09-07-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - सत्य बाबांसोबत आतून बाहेरून सच्चे रहा, तेव्हाच देवता बनू शकाल. तुम्ही ब्राह्मणच फरिश्ता सो देवता बनता”

प्रश्न:-
या ज्ञानाला ऐकण्याचा अथवा धारण करण्याचा अधिकार कोणाला मिळू शकतो?

उत्तर:-
ज्याने ऑलराऊंड पार्ट बजावला आहे, ज्याने सर्वात जास्त भक्ती केली आहे, तेच या ज्ञानाला धारण करण्यामध्ये खूप तीव्र गतीने जातील. उच्च पद सुद्धा तेच प्राप्त करतील. तुम्हा मुलांना काहीजण विचारतात - तुम्ही शास्त्रांना मानत नाही? तर बोला - जितकी शास्त्रे आम्ही वाचली आहेत, भक्ती केली आहे, तितकी दुनियेमध्ये कोणी करत नाही. आम्हाला आता भक्तीचे फळ मिळाले आहे, म्हणून आता भक्तीची गरज नाही.

ओम शांती।
बेहदचे बाबा बेहदच्या मुलांना बसून समजावून सांगत आहेत, सर्व आत्म्यांचे पिता सर्व आत्म्यांना समजावून सांगत आहेत कारण ते सर्वांचे सद्गती दाता आहेत. जे काही आत्मे आहेत, जीव आत्मेच म्हणणार. शरीर नसेल तर आत्मा पाहू शकणार नाही. भले ड्रामा प्लॅन अनुसार स्वर्गाची स्थापना बाबा करत आहेत परंतु बाबा म्हणतात - ‘मी स्वर्ग बघत नाही’. ज्यांच्यासाठी आहे तेच पाहू शकतात. तुम्हाला शिकवून मग मी तर कोणते शरीर धारण करतच नाही. तर शरीराविना कसे पाहू शकेन. असे नाही, जिथे-तिथे उपस्थित आहे, सर्वकाही पाहतात. नाही, बाबा बघतात फक्त तुम्हा मुलांना, ज्यांना गुल-गुल (फूल) बनवून आठवणीची यात्रा शिकवतात. ‘योग’ शब्द भक्तीचा आहे. ज्ञान देणारे एक ज्ञानाचे सागर आहेत, त्यांनाच सद्गुरु म्हटले जाते. बाकी सर्व आहेत गुरु. सत्य बोलणारे, सत्य खंड स्थापन करणारे तेच आहेत. भारत सत्य खंड होता, तिथे सर्व देवी-देवता निवास करत होते. तुम्ही आता मनुष्यापासून देवता बनत आहात. तर मुलांना समजावून सांगत आहेत - सत्य बाबांसोबत आतून-बाहेरून सच्चे रहायचे आहे. पूर्वी तर पावला-पावलावर असत्यच होते, ते सर्व सोडावे लागेल, जर स्वर्गामध्ये उच्च पद प्राप्त करायचे असेल तर. भले स्वर्गामध्ये तर बरेचजण जातील परंतु बाबांना जाणून सुद्धा विकर्म विनाश केली नाहीत तर शिक्षा भोगून हिशोब चुकता करावा लागेल, मग पद देखील खूप कमी मिळेल. राजधानी स्थापन होत आहे पुरुषोत्तम संगमयुगावर. राजधानी ना सतयुगामध्ये स्थापन होऊ शकत, ना कलियुगामध्ये; कारण बाबा सतयुग अथवा कलियुगामध्ये येत नाहीत. या युगाला म्हटले जाते पुरुषोत्तम कल्याणकारी युग. यामध्येच बाबा येऊन सर्वांचे कल्याण करतात. कलियुगानंतर सतयुग येणार आहे म्हणून संगमयुग सुद्धा जरूर हवे. बाबांनी सांगितले आहे हि पतित जुनी दुनिया आहे. गायन देखील आहे - ‘दूर देश का रहने वाला…’ तर परक्या देशामध्ये आपली मुले कुठून भेटतील. परक्या देशामध्ये मग परकी मुलेच भेटतात. त्यांना व्यवस्थित रित्या समजावून सांगतात - मी कोणामध्ये प्रवेश करतो. स्वतःचा सुद्धा परिचय देतात आणि ज्यांच्यामध्ये प्रवेश करतात त्यांना देखील समजावून सांगतात की, ‘हा तुझा अनेक जन्मांतील शेवटचा जन्म आहे’. किती क्लियर आहे.

