादांनी म्हटले होते - तुम्ही देखील सर्वांनी संकल्प केला होता, लक्षात आहे? काहींनी तो संकल्प फक्त संकल्प करण्यापर्यंत पूर्ण केला आहे, काहींनी अर्धा संकल्प पूर्ण केला आहे आणि काहीजण विचार करतात परंतु विचार, (pause) विचार करण्यापर्यंतच आहे. तर तो संकल्प कोणता आहे? काही नवीन गोष्ट नाहीये, जुनीच गोष्ट आहे - स्व-परिवर्तनातून सर्व परिवर्तन. विश्वाची गोष्ट तर सोडाच परंतु बापदादा स्व-परिवर्तनाने ब्राह्मण परिवार परिवर्तन, हे पाहू इच्छितात. आता हे ऐकू इच्छित नाहीत की, ‘असे झाले तर असे होईल. हा बदलेल तर मी बदलेन, हा करेल तर मी करेन…’ यामध्ये विशेष प्रत्येक मुलाला ब्रह्माबाबा विशेष करून हे सांगत आहेत की, मज समान ‘हे अर्जुन’ बना… यामध्ये पहिला मी, अगोदर तो नाही, अगोदर मी. हा “मी” कल्याणकारी ‘मी’ आहे. बाकी हदचे ‘मी-मी’ खाली आणणारे आहेत. यासाठी जी म्हण आहे - ‘जो ओटे सो अर्जुन, तर अर्जुन अर्थात नंबरवन’. नंबरवार नाही नंबरवन. तर तुम्ही दुसऱ्या नंबरचे बनू इच्छिता की नंबर वन बनू इच्छिता? बऱ्याच कामामध्ये बापदादांनी पाहिले आहे - गमतीची गोष्ट, परिवाराची गोष्ट सांगतो. परिवार बसला आहे ना! काही अशी कामे असतात तर बापदादांकडे समाचार येतात, तर बरीच कामे अशी असतात, अनेक प्रोग्राम्स असे असतात जे विशेष आत्म्यांच्या निमित्त असतात. तर बापदादांकडे, दादींकडे समाचार येतात, कारण साकारमध्ये तर दादीच आहेत. बापदादांकडे तर संकल्प पोहोचतात. तर कोणता संकल्प पोहोचतो? ‘माझे सुद्धा नाव यामध्ये असायला हवे, मी काय कमी आहे! माझे नाव का नाही!’ तर बाबा म्हणतात - ‘हे अर्जुन’ यामध्ये तुमचे नाव का नाही! असायला हवे ना! का असता कामा नये? असायला हवे? समोर महारथी बसले आहेत, असायला हवे ना! असायला हवे का? तर ब्रह्मा बाबांनी जे करून दाखवले, कोणाला पाहिले नाही, ‘हे करत नाहीत, ते करत नाहीत’, नाही. अगोदर मी. या ‘मी’मध्ये जे या पूर्वी ऐकवले होते अनेक प्रकारचे रॉयल रूपातील मी, ऐकवले होते ना! ते सर्व समाप्त होऊन जातात. तर बापदादांच्या या सीझनच्या समाप्तीला याच आशा आहेत की, प्रत्येक मुलाने जे ब्रह्माकुमार, ब्रह्माकुमारी म्हणवून घेतात, मानतात, जाणतात, त्या प्रत्येक ब्राह्मण आत्म्याने जी काही संकल्प रूपामध्ये सुद्धा हदची बंधने आहेत, त्या बंधनातून मुक्त व्हावे. ब्रह्मा बाप समान बंधनमुक्त, जीवनमुक्त. ब्राह्मण जीवन मुक्त, साधारण जीवन मुक्त नाही, ब्राह्मण श्रेष्ठ जीवनमुक्तीचे हे विशेष वर्ष साजरे करावे. प्रत्येक आत्मा जितके आपल्या सूक्ष्म बंधनांना जाणते, तितके दुसरे कोणीही जाणू शकत नाही. बापदादा तर जाणतात कारण बापदादांपाशी तर टी. व्ही. आहे, मनाचा टी. व्ही., स्थूल टी. व्ही. नाही, मनाचा टी. व्ही. आहे. तर काय आता पुन्हा जो सिझन होईल, सिझन तर सुरु होणारच ना का सुट्टी घ्यायची? एक वर्ष सुट्टी घ्यायची? नको? निदान एक वर्ष तरी सुट्टी असली पाहिजे? नको आहे? पांडव एक वर्ष सुट्टी घ्यायची? (दादी हो म्हणत आहे, महिन्यामध्ये १५ दिवसांची सुट्टी) अच्छा. खूप छान, सगळे म्हणत आहेत, जे म्हणतात सुट्टी घ्यायची नाहीये त्यांनी हात वर करा. घ्यायला नको? अच्छा. वरती गॅलरीमध्ये बसलेले हात हलवत नाही आहेत. (संपूर्ण सभेने हात हलवला) खूप छान. बाबा तर नेहमी मुलांना ‘हाँ जी’, ‘हाँ जी’ करतात, ठीक आहे. आता मुले बाबांना ‘हाँ जी’ कधी करतील! बाबांकडून तर ‘हाँ जी’ करून घेतलेत, तर बाबा म्हणत आहेत, बाबा सुद्धा आता एक अट घालणार, अट मंजूर होईल? सर्वांनी ‘हाँ जी’ तर करा. नक्की? जरासुद्धा टाळाटाळ करणार नाही ना? आता सर्वांचे चेहरे टी. व्ही. मध्ये शूट करा. चांगले आहे. बाबांनाही आनंद होतो की सर्व मुले हाँ जी, हाँ जी करणारी आहेत.

