10-06-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - ध्येयाला सदैव समोर ठेवा तर दैवीगुण येत जातील. आता आपली काळजी घ्यायची आहे, आसुरी गुणांना काढून दैवी गुण धारण करायचे आहेत”

प्रश्न:-
‘आयुष्यमान भव’चे वरदान मिळालेले असताना देखील दीर्घायुषी होण्यासाठी कोणती मेहनत करायची आहे?

उत्तर:-
दीर्घायुषी होण्यासाठी तमोप्रधाना पासून सतोप्रधान बनण्याची मेहनत करा. जितकी बाबांची आठवण कराल तितके सतोप्रधान बनाल आणि आयुष्य वाढेल मग मृत्यूचे भय निघून जाईल. आठवणीमुळे दुःख दूर होतील. तुम्ही फूल बनाल. आठवणीमध्येच गुप्त कमाई आहे. आठवणीमुळे पापे नष्ट होतात. आत्मा हलकी होते, आयुष्य वाढते.

ओम शांती।
गोड-गोड रुहानी मुलांप्रति बाबा समजावून सांगत आहेत, शिकवत सुद्धा आहेत. काय समजावून सांगत आहेत? गोड मुलांनो, तुम्हाला एक तर दीर्घायुष्य हवे आहे कारण तुमचे आयुष्य खूप मोठे होते. १५० वर्षांचे आयुष्य होते, दीर्घायुष्य कसे मिळते? तमोप्रधाना पासून सतोप्रधान बनल्यामुळे. जेव्हा तुम्ही सतोप्रधान होता तेव्हा तुमचे आयुष्य खूप जास्ती होते. आता तुम्ही वर चढत आहात. जाणता कि, आपण तमोप्रधान बनलो म्हणून आमचे आयुष्य कमी झाले होते. आरोग्य सुद्धा ठीक नव्हते. एकदमच रोगी बनलो होतो. हे जीवन जुने आहे नव्या जीवनासोबत तुलना केली जाते. आता तुम्ही जाणता कि बाबा आम्हाला आयुष्य वाढविण्याची युक्ती सांगत आहेत. गोड-गोड मुलांनो, माझी आठवण कराल तर तुम्ही जसे सतोप्रधान होता दीर्घायुषी, आरोग्य संपन्न होता, असे पुन्हा बनाल. आयुष्य कमी असले तर मृत्यूचे भय असते. तुम्हाला तर गॅरेंटी मिळते कि सतयुगामध्ये असा अचानक कधीही मृत्यू होणार नाही. बाबांची आठवण करत रहाल तर आयुष्य वाढेल आणि सर्व दुःख सुद्धा दूर होतील. कोणत्याही प्रकारचे दुःख होणार नाही, तुम्हाला अजून काय पाहिजे? तुम्ही म्हणता, उच्च पद देखील पाहिजे. तुम्हाला माहिती नव्हते कि असे पद सुद्धा मिळू शकते. आता बाबा युक्ती सांगत आहेत - असे करा. एम ऑब्जेक्ट समोर आहे. तुम्ही असे पद प्राप्त करू शकता. दैवी गुण इथेच धारण करायचे आहेत. स्वतःला विचारायचे आहे माझ्यामध्ये कोणता अवगुण तर नाही ना? अवगुण सुद्धा अनेक प्रकारचे आहेत. सिगारेट ओढणे, छी-छी पदार्थ खाणे हे अवगुण आहेत. सर्वात मोठा अवगुण आहे विकाराचा, त्यालाच बॅड कॅरॅक्टर (खराब चारित्र्य) म्हणतात. बाबा म्हणतात - तुम्ही विशश (विकारी) बनले आहात. आता व्हाईसलेस (निर्विकारी) बनण्याची तुम्हाला युक्ती सांगतो - याकरिता या विकारांना, अवगुणांना सोडायचे आहे. कधीही विकारी