आता तुम्ही इथे पुरुषार्थी आहात, संपूर्ण पवित्र नाही. संपूर्ण पवित्र असणाऱ्याला फरिश्ता म्हटले जाते. जे पवित्र नाहीत त्यांना पतितच म्हणणार. फरिश्ता बनल्यानंतर मग देवता बनता. सूक्ष्म वतनमध्ये तुम्ही संपूर्ण फरिश्ता पाहता, त्यांना फरिश्ता म्हटले जाते. तर बाबा समजावून सांगत आहेत - ‘मुलांनो, एका अल्फचीच आठवण करायची आहे’. अल्फ म्हणजे ‘बाबा’, त्यांना ‘अल्लाह’ देखील म्हणतात. मुलांना समजले आहे बाबांकडून स्वर्गाचा वारसा मिळतो. स्वर्ग कसा रचतात? आठवणीच्या यात्रेने आणि ज्ञानाने. भक्तीमध्ये ज्ञान असत नाही. ज्ञान फक्त एक बाबाच देतात ब्राह्मणांना. ब्राह्मण शीखा आहेत ना. आता तुम्ही ब्राह्मण आहात मग बाजोली (कोलांटीउडीचा खेळ) खेळणार. ब्राह्मण, देवता, क्षत्रिय… याला म्हटले जाते विराट रूप. विराट रूप काही ब्रह्मा, विष्णु, शंकराचे म्हणणार नाही. त्यामध्ये शीखा ब्राह्मण तर नाही आहेत. बाबा ब्रह्मा तनामध्ये येतात - हे तर कोणी जाणत नाहीत. ब्राह्मण कुळच सर्वोत्तम कुळ आहे, जेव्हा बाबा येऊन शिकवतात. बाबा शूद्रांना तर शिकवणार नाहीत ना. ब्राह्मणांनाच शिकवतात. शिकवण्यासाठी सुद्धा वेळ लागतो, राजधानी स्थापन होणार आहे. तुम्ही उच्च ते उच्च पुरुषोत्तम बना. नवी दुनिया कोण रचणार? बाबाच रचणार. हे विसरू नका. माया तुम्हाला विसरायला लावते, तिचा तर धंदाच हा आहे. ज्ञानामध्ये इतका हस्तक्षेप करत नाही, आठवणी मध्येच करते. आत्म्यामध्ये खूप कचरा भरलेला आहे, तो बाबांची आठवण केल्याशिवाय साफ होऊ शकणार नाही. ‘योग’ शब्दामुळे मुले खूप गोंधळून जातात. म्हणतात - ‘बाबा आमचा योग लागत नाही’. वास्तविक ‘योग’ शब्द त्या हठयोगींचा आहे. संन्यासी म्हणतात ब्रह्म तत्वाशी योग लावायचा आहे. आता ब्रह्म तत्व तर अतिशय अवाढव्य लांब-रुंद आहे, जसे आकाशामध्ये स्टार्स दिसतात, तसे तिथे देखील छोटे-छोटे ताऱ्याप्रमाणे आत्मे आहेत. ते आहे आकाशाच्या पलीकडे, जिथे सूर्य-चंद्राचा प्रकाश नाही. तर बघा तुम्ही किती छोटी-छोटी रॉकेट आहात. म्हणूनच बाबा म्हणतात - ‘सर्वप्रथम आत्म्याचे ज्ञान दिले पाहिजे’. ते तर एक भगवंतच देऊ शकतात. असे नाही कि, फक्त भगवंताला ओळखत नाहीत परंतु आत्म्याला देखील जाणत नाहीत. इतक्या छोट्याशा आत्म्यामध्ये ८४ च्या चक्राचा अविनाशी पार्ट भरलेला आहे, यालाच निसर्ग म्हटले जाते, आणखी काही म्हणू शकत नाही. आत्मा ८४ चे चक्र फिरतच राहते. दर ५ हजार वर्षानंतर हे चक्र फिरतच राहते. हे ड्रामामध्ये नोंदलेले आहे. दुनिया अविनाशी आहे, कधी विनाश होत नाही. ते लोक असे दाखवतात की मोठा प्रलय होतो आणि मग श्रीकृष्ण अंगठा चोखत पिंपळाच्या पानावरून येतो. परंतु असे काही होते थोडेच. हे तर बेकायदेशीर आहे. महाप्रलय कधीही होत नाही. एका धर्माची स्थापना आणि अनेक धर्मांचा विनाश होतच राहतो. या वेळेला मुख्य ३ धर्म आहेत. हे तर ऑस्पिसिअस (मंगलकारी) संगमयुग आहे. जुनी दुनिया आणि नवीन दुनिया यामध्ये रात्रं-दिवसाचा फरक आहे. काल नवीन दुनिया होती, आज जुनी आहे. कालच्या दुनियेमध्ये काय होते - हे तुम्ही समजू शकता. जो ज्या धर्माचा आहे, त्या धर्माचीच स्थापना करतात. ते तर फक्त एकटेच येतात, खूप असत नाहीत. नंतर मग हळू-हळू वृद्धी होते.

