11-01-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो – योग हा अग्नी प्रमाणे आहे, ज्यामध्ये तुमची पापे जळून जातात, आत्मा सतोप्रधान बनते म्हणून एका बाबांच्या आठवणीमध्ये (योग मध्ये) रहा”

प्रश्न:-
पुण्यात्मा बनणाऱ्या मुलांना कोणत्या गोष्टीच्या बाबतीत खूप सावधानी बाळगायची आहे?

उत्तर:-
पैसा कोणाला दान करायचा या गोष्टीबद्दल खूप सावध रहायचे आहे. जर कोणाला पैसे दिले आणि त्याने जाऊन दारू वगैरे प्यायली, वाईट कर्मे केली तर त्याचे पाप तुमच्यावर येईल. तुम्हाला आता पाप आत्म्यांसोबत देवाण-घेवाण करायची नाहीये. इथे तर तुम्हाला पुण्य आत्मा बनायचे आहे.

गीत:-
न वह हमसे जुदा होंगे...

ओम शांती।
याला म्हटले जाते आठवणीचा अग्नी. ‘योग-अग्नी’ अर्थात आठवणीचा अग्नी. ‘अग्नी’ शब्द का वापरला आहे? कारण यामध्ये पापे जळून जातात. हे फक्त तुम्ही मुलेच जाणता की, कसे आपण तमोप्रधाना पासून सतोप्रधान बनतो. सतोप्रधान याचा अर्थच आहे पुण्य-आत्मा आणि तमोप्रधान याचा अर्थच आहे पाप-आत्मा. म्हटले सुद्धा जाते - ही खूप पुण्य-आत्मा आहे, ही पाप-आत्मा आहे. याच्यावरून सिद्ध होते की आत्माच सतोप्रधान बनते मग पुनर्जन्म घेत-घेत तमोप्रधान बनते म्हणून तिला पाप-आत्मा म्हटले जाते. पतित-पावन बाबांची देखील याच्यासाठीच आठवण करतात की येऊन पावन आत्मा बनवा. पतित आत्मा कोणी बनवले हे कोणालाच माहीत नाही. तुम्ही जाणता जेव्हा पावन आत्मे होते तेव्हा त्याला रामराज्य म्हटले जात होते. आता पतित आत्मे आहेत त्यामुळे याला रावणराज्य म्हटले जाते. भारतच पावन, भारतच पतित बनतो. बाबाच येऊन भारताला पावन बनवतात. बाकी सर्व आत्मे पावन बनून शांतीधाममध्ये निघून जातात. आता आहे दुःख धाम. इतकी सोपी गोष्ट सुद्धा बुद्धीमध्ये राहत नाही. जेव्हा मनापासून समजेल तेव्हाच खरा ब्राह्मण बनेल. ब्राह्मण बनल्याशिवाय बाबांकडून वारसा मिळू शकत नाही.

आता हा आहे संगमयुगातील यज्ञ. यज्ञासाठी ब्राह्मण तर नक्की पाहिजेत. आता तुम्ही ब्राह्मण बनले आहात. जाणता की मृत्यूलोकातील हा शेवटचा यज्ञ आहे. यज्ञ मृत्युलोक मध्येच होतात. अमरलोक मध्ये यज्ञ होत नाहीत. भक्तांच्या बुद्धीमध्ये या गोष्टी येऊ शकत नाहीत. भक्ती अगदी वेगळी आहे, ज्ञान वेगळे आहे. मनुष्य मग वेद-शास्त्रांनाच ज्ञान समजतात. जर त्यांच्यामध्ये ज्ञान असते तर मग मनुष्य परत निघून गेले असते. परंतु ड्रामा अनुसार परत कोणीही जात नाही. बाबांनी समजावून सांगितले आहे पहिल्या नंबरवाल्यालाच सतो-रजो-तमोमध्ये यायचे आहे तर मग बाकीचे फक्त सतोचा पार्ट बजावून परत कसे जाऊ शकतील? त्यांना तर मग तमोप्रधानतेमध्ये यायचेच आहे, पार्ट बजावायचाच आहे. प्रत्येक ॲक्टरची ताकद आपली स्वतःची असते ना. मोठ-मोठे ॲक्टर्स किती नावाजलेले प्रसिद्ध असतात. सर्वात मुख्य क्रिएटर, डायरेक्टर आणि मुख्य ॲक्टर कोण आहे? आता तुम्हाला समजले आहे गॉडफादर आहेत मुख्य, नंतर जगत अंबा, जगतपिता. जगाचे मालक, विश्वाचे मालक बनतात, यांचा पार्ट नक्की श्रेष्ठ आहे. तर मग त्यांचा पगार देखील जास्त आहे. पगार देतात बाबा, जे सर्वात श्रेष्ठ आहेत. म्हणतात - तुम्ही मला इतकी मदत करता तर तुम्हाला पगार सुद्धा जरूर इतका मिळेल. बॅरिस्टर शिकवत असेल तर म्हणेल ना, इतके उच्च पद मिळवून देतो तर या अभ्यासाकडे मुलांनी किती लक्ष दिले पाहिजे. संसारात सुद्धा रहायचे आहे, कर्मयोग संन्यास आहे ना. गृहस्थ व्यवहारामध्ये राहून, सर्व काही करत असताना बाबांकडून वारसा मिळविण्याचा पुरुषार्थ करू शकता, यामध्ये तर काहीच त्रास नाहीये. कामकाज करताना शिवबाबांच्या आठवणीमध्ये रहायचे आहे. ज्ञान तर खूप सोपे आहे. गातात देखील - ‘हे पतित-पावन या, येऊन आम्हाला पावन बनवा’. पावन दुनियेमध्ये तर राज्य आहे तर बाबा त्या राज्याच्या देखील लायक बनवतात.

