10-07-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - आता सतोप्रधान बनून घरी जायचे आहे त्यामुळे स्वतःला आत्मा समजून निरंतर बाबांची आठवण करण्याचा अभ्यास करा, सदैव आपल्या प्रगतीची काळजी घ्या”

प्रश्न:-
शिक्षणामध्ये दिवसेंदिवस पुढे जात आहोत की मागे येत आहोत त्याचे लक्षण कोणते?

उत्तर:-
शिक्षणामध्ये जर पुढे जात असाल तर हलकेपणाचा अनुभव होईल. बुद्धीमध्ये राहील की हे शरीर तर छी-छी आहे, याला सोडायचे आहे, आपल्याला तर आता घरी जायचे आहे. दैवी गुण धारण करत जाणार. जर मागे येत असाल तर वर्तनामध्ये आसुरी गुण दिसून येतील. चालता-फिरता बाबांची आठवण राहणार नाही. ते फुल बनून सर्वांना सुख देऊ शकणार नाहीत. अशा मुलांना पुढे गेल्यावर साक्षात्कार होतील आणि खूप शिक्षा भोगाव्या लागतील.

ओम शांती।
बुद्धीमध्ये हा विचार रहावा की आपण सतोप्रधान आलो होतो. रूहानी बाबा रुहानी मुलांना समजावून सांगत आहेत; इथे सर्वजण बसले आहेत, कोणी तर देह-अभिमानी आहेत आणि कोणी देही-अभिमानी असतील. कोणी सेकंदामध्ये देह-अभिमानी आणि सेकंदामध्ये देही-अभिमानी होत राहतील. असे तर कोणी म्हणू शकत नाही की आम्ही पूर्णवेळ देही-अभिमानी होऊन बसलो आहोत. नाही, बाबा समजावून सांगतात काही वेळ देही-अभिमानी, काही वेळ देह-अभिमानामध्ये असणार. आता मुले हे तर जाणतात आपण आत्मा या शरीराला सोडून जाणार आपल्या घरी. अतिशय आनंदाने जायचे आहे. पूर्ण दिवस चिंतनच हे चालते - आपण शांतीधाममध्ये जावे कारण बाबांनी रस्ता तर सांगितला आहे. बाकीचे लोक तर कधी या विचारामध्ये बसत नसतील. हे शिक्षण कोणाला मिळतच नाही. विचार देखील येत नसणार. तुम्ही समजता हे दुःख धाम आहे. आता बाबांनी सुखधामध्ये जाण्याचा रस्ता सांगितला आहे. जितकी बाबांची आठवण कराल तितके संपूर्ण बनून यथायोग्य शांतीधाममध्ये जाल, त्यालाच मुक्ती म्हटले जाते, ज्याच्यासाठीच मनुष्य गुरू करतात. परंतु मनुष्यांना हे अजिबात माहित नाही की मुक्ती-जीवनमुक्ती काय चीज आहे कारण ही आहे नवीन गोष्ट. तुम्ही मुले समजता आता आपल्याला घरी जायचे आहे. बाबा म्हणतात - ‘आठवणीच्या यात्रेद्वारे पवित्र बना’. तुम्ही सर्वप्रथम जेव्हा श्रेष्ठाचारी दुनियेमध्ये आला होता तेव्हा सतोप्रधान होता. आत्मा सतोप्रधान होती. कोणासोबत नाते-संबंध देखील नंतर होणार. जेव्हा गर्भामध्ये जाल तेव्हा नात्यामध्ये याल. तुम्ही जाणता आता हा आपला अंतिम जन्म आहे. आपल्याला आता परत घरी जायचे आहे. पवित्र बनल्याशिवाय आपण जाऊ शकत नाही. अशाप्रकारे मनामध्ये हितगूज केले पाहिजे कारण बाबांचा आदेश आहे की, उठता-बसता, चालता-फिरता बुद्धीमध्ये हा विचार असावा की आपण सतोप्रधान आलो होतो, आता सतोप्रधान बनून घरी जायचे आहे. सतोप्रधान बनायचे आहे बाबांच्या आठवणीने कारण बाबाच पतित पावन आहेत. आम्हा मुलांना युक्ती सांगतात की, तुम्ही असे पावन बनू शकता. साऱ्या सृष्टीच्या आदि-मध्य-अंताला तर बाबाच जाणतात आणखी कोणती ऑथॉरिटी नाही आहे. बाबाच मनुष्य सृष्टीचे बीज रूप आहेत. भक्ती कधी पर्यंत चालते, हे देखील बाबांनी समजावून सांगितले आहे. इतका वेळ ज्ञानमार्ग, इतका वेळ भक्ती. हे सारे ज्ञान आतमध्ये झिरपत राहिले पाहिजे. जसे बाबांच्या आत्म्यामध्ये ज्ञान आहे, तुमच्या आत्म्यामध्ये देखील ज्ञान आहे. शरीराद्वारे ऐकता आणि ऐकवता. शरीराशिवाय तर आत्मा बोलू शकत नाही, यामध्ये प्रेरणा किंवा आकाशवाणीची गोष्ट असत नाही. भगवानुवाच आहे तर जरूर मुख पाहिजे, रथ पाहिजे. गाढव-घोड्याचा रथ नको आहे. तुम्ही देखील आधी समजत होता कलियुग अजून ४०,००० वर्षे आणखी चालणार आहे. तुम्ही अज्ञान निद्रेमध्ये झोपून पडलेले होता, आता बाबांनी जागे केले आहे. तुम्ही देखील अज्ञानामध्ये होता. आता ज्ञान मिळाले आहे. अज्ञान म्हटले जाते भक्तीला.

