10-11-24    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   14.11.2002  ओम शान्ति   मधुबन


“ब्राह्मण जीवनाचे फाउंडेशन आणि सफलतेचा आधार - निश्चयबुद्धी”


आज समर्थ बाबा आपल्या चोहो बाजूंच्या समर्थ मुलांना पाहत आहेत. प्रत्येक मुल समर्थ बनून बाप समान बनण्याच्या श्रेष्ठ पुरुषार्थामध्ये मग्न आहे. मुलांच्या या ध्यासाला पाहून बापदादा सुद्धा हर्षित होत राहतात. मुलांचा हा दृढ संकल्प बापदादांना देखील आवडतो. बापदादा तर मुलांना हेच सांगतात की बाबांच्याही पुढे जाऊ शकता कारण यादगारमध्ये देखील बाबांची पूजा सिंगल आहे, तुम्हा मुलांची पूजा डबल आहे. बापदादांच्याही मस्तकावरील मुकुट आहात. बापदादा मुलांच्या स्वमानाला बघून नेहमी हेच म्हणतात - ‘वाह श्रेष्ठ स्वमानधारी, स्वराज्यधारी बच्चे वाह!’ प्रत्येक मुलाची विशेषता बाबांना प्रत्येकाच्या मस्तकामध्ये चमकताना दिसते. तुम्ही देखील आपल्या विशेषतांना जाणून, ओळखून विश्व सेवेमध्ये वापरत चला. चेक करा - मी प्रभु पसंत, परिवार पसंत कितपत बनलो आहे? कारण संगमयुगामध्ये बाबा ब्राह्मण परिवार रचतात, तर प्रभु पसंत आणि परिवार पसंत असणे दोन्ही आवश्यक आहेत.

आज बापदादा सर्व मुलांच्या ब्राह्मण जीवनाचे फाउंडेशन पाहत होते. फाउंडेशन आहे - निश्चयबुद्धी; त्यामुळे जिथे प्रत्येक संकल्पामध्ये, प्रत्येक कार्यामध्ये निश्चय आहे तिथे विजय झाल्यातच जमा आहे. सफलता जन्मसिद्ध अधिकाराच्या रूपामध्ये स्वतः आणि सहज प्राप्त आहे. जन्मसिद्ध अधिकारासाठी मेहनत करण्याची आवश्यकता नसते. सफलता ब्राह्मण जीवनाच्या गळ्यातील हार आहे. ब्राह्मण जीवन आहेच सफलता स्वरूप. सफलता होईल की नाही होणार(?) हा प्रश्नच ब्राह्मण जीवनामध्ये उद्भवत नाही. निश्चयबुद्धी असणारे सदैव बाबांसोबत कंबाइंड आहेत, तर जिथे बाबा कंबाइंड आहेत तिथे सफलता सदैव प्राप्त आहेच. तर चेक करा - सफलता स्वरूप कितपत बनलो आहे? जर सफलतेमध्ये पर्सेंटेज (कमी) असेल तर त्याचे कारण निश्चयामध्ये पर्सेंटेज आहे. निश्चय फक्त बाबांवर आहे, हे तर खूप चांगले आहे. परंतु निश्चय - बाबांवर निश्चय, स्वतःवर निश्चय, ड्रामावर निश्चय आणि त्यासोबत परिवारावर निश्चय. या चारही निश्चयांच्या आधारे सफलता सहजच आणि आपोआप मिळते.

