10-08-25    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   31.10.2006  ओम शान्ति   मधुबन


“सदैव स्नेही बनण्यासोबत अखंड महादानी बनाल तर विघ्न-विनाशक, समाधान स्वरूप बनाल”


आज प्रेमाचे सागर आपल्या परमात्म प्रेमाला पात्र असणाऱ्या मुलांना भेटण्यासाठी आले आहेत. तुम्ही देखील सर्व स्नेहाच्या अलौकिक विमानाने इथे पोहोचला आहात ना! साधारण विमानातून आला आहात का स्नेहाच्या विमानातून उडत येऊन पोहोचला आहात? सर्वांच्या हृदयामध्ये स्नेहाच्या लाटा तरंगत आहेत आणि स्नेहच या ब्राह्मण जीवनाचे फाऊंडेशन आहे. तर तुम्ही सर्व जेव्हा आलात तर स्नेहाने आकर्षित केले ना! ज्ञान तर नंतर ऐकले, परंतु स्नेहाने परमात्म स्नेही बनवले. कधी स्वप्नात देखील नसेल की आम्ही परमात्म स्नेहाचे पात्र बनू. परंतु आता काय म्हणता? बनलो. स्नेह देखील काही साधारण स्नेह नाही, अंतःकरणपूर्वक स्नेह. आत्मिक स्नेह आहे, खरा स्नेह आहे, नि:स्वार्थ स्नेह आहे. हा परमात्म स्नेह अतिशय सहज आठवणीचा अनुभव करवितो. स्नेह्याला आठवण करणे अवघड नसते, विसरणे कठीण असते. स्नेह एक अलौकिक चुंबक आहे. स्नेह सहज योगी बनवतो, मेहनत करण्यापासून सोडवतो. स्नेहामुळे आठवण करण्यासाठी मेहनत करावी लागत नाही. प्रेमाचे फळ खाता. स्नेहाची निशाणी विशेष चोहो बाजूंची मुले तर आहेतच परंतु डबल विदेशी स्नेहामध्ये धावत-पळत पोहोचले आहेत. पहा, ९० देशातून कसे धावत पोहोचले आहेत! देशातील मुले तर प्रभू प्रेमाचे पात्र आहेतच, परंतु आज विशेष डबल विदेशींना गोल्डन चान्स आहे. तुम्हा सर्वांचे देखील विशेष प्रेम आहे ना! स्नेह आहे ना! किती स्नेह आहे? कोणाशी तुलना करू शकता का? कशाशीच तुलना होऊ शकत नाही. तुम्हा सर्वांचे एक गाणे आहे ना - ‘न आसमान में इतने तारे हैं, ना सागर में इतना जल हैं…’ बेहदचे प्रेम, बेहदचा स्नेह आहे.

