09-10-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“ गोड मुलांनो - तुम्ही आता काट्या पासून फूल बनला आहात, तुम्ही नेहमी सर्वांना सुख द्यायचे आहे, तुम्ही कोणालाही दुःख देऊ शकत नाही”

प्रश्न:-
चांगली फर्स्टक्लास पुरुषार्थी मुले कोणते बोल मोकळ्या मनाने बोलतील?

उत्तर:-
बाबा, आम्ही तर पास विद् ऑनर होऊन दाखवणार. तुम्ही निश्चिंत रहा. त्यांचे रजिस्टर देखील चांगले असेल. त्यांच्या मुखावाटे कधीही हे बोल निघणार नाहीत की, आता तर आम्ही पुरुषार्थी आहोत. पुरुषार्थ करून असे महावीर बनायचे आहे जेणेकरून माया जरा देखील विचलित करू शकणार नाही.

ओम शांती।
गोड-गोड रूहानी मुले रुहानी बाबांकडून शिकत आहेत. स्वतःला आत्मा समजले पाहिजे. निराकार बाबांची आपण निराकारी मुले आत्मे शिकत आहोत. दुनियेमध्ये साकारी टीचरच शिकवतात. इथे आहेत निराकार पिता, निराकार टीचर, बाकी यांची काही किंमत नाही. शिवबाबा बेहदचे पिता येऊन यांना किंमत देतात. मोस्ट व्हॅल्युएबल (सर्वात मौल्यवान) आहेत शिवबाबा, जे स्वर्गाची स्थापना करतात. किती महान कार्य करतात. जितके बाबा उच्च ते उच्च गायले जातात, मग तितकेच मुलांना देखील श्रेष्ठ बनायचे आहे. तुम्ही जाणता सर्वात श्रेष्ठ आहेत बाबा. हे देखील तुमच्या बुद्धीमध्ये आहे की खरोखर, आता स्वर्गाची राजाई स्थापन होत आहे, हे आहे संगमयुग. सतयुग आणि कलियुगाच्या मधला काळ आहे पुरुषोत्तम बनण्याचे संगमयुग. पुरुषोत्तम शब्दाचा अर्थ देखील मनुष्य जाणत नाहीत. उच्च ते उच्च तेच मग नीच ते नीच बनले आहेत. पतित आणि पावन यामध्ये किती अंतर आहे. देवतांचे जे पुजारी असतात, ते स्वतः वर्णन करतात - ‘तुम्ही सर्वगुण संपन्न… विश्वाचे मालक. आम्ही विषय वैतरणी नदीमध्ये गोते खाणारे आहोत’. म्हणायचे म्हणून म्हणतात, समजतात थोडेच. ड्रामा विचित्र वंडरफुल आहे. अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही कल्प-कल्प ऐकता. बाबा येऊन समजावून सांगतात. ज्यांचे बाबांवर पूर्ण प्रेम आहे त्यांना खूप कशिश होते (आकर्षित होतात). आता आत्मा बाबांना कशी भेटेल? भेटणे होते साकारमध्ये, निराकारी दुनियेमध्ये तर आकर्षणाचा प्रश्नच येत नाही. तिथे तर आहेतच सर्व पवित्र. गंज निघालेला आहे. आकर्षणाचा प्रश्नच उद्भवत नाही. प्रेमाची गोष्ट इथे होते. अशा बाबांना तर एकदम पकडूनच ठेवा. बाबा तुम्ही तर कमाल करता. तुम्ही आमचे जीवन असे बनवता. खूप प्रेम पाहिजे. प्रेम का नाही कारण की गंज चढलेला आहे. आठवणीच्या यात्रे शिवाय गंज निघणार नाही, इतके लवली (गोड) बनत नाही. तुम्हा फुलांना तर इथेच फुलायचे आहे, फूल बनायचे आहे, तेव्हाच मग तिथे जन्म-जन्मांतर फूल बनता. किती आनंद झाला पाहिजे - आपण काट्यापासून फूल बनत आहोत. फुले नेहमी सर्वांना सुख देतात. फुलांना सर्वजण आपल्या डोळ्यांवर ठेवतात. त्याचा सुगंध घेतात. फुलांचे अत्तर बनवतात. गुलाबाचे जल बनवतात. बाबा तुम्हाला काट्यांपासून फूल बनवतात. तर तुम्हा मुलांना आनंद का होत नाही! बाबांना तर आश्चर्य वाटते, शिवबाबा आपल्याला स्वर्गाचे फूल बनवतात! फूल देखील शिळे झाले की मग एकदम कोमेजून जाते. तुमच्या बुद्धीमध्ये आहे आता आपण मनुष्यापासून देवता बनत आहोत. तमोप्रधान मनुष्य आणि सतोप्रधान देवता यांच्यामध्ये किती फरक आहे. हे देखील बाबांशिवाय इतर कोणीही सांगू शकत नाही.