बाबांवर निश्चय तर सर्व मुलांचा आहे तेव्हाच तर इथे आला आहात. बाबांचा देखील तुम्हा सर्वांवर निश्चय आहे तेव्हाच तर तुम्हाला आपले बनवले आहे. परंतु ब्राह्मण जीवनामध्ये संपन्न आणि संपूर्ण बनण्याकरिता स्वतःवरती देखील निश्चय अत्यावश्यक आहे. बापदादांद्वारे प्राप्त झालेले श्रेष्ठ आत्म्याचे स्वमान कायम स्मृतिमध्ये रहावेत की, ‘मी परमात्म्याद्वारे स्वमानधारी श्रेष्ठ आत्मा आहे’. साधारण आत्मा नाही, परमात्म स्वमानधारी आत्मा. तर स्वमान प्रत्येक संकल्पामध्ये, प्रत्येक कर्मामध्ये सफलता अवश्य देतो. साधारण कर्म करणारी आत्मा नाही, स्वमानधारी आत्मा आहे. तर प्रत्येक कर्मामध्ये स्वमान तुम्हाला सफलता सहजच प्राप्त करून देईल. तर ‘स्व’मध्ये निश्चयबुद्धीची निशाणी आहे - सफलता अथवा विजय. तसाच बाबांमध्ये तर पक्का निश्चय आहे, त्याची विशेषता आहे - “निरंतर मी बाबांचा आणि बाबा माझे.” हा निरंतर विजयाचा आधार आहे. “माझे बाबा” फक्त बाबा नाही, माझे बाबा. ‘माझे’ असलेल्यावर अधिकार असतो. तर ‘माझे बाबा’, अशी निश्चयबुद्धी आत्मा सदैव सफलतेची आणि विजयाची अधिकारी आहे. तसेच ड्रामावर देखील पूर्णत: निश्चय पाहिजे. सफलता आणि समस्या दोन्ही प्रकारच्या गोष्टी ड्रामामध्ये येतात परंतु समस्येच्या वेळी निश्चयबुद्धीची निशाणी आहे - समाधान स्वरूप. समस्येला सेकंदामध्ये समाधान स्वरुपा द्वारे परिवर्तन करा. समस्येचे काम आहे येणे, निश्चयबुद्धी आत्म्याचे काम आहे समाधान स्वरूपा द्वारे समस्येला परिवर्तन करणे. कशासाठी? तुम्हा प्रत्येक ब्राह्मण आत्म्याने ब्राह्मण जन्म घेताच मायेला चॅलेंज केले आहे. केले आहे ना की विसरला आहात? चॅलेंज केले आहे की आम्ही मायाजीत बनणारे आहोत. तर समस्येचे स्वरूप हे मायेचे स्वरूप आहे. जेव्हा चॅलेंज केले आहे तर माया सामना तर करणार ना! ती भिन्न-भिन्न समस्यांच्या रूपामध्ये तुमच्या चॅलेंजला पूर्ण करण्यासाठी येते. तुम्हाला निश्चयबुद्धी विजयी स्वरूपाने पार करायचे आहे, का? नथिंग न्यू. किती वेळा विजयी बनला आहात? आता पहिल्यांदाच संगमावर विजयी बनत आहात का अनेक वेळा विजयी बनले आहात त्याला रिपीट करत आहात? त्यामुळे समस्या तुमच्यासाठी काही नविन गोष्ट नाहीये, नथिंग न्यू. अनेक वेळा विजयी बनला आहात, बनत आहात आणि पुढे देखील बनत रहाणार. हे आहे ड्रामावर निश्चयबुद्धी विजयी. त्यानंतर आहे - ब्राह्मण परिवारावर निश्चय, कशासाठी? ब्राह्मण परिवाराचा अर्थच आहे - संघटन. छोटा परिवार नाही आहे, ब्रह्मा बाबांचा ब्राह्मण परिवार सर्व परिवारांपेक्षा श्रेष्ठ आणि मोठा आहे. तर परिवारामध्ये, परिवारावर प्रेमाची पद्धत निभावण्यामध्ये देखील विजयी. असे नाही की बाबा माझे, मी बाबांचा, सर्व काही झाले, बाबांशी काम आहे, परिवाराशी काय काम! परंतु ही देखील निश्चयाची विशेषता आहे. चारही गोष्टींमध्ये निश्चय, विजयासाठी आवश्यक आहे. परिवार देखील सर्वांना बऱ्याच गोष्टींमध्ये मजबूत बनवतो. फक्त परिवारामध्ये हे लक्षात रहावे की सर्व नंबरवार आपल्या-आपल्या धारणा स्वरूप आहेत. व्हरायटी आहे. याचे यादगार १०८ ची माळा आहे. विचार करा - कुठे १ नंबर आणि कुठे १०८ वा नंबर, का बनला? सर्वच एक नंबर का नाही बनले? १६ हजार का बनले? कारण काय? व्हरायटी संस्कारांना ओळखून नॉलेजफुल बनून चालणे, निभावणे, हीच सक्सेसफुल स्टेज आहे. चालावे तर लागतेच. परिवाराला सोडून कुठे जाणार. नशा देखील आहे ना की आमचा एवढा मोठा परिवार आहे. तर मोठ्या परिवारामध्ये मोठ्या मनाने प्रत्येकाच्या संस्काराला जाणत असूनही चालणे, निर्माण होऊन चालणे, शुभ भावना, शुभ कामनेच्या वृत्तीने चालणे… हीच परिवारावरील निश्चयबुद्धी विजयाची निशाणी आहे. तर सर्व विजयी आहात ना? विजयी आहात का?

