10-03-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्हाला मनुष्यापासून देवता बनण्याचा अभ्यास शिकायचा आहे आणि शिकवायचा
आहे, सर्वांना शांतीधाम आणि सुखधामचा मार्ग दाखवायचा आहे”
प्रश्न:-
जे सतोप्रधान
पुरुषार्थी आहेत त्यांचे लक्षण काय असेल?
उत्तर:-
ते इतरांनाही आप समान बनवतील. ते अनेकांचे कल्याण करत राहतील. ज्ञान-धनाने झोळी
भरून दान करतील. २१ जन्मांसाठी वारसा घेतील आणि दुसऱ्यांनाही मिळवून देतील.
गीत:-
ओम् नमो शिवाय...
ओम शांती।
भक्त ज्यांची महिमा करतात, त्यांच्या सन्मुख तुम्ही बसला आहात, तर किती आनंद व्हायला
पाहिजे. त्यांना म्हणतात - शिवाय नमः तुम्हाला तर नमः करायचे नाहीये. बाबांची मुले
आठवण करतात, नमः कधी करत नाहीत. हे देखील बाबा आहेत, यांच्याकडून तुम्हाला वारसा
मिळतो. तुम्ही कधी नमः करत नाही, आठवण करता. जीवाची आत्मा आठवण करते. बाबांनी हे
शरीर उधार घेतले आहे. ते आपल्याला रस्ता दाखवत आहेत - बाबांकडून बेहदचा वारसा कसा
घेतला जातो. तुम्ही देखील चांगल्या प्रकारे जाणता. सतयुग आहे सुखधाम आणि जिथे आत्मे
रहातात त्याला म्हटले जाते - शांतीधाम. तुमच्या बुद्धीमध्ये आहे की आपण शांतीधामचे
रहिवासी आहोत. या कलियुगाला म्हटलेच जाते दुःख-धाम. तुम्ही जाणता आपण आत्मे आता
स्वर्गामध्ये जाण्याकरिता, मनुष्यापासून देवता बनण्याकरिता शिकत आहोत. हे
लक्ष्मी-नारायण देवता आहेत ना. मनुष्यापासून देवता बनायचे आहे नवीन दुनियेसाठी.
बाबांकडून तुम्ही शिकत आहात. जितके शिकाल, अभ्यासामध्ये कोणाचा पुरुषार्थ जलद असतो,
कोणाचा मंद असतो. जे सतोप्रधान पुरुषार्थी असतात ते इतरांनाही आप समान बनवण्याचा
पुरुषार्थ नंबरवार करवून घेतात, अनेकांचे कल्याण करतात. जितकी ज्ञान-धनाने झोळी
भरून घेऊन मग दान कराल तितका फायदा होईल. मनुष्य दान करतात, त्याचे फळ अल्पकाळासाठी
दुसऱ्या जन्मामध्ये मिळते. त्यामध्ये थोडे सुख बाकी तर दुःखच दुःख आहे. तुम्हाला
तर २१ जन्मांसाठी स्वर्गाची सुखे मिळतात. कुठे स्वर्गातील सुखे आणि कुठे ही दुःखे!
बेहदच्या बाबांकडून तुम्हाला स्वर्गामध्ये बेहदचे सुख मिळते. ईश्वर अर्थ दान-पुण्य
करतात ना. ते आहे इनडायरेक्ट. आता तुम्ही तर सन्मुख आहात ना. आता बाबा बसून समजावून
सांगतात - भक्तीमार्गामध्ये ईश्वराच्या नावाने दान-पुण्य करतात तर त्याचे फळ दुसऱ्या
जन्मामध्ये मिळते. कोणी चांगले करतात तर चांगले मिळते, वाईट, पाप इत्यादी करतात तर
त्याला तसेच फळ मिळते. इथे कलियुगामध्ये तर पापेच होत राहतात, पुण्य होतच नाही.
फारफार तर अल्पकाळासाठी सुख मिळते. आता तर तुम्ही भविष्य सतयुगामध्ये २१ जन्मांसाठी
कायमचे सुखी बनता. त्याचे नावच आहे सुखधाम. प्रदर्शनी देखील तुम्ही लिहू शकता की,
शांतीधाम आणि सुखधामचा हा मार्ग आहे, शांतीधाम आणि सुखधामला जाण्याचा सोपा मार्ग.
आता तर कलियुग आहे ना. बिना कवडी खर्चाचा कलियुगामधून सतयुगामध्ये, पतित दुनियेमधून
पावन दुनियेमध्ये जाण्याचा सोपा मार्ग आहे. तेव्हा लोक समजतील कारण पत्थर-बुद्धी
आहेत ना. बाबा एकदम सोपे करून समजावून सांगतात. याचे नावच आहे सहज राजयोग, सहज
ज्ञान.