बाबा म्हणतात - ‘तुम्हा मुलांना कसलाच त्रास देत नाही. मुलांना त्रास कसा देणार! सर्वात प्रिय बाबा आहेत ना. म्हणतात - ‘मी तुमचा सद्गती दाता, दुःख हर्ता, सुख कर्ता आहे. आठवण देखील माझी एकाचीच करता. भक्ती मार्गामध्ये काय केले आहे, मला किती शिव्या देतात! म्हणतात - ‘गॉड इज वन’. सृष्टीचे चक्र सुद्धा एकच आहे, असे नाही आकाशामध्ये कोणती दुनिया आहे. आकाशामध्ये ग्रह-तारे आहेत. मनुष्य तर समजतात प्रत्येक ग्रहावर सृष्टी आहे. पाताळामध्ये सुद्धा दुनिया आहे. या सर्व आहेत भक्ती मार्गाच्या गोष्टी. उच्च ते उच्च भगवान एक आहेत. असे म्हणतात देखील - साऱ्या सृष्टीचे आत्मे तुमच्यामध्ये गुंफलेले आहेत, हि जशी माळा आहे. याला बेहदची रुद्रमाळा सुद्धा म्हणू शकता. धाग्यामध्ये बांधलेली आहे. गातात सुद्धा परंतु समजत काहीच नाही. बाबा येऊन समजावून सांगतात - ‘मुलांनो, मी तुम्हाला जरा सुद्धा त्रास देत नाही. हे देखील सांगितले आहे ज्यांनी सर्वात अगोदर भक्ती केली आहे, तेच ज्ञानामध्ये तीव्र गतीने पुढे जातील. भक्ती जास्ती केली आहे तर फळ सुद्धा त्यांना जास्त मिळायला हवे. म्हणतात की ‘भक्तीचे फळ भगवान देतात’; ते आहेत ज्ञानाचे सागर. तर जरूर ज्ञानाद्वारेच फळ देतील. भक्तीच्या फळाबद्दल कोणालाही माहीत नाहीये. भक्तीचे फळ आहे ज्ञान, ज्यामुळे स्वर्गाचा वारसा सुख मिळते. तर फळ देतात अर्थात नरकवासी पासून स्वर्गवासी बनवतात एक बाबा. रावणा विषयी देखील कोणालाच माहिती नाही आहे. म्हणतात देखील हि जुनी दुनिया आहे. कधीपासून जुनी आहे - तो हिशोब लावू शकत नाहीत. बाबा आहेत मनुष्य सृष्टी रूपी झाडाचे बीजरूप. सत्य आहेत. त्यांचा कधीही विनाश होत नाही, याला उलटे झाड म्हटले जाते. बाबा वरती आहेत, आत्मे बाबांना वरती पाहून बोलावतात, शरीर तर बोलावू शकत नाही. आत्मा तर एका शरीरातून निघून दुसऱ्यामध्ये निघून जाते. आत्मा ना घटते, ना वाढते, ना तिचा कधी मृत्यु होत. हा खेळ बनलेला आहे. संपूर्ण खेळाच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य बाबांनी सांगितले आहे. आस्तिक सुद्धा बनवले आहे. हे देखील सांगितले आहे कि या लक्ष्मी-नारायणामध्ये हे ज्ञान नाही आहे. तिथे तर आस्तिक-नास्तिक विषयी माहीतच नसते. या वेळेला बाबाच अर्थ समजावून सांगतात. नास्तिक त्यांना म्हटले जाते जे ना बाबांना जाणत, ना रचनेच्या आदि-मध्य-अंताला जाणत आणि ना कालावधी जाणत. या वेळेला तुम्ही आस्तिक बनले आहात. तिथे या गोष्टीच नाहीत. खेळ आहे ना. जी गोष्ट एका सेकंदामध्ये होते ती पुन्हा दुसऱ्या सेकंदामध्ये