बापदादा सुद्धा स्नेही मुलांना भेटण्यासाठी पोहोचले आहेत. तुम्हा सर्व मुलांनी स्नेहाने आठवण केली आणि बापदादा तुमच्या प्रेमामध्ये पोहोचले आहेत. जसे यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्नेहाची रेषा चमकत आहे. असेच आता अजून एक ॲडिशन कोणते करायचे आहे? स्नेह तर आहे, हे तर पक्के आहे. बापदादा सुद्धा सर्टिफिकेट देतात की स्नेह आहे. आता काय करायचे आहे? समजले तर आहे. आता केवळ अंडरलाइन करायची आहे - सदैव स्नेही रहायचे आहे, सदैव. समटाइम (कधीतरी) नको. स्नेह आहे अतूट परंतु पर्सेंटेज मध्ये अंतर पडते. मग हे अंतर संपविण्यासाठी कोणता मंत्र आहे? निरंतर महादानी, अखंडदानी बना. सदैव दात्याची मुले विश्व सेवाधारी समान. कोणत्याही वेळी मास्टर दाता बनल्याशिवाय राहू नका कारण विश्व कल्याणाच्या कार्याप्रती बाबांसोबतच तुम्ही देखील मदतगार बनण्याचा संकल्प केला आहे. भले मग मनसाद्वारे शक्तींचे दान किंवा सहयोग द्या. वाचे द्वारे ज्ञानाचे दान द्या, सहयोग द्या. कर्माद्वारे गुणांचे दान द्या आणि स्नेह संपर्काद्वारे आनंदाचे दान द्या. किती अखंड खजिन्यांचे मालक, रिचेस्ट इन दी वर्ल्ड आहात. अखूट आणि अखंड खजिने आहेत. जितके द्याल तितके वाढत जातात. कमी होत नाहीत, वाढतील कारण वर्तमान समयी मेजॉरिटी तुम्हा सर्वांचे आत्मिक भाऊ आणि बहिणी या खजिन्यांचे तहानलेले आहेत. तर काय आपल्या भाऊ-बहिणींवर दया येत नाही! काय तहानलेल्या आत्म्यांची तहान भागवणार नाही? कानावर आवाज येत नाही “हे आमचे देव-देवी आम्हाला शक्ती द्या, खरे प्रेम द्या”, तुमचे भक्त आणि दुःखी आत्मे दोघेही - ‘दया करा, कृपा करा, हे कृपेचे देव आणि देवी’ असे म्हणत आक्रोश करत आहेत. काळाची हाक ऐकू येते आहे ना! आणि देण्याची वेळ देखील आता आहे. नंतर कधी देणार? इतके अखूट अखंड खजिने जे तुमच्यापाशी जमा आहेत, तर देणार कधी? काय शेवटच्या वेळी, अंतिम वेळेला देणार? त्यावेळी केवळ ओंजळभर देऊ शकाल. तर तुमचे जमा झालेले खजिने कधी कार्यामध्ये लावणार? चेक करा - प्रत्येक वेळी कोणता ना कोणता खजिना सफल करत आहे! यामध्ये डबल फायदा आहे, खजिन्याला सफल केल्याने आत्म्यांचे सुद्धा कल्याण होईल आणि त्याच सोबत तुम्ही देखील सर्व महादानी बनल्याकारणाने विघ्न-विनाशक, समस्या स्वरूप नाही, समाधान स्वरूप सहज बनाल. डबल फायदा आहे. आज हा आला, उद्या तो आला, आज असे झाले, उद्या तसे झाले. सदाकाळासाठी विघ्नमुक्त, समस्यामुक्त बनाल. जो समस्येच्या मागे वेळ देता, मेहनत देखील करता, कधी उदास होता, कधी उल्हासामध्ये येता, त्यापासून वाचाल कारण बापदादांना देखील मुलांनी मेहनत केलेली आवडत नाही. जेव्हा बापदादा बघतात, मुले मेहनत करत आहेत, तर मुलांची मेहनत बाबांना बघवत नाही. तर मेहनत मुक्त. पुरुषार्थ करायचा आहे परंतु कोणता पुरुषार्थ? काय अजूनही आपल्या छोट्या-छोट्या समस्यांमध्ये पुरुषार्थी होऊन रहाणार! आता पुरुषार्थ करा अखंड महादानी, अखंड सहयोगी. ब्राह्मणांमध्ये सहयोगी बना आणि दुःखी आत्म्यांसाठी, तहानलेल्या आत्म्यांसाठी महादानी बना. आता या पुरुषार्थाची गरज आहे. पसंत आहे ना! पसंत आहे? मागे बसलेले पसंत आहे! तर आता काही चेंज सुद्धा करायला हवा ना, तोच पुरुषार्थ स्वयं प्रति खूप वेळ केलात. कसे काय पांडव! पसंत आहे? तर उद्यापासून काय करणार? उद्यापासून सुरु करणार की आतापासून? आतापासून संकल्प करा - माझा वेळ, संकल्प विश्वाच्या सेवेप्रती आहे. यामध्ये स्वतःचे ऑटोमॅटिकच होऊन जाते, राहणार नाही, वाढेल. असे का? कोणालाही तुम्ही त्यांच्या आशा पूर्ण कराल, दुःखाऐवजी सुख द्याल, निर्बल आत्म्यांना शक्ती द्याल, गुण द्याल, तर ते किती आशीर्वाद देतील. आणि सर्वांकडून आशीर्वाद घेणे हेच पुढे जाण्याचे सर्वात सहज साधन आहे. भले मग भाषण नाही केले, जास्त प्रोग्राम करू शकत नसाल, काही हरकत नाही, करू शकत असाल तर अजून करा. परंतु नाही जरी करू शकत असाल तरीही काही हरकत नाही, खजिन्यांना सफल करा. सांगितले ना - मनसाद्वारे शक्तींचा खजिना देत जा. वाणीद्वारे ज्ञानाचा खजिना, कर्माद्वारे गुणांचा खजिना आणि बुद्धीद्वारे वेळेचा खजिना, संबंध-संपर्काद्वारे आनंदाचा खजिना सफल करा. तर सफल केल्यामुळे सहज सफलता मूर्त बनालच. सहज उडत रहाल कारण आशीर्वाद एका लिफ्टचे काम करतात, शिडीचे नाही. समस्या आली, संपवले, कधी दोन दिवस लावले, कधी दोन तास लावले, हे शिडी चढणे आहे. सफल करा, सफलता मूर्त बना, तर आशीर्वादांच्या लिफ्टने जिथे पाहिजे तिथे सेकंदामध्ये पोहोचाल. भले सूक्ष्मवतन मध्ये पोहोचा, भले परमधाम मध्ये पोहोचा, भले आपल्या राज्यामध्ये पोहोचा, सेकंदामध्ये. लंडनमध्ये प्रोग्राम केला होता ना - ‘वन मिनिट’. बापदादा तर म्हणतात - ‘वन सेकंद’. एका सेकंदामध्ये आशीर्वादांच्या लिफ्टमध्ये चढा. फक्त स्मृतीचा स्विच दाबा, बस्स, मेहनत मुक्त.