तर बापदादा हेच इच्छितात की कोणतेही कारण सांगायचे नाही, ‘हे कारण आहे, हे कारण आहे, म्हणून हे बंधन आहे!’ समस्या नाही, समाधान स्वरूप बनायचे आहे आणि साथीदारांनाही बनवायचे आहे कारण काळाची हालत तर बघत आहात. भ्रष्टाचाराचे प्रमाण किती वाढत चालले आहे. भ्रष्टाचार, अत्याचार अतिमध्ये जात आहे. तर श्रेष्ठाचाराचा झेंडा पहिला ब्राह्मण आत्म्याच्या मनामध्ये फडकावा, तेव्हा विश्वामध्ये फडकेल. किती शिवरात्री साजऱ्या केल्यात! प्रत्येक शिवरात्रीला हाच संकल्प करता की, विश्वामध्ये बाबांचा झेंडा फडकवायचा आहे. विश्वामध्ये हा प्रत्यक्षतेचा झेंडा फडकविण्यापूर्वी प्रत्येक ब्राह्मणाला आपल्या मनामध्ये सदैव दिलतख्तावर बाबांचा झेंडा फडकवावा लागेल. या झेंड्याला फडकविण्यासाठी प्रत्येक कर्मामध्ये फक्त दोन शब्द आणावे लागतील. कर्मामध्ये आणा, संकल्पामध्ये नाही, बुद्धीमध्ये नाही. मनामध्ये, कर्मामध्ये, संबंधामध्ये, संपर्कामध्ये आणावे लागतील. काही अवघड शब्द नाही आहेत कॉमन शब्द आहेत. ते आहेत - एक आहे - सर्व संबंध-संपर्कामध्ये आपसामध्ये एकता. अनेक संस्कार असतानाही, अनेकतेमध्ये एकता. आणि दुसरा आहे - जो कोणता श्रेष्ठ संकल्प करता, बापदादांना खूप चांगला वाटतो, जेव्हा तुम्ही संकल्प करता ना, तर बापदादा तो संकल्प पाहून, ऐकून खूप खुश होतात, वाह! वाह! बच्चे वाह! वाह! श्रेष्ठ संकल्प वाह! परंतु, परंतु… येतो. येता कामा नये परंतु येतो. संकल्प मेजॉरिटी, मेजॉरिटी अर्थात ९० टक्के, बऱ्याच मुलांचे खूप चांगले-चांगले असतात. बापदादा समजतात आज या मुलाचा संकल्प खूप चांगला आहे, प्रोग्रेस होईल परंतु बोलण्यामध्ये थोडा अर्धा कमी होऊन जातो, कर्मामध्ये मग पाव कमी होतो, मिक्स होतो. कारण काय आहे? संकल्पामध्ये एकाग्रता, दृढता नाही आहे. जर संकल्पामध्ये एकाग्रता असती तर एकाग्रता सफलतेचे साधन आहे. दृढता सफलतेचे साधन आहे. त्यामध्ये फरक पडतो. कारण काय? रिझल्टमध्ये बापदादा एकच गोष्ट बघतात ती म्हणजे मुले दुसऱ्यांकडे जास्त बघतात. तुम्ही लोक बोलता ना, (बापदादांनी एक बोट पुढे करून कृती करून दाखवली) असे करतात, तर एक बोट दुसऱ्याकडे आणि चार स्वतःकडे आहेत. तर चारला बघत नाहीत, एकाला खूप बघतात त्यामुळे दृढता आणि एकाग्रता, एकता डळमळीत होते. ‘हा करेल तर मी करेन’, यामध्ये ‘ओटे अर्जुन’ बनतात, त्यामध्ये दुसरा नंबर बनतात. नाहीतर तुमचे स्लोगन बदलून टाका. ‘स्व-परिवर्तनातून विश्व परिवर्तन’ या ऐवजी - ‘विश्व परिवर्तनातून स्व-परिवर्तन’ असे करा. दुसऱ्यांच्या परिवर्तनातून स्व-परिवर्तन. बदलायचे का? बदलून टाकायचे? नाही बदलायचे? तर मग बापदादा देखील एक अट घालत आहेत, मंजूर आहे, सांगू? बापदादा ६ महिने रिझल्ट बघतील, मग येतील, नाहीतर येणार नाहीत. जर बाबांनी ‘हाँ जी’ केले आहे, तर मग मुलांनी देखील ‘हाँ जी’ केले पाहिजे ना! काहीही होवो, बापदादा तर म्हणतात, स्व-परिवर्तनासाठी या हदच्या ‘मी’पणापासून मरावे लागेल, ‘मी’पणापासून मरा, शरीराने नका मरू. शरीराने मरायचे नाही, ‘मी’पणापासून मरायचे आहे. ‘मी राइट आहे, मी असा आहे, मी काय कमी आहे, मीच सर्व काही आहे’, या ‘मी’पणापासून मरायचे आहे. तर मरावे सुद्धा लागले तरीही हा मृत्यु खूप गोड मृत्यु आहे. हे मरणे नाही आहे, २१ जन्म राज्य भाग्यामध्ये जगणे आहे. तर मंजूर आहे? मंजूर आहे टीचर्स? डबल फॉरेनर्स? डबल फॉरेनर्स जो संकल्प करतात ना, तो करण्यामध्ये हिंमत ठेवतात, ही त्यांची विशेषता आहे. आणि भारतवासी ट्रिपल हिंमतवाले आहेत, ते डबल तर हे ट्रिपल. तर बापदादा हेच पाहू इच्छितात. समजले! हाच बापदादांच्या श्रेष्ठ आशेचा दीपक, प्रत्येक मुलामध्ये जागृत झालेला पाहू इच्छितात. आता या वेळी ही दिवाळी साजरी करा. भले ६ महिन्यानंतर साजरी करा. मग जेव्हा बापदादा दीपावलीचा समारोह बघतील नंतर आपला प्रोग्राम देतील. करायचे तर आहेच. तुम्ही नाही केलेत तर दुसरे मागचे करणार काय! माळा तर तुमची आहे ना! १६१०८ मध्ये तर तुम्ही जुनेच येणार आहात ना. नवीन तर नंतर मागाहून येतील. हो, काहीजण लास्ट सो फास्ट येतील. कोणी तर उदाहरण बनतील जे लास्ट सो फास्ट जातील, फर्स्ट येतील. परंतु थोडे. बाकी तर तुम्हीच आहात, तुम्हीच प्रत्येक कल्पामध्ये बनले आहात, तुम्हीच बनणार आहात. भले कुठेही बसला आहात, विदेशामध्ये बसला आहात, देशामध्ये बसला आहात परंतु तुम्ही जे पक्के निश्चयबुद्धी खूप काळाचे आहात, ते अधिकारी आहातच आहात. बापदादांचे प्रेम आहे ना, तर जे बहुतकाळाचे चांगले पुरुषार्थी, संपूर्ण पुरुषार्थी नाही, परंतु चांगले पुरुषार्थी बनले आहेत त्यांना बापदादा सोडून जाणार नाहीत, सोबतच घेऊन जातील. त्यामुळे पक्का, निश्चय करा आम्हीच होतो, आम्हीच आहोत, आम्हीच सोबत राहणार. ठीक आहे ना! पक्के आहे ना? बस, फक्त शुभ चिंतक, शुभ चिंतन, शुभ भावना, परिवर्तनाची भावना, सहयोग देण्याची भावना, दयाळूपणाची भावना इमर्ज करा. आता मर्ज करून ठेवली आहे. इमर्ज करा. जास्त शिकवत बसू नका, क्षमा करा. एकमेकांना शिकवण्यामध्ये सर्वजण हुशार आहेत परंतु क्षमेसोबत शिकवण द्या. मुरली ऐकवणे, कोर्स करणे किंवा जे काही तुम्ही प्रोग्राम्स चालवता, त्यामध्ये भले शिकवा, परंतु आपसामध्ये जेव्हा व्यवहारामध्ये येता तेव्हा क्षमेसोबत शिकवण द्या. फक्त शिकवू नका, दयाळू बनून शिकवा तर तुमचा दयाळूपणा असे काम करेल की समोरच्याची कमजोरी माफ होईल. समजले. अच्छा.

