10-04-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड मुलांनो - बाबा
आले आहेत, भारताला सॅलव्हेज करण्यासाठी (उद्धार करण्याकरिता), तुम्ही मुले यावेळी
बाबांचे मदतनीस बनता, भारतच प्राचीन खंड आहे”
प्रश्न:-
उच्च
ध्येयापर्यंत पोहोचण्यामध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या कोणत्या छोट्या-छोट्या गोष्टी
आहेत?
उत्तर:-
जर थोडा देखील कोणता शौक असेल, अनासक्त वृत्ती नसेल. चांगले कपडे घालण्यामध्ये,
खाण्यामध्ये बुद्धी भटकत असेल... तर या गोष्टी उच्च ध्येयापर्यंत पोहोचण्यामध्ये
अडथळा निर्माण करतात; म्हणूनच बाबा म्हणतात - मुलांनो, वनवासामध्ये रहा. तुम्हाला
तर सर्व काही विसरायचे आहे. या शरीराची देखील आठवण राहू नये.
ओम शांती।
मुलांना हे समजावून सांगितले आहे की हा भारतच अविनाशी खंड आहे आणि याचे मूळ नावच आहे
- ‘भारत खंड’. ‘हिंदुस्थान’ हे नाव तर नंतर पडले आहे. भारताला म्हटले जाते -
‘स्पिरिच्युअल खंड’ (अध्यात्मिक खंड). हा प्राचीन खंड आहे. भारत खंड जेव्हा नवीन
दुनियेमध्ये होता तेव्हा इतर कोणतेही खंड नव्हते. मुख्य आहेतच इस्लामी, बौद्धी आणि
ख्रिश्चन. आता तर खूप खंड झाले आहेत. भारत अविनाशी खंड आहे, त्यालाच स्वर्ग, हेवन
म्हणतात. नवीन दुनियेमध्ये नवीन खंड एक भारतच आहे. नवीन दुनिया रचणारे आहेत परमपिता
परमात्मा, स्वर्गाचे रचयिता हेवनली गॉड फादर. भारतवासी जाणतात की भारत हा अविनाशी
खंड आहे. भारत स्वर्ग होता. जेव्हा कोणाचा मृत्यू होतो तेव्हा म्हणतात स्वर्गवासी
झाला, समजतात स्वर्ग वर कुठे तरी आहे. दिलवाडा मंदिरामध्ये सुद्धा वैकुंठाची चित्रे
छतावर दाखवली आहेत. हे कोणाच्याही बुद्धीमध्ये येत नाही की भारतच हेवन होता, आत्ता
तो नाहीये. आता तर हेल (नरक) आहे. तर हे देखील अज्ञानच झाले. ज्ञान आणि अज्ञान दोन
गोष्टी असतात. ज्ञानाला म्हटले जाते - दिवस, अज्ञानाला म्हटले जाते - रात्र. लख्ख
प्रकाश आणि घनघोर अंधार असे म्हटले जाते. प्रकाश म्हणजे राईज (उत्थान), अंधार म्हणजे
फॉल (पतन). मनुष्य सूर्यास्त पाहण्यासाठी सनसेटच्या ठिकाणी जातात. आता ती तर आहे
हदची गोष्ट. यासाठी म्हटले जाते - ब्रह्माचा दिवस, ब्रह्माची रात्र. आता ब्रह्मा तर
आहेत प्रजापिता. तर जरूर प्रजेचा पिता झाला. ‘ज्ञान अंजन सद्गुरू दिया, अज्ञान
अंधेर विनाश’. या गोष्टी दुनियेमध्ये कोणीही समजत नाही. हे आहे नवीन दुनियेसाठी
नवीन नॉलेज. हेवनसाठी हेवनली गॉड फादरचे नॉलेज पाहिजे (स्वर्गासाठी ईश्वरीय पित्याचे
ज्ञान पाहिजे). गातात देखील की, फादर इज नॉलेजफुल (पिता ज्ञानसंपन्न आहेत). तर मग
ते शिक्षक झाले. फादरला म्हटलेच जाते पतित-पावन, इतर कोणालाही पतित-पावन म्हणू शकत
नाही. श्रीकृष्णाला सुद्धा म्हणू शकत नाही. फादर तर सर्वांचा एकच आहे. श्रीकृष्ण