आज डबल विदेशींचा दिवस आहे ना तर बापदादा सर्वप्रथम डबल विदेशींना कोणत्या स्वरूपामध्ये पाहू इच्छितात? मेहनत मुक्त, सफलता मूर्त, आशीर्वादांचे पात्र. बनणार ना? कारण की डबल विदेशींचे बाबांवर प्रेम चांगले आहे, शक्ति हवी आहे परंतु प्रेम चांगले आहे. कमाल तर केली आहे ना? बघा ९० देशांमधून वेगवेगळे देश, वेगवेगळ्या चाली-रिती परंतु ५ ही खंडांवाले एक चंदनाचा वृक्ष बनले आहेत. एका वृक्षाखाली आले आहेत. एकच ब्राह्मण कल्चर झाले, आता इंग्लिश कल्चर आहे काय? आमचे कल्चर इंग्लिश आहे… असे तर नाही ना! ब्राह्मण आहे ना? जे समजतात आता तर आमचे ब्राह्मण कल्चर आहे त्यांनी हात वर करा. ब्राह्मण कल्चर दुसरे ॲडिशन नाही. एक झाला आहात ना! बापदादा याची मुबारक देत आहेत की सर्व एकाच वृक्षाचा भाग बनले. किती छान वाटत आहे! कोणालाही विचारा, अमेरिकेला विचारा, युरोपला विचारा, तुम्ही कोण आहात? तर काय म्हणतील? ब्राह्मण आहात ना! की असे म्हणाल यू. के. चे आहोत, आफ्रिकन आहोत, अमेरिकन नाही आहोत; सर्वजण एक ब्राह्मण झालात, एका मताचे झालात, एका स्वरूपाचे झालात. ब्राह्मण आणि एक मत श्रीमत. यामध्ये मजा वाटते ना! मजा वाटते की मुश्किल वाटते? मुश्किल तर नाही आहे ना! मान हलवत आहेत, चांगले आहे.

