10-10-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो - तुम्हाला एका बाबांकडून एक मत मिळते, ज्याला अद्वैत मत म्हणतात, याच
अद्वैत मताद्वारे तुम्हाला देवता बनायचे आहे."
प्रश्न:-
मनुष्य या
भूल-भुलैयाच्या खेळामध्ये कोणती सर्वात मुख्य गोष्ट विसरले आहेत?
उत्तर:-
आपले घर कुठे आहे, त्याचा रस्ताच या खेळामध्ये येऊन विसरून गेले आहेत. माहीतच नाहीये
की घरी केव्हा जायचे आहे आणि कसे जायचे आहे. आता बाबा आले आहेत तुम्हा सर्वांना
सोबत घेऊन जाण्यासाठी. आता तुमचा पुरुषार्थ आहे वाणी पासून परे (दूर) स्वीट होममध्ये
जाण्याचा.
गीत:-
रात के राही
थक मत जाना...
ओम शांती।
गाण्याचा अर्थ ड्रामा प्लॅन अनुसार इतर कोणीही समजू शकणार नाही. लोकांनी काही-काही
गाणी अशी बनवलेली आहेत, जी तुम्हाला मदत करतात. मुले समजतात आता आपण सो देवी-देवता
बनत आहोत. जसे ते शिक्षण घेणारे म्हणतील आम्ही डॉक्टर, बॅरिस्टर बनत आहोत. तुमच्या
बुद्धीमध्ये आहे - नव्या दुनियेसाठी हम सो देवता बनत आहोत. हा विचार फक्त तुम्हालाच
येतो. अमर-लोक, नवी दुनिया सतयुगालाच म्हटले जाते. आता तर ना सतयुग, ना देवतांचे
राज्य आहे. इथे तर असूच शकत नाही. तुम्ही जाणता हे चक्र फिरून आता आपण कलियुगाच्याही
शेवटी येऊन पोहोचलो आहोत. इतर कोणाच्याही बुद्धीमध्ये हे चक्र येणार नाही. ते तर
सतयुगाला लाखो वर्षांचे आहे असे म्हणतात. तुम्हा मुलांना हा निश्चय आहे - बरोबर हे
चक्र ५ हजार वर्षांनंतर फिरत रहाते. मनुष्य ८४ जन्मच घेतात, हिशोब आहे ना! या
देवी-देवता धर्माला अद्वैत धर्म सुद्धा म्हटले जाते. अद्वैत शास्त्र सुद्धा मानले
जाते. ते देखील एकच आहे, बाकी तर अनेक धर्म आहेत, शास्त्रे सुद्धा अनेक आहेत. तुम्ही
एक आहात. एकाद्वारे एक मत मिळते. त्याला म्हटले जाते अद्वैत मत. हे अद्वैत मत
तुम्हाला मिळते. देवी-देवता बनण्यासाठी हे शिक्षण आहे ना म्हणून बाबांना ज्ञान सागर,
नॉलेजफुल म्हटले जाते. मुले समजतात आम्हाला स्वयं भगवान शिकवत आहेत, नव्या
दुनियेकरिता. हे विसरता कामा नये. शाळेमध्ये विद्यार्थी कधी टीचरला विसरतात का? नाही.
गृहस्थ व्यवहारामध्ये रहाणारे सुद्धा मोठे पद मिळवण्यासाठी शिकतात. तुम्ही देखील
गृहस्थ व्यवहारामध्ये राहून आपली उन्नती करण्यासाठी शिकत आहात. मनामध्ये हे आले
पाहिजे की आपण बेहदच्या बाबांकडून शिकत आहोत. शिवबाबा सुद्धा बाबा आहेत, प्रजापिता
ब्रह्मा देखील बाबा आहेत. ‘प्रजापिता ब्रह्मा आदि देव’ नाव प्रसिद्ध आहे. फक्त
पूर्वी होऊन गेले आहेत. जसे गांधीजी देखील पूर्वी होऊन गेले आहेत. त्यांना बापूजी
म्हणतात परंतु समजत नाहीत, असेच बोलतात. हे शिवबाबा खरे-खरे आहेत, ब्रह्मा बाबा
देखील खरे-खरे आहेत, लौकिक पिता देखील खरा-खरा असतो. बाकी मेयर इत्यादींना तर असेच
बापू म्हणतात. ते सर्व आहेत नकली. हे आहेत खरे. परमात्मा बाबा येऊन आत्म्यांना
प्रजापिता ब्रह्मा द्वारे आपले बनवतात. त्यांची तर जरूर असंख्य मुले असतील.