काही सर्वांचा फादर नाहीये. तो तर जेव्हा मोठा होईल, लग्न करेल तेव्हा एक-दोन
मुलांचा बाप बनेल. राधे-कृष्णाला प्रिन्स-प्रिन्सेस म्हटले जाते. कधी स्वयंवर देखील
झाले असेल. लग्नानंतरच आई-वडील बनू शकतात. त्यांना कधी कोणता वर्ल्ड गॉड फादर म्हणू
शकत नाही. वर्ल्ड गॉड फादर फक्त एकाच निराकार बाबांना म्हटले जाते. ग्रेट-ग्रेट
ग्रँड फादर शिवबाबांना म्हणू शकत नाही. ग्रेट-ग्रेट ग्रँड फादर आहेत - प्रजापिता
ब्रह्मा. त्यांच्या पासून कुळ उदयास येते. ते (शिवबाबा) इनकॉर्पोरियल गॉड फादर,
निराकार आत्म्यांचे पिता आहेत. निराकारी आत्मे जेव्हा इथे शरीरामध्ये असतात तेव्हा
भक्तीमार्गामध्ये त्यांना बोलावतात. या तुम्ही सर्व नवीन गोष्टी ऐकत आहात. यथार्थ
रीतीने कोणत्याही शास्त्रामध्ये नाहीये. बाबा म्हणतात, मी सन्मुख बसून तुम्हा
मुलांना समजावून सांगतो. मग हे सर्व ज्ञान लुप्त होते. पुन्हा जेव्हा बाबा येतील
तेव्हा येऊन यथार्थ ज्ञान ऐकवतील. मुलांनाच सन्मुख समजावून सांगून वारसा देतात.
त्यानंतर शास्त्रे बनतात. यथार्थ तर बनू शकणार नाहीत कारण सत्याची दुनियाच नष्ट
होऊन झूठ खण्ड तयार होतो. तर खोटीच गोष्ट असणार, कारण उतरती कलाच असते. सत्यामुळे
तर चढती कला होते. भक्ती आहे - रात्र, अंधारामध्ये ठोकरा खाव्या लागतात. माथा टेकवत
राहतात. इतका घोर अंधार आहे. मनुष्यांना तर काहीच माहीत नसते. दारोदारी धक्के खात
राहतात. या सूर्याचा देखील राईज आणि फॉल (उदय आणि अस्त) होतो, जो मुले जाऊन पाहतात.
आता तर तुम्हा मुलांना ज्ञान सूर्याचा उदय होताना पाहायचे आहे. राईज ऑफ भारत आणि
डाऊन फॉल ऑफ भारत (भारताचे उत्थान आणि भारताचे पतन). भारत असा बुडतो जसा सूर्य
मावळतो. सत्यनारायणाच्या कथेमध्ये हे दाखवतात की भारताची नौका खाली जाते आणि मग बाबा
येऊन त्यांना सैलवेज करतात (उद्धार करतात).
तुम्ही या भारताचा
पुन्हा उद्धार करता. हे तुम्ही मुलेच जाणता. तुम्ही आमंत्रण देखील देता,
‘नव-निर्माण प्रदर्शनी’ हे नाव देखील ठीक आहे. नवीन दुनिया स्थापन कशी होते, त्याची
ही प्रदर्शनी आहे. चित्रांद्वारे स्पष्टीकरण दिले जाते. तर तेच नाव पुढे चालत राहिले
तर चांगले आहे. नवीन दुनिया स्थापन कशी होते किंवा राईज (उत्थान) कसे होते, ते
तुम्ही दाखवता. जरूर जुन्या दुनियेचे पतन होते तेव्हाच दाखवतात की उत्थान कसे होते.
ही देखील एक कथा आहे - राज्य जिंकून घेणे आणि गमावणे. ५ हजार वर्षांपूर्वी काय होते?
म्हणतील, सूर्यवंशीयांचे राज्य होते. मग चंद्रवंशी राज्य स्थापन झाले. ते तर
एकमेकांकडून राज्य हिरावून घेतात. दाखवतात की अमक्याकडून घेतले. त्यांना काही शिडी
समजत नाही. हे तर बाबा समजावून सांगतात की तुम्ही गोल्डन एज्ड मधून सिल्व्हर
एज्डमध्ये (त्रेतायुगामध्ये) गेलात, शिडी उतरत आला आहात. ही ८४ जन्मांची शिडी आहे.
