09-06-24    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   15.02.20  ओम शान्ति   मधुबन


“मनाला स्वच्छ आणि बुद्धीला क्लियर ठेवून डबल लाइट फरिश्ता स्थितीचा अनुभव करा”


आज बापदादा आपल्या स्वराज्य अधिकारी मुलांना पाहत आहेत. ‘स्वराज्य’, ब्राह्मण जीवनाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. बापदादांनी प्रत्येक ब्राह्मणाला स्वराज्याचे तख्तनशीन (सिंहासनधारी) बनविले आहे. स्वराज्याचा अधिकार जन्मत:च प्रत्येक ब्राह्मण आत्म्याला प्राप्त झालेला आहे. जितके ‘स्वराज्य स्थित’ बनता तितका स्वतःमध्ये लाइट आणि माइटचा अनुभव करता.

बापदादा आज प्रत्येक मुलाच्या मस्तकावर लाइटचा ताज पाहत आहेत. जितकी स्वतःमध्ये माइट (शक्ती) धारण केली आहे तितकाच नंबरवार लाइटचा ताज चमकतो आहे. बापदादांनी सर्व मुलांना सर्व शक्ती अधिकारामध्ये दिल्या आहेत. प्रत्येकजण मास्टर सर्वशक्तिवान आहे, परंतु धारण करण्यामध्ये नंबरवार बनले आहेत. बापदादांनी पाहिले आहे कि सर्वशक्तींविषयीचे नॉलेज देखील सर्वांमध्ये आहे, धारणा सुद्धा आहे परंतु एका गोष्टीमध्ये फरक पडत जातो. कोणत्याही ब्राह्मण आत्म्याला विचारा - प्रत्येक शक्तीचे वर्णन सुद्धा खूप चांगले करतील, प्राप्तीचे वर्णन सुद्धा खूप छान करतील. परंतु फरक हा आहे कि, वेळेला ज्या शक्तीची आवश्यकता आहे, त्यावेळेला ती शक्ती कार्यामध्ये लावू शकत नाहीत. वेळ निघून गेल्यानंतर जाणीव होते कि या शक्तीची आवश्यकता होती. बापदादा मुलांना म्हणतात - सर्व शक्तींचा वारसा इतका शक्तीशाली आहे ज्याच्या समोर कोणतीही समस्या टिकू शकत नाही. समस्या-मुक्त बनू शकता. फक्त सर्व शक्तींना इमर्ज रूपामध्ये स्मृतीमध्ये ठेवा आणि वेळेला कार्यामध्ये लावा. यासाठी आपल्या बुद्धीची लाइन क्लियर ठेवा. जितकी बुद्धीची लाइन क्लियर आणि क्लीन असेल तितकी निर्णय शक्ती तीव्र असल्याकारणाने ज्यावेळी ज्या शक्तीची आवश्यकता आहे ती कार्यामध्ये लावू शकाल; कारण वेळेनुसार बापदादा प्रत्येक मुलाला विघ्न-मुक्त, समस्या-मुक्त, पुरुषार्थाच्या मेहनतीपासून मुक्त पाहू इच्छितात. बनायचे तर सर्वांना आहेच परंतु हा अभ्यास दीर्घ काळाचा असणे आवश्यक आहे. ब्रह्मा बाबांचा एक विशेष संस्कार पाहिला - “तुरंत दान महापुण्य”. जीवनाच्या सुरुवातीपासून प्रत्येक कार्यामध्ये तुरंत दान सुद्धा, तुरंत काम सुद्धा केले. ब्रह्मा बाबांची विशेषता हि होती कि त्यांची निर्णय शक्ती नेहमीच फास्ट होती. तर बापदादांनी रिझल्ट पाहिला. सर्वांना सोबत तर घेऊन जायचेच आहे. बापदादांसोबत जाणारे आहात ना! का पाठीमागून येणारे आहात? जर सोबत जायचेच आहे तर फॉलो ब्रह्मा बाबा. कर्मामध्ये फॉलो ब्रह्मा बाबा आणि स्थितीमध्ये निराकारी शिवबाबांना फॉलो करायचे आहे. फॉलो करता येते ना?

