09-03-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - जसा बाबांचा पार्ट आहे सर्वांचे कल्याण करण्याचा, असे बाप समान कल्याणकारी बना, आपले आणि सर्वांचे कल्याण करा”

प्रश्न:-
मुलांची कोणती एक विशेषता पाहून बापदादा खूप खुश होतात?

उत्तर:-
गरीब मुले बाबांच्या यज्ञामध्ये ८ आणे, एक रुपया पाठवितात. असे म्हणतात - ‘बाबा, याच्या बदल्यात आम्हाला महाल द्या’. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, हा तुमचा एक रुपया देखील शिवबाबांच्या खजिन्यामध्ये जमा झाला. तुम्हाला २१ जन्मांसाठी महाल मिळतील’. सुदाम्याचे उदाहरण आहे ना. कवडीचाही खर्च न करता तुम्हा मुलांना विश्वाची बादशाही मिळते. बाबा गरीब मुलांच्या या विशेषतेवर खूप खूश होतात.

गीत:-
तुम्हें पाके हमने…

ओम शांती।
गोड-गोड मुले समजतात की बाबांकडून आता बेहदचा वारसा घेत आहोत. मुले म्हणतात की बाबा तुमच्या श्रीमतानुसार आम्ही तुमच्याकडून परत बेहदचा वारसा प्राप्त करत आहोत. नवीन गोष्ट नाहीये. मुलांना नॉलेज मिळाले आहे. तुम्ही जाणता सुखधामचा वारसा आपण कल्प-कल्प घेत राहतो. कल्प-कल्प ८४ जन्म तर घ्यावे लागतात. बरोबर आपण बेहदच्या बाबांद्वारे २१ जन्मांचा वारसा मिळवतो आणि हळू-हळू गमावतो. बाबांनी समजावून सांगितले आहे हा अनादि पूर्वनियोजित खेळ आहे. तुम्हा मुलांना खात्री होत जाते. हे देखील जाणता - ड्रामामध्ये खूप सुख आहे. नंतर शेवटी येऊन रावणाद्वारे दुःख भोगता. आता अजून तुम्ही फार थोडेजण आहात, पुढे चालून खूप वृद्धी होत जाईल. मनुष्यापासून देवता बनता. जरूर मनामध्ये समजणार आम्ही कल्प-कल्प बाबांकडून वारसा प्राप्त करतो. जे-जे येऊन नॉलेज घेतील ते असे समजतील की आता ज्ञान सागर बाबांद्वारे सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे नॉलेज प्राप्त केले आहे. बाबाच ज्ञानाचे सागर, पतितांना पावन बनविणारे आहेत अर्थात मुक्ती-जीवनमुक्तीमध्ये घेऊन जाणारे आहेत. हे देखील तुम्ही आता जाणता. गुरु तर खूप जणांनी केले आहेत ना. शेवटी गुरूंना देखील सोडून येऊन नॉलेज घेतील. तुम्हाला देखील आता हे नॉलेज मिळाले आहे. तुम्ही जाणता - याआधी आपण अज्ञानी होतो, सृष्टीचे चक्र कसे फिरते, शिवबाबा, ब्रह्मा, विष्णू, शंकर कोण आहेत, हे काहीही जाणत नव्हतो. आता माहिती झाले आहे आपण विश्वाचे मालक होतो तर तुमच्या बुद्धीमध्ये खूप चांगला नशा चढलेला राहिला पाहिजे. बाबांची आणि सृष्टी चक्राची आठवण करत राहिली पाहिजे. अल्फ आणि बे. बाबा समजावून सांगतात या आधी तुम्ही काहीच जाणत नव्हतात ना. ना बाबांना, ना त्यांच्या रचनेला जाणत होता. संपूर्ण सृष्टीतील मनुष्य मात्र ना बाबांना, ना रचनेच्या आदि-मध्य-अंताला जाणतात. आता तुम्ही शुद्रापासून ब्राह्मण बनला आहात. बाबा सर्व मुलांसोबत बोलत आहेत. किती असंख्य मुले आहेत. किती सेंटर्स आहेत. आता तर सेंटर्स उघडतील. तर बाबा समजावून सांगतात आधी तुम्ही काहीच जाणत नव्हता. आता नंबरवार पुरुषार्था नुसार जाणले आहे. हे देखील जाणता की, आता आपण बाबांद्वारे पतितापासून पावन बनत आहोत. बाकीचे तर बोलावत राहतात, तुम्ही आहात गुप्त. ब्रह्माकुमार-कुमारी म्हणतात परंतु समजत नाहीत की यांना शिकविणारा कोण आहे? शास्त्रांमध्ये कुठेही लिहिलेले नाहीये. त्याच गीतेचा भगवान शिवबाबांनीच येऊन मुलांना राजयोग शिकविला आहे. हे तुमच्या बुद्धीमध्ये येते ना. गीता देखील तुम्ही वाचली असेल. हे देखील आता समजता - ज्ञान मार्ग अगदी वेगळा आहे. विद्वान पंडित मंडळींकडून शास्त्रे इत्यादी शिकून जे टायटल घेतात ती सर्व भक्तीमार्गाची शास्त्रे आहेत. हे नॉलेज काही त्यांच्याकडे नाही आहे. हे तर बाबाच येऊन रचनेच्या आदि-मध्य-अंताचे नॉलेज देतात. हे तर बाबांनी येऊन तुमच्या बुद्धीचे कुलूप उघडले आहे.