शिडी उतरावी लागते, मग चढावी देखील लागते. डाऊन फॉलचे (पतनाचे) रहस्य देखील समजावून
सांगावे लागते. भारताचे पतन किती काळ आणि उत्थान किती काळ? भारतवासींचे उत्थान आणि
पतन. विचार सागर मंथन करावे लागते की, लोकांना प्रलोभन कसे दाखवायचे आणि मग
निमंत्रण देखील द्यायचे आहे - बंधू-भगिनींनो येऊन समजून घ्या… बाबांची महिमा तर
पहिली सांगायची आहे. शिवबाबांच्या महिमेचा एक बोर्ड असायला हवा. पतित-पावन ज्ञानाचा
सागर, पवित्रता, सुख-शांतीचा सागर, संपत्तीचा सागर, सर्वांचा सद्गती दाता, जगत-पिता,
जगत-शिक्षक, जगत-गुरु शिवबाबांकडून आपला सूर्यवंशी, चंद्रवंशी वारसा येऊन घ्या.
तेव्हा मग लोकांना पित्या विषयी ठाऊक होईल. बाबांची महिमा आणि श्रीकृष्णाची महिमा
वेगवेगळी आहे. हे तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये पक्के झालेले आहे. जी सेवाभावी मुले
आहेत ती दिवसभर धावपळ करत असतात. आपली लौकिक सर्व्हिस असताना देखील सुट्टी काढून
सेवेला लागतात. हे आहेच ईश्वरीय गव्हर्नमेंट. खास कन्या जर अशा सेवेमध्ये लागतील तर
खूप नाव काढू शकतात. सेवाभावी मुलांची पालना तर चांगल्या प्रकारे होतच राहते, कारण
शिवबाबांचा भंडारा भरपूर आहे. ज्या भंडाऱ्यातून खाल्ले तो भंडारा भरपूर, काल कंटक
दूर.
तुम्ही आहात शिव-वंशी.
ते रचयिता आहेत, ही रचना आहे. ‘बाबुल’ (पिता) नाव खूप गोड आहे. शिव, साजन देखील
आहेत ना. शिवबाबांची महिमाच वेगळी आहे. ‘निराकार’ शब्द लिहिल्यामुळे समजतात की
त्यांचा कोणताही आकार नाहीये. मोस्ट बिलवेड (परमप्रिय) शिवबाबा आहेत - ‘परमप्रिय’
हे तर लिहायचेच आहे. यावेळी युद्धाचे मैदान त्यांचे देखील आहे तर तुमचेही आहे.
शिव-शक्ती या नॉन-व्हायोलन्स (अहिंसक) म्हणून गायल्या जातात. परंतु चित्रांमध्ये
देवींना देखील शस्त्रे देऊन हिंसा दाखवली आहे. खरे तर तुम्ही योग अथवा आठवणीच्या
बळावर विश्वाची बादशाही घेता. शस्त्रे इत्यादींची तर गोष्टच नाही. गंगेचा प्रभाव
खूप आहे. अनेकांना साक्षात्कार देखील होईल. भक्ती मार्गामध्ये समजतात की गंगाजल
मिळेल तेव्हाच उद्धार होईल, म्हणूनच ‘गुप्त गंगा’ असे बोलत राहतात. म्हणतात की, बाण
मारला आणि गंगा उत्पन्न झाली. गाईच्या मुखातून (गोमुखातून) देखील गंगा दाखवतात.
तुम्ही विचाराल तर म्हणतील की गुप्त गंगा येत आहे. त्रिवेणीवर देखील सरस्वतीला
गुप्त दाखवले आहे. मनुष्यांनी तर खूप गोष्टी बनवल्या आहेत. इथे तर एकच गोष्ट आहे -
फक्त ‘अल्फ’, बस्स. अल्लाह येऊन बहिश्त (स्वर्ग) स्थापन करतात. खुदा हेवन स्थापन
करतात. ईश्वर स्वर्ग स्थापन करतात. वास्तविक ईश्वर तर एकच आहे. ही तर आपापल्या
भाषेमध्ये विविध नावे ठेवली आहेत. परंतु एवढे मात्र समजतात की अल्लाह कडून नक्कीच
स्वर्गाची बादशाही मिळेल. इथे तर बाबा म्हणतात - मनमनाभव. बाबांची आठवण केल्याने
वारसा जरूर आठवेल. रचत्याची रचना आहेच मुळी स्वर्ग. असे थोडेच म्हणणार की रामाने
नरक रचला. भारतवासीयांना हे माहितच नाही आहे की, निराकार रचयिता कोण आहे? तुम्ही
जाणता की नरकाचा रचयिता रावण आहे, ज्याला जाळतात. रावण राज्यामध्ये भक्ती मार्गाचे
