10-02-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - बाबांकडून तुम्हाला जे अद्वैत मत (श्रीमत) मिळत आहे, त्यानुसार चालून
कलियुगी मनुष्यांना सतयुगी देवता बनविण्याचे श्रेष्ठ कर्तव्य करायचे आहे”
प्रश्न:-
सर्व
मनुष्यमात्र दुःखी का बनले आहेत, त्याचे मूळ कारण काय आहे?
उत्तर:-
रावणाने सर्वांना शापित केले आहे, त्यामुळे सर्व दुःखी बनले आहेत. बाबा वारसा देतात,
रावण शाप देतो हे सुद्धा दुनिया जाणत नाही. बाबांनी वारसा दिला म्हणूनच तर भारतवासी
इतके सुखी स्वर्गाचे मालक बनले, पूज्य बनले. शापित झाल्यामुळे पुजारी बनतात.
ओम शांती।
मुले इथे मधुबन मध्ये बापदादांकडे येतात. जेव्हा हॉलमधे येता, बघता अगोदर भाऊ-बहिणी
बसतात, नंतर मग बघता बापदादा आलेले आहेत तेव्हा बाबांची आठवण येते. तुम्ही प्रजापिता
ब्रह्माची मुले ब्राह्मण आणि ब्राह्मणी आहात. ते (दुनियेतील) ब्राह्मण तर ब्रह्मा
बाबांना जाणत सुद्धा नाहीत. तुम्ही मुले जाणता - जेव्हा बाबा येतात तेव्हा
ब्रह्मा-विष्णू-शंकर सुद्धा नक्की पाहिजेत. म्हटलेच जाते त्रिमूर्ती शिवभगवानुवाच.
आता तिघांच्याही द्वारे तर बोलणार नाहीत ना. या गोष्टी व्यवस्थित बुद्धीमध्ये धारण
करायच्या आहेत. बेहदच्या बाबांकडून नक्कीच स्वर्गाचा वारसा मिळतो, त्यामुळे सर्व
भक्त भगवंताकडून काय इच्छितात? जीवनमुक्ती. आता आहे जीवन-बंधन. सर्वजण बाबांची आठवण
करतात की, येऊन या बंधनातून मुक्त करा. आता तुम्ही मुलेच जाणता की बाबा आलेले आहेत.
कल्प-कल्प बाबा येतात. बोलावतात देखील - ‘तुम मात पिता…’ परंतु याचा अर्थ तर कोणीही
समजत नाहीत. निराकार बाबांकरिता समजतात. गातात परंतु मिळत काहीच नाही. आता तुम्हा
मुलांना त्यांच्याकडून वारसा मिळतो आहे; पुन्हा मग एका कल्पानंतरच मिळेल. मुले
जाणतात बाबा येऊन अर्ध्या कल्पासाठी वारसा देतात आणि रावण मग शाप देतो. दुनिया हे
देखील जाणत नाही की, आपण सर्व शापित आहोत. रावणाचा शाप मिळाला आहे म्हणून सर्व दुःखी
आहेत. भारतवासी सुखी होते. काल या लक्ष्मी-नारायणाचे राज्य भारतामध्ये होते.
देवतांच्या पुढे डोके टेकतात, पूजा करतात परंतु सतयुग केव्हा होते, हे कोणालाच
माहीत नाही. आता बघा फक्त सतयुगाचा कालावधी लाखो वर्षे दाखवला आहे, मग त्रेताचा,
द्वापर-कलियुगाचा, त्या हिशोबाने तर मनुष्य किती भरमसाठ होतील. फक्त सतयुगातच
पुष्कळ मनुष्य होतील. कोणत्याही मनुष्याच्या डोक्यातच शिरत नाही. बाबा बसून समजावून
सांगतात की बघा, गायन देखील आहे ३३ कोटी देवता असतात. असे थोडेच आहे की, ते काही
लाखो वर्षांमध्ये होतात. तर हे देखील लोकांना समजावून सांगावे लागेल.