डबल विदेशींना फॉलो करता येते का? फॉलो करणे तर सोपे आहे ना! जर फॉलोच करायचे आहे तर, ‘का, काय, कसे…’ हे संपून जाते. आणि सर्वांना अनुभव आहे कि व्यर्थ संकल्पाचे निमित्त हे ‘का, काय, कसे…’ हेच आधार बनतात. ‘फॉलो फादर’मध्ये हे शब्द संपून जातात. ‘कसे’ नाही, ‘असे’. बुद्धी लगेच ठरवते - असे चला, असे करा. तर बापदादा आज विशेष सर्व मुलांना भले मग पहिल्यांदाच आले आहेत, नाहीतर जुने आहेत, हाच इशारा देत आहेत कि आपल्या मनाला स्वच्छ ठेवा. बऱ्याच जणांच्या मनामध्ये अजूनही व्यर्थ आणि निगेटिव्हचे छोटे-मोठे डाग आहेत. या कारणामुळे पुरुषार्थाचा श्रेष्ठ स्पीड, तीव्रगतीमध्ये अडथळा निर्माण होतो. बापदादा सदैव श्रीमत देतात कि, ‘मनामध्ये सदैव प्रत्येक आत्म्याप्रती शुभ भावना आणि शुभ कामना ठेवा’ - हे आहे स्वच्छ मन. ‘अपकारीबद्दल देखील उपकाराची वृत्ती ठेवा’ - हे आहे स्वच्छ मन. स्वयंप्रती अथवा इतरांप्रती व्यर्थ संकल्प येणे - हे म्हणजे मन स्वच्छ नाही. तर स्वच्छ मन तसेच क्लीन आणि क्लियर बुद्धी. तुम्हीच तपासा, आपणच आपल्याला लक्षपूर्वक पहा, वर-वर नाही, ठीक आहे, ठीक आहे. नाही, विचार करून पहा की, माझे मन आणि बुद्धी स्पष्ट आहे, श्रेष्ठ आहे? तेव्हाच डबल लाइट स्थिती बनू शकते. बाप समान स्थिती बनविण्याचे हेच सोपे साधन आहे. आणि हा अभ्यास शेवटी नाही, दीर्घ काळ करणे आवश्यक आहे. तर चेक करता येते ना? स्वतःला चेक करा, दुसऱ्याला नाही. बापदादांनी या अगोदर देखील एक हसण्यासारखी गोष्ट सांगितली होती की, बऱ्याच मुलांची दूरची नजर तीक्ष्ण आहे आणि जवळची नजर कमजोर आहे त्यामुळे दुसऱ्याला तपासण्यामध्ये खूप हुशार आहेत. स्वतःला चेक करण्यामध्ये कमजोर बनायचे नाही.

