10-03-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - सर्वात मोठा आजार देह-अभिमानाचा आहे, यामुळेच डाऊन फॉल (अधःपतन) झाले आहे, त्यामुळे आता देही-अभिमानी बना”

प्रश्न:-
तुम्हा मुलांची कर्मातीत अवस्था कधी होईल?

उत्तर:-
जेव्हा योगबलाद्वारे कर्मभोगावर विजय प्राप्त कराल. पूर्णतः देही-अभिमानी बनाल. हा देह-अभिमानाचा रोगच सर्वात जास्त वाईट आहे, यामुळेच दुनिया पतित झाली आहे. देही-अभिमानी बना तर तो आनंद, तो नशा राहील, चलन (वर्तन) देखील सुधारेल.

गीत:-
रात के राही थक मत जाना…

ओम शांती।
राही (प्रवासी) याचा अर्थ तर मुलांनी ऐकला. याचा अर्थ तुम्हा ब्रह्मा मुख वंशावली ब्राह्मणांशिवाय बाकीचे तर कोणीही समजावून सांगू शकणार नाहीत. तुम्ही जे देवी-देवता होता, होता तर मनुष्यच परंतु तुमची सिरत खूप चांगली होती (चारित्र्य खूप चांगले होते). तुम्ही सर्वगुण संपन्न, १६ कला संपूर्ण होता. तुम्ही विश्वाचे मालक होता. हिऱ्या समान असलेले कवडी समान कसे बनलात, हे कोणीही मनुष्य जाणत नाही. तुम्ही देखील नंबरवार पुरुषार्थानुसार पलटी खाल्ली आहे (परिवर्तित झाला आहात). अजून तुम्ही देवता बनलेले नाही आहात. रिज्युवनेट (पुनरुज्जीवीत) होत आहात. कोणी थोडे बदलले आहेत, कोणाचे ५ प्रतिशत परिवर्तन झाले आहे, कोणाचे १० प्रतिशत परिवर्तन झाले आहे… सिरत (चारित्र्य) बदलत जाते. दुनियेला हेच ठाऊक नाही आहे की भारतच हेवन होता, म्हणतात देखील क्राईस्टच्या ३ हजार वर्षांपूर्वी भारतामध्ये देवी-देवता होते, त्यांच्यामध्ये असे गुण होते ज्यामुळे त्यांना भगवान-भगवती म्हणत होते. आता तर ते काही गुण राहिलेले नाहीत. मनुष्याच्या लक्षात येत नाही की, भारत जो इतका श्रीमंत होता, तो मग डाऊन फॉल कसा झाला (त्याचे अधःपतन कसे झाले). ते देखील बाबाच बसून समजावून सांगतात. तुम्ही देखील समजावून सांगू शकता, ज्यांची सुरत सुधारलेली (वर्तन सुधारलेले) आहे. बाबा म्हणतात - मुलांनो, तुम्ही देवी-देवता होता तेव्हा आत्म-अभिमानी होता मग जेव्हा रावण राज्य सुरू झाले तेव्हा देह-अभिमानी बनला आहात. हा देह-अभिमानाचा सर्वात मोठा आजार तुम्हाला झाला आहे. सतयुगामध्ये तुम्ही आत्म-अभिमानी होता, खूप सुखी होता, तुम्हाला असे कोणी बनविले? हे कोणीही जाणत नाहीत. तुमचे डाऊन फॉल (अधःपतन) का झाले ते बाबा बसून समजावून सांगत आहेत. आपल्या धर्माला विसरून गेला आहात. भारतच वर्थ नॉट ए पेनी (कवडीतुल्य) बनला आहे. त्याचे मूळ कारण काय आहे? देह-अभिमान. हा देखील ड्रामा बनलेला आहे. मनुष्य हे जाणत नाहीत की भारत इतका श्रीमंत होता आणि मग गरीब कसा बनला, आपण आदि सनातन देवी-देवता धर्माचे होतो तर मग आपण धर्म भ्रष्ट, कर्म भ्रष्ट कसे काय बनलो. बाबा समजावून सांगत आहेत - रावण राज्य सुरू झाल्याने तुम्ही देह-अभिमानी बनलात, त्यामुळे तुमची ही हालत होऊ लागली आहे. शिडीच्या चित्रामध्ये देखील दाखवले आहे की कसे अधःपतन झाले आहे; वर्थ नॉट ए पेनीचे (कवडीतुल्य बनण्याचे) देखील मुख्य कारण देह-अभिमान आहे. हे देखील बाबा बसून समजावून सांगतात. शास्त्रांमध्ये कल्पाचे आयुष्य लाखो वर्षांचे सांगितले आहे. आजकाल ख्रिश्चन लोक जास्त हुशार आहेत. ते देखील म्हणतात - क्राइस्टच्या ३ हजार वर्षांपूर्वी पॅराडाईज होता, भारतवासी हे समजू शकत नाहीत की प्राचीन भारतच होता ज्याला स्वर्ग, हेवन म्हटले जाते. आजकाल तर भारताच्या पूर्ण इतिहास-भूगोलाला जाणतच नाहीत; काही मुलांना थोडेसे ज्ञान समजू लागले आहे परंतु त्यांना देह-अभिमान येतो. समजतात की, माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही. भारताची अशी दुर्दशा का झाली, ते बाबा समजावून सांगतात. बापू गांधीजी देखील म्हणत होते - पतित-पावन या, येऊन रामराज्य स्थापन करा. आत्म्याला जरूर कधीतरी बाबांकडून सुख मिळाले आहे, त्यामुळे पतित-पावनची आठवण करतात.

