09-09-2024
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - योगबलाद्वारे वाईट संस्कारांना परिवर्तन करून स्वतःमध्ये चांगले संस्कार
भरा. ज्ञान आणि पवित्रतेचे संस्कार चांगले संस्कार आहेत’’
प्रश्न:-
तुम्हा मुलांचा
बर्थ-राइट (जन्मसिद्ध अधिकार) कोणता आहे? तुम्हाला आता कोणती जाणीव होते?
उत्तर:-
तुमचा बर्थ-राइट आहे मुक्ती आणि जीवनमुक्ती. तुम्हाला आता जाणीव होते की आपल्याला
बाबांसोबत परत घरी जायचे आहे. तुम्ही जाणता - बाबा आले आहेत भक्तीचे फळ मुक्ती आणि
जीवनमुक्ती देण्यासाठी. आता सर्वांना शांतीधामला जायचे आहे. सर्वांनी आपल्या घराचा
साक्षात्कार करायचा आहे.
ओम शांती।
मनुष्य बाबांना सच्चा पातशाह (खरा बादशहा) देखील म्हणतात. इंग्रजीमध्ये पातशाह
म्हणत नाहीत, फक्त ‘सच्चा फादर’ म्हणतात. ‘गॉड फादर इज ट्रूथ’ म्हणतात. भारतामध्येच
म्हणतात - सच्चा पातशाह. आता फरक तर खूप आहे, ते (बाबा) फक्त सत्य तेच सांगतात,
सत्यच शिकवतात, सच्चे बनवतात. इथे म्हणतात - सच्चा पातशाह. सच्चे बनवतात देखील आणि
सचखंडाचा बादशहा सुद्धा बनवतात. हे तर बरोबर आहे - मुक्ती देखील देतात, जीवनमुक्ती
सुद्धा देतात, ज्याला भक्तीचे फळ म्हटले जाते. लिब्रेशन आणि फ्रूसन (मुक्ती आणि फळ).
भक्तीचे फळ देतात आणि लिबरेट (मुक्त) करतात. मुले जाणतात आपल्याला दोन्ही देतात.
लिबरेट तर सर्वांना करतात, फळ तुम्हाला देतात. लिब्रेशन आणि फ्रूसन (मुक्ती आणि फळ)
- ही देखील भाषा बनविलेली आहे ना. भाषा तर खूप आहेत. शिवबाबांची सुद्धा नावे खूप
ठेवतात. कोणाला म्हणाल त्यांचे नाव शिवबाबा आहे तर म्हणतात आम्ही तर त्यांना ‘मालक’
म्हणतो. मालक तर ठीक आहे परंतु त्याचे देखील नाव तर पाहिजे ना. नावा-रुपा पासून
वेगळी कोणती वस्तू असत नाही. मालक देखील कोणत्या वस्तूचाच बनतो ना. नाव-रूप तर जरूर
आहे. आता तुम्ही मुले जाणता - बाबा खरोखर लिबरेट सुद्धा करतात आणि मग शांतीधाम मध्ये
सर्वांना जरूर जायचे आहे. सर्वांनी आपल्या घराचा साक्षात्कार करायचा आहे. घरून आले
आहात तर अगोदर त्याचा साक्षात्कार कराल, त्याला म्हटले जाते गती-सद्गती. शब्द
बोलतात परंतु निरर्थकपणे. तुम्हा मुलांना तर जाणीव होत असते, आपण आपल्या घरी देखील
जाणार आणि फळ सुद्धा मिळणार. तुम्हाला नंबरवार मिळते आणि इतर धर्मवाल्यांना मग
वेळेनुसार मिळते. बाबांनी समजावून सांगितले होते की, हे पत्रक आहे खूप चांगले -
‘तुम्ही स्वर्गवासी आहात की नरकवासी?’ तुम्ही मुलेच जाणता, ही मुक्ती-जीवनमुक्ती
दोन्ही गॉडफादरली बर्थराइट आहेत. तुम्ही लिहू देखील शकता. बाबांकडून तुम्हा मुलांना
हा बर्थ-राइट मिळतो. बाबांचे बनल्याने दोन्ही गोष्टी प्राप्त होतात. तो आहे रावणाचा
बर्थ-राइट, हा आहे परमपिता परमात्म्याचा बर्थ-राइट. हा आहे भगवंताचा बर्थ-राइट, तो
आहे सैतानाचा बर्थ-राइट. असे लिहिले पाहिजे जेणेकरून थोडेतरी समजू शकतील. आता तुम्हा
मुलांना हेवन (स्वर्ग) स्थापन करायचा आहे. किती कार्य करायचे आहे! आता तर जसे छोटे
बालक आहात, ज्याप्रमाणे मनुष्य कलियुगासाठी म्हणतात की, आता बालक आहे. बाबा म्हणतात
- स्वर्गाच्या स्थापनेमध्ये बालक आहात. आता तुम्हा मुलांना वारसा मिळत आहे. रावणाचा
काही वारसा म्हणता येणार नाही. गॉडफादर कडून तर वारसा मिळतो. तो काही फादर थोडाच आहे,
त्याला (रावण ५ विकारांना) तर सैतान म्हटले जाते. सैतानाचा काय वारसा मिळणार? ५
विकार मिळतात, शो देखील तसाच करतात, तमोप्रधान बनतात. आता दसरा किती साजरा करतात,
मोठा समारंभच करतात. खूप खर्च करतात. परदेशातून सुद्धा निमंत्रण देऊन बोलावतात.