बापदादांनी या आधीही सांगितले आहे कि जसे आता हे पक्के झाले आहे कि, मी ब्रह्माकुमार/ब्रह्माकुमारी आहे. चालता-फिरता-विचार करता - मी ब्रह्माकुमारी आहे, मी ब्रह्माकुमार ब्राह्मण आत्मा आहे. तसे आता हि नॅचरल स्मृती आणि नेचर बनवा कि, “मी फरिश्ता आहे”. अमृतवेलेला उठताच हे पक्के करा कि मी फरिश्ता परमात्म श्रीमतावर, खाली या साकार शरीरामध्ये आलो आहे, सर्वांना संदेश देण्यासाठी किंवा श्रेष्ठ कर्म करण्यासाठी. कार्य पूर्ण झाले आणि आपल्या शांतीच्या स्थितीमध्ये स्थित व्हा. उच्च स्थितीमध्ये स्थित व्हा. एकमेकांना सुद्धा फरिश्ता स्वरूपामध्ये पहा. तुमची वृत्ती दुसऱ्याला देखील हळू-हळू फरिश्ता बनवेल. तुमची दृष्टी दुसऱ्यांवर देखील प्रभाव टाकेल. हे पक्के आहे का की आपण फरिश्ते आहोत? ‘फरिश्ता भव’चे वरदान सर्वांना मिळाले आहे? एका सेकंदामध्ये फरिश्ता अर्थात डबल लाइट बनू शकता का? एका सेकंदामध्ये, मिनिटामध्ये नाही, १० सेकंदामध्ये नाही, एका सेकंदामध्ये विचार केला आणि बनलो, असा अभ्यास आहे? अच्छा जे एका सेकंदामध्ये बनू शकतात, दोन सेकंदामध्ये नाही, एका सेकंदामध्ये बनू शकतात, त्यांनी एका हाताची टाळी वाजवा. बनू शकता? असेच हात वर करू नका. डबल फॉरेनर हात वर करत नाही आहेत! वेळ लागतो का? अच्छा जे समजतात कि थोडा वेळ लागतो, एका सेकंदामध्ये नाही, थोडा वेळ लागतो, त्यांनी हात वर करा. (खूप जणांनी हात वर केले) चांगले आहे, परंतु अंतिम वेळेचा पेपर एका सेकंदाचा येणार आहे मग काय करणार? अचानक येणार आहे आणि सेकंदाचा येणार आहे. हात वर केला, काही हरकत नाही. जाणीव झाली, हे सुद्धा खूप चांगले आहे. परंतु हा अभ्यास करायचाच आहे. करावाच लागेल नाही, करायचाच आहे. हा अभ्यास खूप-खूप-खूप आवश्यक आहे. ठीक आहे तरीही बापदादा थोडा वेळ देत आहेत. किती वेळ हवा आहे? दोन हजार पर्यंत वेळ हवा. २१ व्या शतकाला तर तुम्ही लोकांनीच आव्हान दिले आहे, दवंडी पिटवली आहात, लक्षात आहे? चॅलेंज केले आहे - गोल्डन एजड दुनिया येणार किंवा वातावरण बनवणार. चॅलेंज केले आहे ना! तोपर्यंत तर खूप वेळ आहे. जितके स्वतःवर अटेन्शन देऊ शकता, देऊ शकता सुद्धा नाही तर द्यायचेच आहे. जसे देह-भानामध्ये यायला किती वेळ लागतो! दोन सेकंद? जरी इच्छा नसली तरीही देह-भानामध्ये येता, तर किती वेळ लागतो? एक सेकंद का त्यापेक्षाही कमी वेळ लागतो? कळत सुद्धा नाही की, देह-भानामध्ये आलो देखील आहे. तसाच हा अभ्यास करा - काहीही होवो, काहीही करत असाल परंतु हे सुद्धा कळू नये कि मी सोल कॉन्शस पॉवरफुल स्थितीमध्ये नॅचरल झालो आहे. फरिश्ता स्थिती सुद्धा नॅचरल झाली पाहिजे. आपली जितकी फरिश्ते-पणाची नेचर बनवाल तर नेचर तुमच्या स्थितीला नॅचरल करेल. तर बापदादांनी किती वेळानंतर विचारायचे? किती वेळ पाहिजे? जयंती तू सांग - किती वेळ पाहिजे? फॉरेनच्या बाजूने तू बोल - फॉरेनवाल्यांना किती वेळ पाहिजे? जनक (जानकी दादी) बोला. (दादीजी म्हणाल्या, ‘आजच्या आज होणार, उद्या नाही’) जर आजच्या आज होणार तर आता सगळे फरिश्ते झालात? होणार, नाही. जर होणार, तर मग कधी पर्यंत? बापदादांनी आज ब्रह्मा बाबांचा कोणता संस्कार सांगितला? ‘तुरंत दान महापुण्य’.

बापदादांचे प्रत्येक मुलावर प्रेम आहे, त्यामुळे असेच समजतात कि एकही मुलगा मागे राहू नये. नंबरवार का? सगळे नंबरवन बनतील तर किती चांगले आहे. अच्छा.