आता तुम्ही समजता की
बाबा आम्हाला स्वच्छ-बुद्धी बनवत आहेत. रावण म्लेंच्छ-बुद्धी (नीच-बुद्धी) बनवतो.
मुख्य गोष्ट तर ही आहे. सतयुगामध्ये पवित्र असतात, इथे आहेत अपवित्र. हे देखील
कोणाला माहीती नाही की, रामराज्य कधीपासून कधीपर्यंत, रावण राज्य कधीपासून
कधीपर्यंत असते? समजतात इथेच राम राज्य देखील आहे, रावण राज्य देखील आहे. अनेक
मत-मतांतरे आहेत ना. जितके मनुष्य तितकी मते आहेत. आता इथे तुम्हा मुलांना एक
अद्वैत मत मिळत आहे जे बाबाच देतात. तुम्ही आता ब्रह्मा द्वारे देवता बनत आहात.
देवतांची महती गायली जाते - सर्वगुण संपन्न, १६ कला संपूर्ण… आहेत तर ते देखील
मनुष्यच, मग मनुष्याची महिमा का गातात? जरूर काही फरक असेल ना. आता तुम्ही मुले
देखील नंबरवार पुरुषार्थानुसार मनुष्यांना देवता बनविण्याचे कर्तव्य शिकता. कलियुगी
मनुष्याला तुम्ही सतयुगी देवता बनवता अर्थात शांतीधामचा, ब्रह्मांडाचा आणि विश्वाचा
मालक बनवता, हे काही शांतीधाम तर नाही ना. इथे तर कर्म नक्की करावे लागते. ते आहे
स्वीट सायलेन्स होम. आता तुम्ही समजता आपण आत्मे स्वीट होम, ब्रह्मांडाचे मालक आहोत.
तिथे सुख-दुःखा पासून अलिप्त असतो. मग सतयुगामध्ये विश्वाचे मालक बनतो. आता तुम्ही
मुले लायक बनत आहात. एम ऑब्जेक्ट अचूक समोर उभे आहे. तुम्ही मुले आहात योगबळवाले.
ते आहेत बाहुबळवाले. तुम्ही देखील युद्धाच्या मैदानावर आहात, परंतु तुम्ही आहात डबल
अहिंसक. ते आहेत हिंसक. हिंसा काम-कटारीला म्हटले जाते. संन्यासी देखील समजतात ही
हिंसा आहे म्हणून पवित्र बनतात. परंतु तुमच्याव्यतिरिक्त इतर कोणाचेही बाबांवर
प्रेम नाही आहे. आशिक-माशूकचे प्रेम असते ना. ते (या दुनियेतील) आशिक-माशूक तर एका
जन्मासाठी गायले जातात. तुम्ही सर्व आहात मज माशूकचे आशिक. भक्तीमार्गामध्ये मज एका
माशूकची आठवण करत आला आहात. आता मी म्हणतो - फक्त हा शेवटचा जन्म पवित्र बना आणि
यथार्थ रीतीने आठवण करा तर मग आठवण केल्यानेच तुमची सुटका होईल. सतयुगामध्ये आठवण
करण्याची गरजच राहणार नाही. दुःखामध्ये सर्वजण आठवण करतात. हा आहे नरक. याला स्वर्ग
तर म्हणणार नाही ना! जर मोठे श्रीमंत आहेत ते समजतात की, आमच्यासाठी तर इथेच स्वर्ग
आहे. विमान इत्यादी सर्व काही वैभव आहे, किती अंधश्रद्धेमध्ये रहातात. गातात देखील
- ‘तुम मात पिता…’ परंतु समजत काहीच नाहीत. कोणते सुख भरभरून मिळाले - हे कोणीही
जाणत नाहीत. बोलते तर आत्माच ना. तुम्ही आत्मे समजता की, आपल्याला भरभरून सुख
मिळणार आहे. त्याचे नावच आहे स्वर्ग, सुखधाम. स्वर्ग सर्वांना खूप गोडही वाटतो.