बापदादांना सेवेमध्ये कोणती नवीनता हवी आहे? जी काही सेवा करत आहात - खूप-खूप-खूप छान करत आहात, त्याची तर मुबारक आहेच. परंतु पुढे ॲडिशन काय करायची आहे? तुम्हा लोकांच्या मनामध्ये आहे ना काही नवीनता पाहीजे. तर बापदादांनी पाहीले, जे काही प्रोग्राम केले आहेत, वेळ देखील दिला आहे, आणि प्रेमानेच केले आहे, मेहनत देखील प्रेमानेच केली आहे आणि जर स्थूल धन जरी लावले असेल तर ते तर पद्मगुणा होऊन तुमच्या परमात्म बँकेमध्ये जमा झाले आहे. ते लावले काय, जमा केले आहे. रिझल्टमध्ये बघितले गेले की संदेश पोहोचवण्याचे कार्य, परिचय देण्याचे कार्य सर्वांनी खूप छान केले आहे. भले कुठेही केले, आता दिल्लीमध्ये होत आहे, लंडनमध्ये झाले आणि डबल फॉरेनर्स जो कॉल ऑफ टाइम आणि ‘पीस ऑफ माईंड’चा प्रोग्राम करतात, ते सर्व प्रोग्राम बापदादांना खूप छान वाटतात. अजून जे काही काम करू शकता करत रहा. संदेश तर मिळतो, स्नेही देखील बनतात, सहयोगी देखील बनतात, संबंधामध्ये देखील कोणी-कोणी येतात परंतु आता ॲडिशन पाहीजे - जेव्हा पण कोणता मोठा प्रोग्राम करता त्यामध्ये संदेश तर मिळतो, परंतु काही अनुभव करून जावे, हा अनुभव खूप लवकर पुढे घेऊन जातो. जसे या कॉल ऑफ टाइममध्ये किंवा पीस ऑफ माईंडमध्ये थोडा जास्त अनुभव करतात. परंतु जे मोठे प्रोग्राम होतात त्यामध्ये संदेश तर चांगला मिळतो, परंतु जे कोणी येतील त्यांचा पाठपुरावा करून अनुभव करविण्याचे लक्ष्य ठेवा, त्याला काही ना काही अनुभव व्हावा, कारण अनुभव कधी विसरला जात नाही आणि अनुभव अशी गोष्ट आहे जी इच्छा नसताना देखील त्या बाजूला आकर्षित करेल. तर बापदादा विचारत आहेत - पहिले जे सर्व ब्राह्मण आहेत, त्यांनी ज्ञानाचे जे काही पॉईंट्स आहेत, त्याचे स्वतः अनुभवी बनला आहात? प्रत्येक शक्तीचा अनुभव केला आहे, प्रत्येक गुणाचा अनुभव केला आहे? आत्मिक स्थितीचा अनुभव केला आहे? परमात्म प्रेमाचा अनुभव केला आहे? ज्ञान समजून घेणे यामध्ये तर पास आहात, नॉलेजफुल तर बनला आहात, यामध्ये तर बापदादा देखील रिमार्क देतात, चांगले आहे. आत्मा काय, परमात्मा काय, ड्रामा काय, ज्ञान तर समजून घेतले आहे, परंतु जेव्हा पाहीजे जितका वेळ पाहीजे, ज्यापण परिस्थितीमध्ये आहात, त्या परिस्थितीमध्ये आत्मिक बळाचा अनुभव व्हावा, परमात्म शक्तीचा अनुभव व्हावा, तो होतो का? ज्या वेळी, जितका वेळ, जसा अनुभव करू इच्छिता तसा होतो का? की कधी कसे, कधी कसे? विचार कराल - आत्मा आहे, आणि मग पुन्हा-पुन्हा देहभान आले, तर अनुभव काय कामाला आला? अनुभवी मूर्त प्रत्येक सब्जेक्टचे अनुभवी मूर्त, प्रत्येक शक्तीचे अनुभवी मूर्त. तर स्वतः मध्ये सुद्धा अनुभवाला आणखी वाढवा. आहे, असे नाही की अनुभव नाहीये, परंतु कधी-कधीचा आहे, समटाइम. तर