डबल फॉरेनर्स विजयी आहात? हात तर खूप छान हलवत आहेत. खूप छान. बापदादांना आनंद आहे. अच्छा - टीचर्स विजयी आहेत? का थोडे-थोडे होते? ‘कसे करू’, असे तर नाही ना! ‘कसे’ च्या ऐवजी ‘असे’ शब्द यूज करा, ‘कसे करू’ नाही, ‘असे करू’. २१ जन्मांचे कनेक्शन परिवारासोबत आहे त्यामुळे जो परिवारामध्ये पास (उत्तीर्ण) आहे, तो सर्वांमध्ये पास आहे.

तर चारही प्रकारचा निश्चय चेक करा कारण प्रभु पसंत सोबतच परिवार पसंत असणे देखील अतिशय गरजेचे आहे. नंबर या चारही निश्चयांच्या पर्सेंटेज नुसार मिळणार आहे. असे नाही - ‘मी बाबांचा, बाबा माझे’, बस्स, झाले. असे नाही. ‘माझे बाबा’ तर खूप छान म्हणता आणि नेहमी या निश्चयावर अटळ देखील आहात, यासाठी मुबारक आहे परंतु अजून तीन आहेत. टीचर्स, चारही जरुरी आहेत की नाहीत? असे तर नाही की तीन जरुरी आहेत एक नाही? जे समजतात चारही निश्चय जरुरी आहेत त्यांनी एक हात वर करा. सर्वांना चारही गोष्टी पसंत आहेत ना? ज्यांना तीन गोष्टी पसंत आहेत त्यांनी हात वर करा. कोणी नाही. निभावणे अवघड तर नाही ना? खूप छान. जर मनापासून हात वर केला असेल तर सगळे पास झाले. अच्छा.

पहा, कुठून-कुठून, वेगवेगळ्या देशाच्या फांद्या येऊन मधुबनमध्ये एक वृक्ष बनतो. मधुबनमध्ये हे लक्षात राहते का, की मी दिल्लीची आहे, मी कर्नाटकची आहे, मी गुजरातची आहे…! सगळे मधुबन निवासी आहेत. तर एक झाड झाले ना. यावेळी सगळे काय समजता, मधुबन निवासी आहात का आपल्या-आपल्या देशाचे निवासी आहात? मधुबन निवासी आहात? सगळे मधुबन निवासी आहात, खूप छान. तसेही प्रत्येक ब्राह्मणाचा परमनंट ॲड्रेस तर मधुबनच आहे. तुमचा परमनंट ॲड्रेस कोणता आहे? मुंबई आहे? दिल्ली आहे? पंजाब आहे? मधुबन परमनंट ॲड्रेस आहे. हे तर सेवेसाठी सेवा केंद्रावर पाठवले गेले आहे. ती सेवेची स्थाने आहेत, तुमचे घर तर मधुबन आहे. सरतेशेवटी आश्रय कुठे मिळणार आहे? मधुबनमध्येच मिळणार आहे, म्हणून मोठ-मोठी ठिकाणे (सेवाकेंद्रे) बनवत आहात ना!

सर्वांचे लक्ष्य बाप समान बनण्याचे आहे. तर संपूर्ण दिवसभरामध्ये ही ड्रिल करा - मनाची ड्रिल. शरीराची ड्रिल तर शरीराच्या आरोग्यासाठी करता, करत रहा कारण आजकाल औषधांपेक्षाही एक्सरसाइज गरजेची आहे. ती तर कराच आणि वेळेवर करा भरपूर करा. सेवेच्या वेळी एक्सरसाइज करत राहू नका. बाकी वेळेवर एक्सरसाइज करणे चांगले आहे. परंतु त्याच सोबत मनाची एक्सरसाइज वारंवार करा. जर बाप समान बनायचे असेल तर एक आहे - निराकार आणि दुसरे आहे - अव्यक्त फरिश्ता. तर जेव्हापण वेळ मिळेल सेकंदामध्ये बाप समान निराकारी स्टेजवर स्थित व्हा, बाप समान बनायचे आहे तर निराकारी स्थिती बाप समान आहे. कार्य करत असताना फरिश्ता बनून कर्म करा, फरिश्ता अर्थात डबल लाइट. कामाचे ओझे नसावे. कामाचे ओझे अव्यक्त फरिश्ता बनू देणार नाही. तर मधून-मधून निराकारी आणि फरिश्ता स्वरूपाची मनाची एक्सरसाइज करा तर थकायला होणार नाही. जसे ब्रह्मा बाबांना साकार रूपामध्ये पाहिले - डबल लाइट. सेवेचे सुद्धा ओझे नाही. अव्यक्त फरिश्ता रूप. तर सहजच बाप समान बनाल. आत्मा सुद्धा निराकार आहे आणि आत्मा निराकार स्थितीमध्ये स्थित होईल तर निराकार बाबांची आठवण सहजच समान बनवेल. आत्ता लगेच एका सेकंदामध्ये निराकारी स्थितीमध्ये स्थित होऊ शकता? होऊ शकता का? (बापदादांनी ड्रिल करवून घेतली) हा अभ्यास आणि अटेंशन चालता-फिरता, कर्म करताना मधून-मधून करत रहा. तर ही प्रॅक्टिस मनसा सेवा करण्यासाठी देखील सहयोग देईल आणि पॉवरफुल योगाच्या स्थितीमध्ये देखील खूप मदत मिळेल. अच्छा.