आता एका सेकंदामध्ये मनाचे मालक बनून मनाला जितका वेळ पाहिजे तितका वेळ एकाग्र करू शकता का? करू शकता? तर आता ही रुहानी एक्सरसाइज करा. पूर्णतः मनाची एकाग्रता असावी. संकल्पामध्ये सुद्धा खळबळ नको. अचल. अच्छा.

चोहो बाजूंच्या सर्व अविनाशी अखंड खजिन्यांचे मालक, सदैव संगमयुगी श्रेष्ठ बंधनमुक्त, जीवनमुक्त स्थितीमध्ये स्थित राहणारे, सदैव बापदादांच्या आशेला पूर्ण करणारे, सदैव एकता आणि एकाग्रतेच्या शक्तिने संपन्न मास्टर सर्व शक्तिवान आत्म्यांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.

चोहो बाजूंना दूर बसलेल्या मुलांना, ज्यांनी प्रेमपूर्वक आठवण पाठवली आहे, पत्रे पाठवली आहेत, त्यांना सुद्धा बापदादा खूप-खूप अंतःकरणापासून प्रेमासहित प्रेमपूर्वक आठवण देत आहेत. त्याच सोबत बऱ्याच मुलांनी मधुबनच्या रिफ्रेशमेंटची खूप सुंदर-सुंदर पत्रे पाठवली आहेत, त्या मुलांनाही विशेष प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.

वरदान:-
जे होऊन गेले आहे त्याला चिंतनामध्ये न आणता फुलस्टॉप लावणारे तीव्र पुरुषार्थी भव

आत्तापर्यंत जे काही झाले - त्याला फुलस्टॉप लावा. जे होऊन गेले आहे त्याला चिंतनामध्ये न आणणे - हाच तीव्र पुरुषार्थ आहे. जर कोणी, जे होऊन गेले आहे त्याचे चिंतन करत असेल तर वेळ, शक्ति, संकल्प सर्व वेस्ट होते. आता वेस्ट करण्याची वेळ नाही आहे कारण की संगमयुगाचे दोन क्षण अर्थात दोन सेकंद देखील वेस्ट केले तर अनेक वर्षे वेस्ट केलीत त्यामुळे वेळेच्या महत्वाला जाणून आता जे होऊन गेले आहे त्याला फुलस्टॉप लावा. फुलस्टॉप लावणे अर्थात सर्व खजिन्यांनी फुल बनणे.

सुविचार:-
जेव्हा प्रत्येक संकल्प श्रेष्ठ होईल तेव्हा स्वतःचे आणि विश्वाचे कल्याण होईल.

अव्यक्त इशारे - सत्यता आणि सभ्यता रुपी कल्चरला धारण करा:-

ज्ञानाची कोणतीही गोष्ट ऑथॉरिटी सोबतच, सत्यता आणि सभ्यतेने बोला, संकोचाने नको. प्रत्यक्षता करण्यासाठी आधी स्वतःला प्रत्यक्ष करा, निर्भय बना. भाषणामध्ये शब्द कमी असावेत परंतु असे शक्तिशाली असावेत ज्यामध्ये बाबांचा परिचय आणि स्नेह सामावलेला असावा, जो स्नेहरूपी चुंबक आत्म्यांना परमात्म्याकडे आकर्षित करेल.