बाबा तुम्हा मुलांना
किती हुशार बनवतात. हे लक्ष्मी-नारायण हुशार आहेत ना. भले श्रीकृष्णासाठी काय-काय
लिहिले आहे, ते आहेत खोटे कलंक. श्रीकृष्ण म्हणतो - ‘आई, मी लोणी खाल्ले नाही...’;
आता याचा देखील अर्थ समजत नाहीत. मी लोणी खाल्ले नाही तर मग खाल्ले कोणी? छोट्या
मुलांना दूध पाजले जाते, छोटी मुले लोणी खातील की दूध पितील! हे जे दाखवले आहे मडके
फोडले वगैरे-वगैरे - अशा तर काही गोष्टी नाहीच आहेत. तो तर स्वर्गातील पहिला
राजकुमार आहे. महिमा तर एका शिवबाबांचीच आहे. दुनियेमध्ये दुसऱ्या कोणाचीही महिमा
नाहीये! या वेळी तर सर्व पतित आहेत परंतु भक्तीमार्गाची देखील महिमा आहे, भक्त माळा
देखील गायली जाते ना. महिलांमध्ये मीरेचे नाव आहे, पुरुषांमध्ये नारदाचे मुख्य गायन
आहे. तुम्ही जाणता एक आहे भक्तमाळा, दुसरी आहे ज्ञानाची माळा. भक्तमाळेमधून
रुद्रमाळेचे बनले आहात आणि मग रुद्रमाळेतून विष्णूची माळा बनते. रुद्रमाळा आहे
संगमयुगाची, हे रहस्य तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे. या गोष्टी तुम्हाला बाबा
सन्मुख बसून समजावून सांगतात. जेव्हा सन्मुख बसता तेव्हा तुमच्या अंगावर रोमांच उभे
राहिले पाहिजेत. अहो सौभाग्य, १०० टक्के दुर्भाग्यशालीपासून आपण सौभाग्यशाली बनतो.
कुमारी तर काम विकारामध्ये पडलेल्या नाहीत. बाबा म्हणतात - ती आहे काम-कटारी.
ज्ञानाला देखील ‘कटारी’ म्हणतात. बाबांनी सांगितले आहे ज्ञानाची अस्त्र-शस्त्र, तर
त्यांनी मग देवींना स्थूल अस्त्र-शस्त्र दाखवली आहेत. त्या तर हिंसक गोष्टी आहेत.
लोकांना हे माहीतच नाहीये की स्वदर्शनचक्र काय आहे? शास्त्रांमध्ये श्रीकृष्णाला
देखील स्वदर्शनचक्र देऊन हिंसाच हिंसा दाखवली आहे. वास्तविक आहे ज्ञानाची गोष्ट.
तुम्ही आता स्वदर्शनचक्रधारी बनला आहात त्यांनी मग हिंसेची गोष्ट दाखवली आहे. तुम्हा
मुलांना आता ‘स्व’चे अर्थात ‘चक्रा’चे ज्ञान मिळाले आहे. तुम्हाला बाबा म्हणतात -
ब्रह्मामुखवंशावली ब्राह्मण कुलभूषण, स्वदर्शन चक्रधारी. याचा अर्थ देखील आता तुम्ही
समजता. तुमच्यामध्ये पूर्ण ८४ जन्मांचे आणि सृष्टीचक्राचे ज्ञान आहे. सर्व प्रथम
सतयुगामध्ये एकच सूर्यवंशी धर्म असतो नंतर मग चंद्रवंशी असतो. दोन्ही मिळून स्वर्ग
म्हटला जातो. या गोष्टी तुमच्यामध्ये देखील नंबरवार सर्वांच्या बुद्धीमध्ये आहेत.
