09-04-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - आता तुम्ही सत्य बाबांकडून सत्य गोष्टी ऐकून प्रकाशामध्ये आले आहात तर तुमचे कर्तव्य आहे सर्वांना अंधारातून काढून प्रकाशामध्ये आणणे”

प्रश्न:-
जेव्हा तुम्ही मुले कोणाला ज्ञान सांगता तर कोणती एक गोष्ट जरूर लक्षात ठेवाल?

उत्तर:-
मुखाने वारंवार ‘बाबा-बाबा’ करत राहा, यामुळे ‘माझे’पणा समाप्त होईल. वारसा देखील आठवणीत राहील. बाबा म्हटल्याने सर्वव्यापीचे ज्ञान अगोदरच नष्ट होते. जर कोणी म्हणेल भगवान सर्वव्यापी आहेत, तर तुम्ही बोला - सर्वांमध्ये पिता कसे बरें असू शकतील!

गीत:-
आज अन्धेरे में है इंसान…

ओम शांती।
मुलांनी काय म्हटले आणि कोणाला बोलावले? हे ज्ञानाचे सागर अर्थात हे ज्ञान सूर्य बाबा… भगवंताला ‘बाबा’ म्हटले जाते ना. भगवान पिता आहेत तर तुम्ही सर्वजण त्यांची संतान आहात. मुले म्हणतात - आम्ही अंधारामध्ये येऊन पडलो आहोत. तुम्ही आम्हाला प्रकाशामध्ये घेऊन जा. बाबा म्हटल्याने सिद्ध होते की पित्याला बोलावत आहेत. ‘बाबा’ शब्द म्हटल्याने प्रेम निर्माण होते कारण पित्याकडून वारसा घेतला जातो. केवळ ‘ईश्वर’ अथवा ‘प्रभू’ म्हटल्याने पित्याच्या वारशाची ती चव येत नाही. बाबा म्हटल्याने वारसा लक्षात येतो. तुम्ही बोलावत असता - ‘बाबा, आम्ही अंधारामध्ये येऊन पडलो आहोत, आता तुम्ही पुन्हा ज्ञानाद्वारे आमचा दीपक जागृत करा कारण आत्म्यांचा दीपक विझलेला आहे. मनुष्य मरतात तर १२ दिवस दिवा लावतात. एकजण तेल घालण्यासाठी बसून राहतो की कुठे दिवा विझू नये. बाबा समजावून सांगत आहेत - तुम्ही भारतवासी प्रकाशामध्ये अर्थात दिवसामध्ये होता. आता रात्रीमध्ये आहात. १२ तास दिवस, १२ तास रात्र. ती आहे हदची गोष्ट. हा तर बेहदचा दिवस आणि बेहदची रात्र आहे, ज्याला म्हटले जाते - ब्रह्माचा दिवस - सतयुग-त्रेतायुग, ब्रह्माची रात्र - द्वापर-कलियुग. रात्रीचा अंधार असतो. मनुष्य खस्ता खात राहतात. भगवंताला शोधण्यासाठी चारही दिशांना फेऱ्या मारतात, परंतु परमात्म्याला भेटू शकत नाहीत. परमात्म्याला भेटण्यासाठीच भक्ती करतात. द्वापर पासून भक्ती सुरू होते अर्थात रावण राज्य सुरू होते. दसऱ्याची देखील एक कथा बनवली आहे. कथा नेहमी मनमोहक बनवतात, जसा चित्रपट, नाटक इत्यादी बनवतात. श्रीमद् भगवद्गीताच सत्य गीता आहे. परमात्म्याने मुलांना राजयोग शिकवला, राजाई दिली. मग भक्तिमार्गामध्ये बसून कथा तयार करतात. व्यासाने गीता बनवली अर्थात स्टोरी बनवली. खरी गोष्ट तर बाबांकडून तुम्ही आता ऐकत आहात. नेहमी ‘बाबा-बाबा’ म्हणत राहिले पाहिजे. परमात्मा आपले पिता आहेत, नवीन दुनियेचे रचयिता आहेत. तर जरूर त्यांच्याकडून आम्हाला स्वर्गाचा वारसा मिळायला हवा. आता तर ८४ जन्म भोगून आपण नरकामध्ये येऊन पडलो आहोत. बाबा समजावून सांगत आहेत - मुलांनो, तुम्ही भारतवासी सूर्यवंशी, चंद्रवंशी होता, विश्वाचे मालक होता, दुसरा कोणताच धर्म नव्हता, त्याला स्वर्ग अथवा कृष्णपुरी म्हटले जाते. इथे आहे कंसपुरी. बापदादा आठवण करून देत आहेत, लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते. बाबाच ज्ञानाचे सागर, शांतीचे सागर पतित-पावन आहेत, ना की पाण्याची गंगा. सर्व ब्राईड्सचे एक भगवानच ब्राईडग्रुम आहेत, हे मनुष्य जाणत नाहीत, म्हणून विचारले जाते - आत्म्याचा पिता कोण आहे? तर गोंधळून जातात. म्हणतात - आम्हाला ठाऊक नाही. अरे आत्मा, तू आपल्या पित्याला जाणत नाहीस? म्हणतात - गॉड फादर, मग विचारले जाते - त्यांचे नाव-रूप काय आहे? गॉडला ओळखता काय? तर म्हणतात - ते सर्वव्यापी आहेत. अरे, मुलांचा पिता कधी सर्वव्यापी असतो का? रावणाच्या आसुरी मतावर किती निर्बुद्ध बनले आहेत. एक नंबरचा आहे देह-अभिमान. स्वतःला आत्मा निश्चय करत नाहीत. म्हणतात मी अमका आहे. ही तर झाली शरीराची गोष्ट. खरे तर मी स्वतः कोण आहे - हेच जाणत नाहीत. मी जज आहे, मी हे आहे… ‘मी, मी’ करत राहतात, परंतु हे चुकीचे आहे. ‘मी’ आणि ‘माझे’ या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आत्मा अविनाशी आहे, शरीर विनाशी आहे. नाव शरीराचे ठेवले जाते. आत्म्याचे काही नाव ठेवले जात नाही. बाबा म्हणतात - माझे नाव ‘शिव’ हेच आहे. शिव जयंती देखील साजरी करतात. आता निराकाराची जयंती कशी होऊ शकते? ते कोणामध्ये येतात, हे कोणालाच ठाऊक नाहीये. सर्व आत्म्यांचे नाव आत्माच आहे. परमात्म्याचे नाव आहे - शिव. बाकी सर्व तर आहेत शाळीग्राम. आत्मे मुले आहेत. एक शिवबाबाच सर्व आत्म्यांचे पिता आहेत. ते आहेत बेहदचे पिता. त्यांना सर्व बोलावतात की येऊन आम्हाला पावन बनवा. आम्ही दुःखी आहोत. आत्मा बोलावते, दुःखामध्ये सर्व मुले आठवण करतात आणि मग हिच मुले जेव्हा सुखामध्ये असतात तेव्हा कोणीही त्यांची आठवण करत नाहीत. दुःखी बनवले आहे रावणाने.