बापदादांना समटाइम (कधी-कधी) नको आहे, समथिंग (थोडेसे) होऊन जाते, तर समटाइम सुद्धा होते कारण तुम्हा सर्वांचे लक्ष्य आहे, विचारले की काय बनायचे लक्ष्य आहे? तर म्हणता - बाप समान. सर्वजण एकच उत्तर देता. तर बाप समान, आता बाबा तर समटाइम आणि समथिंग नव्हते, ब्रह्मा बाबा सदैव राजयुक्त, योगयुक्त, प्रत्येक शक्तीमध्ये सदैव, कधी-कधी नव्हते. अनुभव जो असतो, तो कायमसाठी राहतो, तो समटाइम (कधी-कधी) नसतो. तर स्वतः अनुभवी मूर्त बनून प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक सब्जेक्ट मध्ये अनुभवी, ज्ञान स्वरूपामध्ये अनुभवी, योगयुक्त मध्ये अनुभवी, धारणा स्वरूप मध्ये अनुभवी. ऑलराऊंड सेवा मनसा, वाचा, कर्मणा, संबंध-संपर्क सर्वांमध्ये अनुभवी, तेव्हा म्हटले जाईल पास विद ऑनर. तर काय बनू इच्छिता? पास होऊ इच्छिता की पास विद ऑनर बनू इच्छिता? पास होणारे तर मागाहून सुद्धा येतील, तुम्ही तर टूलेट च्या अगोदर आला आहात, भले आता नवीन सुद्धा आले आहेत परंतु टूलेट चा बोर्ड लागलेला नाहीये. लेट चा लागला आहे, टूलेट चा लागलेला नाहीये. त्यामुळे भले कोणी नवीन सुद्धा आहेत परंतु अजूनही तीव्र पुरुषार्थ करा, केवळ पुरुषार्थ नाही तर तीव्र पुरुषार्थ, तेव्हाच पुढे जाऊ शकता कारण अजून नंबर आऊट झालेला नाहीये. केवळ दोन नंबर आऊट झाले आहेत, बाबा आणि मम्मा. अजून कोणत्याही भाऊ-बहीणीचा तिसरा नंबर आऊट झालेला नाहीये. भले तुम्ही म्हणाल दादींवर खूप प्रेम आहे, बाबांचे सुद्धा दादींवर प्रेम आहे, परंतु नंबर आऊट झालेला नाहीये. म्हणून तुम्ही खूप-खूप सिकीलधे, लाडके भाग्यवान आहात, जितके उडू इच्छिता तितके उड़ा कारण पहा, जी छोटी मुले असतात ना त्यांना वडील आपले बोट देऊन चालवतात, जास्त प्रेम करतात, आणि मोठ्याला बोट धरून चालवत नाहीत, तो आपल्या पायाने चालतो. तर कोणी नवीन देखील मेकअप करू शकतो (गॅप भरून काढू शकतो). गोल्डन चान्स आहे. परंतु लवकरात लवकर टू लेट चा बोर्ड लागणार आहे, म्हणून त्याच्या अगोदरच करा. नवीन जे पहिल्यांदा आले आहेत, त्यांनी हात वर करा. अच्छा. मुबारक असो. पहिल्यांदा आपल्या घरी मधुबनमध्ये पोहोचला आहात, म्हणून बापदादा आणि संपूर्ण परिवार मग देशातील असोत, किंवा विदेशातील असो सर्वांतर्फे पद्म-पद्मपटीने मुबारक असो. अच्छा - आता सेकंदामध्ये ज्या स्थितीमध्ये बापदादा डायरेक्शन देतील त्याच स्थितीमध्ये सेकंदामध्ये पोहोचू शकता! की पुरुषार्थामध्ये वेळ जाईल? आता प्रॅक्टिस हवी सेकंदाची कारण पुढे जो फायनल वेळ येणार आहे, ज्यामध्ये पास विद ऑनरचे सर्टिफिकेट मिळणार आहे, त्याचा अभ्यास आतापासून करायचा आहे. सेकंदामध्ये जिथे पाहिजे, जी स्थिती पाहिजे त्या स्थितीमध्ये स्थित व्हावे. तर एवररेडी. रेडी झालात.

