09-09-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - आपणच आपल्यावर कृपा करायची आहे, अभ्यासातील गॅप भरून काढा, कोणतेही विकर्म करून आपले रजिस्टर खराब करू नका”

प्रश्न:-
या उच्च शिक्षणामध्ये पास होण्याकरिता मुख्य शिकवण कोणती मिळते? त्यासाठी कोणत्या गोष्टीवर विशेष अटेंशन पाहिजे?

उत्तर:-
या शिक्षणामध्ये पास व्हायचे असेल तर डोळे अतिशय पवित्र असायला पाहिजेत कारण हे डोळेच धोका देतात, हेच क्रिमिनल (विकारी) बनतात. शरीराला बघितल्यानेच कर्मेंद्रियांमध्ये चंचलता येते त्यामुळे डोळे कधीही क्रिमिनल (विकारी) होऊ नयेत, पवित्र बनण्यासाठी भाऊ-बहीणी होऊन रहा, आठवणीच्या यात्रेवर पूर्णपणे अटेंशन द्या.

गीत:-
धीरज धर मनुवा…

ओम शांती।
हे कोणी म्हटले? बेहदच्या बाबांनी बेहदच्या मुलांना म्हटले. जसे कोणी व्यक्ती आजारी पडते तर तिला धीर दिला जातो की, धीर धर - तुझी सर्व दुःख दूर होतील. त्यांना खुशीमध्ये आणण्यासाठी हिंमत दिली जाते. आता त्या तर आहेत हदच्या गोष्टी. ही आहे बेहदची गोष्ट, यांची किती खंडीभर मुले असतील. सर्वांना दुःखातून सोडवायचे आहे. हे देखील तुम्ही मुलेच जाणता. तुम्ही विसरता कामा नये. बाबा आले आहेत सर्वांची सद्गती करण्यासाठी. सर्वांचे सद्गती दाता आहेत तर याचा अर्थ सगळे दुर्गतीमध्ये आहेत. संपूर्ण दुनियेतील मनुष्यमात्र, त्यामध्ये देखील खास भारत बाकी साधारण दुनिया म्हटले जाते. विशेष तुम्ही सुखधाममध्ये जाल. बाकी सर्व शांतीधाममध्ये निघून जातील. बुद्धीमध्ये येते - खरोखर आपण सुखधाममध्ये होतो तेव्हा इतर धर्म वाले शांतीधाममध्ये होते. बाबा आले होते, भारताला सुखधाम बनविले होते. ॲडव्हरटाईजमेंट देखील अशी केली पाहिजे. समजावून सांगायचे आहे - दर ५ हजार वर्षानंतर निराकार शिवबाबा येतात. ते सर्वांचे पिता आहेत. बाकी सर्व ब्रदर्स आहेत. ब्रदर्सच पुरुषार्थ करतात फादर कडून वारसा घेण्यासाठी. असे तर नाही फादर्स पुरुषार्थ करतात. सगळेच फादर्स असतील तर मग वारसा कोणाकडून घ्याल? ब्रदर्स कडून काय? हे तर होऊ शकत नाही. आता तुम्ही समजता - ही तर खूप सोपी गोष्ट आहे. सतयुगामध्ये एकच देवी-देवता धर्म होता. बाकी सर्व आत्मे मुक्तिधाममध्ये निघून जातात. जगाचा इतिहास-भूगोल रिपीट असे म्हणतात तर जरूर एकच इतिहास-भूगोल आहे जो रिपीट होतो. कलियुगा नंतर मग सतयुग असेल. दोघांच्यामध्ये मग संगमयुग देखील जरूर असेल. याला म्हटले जाते सुप्रीम, पुरुषोत्तम कल्याणकारी युग. आता तुमच्या बुद्धीचे कुलूप उघडले आहे तर समजता ही तर अतिशय सोपी गोष्ट आहे. नवीन दुनिया आणि जुनी दुनिया. जुन्या झाडाला जरूर पुष्कळ पाने असतील. नवीन झाडाला थोडी पाने असतील. ती आहे सतोप्रधान दुनिया, याला तमोप्रधान म्हणणार. तुमचे देखील नंबरवार पुरुषार्था अनुसार बुद्धीचे कुलूप उघडले आहे कारण सगळेच काही यथार्थ रीतीने बाबांची आठवण करत नाहीत. तर धारणा देखील होत नाही. बाबा तर पुरुषार्थ करवून घेतात, परंतु भाग्यामध्ये नाही. ड्रामा अनुसार जे चांगल्या रीतीने शिकतील आणि शिकवतील, बाबांचे मदतगार बनतील, कोणत्याही परिस्थितीमध्ये तेच उच्च पद प्राप्त करतील. स्कूलमध्ये स्टूडेंट देखील समजतात की, आपण किती मार्कांनी पास होणार. तीव्र वेगाने जाणारे जोरदारपणे पुरुषार्थ करतात. ट्युशनसाठी टीचर ठेवतात की कसेही करून पास व्हावे. इथे देखील खूप अभ्यास भरून काढायचा आहे. स्वतःवर कृपा करायची आहे. बाबांना जर कोणी विचारले - आता जर शरीर सुटले तर या स्थितीमध्ये कोणते पद मिळेल? तर बाबा लगेच सांगतील. ही गोष्ट तर समजायला खूपच सोपी आहे. जसे हदचे स्टूडेंट समजतात, बेहदचे स्टूडेंट देखील समजू शकतात. बुद्धीने