आता तुम्हा मुलांना हा विचार करायचा आहे की आपण आपली प्रगती कशी करावी, उच्च पद कसे मिळवावे? आपल्या घरी जाऊन परत नवीन राजधानीमध्ये येऊन उच्च पद मिळवावे. त्यासाठी आहे आठवणीची यात्रा. स्वतःला आत्मा तर जरूर समजायचे आहे. आम्हा सर्व आत्म्यांचे पिता परमात्मा आहेत. हे तर खूप सोपे आहे. परंतु मनुष्याला एवढी गोष्ट सुद्धा समजत नाही. तुम्ही समजावून सांगू शकता की हे आहे रावण राज्य, म्हणून तुमची बुद्धी भ्रष्टाचारी बनली आहे. मनुष्य असे समजतात, जे विकारामध्ये जात नाहीत ते पावन आहेत. जसे संन्यासी आहेत. बाबा म्हणतात, ते तर अल्पकाळासाठी पावन बनतात. दुनिया तर तशीही पतित आहे ना. पावन दुनिया आहेच सतयुग. पतित दुनियेमध्ये सतयुगासारखे पावन कोणी असू शकत नाही. तिथे तर रावण राज्यच नाही, विकाराची गोष्टच नाही. तर चक्र लावत हिंडता-फिरता बुद्धीमध्ये हे चिंतन चालले पाहिजे. बाबांमध्ये हे ज्ञान आहे ना. ज्ञानसागर आहेत तर जरूर ज्ञान टपकत असेल. तुम्ही देखील ज्ञानसागरापासून निघालेल्या नद्या आहात. ते (बाबा) तर एव्हर सागरच आहेत, तुम्ही एव्हर सागर नाही आहात. तुम्ही मुले समजता आपण तर सर्व भाऊ-भाऊ आहोत. तुम्ही मुले शिकता, खरे पाहता नद्या इत्यादिची काही गोष्ट नाहीये. नदी म्हटले की गंगा-जमुना इत्यादी म्हणतात. तुम्ही आता बेहदमध्ये उभे आहात. आपण सर्व आत्मे एका बाबांची मुले भाऊ-भाऊ आहोत. आता आपल्याला परत घरी जायचे आहे. जिथून येऊन शरीर रुपी तख्तावर विराजमान होतो. अतिशय छोटी आत्मा आहे, साक्षात्कार झाला तरी समजू शकणार नाही. आत्मा निघून जाते तेव्हा कधी म्हणतात माथ्यातून बाहेर गेली, डोळ्यातून, मुखातून गेली… मुख उघडे पडते. आत्मा शरीर सोडून निघून जाते तेव्हा शरीर जड होते. हे ज्ञान आहे. स्टुडंट्सच्या बुद्धीमध्ये पूर्ण दिवस अभ्यास असतो. तुमचे देखील पूर्ण दिवस अभ्यासा विषयीचे विचार चालले पाहिजेत. चांगल्या-चांगल्या स्टुडंट्सच्या हातामध्ये कोणते ना कोणते पुस्तक असते. वाचत राहतात.

