10-09-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - बाबा जे तुम्हाला हिऱ्यासारखे बनवितात, त्यांच्याबद्दल कधीही संशय येता कामा नये, संशय-बुद्धी बनणे अर्थात आपलेच नुकसान करणे”

प्रश्न:-
मनुष्यापासून देवता बनण्याच्या शिक्षणामध्ये पास होण्याचा मुख्य आधार काय आहे?

उत्तर:-
निश्चय. निश्चय-बुद्धी बनण्याचे धाडस पाहिजे. माया या धाडसाला मोडून टाकते. संशय-बुद्धी बनवते. चालता-चालता जर शिक्षणामध्ये किंवा शिकविणाऱ्या सुप्रीम टीचर बद्दल संशय उत्पन्न झाला तर आपले आणि दुसऱ्यांचे खूप नुकसान करतात.

गीत:-
तू प्यार का सागर है…

ओम शांती।
रुहानी मुलांप्रती शिवबाबा समजावून सांगत आहेत, तुम्ही मुले बाबांची महिमा करता - ‘तू प्यार का सागर है’. त्यांना ज्ञानाचा सागर देखील म्हटले जाते. जर का ज्ञानाचा सागर एकच आहे तर मग बाकीच्यांना अज्ञानी म्हणणार कारण ज्ञान आणि अज्ञानाचा खेळ आहे. ज्ञान आहेच परमपिता परमात्म्याजवळ. या ज्ञानाद्वारे नवीन दुनियेची स्थापना होते. असे नाही की कोणती नवीन दुनिया बनवतात. दुनिया तर अविनाशी आहेच. फक्त जुन्या दुनियेला बदलून नवीन बनवितात. असे नाही की प्रलय होतो. संपूर्ण दुनियेचा कधी विनाश होत नाही. जी जुनी आहे ती बदलून नवीन बनत आहे. बाबांनी समजावून सांगितले आहे हे जुने घर आहे, ज्यामध्ये तुम्ही बसले आहात. जाणता आपण नवीन घरामध्ये जाणार. जशी जुनी दिल्ली आहे. आता जुनी दिल्ली नष्ट होणार आहे, त्याच्या बदल्यात आता नवीन बनणार आहे. आता नवीन कशी बनते? पहिले तर त्यामध्ये राहणारे लायक पाहिजेत. नवीन दुनियेमध्ये तर असतात सर्वगुण संपन्न… तुम्हा मुलांना हा एम ऑब्जेक्ट देखील आहे. पाठशाळेमध्ये एम ऑब्जेक्ट तर असते ना. शिकणारे जाणतात - मी सर्जन बनणार, बॅरिस्टर बनणार… इथे तुम्ही जाणता आपण आलो आहोत - मनुष्यापासून देवता बनण्यासाठी. पाठशाळेमध्ये एम ऑब्जेक्ट शिवाय तर कोणी बसू शकणार नाहीत. परंतु ही अशी वंडरफुल पाठशाळा आहे जिथे एम ऑब्जेक्ट माहित असताना, शिकत असताना देखील शिक्षणाला सोडून देतात. वाटते की, हे चुकीचे शिक्षण आहे. हे एम ऑब्जेक्ट नाहीच, असे कधी होऊ शकत नाही. शिकविणाऱ्यावर देखील संशय उत्पन्न होतो. त्या (लौकिक) शिक्षणामध्ये तर शिकू शकत नसतील अथवा पैसे नसतील, हिंमत नसेल तर शिक्षण सोडून देतात. असे तर म्हणणार नाही की बॅरिस्टरीचे नॉलेजच चुकीचे आहे, शिकविणारा चुकीचा आहे. इथे तर लोकांची वंडरफुल बुद्धी आहे. शिक्षणाविषयी संशय उत्पन्न होतो तर म्हणतात - ‘हे शिक्षणच चुकीचे आहे. भगवान शिकवतच नाहीत, बादशाही इत्यादी काही मिळत नाही… या सर्व थापा आहेत’. अशी देखील बरीच मुले शिकता-शिकता मग सोडून देतात. सर्वजण विचारतील - ‘तुम्ही तर म्हणत होता आम्हाला भगवान शिकवत आहेत, ज्यामुळे मनुष्यापासून देवता बनतो मग असे काय झाले?’ नाही, नाही त्या तर सर्व थापा होत्या. म्हणतात हे एम ऑब्जेक्ट आम्हाला कळत नाही. असे कितीतरी आहेत जे निश्चयाने शिकत होते आणि मग संशय आल्यामुळे शिक्षण सोडून दिले. निश्चय कसा झाला आणि मग संशय-बुद्धी कोणी बनवले? तुम्ही म्हणाल हे जर शिकले असते तर खूप उच्च पद मिळवू शकले असते. खूप शिकत राहतात. बॅरिस्टरी शिकता-शिकता अर्ध्यावरून सोडून देतात, बाकीचे तर शिकून बॅरिस्टर बनतात. कोणी शिकून पास होतात, कोणी नापास होतात. मग कोणते ना कोणते कमी पद मिळवतात. ही तर खूप मोठी परीक्षा आहे. यामध्ये खूप मोठे धाडस पाहिजे. एक