म्हैसूरमध्ये सर्वात प्रसिद्ध दसरा साजरा करतात. खूप पैसेवाले सुद्धा आहेत. रावण
राज्यामध्ये पैसा मिळतो तर अक्कल नष्ट होते. बाबा सविस्तरपणे समजावून सांगतात. याचे
नावच आहे रावण राज्य. त्याला मग म्हटले जाते ईश्वरीय राज्य. राम राज्य म्हणणे देखील
चुकीचे ठरते. गांधीजींना राम राज्य व्हावे असे वाटत होते. लोक समजतात की, गांधीजी
देखील अवतार होते. त्यांना किती धन देत होते. त्यांना भारताचे बापूजी म्हणत होते.
आता हे (शिवबाबा) तर साऱ्या विश्वाचे बापू आहेत. आता तुम्ही इथे बसले आहात, जाणता
किती जीव आत्मे असतील. जीव (शरीर) तर विनाशी आहे, बाकी आत्मा आहे अविनाशी. आत्मे तर
पुष्कळ आहेत. ज्याप्रमाणे वरती तारे राहतात ना. तारे जास्त आहेत की आत्मे जास्त
आहेत? कारण तुम्ही आहात धरतीवरील तारे आणि ते आहेत आकाशातील तारे. तुम्हाला देवता
म्हटले जाते, ते (दुनियावाले) मग त्यांना देखील देवता म्हणतात. तुम्हाला ‘लकी सितारे’
म्हटले जाते ना.
अच्छा, याच्यावर मग
आपसामध्ये डिस्कस करा (चर्चा करा). बाबा आता या गोष्टीमध्ये हात घालत नाहीत. हे तर
समजावून सांगितले आहे की सर्व आत्म्यांचा पिता एकच आहे, यांच्या बुद्धीमध्ये तर
सर्व आहे, जे काही मनुष्य मात्र आहेत, त्या सर्वांचे ते पिता आहेत. हे तर सर्वजण
जाणतात की संपूर्ण सृष्टी समुद्रावर उभी आहे. हे देखील सर्वांनाच काही माहित नाही
आहे. बाबांनी समजावून सांगितले होते हे रावण राज्य संपूर्ण सृष्टीवर आहे. असे नाही,
रावण राज्य काही सागराच्या पलीकडे आहे. समुद्र सभोवती तर आहेच. असे म्हणतात ना -
‘खाली बैल आहे, त्याच्या शिंगांवर सृष्टी उभी आहे. मग जेव्हा थकतो तेव्हा शिंग बदलतो’.
आता जुनी दुनिया नष्ट होऊन नवीन दुनियेची स्थापना होते. शास्त्रांमध्ये तर अनेक
प्रकारच्या गोष्टी दंतकथेच्या रूपामध्ये लिहिल्या आहेत. हे तर मुले समजतात - इथे
सर्व आत्मे शरीरासोबत आहेत, याला म्हटले जाते जीव-आत्मे. ते जे आत्म्यांचे घर आहे
तिथे तर शरीर नाहीये. त्याला म्हटले जाते निराकारी. जीव आकारी आहे म्हणून त्याला
साकारी म्हटले जाते. निराकाराला शरीर नसते. ही आहे साकारी सृष्टी. ती (शांतीधाम) आहे
निराकारी आत्म्यांची दुनिया. याला सृष्टी म्हणता येईल, त्याला म्हटले जाते
इनकार्पोरियल वर्ल्ड (निराकारी दुनिया). आत्मा जेव्हा शरीरामध्ये येते तेव्हा
चुरपूर सुरु होते (शरीरामध्ये चेतना येते). नाही तर शरीर काहीच कामाचे राहत नाही.