समजू शकतात, आपल्याकडून वारंवार या चुका होत आहेत, विकर्म होते. रजिस्टर खराब असेल तर रिजल्ट देखील असाच येईल. प्रत्येकाने आपले रजिस्टर ठेवावे. अशी तर ड्रामा अनुसार सर्व काही नोंद होतेच. स्वतः देखील समजतात आपले रजिस्टर तर खूप खराब आहे. समजत नसेल तर बाबा सांगू शकतात. स्कूलमध्ये रजिस्टर इत्यादी सर्व ठेवले जाते. याबद्दल (या ज्ञानाबद्दल) मात्र दुनियेमध्ये कोणालाच माहित नाही आहे. नाव आहे ‘गीता पाठशाळा’. ‘वेद पाठशाला’ कधी म्हटले जात नाही. वेद-उपनिषद ग्रंथ इत्यादी कशाचीच पाठशाळा म्हणता येणार नाही. पाठशाळेमध्ये एम ऑब्जेक्ट आहे. आपण भविष्यामध्ये हे बनणार. जेव्हा कोणी वेद-शास्त्रांचा खूप अभ्यास करतात तर त्यांना देखील टायटल (उपाधी) मिळते. कमाई देखील होते. कोणी-कोणी तर खूप कमाई करतात. परंतु ती काही अविनाशी कमाई नाहीये, सोबत येत नाही. ही खरी कमाई सोबत येणार आहे. बाकी सर्व नष्ट होते. तुम्ही मुले जाणता आपण खूप-खूप कमाई करत आहोत. आपण विश्वाचे मालक बनू शकतो. सूर्यवंशी डिनायस्टी आहे तर जरूर मुले तख्तावर बसतील. खूप उच्च पद आहे. तुम्हाला स्वप्नामध्ये देखील वाटत नव्हते की आपण पुरुषार्थ करून राज्य पद प्राप्त करु. याला म्हटले जाते राजयोग. तो असतो बॅरिस्टरी योग, डॉक्टरी योग. अभ्यास आणि शिकविणारा लक्षात राहतो. इथे देखील ही आहे - सहज आठवण. आठवणीमध्येच मेहनत आहे. स्वतःला देही-अभिमानी समजावे लागेल. आत्म्यामध्येच संस्कार भरतात. असे भरपूरजण येतात जे म्हणतात - आम्ही तर शिवबाबांचीच पूजा करत होतो, परंतु का पूजा करत होतो हे जाणत नाहीत. शिवालाच बाबा म्हणतात. दुसऱ्या कोणालाही बाबा म्हणणार नाही. हनुमान, गणेश इत्यादींची पूजा करतात, ब्रह्माची पूजा होत नाही. अजमेरला भले मंदिर आहे. तिथले थोडेसे ब्राह्मण लोक पूजा करत असतील. बाकी गायन इत्यादी काहीच नाही. श्रीकृष्णाचे, लक्ष्मी-नारायणाचे किती गायन आहे. ब्रह्माचे नावही नाही कारण ब्रह्मा तर यावेळी सावळे आहेत. मग बाबा येऊन त्यांना ॲडॉप्ट करतात. हे देखील खूप सोपे आहे. तर बाबा मुलांना विभिन्न प्रकारे समजावून सांगतात. बुद्धीमध्ये हे रहावे की, शिवबाबा आम्हाला ऐकवत आहेत. ते पिता देखील आहेत, टीचर, गुरु देखील आहेत. शिवबाबा ज्ञानाचे सागर आम्हाला शिकवत आहेत. आता तुम्ही मुले त्रिकालदर्शी बनला आहात. ज्ञानाचा तिसरा नेत्र तुम्हाला मिळतो आहे. हे देखील तुम्ही समजता आत्मा अविनाशी आहे. आत्म्यांचा पिता देखील अविनाशी आहे. हे देखील दुनियेमध्ये कोणीही जाणत नाही. ते तर सर्व बोलावतच राहतात - ‘बाबा, आम्हाला पतितापासून पावन बनवा’. असे म्हणत नाहीत की वर्ल्डचा इतिहास-भूगोल येऊन ऐकवा. हे तर बाबा स्वतःच येऊन ऐकवतात. पतिता पासून पावन आणि पुन्हा पावन पासून पतित कसे बनणार? हिस्ट्री रिपीट कशी होईल, ते देखील सांगतात. ८४ चे चक्र आहे. आपण पतित का बनलो मग पावन बनून कुठे जाऊ इच्छितो. मनुष्य तर संन्यासी इत्यादींकडे जाऊन म्हणतील मनाची शांती कशी मिळेल? असे म्हणणार नाहीत की, आम्ही संपूर्ण निर्विकारी पावन कसे बनायचे? असे म्हणायला लाज वाटते. आता बाबांनी समजावून सांगितले आहे - तुम्ही सर्व भक्तिणी आहात. मी आहे भगवान, ब्राईडग्रुम (नवरदेव). तुम्ही आहात ब्राईड्स (वधू). तुम्ही सर्वजण माझी आठवण करता. मी प्रवासी अतिशय सुंदर आहे. संपूर्ण दुनियेच्या मनुष्यमात्रांना सुंदर बनवतो. वंडर ऑफ वर्ल्ड स्वर्गच असतो. इथे सात वंडर्स मोजतात. तिथे तर वंडर ऑफ वर्ल्ड एकच स्वर्ग आहे. बाबा देखील एक, स्वर्ग देखील एक ज्याची सर्व मनुष्यमात्र आठवण करतात. इथे तर काहीच वंडर नाहीये. तुम्हा मुलांमध्ये संयम आहे आता सुखाचे दिवस येत आहेत.