बाबा म्हणतात तुमचा हा अंतिम जन्म आहे, पूर्ण चक्र फिरून अंतामध्ये आले आहात बुद्धीमध्ये याचेच चिंतन असले पाहिजे. धारण करून दुसऱ्यांना समजावून सांगितले पाहिजे. काहींना तर धारणाच होत नाही. स्कूलमध्ये देखील नंबरवार स्टुडंट्स असतात. विषय देखील खूप असतात. इथे तर एकच सब्जेक्ट आहे. देवता बनायचे आहे, याच अभ्यासाचे चिंतन चालत रहावे. असे नाही, अभ्यासाला विसरून बाकी दुसरे-दुसरे विचार चालत राहतील. धंद्यावाला असेल तर तो आपल्या धंद्याच्याच विचारामध्ये राहील. स्टुडंट्स अभ्यासातच मग्न असणार. तुम्हा मुलांना देखील आपल्या अभ्यासामध्येच मग्न रहायचे आहे.

काल एक निमंत्रण पत्र आले होते इंटरनॅशनल योग कॉन्फरन्सचे. तुम्ही त्यांना लिहू शकता तुमचा तो आहे हठयोग. त्याचा एम ऑब्जेक्ट काय आहे? त्याने काय फायदा होतो? आम्ही तर राजयोग शिकत आहोत. परमपिता परमात्मा जे ज्ञानसागर आहेत, ते रचयिता आम्हाला स्वतःचे आणि रचनेचे ज्ञान ऐकवतात. आता आम्हाला परत घरी जायचे आहे. मनमनाभव (मज एकाची आठवण करा) - हा आहे आमचा मंत्र. आम्ही बाबांना आणि बाबांद्वारे जो वारसा मिळतो, त्याची आठवण करतो. तुम्ही हे हठयोग इत्यादी करत आले आहात, त्याचे एम ऑब्जेक्ट काय आहे? आम्ही आमचे तर सांगितले की आम्ही हे शिकत आहोत. तुमच्या या हठयोगाने काय मिळते? असा रिस्पॉन्स नटशेलमध्ये (अशी प्रतिक्रिया संक्षिप्त मध्ये) लिहायची आहे. अशा प्रकारची निमंत्रणे तर तुमच्याकडे खूप येतात. ऑल इंडिया रिलीजियस कॉन्फरन्ससाठी (अखिल भारतीय धार्मिक परिषदेसाठी) तुम्हाला निमंत्रण आले आणि ते जर तुम्हाला म्हणाले - तुमचे एम ऑब्जेक्ट काय आहे? तर तुम्ही बोला - आम्ही हे-हे शिकत आहोत. आपले कार्य जरूर सांगितले पाहिजे; का? हा राजयोग तुम्ही शिकत आहात. तर तुम्ही बोला - ‘आम्ही हे शिकत आहोत. आम्हाला शिकविणारे स्वयं भगवान आहेत, आम्ही सर्व भाऊ-भाऊ आहोत. आम्ही स्वतःला आत्मा समजतो. बेहदचे बाबा म्हणतात स्वतःला आत्मा समजून मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर तुमची पापे नष्ट होतील’. अशा प्रकारचे लिखाण खूप चांगल्या प्रकारे छापून ठेवा. मग जिथे-जिथे कॉन्फरन्स इत्यादी असेल तिथे पाठवून द्या. ते म्हणतील - हे तर खूप चांगल्या नियमबद्ध गोष्टी शिकतात. या राजयोगामुळे राजांचाही राजा विश्वाचा मालक बनतात. दर ५००० वर्षानंतर आम्ही देवता बनतो आणि मग पुन्हा मनुष्य बनतो. अशा प्रकारे विचार सागर मंथन करून फर्स्टक्लास लिखाण तयार केले पाहिजे. उद्देश तुम्हाला विचारू शकतात. तर हे छापून ठेवले पाहिजे, आमचे एम ऑब्जेक्ट हे आहे. असे लिहिल्याने टेम्पटेशन (जाणून घेण्याचा मोह) होईल. यामध्ये कोणता हठयोग अथवा शास्त्रार्थ करण्याची गरज नाही. त्या लोकांना त्यांच्या शास्त्रार्थाचा देखील किती अहंकार असतो. ते स्वतःला शास्त्रांची ऑथॉरिटी (शास्त्रांचे अधिकारी) समजतात. खरेतर ते पुजारी आहेत, ऑथॉरिटी तर पूज्यला म्हणणार. पुजारीला कसे म्हणणार? हे तर क्लिअर करून लिहिले पाहिजे की, आम्ही काय शिकत आहोत. बी. के. चे नाव तर प्रसिद्ध झाले आहे.