बाबा समजावून सांगत आहेत - माझी मुले जी शूद्रापासून बदलून ब्राह्मण बनतात ती देखील पूर्णतः देही-अभिमानी बनत नाहीत. वारंवार देह-अभिमानामध्ये येतात. हा आहे सर्वात जुना आजार, ज्यामुळे ही हालत झाली आहे. देही-अभिमानी बनण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. जितके देही-अभिमानी बनाल, तितकी बाबांची आठवण कराल. तर मग अथाह आनंद झाला पाहिजे. गायले जाते - पर्वा होती पार ब्रह्ममध्ये राहणाऱ्या परमेश्वराची आणि तो आता भेटला आहे, त्यांच्याकडून २१ जन्मांचा वारसा मिळत आहे; अजून बाकी काय पाहिजे. तुम्ही फक्त देही-अभिमानी बना, मामेकम् (मज एकाची) आठवण करा. भले गृहस्थव्यवहारामध्ये राहा. सारी दुनिया देह-अभिमानामध्ये आहे. भारत जो इतका श्रेष्ठ होता त्याचा डाऊन फॉल झाला आहे (अध:पतन झाले आहे). इतिहास-भूगोल काय आहे, हे कोणीही सांगू शकत नाही. या गोष्टी कोणत्याही शास्त्रांमध्ये नाहीत. देवता आत्म-अभिमानी होते. जाणत होते की, एका देहाला सोडून दुसरा घ्यायचा आहे. परमात्म-अभिमानी नव्हते. तुम्ही जितकी बाबांची आठवण कराल, देही-अभिमानी होऊन राहाल तितके जास्त गोड बनाल. देह-अभिमानामध्ये आल्यानेच भांडणे, मारामारी करणे, माकडासारखे वर्तन होते, हे बाबा समजावून सांगत आहेत. हे बाबा (ब्रह्मा बाबा) देखील समजून घेत आहेत. मुले देह-अभिमानामध्ये येऊन शिवबाबांना विसरून जातात. चांगली-चांगली मुले देह-अभिमानामध्ये राहतात. देही-अभिमानी बनतच नाहीत. तुम्ही कोणालाही हा बेहदचा इतिहास-भूगोल समजावून सांगू शकता. खरोखर सूर्यवंशी, चंद्रवंशी राजधानी होती. ड्रामा विषयी कोणालाच माहिती नाही आहे. भारत जो इतका पतित झाला, डाऊन फॉलचे (अध:पतनाचे) मूळ आहे देह-अभिमान. मुलांमध्ये देखील देह-अभिमान येतो. हे समजत नाहीत की आपल्याला डायरेक्शन कोण देत आहेत. नेहमी असे समजा की, शिवबाबा सांगत आहेत. शिवबाबांची आठवण न केल्यानेच देह-अभिमानामध्ये येतात. सारी दुनिया देह-अभिमानी बनली आहे, तेव्हाच तर बाबा म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा, स्वतःला आत्मा समजा. आत्मा या देहाद्वारे ऐकते, पार्ट बजावते. बाबा किती चांगल्या रीतीने समजावून सांगतात. भले भाषण तर खूप चांगले करतात परंतु वर्तन देखील चांगले पाहिजे ना. देह-अभिमान असल्याकारणाने फेल होतात. तो आनंद तो नशा राहत नाही. आणि मग त्यांच्याकडून मोठी विकर्म देखील होतात, ज्यामुळे मोठ्या दंडाचे भागीदार बनतात. देह-अभिमानी बनल्यामुळे खूप नुकसान होते. खूप सजा खावी लागते. बाबा म्हणतात - हे गॉडली वर्ल्ड गव्हर्नर्मेंट आहे ना. मज गॉडच्या गव्हर्नर्मेंटचा राईट हॅन्ड आहे - धर्मराज. तुम्ही चांगली कर्म करता तर त्याचे फळ चांगले मिळते. वाईट कर्म करता तर त्याची सजा खाता. सर्वजण गर्भ-जेलमध्ये देखील सजा खातात. त्यावरून देखील एक कहाणी आहे. या सर्व गोष्टी यावेळच्या आहेत. महिमा एका बाबांची आहे. दुसऱ्या कोणाचीही महिमा नाही आहे; म्हणूनच लिहिले जाते - ‘त्रिमूर्ती शिवजयंती वर्थ डायमंड’ (हिरे तुल्य त्रिमूर्ती शिवजयंती). बाकी सर्व आहेत वर्थ कवडी (कवडी तुल्य). शिवबाबांव्यतिरिक्त इतर कोणीही पावन बनवू शकत नाही. पावन बनतात आणि मग रावण पतित बनवतो. ज्यामुळे सर्व देह-अभिमानी बनले आहेत. आता तुम्ही देही-अभिमानी बनता. ही देही-अभिमानी अवस्था २१ जन्म चालते. तर बलिहारी एकाचीच गायली जाते. भारताला स्वर्ग बनविणारे शिवबाबा आहेत; हे कोणालाच ठाऊक नाही आहे की, शिवबाबा कधी आले, सर्वात अगोदर तर त्यांचा इतिहास पाहिजे. शिव म्हटलेच जाते परमपिता परमात्म्याला.