तुम्ही जाणता आधी आपण काय होतो, आता काय बनलो आहोत! बुद्धीमध्ये सारे चक्र आले आहे. सुरुवातीला थोडेच समजत होतो. दिवसेंदिवस ज्ञानाचा तिसरा नेत्र चांगल्या प्रकारे उघडत जातो. हे देखील कोणाला माहित नाही आहे की भगवान केव्हा आले, ते कोण होते-ज्यांनी येऊन गीतेचे ज्ञान ऐकविले. तुम्हा मुलांनी आता जाणले आहे. बुद्धीमध्ये पूर्ण चक्राचे ज्ञान आहे. केव्हापासून आपण हार खातो आणि कसे मग वाम मार्गामध्ये जातो, कशी शिडी उतरतो. हे चित्रांमध्ये किती सोपे करून समजावून सांगितले आहे. ८४ जन्मांची शिडी आहे. कशी उतरतो आणि मग परत चढतो. पतित-पावन कोण आहेत? पतित कोणी बनवले? हे तुम्ही आता जाणता, ते तर फक्त गात राहतात - ‘पतित-पावन’. हे थोडेच समजतात की रावण राज्य कधीपासून सुरु होते? पतित केव्हापासून बनलो? हे नॉलेज आहेच मुळी आदि सनातन देवी-देवता धर्मवाल्यांसाठी. बाबा म्हणतात - ‘मीच आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना केली होती’. हा जगाचा इतिहास-भूगोल बाबां व्यतिरिक्त इतर कोणीही समजावून सांगू शकत नाही. तुमच्यासाठी जणू काही एक कहाणी आहे. कसे राज्य प्राप्त करतो, कसे गमावतो. त्याचा आपण इतिहास-भूगोल शिकतो. ही आहे बेहदची गोष्ट. आपण ८४ चे चक्र कसे फिरतो. आपण विश्वाचे मालक होतो, मग रावणाने राज्य हिसकावून घेतले, हे नॉलेज बाबांनीच दिले आहे. मनुष्य दसरा इत्यादी सण साजरे करतात परंतु नॉलेज अजिबात नाही आहे. जसे तुम्हाला हे नॉलेज नव्हते, आता नॉलेज मिळत आहे तर तुम्ही आनंदामध्ये राहता. नॉलेज आनंद देते. बेहदचे नॉलेज बुद्धीमध्ये आहे. बाबा तुमची झोळी भरत आहेत. म्हणतात ना - ‘झोळी भरा’. कोणाला म्हणतात? साधु-संत इत्यादींना म्हणत नाहीत. भोलेनाथ ‘शिव’ना म्हणतात, त्यांच्याकडेच भीक मागतात. तुमच्या आनंदाला तर आता पारावार नाही. तुम्हाला खूप आनंद झाला पाहिजे. बुद्धीमध्ये किती नॉलेज आले आहे. बेहदच्या बाबांकडून बेहदचा वारसा मिळतो. तर आता आपले आणि दुसऱ्यांचे देखील कल्याण करायचे आहे. सर्वांचे कल्याण करायचे आहे. आधी तर एकमेकांचे अकल्याणच करत होते कारण आसुरी मत होते. आता तुम्ही श्रीमतावर आहात तर आपले स्वतःचे देखील कल्याण करायचे आहे.