कलम किती मोठे आहे. रावणाचे रूप देखील खूप भयंकर बनवले आहे. बोलतात देखील की, रावण
आमचा शत्रू आहे. बाबांनी अर्थ समजावून सांगितला आहे - पेशगीर (विस्तार) मोठा आहे
म्हणून मग रावणाचे शरीर देखील मोठे बनवतात. शिवबाबा तर बिंदू आहेत. परंतु चित्र मोठे
बनवले आहे. नाहीतर बिंदूची पूजा कशी करणार. पुजारी तर बनायचे आहे ना. आत्म्यासाठी
तर म्हणतात - ‘भ्रकुटी के बीच चमकता है अज़ब सितारा’. आणि पुन्हा मग म्हणतात - आत्मा
सो परमात्मा. तर मग हजारो सूर्यांपेक्षाही जास्त तेज कसे असेल? आत्म्याचे वर्णन तर
करतात परंतु समजत नाहीत. जर परमात्मा हजार सूर्यांपेक्षा तेजस्वी असेल, तर
प्रत्येकामध्ये प्रवेश कसा करेल? किती अयथार्थ गोष्टी आहेत, ज्या ऐकून काय बनून बसले
आहेत. म्हणतात - आत्मा सो परमात्मा तर मग बाबांचे रूप देखील असेच असेल ना, परंतु
पूजेसाठी म्हणून मोठे बनवले आहे. दगडाची किती मोठी-मोठी चित्रे बनवतात. जसे
गुहेमध्ये भलेमोठे पांडव दाखवले आहेत, जाणत काहीच नाहीत. हे आहे शिक्षण. धंदा आणि
शिक्षण वेगवेगळे आहे. बाबा शिकवतात देखील आणि धंदा देखील शिकवतात. बोर्डावर देखील
आधी बाबांची महिमा दिली पाहिजे. बाबांची पूर्ण महिमा लिहायची आहे. या गोष्टी तुम्हा
मुलांच्या बुद्धीमध्ये देखील नंबरवार पुरुषार्थानुसार येतात म्हणूनच महारथी,
घोडेस्वार म्हटले जाते. शस्त्रे इत्यादींची कोणतीही गोष्ट नाहीये. बाबा बुद्धीचे
कुलूप उघडतात. हे गोदरेजचे कुलूप कोणीही उघडू शकणार नाही. बाबांकडे भेटायला येतात
तेव्हा बाबा मुलांना विचारतात की, या आधी कधी भेटला होता? याच ठिकाणी, याच दिवशी कधी
भेटला होता? तेव्हा मुले म्हणतात - होय बाबा, ५ हजार वर्षांपूर्वी भेटलो होतो. आता
या गोष्टी अशा कोणी विचारू शकणार नाही. किती गूढ समजून घेण्यासारख्या गोष्टी आहेत.
किती ज्ञानाच्या युक्त्या बाबा समजावून सांगतात. परंतु धारणा नंबरवार होते.
शिवबाबांची महिमा वेगळी आहे. ब्रह्मा-विष्णु-शंकर यांची महिमा वेगळी आहे.
प्रत्येकाचा पार्ट वेगवेगळा आहे. एक दुसऱ्याशी मेळ खाऊ शकत नाही. हा अनादि ड्रामा
आहे. तोच पुन्हा रिपीट होईल. आता तुमच्या बुद्धीमध्ये हे पक्के झाले आहे की, आपण कसे
मूलवतनमध्ये जातो, आणि मग पार्ट बजावण्यासाठी येतो. जातो व्हाया सूक्ष्मवतन.
येतेवेळी सूक्ष्मवतन नसते. सूक्ष्मवतनचा साक्षात्कार कधी कोणाला होतही नाही.
सूक्ष्मवतनचा साक्षात्कार करण्यासाठी कोणी तपस्या करत नाहीत कारण त्यांना कोणी जाणत
नाही. सूक्ष्मवतनचा कोणी भक्त थोडाच असेल. सूक्ष्मवतन आता रचतात व्हाया सूक्ष्मवतन
जाऊन मग नवीन दुनियेमध्ये येतील. आता यावेळी तुम्ही तिथे येत-जात राहता. तुमचे लग्न
झाले आहे, हे तुमचे माहेर आहे. विष्णूला पिता म्हणणार नाही. ते आहे सासर. जेव्हा
कन्या सासरी जाते तेव्हा जुने कपडे सर्व सोडून जाते. तुम्ही जुन्या दुनियेलाच सोडून
देता. तुमच्या आणि त्यांच्या वनवासामध्ये किती फरक आहे. तुम्हाला सुद्धा खूप
अनासक्त होऊन राहिले पाहिजे. देह-अभिमान तोडायचा आहे. महागडी साडी नेसाल तर लगेच
देह-अभिमान येईल. मी आत्मा आहे, हे विसरायला होईल. यावेळी तुम्ही आहातच वनवासामध्ये.