तुम्ही जाणता देह-अभिमानामुळे डाऊन फॉल होतो (अध:पतन होते). असे होईल तेव्हाच तर बाबा येऊन राईज (उत्थान) करतील. राईज आणि फॉल (उत्थान आणि पतन), दिवस आणि रात्र, ज्ञान सूर्य प्रकटा, अज्ञान अंधेर विनाश. सर्वात जास्त अज्ञान आहे हा देह-अभिमान. आत्म्याविषयी तर कोणालाच माहीत नाही आहे. आत्मा सो परमात्मा म्हणतात त्यामुळे किती पाप-आत्मा बनले आहेत त्यामुळे डाऊन फॉल झाला (अध:पतन झाले) आहे. ८४ जन्मघेत शिडी खाली उतरत आले आहेत. हा खेळ पूर्वनियोजित आहे. या दुनियेचा इतिहास-भूगोल तुम्ही मुलेच जाणता इतर कोणीही जाणत नाहीत. विश्वाचा डाऊन फॉल कसा झाला. ते (दुनियेवाले) तर समजतात की विज्ञानामुळे खूप प्रगती झाली आहे. परंतु हे समजत नाहीत की दुनिया अजूनच पतित नरक बनली आहे. देह-अभिमान भरपूर आहे. बाबा म्हणतात - आता तुम्हाला देही-अभिमानी बनायचे आहे. चांगले-चांगले महारथी भरपूर आहेत. ज्ञान खूप सुंदर ऐकवतात परंतु देह-अभिमान पूर्णपणे नष्ट होत नाही. देह-अभिमानामुळे कोणामध्ये क्रोधाचा अंश, कोणामध्ये मोहाचा अंश, थोडाफार आहे. सीरत (चारित्र्य) सुधारले पाहिजे ना. खूप-खूप गोड बनले पाहिजे. तेव्हाच तर उदाहरण देतात की, स्वर्गामध्ये वाघ-बकरी एकत्र पाणी पितात. तिथे कोणी असे दुःख देणारे पशु सुद्धा असत नाहीत. या गोष्टींना देखील फार मुश्किलीने कोणी समजतात. समजणारे नंबरवार आहेत. कर्मभोग संपून जाईल, कर्मातीत अवस्था होईल, हे फार मुश्किलीने होते. खूप देह-अभिमानामध्ये येतात. लक्षात येत नाही की आपल्याला हे मत कोण देत आहे. श्रीमत, श्रीकृष्णाद्वारे कसे मिळेल. शिवबाबा म्हणतात - यांच्याशिवाय (ब्रह्मा बाबांशिवाय) श्रीमत कसे देणार. माझा स्थायी रथ हा आहे. देह-अभिमानामध्ये येऊन उलटी-सुल्टी कामे करून फुकटची आपली बरबादी करू नका. नाहीतर परिणाम काय होईल! खूप कमी दर्जाचे पद मिळेल. शिकलेल्यांसमोर अशिक्षित चाकरी करतील. बरेचजण म्हणतात की, भारताचा इतिहास-भूगोल जो पूर्ण असला पाहिजे तो नाही आहे. तर हे त्यांना समजावून सांगावे लागेल. हे तर तुमच्या शिवाय कोणीही समजावून सांगू शकणार नाही. परंतु देही-अभिमानी स्थिती पाहिजे, तेच उच्चपद प्राप्त करू शकतात.