प्रशासक वर्ग (ॲडमिनीस्ट्रेशन विंगच्या) भाऊ-बहीणींसोबत वार्तालाप:- आपसात मिळून काय प्रोग्राम बनवला आहे? असा तीव्र पुरुषार्थाचा प्लॅन बनवला आहे का कि लवकरात लवकर तुम्हा श्रेष्ठ आत्म्यांच्या हातामध्ये हे कार्य यावे. विश्व परिवर्तन करायचे आहे तर संपूर्ण ॲडमिनीस्ट्रेशन (प्रशासन) बदलावे लागेल ना! हे कार्य कसे सहज वाढत जाईल, विस्तार होत जाईल, याचा विचार केला आहे का? जे कोणी कमीत-कमी मोठ-मोठ्या शहरांमध्ये निमित्त आहेत त्यांना पर्सनल संदेश देण्याचा प्लॅन बनवला आहे का? कमीत-कमी एवढे तरी कळावे की आता अध्यात्मिकते द्वारे परिवर्तन होऊ शकते आणि झाले पाहिजे. तर आपल्या क्षेत्रातील लोकांना जागृत करावे यासाठी हे वर्ग (विंग) बनविले गेले आहेत. तर बापदादा विंगवाल्यांची सेवा पाहून खुश आहेत परंतु बाबांना हा रिजल्ट बघायचा आहे कि, प्रत्येक विंगवाल्यांनी आपापल्या फिल्डला कितपत मेसेज दिला आहे! थोडे फार जागृत केले आहे का सोबती बनवले आहे? सहयोगी, सोबती बनवले आहे? ब्रह्माकुमार नाही बनवले परंतु सहयोगी सोबती तरी बनवले आहे का?

सर्व विंगना बापदादा म्हणत आहेत कि, जसे आता धर्म नेते आले, ‘नंबर वन’वाले नव्हते तरीही एका स्टेजवर सगळे एकत्र आले आणि सर्वांच्या मुखातून हे निघाले कि, आपल्या सर्वांना मिळून अध्यात्मिक शक्तीचा प्रसार केला पाहिजे. असे प्रत्येक विंगवाले जे कोणी आले आहात, त्या सर्व विंगवाल्यांना हा रिजल्ट दाखवायचा आहे कि, आपल्या फिल्डवाल्यांमध्ये कितपत मेसेज पोहोचला आहे? दुसरे - ‘अध्यात्मिकतेची आवश्यकता आहे आणि आम्ही देखील सहयोगी बनू’, हा रिझल्ट असावा. रेग्युलर स्टुडंट बनत नाहीत परंतु सहयोगी बनू शकतात. तर आता पर्यंत प्रत्येक फिल्डवाल्यांची जी काही सेवा केली आहे, जसे आता धर्म नेत्यांना बोलावले, तसे प्रत्येक देशामध्ये प्रत्येक विंगवाल्यांचे करा. पहिले इंडियामध्येच करा, नंतर इंटरनॅशनल करा, असे प्रत्येक फिल्डमधील वेग-वेगळ्या स्टेजवाले एकत्र यावेत आणि असा अनुभव करावा कि आम्हा लोकांना सहयोगी बनायचे आहे. हा प्रत्येक विंगचा रिझल्ट आतापर्यंत किती निघाला आहे? आणि पुढचा प्लॅन काय आहे? कारण एक विंग, जर एका-एकाला लक्ष्य ठेवून जवळ आणेल तर मग सर्व विंगचे जे जवळचे सहयोगी आहेत ना, त्यांचे संघटन करून मोठे संघटन बनवूया. आणि एकमेकांना पाहून उमंग-उत्साह देखील येतो. आता सर्व विखुरलेले आहेत, कोणत्या शहरात किती आहेत, कोणत्या शहरामध्ये किती आहेत. चांगले-चांगले आहेतही परंतु सर्वांचे आधी संघटन तयार करा आणि मग मधुबनमध्ये सर्वांना एकत्रीत करूया. तर असा काही प्लॅन बनवला आहे का? बनला असेल नक्कीच. फॉरेनवाल्यांनाही संदेश पाठवला होता कि विखुरलेले खूप आहेत. जर भारतामध्ये देखील पाहिले तर चांगले-चांगले सहयोगी आत्मे ठीक-ठिकाणी निघाले आहेत परंतु गुप्त राहतात. त्यांना एकत्र आणून काही विशेष प्रोग्राम ठेवून अनुभवाचे आदान-प्रदान करावे, त्याने फरक पडतो, जवळ येतात. कोणत्या विंगचे ५ असतील, कोणत्या विंगचे ८, कोणाचे २५-३० असतील. संघटनमध्ये आल्याने प्रगती होते. उमंग-उत्साह वाढतो. तर आतापर्यंत जी सर्व विंगची सेवा झाली आहे, त्याचा रिझल्ट निघाला पाहिजे. तर ऐकले, सर्व विंगवाले ऐकत आहात ना! सर्व विंगवाले जे विशेष आज आले आहेत त्यांनी हात वर करा. खूप छान. तर आता रिजल्ट द्या - किती-किती, कोण-कोण आणि किती प्रमाणात जवळचे सहयोगी आहेत? मग त्यांच्यासाठी मनोरंजनाचा प्रोग्राम बनवूया. ठीक आहे ना!

