09-12-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - विनाशा पूर्वी सर्वांना बाबांचा परिचय द्यायचा आहे, धारणा करून मग इतरांनाही समजावून सांगा तेव्हाच उच्च पद मिळू शकेल”

प्रश्न:-
राजयोगी विद्यार्थ्यांना बाबांचे कोते डायरेक्शन आहे?

उत्तर:-
तुम्हाला डायरेक्शन आहे की एका बाबांचे बनून मग इतरांवर मन जडवायचे नाही. प्रतिज्ञा करून मग पुन्हा पतित बनायचे नाही. तुम्ही असे संपूर्ण पावन बना जेणेकरून बाबांची आणि टीचरची आठवण स्वतः निरंतर राहील. एका बाबांवरच प्रेम करा, त्यांचीच आठवण करा तर तुम्हाला खूप ताकद मिळत राहील.

ओम शांती।
रूहानी बाबा बसून समजावून सांगतात. समजावून तेव्हा सांगतात जेव्हा हे शरीर आहे. सन्मुखच समजावून सांगायचे असते. जे सन्मुख सांगितले जाते ते मग लिखित स्वरूपामध्ये सर्वांकडे जाते. तुम्ही इथे येता सन्मुख ऐकण्यासाठी. बेहदचे बाबा आत्म्यांना ऐकवतात. आत्माच ऐकते. सर्व काही आत्माच या शरीराद्वारे करते त्यामुळे सर्वप्रथम स्वतःला आत्मा जरूर समजायचे आहे. गायन आहे ‘आत्मायें-परमात्मा अलग रहे बहुकाल’... सर्वात आधी बाबांपासून वेगळे होऊन इथे पार्ट बजावण्यासाठी कोण येतात? तुम्हाला विचारतील किती काळ तुम्ही बाबांपासून वेगळे राहिले आहात? तर तुम्ही म्हणाल ५ हजार वर्षे. पूर्ण हिशोब आहे ना. हे तर तुम्हा मुलांना माहित आहे कसे नंबरवार येतात. बाबा जे वर होते ते देखील आता खाली आले आहेत - तुम्हा सर्वांची बॅटरी चार्ज करण्यासाठी. आता बाबांची आठवण करायची आहे. आता तर बाबा सन्मुख आहेत ना. भक्तिमार्गामध्ये तर बाबांच्या ऑक्युपेशन विषयी (जीवन चरित्रा विषयी) माहितीच नाही आहे. नाव, रूप, देश, काळाला जाणतच नाहीत. तुम्हाला तर नाव, रूप, देश, काळाबद्दल सर्व माहित आहे. जाणता या रथाद्वारे बाबा आम्हाला सर्व रहस्ये समजावून सांगतात. रचता आणि रचनेच्या आदि, मध्य, अंताचे रहस्य सांगितले आहे. हे किती सूक्ष्म आहे. या मनुष्य सृष्टी रुपी झाडाचे बीज रूप बाबाच आहेत. ते इथे येतात जरूर. नवी दुनिया स्थापन करणे त्यांचेच काम आहे. असे नाही की तिथे बसून स्थापना करतात. तुम्ही मुले जाणता - बाबा या तनाद्वारे आम्हाला सन्मुख समजावून सांगत आहेत. हे देखील बाबांचे प्रेम करणे झाले ना. इतर कोणालाही त्यांच्या बायोग्राफी बद्दल माहित नाही आहे. गीता आहे आदि सनातन देवी-देवता धर्माचे शास्त्र. हे देखील तुम्ही जाणता - या ज्ञानानंतर आहे विनाश. विनाश जरूर होणार आहे. इतर जे काही धर्मस्थापक येतात, त्यांच्या येण्याने विनाश होत नाही. विनाशाचा काळच हा आहे, म्हणून तुम्हाला जे ज्ञान मिळते ते मग नष्ट होते. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये या सर्व गोष्टी आहेत. तुम्ही रचता आणि रचनेला जाणले आहे. आहेत दोन्ही अनादि जे चालत येतात. बाबांचा पार्टच आहे संगमावर येण्याचा. भक्ती अर्धा कल्प चालते, ज्ञान चालत नाही. ज्ञानाचा वारसा अर्ध्या कल्पासाठी मिळतो. ज्ञान तर एकदाच फक्त संगमावर मिळते. हा क्लास तुमचा एकदाच चालतो. या गोष्टी व्यवस्थित समजून घेऊन मग इतरांना समजावून सांगायच्या देखील आहेत. पदाचा सारा आधार आहे सर्विस करण्यावर. तुम्ही जाणता पुरुषार्थ करून आता नव्या दुनियेमध्ये जायचे आहे. धारणा करणे आणि दुसऱ्यांना समजावून सांगणे - यावरच तुमचे पद आहे. विनाश होण्याच्या आधी सर्वांना बाबांचा परिचय द्यायचा आणि रचनेच्या आदि, मध्य, अंताचा परिचय द्यायचा आहे. तुम्ही देखील बाबांची आठवण करता की जन्म-जन्मांतरीची पापे नष्ट व्हावी. जोपर्यंत बाबा शिकवत आहेत तोपर्यंत आठवण जरूर करायची आहे. शिकवणाऱ्या सोबत योग तर राहील ना. शिक्षक शिकवतात तर त्यांच्यासोबत योग असतो. ‘योग’ असल्याशिवाय शिकणार कसे? ‘योग’ अर्थात शिकविणाऱ्याची आठवण. हे बाबा देखील आहेत, टीचर देखील आहेत, सद्गुरु देखील आहेत. तीनही स्वरूपामध्ये पूर्ण आठवण करावी लागते. हे सद्गुरु तुम्हाला एकदाच मिळतात. ज्ञानाने सद्गती मिळाली, बस्स मग गुरुची प्रथाच संपुष्टात येते. पिता, टीचरची प्रथा चालू राहते, गुरुची प्रथा संपुष्टात येते. सद्गती मिळाली ना. निर्वाणधामामध्ये तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये जाता मग आपल्या वेळेवर पार्ट बजावण्यासाठी याल. मुक्ती-जीवनमुक्ती दोन्ही तुम्हाला मिळते. मुक्ती देखील जरूर मिळते. थोड्या वेळासाठी घरी जाऊन रहाल. इथे तर शरीराद्वारे पार्ट बजावावा लागतो. मागाहून सर्व पार्टधारी येतील. नाटक जेव्हा पूर्ण होते तेव्हा सर्व ॲक्टर्स स्टेजवर येतात. आत्ता देखील सर्व ॲक्टर्स स्टेजवर येऊन एकत्रित झाले आहे. किती घनघोर युद्ध आहे. सतयुग इत्यादी मध्ये इतके भयंकर युद्ध नव्हते. आता तर किती अशांती आहे. तर आता जसे बाबांना सृष्टी चक्राचे नॉलेज आहे तसे मुलांना देखील नॉलेज आहे. बीजाला नॉलेज आहे ना - आपले झाड कसे वृद्धिंगत होऊन मग नष्ट होते. आता तुम्ही बसले आहात नव्या दुनियेचे कलम लावण्याकरिता अथवा आदि सनातन देवी-देवता धर्माचे कलम लावण्याकरिता. तुम्हाला माहित आहे या लक्ष्मी-नारायणाने राज्य कसे मिळवले? तुम्ही जाणता आपण आता नव्या दुनियेचे राजकुमार बनणार. त्या दुनियेमध्ये राहणारे सर्व आपल्याला मालकच म्हणतील ना. जसे आत्ता देखील सर्वजण म्हणतात भारत आमचा देश आहे. तुम्ही समजता आता आम्ही संगमावर उभे आहोत, शिवालयात जाणार आहोत. बस्स, आता गेलो की गेलो. आम्ही जाऊन शिवालयाचे मालक बनणार. तुमचे एम ऑब्जेक्टच हे आहे. यथा राजा राणी तथा प्रजा, सर्व शिवालयाचे मालक बनतात. बाकी राजधानीमध्ये पदे तर विविध असतातच तिथे मंत्री तर कोणी असतही नाही. मंत्री तेव्हा असतात जेव्हा पतित बनतात. लक्ष्मी-नारायण अथवा राम-सीता यांचे मंत्री असे ऐकलेही नसेल कारण ते स्वतः सतोप्रधान पावन बुद्धीवाले आहेत. मग जेव्हा पतित बनतात तेव्हा राजा-राणी एक मंत्री ठेवतात सल्ला घेण्याकरिता. आता तर बघा कितीतरी मंत्री आहेत.