अजून तरी कोणाची कर्मातीत अवस्था झालेली नाही आहे. यांच्यावर (ब्रह्मा बाबांवर) तर खूप जबाबदाऱ्या आहेत. किती काळजी लागून राहिलेली असते. भले समजतात की सर्व ड्रामा अनुसार होते. तरी देखील समजावून सांगण्यासाठी युक्त्या तर शोधाव्याच लागतात ना; म्हणून बाबा म्हणतात - तुम्हीच जास्ती देही-अभिमानी बनू शकता, तुमच्यावर कोणतेही ओझे (जबाबदारी) नाही आहे, बाबांवर तर जबाबदारी आहे. हेड तर हे आहेत ना - प्रजापिता ब्रह्मा. परंतु हे कोणालाच ठाऊक नाही आहे की यांच्यामध्ये शिवबाबा बसले आहेत. तुमच्यामधील देखील कोणी मुश्किलीने या निश्चयामध्ये राहतात. तर हा जगाचा इतिहास-भूगोल जाणून घेतला पाहिजे ना. भारतामध्ये स्वर्ग कधी होता, आणि मग कुठे गेला? कसे डाऊन फॉल (अध:पतन) झाले? हे कोणालाच ठाऊक नाही आहे. जोपर्यंत तुम्ही समजावून सांगणार नाही तोपर्यंत कोणीही समजू शकणार नाही म्हणून बाबा डायरेक्शन देतात. शिकून घ्या तर तुम्हाला शाळांमध्ये जाऊन जगाचा इतिहास-भूगोल सांगता येईल. डाऊन फॉलवर (अध:पतनावर) भाषण केले पाहिजे. भारत हिऱ्या समान होता तो मग कवडी समान कसा काय बनला? किती वर्षे लागली? आम्ही समजावून सांगतो. अशी पत्रके एरोप्लेनमधून खाली टाकू शकता. समजावून सांगणारा खूप हुशार पाहिजे. गव्हर्नमेंटला इच्छा आहे तर गव्हर्नमेंटचाच हॉल ‘विज्ञान-भवन’ जो दिल्लीमध्ये आहे तिथे सर्वांना बोलावले पाहिजे. वृत्तपत्रांमध्ये देखील द्यावे लागेल. निमंत्रण पत्रिका देखील सर्वांना पाठवून द्या. आम्ही तुम्हाला साऱ्या जगाचा इतिहास-भूगोल सुरुवातीपासून शेवटपर्यंत समजावून सांगतो. आपणच येतील आणि जातील. पैशांचा तर प्रश्नच नाही. समजा आपल्याला कोणी भेटला, प्रेझेंट देत असतील तर आपण ते घेऊ शकत नाही. सेवा करण्यासाठी उपयोगात आणू, बाकी आम्ही ते घेऊ शकत नाही. बाबा म्हणतात - मी तुमच्याकडून दान घेऊन काय करू जे मग भरून द्यावे लागेल.मी पक्का सराफ आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) देह-अभिमानामध्ये येऊन कोणतेही उलटे-सुलटे काम करायचे नाही. देही-अभिमानी बनण्याचा पूर्णपणे पुरुषार्थ करायचा आहे. आपले सीरत (चारित्र्य) सुधारत राहायचे आहे.