मधुबनवाल्यांनी रिकामे रहायचे नाही. रिकामे रहायचे आहे का? बीझी राहू इच्छिता ना! का थकून जाता? मधे-मधे १५ दिवस सुट्टी सुद्धा असते आणि असायला देखील हवी. परंतु एका पाठोपाठ एक प्रोग्राम लिस्टमध्ये असायला हवा तर उमंग-उत्साह राहतो, नाहीतर जेव्हा सेवा नसते तेव्हा दादी एक कंप्लेंट करते. सांगू कंप्लेंट कोणती ते? म्हणते, सगळे म्हणतात - आपापल्या गावी जाऊ. फिरायला जाऊ, सेवेसाठी देखील फेरीमारावी, त्यामुळे बीझी ठेवणे चांगले आहे. बीझी रहाल तर खिट-पिट सुद्धा होणार नाही. आणि पहा मधुबनवाल्यांच्या एका विशेषतेवर बापदादा पद्मगुणा मुबारक देत आहेत. १०० पट सुद्धा नाही, पद्म-गुणा. कोणत्या गोष्टीसाठी? जेव्हा पण कोणी येतात तर मधुबनवाल्यांमध्ये अशी सेवेची उत्कंठा लागते कि काहीही आत असो, ते लपून जाते. अव्यक्ति दिसू लागतात. अथक दिसून लागतात; आणि मग सर्व रिमार्क लिहून जातात कि, इथे तर प्रत्येकजण फरिश्ता वाटत आहे. तर हि विशेषता खूप चांगली आहे जी त्यावेळी विशेष विल पावर येते. सेवेची चमक येते. आता हे सर्टीफिकेट तर बापदादा देत आहेत. मुबारक आहे ना? मग टाळ्या तर वाजवा मधुबनवाले. खूप छान. बापदादा सुद्धा त्यावेळी फेरी मारायला येतात, तुम्हा लोकांना कळत नाही परंतु बापदादा फेरी मारायला येतात. तर ही विशेषता मधुबनची आणखी जास्त वाढत जाईल. अच्छा.