तुम्ही मुले जाणता हा अतिशय मजेशीर खेळ आहे. खेळ नेहमी मजेदारच असतो. सुख देखील असते, दुःख देखील असते. या बेहदच्या खेळाला तुम्ही मुलेच जाणता. यामध्ये हाय-हाय करून रडणे इत्यादीचा तर प्रश्नच नाही. गातात देखील - ‘बीती सो बीती देखो…’, ‘बनी-बनाई बन रही’. हे नाटक तुमच्या बुद्धीमध्ये आहे. आम्ही यातील ॲक्टर्स आहोत. आमच्या ८४ जन्मांचा पार्ट ॲक्युरेट अविनाशी आहे. ज्यांनी ज्या जन्मामध्ये जी ॲक्ट करत आले आहेत तिच करत राहतील. आज पासून ५ हजार वर्षांपूर्वी देखील तुम्हाला हेच सांगितले होते की, ‘स्वतःला आत्मा समजा’. गीतेमध्ये देखील हे शब्द आहेत. तुम्ही जाणता खरोखर आदि सनातन देवी-देवता धर्म जेव्हा स्थापन झाला होता तेव्हा बाबांनी सांगितले होते - ‘देहाचे सर्व धर्म सोडून स्वतःला आत्मा समजा आणि बाबांची आठवण करा’. मनमनाभवचा अर्थ तर बाबांनी चांगल्या रीतीने समजावून सांगितला आहे. भाषा देखील हीच आहे. इथे बघा किती अनेक भाषा आहेत. भाषांवरून देखील किती वितंडवाद होतात. भाषेविना तर काम होऊ शकत नाही. अशा काही भाषा शिकून येतात जी मातृभाषाच नष्ट होते. जे जास्त भाषा शिकतात त्यांना बक्षीस मिळते. जितके धर्म, तितक्या भाषा असतील. तिथे तर तुम्ही जाणता आपलीच राजाई असेल. भाषा देखील एकच असेल. इथे तर शंभर मैलावर एक भाषा आहे. तिथे तर एकच भाषा असते. या सर्व गोष्टी बाबा बसून समजावून सांगतात तर त्या बाबांचीच आठवण करत रहा. शिवबाबा समजावतात ब्रह्मा द्वारे. रथ तर जरूर पाहिजे ना. शिवबाबा आमचे पिता आहेत. बाबा म्हणतात - ‘माझी तर बेहदची मुले आहेत’. बाबा यांच्याद्वारे शिकवतात ना. टीचरची कधी गळाभेट थोडीच घेतात. बाबा तर तुम्हाला शिकविण्यासाठी आले आहेत. राजयोग शिकवतात तर टीचर झाले ना. तुम्ही विद्यार्थी आहात. विद्यार्थी कधी टीचरची गळाभेट घेतात का? एका बाबांचे बनून मग इतरांमध्ये मन गुंतवायचे नाही.