तुम्हाला इच्छा होते की, हे बेहदचे शिक्षण सर्वांनी शिकावे, सेंटर्स उघडत जावी. म्हणतात - ‘बाबा, प्रदर्शनी द्या, प्रोजेक्टर द्या आम्ही सेंटर उघडतो. आम्हाला जे नॉलेज मिळाले आहे, ज्यामुळे बेहदच्या आनंदाचा पारा चढला आहे तो इतरांना देखील अनुभव करवावा’. ड्रामा अनुसार हा देखील पुरुषार्थ चालत राहतो. बाबा आले आहेत भारताला पुन्हा स्वर्ग बनविण्यासाठी. तुम्ही जाणता आपण अगोदर नरकवासी होतो, आता स्वर्गवासी बनत आहोत. हे चक्र तुमच्या बुद्धीमध्ये सदैव फिरत राहिले पाहिजे, ज्यामुळे तुम्ही सदैव आनंदात राहाल. इतरांना समजावून सांगण्याचा देखील नशा असावा. आपण बाबांकडून नॉलेज घेत आहोत. तुमचे इतर भाऊ-बहिणी जे जाणत नाहीत त्यांना देखील रस्ता सांगणे हा तुमचा धर्म आहे. जसा बाबांचा पार्ट आहे सर्वांचे कल्याण करणे तसा आमचा देखील पार्ट आहे - सर्वांचे कल्याणकारी बनणे. बाबांनी कल्याणकारी बनविले आहे तर स्वतःचे देखील कल्याण करायचे आहे आणि इतरांचे देखील करायचे आहे. बाबा म्हणतात - तुम्ही अमक्या सेंटरवर जा, जाऊन सेवा करा. एकाच ठिकाणी बसून सेवा करायची नाही. जो जितका हुशार असतो तितकी त्याला आवड असते की, जाऊन आपण सेवा करावी. अमके नवीन सेंटर उघडले आहे, हे तर जाणतात की कोण-कोण सेवाभावी आहेत, कोण-कोण आज्ञाधारक, प्रामाणिक, फरमानबरदार आहेत. अज्ञान काळामध्ये देखील कपूत मुलांवर वडील नाराज असतात. हे तर बेहदचे बाबा म्हणतात - मी अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगतो, यामध्ये घाबरण्याची कोणतीही गोष्ट नाही. हे तर जो करेल तो मिळवेल. शाप अथवा नाराज होण्याचा प्रश्नच नाही. बाबा म्हणतात - चांगली सेवा करून स्वतःचे देखील आणि इतरांचे देखील कल्याण का करत नाही. जितके जे अनेकांचे कल्याण करतात तितका बाबांना देखील आनंद होतो. बगीच्यामध्ये बाबा बघतील की हे फूल किती सुंदर आहे. हा सर्व बगीचा आहे. बगीच्याला बघण्यासाठी म्हणतात - बाबा, आम्ही सेंटरवर फेरी मारून येतो. कशा प्रकारची फुले आहेत! कशी सेवा करत आहेत! गेल्यामुळे माहिती होईल. कसे आनंदामध्ये नाचत राहतात. बाबांना देखील येऊन म्हणत होते - ‘बाबा, अमक्याला आम्ही असे समजावून सांगितले. आज माझ्या पतीला, भावाला घेऊन आले आहे. समजावून सांगितले आहे - बाबा आलेले आहेत, ते हिऱ्यासारखे जीवन कसे बनवितात’. ऐकतात तेव्हा त्यांची देखील इच्छा होते आपण सुद्धा बघावे. तर मुलांना उत्साह येतो, मग त्यांना घेऊन येतात. जगाच्या इतिहास-भूगोलाला जाणून घेतले पाहिजे. तुम्ही जज करू शकता (ठरवू शकता) की भारत पूर्ण विश्वाचा मालक होता. आता तर काय हालत झाली आहे. सतयुग-त्रेतामध्ये किती सुख होते. आता पुन्हा बाबा विश्वाचा मालक बनवत आहेत. हे देखील जाणता की, दुनियेमध्ये शेवटी खूप अंदाधुंदी माजणार आहे. युद्ध काही कधी बंद थोडेच होते. कुठे ना कुठे युद्ध चालूच असते. जिथे बघावे तिथे भांडण-तंटेच आहेत. किती संघर्ष चालू आहे. परदेशामध्ये काय-काय होत आहे. त्यांना समजत नाही की आपण काय करत आहोत. किती वादळे येत राहतात. मनुष्य सुद्धा मरत राहतात. किती दुःखाची दुनिया आहे. तुम्ही मुले जाणता - या दुःखाच्या दुनियेतून बस्स आता गेलो की गेलो. बाबा तर धीर देत आहेत. ही छी-छी दुनिया आहे. थोड्याच दिवसांमध्ये आपण विश्वावर शांतीने राज्य करणार. यामध्ये तर आनंद झाला पाहिजे ना. सेंटर्स उघडत राहतात. आता बघा सेंटर्स उघडतात, बाबा लिहितात - आता चांगल्या हुशार मुलांनो तिथे जा. ज्यांनी हृदयामध्ये स्थान मिळविलेले आहे त्यांची नावे देखील लिहितो. अनेकांचे कल्याण होते. असे बऱ्याच जणी लिहितात - ‘बाबा, आम्ही तर बंधनात आहोत. चांगले सेंटर उघडले तर भरपूर जण येऊन वारसा प्राप्त करतील’. हे देखील जाणता की हे सर्व काही नष्ट होणार आहे तर का नाही अनेकांच्या कल्याणासाठी वापरावे. ड्रामामध्ये त्यांचा असा पार्ट आहे. प्रत्येक जण आपला-आपला पार्ट बजावत आहेत. दया येते. दुसऱ्यांना देखील बंधनमुक्त करण्यासाठी थोडीतरी मदत करावी. त्यांना देखील वारसा घेऊ दे. बाबांना किती काळजी असते. सर्वजण काम-चितेवर जळून मेले आहेत. सर्व कब्रस्तान झाले आहे. म्हणतात देखील - अल्लाह येऊन कब्रस्तानमधून जागे करून सर्वांना घेऊन जातात.