शिवबाबांची तर सर्व मुले आहेत, सर्वजण त्यांची आठवण करतात. तरी देखील काहीजण त्यांना
देखील मानत नाहीत, पक्के नास्तिक असतात - जे म्हणतात ही संकल्पाने दुनिया बनलेली आहे.
आता तुम्हाला बाबा समजावून सांगतात, याची बुद्धीमध्ये आठवण ठेवा - आपण शिकत आहोत.
शिकवणारे आहेत शिवबाबा. हे रात्रंदिवस लक्षात राहिले पाहिजे. हेच माया क्षणो-क्षणी
विसरायला लावते, म्हणून आठवण करायची असते. पिता, टीचर, गुरू तिघांनाही विसरून जातात.
आहेत एकच तरी सुद्धा विसरून जातात. रावणा सोबत युद्ध यामध्येच आहे. बाबा म्हणतात -
हे आत्म्यांनो, तुम्ही सतोप्रधान होता, आता तमोप्रधान बनला आहात. जेव्हा
शांतीधाममध्ये होता तेव्हा तुम्ही पवित्र होता. पवित्रते शिवाय कोणतीही आत्मा वरती
राहू शकत नाही म्हणून सर्व पतित आत्मे पतित-पावन बाबांना बोलावत राहतात. जेव्हा
सर्व पतित तमोप्रधान बनतात तेव्हा बाबा येऊन सांगतात - मी तुम्हाला सतोप्रधान बनवतो.
तुम्ही जेव्हा शांतीधाम मध्ये होता तेव्हा तिथे सर्वजण पवित्र होते. तिथे कोणी
अपवित्र आत्मा राहू शकत नाही. सर्वांना सजा भोगून पवित्र जरूर बनायचे आहे. पवित्र
बनल्याशिवाय कोणीही परत जाऊ शकत नाही. भले कोणी म्हणतात - अमका ब्रह्ममध्ये लीन झाला,
ज्योत ज्योती मध्ये विलीन झाली. ही सर्व आहेत भक्तिमार्गातील अनेक मते. तुमचे हे आहे
अद्वैत मत. मनुष्यापासून देवता तर एक बाबाच बनवू शकतात. कल्प-कल्प बाबा
शिकविण्यासाठी येतात. त्यांचा ॲक्ट हुबेहूब कल्पा पूर्वीप्रमाणेच चालतो. हा अनादि
पूर्वनियोजित ड्रामा आहे ना. सृष्टीचक्र फिरत राहते. सतयुग, त्रेता, द्वापर, कलियुग,
मग आहे हे संगमयुग. मुख्य धर्म सुद्धा हे आहेत - डिटिझम (देवी-देवता धर्म), इस्लामी
धर्म, बौद्ध धर्म, ख्रिश्चन धर्म अर्थात ज्यांच्यामध्ये राजाई चालते. ब्राह्मणांची
राजाई नाहीये, ना कौरवांची राजाई आहे! आता तुम्हा मुलांना क्षणोक्षणी आठवण करायची
आहे बेहदच्या बाबांची. तुम्ही ब्राह्मणांना देखील समजावून सांगू शकता. बाबांनी खूप
वेळा समजावून सांगितले आहे - सर्वात पहिले ब्राह्मण शिखा आहेत, ब्रह्माची वंशावळी
सर्वप्रथम तुम्ही आहात. हे तुम्ही जाणता आणि मग भक्तीमार्गामध्ये आम्हीच पूज्यचे
पुजारी बनतो. पुन्हा आता आम्ही पूज्य बनत आहोत. ते ब्राह्मण (दुनियेतील) गृहस्थी
असतात, ना की संन्यासी. संन्यासी हठयोगी आहेत, घरदार सोडणे हा हट्ट आहे ना! हठयोगी
सुद्धा अनेक प्रकारचे योग शिकवतात. जयपूरमध्ये हठयोगींचे सुद्धा म्युझियम आहे.