तर त्याला म्हटलेच जाते निराकारी दुनिया. जितके म्हणून आत्मे आहेत त्या सर्वांना
शेवटी इथे आलेच पाहिजे म्हणून याला पुरुषोत्तम संगमयुग म्हटले जाते. सर्व आत्मे
जेव्हा इथे येतात तेव्हा तिथे (परमधाममध्ये) मग एकही आत्मा राहत नाही. तिथे जेव्हा
एकदम रिकामे होते तेव्हा मग सर्व परत जातात. तुम्ही हे संस्कार घेऊन जाता नंबरवार
पुरुषार्थानुसार. कोणी ज्ञानाचे संस्कार घेऊन जातात, कोणी पवित्रतेचे संस्कार घेऊन
जातात. यायचे तरी देखील इथेच आहे. परंतु पहिले घरी तर जायचे आहे. तिथे आहेत चांगले
संस्कार. इथे आहेत वाईट संस्कार. चांगले संस्कार बदलून वाईट संस्कार होतात. मग वाईट
संस्कार योगबलाने चांगले होतात. चांगले संस्कार तिथे (सतयुगामध्ये) घेऊन जाल.
बाबांमध्ये देखील शिकवण्याचे संस्कार आहेत ना. जे येऊन शिकवण देतात. रचयिता आणि
रचनेच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य समजावून सांगतात. बीजा विषयी देखील स्पष्ट करून
सांगतात, तर संपूर्ण झाडाविषयी देखील स्पष्ट करून सांगतात. बीजा विषयीचे स्पष्टीकरण
आहे - ज्ञान आणि झाडाचे स्पष्टीकरण होते - भक्ती. भक्तीमध्ये खूप विस्तार असतो ना.
बीजाची आठवण करणे तर सोपे आहे. तिथेच निघून जायचे आहे. तमोप्रधानापासून सतोप्रधान
बनण्यासाठी वेळ थोडाच लागतो. मग सतोप्रधानापासून तमोप्रधान बनण्यासाठी ॲक्युरेट ५
हजार वर्षे लागतात. हे चक्र अतिशय अचूक बनलेले आहे जे रिपीट होत राहते. इतर कोणी या
गोष्टी सांगू शकणार नाही. तुम्ही सांगू शकता. अर्धे-अर्धे केले जाते. अर्धा भाग आहे
स्वर्ग, अर्धा भाग आहे नरक; मग त्याला विस्तृतपणे सुद्धा सांगता. स्वर्गामध्ये जन्म
कमी आणि आयुष्य जास्त असते. नरकामध्ये जन्म जास्त आणि आयुष्य कमी असते. तिथे आहेत
योगी, इथे आहेत भोगी म्हणून इथे जास्त जन्म असतात. या गोष्टींना दुसरे कोणीही जाणत
नाही. मनुष्यांना काहीच माहित नाही आहे. देवता कधी होते, ते कसे बनले, किती हुशार
बनले आहेत - हे देखील तुम्ही जाणता. बाबा यावेळी मुलांना शिकवून २१ जन्मांसाठी वारसा
देतात. मग तुमचे हे संस्कार राहत नाहीत. जसे राजांचे संस्कार होतात तर ज्ञान
शिकण्याचे संस्कार पूर्ण होतात. हे संस्कार पूर्ण झाले की मग नंबरवार
पुरुषार्थानुसार रुद्र माळेमध्ये ओवले जाल मग नंबरवार पार्ट बजावण्यासाठी याल.
ज्यांनी पूर्ण ८४ जन्म घेतले आहेत, ते पहिले येतात. त्यांचे नाव देखील सांगतात.