तुम्ही जाणता आपण देवता बनण्यासाठी शिकत आहोत. शिक्षणामध्ये नशा असतो ना. तुम्ही देखील समजता आपण बाबांकडून शिकून विश्वाचे मालक बनतो. तुमचे शिक्षण आहे फॉर फ्युचर (भविष्याकरिता). भविष्यासाठी शिक्षण असे कधी ऐकले आहे? तुम्हीच म्हणता आम्ही शिकतो नवीन दुनियेकरिता. नवीन जन्माकरिता. कर्म-अकर्म-विकर्माची गती देखील बाबा समजावून सांगतात. गीतेमध्ये देखील आहे परंतु त्याचा अर्थ गीता वाचणाऱ्यांना थोडाच कळतो. आता बाबांकडून तुम्हाला कळला आहे की सतयुगामध्ये कर्म ही अकर्म होतात आणि मग रावण राज्यामध्ये कर्म ही विकर्म होण्यास सुरूवात होते. ६३ जन्म तुम्ही अशी कर्म करत आला आहात. विकर्मांचे ओझे डोक्यावर खूप आहे. सर्व पाप-आत्मे बनले आहेत. आता ती पास्टची (मागील जन्मांतील) विकर्म कशी नष्ट होतील. तुम्ही जाणता पहिले सतोप्रधान होतो मग ८४ जन्म घेतले आहेत. बाबांनी ड्रामाची ओळख दिली आहे. जे सर्वात पहिले येतील, सर्वात पहिले ज्यांचे राज्य असेल तेच ८४ जन्म घेतील. मग पुन्हा बाबा येऊन राज्य-भाग्य देतील. आता तुम्ही राज्य घेत आहात. समजता आपण कसे ८४ चे चक्र फिरलो आहोत. आता पुन्हा पवित्र बनायचे आहे. बाबांची आठवण करता-करता आत्मा पवित्र होईल मग हे जुने शरीर नष्ट होईल. मुलांना अपार आनंद झाला पाहिजे. ही महिमा तर कधीही कुठे ऐकली नाही की बाबा, पिता देखील आहेत, टीचर देखील आहेत, गुरु देखील आहेत. शिवाय, तिघेही उच्च ते उच्च आहेत. सत्य पिता, सत्य टीचर, सत्य गुरू तिन्ही एकच आहेत. आता तुम्हाला भासना येते. बाबा जे ज्ञानाचे सागर आहेत, सर्व आत्म्यांचे पिता आहेत, ते आपल्याला शिकवत आहेत. युक्ती रचत आहेत. मॅगझिनमध्ये देखील चांगले-चांगले पॉईंट्स येत असतात. होऊ शकते रंगीत चित्रांचे देखील मॅगझिन निघेल. केवळ अक्षर अगदी लहान आहेत. चित्रे तर बनलेली आहेत. कुठेही कोणी बनवू शकतात. वर पासून प्रत्येक चित्राचे महत्व तुम्ही जाणता. शिवबाबांचे देखील ऑक्युपेशन (कार्य) तुम्ही जाणता. मुले पित्याचे ऑक्युपेशन जरूर पित्याकडूनच जाणतील ना. तुम्ही तर काहीच जाणत नव्हता. छोटी मुले शिक्षणाबद्दल काय जाणतील. मुले ५ वर्षाची झाल्यानंतर शिकणे सुरू करतात. मग शिकता-शिकता उच्च परिक्षा उत्तीर्ण होईपर्यंत कितीतरी वर्षे जातात. तुम्ही आहात किती साधारण आणि बनता काय! विश्वाचे मालक. तुमचा किती शृंगार होईल. गोल्डन स्पून इन माऊथ. तिथले तर गायनच आहे. आताही कोणी चांगली मुले शरीर सोडतात तर खूप चांगल्या घरामध्ये जन्म घेतात. तर गोल्डन स्पून इन माऊथ मिळतो. इन ॲडव्हान्स कोणाकडे तरी जातीलच ना. निर्विकारीकडे सर्वप्रथम जन्म तर श्रीकृष्णालाच घ्यायचा आहे. बाकीचे तर जे पण जातील ते विकारीकडेच जन्म घेतील. परंतु गर्भामध्ये इतक्या सजा भोगणार नाहीत. खूप चांगल्या घरामध्ये जन्म घेतील. सजा तर संपून गेल्या, बाकी थोड्याफार असतील. इतके दुःख होणार नाही. पुढे चालून पहा तुमच्याकडे खूप मोठ्या-मोठ्या घरातील मुले प्रिन्स-प्रिन्सेस कसे येतील. बाबा तुमची किती महिमा करतात. तुम्हाला मी माझ्यापेक्षाही उच्च बनवतो. जसा कोणी लौकिक पिता मुलांना सुखात ठेवतो. ६० वर्षे झाली की बस आपण वानप्रस्थमध्ये निघून जातात, भक्ती करू लागतात. ज्ञान तर कोणीच देऊ शकणार नाही. ज्ञानाद्वारे सर्वांची सद्गती मीच