राजयोगाची चित्रे नाहीत. राजयोगाची चित्रे आहेतच इथे दिलवाडा मंदिरामध्ये. यांचे
म्युझियम काही नाही आहे. हठयोगाची किती म्युझियम आहेत. राजयोगाचे मंदिर इथे
भारतामध्येच आहे. हे आहेत चैतन्य. तुम्ही इथे चैतन्य मध्ये बसला आहात. लोकांना
काहीच माहिती नाहीये की स्वर्ग कुठे आहे. दिलवाडा मंदिरामध्ये खाली तपस्येमध्ये बसले
आहेत, पूर्ण यादगार आहे. जरूर स्वर्ग वरतीच दाखवावा लागेल. मनुष्य मग समजतात की
स्वर्ग वरती आहे. हे तर चक्र फिरत रहाते. अर्ध्याकल्पा नंतर स्वर्ग पुन्हा खाली
जाईल, पुन्हा अर्धे कल्प स्वर्ग वरती येईल. याचे आयुर्मान किती आहे हे कोणीच जाणत
नाही. तुम्हाला बाबांनी संपूर्ण चक्र समजावून सांगितले आहे. तुम्ही ज्ञान घेऊन वरती
जाता, चक्र पूर्ण होते मग पुन्हा नव्याने सुरू होईल. हे बुद्धीमध्ये चालायला हवे.
जसे ते नॉलेज शिकतात तर बुद्धी मध्ये पुस्तक इत्यादी सर्व लक्षात राहते ना. हे
देखील शिक्षण आहे. हे भरपूर प्रमाणात असले पाहिजे, विसरता कामा नये. हे शिक्षण
वृद्ध, तरुण, मुले इत्यादी सर्वांना शिकण्याचा हक्क आहे. केवळ अल्फला जाणून घ्यायचे
आहे. अल्फला जाणून घेतले तर बाबांची प्रॉपर्टी सुद्धा बुद्धीमध्ये येईल. प्राण्यांना
देखील आपली पिल्ले इत्यादी सर्व बुद्धीमध्ये राहते. जंगलात गेले तरी घर आणि
पिल्लांची आठवण येत राहील. आपोआप शोधत येतात. आता बाबा म्हणतात - ‘मुलांनो, मामेकम्
(मज एकाची) आठवण करा आणि आपल्या घराची आठवण करा, जिथून तुम्ही पार्ट बजावण्याकरिता
आला आहात’. आत्म्याला घर खूप प्रिय असते. किती आठवण करतात परंतु रस्ता विसरून गेले
आहेत. तुमच्या बुद्धीमध्ये आहे, आपण खूप दूर राहतो. परंतु तिथे जायचे कसे आहे, आपण
का जाऊ शकत नाही, हे काहीही माहिती नाही, म्हणून बाबांनी सांगितले होते भूल-भुलैयाचा
खेळ देखील बनवतात, जिथून जावे तिथला दरवाजा बंद. आता तुम्ही जाणता या युद्धानंतर
स्वर्गाचा दरवाजा उघडतो. या मृत्युलोकातून सगळे जाणार, इतके सर्व मनुष्य नंबरवार
धर्मानुसार आणि पार्ट नुसार जाऊन राहतील. तुमच्या बुद्धीमध्ये या सर्व गोष्टी आहेत.
मनुष्य ब्रह्म तत्वामध्ये जाण्यासाठी किती डोकेफोड करतात. वाणीच्या पार जायचे आहे.
आत्मा शरीरातून निघून जाते तर मग आवाज राहत नाही. मुले जाणतात आमचे तर ते स्वीट होम
आहे. मग देवतांची आहे स्वीट राजधानी, अद्वैत राजधानी.
बाबा येऊन राजयोग
शिकवतात. संपूर्ण नॉलेज समजावून सांगतात, ज्याचे मग भक्तीमध्ये शास्त्र इत्यादी
बसून बनवले आहे, आता तुम्हाला ती शास्त्रे इत्यादी वाचायची नाही आहेत. त्या
स्कूलमध्ये म्हाताऱ्या इत्यादी शिकत नाहीत. इथे तर सगळे शिकतात. तुम्ही मुले अमरलोक
मध्ये देवता बनता, तिथे काही असे शब्द बोलले जात नाहीत, ज्याने कोणाची निंदा केली
जाईल. आता तुम्ही जाणता स्वर्ग पास्ट झालेला आहे, त्याची महिमा आहे. किती मंदिरे
बनवतात. त्यांना विचारा - हे लक्ष्मी-नारायण कधी होऊन गेले? काहीच ठाऊक नाहीये. आता
तुम्ही जाणता आम्हाला आपल्या घरी जायचे आहे. मुलांना समजावून सांगितले आहे –
‘ओम्’चा अर्थ वेगळा आहे आणि ‘सो हम’चा अर्थ वेगळा आहे. त्यांनी मग ‘ओम्’ आणि ‘सो हम
सो’ चा अर्थ एक करून टाकला आहे. तुम्ही आत्मा शांतीधाम मध्ये राहणारी आहात नंतर येता
पार्ट बजावण्याकरिता. देवता, क्षत्रिय, वैश्य, शूद्र बनतात. ओम् अर्थात ‘मी आत्मा’.