श्रीकृष्ण तर आहे फर्स्ट प्रिन्स ऑफ हेवन. तुम्ही जाणता केवळ एक थोडाच असेल,
संपूर्ण राजधानी असेल ना. राजा सोबत तर मग प्रजा देखील पाहिजे. होऊ शकते - एका
पासून दुसऱ्याची उत्पत्ती होत जाईल. जर म्हटले ८ एकत्रित येतात, परंतु श्रीकृष्ण तन
नंबरवन मध्ये येईल ना. ८ एकत्रित येतात, तर मग श्रीकृष्णाचे इतके गायन कशासाठी? या
सर्व गोष्टी नंतर पुढे समजावून सांगतील. म्हणतात ना - आज तुम्हाला खूप सखोल गोष्टी
ऐकवतो. काहीतरी राहिलेले आहे ना. ही युक्ती चांगली आहे - पहा जी गोष्ट समजत नाही तर
तुम्ही बोला, आमची मोठी बहीण उत्तर देऊ शकते, नाही तर सांगितले पाहिजे - अजून
बाबांनी सांगितलेले नाही. दिवसें-दिवस अजून सखोल गोष्टी ऐकवतात. हे सांगण्यासाठी
लाजण्याची गरज नाही. अति सखोल पॉईंट्स जेव्हा ऐकवतात तेव्हा तुम्हाला ऐकून खूप आनंद
होतो. आणि मग शेवटी म्हणतात मनमनाभव, मध्याजीभव. शब्द देखील शास्त्र बनविणाऱ्यांनी
लिहिले आहेत. गोंधळून जाण्याची तर गरजच नाही. बाबांची संतान बनला आणि बेहद सुखाचा
वारसा मिळाला. यामध्ये मनसा-वाचा-कर्मणा पवित्रतेची आवश्यकता आहे. लक्ष्मी-नारायणाला
बाबांचा वारसा मिळाला आहे ना. हे पहिल्या नंबरवर आहेत, ज्यांची पूजा होते. स्वतःला
देखील पहा - माझ्यामध्ये असे गुण आहेत. आता तर अवगुण आहेत ना. आपल्या अवगुणांविषयी
देखील कोणाला माहिती नाहीये.
आता तुम्ही बाबांचे
बनले आहात तर जरूर परिवर्तन करावे लागेल. बाबांनी बुद्धीचे कुलूप उघडले आहे. ब्रह्मा
आणि विष्णूचे देखील रहस्य समजावून सांगितले आहे. हे आहेत पतित, ते आहेत पावन. ॲडॉप्शन
(दत्तकविधान) या पुरुषोत्तम संगमयुगावरच होते. प्रजापिता ब्रह्मा जेव्हा असतात
तेव्हाच ॲडॉप्शन होते. सतयुगामध्ये तर होत नाही. इथे देखील कोणाला संतान होत नाही
तेव्हा मग ॲडॉप्ट करतात. प्रजापिता ब्रह्माला देखील जरूर ब्राह्मण मुले पाहिजेत. हे
आहेत मुख-वंशावली. ते (दुनियावाले) आहेत कुख-वंशावली. ब्रह्मा तर प्रसिद्ध आहे.
यांचे सरनेमच बेहदचे आहे. सर्वजण जाणतात प्रजापिता ब्रह्मा आदि देव आहेत, त्यांना
इंग्रजीमध्ये म्हणतात - ग्रेट-ग्रेट ग्रँड फादर. हे आहे बेहदचे सरनेम. ती सर्व आहेत
हदची सरनेम; म्हणून बाबा म्हणतात की, जरूर हे सर्वांना माहीत असायला पाहिजे की भारत
महान ते महान तीर्थ आहे, जिथे बेहदचे बाबा येतात. असे नाही, संपूर्ण भारतामध्ये
उपस्थित झाले. शास्त्रांमध्ये ‘मगध देश’ लिहिला आहे, परंतु ज्ञान कुठे शिकवले?
आबूमध्ये कसे आले? दिलवाला मंदिर देखील इथे पूर्ण यादगार आहे. ज्यांनीपण बनविले आहे,
त्यांच्या देखील बुद्धीमध्ये आले आणि त्याप्रमाणे बनवले. ॲक्युरेट मॉडेल तर बनवू
शकणार नाहीत. बाबा इथेच येऊन सर्वांची सद्गती करतात, मगध देशामध्ये नाही. तो तर
पाकिस्तान झाला आहे. हे आहे - ‘पाक स्थान (पवित्र स्थान)’. वास्तविक ‘पाक स्थान’ तर
स्वर्गाला म्हटले जाते. हा सारा पाक आणि नापाकचा (पवित्र आणि अपवित्रचा) ड्रामा
बनलेला आहे.