तर निश्चय-बुद्धी असण्यामध्ये धाडस पाहिजे. माया अशी आहे आता-आता निश्चय तर आता-आता संशय-बुद्धी बनवते. शिकण्यासाठी भरपूर येतात परंतु डल-बुद्धी आहेत, नंबरवार पास होतात ना. वर्तमानपत्रामध्ये देखील लिस्ट छापून येते. इथे देखील असेच आहे, शिकण्यासाठी खूपजण येतात. कोणी चांगली-बुद्धी असणारे आहेत, कोणी डल-बुद्धी आहेत. डल-बुद्धी होत-होत मग कोणत्या ना कोणत्या संशयामध्ये येऊन सोडून जातात. मग इतरांचे देखील नुकसान करतात. संशय-बुद्धी विनशन्ती म्हटले जाते. ते उच्च पद प्राप्त करू शकत नाहीत. निश्चय देखील आहे परंतु नीट अभ्यास करत नसतील तर थोडेच पास होतील कारण बुद्धी काहीच कामाची नाहीये. धारणा होत नाही. आपण आत्मा आहोत हे विसरून जातात. बाबा म्हणतात - मी तुम्हा आत्म्यांचा परमपिता आहे. तुम्ही मुले जाणता की बाबा आलेले आहेत. कोणाला खूप विघ्ने येतात तर त्यांना संशय येतो, मग म्हणतात - आम्हाला अमक्या ब्राह्मणीवर निश्चय बसत नाही. अरे, ब्राह्मणी कशीही असो तुम्हाला शिकले तर पाहिजे ना. टीचर चांगले शिकवत नसतील तर विचार करतात की, यांना शिकवण्या पासून दूर करावे. परंतु तुम्हाला तर शिकायचे आहे ना. हे शिक्षण आहे बाबांचे. शिकविणारे ते सुप्रीम टीचर आहेत. ब्राह्मणी देखील त्यांचे नॉलेज ऐकविते तर मग अटेंशन अभ्यासावर असले पाहिजे ना. अभ्यासाशिवाय परीक्षा पास होऊ शकणार नाही. परंतु बाबांवरील निश्चयच मोडून पडतो तर मग शिक्षणच सोडून देतात. शिकता-शिकता टीचर विषयीच संशय उत्पन्न होतो की यांच्याद्वारे हे पद मिळेल की नाही आणि मग सोडून देतात. दुसऱ्यांना देखील खराब करतात, निंदा केल्यामुळे अजूनच नुकसान करतात. खूप तोटा होतो. बाबा म्हणतात की, इथे जर कोणी पाप करतील तर त्यांना शंभर पटीने दंड भोगावा लागतो. अनेकांना खराब करण्यासाठी एक कोणीतरी निमित्त बनतो. तर जेवढा काही पुण्य आत्मा बनला तेवढा मग पाप आत्मा बनतो. पुण्य आत्मा बनतातच या शिक्षणाद्वारे आणि पुण्य आत्मा बनविणारे एक बाबाच आहेत. जर कोणी शिकू शकत नसतील तर ज़रूर कोणतीतरी खराबी आहे. बस्स, म्हणतात की, ‘नशिबच असे, मी तरी काय करणार’. जणूकाही हार्ट फेल होतात. तर जे इथे येऊन मरजीवा बनतात, ते मग पुन्हा रावण राज्यामध्ये जाऊन मरजीवा बनतात. हिऱ्यासारखे जीवन बनवू शकत नाहीत. मनुष्य हार्ट फेल होतात तर जाऊन दुसरा जन्म घेतील. इथे हार्ट फेल होतात तर आसुरी संप्रदायामध्ये निघून जातात. हा आहे मरजीवा जन्म. नवीन दुनियेमध्ये जाण्यासाठी बाबांचे बनतात. आत्मे जातील ना. मी आत्मा आहे, असे या शरीराचे भान सोडून देऊ तर समजतील की हे देह-अभिमानी आहेत. ‘मी’ वेगळी गोष्ट आहे, ‘शरीर’ वेगळी गोष्ट आहे. एक शरीर सोडून दुसरे घेतो तर जरूर वेगळी गोष्ट झाली ना, तुम्ही समजता आपण आत्मे श्रीमतावर या भारतामध्ये स्वर्गाची स्थापना करत आहोत. ही मनुष्याला देवता बनविण्याची कला शिकायची असते. हे देखील मुलांना समजावून सांगितले आहे, कोणताही सत्संग नाहीये. सत्य तर एक परमात्म्यालाच म्हटले जाते. त्यांचे नाव आहे शिव, तेच सतयुगाची स्थापना करतात. कलियुगाचे आयुष्य जरूर पूर्ण होणार आहे. साऱ्या दुनियेचे चक्र कसे फिरते, हे गोळ्याच्या चित्रामध्ये क्लिअर आहे. देवता बनण्यासाठी संगमयुगावर बाबांचे बनतात. बाबांना सोडाल तर मग परत कलियुगामध्ये निघून जाल. ब्राह्मण असताना जर संशय आला तर मग शूद्र घराण्यामध्ये जाऊन जन्म घ्याल. आणि मग देवता बनू शकणार नाही.