मीडिया विंग:- फॉरेनमध्ये देखील मीडियाचे विंगचे काम सुरु झाले आहे ना! बापदादांनी पाहिले की मीडियामध्ये आता मेहनत चांगली केली आहे. आता वर्तमानपत्रांमध्ये येणे सुरु झाले आहे आणि प्रेमाने देतातही. तर मेहनतीचे फळ देखील मिळत आहे. आता अजूनही विशेष वर्तमानपत्रांमध्ये, जसे टी.व्ही.मध्ये कोणीतरी कायमसाठी थोडा वेळही दिला आहे ना! प्रोग्राम रोज चालतो ना. तर हि प्रोग्रेस चांगली आहे. सर्वांना ऐकून चांगला अनुभव होतो. असाच वर्तमानपत्रामध्ये विशेष कॉलम मग तो आठवड्यामध्ये असो, अथवा रोज असो, किंवा एक दिवस आड असो एक कॉलम निश्चित करावा कि, ‘हा अभ्यास अध्यात्म शक्ती वाढवण्यासाठी एक संधी आहे’. ‘असा पुरुषार्थ करा’. ‘तशी सफलता आहे’, सबंध-संपर्क देखील चांगला वाढत जातो. आता वृत्तपत्राच्या बाबतीत काही कमाल करून दाखवा. करू शकता का? ग्रुप करू शकतो का? हात वर करा - हो करणार. उमंग-उत्साह आहे तर सफलता आहेच आहे. का नाही होऊ शकत! शेवटी तर वेळ येणारच आहे जेव्हा सर्व साधने तुमच्या बाजूने यूज होतील. तेच तुम्हाला ऑफर करतील. ऑफर करतील काहीतरी द्या, काहीतरी द्या. मदत घ्या. आता तुम्हा लोकांना सांगावे लागते - ‘सहयोगी बना’, आणि नंतर ते म्हणणार - ‘आम्हाला सहयोगी बनवा’. केवळ ही गोष्ट पक्की करा - ‘फरिश्ता, फरिश्ता, फरिश्ता’. मग पहा तुमचे काम किती लवकर होते. मागे लागावे लागणार नाही परंतु सावलीप्रमाणे ते स्वतःच तुमच्या मागे येतील. बस, फक्त तुमच्या अवस्थेमध्ये रुकावट आल्याने थांबलेले आहे. एव्हररेडी बना, तर फक्त बटण दाबायचे बाकी आहे, बस. चांगले करत आहात आणि करत रहाल.

चोहो बाजूंच्या देश-विदेशच्या साकार स्वरूपामध्ये अथवा सूक्ष्म स्वरूपामध्ये मिलन साजरे करणाऱ्या सर्व स्वराज्य अधिकारी आत्म्यांना, सदैव या श्रेष्ठ अधिकाराला आपल्या चलन आणि चेहऱ्याद्वारे प्रत्यक्ष करणाऱ्या विशेष आत्म्यांना, सदैव बापदादांना प्रत्येक पावलावर फॉलो करणाऱ्या, सदैव मनाला स्वच्छ आणि बुद्धीला क्लीयर ठेवणाऱ्या अशा स्वतः तीव्र पुरुषार्थी आत्म्यांना, सदैव सोबत राहणाऱ्या आणि सोबत चालणाऱ्या डबल लाईट मुलांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.

वरदान:-
साधनांना निर्लेप अथवा न्यारे बनून कार्यामध्ये लावणारे बेहदचे वैरागी भव बेहदचे वैरागी अर्थात कशातही आकर्षण नाही, नेहमी बाबांचे प्रिय. हे प्रेमच न्यारे बनवते. जर बाबांवर प्रेम नसेल तर न्यारे देखील बनू शकणार नाही, आकर्षणामध्ये याल. ज्यांचे बाबांवर प्रेम आहे ते सर्व आकर्षणांपासून दूर अर्थात न्यारे असणार - यालाच म्हटले जाते - ‘निर्लेप स्थिती’. कोणत्याही हदच्या आकर्षणांच्या प्रभावामध्ये येणारे नाही. रचना अथवा साधनांना निर्लेप बनून कार्यामध्ये लावणारे - असे बेहदचे वैरागीच राजऋषि आहेत.

सुविचार:-
अंतःकरण सच्चे आणि साफ असेल तर साहेब राजी होईल (बाबा संतुष्ट होतील).