बाबा समजावून सांगत आहेत - हा रावण तुमचा जुना शत्रू आहे. हा देखील ड्रामाचा खेळ बनलेला आहे. तर आता सर्व अंधारामध्ये आहेत म्हणून बोलावत आहेत की, ‘ओ ज्ञान सूर्य या, आम्हाला प्रकाशामध्ये घेऊन जा’. भारत सुखधाम होता तेव्हा कोणीही बोलावत नव्हते. कोणतीही अप्राप्त वस्तू नव्हती. इथे तर ओरडत राहतात - ओ शांती देवा. बाबा येऊन सांगत आहेत - शांती तर तुमचा स्वधर्म आहे. गळ्यातील हार आहे. आत्मा शांतीधामची रहीवासी आहे. शांतीधाम मधून मग सुखधाममध्ये जाते. तिथे तर सुखच सुख आहे. तिथे तुम्हाला ओरडावे लागत नाही. दुःखामध्येच ओरडतात - दया करा, दुःख हर्ता, सुख कर्ता बाबा या. शिवबाबा, गोड बाबा पुन्हा या. येतात जरूर तेव्हाच तर शिवजयंती साजरी करतात. श्रीकृष्ण आहे स्वर्गाचा प्रिन्स. त्यांची देखील जयंती साजरी करतात. परंतु श्रीकृष्ण कधी आले, हे कोणालाच ठाऊक नाहीये. राधे-कृष्णच स्वयंवरा नंतर लक्ष्मी-नारायण बनतात, हे कोणीही जाणत नाहीत. मनुष्य बोलावत राहतात - ‘ओ गॉड फादर…’ ठीक आहे, त्यांचे नाव-रूप काय आहे? तर म्हणतात नावा-रुपा पासून न्यारा आहे. अरे, तुम्ही त्यांना ‘गॉड फादर’ म्हणता आणि मग नावा-रूपापासून न्यारा कसे काय म्हणता. आकाश पोकळ आहे, त्याचे देखील नाव आहे - आकाश. तुम्ही म्हणता - आम्ही पित्याचे नाव-रूप इत्यादीला जाणत नाही; अच्छा, स्वतःला तरी जाणता का? आपण आत्मा आहोत. अच्छा, आत्म्याचे नाव-रूप सांगा. तर म्हणतात - आत्मा सो परमात्मा आहे. आत्मा नावा-रुपापासून न्यारी तर असू शकत नाही. आत्मा एक बिंदू ताऱ्याप्रमाणे आहे. भृकुटीच्या मध्यभागी राहते. ज्या छोट्याशा आत्म्यामध्ये ८४ जन्मांचा पार्ट नोंदलेला आहे. या नीट समजून घेण्याच्या गोष्टी आहेत, म्हणून ७ दिवस भट्टी गायली गेली आहे. द्वापर पासून रावण राज्य सुरू झाले आहे, तेव्हा पासून विकारांची प्रवेशता झाली आहे. शिडी उतरत आला आहात. आता सर्वांना ग्रहण लागलेले आहे, काळे झाले आहेत म्हणून बोलावत असतात - ‘हे ज्ञान सूर्य, या. येऊन आम्हाला प्रकाशामध्ये घेऊन जा’. ‘ज्ञान अंजन सद्गुरु दिया, अज्ञान अंधेर विनाश…’ बुद्धीमध्ये पिताच येतात. असे नाही ज्ञान अंजन गुरु दिया…, गुरु तर अनेक आहेत, त्यांना हे ज्ञान कुठे आहे. त्यांचे थोडेच गायन आहे. ज्ञान-सागर, पतित-पावन सर्वांचे सद्गती दाता एक बाबाच आहेत. मग दुसरा कोणी ज्ञान कसे बरे देऊ शकतो. साधू लोक म्हणतात की, भगवंताला प्राप्त करण्याचे अनेक रस्ते आहेत. शास्त्र वाचणे, यज्ञ, तप इत्यादी करणे - हे सर्व भगवंताला भेटण्याचे रस्ते आहेत परंतु मग पतित असणारे पावन दुनियेमध्ये कसे बरे जाऊ शकतील. बाबा म्हणतात - मी स्वतः येतो. भगवान तर एकच आहेत ब्रह्मा-विष्णू-शंकर हे देखील देवता आहेत, त्यांना भगवान थोडेच म्हणता येईल. त्यांचे देखील पिता शिवच आहेत. प्रजापिता ब्रह्मा तर इथेच असतील ना. प्रजा इथे आहे. नाव देखील लिहिलेले आहे - ‘प्रजापिता ब्रह्माकुमारी इन्स्टिट्यूशन’, तर सर्व संतान झाली. असंख्य बी.