करतो. तुमच्या निमित्ताने सर्वांचे कल्याण होते कारण तुमच्याकरिता जरूर नवीन दुनिया पाहिजे. तुम्ही किती आनंदीत होता. आता व्हेजिटेरियनच्या कॉन्फरन्स मध्ये देखील तुम्हा मुलांना निमंत्रण मिळालेले आहे. बाबा तर सांगत राहतात हिंमत करा. दिल्लीसारख्या शहरामध्ये तर एकदम आवाज पसरावा. दुनियेमध्ये अंधश्रद्धेची भक्ति खूप आहे. सतयुग-त्रेतामध्ये भक्तीची काही गोष्टच नाही. ते डिपार्टमेंट वेगळे आहे. अर्धा कल्प ज्ञानाचे प्रारब्ध असते. तुम्हाला बेहदच्या बाबांकडून २१ जन्मांचा वारसा मिळतो. मग २१ पिढ्या तुम्ही सुखी राहता. म्हातारपणापर्यंत दुःखाचे नावही राहत नाही. पूर्ण आयुष्य सुखी राहता. जितका वारसा प्राप्त करण्याचा पुरुषार्थ कराल तितके उच्च पद प्राप्त कराल. तर पूर्ण पुरुषार्थ करायला हवा. तुम्ही पाहता नंबरवार माळा कशी बनते. पुरुषार्था नुसारच बनेल. तुम्ही आहात स्टुडंट, वंडरफुल. शाळेमध्ये देखील मुलांना निशाण्यापर्यंत धावायला लावतात ना. बाबा देखील म्हणतात - तुम्हाला निशाण्यापर्यंत धावून मग पुन्हा इथेच यायचे आहे. आठवणीच्या यात्रे द्वारे तुम्ही धावत जा म्हणजे मग तुम्ही नंबर वनमध्ये याल. मुख्य आहे आठवणीची यात्रा. म्हणतात - ‘बाबा, आम्ही विसरून जातो’. अरे, बाबा इतके तुम्हाला विश्वाचे मालक बनवतात, त्यांना तुम्ही विसरता. भले वादळे तर येतील. बाबा हिंमत तर देतील ना. त्याच सोबत हेही सांगतात की हे युद्ध-स्थळ आहे. युधिष्ठिर देखील वास्तविक बाबांनाच म्हटले पाहिजे जे युद्ध करायला शिकवतात. युधिष्ठिर बाबा तुम्हाला शिकवतात - मायेशी युद्ध तुम्ही कसे करू शकता. यावेळी युद्धाचे मैदान आहे ना. बाबा म्हणतात - काम महाशत्रू आहे. त्याच्यावर विजय प्राप्त केल्याने तुम्ही जगतजीत बनाल. तुम्हाला मुखाने काहीच जपायचे नाही, काहीच करायचे नाहीये, गप्प रहायचे आहे. भक्ती मार्गामध्ये किती मेहनत करतात. मनातल्या मनात ‘राम-राम’ नावाचा जप करत राहतात, त्यालाच म्हटले जाते नवधा भक्ती (नऊ प्रकारच्या सामग्रीने केलेली भक्ती). तुम्ही जाणता बाबा आम्हाला आपल्या माळेतील एक बनवत आहेत. तुम्ही रुद्र माळेचे मणी बनणारे आहात ज्याची मग पूजा होईल. रुद्र माळा आणि रुंड माळा बनत आहे. विष्णूच्या माळेला रुंड म्हटले जाते. तुम्ही विष्णूच्या गळ्यातील हार बनता. ते कसे बनाल? जेव्हा धावण्यामध्ये जिंकाल तेव्हा. बाबांची आठवण करायची आहे आणि ८४ च्या चक्राला जाणून घ्यायचे आहे. बाबांच्या आठवणीनेच विकर्म विनाश होतील. तुम्ही कसे लाईट हाऊस आहात. एका डोळ्यामध्ये मुक्तिधाम आणि एकामध्ये जीवन-मुक्तिधाम. या चक्राला जाणल्याने तुम्ही चक्रवर्ती राजा, सुखधामचे मालक बनाल. तुमची आत्मा म्हणते - आता आपण आत्मे आपल्या घरी जाणार. घराची आठवण करता-करता निघून जाणार. ही आहे आठवणीची यात्रा. तुमची यात्रा पहा कशी फर्स्टक्लास आहे. बाबा जाणतात आपण असे बसल्या-बसल्या क्षीर-सागरामध्ये जाणार. विष्णूला क्षीर-सागरामध्ये दाखवतात ना. बाबांची आठवण करता-करता क्षीर-सागरामध्ये निघून जाणार. क्षीर सागर आता तर नाही आहे. ज्यांनी तलाव बनवला आहे जरूर क्षीर (दूध) टाकले असेल. पूर्वी तर क्षीर (दूध) खूप स्वस्त होते. एका पैशाला लोटा भरून येत होते. तर का नाही तलाव भरत असेल. आता तर क्षीर आहे कुठे. पाणीच पाणी झाले