२) अतिशय गोड, शितल बनायचे आहे. आतमध्ये क्रोधाचे, मोहाचे जे भूत आहे, त्याला काढून टाकायचे आहे.

वरदान:-
रिगार्ड देण्याचे रेकॉर्ड ठीक ठेवून, खुशीचे महादान करणारे पुण्य-आत्मा भव

वर्तमान समयी चोहो बाजूंना रिगार्ड देण्याचे रेकॉर्ड ठीक करण्याची आवश्यकता आहे. हेच रेकॉर्ड मग चारी दिशांना वाजेल. रिगार्ड देणे आणि रिगार्ड घेणे, छोट्यांना देखील रिगार्ड द्या, मोठ्यांना देखील रिगार्ड द्या. हे रिगार्डचे रेकॉर्ड आता निघाले पाहिजे, तेव्हा खुशीचे दान देणारे महादानी पुण्य-आत्मा बनाल. कोणाला रिगार्ड देऊन खुश करणे - हे मोठ्यात मोठे पुण्याचे काम आहे, सेवा आहे.

बोधवाक्य:-
प्रत्येक क्षण अंतिम क्षण समजून चाला तेव्हाच एव्हररेडी राहाल.

मातेश्वरीजींची अनमोल महावाक्ये:-

१) “तमोगुणी मायेचा विस्तार” -

सतोगुणी, रजोगुणी, तमोगुणी हे तीन शब्द जे बोलतात त्याचा यथार्थ अर्थ समजून घेणे जरुरी आहे. मनुष्य असे समजतात की हे तीनही गुण एकत्र चालत असतात, परंतु विवेक काय म्हणतो - काय हे तीनही गुण एकत्र एकाच वेळी चालत येतात का तीनही गुणांचा पार्ट वेगवेगळ्या युगामध्ये असतो? विवेक तर हेच म्हणतो की, हे तीनही गुण एकत्र चालत नाहीत, जेव्हा सतयुग आहे तेव्हा सतोगुण आहे, द्वापर आहे तेव्हा रजोगुण आहे आणि कलियुग आहे तेव्हा तमोगुण आहे. जेव्हा सतो असतो तेव्हा तमो, रजो नसतात, जेव्हा रजो असतो तेव्हा मग सतोगुण नसतो. हे मनुष्य तर असेच समजून बसले आहेत की हे तीनही गुण एकत्र चालत असतात. असे म्हणणे म्हणजे पूर्णपणे चुकीचे आहे; ते असे समजतात जेव्हा मनुष्य सत्य बोलतात, पाप कर्म करत नाहीत तर ते सतोगुणी असतात. परंतु विवेक म्हणतो की, आपण जेव्हा सतोगुण म्हणतो, तर या सतोगुणाचा अर्थ आहे संपूर्ण सुख अर्थात सारी सृष्टी सतोगुणी आहे. बाकी असे म्हणणार नाही की जो सत्य बोलतो तो सतोगुणी आहे, आणि जो खोटे बोलतो तो कलियुगी तमोगुणी आहे, अशीच दुनिया चालत आली आहे. आता जेव्हा आपण सतयुग म्हणतो तर याचा अर्थ आहे - साऱ्या सृष्टीवर सतोगुण सतोप्रधान