आता पहिले एका सेकंदामध्ये पुरुषोत्तम संगमयुगी श्रेष्ठ ब्राह्मण आहे, या स्थितीमध्ये स्थित व्हा… आता मी फरिश्ता रूप आहे, डबल लाइट आहे… आता विश्व कल्याणकारी बनून मनसा द्वारे चोहो बाजूला शक्तीची किरणे देण्याचा अनुभव करा. असे पूर्ण दिवसभरामध्ये सेकंदामध्ये स्थित होऊ शकता! याचा अनुभव करत रहा कारण अचानक काहीही होणार आहे. जास्त वेळ मिळणार नाही. हलचलमध्ये सेकंदामध्ये अचल बनू शकाल याचा अभ्यास आपणच आपला वेळ काढून मधून-मधून करत रहा. याने मनाचा कंट्रोल सहज होईल. कंट्रोलिंग पॉवर, रुलिंग पॉवर वाढत जाईल. अच्छा!

चोहो बाजूंच्या मुलांची पत्रे देखील खूप आली आहेत, अनुभव सुद्धा खूप आले आहेत, तर बापदादा मुलांना रिटर्नमध्ये हृदयापासून खूप-खूप आशीर्वाद आणि हृदयापासून पद्म-पद्मगुणा प्रेमपूर्वक आठवण देत आहेत. बापदादा बघत आहेत - चोहो बाजूची मुले ऐकत देखील आहेत, बघत सुद्धा आहेत. जे बघत नसतील जरी, ते देखील आठवणीमध्ये तर आहेत. सर्वांची बुद्धी यावेळी मधुबन मध्येच आहे. तर चोहो बाजूच्या प्रत्येक मुलाला नावासहित प्रेमपूर्वक आठवण स्वीकार व्हावी.

सर्व सदैव उमंग-उत्साहाच्या पंखाद्वारे उच्च स्थितीमध्ये उडत राहणाऱ्या श्रेष्ठ आत्म्यांना, सदैव स्नेहामध्ये लवलीन राहणाऱ्या एकरूप झालेल्या मुलांना, सदैव मेहनत मुक्त, समस्या मुक्त, विघ्न-मुक्त, योगयुक्त, राजयुक्त मुलांना, सदैव प्रत्येक परिस्थितीमध्ये सेकंदामध्ये पास होणाऱ्या, प्रत्येक वेळी सर्व शक्ती स्वरूप राहणाऱ्या मास्टर सर्वशक्तीवान मुलांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.

वरदान:-
गोल्डन एज्ड स्वभावाद्वारे गोल्डन एज्ड सेवा करणारे श्रेष्ठ पुरुषार्थी भव

ज्या मुलांच्या स्वभावामध्ये ईर्षा, सिद्ध आणि जिद्दचा भाव किंवा कोणत्याही जुन्या संस्कारांची अलॉय मिक्स नसेल तेच गोल्डन एज्ड स्वभाववाले आहेत. असा गोल्डन एज्ड स्वभाव आणि सदैव ‘हां जी’ चा संस्कार बनविणारी श्रेष्ठ पुरुषार्थी मुले जशी वेळ, जशी सेवा तसे स्वतःला मोल्ड करून रियल गोल्ड बनतात. सेवेमध्ये सुद्धा अभिमान किंवा अपमानाची अलॉय मिक्स नसावी तेव्हा म्हटले जाईल गोल्डन एज्ड सेवा करणारे.

सुविचार:-
‘का, काय’ या प्रश्नांना नष्ट करून सदैव प्रसन्नचित्त रहा.

अव्यक्त इशारे:- सहजयोगी बनायचे असेल तर परमात्म प्रेमाचे अनुभवी बना.

लवलीन स्थिती असणारे समान आत्मे निरंतर योगी आहेत. योग लावणारे नाहीत परंतु आहेतच लवलीन. वेगळेच नाहीत तर आठवण काय करणार! आठवण स्वतः आहेच. जिथे सोबत असते तिथे आठवण आपोआप येते. तर समान आत्म्यांची स्टेज सोबत राहण्याची आहे, सामावून (एकरूप होऊन) राहण्याची आहे.