बाबा हे देखील समजावून सांगत आहेत की, कसे आता स्वर्गाच्या स्थापनेचे फाउंडेशन पडत आहे. फाउंडेशनची सेरेमनी आणि मग ओपनिंगची देखील सेरेमनी असते. इथे तर आहे गुप्त. तुम्ही जाणता आपण स्वर्गासाठी तयार होत आहोत. नंतर मग नरकाचे नावही राहणार नाही. शेवटपर्यत जिथे जगायचे आहे, शिकायचे आहे जरूर. पतित-पावन एकच बाबा आहेत जे पावन बनवतात.

आता तुम्ही मुले समजता हे आहे संगमयुग, जेव्हा बाबा पावन बनविण्यासाठी येतात. लिहायचे देखील आहे पुरुषोत्तम संगमयुगामध्ये नरापासून नारायण बनतात. हे देखील लिहिलेले आहे - हा तुमचा ईश्वरीय जन्मसिद्ध अधिकार आहे. बाबा आता तुम्हाला दिव्य दृष्टी देत आहेत. आत्मा जाणते आपले ८४ चे चक्र आता पूर्ण झाले आहे. आत्म्यांना बाबा बसून समजावून सांगतात. आत्मा शिकते भले देह-अभिमान पुन्हा-पुन्हा येईलसुद्धा कारण अर्ध्या-कल्पाचा देह-अभिमान आहे ना. तर देही-अभिमानी बनण्यामध्ये वेळ लागतो. बाबा बसले आहेत, वेळ मिळालेला आहे. भले ब्रह्माचे आयुष्य १०० वर्षे म्हणतात किंवा कमी देखील असेल. समजा ब्रह्मा निघून गेले, परंतु असे तर नाही की, स्थापना होणार नाही. तुम्ही सेना तर बसला आहात ना. बाबांनी मंत्र दिलेला आहे, शिकायचे आहे. सृष्टीचे चक्र कसे फिरते, हे देखील बुद्धीमध्ये आहे. आठवणीच्या यात्रेवर रहायचे आहे. आठवणीनेच विकर्म विनाश होतील. भक्ती मार्गामध्ये सर्वांकडून विकर्म झालेली आहेत. जुनी दुनिया आणि नवीन दुनिया दोन्हीचे गोळे तुमच्यासमोर आहेत. तर तुम्ही लिहू शकता जुनी दुनिया रावण राज्य मुर्दाबाद, नवीन दुनिया ज्ञान मार्ग रामराज्य जिंदाबाद. जे पूज्य होते तेच पुजारी बनले आहेत. श्रीकृष्ण देखील पूज्य गोरा होता मग रावण राज्यामध्ये पुजारी सावळा बनतो. हे समजावून सांगणे तर सोपे आहे. सर्वात आधी जेव्हा पूजेची सुरुवात होते तेव्हा मोठ्या-मोठ्या हिऱ्याचे लिंग बनवतात, सर्वात मौल्यवान असते कारण बाबांनी इतके श्रीमंत बनवले आहे ना. ते स्वतःच हिरा आहेत, तर आत्म्यांना देखील हिऱ्यासारखे बनवतात, मग त्यांना हिरा बनवून ठेवले पाहिजे ना. हिरा नेहमी मध्यभागी असतो. पुखराज इत्यादी सोबत तर त्यांची किंमत राहणार नाही म्हणून हिऱ्याला मध्यभागी ठेवले जाते. यांच्या द्वारे ८ रत्न विजयी माळेचे मणी बनतात, सर्वात जास्त किंमत असते हिऱ्याची. बाकी तर नंबरवार बनतात. बनवतात शिवबाबा, या सर्व गोष्टी बाबांशिवाय इतर कोणीही समजावून सांगू शकणार नाही. शिकता-शिकता आश्चर्यवत् बाबा-बाबा कहन्ती आणि मग निघून जातात. शिवबाबांना बाबा म्हणतात, तर त्यांना कधीही सोडता कामा नये. मग म्हटले जाते नशीब. कोणाच्या नशिबात जास्त नसेल तर