बनायचे नाही. या जन्मामध्ये जे सुधरतील तर ती सुधारणा २१ जन्मांपर्यंत चालणार आहे. सर्वात महत्वाची गोष्ट आहे निर्विकारी बनणे. जन्म-जन्मांतरीचे जे ओझे डोक्यावर चढलेले आहे, ते योगबलानेच उतरणार. मुले जाणतात जन्म-जन्मांतर आपण विकारी बनलो आहोत. आता बाबांकडे आम्ही प्रतिज्ञा करतो कि पुन्हा कधीही विकारी बनणार नाही. बाबांनी सांगितले आहे जर पतित बनलात तर शंभर पटीने सजा सुद्धा भोगावी लागेल शिवाय पद सुद्धा भ्रष्ट होईल; कारण निंदा केलीत ना तर जसे त्या बाजूला (विकारी मनुष्यांच्या बाजूला) निघून गेला. असे बरेचजण निघून जातात अर्थात हार खातात. या अगोदर तुम्हाला माहिती नव्हते कि हा विकाराचा धंदा करता कामा नये. काही-काही चांगली मुले असतात, म्हणतात आम्ही ब्रह्मचारी राहणार. संन्याशांना पाहून समजतात की, पवित्रता चांगली आहे. पवित्र आणि अपवित्र, दुनियेमध्ये अपवित्र तर पुष्कळ असतात. शौचालयामध्ये जाणे सुद्धा अपवित्र बनणे आहे म्हणून लगेच स्नान केले पाहिजे. अपवित्रता अनेक प्रकारची असते. कोणाला दुःख देणे, भांडण-तंटा करणे हे देखील अपवित्र काम आहे. बाबा म्हणतात - जन्म-जन्मांतर तर तुम्ही पापेच केली आहेत. त्या सर्व सवयी आता सोडायच्या आहेत. आता तुम्हाला खराखुरा महान आत्मा बनायचे आहे. खरे-खरे महान आत्मा तर हे लक्ष्मी-नारायणच आहेत इतर कोणी तर इथे बनू शकणार नाहीत कारण सगळे तमोप्रधान आहेत. निंदा सुद्धा खूप करतात ना. त्यांना कळतही नाही की आपण काय करत आहोत. एक असते - गुप्त पाप, दुसरी - प्रत्यक्ष पापे सुद्धा असतात. हि आहेच तमोप्रधान दुनिया. मुले जाणतात कि बाबा आम्हाला आता हुशार (ज्ञानी) बनवत आहेत म्हणून त्यांची सर्वजण आठवण करतात. सगळ्यात चांगली समज तुम्हाला मिळते कि, पावन बनायचे आहे आणि मग गुण सुद्धा पाहिजेत. देवतांच्या समोर तुम्ही जी महिमा गात आले आहात, तर तसे आता तुम्हाला बनायचे आहे. बाबा समजावून सांगत आहेत - ‘गोड-गोड मुलांनो, तुम्ही किती गोड-गोड गुल-गुल फूल होता नंतर काटे बनला आहात’. आता बाबांची आठवण करा तर आठवणीमुळे तुमचे आयुष्य वाढेल. पापे सुद्धा भस्म होतील. डोक्यावरील ओझे कमी होईल. आपली काळजी घ्यायची आहे. आपल्यामध्ये जे कोणते अवगुण आहेत ते काढून टाकायचे आहेत. जसे नारदाचे उदाहरण आहे - नारदाला विचारले, ‘तू लायक आहेस?’ तर त्याने बघितले की, खरोखरच मी लायक नाहीये. बाबा तुम्हाला श्रेष्ठ बनवतात, बाबांची तुम्ही मुले आहात ना. जसे कोणाचे वडील महाराजा असतील तर तो म्हणेल ना, ‘माझे बाबा महाराजा आहेत’. बाबा खूप सुख देणारे आहेत. जे चांगल्या स्वभावाचे महाराजा असतात, त्यांना कधी राग येत नाही. आता तर हळू-हळू सर्वांच्या कला कमी होत गेल्या आहेत. सगळे अवगुण प्रवेश करत गेले आहेत. कला कमी होत गेली आहे. तमो होत गेले आहेत. तमोप्रधानतेचा देखील जसा शेवट जवळ आला आहे. किती दुःखी झाले आहेत. तुम्हाला किती सहन करावे लागते. आता अविनाशी सर्जन द्वारे तुम्हाला औषध दिले जात आहे. बाबा म्हणतात - ‘हे ५ विकार तर तुम्हाला वारंवार सतावणार.’ तुम्ही जितका बाबांची आठवण करण्याचा पुरुषार्थ कराल, तितकी माया तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करते. तुमची अवस्था अशी मजबूत व्हायला पाहिजे जेणे करून मायेचे कोणतेही तुफान तुम्हाला हलवू शकणार नाही. रावण काही वेगळी चीज नाहीये अथवा कोणी मनुष्य नाहीये. ५ विकार रुपी रावणालाच माया म्हटले जाते. आसुरी रावण संप्रदायवाले तुम्हाला ओळखतही नाहीत कि, शेवटी हे आहेत तरी कोण? हे बी.के. काय समजावून सांगतात? वास्तविकता कोणीही जाणत नाहीत. यांना बी.के. का म्हटले जाते? ब्रह्मा कोणाची संतान आहे? आता तुम्ही मुले जाणता आम्हाला परत घरी जायचे आहे. हे बाबा बसून तुम्हा मुलांना शिकवण देतात. ‘आयुष्यमान भव, धनवान भव…’ तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करत, वरदान देतात. परंतु फक्त वरदानांनी काही काम होत नाही. मेहनत करायची आहे. प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची आहे. स्वतःला राज-तिलक देण्यासाठी अधिकारी (पात्र) बनायचे आहे. बाबा अधिकारी बनवतात. तुम्हा मुलांना शिकवण देतात की, असे-असे करा. सर्वात पहिली शिकवण देतात - ‘मामेकम् (मज एकाची) आठवण करा’. मनुष्य आठवण करत नाहीत कारण ते जाणतच नाहीत तर आठवण सुद्धा चुकीची आहे. असे म्हणतात - ईश्वर सर्वव्यापी आहे. मग शिवबाबांची आठवण कशी करणार! शिवाच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा करतात, तुम्ही विचारा यांचे ऑक्युपेशन (कार्य) सांगा? तर म्हणतील भगवान सर्वव्यापी आहेत. पूजा करतात, तेव्हा दया मागतात, मागत असताना पुन्हा कोणी विचारतात परमात्मा कुठे आहेत? तर म्हणतात - ‘सर्वव्यापी आहेत’. चित्रासमोर (प्रतिमेसमोर) काय करतात आणि नंतर चित्र समोर नसते तर सर्व गुण आणि शरीरच नष्ट होते. भक्तीमध्ये किती चुका करतात. तरी देखील भक्तिवर किती प्रेम आहे. श्रीकृष्णासाठी किती निर्जल (उपवास) इत्यादी करतात. इथे तुम्ही शिकत आहात आणि ते भक्त लोक काय-काय करतात. तुम्हाला आता हसू येते. ड्रामा अनुसार भक्ति करत पाऊल खाली उतरत आले आहेत. वरती तर कोणी चढू शकत नाही.