तुम्ही आता जाणता स्वर्गामध्ये हिरे-माणकांचे किती महाल होते. भक्तीमार्गामध्ये
देखील किती अगणित धन होते; सोमनाथाचे मंदिर जे बनवले आहे. त्यामध्ये एक-एक मूर्ती
लाखोंच्या किंमतीची होती. त्या सर्व मुर्त्या गेल्या कुठे? किती लुटून घेऊन गेले!
मुसलमानांनी नेऊन मशीदीमध्ये वगैरे लावले, इतकी अपार संपत्ती होती. आता तुम्हा
मुलांच्या बुद्धीमध्ये आहे - आता पुन्हा आपण बाबांकडून स्वर्गाचे मालक बनत आहोत.
आमचे महाल सोन्याचे असतील. दरवाजे देखील जडवलेले असतील. जैनांची मंदिरे देखील अशी
बनवलेली असतात. आता हिरे इत्यादी काही राहिलेले नाहीत, जे पूर्वी होते. आता तुम्ही
जाणता आम्ही बाबांकडून स्वर्गाचा वारसा घेत आहोत. शिवबाबा येतात देखील भारतामध्येच.
भारतालाच शिव भगवंताकडून स्वर्गाचा वारसा मिळतो. ख्रिश्चन देखील म्हणतात -
क्राइस्टच्या ३ हजार वर्षांपूर्वी भारत स्वर्ग होता. परंतु राज्य कोण करत होते हे
मात्र कोणालाच माहीत नाही. बाकी एवढे मात्र समजतात - भारत फार पुरातन आहे. तर इथेच
स्वर्ग होता ना. बाबांना म्हणतात देखील हेवनली गॉडफादर अर्थात स्वर्ग स्थापन करणारे
फादर. तर जरूर फादर आले असतील, तेव्हाच तर तुम्ही स्वर्गाचे मालक बनला असाल. दर ५
हजार वर्षांनंतर स्वर्गाचे मालक बनता मग अर्ध्या कल्पानंतर रावण राज्य सुरू होते.
चित्रांमधे असे स्पष्ट करून दाखवा ज्यामुळे लाखो वर्षांची गोष्टच बुद्धीतून निघून
जाईल. लक्ष्मी-नारायण कोणी एक नाहीत, यांची डिनायस्टी (राजघराणे) असेल ना, तर मग
त्यांचीच मुले राजा बनत असतील. राजे तर खूप बनत असतील ना. सर्व माळा बनलेली आहे.
माळेचाच जप करतात ना. जे बाबांचे मदतगार बनून बाबांची सेवा करतात त्यांचीच माळा बनते.
जे पूर्ण चक्रामध्ये येतात, पूज्य-पुजारी बनतात त्यांचेच हे यादगार (स्मारक) आहे.
तुम्ही पूज्य पासून पुजारी बनता तेव्हा मग आपल्याच माळेची बसून पूजा करता. पहिले
माळेला हात लावून मग डोके टेकवाल. नंतर मग माळा जपायला सुरवात करता. तुम्ही देखील
पूर्ण चक्र फिरता मग शिवबाबांकडून वारसा मिळवता. हे रहस्य तुम्हीच जाणता. मनुष्य तर
कोणी कोणाच्या नावाची तर कोणी कोणाच्या नावाची माळा जपतात. जाणत काहीच नाहीत. आता
तुम्हाला माळे विषयीचे सर्व ज्ञान आहे, बाकी कोणाला हे ज्ञान नाहीये. ख्रिश्चनांना
थोडेच समजते की, हे कोणाची माळा जपतात? ही माळा त्यांचीच आहे जे बाबांचे मदतगार
बनून सेवा करतात. या वेळी सर्व पतित आहेत, जे पावन होते ते सर्व इथे येता-येता आता
पतित बनले आहेत, मग नंबरवार सर्व जातील. नंबरवार येतात आणि नंबरवार जातात. किती
समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. हे झाड आहे. किती शाखा-उपशाखा मठ-पंथ आहेत. आता हे
पूर्ण झाड नष्ट होणार आहे, नंतर मग तुमचे फाउंडेशन लागेल. तुम्ही आहात या झाडाचे
फाऊंडेशन (पाया). त्यामध्ये सूर्यवंशी, चंद्रवंशी दोन्ही आहेत. सतयुग-त्रेतामध्ये
जे राज्य करणारे होते, त्यांचा आता धर्मच राहिलेला नाही, फक्त चित्रे राहिली आहेत.