योग तर दोन प्रकारचे आहेत - एक आहे हठयोग, दुसरा आहे सहज योग. तो तर कोणताही मनुष्य शिकवू शकत नाही. राजयोग एक परमात्माच शिकवतात. बाकी हे अनेक प्रकारचे योग आहेत मनुष्य मतावर. तिथे देवतांना तर कुणाच्या मताची गरजच नाही कारण वारसा घेतलेला आहे. ते आहेत देवता अर्थात दैवी गुणवाले, ज्यांच्यामध्ये असे गुण नाहीत त्यांना असुर म्हटले जाते. देवतांचे राज्य होते मग ते गेले कुठे? ८४ जन्म कसे घेतले? शिडीच्या चित्रावर समजावून सांगितले पाहिजे. शिडी खूप चांगली आहे. जे तुमच्या मनात आहे ते या शिडीमध्ये आहे. सर्व काही शिक्षणावर अवलंबून आहे. शिक्षण आहे सोर्स ऑफ इन्कम. हे आहे सर्वात उच्च शिक्षण. दि बेस्ट. दुनिया जाणत नाही की सर्वोत्तम शिक्षण कोणते आहे. या शिक्षणाने मनुष्यापासून देवता डबल मुकुटधारी बनतात. आता तुम्ही डबल मुकुटधारी बनण्याचा पुरुषार्थ करत आहात. शिक्षण एकच आहे मग कोणी काय बनतात, कोणी काय! आश्चर्य आहे ना, एकाच शिक्षणाने राजधानी स्थापन होते, राजा देखील बनतात तर रंक देखील बनतात. बाकी तिथे दुःखाची गोष्ट असत नाही. पदे तर आहेत ना. इथे अनेक प्रकारचे दुःख आहे. दुष्काळ, रोगराई, धान्य इत्यादी मिळत नाही, पूर येत राहतात. भले लखपती, करोडपती आहेत, जन्म तर विकारानेच होतो ना. कष्ट भोगणे, डास चावणे, हे सर्व दुःख आहे ना. नावच आहे रौरव नरक. तरी देखील म्हणत राहतात अमका स्वर्गवासी झाला. अरे स्वर्ग तर येणार आहे मग कोणी स्वर्गात गेला कसा. कोणालाही समजावून सांगणे खूप सोपे आहे. बाबांनी निबंध दिला आहे. लिहिणे मुलांचे काम आहे. धारणा असेल तर लिहीतील देखील. मुख्य गोष्ट मुलांना समजावून सांगतात की, ‘स्वतःला आत्मा समजा, आता परत जायचे आहे’. आपण सतोप्रधान होतो तर आनंदाला पारावार नव्हता. आता तमोप्रधान बनलो आहोत. किती सोपे आहे. पॉईंट्स तर बाबा खूप सांगत असतात तर बसून चांगल्या प्रकारे समजावून सांगायचे आहे. जर मानत नसतील तर समजले जाते हा आपल्या कुळातील नाही. अभ्यासामध्ये दिवसेंदिवस पुढे जायचे आहे. मागे थोडेच हटायचे आहे. दैवी गुणांच्या ऐवजी आसुरी गुण धारण करणे - हे तर मागे हटणे झाले ना. बाबा म्हणतात विकारांना सोडत जा, दैवी गुण धारण करा. अतिशय हलके रहायचे आहे. हे शरीर छी-छी आहे, त्याला सोडायचे आहे. आपल्याला तर आता जायचे आहे घरी. बाबांची आठवण केली नाहीत तर गुल-गुल (फूल) बनणार नाही. खूप शिक्षा भोगावी लागेल. पुढे जाऊन तुम्हाला साक्षात्कार होतील. विचारणार, तुम्ही काय सेवा केली आहे? तुम्ही कधी कोर्टामध्ये गेले नाही आहात. बाबांनी (ब्रह्मा बाबांनी) सर्व काही पाहिलेले आहे, कसे हे लोक चोरांना पकडतात, मग केस चालते; तर तिथे देखील तुम्हाला सर्व साक्षात्कार