डबल फॉरेनर्स सोबत - पहा डबल फॉरेनर्सना या सीझनमध्ये कारणे-अकारणे या सर्व ग्रुपमध्ये चान्स मिळाला आहे. प्रत्येक ग्रुपमध्ये येऊ शकतात, फ्रिडम आहे. तर हे भाग्य आहे ना, डबल भाग्य आहे. तर या ग्रुपमध्ये सुद्धा बापदादा बघत आहेत काही पहिल्यांदाच आले आहेत, काही जुने सुद्धा आले आहेत. बापदादांची दृष्टी सर्व फॉरेनर्सवर आहे. जेवढे तुमचे प्रेम बाबांवर आहे, बाबांचे प्रेम तुमच्यावर पद्मगुणा आहे. ठीक आहे ना! पद्मगुणा आहे ना? तुमचे देखील प्रेम, अंतःकरणातील प्रेम आहे तेव्हाच तर इथे पोहोचले आहात. डबल फॉरेनर्स या ब्राह्मण परिवाराचा शृंगार आहेत. स्पेशल शृंगार आहात. प्रत्येक देशामध्ये बापदादा बघत आहेत - आठवणीमध्ये बसले आहेत. ऐकत देखील आहेत तर आठवणीमध्ये देखील बसले आहेत. खूपच छान.

टीचर्स - टीचर्सचा ग्रुप देखील मोठा आहे. बापदादा टीचर्सना एक टायटल देतात. कोणते टायटल देतात? (फ्रेंड्स) फ्रेंड्स तर सगळेच आहेत. डबल फॉरेनर्स तर पहिले फ्रेंड्स आहेत. यांना फ्रेंडचा संबंध आवडतो. टीचर्स ज्या योग्य आहेत, सर्वांना नाही, योग्य टीचर्सना बापदादा म्हणतात - या ‘गुरुबंधू’ आहेत. जसे मोठी मुले वडिलांसमान असतात ना, तसे टीचर्स सुद्धा गुरुबंधू आहेत कारण सदैव बाबांच्या सेवेसाठी निमित्त बनले आहेत. बाप समान सेवाधारी आहेत. पहा, टीचर्सना मुरली ऐकविण्यासाठी बाबांचे सिंहासन मिळते. गुरुची गादी मिळते ना! म्हणून टीचर्स अर्थात निरंतर सेवाधारी. भले मग मनसा असो, किंवा वाचा, किंवा संबंध-संपर्काद्वारे कर्मणा असो - निरंतर सेवाधारी. असे आहे ना! आराम पसंत तर नाही ना! सेवाधारी. सेवा, सेवा आणि सेवा. ठीक आहे ना? अच्छा.