होत नाही. ड्रामामध्ये टिक-टिक होत राहते. जे पास्ट झाले चक्र फिरत जाते. जसा सिनेमा असतो, दोन तास किंवा तीन तासानंतर पुन्हा तोच सिनेमा जसाच्या तसा रिपीट होतो. घर इत्यादी तोडतात नंतर बघतात बनलेले आहे. तेच जसेच्या तसे रिपीट होते. यामध्ये गोंधळून जाण्याची गोष्टच नाही. मुख्य गोष्ट आहे आत्म्यांचा पिता परमात्मा आहे. ‘आत्मायें परमात्मा अलग रहे बहुकाल…’ दुरावतात, इथे येतात पार्ट बजावण्यासाठी. तुम्ही पूर्ण ५ हजार वर्ष दूर राहिले आहात. तुम्हा गोड मुलांना ऑलराउंड पार्ट मिळालेला आहे म्हणून तुम्हालाच समजावून सांगतात. ज्ञानाचे देखील तुम्ही अधिकारी आहात. सर्वात जास्त भक्ती ज्यांनी केली आहे, तेच ज्ञानामध्ये देखील वेगाने पुढे जातील, पद सुद्धा उच्च प्राप्त करतील. सर्वप्रथम एका शिवबाबांची भक्ती होते नंतर मग देवतांची. मग ५ तत्वांची सुद्धा भक्ती करतात, व्यभिचारी बनतात. आता बेहदचे बाबा तुम्हाला बेहदमध्ये घेऊन जातात, ते (दुनियावाले) मग बेहद भक्तीच्या अज्ञानामध्ये घेऊन जातात. आता बाबा तुम्हा मुलांना समजावून सांगत आहेत - ‘स्वतःला आत्मा समजून मज एका बाबांची आठवण करा’. तरी देखील इथून बाहेर गेल्यानंतर माया विसरायला लावते. जसे गर्भामध्ये पश्चात्ताप करतात - ‘आम्ही असे नाही करणार’ आणि बाहेर आल्यानंतर विसरून जातात. इथे देखील असे आहेत, बाहेर जाताच विसरून जातात. हा स्मृती आणि विस्मृतीचा खेळ आहे. आता तुम्ही बाबांची दत्तक मुले बनला आहात. शिवबाबा आहेत ना. ते आहेत सर्व आत्म्यांचे बेहदचे बाबा. बाबा किती दुरून येतात. त्यांचे घर आहे परमधाम. परमधाम वरून येतात तर जरूर मुलांसाठी सौगात घेऊन येतील. तळहातावर स्वर्ग सौगात म्हणून घेऊन येतात. बाबा म्हणतात - ‘सेकंदामध्ये स्वर्गाची बादशाही घ्या. फक्त बाबांना जाणा’. सर्व आत्म्यांचे पिता तर आहेत ना. म्हणतात - ‘मी तुमचा पिता आहे. मी कसा येतो ते देखील तुम्हाला समजावून सांगतो. मला रथ तर जरूर पाहिजे’. कोणता रथ? कोणा महात्म्याचा तर घेऊ शकत नाही. मनुष्य म्हणतात तुम्ही ब्रह्माला भगवान, ब्रह्माला देवता म्हणता. अरे, आम्ही कुठे म्हणतो! झाडाच्या वरती एकदम शेवटी उभे आहेत, जेव्हा कि सारे झाड तमोप्रधान आहे. ब्रह्मा देखील तिथे उभे आहेत तर अनेक जन्मांच्या अंताचा जन्म झाला ना. बाबा (ब्रह्मा बाबा) स्वतः म्हणतात - ‘माझ्या अनेक जन्मांच्या अंतिम जन्मामध्ये जेव्हा वानप्रस्थ अवस्था होते तेव्हा बाबा आले आहेत. ज्यांनी येऊन धंदा इत्यादी पासून मुक्त केले’. मनुष्य साठीनंतर भक्ती करतात भगवंताला भेटण्यासाठी.

