10-12-2024
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - तुमच्यासाठी ही गाण्याची टेप संजीवनी बुटी आहे, ही गाणी वाजविल्याने
उदासीनता निघून जाईल'’
प्रश्न:-
अवस्था
बिघडण्याचे कारण काय आहे? कोणत्या युक्तीने अवस्था खूप चांगली राहू शकते?
उत्तर:-
१. ज्ञानाचा डान्स करत नाहीत, झरमुई झगमुईमध्ये (व्यर्थ गोष्टींमध्ये) आपला वेळ वाया
घालवतात म्हणून अवस्था बिघडते. २. दुसऱ्यांना दुःख दिले तरी देखील त्याचा प्रभाव
अवस्थेवर येतो. अवस्था चांगली तेव्हा राहील जेव्हा गोड होऊन चालाल. आठवणीवर पूर्ण
अटेंशन असेल. रात्री झोपण्यापूर्वी कमीत-कमी अर्धा तास आठवणीमध्ये बसा मग सकाळी
उठून आठवण कराल तर अवस्था चांगली राहील .
गीत:-
कौन आया मेरे
मन के द्वारे…
ओम शांती।
या गाण्यांच्या टेप देखील बाबांनी मुलांसाठी बनविल्या आहेत. याचा अर्थ देखील मुलां
व्यतिरिक्त कोणी जाणू शकत नाही. बाबांनी अनेकदा समजावून सांगितले आहे की, अशा
चांगल्या-चांगल्या गाण्यांच्या टेप घरी असल्या पाहिजेत म्हणजे मग कधी उदासवाणे वाटते
तेव्हा या गाण्याची टेप लावल्याने लगेच बुद्धीमध्ये अर्थ येईल आणि उदासी निघून जाईल.
या गाण्यांच्या टेप देखील संजीवनी बुटी आहेत. बाबा डायरेक्शन तर देतात परंतु कोणी
अमलात आणेल तेव्हा ना. आता या गाण्यामध्ये हे कोण म्हणत आहे की, ‘हमारे तुम्हारे
सबके दिल में कौन आया है!’ जे येऊन ज्ञान डान्स करतात. म्हणतात - गोपिका कृष्णाला
नृत्य करायला लावत होत्या, असे तर काहीच नाही. आता बाबा म्हणतात - ‘माझ्या
शाळीग्राम मुलांनो’, सर्वांनाच म्हणतात ना. शाळा अर्थात शाळा, जिथे शिकवले जाते, हे
देखील स्कूल आहे. तुम्ही मुले जाणता आपल्या हृदयामध्ये कोणाची आठवण येते! दुसऱ्या
कोणत्याही मनुष्यमात्राच्या बुद्धीमध्ये या गोष्टी नसतात. ही एकच वेळ आहे जेव्हा की
तुम्हा मुलांना त्यांची आठवण येते बाकी कोणीही त्यांची आठवण करत नाहीत. बाबा
म्हणतात तुम्ही रोज माझी आठवण करा तर खूप चांगली धारणा होईल. मी जसे डायरेक्शन देतो
तशी तुम्ही आठवण करत नाही. माया तुम्हाला आठवण करू देत नाही. तुम्ही माझ्या
मतानुसार फार कमी चालता आणि बरेचसे मायेच्या मतानुसार चालता. अनेकदा सांगितले आहे -
रात्रीचे जेव्हा झोपता तर अर्धा तास बाबांच्या आठवणीमध्ये बसले पाहिजे. भले
पती-पत्नी आहेत, एकत्र बसा नाहीतर वेग-वेगळे बसा. बुद्धीमध्ये एका बाबांची आठवण
असावी. परंतु कोणी विरळेच आठवण करतात. माया विसरायला लावते. आदेशानुसार चालला नाहीत
तर पद कसे प्राप्त करू शकाल. बाबांची खूप आठवण करायची आहे. शिवबाबा तुम्हीच
आत्म्यांचे पिता आहात. सर्वांना तुमच्याकडूनच वारसा मिळणार आहे. जे पुरुषार्थ करत
नाहीत त्यांना देखील वारसा मिळेल, ब्रह्मांडाचे मालक तर सर्व बनतील. सर्व आत्मे
ड्रामा अनुसार निर्वाण धाममध्ये येतील. भले काहीही जरी केले नाही तरीही. अर्धा कल्प
भले भक्ती करतात परंतु जोपर्यंत मी गाईड बनून येत नाही तोपर्यंत परत कोणीही जाऊ शकत
नाही. कोणी रस्ताच पाहिलेला नाही आहे. जर पाहिला असेल तर त्यांच्या मागे सर्व
मच्छरांप्रमाणे जातील. मूलवतन काय आहे - हे देखील कोणीही जाणत नाही. तुम्ही जाणता
हा पूर्व नियोजित ड्रामा आहे. यालाच रिपीट करायचे आहे. आता दिवसाचे तर कर्मयोगी
बनून धंद्यामध्ये लागायचे आहे. जेवण बनविणे इत्यादी सर्व कर्म करायची आहेत,
वास्तविक कर्म संन्यास म्हणणे देखील चुकीचे आहे. कर्मा शिवाय तर कोणी राहू शकत नाही.