सेवेमध्ये आग्रा, दिल्लीचा टर्न आहे:- आग्रा सोबती आहे. दिल्लीचे लष्कर (सेवाधारी) तर खूप मोठे आहे. अच्छा - दिल्लीमध्ये स्थापनेचे फाउंडेशन पडले, हे तर खूप चांगले आहे. आता बाबांची प्रत्यक्षता करण्याचे फाउंडेशन कुठून सुरु होणार? दिल्लीमधून की महाराष्ट्रातून? कर्नाटकातून, लंडनमधून… कुठून होणार? दिल्लीमधून होईल? करा, निरंतर सेवा आणि तपस्या. सेवा आणि तपस्या दोन्हीच्या बॅलन्स द्वारे प्रत्यक्षता होईल. जसा सेवेचा डायलॉग बनवला आहे ना, तसे दिल्लीमध्ये तपस्येचे वर्णन करण्याचा डायलॉग बनवा तेव्हा म्हणणार दिल्ली, दिल्ली आहे. दिल्ली बाबांची ‘दिल’ तर आहे परंतु बाबांच्या दिल पसंत कार्य देखील करून दाखवतील. पांडव करायचे आहे ना? करणार, जरूर करणार. तपस्या अशी करा ज्यामुळे सर्व पतंग (आत्मे) ‘बाबा-बाबा’ म्हणत दिल्लीच्या विशेष स्थानावर पोचावेत. परवाने ‘बाबा-बाबा’ म्हणत यावेत तेव्हा म्हणणार प्रत्यक्षता. तर हे करायचे आहे, पुढच्या वर्षी हा डायलॉग करायचा आहे, हा रिझल्ट ऐकायचा आहे की किती परवाने ‘बाबा-बाबा’ म्हणत स्वाहा झाले. ठीक आहे ना? खूप छान, माता देखील खूप आहेत.

कुमार-कुमारींसोबत:- कुमार आणि कुमारी, तर अर्धा हॉल कुमार आणि कुमारी आहेत. शाब्बास कुमार कुमारींना. बस, कुमार आणि कुमारी ज्वाला रूप बनून - आत्म्यांना पावन बनविणारे. कुमार आणि कुमारींना आजच्या कुमार आणि कुमारींवर दया आली पाहिजे, किती भटकत आहेत. भटकणाऱ्या हमजीन्सना मार्गावर आणा (मार्ग दाखवा). अच्छा, जे काही कुमार आणि कुमारी आलेले आहेत त्यांच्यापैकी या पूर्ण वर्षामध्ये ज्यांनी इतर आत्म्यांना सेवेमध्ये आप समान बनवले आहे त्यांनी हात वर करा. कुमारींनी आप समान बनवले आहे का? चांगला प्लॅन बनवत आहेत. या हॉस्टेलवाल्या कुमारी हात वर करत आहेत. अजून सेवेचा पुरावा आणलेला नाही. तर कुमार आणि कुमारींनी सेवेचा पुरावा आणायचा आहे. ठीक आहे! अच्छा.

चोहो बाजूंच्या विजयी रत्नांना, सदैव निश्चय बुद्धी सहज सफलता मूर्त मुलांना, सदैव ‘माझे बाबा’ या अधिकाराने प्रत्येक सेवेमध्ये सफलता प्राप्त करणाऱ्या सफलता मूर्त मुलांना, सदैव समाधान स्वरूप, समस्येला परिवर्तन करणारे परिवर्तक आत्मे अशा श्रेष्ठ मुलांना, सदैव बाबांना प्रत्यक्ष करण्याच्या प्लॅनला प्रॅक्टिकलमध्ये आणणाऱ्या मुलांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण, मुबारक, अक्षोणी वेळा मुबारक आणि नमस्ते.

दादीजींसोबत :- सर्वांचे तुमच्यावर प्रेम आहे, बाबांचे देखील तुमच्यावर प्रेम आहे. (रतनमोहिनी दादींना) सहयोगी बनल्यामुळे सूक्ष्ममध्ये खूप काही प्राप्त होते. असे आहे ना! आदि रतन आहात. आदि रतन आज पर्यंत देखील निमित्त आहात. अच्छा. ओम् शांती.

वरदान:-
सर्व काही ‘तुझे’ असे म्हणून ‘माझे’पणाच्या अंश मात्रला देखील नष्ट करणारे डबल लाईट भव

कोणत्याही प्रकारचा माझेपणा - माझा स्वभाव, माझा संस्कार, माझी नेचर… काहीही माझे आहे तर ओझे आहे आणि ओझे असणारा उडू शकत नाही. हा ‘माझे-माझे’पणाच खराब बनवणारा आहे त्यामुळे आता ‘तुझे-तुझे’ म्हणून स्वच्छ बना. फरिश्ता म्हणजेच ‘माझे’पणाचा अंश मात्र नाही. संकल्पामध्ये देखील माझेपणाचे भान आले तरीही समजा खराब झालात. तर या खराब ओझ्याला नष्ट करून, डबल लाईट बना.

सुविचार:-
जहान के नूर (जगाचा प्रकाश) ते आहेत जे बापदादांना आपल्या नेत्रांमध्ये सामावणारे आहेत.