तर गोड-गोड सिकीलध्या
मुलांनो, तुम्ही हे समजता कि, ‘आत्मायें परमात्मा अलग रहे बहुकाल…’. किती काळानंतर
भेटले आहात? पुन्हा केव्हा भेटणार? ‘सुंदर मेला कर दिया जब सद्गुरु मिला दलाल’च्या
रूपामध्ये. ‘गुरु’ तर पुष्कळ आहेत ना म्हणून ‘सद्गुरु’ म्हटले जाते. स्त्रीचे जेव्हा
लग्न होते तेव्हा हथियाला बांधतात (गठबंधन करतात) आणि तिला सांगतात - ‘हा पती तुझा
गुरु ईश्वर आहे’. पती तर सर्वात आधी अपवित्र बनवतो. आजकाल तर दुनिया खूप गलिच्छ
झालेली आहे. आता तुम्हा मुलांना गुल-गुल (फूल) बनायचे आहे. तुम्हा मुलांची
पक्की-पक्की गाठ बाबा बांधतात.
तसे तर शिवजयंतीच्या
सोबतच रक्षाबंधन होते. गीता जयंती सुद्धा झाली पाहिजे. श्रीकृष्णाची जयंती थोड्या
उशिराने नवीन दुनियेमध्ये झाली आहे. बाकी सर्व सण-उत्सव या वेळेचे आहेत. राम नवमी
कधी झाली - हे देखील कोणाला माहित आहे का? तुम्ही म्हणाल नवीन दुनियेमध्ये १२५०
वर्षानंतर राम नवमी होते. शिव जयंती, कृष्ण जयंती, राम जयंती कधी झाली…? हे कोणीही
सांगू शकत नाही. तुम्हा मुलांना देखील आता बाबांद्वारे समजले आहे. ॲक्युरेट सांगू
शकता. जणू साऱ्या दुनियेची जीवन कहाणी तुम्ही सांगू शकता. लाखो वर्षांची गोष्ट
थोडीच कोणी सांगू शकेल. बाबा किती चांगले बेहदचे शिक्षण शिकवतात. एकदाच तुम्ही २१
जन्मांसाठी विवस्त्र होण्यापासून वाचता. आता तुम्ही ५ विकाररूपी रावणाच्या परक्या
राज्यामध्ये आहात. आता संपूर्ण ८४ चे चक्र तुमच्या स्मृतीमध्ये आले आहे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) बेहद सुखाचा
वारसा प्राप्त करण्यासाठी मनसा-वाचा-कर्मणा पवित्र जरूर बनायचे आहे. योगबलाने चांगले
संस्कार धारण करायचे आहेत. स्वतःला गुणवान बनवायचे आहे.
२) नेहमी आनंदामध्ये
राहण्यासाठी बाबा ज्या अति सखोल गोष्टी सांगतात, त्या ऐकून मग इतरांना ऐकवायच्या
आहेत. कोणत्याही गोष्टींमध्ये गोंधळून जायचे नाही. युक्तीने उत्तर द्यायचे आहे.
लाजायचे नाही.
वरदान:-
सुख स्वरूप
बनून प्रत्येक आत्म्याला सुख देणारे मास्टर सुखदाता भव
जे मुले नेहमी यथार्थ
कर्म करतात त्यांना त्या कर्माचे प्रत्यक्ष फळ आनंद आणि शक्ती मिळते. त्यांचे मन
सदैव आनंदी असते, त्यांच्यावर संकल्प मात्र सुद्धा दुःखाची लाट येऊ शकत नाही.
संगमयुगी ब्राह्मण अर्थात दुःखाचे नामो-निशाण सुद्धा नाही कारण सुखदात्याची मुले
आहेत. अशी सुखदात्याची मुले स्वतः देखील मास्टर सुखदाता असतील. ते प्रत्येक
आत्म्याला नेहमी सुखच देतील. ते कधीही ना दुःख देणार, ना दुःख घेणार.
बोधवाक्य:-
मास्टर दाता
बनून सहयोग, स्नेह आणि सहानुभूती देणे - हेच दयाळू आत्म्याचे लक्षण आहे.