‘कर्म संन्याशी’ असे चुकीचे नाव ठेवले आहे. तर दिवसाचे भले धंदा इत्यादी करा,
रात्रीला आणि पहाटेला चांगल्या रीतीने बाबांची आठवण करा. ज्याला आता आपले बनवले आहे
त्याची आठवण कराल तर मदत देखील मिळेल, नाहीतर मिळणार नाही. श्रीमंतांना तर बाबांचे
बनण्यामध्ये हृदय विदीर्ण होते; तर मग पद सुद्धा मिळणार नाही. ही आठवण करणे तर
अतिशय सोपे आहे. ते आपले पिता, टीचर, गुरु आहेत. आपल्याला संपूर्ण रहस्य सांगितले
आहे - हा जगाचा इतिहास-भूगोल कसा रिपीट होतो. बाबांची आठवण करायची आहे आणि मग
स्वदर्शन चक्र फिरवायचे आहे. सर्वांना परत घेऊन जाणारे तर बाबाच आहेत. अशा
विचारांमध्ये राहिले पाहिजे. रात्रीचे झोपताना देखील हे नॉलेज डोक्यात फिरत राहिले
पाहिजे. सकाळी उठल्यानंतर देखील हेच नॉलेज आठवत रहावे. आपण ब्राह्मण सो देवता मग
क्षत्रिय, वैश्य, शूद्र बनणार. नंतर मग बाबा येतील आणि आपण शूद्रा पासून ब्राह्मण
बनणार. बाबा त्रिमूर्ती, त्रिकालदर्शी, त्रिनेत्री देखील आहेत. आमची बुद्धी उघडतात.
ज्ञानाचा तिसरा नेत्र देखील मिळतो. असा पिता तर कोणी असूही शकत नाही. बाबा रचना
रचतात तर माता देखील झाले. जगत अंबेला निमित्त बनवतात. बाबा या शरीरामध्ये येऊन
ब्रह्मा रूपामध्ये खेळतात-बागडतात देखील. फिरायला देखील जातात. आपण बाबांची आठवण तर
करतो ना! तुम्ही जाणता यांच्या रथामध्ये येतात. तुम्ही म्हणाल - आमच्या सोबत बापदादा
खेळतात. खेळत असताना देखील बाबा (ब्रह्मा बाबा) आठवण करण्याचा पुरुषार्थ करतात. बाबा
म्हणतात - मी यांच्याद्वारे खेळत आहे. चैतन्य तर आहे ना. तर असे विचार ठेवले
पाहिजेत. अशा बाबांवर अर्पितही व्हायचे आहे. भक्तिमार्गामध्ये तुम्ही गात आले आहात
- ‘वारी जाऊ…’ आता बाबा म्हणतात - ‘मला हा एक जन्म तुमचा वारसदार बनवा तर मी २१
जन्मांसाठी राज्यभाग्य देईन’. आता हा आदेश दिला तर त्या डायरेक्शन प्रमाणे चालायचे
आहे. ते देखील जसे पाहतील तसे डायरेक्शन देतील. डायरेक्शन प्रमाणे चालल्याने मोह
नष्ट होईल, परंतु घाबरतात. बाबा म्हणतात - तुम्ही स्वतःला अर्पित करत नाही तर मी
वारसा कसा देणार. तुमचे पैसे कोणी घेऊन थोडेच जातात. म्हणतील, ठीक आहे तुमचे पैसे
आहेत, लिटरेचरमध्ये लावा. ट्रस्टी आहेत ना. बाबा मत देत राहतील. बाबांचे सर्व काही
मुलांकरिता आहे. मुलांकडून काही घेत नाहीत. युक्तीने समजावून सांगतात फक्त मोह नष्ट
व्हावा. मोह देखील अतिशय कट्टर आहे. (माकडाचे उदाहरण आहे) बाबा म्हणतात तुम्ही
माकडासारखा त्यांच्यामध्ये मोह का ठेवता. मग घरोघरी मंदिरे कशी बनतील. मी तुम्हाला
मर्कटासारख्या वृत्तीपासून सोडवून मंदिर लायक बनवतो. तुम्ही या कचरापट्टीमध्ये मोह
का ठेवता. बाबा केवळ मत देतील - कसे सांभाळायचे ते. तरी देखील बुद्धीमध्ये येत नाही.