तुम्ही समजता या जुन्या दुनियेचा विनाश होईल तेव्हाच तर स्वर्गाची राजाई मिळेल. आता अजून राजाई स्थापन झालेली नाहीये. हो, प्रजा बनत जाते. मुले आपसामध्ये सल्लामसलत करतात, सेवेची वृद्धी कशी होईल? सर्वांना संदेश कसा द्यावा? बाबा आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना करतात. बाकी सर्वांचा विनाश करतात. अशा बाबांची आठवण केली पाहिजे ना. जे बाबा आपल्याला राजतिलकाचा अधिकारी बनवून बाकी सर्वांचा विनाश करवितात. नैसर्गिक आपत्ती देखील ड्रामामध्ये नोंदलेली आहे. याच्या शिवाय दुनियेचा विनाश होऊ शकत नाही. बाबा म्हणतात आता तुमची परीक्षा खूप जवळ आहे, मृत्यूलोकातून अमर लोकमध्ये ट्रान्सफर व्हायचे आहे. जितके चांगल्या रीतीने शिकाल आणि शिकवाल, तितके उच्च पद प्राप्त कराल कारण आपली प्रजा बनवता. पुरुषार्थ करून सर्वांचे कल्याण केले पाहिजे. चॅरिटी बिगिन्स ॲट होम. हा नियम आहे. पहिले मित्र-संबंधी जातवाले इत्यादीच येतील. त्यानंतर पब्लिक येते. सुरुवातीला झाले देखील असेच. हळू-हळू वृद्धी झाली मग मुलांना राहण्यासाठी मोठे घर बनले ज्याला ‘ओमनिवास’ म्हटले जात होते. मुले येऊन शिकू लागली. हे सर्व ड्रामामध्ये नोंदलेले होते, जे पुन्हा रिपीट होईल. याला कोणी बदलू थोडेच शकते. हे शिक्षण किती उच्च आहे. आठवणीची यात्राच मुख्य आहे. मुख्य म्हणजे डोळेच खूप धोका देतात. डोळे क्रिमिनल (विकारी) बनतात तेव्हाच शरीराची कर्मेंद्रिये चंचल होतात. एखादी सुंदर मुलगी बघतात, तर बस्स तिच्यामध्येच अडकून पडतात. दुनियेमध्ये अशा खूप केसेस होतात. गुरुची देखील क्रिमिनल आय (वक्र दृष्टी) होते. इथे बाबा म्हणतात - क्रिमिनल आय अजिबात असता कामा नये. बहिण-भाऊ बनून राहाल तेव्हाच पवित्र राहू शकाल. लोकांना काय माहित ते तर हसणारच. शास्त्रांमध्ये तर या गोष्टीच नाहीत. बाबा म्हणतात - हे ज्ञान प्राय: लोप होते. नंतर द्वापर पासून ही शास्त्रे इत्यादी बनली आहेत. आता बाबा मुख्य गोष्ट सांगतात की, अल्फची आठवण करा तर विकर्म विनाश होतील. स्वतःला आत्मा समजा. तुम्ही ८४ चे चक्र फिरून आला आहात. आता पुन्हा तुमची आत्मा देवता बनत आहे. छोट्याशा आत्म्यामध्ये ८४ जन्मांचा अविनाशी पार्ट भरलेला आहे, वंडर आहे ना. अशा वंडर ऑफ वर्ल्डच्या गोष्टी बाबाच येऊन सांगतात. कोणाचा ८४ चा, कोणाचा ५०-६० जन्मांचा पार्ट आहे. परमपिता परमात्म्याला देखील पार्ट मिळालेला आहे. ड्रामा अनुसार हा अनादि अविनाशी ड्रामा आहे. कधी सुरू झाला, बंद कधी होणार - हे सांगू शकत नाही कारण हा अनादि अविनाशी ड्रामा आहे. या गोष्टी कोणीही जाणत नाहीत. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) आता परीक्षेची वेळ खूप जवळ आली आहे त्यामुळे पुरुषार्थ करून आपले आणि सर्वांचे कल्याण करायचे आहे, शिकायचे आणि शिकवायचे आहे, चॅरिटी बिगिन्स ॲट होम.