मग कर्मच असे करतात त्यामुळे शंभर पटीने दंड चढतो. पुण्य आत्मा बनण्यासाठी पुरुषार्थ करून आणि मग पाप केल्यामुळे शंभर पटीने पाप होते आणि मग जामडे (थिटेच) राहतात, वृद्धी होऊ शकत नाही. शंभर पटीने दंडाची भर पडल्यामुळे अवस्था जोर भरत नाही. बाबा, ज्यांच्याद्वारे तुम्ही हिऱ्यासारखे बनता त्यांच्यावर संशय का आला पाहिजे. कोणत्याही कारणाने बाबांना सोडले तर कंबख्त (दुर्दैवी) म्हणणार. कुठेही राहून बाबांची आठवण करायची आहे, तर सजेपासून वाचाल. इथे तुम्ही येताच मुळी पतितापासून पावन बनण्याकरिता. पास्टमध्ये देखील अशी काही कर्म केलेली असतील तर शरीराचे सुद्धा किती कर्मभोग चालतात. आता तुमची तर अर्ध्या कल्पासाठी यातून सुटका होते. स्वतःला बघायचे आहे आपण आपली कितपत उन्नती करतो, इतरांची सेवा करतो? लक्ष्मी-नारायणाच्या चित्रावर देखील वरच्याबाजूला लिहू शकता की, ही आहे विश्वामध्ये शांतीची राजाई, जी आता स्थापन होत आहे. हे आहे एम ऑब्जेक्ट. तिथे १०० टक्के पवित्रता, सुख-शांती आहे. यांच्या राज्यामध्ये दुसरा कोणताही धर्म असत नाही. तर आता इतके जे धर्म आहेत त्यांचा विनाश जरूर होईल ना. समजावून सांगण्यासाठी चांगली-बुद्धी पाहिजे. नाही तर आपल्या अवस्थेनुसारच समजावून सांगतात. चित्रांच्या समोर बसून विचार चालले पाहिजेत. स्पष्टीकरण तर मिळालेले आहे. समजत आहे तर मग समजावून सांगायचे आहे म्हणून बाबा म्युझियम उघडत राहतात. ‘गेट वे टू हेवन’, हे नाव देखील चांगले आहे. ते आहे दिल्ली गेट, इंडिया गेट. हे मग आहे स्वर्गाचे गेट. तुम्ही आता स्वर्गाचे गेट उघडत आहात. भक्ती मार्गामध्ये असे गोंधळून जातात जसे की भूल-भुलैयामध्ये गोंधळतात. कोणालाच रस्ता सापडत नाही. सगळेच आतमध्ये अडकून पडतात - मायेच्या राज्यामध्ये. मग बाबा येऊन बाहेर काढतात. कोणाला मग बाहेर पडण्याची इच्छा होत नाही तर बाबा तरी काय करतील म्हणून बाबा म्हणतात - महान कंबख्त (मोठ्यात मोठा दुर्दैवी) सुद्धा इथेच बघा, जे शिक्षणाला सोडून देतात. संशय-बुद्धी बनून जन्म-जन्मांतरासाठी आपलाच खून करतात. नशीब बिघडते तेव्हा मग असे होते. गृहचारी बसल्यामुळे गोरा बनण्याऐवजी काळे बनतात. गुप्त आत्मा शिकते, आत्माच शरीराद्वारे सर्वकाही करते, आत्मा शरीराशिवाय तर काही करू शकत नाही. स्वतःला आत्मा समजणे हीच खरी मेहनत आहे. आत्मा निश्चय करू शकत नाहीत तर मग देह-अभिमानामध्ये येतात, अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) सुप्रीम टिचरचे शिक्षण आपल्याला नरापासून नारायण बनविणारे आहे, याच निश्चयाने अटेंशन देऊन शिक्षण शिकायचे आहे. शिकविणाऱ्या टीचरला बघायचे नाही.