किती फरक आहे. ते मग दोन्हीला एक करतात. या बुद्धीने समजून घेण्याच्या गोष्टी आहेत.
कोणाला नीटसे समजत नाही तर मग पेंगत राहतात. कमाई मध्ये कधी डुलक्या काढत नाहीत. ती
कमाई तर आहे अल्पकाळासाठी. ही तर अर्ध्या कल्पासाठी आहे. परंतु बुद्धी इतर ठिकाणी
भटकत राहते तर मग थकून जातात. आळस देत राहतात. तुम्हाला डोळे बंद करून बसायचे नाहीये.
तुम्ही तर जाणता आत्मा अविनाशी आहे, शरीर विनाशी आहे. कलियुगी नर्कवासी मनुष्याच्या
पाहण्यामध्ये आणि तुमच्या पाहण्यामध्ये रात्रं-दिवसाचा फरक असतो. मी आत्मा
बाबांकडून शिकत आहे हे कोणालाच माहीत नाही. ज्ञान सागर परमपिता परमात्मा येऊन शिकवत
आहेत. मी आत्मा ऐकत आहे. स्वत:ला आत्मा समजून बाबांची आठवण केल्याने विकर्म विनाश
होतील. तुमची बुद्धी वर निघून जाईल. शिवबाबा आम्हाला नॉलेज ऐकवत आहेत, यामध्ये
बुद्धी खूप रिफाइन (शुद्ध) पाहिजे. रिफाइन बुद्धी करण्यासाठी बाबा युक्ती सांगत
आहेत - स्वत:ला आत्मा समजल्याने बाबांची आठवण जरूर येईल. स्वत:ला आत्मा समजतातच
यासाठी की बाबांची आठवण यावी, नाते रहावे जे सारे कल्प तुटले आहे. तिथे तर आहे
प्रारब्ध सुखच सुख, दु:खाची गोष्ट नाही. त्याला हेवन (स्वर्ग) म्हणतात. हेवनली गॉड
फादरच हेवनचा मालक बनवतात. अशा बाबांना देखील किती विसरून जातात. बाबा येऊन मुलांना
दत्तक घेतात. मारवाडी लोक खूप दत्तक घेतात तर त्याला आनंद होणार ना की, मी
श्रीमंताच्या गोदीमध्ये आलो आहे. श्रीमंताचा मुलगा गरिबापाशी कधी जाणार नाही. ही
प्रजापिता ब्रह्माची मुले आहेत तर जरूर मुख वंशावळी असतील ना. तुम्ही ब्राह्मण आहात
मुखवंशावळी. ते आहेत कुखवंशावळी. या फरकाला तुम्हीच जाणता. तुम्ही जेव्हा ज्ञान
समजावून सांगाल तेव्हा मुखवंशावळी बनतील. हे दत्तक घेणे आहे. पत्नीला समजतात माझी
पत्नी. आता पत्नी कुखवंशावळी आहे की मुखवंशावळी? पत्नी आहेच मुखवंशावळी. मग जेव्हा
मुले होतात, ती आहेत कुख वंशावळी. बाबा म्हणतात ही सर्व आहे मुखवंशावळी, माझी
म्हटल्याने माझी बनली ना. माझी मुले आहेत, असे म्हटल्याने नशा चढतो. तर ही सर्व आहे
मुखवंशावळी, आत्मे थोडीच मुखवंशावळी आहेत. आत्मा तर अनादि-अविनाशी आहे. तुम्ही जाणता
ही मनुष्य सृष्टी कशी ट्रान्सफर होते. पॉईंट्स तर मुलांना खूप मिळतात. तरीही बाबा
म्हणतात - आणखी काही धारणा होत नसेल, मुख चालत नसेल तर ठीक आहे तुम्ही बाबांची आठवण
करत रहा तर तुम्ही भाषण करणार्यांपेक्षाही उच्च पद प्राप्त करू शकता. भाषण करणारे
काही वेळा वादळामध्ये खाली कोसळतात. ते खाली कोसळले नाहीत आणि बाबांची आठवण करत
राहिले तर उच्च पद प्राप्त करू शकतात. सर्वात जास्त जे विकारामध्ये जातात तर ५ व्या