आहे. बाबांनी नेपाळमध्ये पाहिले आहे - खूप मोठे विष्णूचे चित्र आहे. सावळेच बनवले आहे. आता तुम्ही विष्णुपुरीचे मालक बनत आहात - आठवणीच्या यात्रेने आणि स्वदर्शन चक्र फिरविल्याने. दैवी गुण देखील इथेच धारण करायचे आहेत. हे आहे पुरुषोत्तम संगमयुग. शिकता-शिकता तुम्ही पुरुषोत्तम बनाल. आत्म्याचा कनिष्ठपणा निघून जाईल. बाबा दररोज समजावून सांगतात - नशा चढला पाहिजे. म्हणतात - बाबा, पुरुषार्थ करत आहोत. अरे मोकळ्या मनाने बोला ना - बाबा आम्ही तर पास विद् ऑनर होऊन दाखवणार. तुम्ही चिंता करू नका. फर्स्टक्लास मुले जी चांगल्या रीतीने शिकतात, त्यांचे रजिस्टर देखील चांगले असेल. बाबांना सांगितले पाहिजे - ‘बाबा, तुम्ही निश्चिंत रहा, आम्ही असे बनून दाखवणार’. बाबा देखील जाणतात ना, बऱ्याच टीचर्स खूप फर्स्टक्लास आहेत. सगळेच काही फर्स्टक्लास बनू शकणार नाहीत. चांगल्या-चांगल्या टीचर्स एकमेकींना देखील जाणतात. सर्वांना महारथींच्या लाईनमध्ये आणू शकत नाही. चांगली मोठी-मोठी सेंटर्स उघडा म्हणजे मग मोठ्या-मोठ्या व्यक्ती येतील. कल्पापूर्वी देखील हुंडी भरली होती. सांवलशाह (विशाल बुद्धीने देणारे) बाबा हुंडी जरूर भरतील. दोन्ही पिता लेकुरवाळे आहेत. प्रजापिता ब्रह्माची देखील किती मुले आहेत. कोणी गरीब, कोणी साधारण, कोणी श्रीमंत, कल्पापूर्वी देखील यांच्या द्वारे राजाई स्थापन झाली होती, ज्याला दैवी राजस्थान म्हटले जात होते. आता तर आसुरी राजस्थान आहे. सारे विश्व दैवी राजस्थान होते, इतके खंड नव्हते. ही दिल्ली यमुनेचा कंठा होता, ज्याला परिस्तान म्हटले जात होते. तिथल्या नद्या इत्यादींना पूर थोडाच येतो. आता तर किती पूर येतो, धरणे फुटतात. प्रकृतीचे जणूकाही आपण दास बनलो आहोत. नंतर तुम्ही मालक बनाल. तिथे मायेची ताकद राहत नाही जी तुमचा अपमान करेल. धरणीची ताकद नाही जो धरणीकंप होऊ शकेल. तुम्हाला देखील महावीर बनले पाहिजे. हनुमानाला महावीर म्हणतात ना. बाबा म्हणतात - तुम्ही सर्व महावीर आहात. महावीर मुले कधी डगमगू शकत नाहीत. महावीर महावीरणींची मंदिरे बनलेली आहेत. इतक्या सर्वांची चित्रे थोडीच ठेवणार. मॉडेल रूपामध्ये बनवली आहेत. आता तुम्ही भारताला स्वर्ग बनवत आहात तर किती आनंद झाला पाहिजे. किती चांगले गुण असायला हवेत. अवगुणांना नाहीसे करत जा. सदैव हर्षित रहायचे आहे. वादळे तर येतील. वादळे येतील तेव्हाच तर महावीरणीची ताकद दिसून येईल. तुम्ही जितके मजबूत बनाल तितकी वादळे येतील. आता तुम्ही पुरुषार्थ करून महावीर बनत आहात, नंबरवार पुरुषार्था नुसार. ज्ञानाचा सागर बाबाच आहेत. बाकी सर्व शास्त्र इत्यादी आहेत भक्तीमार्गाची सामग्री. तुमच्याकरिताच आहे - पुरुषोत्तम संगमयुग. कृष्णाची आत्मा इथेच बसलेली आहे. भागीरथ हेच आहेत. तसे तर तुम्ही सर्वच भागीरथ आहात, भाग्यशाली आहात ना. भक्तीमार्गामध्ये बाबा तर कोणाचाही साक्षात्कार घडवू शकतात. याच कारणामुळे लोकांनी सर्वव्यापी म्हटले आहे, ही देखील ड्रामाची भावी आहे. तुम्ही मुले खूप उच्च शिक्षण शिकत आहात. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) आत्म्यावर जो गंज चढलेला आहे, त्याला आठवणीच्या यात्रेद्वारे उतरवून खूप-खूप प्रेमळ बनायचे आहे. प्रेम असे असावे जे नेहमी बाबांकडे आकर्षित होतील.