तुम्ही आता समजता की, रावणाने आल्याला कसे पराजित केले आहे. यापूर्वी थोडेच जाणत होता. मी सोनार, लखपती आहे, इतकी मुले आहेत, नशा तर असतो ना. आता समजत आहे मी तर पूर्णपणे पतित होतो. भले जुन्या दुनियेमध्ये कितीही लखपती, करोडपती आहेत परंतु हे सर्व कवडीसमान आहे. आता गेले की गेले. माया देखील किती शक्तिशाली आहे. बाबा म्हणतात - मुलांनो, सेंटर खोला, अनेकांचे कल्याण होईल. गरीब लवकर जागे होतात, श्रीमंत जरा मुश्किलीने जागे होतात. आपल्याच मस्तीमध्ये मस्त असतात. मायेने एकदम आपल्या वश मध्ये केले आहे. समजावून सांगितल्याने समजतात देखील परंतु सोडणार कसे? भीती वाटते की, यांच्यासारखे सर्व काही सोडावे लागेल. भाग्यात नसेल तर या ज्ञानमार्गावर चालू शकत नाहीत. जणू काही यातून (विकारातून) सुटका करून घेणे अवघड आहे. तेवढ्या वेळे पूरते वैराग्य येते - खरोखर ही छी-छी (घाणेरडी) दुनिया आहे. आणि मग तिथले तिथेच राहून जाते. कोटींमधून कोणी निघतात. मुंबईमध्ये शेकडोनी येतात, काही जणांना रंग लागतो. समजतात भविष्यासाठी काहीतरी भाग्य बनवावे. कवडीच्या बदल्यात आपल्याला हिरा मिळेल. बाबा समजावून सांगतात ना - बॅग-बॅगेज सर्व काही स्वर्गामध्ये ट्रान्सफर करा. तिथे २१ जन्मांसाठी तुम्हाला राज्य-भाग्य मिळेल. काही जण तर एक रुपया, आठ आणे देखील पाठवतात. बाबा म्हणतात - तुमचा एक रुपया देखील शिवबाबांच्या खजिन्यामध्ये जमा झाला. तुम्हाला २१ जन्मांकरिता महाल मिळतील. सुदाम्याचे उदाहरण आहे ना. अशांना पाहून बाबांना खूप आनंद होतो. बिना खर्चाने तुम्हा मुलांना विश्वाची बादशाही मिळते. युद्ध इत्यादी काहीच नाही. ते तर थोड्याशा तुकड्यासाठी देखील किती भांडत राहतात. तुम्हाला बाबा फक्त म्हणतात - मनमनाभाव. बस्स, इथे बसून राहण्याची गरज नाही, चालता-फिरता बाबांची आणि वारशाची आठवण करा. आनंदात राहा. खाणे-पिणे देखील शुद्ध ठेवायचे आहे. तुम्ही जाणता आपली आत्मा कितपत पवित्र बनली आहे, जी मग जाऊन प्रिंसचा जन्म घेईल. पुढे चालून दुनियेची हालत अगदीच खराब होणार आहे. खाण्यासाठी तर अन्न सुद्धा मिळणार नाही, तेव्हा मग चारा खाऊ लागतील. मग असे थोडेच म्हणणार की, आम्ही तुपाशिवाय राहू शकत नाही. काहीही मिळणार नाही. आता देखील कितीतरी ठिकाणी मनुष्य चारा खाऊन गुजारा करत आहेत. तुम्ही तर खूप मजेत बाबांच्या घरामध्ये बसला आहात. घरामध्ये वडील अगोदर मुलांना खाऊ घालतात. जमाना खूप वाईट आहे. इथे तुम्ही खूप सुखात बसले आहात. फक्त बाबांची आणि वारशाची आठवण करत राहा. आपले आणि इतरांचे देखील कल्याण करायचे आहे. पुढे चालून आपणच येतील, भाग्य जागे होईल. जागे तर होणारच आहे ना. बेहदची राजधानी स्थापन होणार आहे. प्रत्येकजण कल्पापूर्वी प्रमाणे पुरुषार्थ करत आहेत. मुलांना तर खूप आनंदामध्ये राहिले पाहिजे. बापदादांचे चित्र बघून देखील आनंदाने रोमांचित झाले पाहिजे. तो आनंदाचा पारा स्थायी राहिला पाहिजे अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) नेहमी अपार खुशीमध्ये राहण्यासाठी बेहदचे नॉलेज बुद्धीमध्ये ठेवायचे आहे. ज्ञान रत्नांनी आपली झोळी भरून आपले आणि सर्वांचे कल्याण करायचे आहे. नॉलेजमध्ये अतिशय हुशार बनायचे आहे.