जसे तुम्हाला बाबांनी शिकवले आहे, तुम्ही शिकून हुशार झाला आहात. आता तुम्हाला मग
इतरांचे कल्याण करायचे आहे. स्वदर्शन चक्रधारी बनायचे आहे. जोपर्यंत
ब्रह्मामुखवंशावली बनत नाही तोपर्यंत शिवबाबांकडून वारसा कसा घेणार? आता तुम्ही बनला
आहात ब्राह्मण. शिवबाबांकडून वारसा घेत आहात हे विसरता कामा नये. पॉईंटस् (मुद्दे)
लिहून ठेवले पाहिजेत. ही शिडी आहे ८४ जन्मांची. शिडी उतरायला तर सोपी असते. जेव्हा
शिडी चढतात तेव्हा कमरेला हाताचा आधार देवून कसे चढतात. परंतु लिफ्ट देखील आहे. आता
बाबा येतातच मुळी तुम्हाला लिफ्ट देण्यासाठी. सेकंदामध्ये चढती कला होते. आता तुम्हा
मुलांना तर आनंद झाला पाहिजे की, आपली चढती कला आहे. मोस्ट बिलवेड (सर्वात प्रिय)
बाबा मिळाले आहेत. त्यांच्या इतकी प्रिय वस्तू दुसरी कोणती असत नाही. साधू-संत
इत्यादी जे कोणी आहेत ते सर्व त्या एका माशूकची (शिवबाबांची) आठवण करतात, सर्वजण
त्यांचे आशिक आहेत. परंतु ते कोण आहेत, हे काहीच समजत नाहीत. फक्त सर्वव्यापी
म्हणतात.
तुम्ही आता जाणता की,
शिवबाबा आम्हाला यांच्याद्वारे शिकवत आहेत. शिवबाबांना स्वतःचे शरीर तर नाही आहे.
ते आहेत परम-आत्मा. परम-आत्मा अर्थात परमात्मा; ज्यांचे नाव शिव आहे. बाकी सर्व
आत्म्यांच्या शरीरांची वेगवेगळी नावे असतात. एकच परम-आत्मा आहेत, ज्यांचे नाव ‘शिव’
आहे. मग मनुष्यांनी अनेक नावे ठेवली आहेत. वेगवेगळी मंदिरे बनवली आहेत. आता तुम्ही
त्याचा अर्थ समजता. मुंबईमध्ये बबुलनाथाचे मंदीर आहे, या वेळी तुम्हाला
काट्यांपासून फूल बनवत आहेत. विश्वाचे मालक बनता. तर पहिली मुख्य गोष्ट आहे की,
आम्हा आत्म्यांचा पिता एक आहे, त्यांच्याकडूनच भारतवासीयांना वारसा मिळतो. हे
लक्ष्मी-नारायण भारताचे मालक आहेत ना. चीनचे तर नाहीत ना. चीनचे असते तर चेहराच काही
वेगळा असला असता. हे आहेतच भारताचे. सर्वप्रथम गोरे आणि नंतर मग सावळे बनतात.
आत्म्यामध्येच अशुद्धता पडते, सावळी बनते. उदाहरणे सर्व याच्यावरून आहेत. भ्रामरी (मधमाशी)
किड्यांना बदलून आपल्या सारखे बनवते. संन्यासी काय बदलतात! पांढऱ्या कपडेवाल्याला
भगवे कपडे घालायला लावून डोक्याचे मुंडण करतात. तुम्ही तर हे ज्ञान घेता. असे
लक्ष्मी-नारायणासारखे सुंदर बनाल. आता तर प्रकृती सुद्धा तमोप्रधान आहे, तर ही धरती
देखील तमोप्रधान आहे, नुकसानकारक आहे. आकाशामध्ये वादळे येतात, किती नुकसान करतात,
उपद्रव होत रहातात. आता या दुनियेमध्ये आहे पराकोटीचे दुःख. तिथे मग परम सुख असेल.
बाबा परम-दुःखातून परम-सुखामध्ये घेऊन जातात. याचा विनाश होतो आणि नंतर मग सर्वकाही
सतोप्रधान बनते. आता तुम्ही पुरुषार्थ करून बाबांकडून जितका वारसा घ्यायचा असेल
तितका घ्या. नाही तर शेवटी पश्चात्ताप करावा लागेल की, बाबा आले परंतु आपण काहीच
घेतले नाही. हे लिहिलेले आहे - भांभोरला (जुन्या दुनियेला) आग लागते तेव्हा
कुंभकर्णाच्या झोपेतून जागे होतात. मग हाय-हाय करत मरतात. ‘हाय-हाय’च्या नंतर मग
जयजयकार होईल. कलियुगामध्ये ‘हाय-हाय’ आहे ना. एकमेकांना मारत राहतात. प्रचंड
प्रमाणात मृत्युमुखी पडतील. कलियुगानंतर मग सतयुग नक्की येईल. मध्ये हा आहे संगम.
याला पुरुषोत्तम युग म्हटले जाते. बाबा तमोप्रधानापासून सतोप्रधान बनण्याची युक्ती
खूप सुंदर सांगतात. फक्त म्हणतात - ‘माझी आठवण करा बाकी काहीच करायचे नाही’. आता
तुम्हा मुलांना डोके सुद्धा टेकवायचे नाहीये. बाबांपुढे कोणी हात जोडतात तर बाबा
म्हणतात, ना तर तुम्हा आत्म्यांना हात आहेत, ना बाबांना, मग हात कोणासाठी जोडता?