2. मायेच्या वादळांना घाबरायचे नाही, महावीर बनायचे आहे. आपल्यातील अवगुणांना नाहीसे करत जायचे आहे, सदैव हर्षित रहायचे आहे. कधीही डगमगायचे नाही.

वरदान:-
शुद्ध संकल्पांच्या शक्तीच्या स्टॉक द्वारे मनसा सेवेचे सहज अनुभवी भव

अंतर्मुखी बनून शुद्ध संकल्पांच्या शक्तीचा स्टॉक जमा करा. ही शुद्ध संकल्पांची शक्ती सहजच आपल्या व्यर्थ संकल्पांना समाप्त करेल आणि इतरांना देखील शुभ भावना, शुभ कामनेच्या स्वरूपा द्वारे परिवर्तन करू शकेल. शुद्ध संकल्पांचा स्टॉक जमा करण्यासाठी मुरलीच्या प्रत्येक पॉईंटला ऐकण्या सोबतच शक्तीच्या रूपामध्ये प्रत्येक वेळी कार्यामध्ये लावा. जितका शुद्ध संकल्पांच्या शक्तीचा स्टॉक जमा कराल तितके मनसा सेवेचे सहज अनुभवी बनत जाल.

बोधवाक्य:-
मनामधून कायमसाठी इर्षा-द्वेषाला निरोप द्या तेव्हाच विजय होईल.

अव्यक्त इशारे:- स्वयं प्रति आणि सर्वांप्रती मनसा द्वारे योगाच्या शक्तींचा प्रयोग करा.

जितके आता तन, मन, धन आणि वेळ कार्यामध्ये लावता, त्यापेक्षा मनसा शक्तींद्वारे सेवा केल्याने खूप कमी वेळामध्ये जास्त सफलता मिळेल. आता आपल्या प्रति जी कधी-कधी मेहनत करावी लागते - आपल्या नेचरला परिवर्तन करण्याची किंवा संघटन मध्ये चालण्याची किंवा कधी सेवेमध्ये कमी सफलता पाहून निराश होण्याची, हे सर्व समाप्त होईल.