२) देही-अभिमानी बनून अविनाशी, खरी कमाई जमा करायची आहे. आपले रजिस्टर ठेवायचे आहे. कोणतेही असे विकर्म होऊ नये ज्यामुळे रजिस्टर खराब होईल.

वरदान:-
सर्वांना उमंग-उत्साहाचा सहयोग देऊन शक्तिशाली बनविणारे सच्चे सेवाधारी भव

सेवाधारी अर्थात सर्वांना उमंग-उत्साहाचा सहयोग देऊन शक्तिशाली बनविणारे. आता वेळ कमी आहे आणि रचना जास्तीत जास्त येणार आहे. फक्त एवढ्याशा संख्येमध्ये खुश होऊ नका की खूप आले. आता तर पुष्कळ संख्या वाढणार आहे म्हणून तुम्ही जी पालना घेतली आहे त्याचे रिटर्न द्या. येणाऱ्या निर्बल आत्म्यांचे सहयोगी बनून त्यांना समर्थ, अचल-अडोल बनवा तेव्हा म्हणणार सच्चे सेवाधारी.

बोधवाक्य:-
रुहला (आत्म्याला) जेव्हा, जिथे आणि जसे पाहिजे तसे स्थिर करा - हीच रुहानी ड्रिल आहे.

अव्यक्त इशारे:- आता लगनच्या (उत्कटतेच्या) अग्नीला प्रज्वलित करून योगाला ज्वाला रूपी बनवा.

पॉवरफुल (शक्तिशाली) मनाची निशाणी आहे - सेकंदामध्ये जिथे पाहिजे तिथे पोहोचू शकते. जेव्हा का मन उडायला शिकते, प्रॅक्टिस झाली तर मग सेकंदामध्ये जिथे पाहिजे तिथे पोहचू शकते. आता-आता साकार वतनमध्ये, आता-आता परमधाम मध्ये, सेकंदाचा वेग आहे. आता याच अभ्यासाला वाढवा.