पाहिजे. होय, कधी काळी सतयुग होते जिथे संपूर्ण संसार सतोगुणी होता. आता ते सतयुग काही नाही आहे, आता तर आहे कलियुगी दुनिया अर्थात साऱ्या सृष्टीवर तमोप्रधानतेचे राज्य आहे. या तमोगुणी काळामध्ये मग सतोगुण कुठून आला! आता आहे घोर अंध:कार ज्याला ब्रह्माची रात्र म्हटले जाते. ब्रह्माचा दिवस आहे - सतयुग आणि ब्रह्माची रात्र आहे - कलियुग, त्यामुळे आपण दोघांना एकत्र करू शकत नाही.

२) “कलियुगी असार संसारामधून सतयुगी सारवाल्या दुनियामध्ये घेऊन जाणे, एका परमात्म्याचेच काम आहे” -

या कलियुगी संसाराला असार संसार का म्हणतात? कारण या दुनियेमध्ये कोणतेही सार नाही म्हणजेच कोणत्याही वस्तूमध्ये ती ताकद राहिलेली नाही अर्थात सुख, शांती, पवित्रता नाही आहे. जी सुख, शांती, पवित्रता या सृष्टीवर कधी काळी होती; आता ती ताकद राहिलेली नाही कारण या सृष्टीमध्ये पाच भूतांची प्रवेशता आहे; म्हणूनच या सृष्टीला भयाचा सागर अथवा कर्मबंधनाचा सागर म्हणतात. म्हणूनच मनुष्य दुःखी होऊन परमात्म्याला बोलावत आहेत - ‘परमात्मा, आम्हाला भवसागरातून पार करा’. यावरून सिद्ध होते की जरूर कोणता अभय अर्थात निर्भयतेचा देखील संसार आहे ज्यामध्ये जाऊ इच्छितात. म्हणूनच या संसाराला पापाचा सागर म्हणतात, ज्याला पार करून पुण्य-आत्मा असणाऱ्या दुनियेमध्ये जाऊ इच्छितात. तर दुनिया दोन आहेत, एक सतयुगी सार वाली दुनिया, दुसरी आहे कलियुगी असार असणारी दुनिया. दोन्ही दुनिया या सृष्टीवर असतात. आता परमात्मा ती सार वाली दुनिया स्थापन करत आहेत. अच्छा - ओम् शांती.

हे अव्यक्त इशारे:- “निश्चयाच्या फाउंडेशनला मजबूत करून सदैव निर्भय आणि निश्चिंत रहा”

जसा ज्ञानाचा सब्जेक्ट आहे, तसा सेवेचा देखील सब्जेक्ट आहे, जो यामध्ये फेथफुल, निश्चय-बुद्धी आहे तोच वरच्या नंबरवर जाऊ शकतो. पहाटेपासून रात्रीपर्यंत आपला प्रोग्राम फिक्स करा, डेली डायरी बनवा, कारण जबाबदार आत्मे आहात, साधारण आत्मे नाही, विश्व कल्याणकारी आत्मे आहात. तर जी जेवढी मोठी व्यक्ती असते, त्याची दिनचर्या सेट असते.