घडवत राहणार. शिक्षा भोगून मग दिडदमडीचे पद प्राप्त कराल. टीचरला तर दया येते ना की, हे नापास होणार. हा बाबांची आठवण करण्याचा सब्जेक्ट सर्वात चांगला आहे, ज्यामुळे पापे नष्ट होतात. बाबा आम्हाला शिकवतात. याचेच चिंतन करत फेऱ्या मारल्या पाहिजेत. स्टुडंट टीचरची आठवण देखील करतात आणि बुद्धीमध्ये अभ्यास असतो. टीचर सोबत योग तर जरूर असणार ना. हे बुद्धीमध्ये राहिले पाहिजे - आम्हा सर्व भावांचा एकच टीचर आहे, ते आहेत सुप्रीम टीचर. पुढे जाऊन अनेकांना माहिती होईल - ‘अहो प्रभू तेरी लीला…’ महिमा करून प्राण सोडतील परंतु प्राप्त तर काहीच करू शकणार नाहीत. देह अभिमानामध्ये आल्यानेच उलटे काम करतात. देही-अभिमानी झाल्याने चांगले काम करतील. बाबा म्हणतात आता तुमची वानप्रस्थ अवस्था आहे. परत जावेच लागेल. हिशोब चुकता करून सर्वांना जायचे आहे. इच्छा असो वा नसो, जायचे जरूर आहे. एक दिवस असा सुद्धा येईल हि दुनिया खूप रिकामी होईल. फक्त भारतच राहील. अर्धा कल्प फक्त भारतच असेल तर दुनिया किती रिकामी असेल. असा विचार तुमच्या शिवाय इतर कोणाच्याही बुद्धीमध्ये येणार नाही. मग तर तुमचा कुणी शत्रू सुद्धा नसेल. शत्रू का येतात? धनाच्या मागे. भारतामध्ये इतके मुसलमान आणि इंग्रज का आले? पैसा बघितला. पैसे खूप होते, आता नाही आहेत तर आता कुणीच नाहीत. पैसे घेऊन रिकामे करून गेले. मनुष्य हे जाणत नाहीत. बाबा म्हणतात पैसा तर तुम्ही स्वतःच ड्रामा प्लॅन अनुसार संपवून टाकलात. तुम्हाला निश्चय आहे आपण बेहदच्या बाबांकडे आलो आहोत. कधी कुणाला वाटणारही नाही की हा ईश्वरीय परिवार आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) चालता-फिरता बुद्धीमध्ये अभ्यासाचे चिंतन करायचे आहे. कोणतेही कार्य करत असताना बुद्धीमध्ये सदैव ज्ञान टपकत रहावे. हेच दि बेस्ट शिक्षण आहे, जे शिकून डबल मुकुटधारी बनायचे आहे.

२) अभ्यास करायचा आहे आपण आत्मा भाऊ-भाऊ आहोत. देह-अभिमानामध्ये आल्याने उलटी कामे होतात म्हणून जितके शक्य आहे तितके देही-अभिमानी होऊन रहायचे आहे.

वरदान:-
सत्यतेच्या शक्तीद्वारे सदैव खुशीमध्ये नाचणारे शक्तिशाली महान आत्मा भव

असे म्हटले जाते “सच तो बिठो नच”. सच्चा अर्थात सत्यतेच्या शक्तीवाला सदैव नाचत राहील, कधी उदास होणार नाही, गोंधळणार नाही, घाबरणार नाही, दुबळा होणार नाही. तो आनंदामध्ये सदैव नाचत राहील. शक्तिशाली असेल. त्याच्यामध्ये सामना करण्याची शक्ती असेल, सत्यता कधी डगमगत नाही, अचल असते. सत्याची नाव डुलते परंतु बुडत नाही. तर सत्यतेची शक्ती धारण करणारी आत्माच महान आहे.

बोधवाक्य:-
व्यस्त मन-बुद्धीला सेकंदामध्ये स्टॉप करणे हाच सर्वश्रेष्ठ अभ्यास आहे.