२) भविष्य २१ जन्मांकरिता राज्यभाग्याचा अधिकार घेण्यासाठी आपले बॅग-बॅगेज सर्व ट्रान्सफर करायचे आहे. या छी-छी दुनियेपासून सुटका करून घेण्यासाठी युक्ती रचायची आहे.

वरदान:-
एका बाबांच्या प्रेमामध्ये लवलीन राहून सदैव चढत्या कलेचा अनुभव करणारे सफलता मूर्त भव

सेवेमध्ये अथवा स्वतःच्या चढत्या कलेमध्ये सफलतेचा मुख्य आधार आहे - एका बाबांवर अतुट प्रेम. बाबांशिवाय इतर काहीही दिसू नये. संकल्पामध्ये देखील बाबा, बोलण्यामध्ये देखील बाबा, कर्मामध्ये देखील बाबांची सोबत. अशी लवलीन आत्मा एक शब्द जरी बोलली तरी तिच्या प्रेमाचे बोल दुसऱ्या आत्म्याला देखील प्रेमामध्ये बांधून टाकतात. अशा लवलीन आत्म्याचा एक ‘बाबा’ शब्दच जादूचे काम करतो. अशी आत्मा रुहानी जादूगार बनते.

बोधवाक्य:-
‘योगी तू आत्मा’ तो आहे जो अंतर्मुखी बनून लाईट माईट रूपामध्ये स्थित राहतो.

हे अव्यक्त इशारे - “निश्चयाच्या फाउंडेशनला मजबूत करून सदैव निर्भय आणि निश्चिंत रहा”

तुम्हाला जी काही ड्युटी मिळालेली आहे, त्यामध्ये नेहमी ॲक्युरेट (अचूक) राहा, जो ड्युटीच्या बाबतीत ॲक्युरेट राहतो त्याला सर्वजण इमानदार अथवा फेथफुलच्या (विश्वासूच्या) नजरेने बघतात. इथे देखील जे सेवेच्या बाबतीत ॲक्युरेट राहतात तेच बाबांचे फेथफुल (विश्वासू) आहेत. एक असते बाबांवर पूर्णपणे फेथ (विश्वास) दुसरे आहे बाबांसोबत सेवेमध्ये देखील फेथफुल. अशी फेथफुल निश्चयबुद्धी मुले नेहमीच विजयी आणि निश्चिंत राहतात.