आता हे आहे पुरुषोत्तम संगमयुग, ज्याबद्दल कोणाला माहितही नाही. आता तुम्ही पुरुषोत्तम बनण्यासाठी पुरुषार्थ करत आहात. टिचर स्टुडंटचा सर्व्हंट असतो ना, स्टुडंटची सेवा करतात! गव्हर्मेंट सर्व्हंट आहे. बाबा देखील म्हणतात - सेवा करतो, तुम्हाला शिकवतो सुद्धा. सर्व आत्म्यांचे पिता आहेत. टिचर सुद्धा बनतात. सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान सुद्धा ऐकवतात. हे ज्ञान इतर कोणत्याही मनुष्यामध्ये असू शकत नाही. कोणीही शिकवू शकणार नाही. तुम्ही पुरुषार्थ करता की आपण असे बनावे म्हणून. दुनियेमध्ये मनुष्य किती तमोप्रधान-बुद्धी आहेत. खूप भयानक दुनिया आहे. जे माणसाने करता कामा नये ते करतात. किती खून, दरोडा इत्यादी घालतात. काय नाही करत. १०० टक्के तमोप्रधान आहेत. आता तुम्ही १०० टक्के सतोप्रधान बनत आहात. त्यासाठी युक्ती सांगितली आहे - ‘आठवणीची यात्रा’. आठवणीनेच विकर्म विनाश होणार, बाबांना जाऊन भेटाल. ईश्वर पिता कसे येतात - हे देखील आता तुम्हाला समजले आहे. या रथामध्ये आले आहेत. ब्रह्मा बाबांच्या थ्रू ऐकवतात. जे मग तुम्ही धारण करून इतरांना ऐकवता तर इच्छा होते की डायरेक्ट ऐकावे. बाबांच्या परिवारामध्ये जावे. इथे वडीलही आहेत, आई सुद्धा आहे, मुले देखील आहेत. परिवारामध्ये येता. ती तर दुनियाच आसुरी आहे. तर आसुरी परिवाराला तुम्ही कंटाळून जाता म्हणून धंदा इत्यादि सोडून बाबांकडे रिफ्रेश होण्यासाठी येता. इथे राहतात देखील ब्राह्मणच. तर या परिवारामध्ये येऊन बसता. घरी जाल तर मग तिथे असा परिवार असणार नाही. तिथे तर तुम्ही देहधारी होऊन जाता, त्या गोरखधंद्यामधून बाहेर पडून तुम्ही इथे येता. आता बाबा म्हणतात - देहाची सर्व नाती सोडा. सुगंधित फूल बनायचे आहे. फुलामध्ये सुगंध असतो. सर्वच उचलून वास घेतात. धोत्र्याच्या फुलाला कोणी उचलणार नाहीत. तर फूल बनण्यासाठी पुरुषार्थ करायचा आहे; यासाठी बाबा देखील फूले घेऊन येतात की, असे बनायचे आहे. घर-गृहस्थीमध्ये राहून एका बाबांची आठवण करायची आहे. तुम्ही जाणता हे देहाचे नातलग तर खल्लास होणार आहेत. तुम्ही इथे गुप्त कमाई करत आहात. तुम्हाला कमाई करून शरीर सोडायचे आहे आणि अतिशय आनंदाने हर्षितमुख होऊन शरीर सोडायचे आहे. हिंडता-फिरता देखील बाबांच्या आठवणीमध्ये रहा तर तुम्हाला कधी थकवा जाणवणार नाही. बाबांच्या आठवणीमध्ये अशरीरी होऊन कितीही फेऱ्या मारा, भले इथून खाली आबूरोड पर्यंत चालत गेलात तरी सुद्धा थकवा जाणवणार नाही. पापे भस्म होतील. हलके व्हाल. तुम्हा मुलांना किती फायदा होतो इतर कोणालाही कळू देखील शकणार नाही. साऱ्या दुनियेतील मनुष्य बोलावतात - ‘पतित-पावन येऊन आम्हाला पावन बनवा’. मग त्यांना महात्मा कसे बरे म्हणणार. पतिता समोर डोके थोडेच टेकवले जाते. डोके पावन असणाऱ्या समोर झुकवले जाते. कन्येचे उदाहरण आहे - जेव्हा विकारी बनते