ज्यांची चित्रे आहेत त्यांच्या जीवन-चरित्राला तर जाणून घेतले पाहिजे ना. म्हणतात
अमकी चीज लाखो वर्षांची जुनी आहे. आता खरे पाहता जुन्यात जुना आहे आदि सनातन
देवी-देवता धर्म. त्याच्या आधीची तर कोणती चीज-वस्तू असू शकत नाही. बाकी सर्व २५००
वर्षांपूर्वीच्या पुरातन वस्तू असतील त्या उत्खनन करून काढतात ना. भक्तीमार्गामध्ये
ज्यांची पूजा करतात त्या जुन्या मुर्त्या उत्खनन करून काढतात कारण भूकंपामध्ये सर्व
मंदिरे इत्यादी कोसळतात मग पुन्हा नवीन बनतात. हिरे-सोने इत्यादीच्या खाणी ज्या आता
रिकाम्या झाल्या आहेत त्या पुन्हा तिथे भरल्या जातील. या सर्व गोष्टी आता तुमच्या
बुद्धीमध्ये आहेत ना. बाबांनी जगाचा इतिहास-भूगोल समजावून सांगितला आहे. सतयुगामध्ये
किती थोडे मनुष्य असतात मग वृद्धी होत जाते. सर्व आत्मे परमधामहून येत राहतात.
येता-येता झाड मोठे होते. आणि मग झाड जेव्हा पूर्ण जडजडीभूत अवस्थेला प्राप्त होते
तेव्हा म्हटले जाते - ‘राम गयो रावण गयो, जिनक बहु परिवार है’. अनेक धर्म आहेत ना.
आपला परिवार किती छोटा आहे. हा फक्त ब्राह्मणांचा परिवार आहे. ते किती अनेक धर्म
आहेत, लोकसंख्या सांगतात ना. तो सर्व आहे रावण संप्रदाय. हे सर्व जातील, बाकी फार
थोडे शिल्लक राहतील. रावण संप्रदायवाले मग स्वर्गामध्ये येणार नाहीत, सगळे
मुक्तीधाममध्येच रहातील. बाकी तुम्ही जे शिकता ते नंबरवार स्वर्गामध्ये याल.
आता तुम्हा मुलांना
समजले आहे की, ते कसे निराकारी झाड आहे, मनुष्यसृष्टीचे झाड आहे, हे सर्व तुमच्या
बुद्धीमध्ये आहे. अभ्यासाकडे लक्ष दिले नाहीत तर परिक्षेमध्ये नापास व्हाल. शिकत
रहाल आणि शिकवत रहाल तर आनंद देखील होईल. जर विकारामध्ये गेलात तर बाकीचे हे सर्व
विसरले जाईल. आत्मा जेव्हा पवित्र सोने असेल तेव्हा त्यामध्ये चांगली धारणा होईल.
सोन्याचे भांडे असते पवित्र गोल्डन. जर कोणी पतित बनला तर ज्ञान ऐकवू शकणार नाही.
आता तुम्ही समोर बसला आहात, जाणता गॉडफादर शिवबाबा आम्हा आत्म्यांना शिकवत आहेत.
आपण आत्मे या अवयवांद्वारे ऐकत आहोत. शिकवणारे बाबा आहेत, अशी पाठशाळा साऱ्या
दुनियेमध्ये कुठे असेल! ते गॉडफादर आहेत, टीचर देखील आहेत, सतगुरु सुद्धा आहेत,
सर्वांना परत घेऊन जाणार आहेत. आता तुम्ही बाबांच्या सन्मुख बसला आहात. सन्मुख मुरली
ऐकण्यात किती फरक आहे. जसा हा टेपरेकॉर्डर निघाला आहे, एक दिवस सर्वांकडे येईल.