२) देही-अभिमानी बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे, मरजीवा बनले आहात तर या शरीराच्या भानाला सोडून द्यायचे आहे. पुण्य आत्मा बनायचे आहे, कोणतेही पाप कर्म करायचे नाही.

वरदान:-
स्वदर्शन चक्राच्या स्मृतीद्वारे सदा संपन्न स्थितिचा अनुभव करणारे मालामाल भव

जे सदैव स्वदर्शन चक्रधारी आहेत ते मायेच्या अनेक प्रकारच्या चक्रांपासून (फेऱ्यांपासून) मुक्त राहतात. एक स्वदर्शन चक्र अनेक व्यर्थ चक्रांना नष्ट करणारे आहे, मायेला पळवून लावणारे आहे. त्याच्यासमोर माया टिकू शकत नाही. स्वदर्शन चक्रधारी मुले सदैव संपन्न असल्याकारणाने अचल राहतात. स्वतःला मालामाल अनुभव करतात. माया रिकामे करण्याचा प्रयत्न करते परंतु ते सदा सतर्क, जागृत, जागती ज्योत होऊन राहतात त्यामुळे माया काहीही करू शकत नाही. ज्यांच्याकडे अटेंशन रुपी चौकीदार जागरूक आहे ते नेहमी सेफ आहेत.

बोधवाक्य:-
तुमचे बोल असे समर्थ असावेत ज्यामध्ये शुभ आणि श्रेष्ठ भावना सामावलेली असावी.

अव्यक्त इशारे:- आता लगनच्या (उत्कटतेच्या) अग्नीला प्रज्वलित करून योगाला ज्वाला रूपी बनवा. पॉवरफुल आठवणीसाठी सच्च्या अंतःकरणाचे प्रेम पाहिजे. सच्चे अंतःकरण असणारे सेकंदामध्ये बिंदू बनून बिंदू स्वरूप बाबांची आठवण करू शकतात. सच्चे अंतःकरण असणारे सत्य साहेबांना राजी केल्यामुळे, बाबांचे विशेष आशीर्वाद प्राप्त करतात, ज्यामुळे सहजच एका संकल्पामध्ये स्थित होऊन ज्वाला रूपातील आठवणीचा अनुभव करू शकतात, पॉवरफुल व्हायब्रेशन पसरवू शकतात.