बाबा म्हणतात, मी तुम्हाला राजयोग शिकविण्यासाठी आलो आहे. तुम्ही शरीरधारी, मी अशरीरी वर राहणारा. म्हणता - बाबा, पावन बनविण्यासाठी या, म्हणजे तुम्ही पतित आहात ना. मग माझी गळाभेट कशी घेऊ शकता? प्रतिज्ञा करून मग पुन्हा पतित बनता. जेव्हा पूर्णतः पावन बनाल, तेव्हा मग आठवणीमध्ये देखील रहाल, टीचरची आणि गुरुची आठवण करत रहाल. आता तर छी-छी बनून (विकारी बनून) खाली पडतात, तर मग अजूनच १०० पटीने दंड भोगावा लागतो. हे (ब्रह्मा बाबा) तर मध्ये दलालाच्या रूपामध्ये भेटले आहेत, त्यांची (शिवबाबांची) आठवण करायची आहे. ब्रह्मा बाबा म्हणतात - ‘मी देखील त्यांचा मुरब्बी बच्चा (अतिप्रिय मुलगा) आहे. मग मी कुठे गळाभेट घेऊ शकतो! तुम्ही तरीदेखील या शरीराद्वारे भेटता तरी. मी त्यांची गळाभेट कशी घेऊ?’ बाबा तर म्हणतात - ‘मुलांनो, तुम्ही एका बाबांचीच आठवण करा, प्रेम करा. आठवणीने शक्ती खूप मिळते’. बाबा सर्व शक्तिमान आहेत. बाबांकडूनच तुम्हाला इतकी शक्ती मिळते. तुम्ही किती शक्तिशाली बनता. तुमच्या राजधानीवर कोणीही विजय मिळवू शकत नाही. रावण राज्यच नष्ट होते. दुःख देणारा कोणी राहतच नाही. त्याला सुखधाम म्हटले जाते. रावण साऱ्या विश्वामध्ये सर्वांना दुःख देणारा आहे. पशु देखील दुःखी होतात. तिथे तर पशु-प्राणी देखील आपसात प्रेमाने राहतात. इथे तर प्रेमच नाहीये.

तुम्ही मुले जाणता हा ड्रामा कसा फिरतो. याच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य बाबाच समजावून सांगतात. कोणी उत्तम रित्या शिकतात, कोणी कमी शिकतात. शिकतात तर सर्वच ना. संपूर्ण दुनिया सुद्धा शिकेल अर्थात बाबांची आठवण करेल. बाबांची आठवण करणे - हा देखील एक अभ्यासच आहे ना. त्या पित्याची सर्वजण आठवण करतात. ते सर्वांचे सद्गती दाता, सर्वांना सुख देणारे आहेत. म्हणतात देखील - येऊन पावन बनवा तर जरूर पतित आहेत. ते तर येतातच मुळी विकारींना निर्विकारी बनविण्याकरिता. बोलावतात देखील की, हे अल्लाह, येऊन आम्हाला पावन बनवा. त्यांचा हाच धंदा आहे, म्हणून बोलावतात.