मुलांच्या सुखासाठी बाबा अशा वस्तू बनवून घेतात. काही मोठी गोष्ट नाहीये ना. हा
सांवल शाह आहे ना; आधी गोरा होता, आता सावळा बनला आहे म्हणून तर श्याम-सुंदर
म्हणतात. तुम्ही जाणता आपण सुंदर होतो, आता काळे बनलो आहोत, पुन्हा सुंदर बनणार.
फक्त एकच का बनेल? सापाने एकालाच दंश केला आहे का? सर्प तर मायेला म्हटले जाते ना.
विकारामध्ये गेल्याने सावळे बनतात. किती समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. बेहदचे बाबा
म्हणतात - गृहस्थ व्यवहारामध्ये राहून हा अंतिम जन्म माझ्याकरिता पवित्र बना.
मुलांकडे ही भीक मागतात. कमल-पुष्पसमान पवित्र बना आणि माझी आठवण करा तर हा जन्म
देखील पवित्र बनाल आणि आठवणीमध्ये राहिल्याने गतजन्मीची विकर्म देखील विनाश होतील.
हा आहे योग-अग्नी, ज्याच्यामुळे जन्म-जन्मांतरीची पापे भस्म होतात. सतोप्रधाना
पासून सतो, रजो, तमोमध्ये येतात त्यामुळे कला कमी होत जातात. भेसळ पडत जाते. आता
बाबा म्हणतात - फक्त मामेकम् (मज एकाची) आठवण करा. बाकी पाण्याच्या नद्यांमध्ये
स्नान केल्याने थोडेच पावन बनाल? पाणी देखील तत्त्व आहे ना? ५ तत्त्व म्हटली जातात.
या नद्या कशा पतित-पावनी होऊ शकतील? नद्या तर सागरातून निघतात. पहिले तर सागर
पतित-पावन असला पाहिजे ना. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१)
विजयीमाळेमध्ये येण्यासाठी बाबांचा मदतगार बनून सेवा करायची आहे. एका माशूकवर खरे
प्रेम करायचे आहे. एकाचीच आठवण करायची आहे.
२) आपले अचूक एम
ऑब्जेक्ट समोर ठेवून पूर्ण पुरुषार्थ करायचा आहे. डबल अहिंसक बनून मनुष्याला देवता
बनविण्याचे श्रेष्ठ कर्तव्य करत रहायचे आहे.
वरदान:-
विजयाच्या
नशेमध्ये सदैव हर्षित राहणारे सर्व आकर्षणांपासून मुक्त भव
विजयी-रत्नांचे
यादगार (स्मृतीचिन्ह) - बाबांच्या गळ्यातील हार आजही पूजला जातो. तर कायम हाच नशा
रहावा की आम्ही बाबांच्या गळ्यातील हार विजयी-रत्न आहोत, आम्ही विश्वाच्या मालकाची
मुले आहोत. आम्हाला जे मिळाले आहे ते कोणालाच मिळू शकत नाही - हा नशा आणि आनंद कायम
राहिला तर कोणत्याही प्रकारच्या आकर्षणापासून दूर रहाल. जो सदा विजयी असतो तो सदैव
आनंदी असतो. एका बाबांच्याच आठवणीच्या आकर्षणामध्ये आकर्षित होतो.
बोधवाक्य:-
एकाच्या
अंतामध्ये हरवून जाणे अर्थात एकांतवासी बनणे.
अव्यक्त इशारे -
एकांतप्रिय बना, एकता आणि एकाग्रतेला धारण करा:-
आता सर्व मिळून
एकमेकांची हिंमत वाढवत हा संकल्प करा की आता समयाला समीप आणायचेच आहे, आत्म्यांना
मुक्ती द्यायचीच आहे. परंतु हे तेव्हा होईल जेव्हा या विचाराला स्मृती-स्वरूपामध्ये
आणाल. जिथे एकता आणि दृढता आहे तिथे असंभव देखील संभव होते.