बाबा म्हणतात - ‘तुम्ही सर्व मनुष्य मतावर होता, आता बाबा तुम्हाला श्रीमत देत आहेत’. शास्त्र लिहिणारे सुद्धा मनुष्य आहेत. देवता काही लिहीत नाहीत, आणि वाचतही नाहीत. सतयुगामध्ये शास्त्र असत नाहीत. भक्तीच नाहीये. शास्त्रांमध्ये सर्व कर्मकांड लिहिलेले आहे. इथे ती गोष्ट नाहीये. तुम्ही बघता बाबा ज्ञान देतात. भक्ती मार्गामध्ये तर आपण खूप शास्त्र वाचली आहेत. कोणी विचारले, ‘तुम्ही वेद-शास्त्र इत्यादींना मानत नाही का?’ तुम्ही बोला - ‘जे काही मनुष्य मात्र आहेत त्यांच्यापेक्षा जास्त आम्ही मानतो’. सुरुवातीपासून अव्यभिचारी भक्ती आम्ही सुरु केली आहे. आता आम्हाला ज्ञान मिळाले आहे. ज्ञानाने सद्गती होते मग आम्ही भक्तीचे काय करणार. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, हियर नो ईविल, सी नो ईविल…’ तर बाबा किती सोप्या पद्धतीने समजावून सांगतात - ‘गोड-गोड मुलांनो, स्वतःला आत्मा निश्चय करा’. मी आत्मा आहे, ते म्हणतात अल्लाह आहे. तुम्हाला शिकवण मिळते - ‘मी आत्मा आहे, बाबांची संतान आहे’. हेच माया वारंवार विसरायला लावते. देह-अभिमानी झाल्यामुळेच उलटे काम होते. आता बाबा म्हणतात - ‘मुलांनो, बाबांना विसरू नका. टाइम वेस्ट करू नका’. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) रचयिता आणि रचनेच्या रहस्याला यथार्थपणे समजून घेऊन आस्तिक बनायचे आहे. ड्रामाच्या ज्ञानामध्ये गोंधळून जायचे नाही. आपल्या बुद्धीला हद मधून काढून बेहदमध्ये घेऊन जायचे आहे.

२) सूक्ष्मवतनवासी फरिश्ता बनण्यासाठी संपूर्ण पवित्र बनायचे आहे. आत्म्यामध्ये जो कचरा भरलेला आहे, त्याला आठवणीच्या बळाने काढून साफ करायचे आहे.

वरदान:-
ईश्वरीय रसाचा अनुभव करून एकरस स्थितीमध्ये स्थित राहणारी श्रेष्ठ आत्मा भव

जी मुले ईश्वरीय रसाचा अनुभव करतात त्यांना दुनियेतील सर्व रस फिके वाटतात. जेव्हा आहेच एकमेव गोड रस तर एकाच दिशेला अटेन्शन जाईल ना. सहजच एकीकडे मन लागते, मेहनत करावी लागत नाही. बाबांचा स्नेह, बाबांची मदत, बाबांची साथ, बाबांद्वारे सर्व प्राप्ती सहजच एकरस स्थिती बनवते. अशा एकरस स्थितीमध्ये स्थित राहणारे आत्मेच श्रेष्ठ आहेत.

बोधवाक्य:-
कचऱ्याला सामावून घेऊन रत्न देणे हेच मास्टर सागर बनणे आहे.