तर सर्वांच्या समोर डोके टेकवत राहते आणि मग हाक मारते - ‘हे पतित-पावन या’. अरे, पतित बनताच कशासाठी, जे बोलवावे लागते. सर्वांची शरीरे तर विकारातूनच जन्म घेतात ना; कारण रावणाचे राज्य आहे. आता तुम्ही रावण राज्यामधून बाहेर पडले आहात. याला म्हटले जाते - पुरुषोत्तम संगमयुग. आता तुम्ही पुरुषार्थ करत आहात राम राज्यामध्ये जाण्याकरीता. सतयुग आहे रामराज्य. फक्त त्रेतामध्ये रामराज्य म्हटले तर मग सूर्यवंशी लक्ष्मी-नारायणाचे राज्य कुठे गेले? तर हे सर्व ज्ञान आता तुम्हा मुलांना मिळत आहे. नवीन-नवीन सुद्धा येतात ज्यांना तुम्ही ज्ञान देता. लायक बनवता. कोणाची संगत अशी मिळते जे मग लायक पासून नालायक बनतात. बाबा पावन बनवतात. तर आता पतित बनायचे सुद्धा नाही. कारण कि बाबा आलेले आहेत पावन बनविण्यासाठी; माया इतकी शक्तिशाली आहे जी पतित बनवते. पराभूत करते. म्हणतात - ‘बाबा, रक्षण करा’. अरे व्वा, युद्धाच्या मैदानामध्ये पुष्कळजण मरतात मग त्यांचे रक्षण केले जाते काय! हि मायेची गोळी बंदुकीच्या गोळीपेक्षा सुद्धा खूप तीव्र आहे. काम विकाराचा आघात झाला म्हणजे जणू वरून खाली पडले (पतन झाले). सतयुगामध्ये सर्व पवित्र गृहस्थधर्मवाले असतात ज्यांना देवता म्हटले जाते. आता तुम्ही जाणता - बाबा कसे आले आहेत, कुठे राहतात, कसे येऊन राजयोग शिकवतात? असे दाखवतात अर्जुनाच्या रथावर बसून ज्ञान दिले आहे. तर मग त्यांना सर्वव्यापी का म्हणता? बाबा, जे स्वर्गाची स्थापना करतात त्यांनाच विसरले आहेत. आता ते स्वतः आपला परिचय देत आहेत. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) महान आत्मा बनण्यासाठी ज्या काही अपवित्र वाईट सवयी आहेत, त्या नष्ट करायच्या आहेत. दुःख देणे, भांडण-तंटा करणे… हि सर्व अपवित्र कामे आहेत जी तुम्हाला करायची नाहीयेत. स्वतःच स्वतःला राजतिलक देण्यासाठी अधिकारी (पात्र) बनवायचे आहे.

२) बुद्धीला सर्व गोरखधंद्यामधून, देहधारींमधून काढून सुगंधित फूल बनायचे आहे. गुप्त कमाई जमा करण्यासाठी चालता-फिरता अशरीरी राहण्याचा अभ्यास करायचा आहे.

वरदान:-
आपल्या शुभ-चिंतनाच्या शक्तीद्वारे आत्म्यांना चिंतामुक्त बनविणारे शुभचिंतक मणी भव

आजच्या विश्वामध्ये सर्व आत्मे चिंतामणी (चिंता करणारे) आहेत. त्या चिंतामणींना तुम्ही शुभचिंतक मणी आपल्या शुभ-चिंतनाच्या शक्तीद्वारे परिवर्तन करू शकता. जशी सूर्याची किरणे दूर पर्यंतचा अंधार नाहीसा करतात तसे तुम्हा शुभचिंतक मण्यांची शुभ संकल्प रुपी चमक अथवा किरणे विश्वामध्ये चोहो बाजूला पसरत आहेत; म्हणून समजतात कि कोणती तरी स्पिरिच्युअल लाईट (अध्यात्मिक शक्ती) गुप्त रूपामध्ये आपले कार्य करत आहे. हि टचिंग (जाणिव) आता होऊ लागली आहे, शेवटी शोधत-शोधत स्थानावर पोहोचतील.

बोधवाक्य:-
बापदादांच्या डायरेक्शनला स्पष्टपणे कॅच करण्यासाठी मन-बुद्धीची लाईन क्लिअर ठेवा.