कलियुगी भक्तीमार्गातील एकही चिन्ह (सवय) असता कामा नये. हे आत्मा, तू हात का
जोडतेस? फक्त मज पित्याची आठवण कर. आठवणीचा अर्थ काही हात जोडणे असा नाही आहे. लोक
तर सूर्याला देखील हात जोडतात, कुठल्याही महात्म्याला सुद्धा हात जोडतील. तुम्ही
हात जोडायचे नाही आहेत, हे तर मी उधार घेतलेले शरीर आहे. परंतु कोणी हात जोडले तर
प्रतिसाद म्हणून जोडावे लागतात. तुम्हाला तर असेच समजावयाचे आहे की आपण आत्मा आहोत,
आपल्याला या बंधनामधून सुटून आता घरी परत जायचे आहे. याचा तर जसा तिटकाराच येतो. या
जुन्या शरीराला सोडून द्यायचे आहे. जसे सापाचे उदाहरण आहे. भ्रामरीला देखील किती
अक्कल आहे जी किड्याला भ्रामरी बनवते. तुम्ही मुले देखील, जे विषय सागरामध्ये
गटांगळ्या खात आहेत, त्यांना त्यामधून काढून क्षीर सागरामध्ये घेऊन जाता. आता बाबा
म्हणतात - शांतीधामला चला. मनुष्य शांती मिळवण्यासाठी किती डोकेफोड करतात.
संन्याशांना काही स्वर्गाची जीवनमुक्ती तर मिळत नाही. हो, मुक्ती मिळते, दुःखातून
सुटून शांतीधाममध्ये जाऊन बसतात. तरी देखील आत्मा सर्वात पहिले तर जीवनमुक्तीमध्ये
येते. नंतर मग जीवनबंधामध्ये येते. आत्मा सतोप्रधान आहे, नंतर मग शिडी उतरते. पहिले
सुख भोगून मग उतरता-उतरता तमोप्रधान बनलेले आहेत. आता पुन्हा सर्वांना परत घेऊन
जाण्यासाठी बाबा आलेले आहेत. बाबा म्हणतात - ‘माझी आठवण करा तर तुम्ही पावन बनाल’.
बाबांनी समजावून
सांगितले आहे - मनुष्य जेव्हा शरीर सोडतात त्या वेळी ते खूप यातना भोगतात कारण सजा
भोगावी लागते. जसे काशी-कलवट खातात; कारण ऐकलेले आहे की, शिवावर बळी चढल्याने मुक्ती
मिळते. तुम्ही आता बळी जाता ना, तर भक्तीमार्गामध्ये देखील मग त्या गोष्टी चालू
राहतात. तर जाऊन शिवावर बळी चढतात. आता बाबा समजावून सांगत आहेत की, परत तर कोणीही
जाऊ शकत नाही. हो, इतके बळी चढतात तर पापे भस्म होतात आणि मग पुन्हा नव्याने
कर्मांचा हिशोब सुरु होतो. तुम्ही आता या सृष्टीचक्राला जाणले आहे. यावेळी सर्वांची
उतरती कला आहे. बाबा म्हणतात - मी येऊन सर्वांची सद्गती करतो. सर्वांना घरी घेऊन
जातो. पतितांना तर सोबत घेऊन जाणार नाही त्यामुळे आता पवित्र बना तेव्हा तुमची
ज्योत पेटेल. लग्नाच्या वेळी पत्नीच्या डोक्यावर मडक्यामध्ये ज्योत पेटवतात. ही
परंपरा देखील इथे भारतातच आहे. पत्नीच्या डोक्यावर मडक्यामध्ये ज्योत पेटवतात,
पतीच्या कधी पेटवत नाहीत, कारण पतीला तर ईश्वर म्हणतात. मग ईश्वराच्या डोक्यावर
ज्योत कशी पेटवतील! तर बाबा समजावून सांगतात की, माझी ज्योत तर पेटलेलीच आहे. मी
तुमची ज्योत पेटवतो. बाबांना शमा देखील (ज्योत देखील) म्हणतात. ब्रह्म-समाजी मग
ज्योतीला मानतात, सदैव ज्योत पेटत ठेवतात, तिचीच आठवण करतात, तिलाच भगवान समजतात.