मजल्यावरून पडल्याने हाडन् हाड तुटून जाते. पाचवा मजला आहे - देह-अभिमान. चौथा मजला
आहे - काम विकार मग उतरत जा. बाबा म्हणतात काम महाशत्रु आहे. लिहितात देखील -
‘बाबा, मी घसरलो’. क्रोधासाठी असे म्हणणार नाहीत की आम्ही घसरलो. काळे तोंड केल्याने
मोठा मार लागतो मग दुसर्याला सांगू शकणार नाहीत की, काम महाशत्रू आहे. बाबा वारंवार
समजावून सांगतात - क्रिमिनल (विकारी) नजरेला खूप सांभाळायचे आहे. सतयुगामध्ये
विवस्त्र होण्याचा प्रश्न येत नाही. क्रिमिनल आय (विकारी दृष्टी) असत नाही. सिव्हील
आय (पवित्र दृष्टी) होते. ते आहे सिव्हीलियन राज्य (पवित्र राज्य). यावेळी आहे
क्रिमिनल दुनिया (विकारी दुनिया). आता तुमची आत्मा सिव्हीलाइज (सुसंस्कृत) बनते, जो
सुसंस्कृतपणा २१ जन्म कामी येतो. तिथे कोणीही क्रिमिनल बनत नाहीत. आता मुख्य गोष्ट
बाबा समजावून सांगत आहेत बाबांची आठवण करा आणि ८४ च्या चक्राची आठवण करा. हे देखील
वंडर आहे जे श्री नारायण आहेत तेच अंतामध्ये येऊन भाग्यशाली रथ बनतात.
त्यांच्यामध्ये बाबांची प्रवेशता होते तर भाग्यशाली बनतात. ब्रह्मा सो विष्णु,
विष्णु सो ब्रह्मा, ही ८४ जन्मांची हिस्ट्री बुद्धीमध्ये राहिली पाहिजे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) बाबांच्या
आठवणीने बुद्धीला शुद्ध बनवायचे आहे. तुमची बुद्धी सदैव ज्ञानाने भरपूर रहावी. बाबा
आणि घर कायम लक्षात ठेवायचे आहे आणि आठवण करून द्यायची आहे.
२) या शेवटच्या
जन्मामध्ये विकारी दृष्टी नष्ट करून सिव्हिल आय (पवित्र दृष्टी), बनवायची आहे.
विकारी दृष्टीला खूप सांभाळायचे आहे.
वरदान:-
दातापणाच्या
स्थिती द्वारे आणि सामावून घेण्याच्या शक्तीद्वारे सदा विघ्न-विनाशक, समाधान स्वरूप
भव
विघ्न-विनाशक समाधान
स्वरूप बनण्याचे वरदान विशेषतः दोन गोष्टींच्या आधारे प्राप्त होते:-
१) सदैव स्मृती रहावी की आपण दात्याची मुले आहोत त्यामुळे मला सर्वांना द्यायचे आहे.
आदर मिळेल, प्रेम मिळेल तेव्हा स्नेही बनू, असे नको. मला द्यायचे आहे.
२) स्वतःसाठी आणि संबंध संपर्कातील सर्वांसाठी सामावून घेण्याच्या शक्तीचे स्वरूप
बनायचे आहे. याच दोन विशेषतांमुळे शुभ भावना, शुभ कामनांनी संपन्न समाधान स्वरूप
बनाल.
बोधवाक्य:-
सत्याला आपला
साथी बनवा तर तुमची नाव कधीही बुडू शकणार नाही.
अव्यक्त इशारे:- स्वयं
प्रति आणि सर्वांप्रती मनसा द्वारे योगाच्या शक्तींचा प्रयोग करा.
जेव्हा मनसामध्ये
सदैव शुभ भावना आणि शुभ आशीर्वाद देण्याचा अभ्यास होईल तेव्हा तुमची मनसा बिझी होईल.
मनामध्ये जी अशांती होते, त्यापासून आपोआपच दूर व्हाल. आपल्या पुरुषार्थामध्ये जे
कधी-कधी निराश होता ते होणार नाही. जादू मंत्र होईल.