के. आहेत. वारसा शिवबाबांकडून मिळतो, ना की ब्रह्माकडून. वारसा आजोबांकडून मिळतो. ब्रह्मा द्वारे स्वर्गामध्ये जाण्याच्या लायक बनवत आहेत. ब्रह्मा द्वारे मुलांना ॲडॉप्ट करतात. मुले देखील म्हणतात - बाबा आम्ही तुमचेच आहोत, तुमच्याकडून वारसा घेतो. ब्रह्मा द्वारे स्थापना होते विष्णु-पुरीची. शिवबाबा राजयोग शिकवत आहेत. श्रीमत अथवा श्रेष्ठ ते श्रेष्ठ भगवंताची गीता आहे. एकच निराकार भगवान आहेत. बाबा म्हणतात - तुम्ही मुलांनी ८४ जन्म घेतले आहेत. ‘आत्मा परमात्मा अलग रहे बहुकाल…’ बऱ्याच काळापासून वेगळे तर भारतवासीच होते. दुसरा कोणताच धर्म नव्हता. सर्वात पहिली त्यांचीच ताटातूट झाली आहे. बाबांपासून ताटातूट होऊन इथे पार्ट बजावण्याकरिता आला आहात. बाबा म्हणतात - ‘माझ्या आत्म्यांनो, आता मज पित्याची आठवण करा’. ही आहे आठवणीची यात्रा अर्थात योग-अग्नी. तुमच्या डोक्यावर जे पापांचे ओझे आहे, ते या योग-अग्नीने भस्म होईल. माझ्या गोड मुलांनो, तुम्ही गोल्डन एज्ड पासून आयरन एज्डमध्ये आला आहात. आता माझी आठवण करा. हे बुद्धीचे काम आहे ना. देहासहित देहाची सर्व नाती सोडून मामेकम् (मज एकाची) आठवण करा. तुम्ही आत्मा आहात ना. हे तुमचे शरीर आहे. ‘मी, मी’ असे आत्मा करते. तुम्हाला रावणाने पतित बनविले आहे. हा खेळ बनलेला आहे. पावन भारत आणि पतित भारत. जेव्हा पतित बनतात तेव्हा पित्याला बोलावतात की, रामराज्य पाहिजे. म्हणतात देखील, परंतु अर्थ समजत नाहीत. ज्ञान देणारे ज्ञानाचे सागर तर एक बाबाच आहेत. बाबाच येऊन सेकंदामध्ये वारसा देतात. आता तुम्ही बाबांचे बनले आहात. बाबांकडून सूर्यवंशी, चंद्रवंशीचा वारसा घेण्याकरिता. मग सतयुग, त्रेतामध्ये तुम्ही अमर बनता. तिथे असे कोणी म्हणणार नाहीत की, अमका मेला. सतयुगामध्ये कधीही अकाले मृत्यू होत नाही. तुम्ही काळावर विजय प्राप्त करता. दुःखाचे नाव राहत नाही. त्याला म्हटले जाते सुखधाम. बाबा म्हणतात - मी तर तुम्हाला स्वर्गाची बादशाही देतो. तिथे तर खूप वैभव आहे. भक्तीमार्गामध्ये मंदिरे बनवली आहेत त्यावेळी देखील किती धन होते. भारत काय होता! बाकीचे सर्व आत्मे निराकारी दुनियेमध्ये होते. मुलांनी जाणले आहे - उच्च ते उच्च बाबा आता स्वर्गाची स्थापना करत आहेत. उच्च ते उच्च आहेत शिवबाबा, त्यानंतर आहेत ब्रह्मा-विष्णू-शंकर सूक्ष्मवतनवासी. नंतर मग ही दुनिया.