हे संपूर्ण बुद्धीचे काम आहे.
अमृतवेलेला बाबांशी
कसे बोलायचे त्यासाठी देखील बाबा सल्ला देतात. बाबा, तुम्ही बेहदचे पिता, टीचर आहात.
तुम्हीच बेहदच्या दुनियेचा इतिहास-भूगोल सांगू शकता. लक्ष्मी-नारायणाच्या ८४
जन्मांची कहाणी दुनियेमध्ये कोणीही जाणत नाहीत. जगत अंबेला माता-माता असे देखील
म्हणतात. ती कोण आहे? सतयुगामध्ये तर असू शकत नाही. तिथले महाराणी-महाराजा तर
लक्ष्मी-नारायण आहेत. त्यांना आपली संतान आहे जी तख्तावर बसेल. आपण त्यांची मुले कशी
काय बनणार जी तख्तावर बसू. आता आपण जाणतो ही जगदंबा ब्राह्मणी आहे, ब्रह्माची मुलगी
सरस्वती. मनुष्य थोडेच हे रहस्य जाणतात. रात्रीचे बाबांच्या आठवणीमध्ये बसण्याचा
नियम ठेवा तर खूप चांगले आहे. नियम बनवाल तर तुमचा आनंदाचा पारा चढलेला राहील;
म्हणजे मग जास्त कोणता त्रास होणार नाही. म्हणतील एका बाबांची मुले आपण भाऊ-बहीणी
आहोत. मग वाईट दृष्टी ठेवणे म्हणजे क्रिमिनल एसाल्ट (विकारांचे आक्रमण) ठरेल. नशा
देखील सतो, रजो, तमोगुणी असतो ना. तमोगुणी नशा चढला तर मरून जाल. हा तर नियम बनवा -
थोडातरी वेळ बाबांची आठवण करून बाबांच्या सेवेवर जा. म्हणजे मग मायेची वादळे येणार
नाहीत. तो नशा दिवसभर राहील आणि अवस्था देखील खूप रिफाईन (चांगली) राहील. योगामध्ये
देखील लाईन क्लिअर होईल. अशा प्रकारची गाणी देखील खूप चांगली आहेत, गाणी ऐकत रहाल
तर नाचणे सुरू कराल, रिफ्रेश व्हाल. दोन, चार, पाच गाणी खूप चांगली आहेत. गरीब
देखील बाबांच्या या सेवेमध्ये लागतील तर त्यांना महाल मिळू शकतात. शिवबाबांच्या
भंडाऱ्यातून सर्व काही मिळते. सेवाभावी असणाऱ्याला बाबा का नाही देणार. शिवबाबांच्या
भंडाऱ्यातून सर्व काही मिळू शकते. सेवायोग्य असणाऱ्यांना बाबा का नाही देणार.
शिवबाबांचा भंडारा भरपूरच आहे.
(गीत) हा आहे ज्ञान
डान्स. बाबा येऊन गोप-गोपिकांना ज्ञान डान्स करायला लावतात. कुठेही बसा परंतु
बाबांची आठवण करत रहा तर अवस्था खूप चांगली राहील. ज्याप्रमाणे बाबा ज्ञान आणि
योगाच्या नशेमध्ये राहतात तुम्हा मुलांना देखील शिकवतात. तर तो आनंदाचा नशा राहील.
नाही तर झरमुई-झगमुईमध्ये (व्यर्थ गोष्टींमध्ये) राहिल्याने मग अवस्थाच बिघडून जाते.