वनवास आणि वानप्रस्थ एकच गोष्ट आहे. शरीरच सोडायचे आहे तर साडी सोडणार नाही का! साधी
साडी मिळाली तर मनच हिरमुसले होते. यामध्ये तर आनंद झाला पाहिजे - चांगले झाले जी
साधी साडी मिळाली. किमती वस्तूला तर सांभाळावे लागते. या परिधान करण्याच्या,
खाण्याच्या लहान-लहान गोष्टी देखील उच्च ध्येयापर्यंत पोहोचण्यामध्ये अडथळा निर्माण
करतात. ध्येय खूप मोठे आहे. कथेमध्ये देखील सांगतात ना की, पतीला म्हणाली - ही काठी
देखील सोडून द्या. बाबा म्हणतात हा जुना कपडा (जुने शरीर), जुनी दुनिया सर्व नष्ट
होणार आहे, त्यामुळे या साऱ्या दुनियेमधून बुद्धियोग तोडून टाकायचा आहे, यालाच
बेहदचा संन्यास म्हटले जाते. संन्याशांनी तर हदचा संन्यास केला आहे आता तर ते आत (जंगलातून
शहरामध्ये) आले आहेत. पूर्वी तर त्यांच्यामध्ये खूप ताकद होती. उतरणाऱ्यांची महिमा
ती काय होऊ शकते. नवीन-नवीन आत्मे देखील शेवटपर्यंत पार्ट बजावण्यासाठी येत राहतात,
त्यांच्यामध्ये कसली ताकद असणार. तुम्ही तर पूर्ण ८४ जन्म घेता. हे सर्व समजण्यासाठी
किती चांगली बुद्धी पाहिजे. सेवाभावी मुले सेवेसाठी उत्साहाने उड्या मारत राहतील.
ज्ञान सागराची मुले असे भाषण करतील जसे बाबा उत्साहाने सांगतात, यामध्ये निराश
व्हायचे नाही. अच्छा !
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) बुद्धीने
बेहदचा संन्यास करायचा आहे. आता परत घरी जाण्याची वेळ आहे त्यामुळे जुनी दुनिया आणि
जुन्या शरीरापासून अनासक्त होऊन रहायचे आहे.
२) ड्रामातील
प्रत्येक सीनला बघत असतानाही सदैव हर्षित रहायचे आहे.
वरदान:-
बापदादांना
आपला सोबती समजून डबल फोर्सने कार्य करणारे सहजयोगी भव
कोणतेही कार्य करताना
बापदादांना आपला सोबती बनवा म्हणजे मग डबल फोर्सने कार्य होईल आणि आठवण देखील खूप
सहज राहील कारण जो नेहमी सोबत असतो त्याची आठवण आपणच टिकून राहते. तर असे सोबत
राहिल्याने किंवा बुद्धीने निरंतर सत् चा (परमात्म्याचा) संग केल्याने सहजयोगी बनाल
आणि पॉवरफुल संग असल्याकारणाने प्रत्येक कामामध्ये तुमचा डबल फोर्स राहील, ज्यामुळे
प्रत्येक कार्यामध्ये सफलतेची अनुभूती होईल.
बोधवाक्य:-
महारथी तो आहे
जो कधीही मायेच्या प्रभावामध्ये परवश होणार नाही.
हे अव्यक्त इशारे -
महान बनण्याकरिता मधुरतेचा आणि नम्रतेचा गुण धारण करा.
मधुरताच ब्राह्मण
जीवनाची महानता आहे. जिथे मधुरता आहे तिथे पवित्रता आहे. पवित्रतेशिवाय मधुरता येऊ
शकत नाही. जितका बुद्धीमध्ये नशा असेल, तितकीच कर्मामध्ये नम्रता आणि बोलण्यामध्ये
मधुरता असावी. अशा नशेमध्ये राहिल्याने कधीही नुकसान होणार नाही. सिद्धीला प्राप्त
करणारे, स्वतःला नम्र-चित्त, निर्माण, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या स्वतःला
गुणग्राहक आणि मधुरतेने संपन्न बनवतील.