तुमची भाषा देखील अचूक असली पाहिजे. ते लोक म्हणतात अल्लाह, ते म्हणतात गॉड. गॉड फादर देखील म्हणतात. मागाहून येणाऱ्यांची बुद्धी तरीही चांगली असते. इतके दुःख भोगत नाहीत. तर आता तुम्ही सन्मुख बसले आहात, काय करत आहात? बाबांना या भृकुटीमध्ये बघता. बाबा मग तुमच्या भृकुटीमध्ये बघतात. ज्यांच्यामध्ये मी प्रवेश करतो, त्यांना पाहू शकतो का? ते तर बाजूला बसले आहेत, ही नीट समजून घेण्याची गोष्ट आहे. मी आमच्या बाजूला बसलेलो आहे. हे देखील समजतात, माझ्या बाजूला बसले आहेत. तुम्ही म्हणाल आम्ही समोर दोघांना बघतो. बाबा आणि दादा दोन्ही आत्म्यांना बघता. तुमच्यामध्ये ज्ञान आहे - बापदादा कोणाला म्हणतात? आत्मा समोर बसली आहे. भक्तिमार्गामध्ये तर डोळे बंद करून बसतात आणि ऐकतात. शिक्षण कधी असे थोडेच असते. टीचरकडे बघावे तर लागेल ना. हे तर पिता देखील आहेत, टीचर देखील आहेत तर समोर बघायचे असते. समोर बसले आहात आणि डोळे बंद असतील, डुलक्या काढत रहाल, तर अशाप्रकारे काही शिक्षण घेतले जात नाही. विद्यार्थी टीचरला जरूर बघत राहील. नाहीतर टीचर म्हणतील हे तर डुलक्या काढत राहतात. हे भांग पिऊन आले आहेत काय? तुमच्या बुद्धीमध्ये आहे बाबा या तनामध्ये आहेत. मी बाबांना पाहतो. बाबा म्हणतात हा क्लास काही साधारण क्लास नाही आहे - जिथे कोणी डोळे बंद करून बसेल. शाळेमध्ये कधी डोळे बंद करून बसतात का? बाकीच्या सत्संगांना शाळा म्हटले जात नाही. भले बसून गीता ऐकवतात परंतु त्याला शाळा म्हटले जात नाही. ते काही पिता थोडेच आहेत ज्यांना तुम्ही बघाल. काही-काही शिवाचे भक्त असतात तर ते शिवाचीच आठवण करत असतात आणि कानाने कथा ऐकत राहतात. शिवाची भक्ती करणाऱ्यांना शिवाचीच आठवण करावी लागेल. कोणत्याही सत्संगामध्ये प्रश्नोत्तरे इत्यादी काही असत नाही. इथे अशी प्रश्नोत्तरे केली जातात. इथे तुमची कमाई पुष्कळ आहे. कमाई करताना कधी जांभई येऊ शकत नाही. धन मिळते ना तर आनंद होतो. जांभई हे दुःखाचे चिन्ह आहे. आजारी असेल किंवा दिवाळे निघाले असेल तर जांभई येत राहील. पैसे मिळत राहतील तर कधी जांभई येणार नाही. बाबा व्यापारी देखील आहेत. रात्रीच्या आगबोटी येत असत तर रात्री जागावे लागत असे. कधी कोणी मुस्लिम राजकुमारी अथवा बादशहाची पत्नी रात्रीची आली तर फक्त महिलांसाठी दुकाने उघडी ठेवतात. बाबा देखील म्हणतात - प्रदर्शनी इत्यादीमध्ये महिलांकरिता एखादा विशिष्ट दिवस ठेवा तर खूपजण येतील. पर्देनशीन (बुरख्यात राहणाऱ्या) देखील येतील. सुना पदराच्या बुरख्यात असतात. गाडीला देखील पडदा असतो. इथे तर आत्म्याची गोष्ट आहे. ज्ञान मिळाले तर पडदा सुद्धा उघडेल. सतयुगामध्ये पडदा इत्यादी असत नाही. हे तर प्रवृत्ती मार्गाचे ज्ञान आहे ना. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) हा खेळ खूप मजेशीर बनलेला आहे, यामध्ये सुख आणि दुःखाचा पार्ट नोंदलेलाच आहे त्यामुळे हाय-हाय करून रडण्याची गरज नाही. बुद्धीमध्ये रहावे बनी-बनाई बन रही, होऊन गेलेल्याचे चिंतन करायचे नाही.

२) हा कॉमन क्लास नाही आहे, इथे डोळे बंद करून बसायचे नाही. समोर टीचरला बघायचे आहे. जांभया काढायच्या नाहीत. जांभई हे दुःखाचे लक्षण आहे.

वरदान:-
संतुष्टतेची तीन सर्टिफिकेट घेऊन आपल्या योगी जीवनाचा प्रभाव टाकणारे सहज योगी भव

संतुष्टता योगी जीवनाचे विशेष लक्ष्य आहे, जे कायम संतुष्ट राहतात आणि सर्वांना संतुष्ट करतात त्यांच्या योगी जीवनाचा प्रभाव दुसऱ्यांवर आपोआप पडतो. जसे सायन्सच्या साधनांचा वायुमंडळावर प्रभाव पडतो, तसे सहजयोगी जीवनाचा देखील प्रभाव असतो. योगी जीवनाची तीन सर्टिफिकेट आहेत एक - स्वतःवर संतुष्ट, दुसरे - बाबा संतुष्ट आणि तिसरे - लौकिक, अलौकिक परिवार संतुष्ट.

बोधवाक्य:-
स्वराज्याचा तिलक, विश्व कल्याणाचा ताज आणि स्थितीच्या तख्तावर विराजमान राहणारेच राजयोगी आहेत.