पहाटे उठणे तर खूप चांगले आहे. बाबांच्या आठवणीमध्ये बसून बाबांशी गोड-गोड गोष्टी
करायला हव्या. भाषण करणाऱ्यांना तर विचार सागर मंथन करावे लागेल. आज या-या
पॉईंट्सवर समजावून सांगायचे, असे समजावून सांगायचे. बाबांना बरीच मुले विचारतात -
‘आम्ही नोकरी सोडावी का?’ परंतु बाबा म्हणतात पहिले सेवेचा पुरावा तर द्या. बाबांनी
आठवणीची युक्ती खूप चांगली सांगितली आहे. परंतु कोटींमधून कोणीच निघतील ज्यांना अशी
सवय लागेल. कोणाला मुश्किलीने आठवण राहते. तुम्हा कुमारींचे नाव तर प्रसिद्ध आहे.
सर्वजण कुमारीच्या पाया पडतात. तुम्ही २१ जन्मांकरिता भारताला स्वराज्य मिळवून देता.
तुमचे यादगार (स्मृती रूपातील) मंदिर देखील आहे. ब्रह्माकुमार-कुमारींचे नाव देखील
प्रसिद्ध झालेले आहे ना. कुमारी ती जी २१ कुळाचा उद्धार करेल. तर त्याचा अर्थ देखील
समजून घ्यावा लागेल. तुम्ही मुले जाणता हे ५ हजार वर्षांचे रीळ आहे, जे काही होऊन
गेले तो ड्रामा. चूक झाली ड्रामा. मग भविष्यासाठी आपले रजिस्टर ठीक केले पाहिजे.
पुन्हा रजिस्टर खराब होऊ नये. भरपूर मेहनत आहे तेव्हा इतके उच्च पद मिळेल. बाबांचे
बनलात तर मग बाबा वारसा सुद्धा देतील. सावत्र असणाऱ्याला थोडाच वारसा देतील. मदत
देणे तर कर्तव्य आहे. जे समजूतदार आहेत ते प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करतात. बाबा पहा
किती मदत करतात. हिम्मते मर्दा मददे खुदा. मायेवर विजय प्राप्त करण्यासाठी देखील
ताकद पाहिजे. एका रूहानी बाबांचीच आठवण करायची आहे, इतर संग सोडून एक संग जोडायचा
आहे. बाबा आहेत ज्ञानाचे सागर. ते म्हणतात मी यांच्यामध्ये प्रवेश करतो, बोलतो.
अजून तर कोणी असे म्हणू शकणार नाहीत की, ‘मी पिता, टीचर, गुरु आहे. ब्रह्मा, विष्णू,
शंकराला रचणारा आहे’. या गोष्टींना आता तुम्ही मुलेच समजू शकता. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) जुन्या
कचरापट्टीमध्ये मोह ठेवायचा नाही, बाबांच्या डायरेक्शनवर चालून आपला मोह नष्ट करायचा
आहे. ट्रस्टी बनून रहायचे आहे.
२) या अंतिम
जन्मामध्ये भगवंताला आपला वारसदार बनवून त्यांच्यावर अर्पित व्हायचे आहे, तेव्हा २१
जन्मांचे राज्यभाग्य मिळेल. बाबांची आठवण करून सेवा करायची आहे, नशेमध्ये रहायचे आहे,
रजिस्टर कधीही खराब होऊ नये याकडे लक्ष द्यायचे आहे.
वरदान:-
प्रत्यक्ष
फळाद्वारे अतिंद्रीय सुखाची अनुभूती करणारे नि:स्वार्थ सेवाधारी भव
सतयुगामध्ये कर्माचे
फळ मिळेल परंतु इथे बाबांचे बनल्याने प्रत्यक्ष फळ वारशाच्या रूपामध्ये मिळते. सेवा
केली आणि सेवा करण्यासोबतच खुशी मिळाली. जे आठवणीमध्ये राहून, नि:स्वार्थ भावाने
सेवा करतात त्यांना सेवेचे प्रत्यक्ष फळ अवश्य मिळते. प्रत्यक्ष फळच ताजे फळ आहे जे
एव्हरहेल्दी (निरोगी) बनवते. योगयुक्त, यथार्थ सेवेचे फळ आहे - खुशी, अतिंद्रिय सुख
आणि डबल लाईटची अनुभूती.
बोधवाक्य:-
विशेष आत्मा
ती आहे जी आपल्या वागणुकीद्वारे रूहानी रॉयल्टीची झलक आणि फलकचा (आत्मिक संपन्नतेचे
तेज आणि नशेचा) अनुभव करवेल.