ज्ञानाद्वारेच तुम्हा मुलांची सद्गती होते. गायले देखील जाते - ज्ञान, भक्ती आणि वैराग्य. जुन्या दुनियेचे वैराग्य येते, कारण सतयुगाची बादशाही मिळते. आता बाबा म्हणतात - मुलांनो, मामेकम् (मज एकाची) आठवण करा. माझी आठवण करत तुम्ही माझ्याकडे याल. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) डोक्यावर जे पापांचे ओझे आहे त्याला योग-अग्नीने भस्म करायचे आहे. बुद्धीने देहासहित देहाची सर्व नाती सोडून एका बाबांची आठवण करायची आहे.

२) बोलावण्या ऐवजी अथवा ओरडण्या ऐवजी आपल्या शांत स्वधर्मामध्ये स्थित राहायचे आहे. शांती गळ्यातील हार आहे. देह-अभिमानामध्ये येऊन ‘मी’ आणि ‘माझे’ हे शब्द बोलायचे नाहीत, स्वतःला आत्मा निश्चय करायचे आहे.

वरदान:-
आपल्या सतोगुणी दृष्टी द्वारे अन्य आत्म्यांच्या दृष्टीचे आणि वृत्तीचे परिवर्तन करणारे साक्षात्कार मूर्त भव

एक म्हण आहे - दृष्टीने सृष्टी बदलते. तर तुमची दृष्टी अशी सतोगुणी असावी जेणेकरून कितीही तमोगुणी किंवा रजोगुणी आत्म्याची दृष्टी, वृत्ती आणि त्यांची स्थिती बदलावी. जे पण तुमच्या समोर येतील त्यांना तुमच्या दृष्टी द्वारे तिन्ही लोक विषयीचे, आपल्या संपूर्ण जीवन कहाणी विषयीची माहिती होईल - हेच आहे नजरेने निहाल करणे. अखेरीला जेव्हा ज्ञानाची सेवा होणार नाही तेव्हा हीच सेवा चालेल.

बोधवाक्य:-
पवित्रतेचे प्रॅक्टिकल स्वरूप सत्यता अर्थात दिव्यता आहे.

हे अव्यक्त इशारे - महान बनण्याकरिता मधुरतेचा आणि नम्रतेचा गुण धारण करा.

मधुरता आणि नम्रतेचा गुण झुकणे शिकवतो. जितके आता तुम्ही संस्कारांमध्ये, संकल्पांमध्ये झुकाल तितके विश्व तुमच्या समोर झुकेल. झुकणे अर्थात झुकविणे. संस्कारांमध्ये देखील झुकणे. असा संकल्प देखील नसावा की इतरांनी देखील आपल्या समोर थोडेतरी झुकावे! आपण झुकलो तर सर्व झुकतील. जे खरे सेवाधारी असतात ते जेव्हा सर्वांपुढे झुकतील तेव्हा सेवा करू शकतील.