बाकीचे मग समजतात छोटी ज्योत (आत्मा) मोठ्या ज्योतीमध्ये (परमात्म्यामध्ये) विलीन
होईल. अनेक मते आहेत. बाबा म्हणतात - तुमचा धर्म तर अपार सुख देणारा आहे. तुम्ही
स्वर्गामध्ये खूप सुख बघता. नव्या दुनियेमध्ये तुम्ही देवता बनता. तुमचे शिक्षण
आहेच मुळी भविष्य नव्या दुनियेसाठी, इतर सर्व प्रकारचे शिक्षण इथल्यासाठी (जुन्या
दुनियेसाठी) असते. तुम्हाला तर इथे शिकून मग भविष्यामध्ये पद प्राप्त करायचे आहे.
गीतेमध्ये देखील अगदी बरोबर राजयोग शिकवलेला आहे. मग शेवटी युद्ध झाले, काहीही
शिल्लक राहिले नाही. पांडवांसोबत कुत्रा दाखवतात. आता बाबा म्हणतात - मी तुम्हाला
देवी-देवता बनवतो. इथे तर अनेक प्रकारची दुःख देणारीच माणसे आहेत. काम-कटारी चालवून
किती दुःखी करतात. तर आता तुम्हा मुलांना हा आनंद असला पाहिजे की बेहदचे बाबा
ज्ञानाचे सागर आपल्याला शिकवत आहेत. मोस्ट बिलवेड माशूक आहेत. पण आशिक अर्धेकल्प
त्यांची आठवण करतो. तुम्ही आठवण करत आला आहात, आता बाबा म्हणतात - ‘मी आलेलो आहे,
तुम्ही माझ्या मतानुसार चला. स्वतःला आत्मा समजून मज पित्याची आठवण करा. दुसरे
कोणीही नाही. माझ्या आठवणी शिवाय तुमची पापे भस्म होणार नाहीत. प्रत्येक गोष्टीसाठी
सर्जन बाबांकडून सल्ला घेत रहा. बाबा सल्ला देतील - अशा प्रकारे युक्तियुक्त होऊन
चाला. जर बाबांच्या सल्ल्यानुसार चालाल तर पावलागणिक पद्म मिळतील. सल्ला घेतलात तर
जबाबदारी संपली. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) बेहदच्या
बाबांकडून बेहदचा वारसा घेण्यासाठी डायरेक्ट ईश्वर अर्थ दान-पुण्य करायचे आहे.
ज्ञान-धनाने झोळी भरून सर्वांना द्यायचे आहे.
२) या पुरुषोत्तम
संगमयुगामध्ये स्वतःला सर्व बंधनामधून मुक्त करून जीवनमुक्त बनायचे आहे. भ्रामरी
प्रमाणे भूँ-भूँ करून आप समान बनविण्याची सेवा करायची आहे.
वरदान:-
सर्व
प्राप्तींच्या अनुभवाद्वारे शक्तीशाली बनणारे सदा सफलतामूर्त भव
जे सर्व प्राप्तींचे
अनुभवीमूर्त आहेत तेच शक्तीशाली आहेत, असे शक्तीशाली, सर्व प्राप्तींचे अनुभवी
आत्मेच सफलतामूर्त बनू शकतात कारण आता सर्व आत्मे शोधतील की सुख-शांतीचे मास्टर दाता
कुठे आहेत. तर जेव्हा तुमच्याजवळ सर्व शक्तींचा स्टॉक (साठा) असेल तेव्हाच तर तुम्ही
सर्वांना संतुष्ट करू शकाल. जसे परदेशामध्ये एकाच दुकानामध्ये सर्व वस्तू मिळतात तसे
तुम्हाला देखील बनायचे आहे. असे नाही की, सहनशक्ती असावी, सामना करण्याची शक्ती नको.
सर्व शक्तींचा स्टॉक पाहिजे तेव्हाच सफलतामूर्त बनू शकाल.
बोधवाक्य:-
मर्यादाच
ब्राह्मण जीवनाची पावले आहेत, पावलावर पाऊल ठेवणे अर्थात ध्येयाच्या समीप पोचणे.
अव्यक्त इशारे -
सत्यता आणि सभ्यता रूपी संस्कृतीला धारण करा:-
आजकाल काहीजण एक
विशेष भाषा वापरतात की, माझ्याच्याने असत्य बघवत नाही, खोटे ऐकवत नाही त्यामुळे
असत्याला पाहून, खोटे ऐकून आतून त्वेष येतो. परंतु जर तो खोटा आहे आणि तुम्हाला खोटे
पाहून त्वेष येत असेल तर तो त्वेष देखील असत्यच आहे ना! असत्याचा नाश करण्यासाठी
स्वतःमध्ये सत्यतेची शक्ती धारण करा.