या ज्ञानाचे मुख्य दोन विषय आहेत - अल्फ आणि बे (बाबा आणि बादशाही). स्वदर्शन चक्रधारी बना आणि बाबांची आठवण करा तर तुम्ही एव्हर हेल्दी आणि वेल्दी (सदैव निरोगी आणि संपन्न) बनाल. बाबा म्हणतात - ‘माझी तिथे आठवण करा. घराची सुद्धा आठवण करा, माझी आठवण केल्याने तुम्ही घरी निघून जाल. स्वदर्शन चक्रधारी बनल्याने तुम्ही चक्रवर्ती राजा बनाल. हे व्यवस्थित बुद्धीमध्ये राहिले पाहिजे. या वेळी तर सर्व तमोप्रधान आहेत. सुखधाममध्ये सुख, शांती, संपत्ती सर्व काही मिळते. तिथे एक धर्म असतो. आता तर बघा घराघरामध्ये अशांती आहे. विद्यार्थी बघा किती अराजकता निर्माण करतात. आपले तरुण रक्त दाखवतात. ही आहे तमोप्रधान दुनिया, सतयुग आहे नवी दुनिया. बाबा संगमावर आलेले आहेत. महाभारत युद्ध देखील संगमातीलच आहे. आता ही दुनिया बदलणार आहे. बाबा देखील म्हणतात - ‘मी नवीन दुनियेची स्थापना करण्यासाठी संगमावर येतो, यालाच पुरुषोत्तम संगमयुग म्हणतात. पुरुषोत्तम महिना, पुरुषोत्तम संवत सुद्धा साजरे करतात. परंतु या पुरुषोत्तम संगमयुगाबद्दल मात्र कोणालाच माहीत नाहीये. संगमावरच बाबा येऊन तुम्हाला हिऱ्यासमान बनवतात. मग यामध्ये नंबरवार तर असतातच. हिऱ्याप्रमाणे राजा बनतात, आणि बाकी सोन्यासारखी प्रजा बनते. बाळाने जन्म घेतला आणि वारशाचा उत्तराधिकारी बनला. आता तुम्ही पावन दुनियेचे उत्तराधिकारी बनता. मग त्यामध्ये उच्च पद प्राप्त करण्यासाठी पुरुषार्थ करायचा आहे. या वेळचा तुमचा पुरुषार्थ कल्प-कल्पाचा पुरुषार्थ असेल. समजून येते हे कल्प-कल्प असाच पुरुषार्थ करतील. यांच्याकडून जास्त पुरुषार्थ होणारच नाही. जन्म-जन्मांतर, कल्पानुकल्प हे प्रजेमध्येच येतील. हे श्रीमंत प्रजेमध्ये दास-दासी बनतील. नंबरवार तर असतात ना. अभ्यासाच्या आधारे सर्व माहिती होते. बाबा लगेच सांगू शकतात या परिस्थितीमध्ये तुझे उद्या जर शरीर सुटले तर काय बनशील. दिवसेंदिवस वेळ कमी होत जातो. जर कोणी शरीर सोडले तर मग शिकू शकणार नाहीत; हो, फक्त थोडेसे बुद्धीमध्ये येईल. शिवबाबांची आठवण करतील. जसे छोट्या मुलाकडून सुद्धा तुम्ही आठवण करून घेतली तर शिवबाबा-शिवबाबा म्हणत राहतो. तर त्यांना देखील काही मिळू शकते. छोटा मुलगा तर महात्म्या प्रमाणे आहे, विकारांविषयी माहितीच नाही. जेवढा मोठा होत जाईल, तेवढा विकारांचा परिणाम होत जाईल, क्रोध येईल, मोह होईल... आता तुम्हाला समजावून सांगितले जात आहे की, या दुनियेमध्ये या डोळ्यांनी जे काही बघत आहात त्यातून मोह काढून टाकायचा आहे. आत्मा जाणते हे सर्व तर कब्रदाखल होणार आहे. तमोप्रधान गोष्टी आहेत. मनुष्य मेल्यावर त्याच्या जुन्या गोष्टी करणीघोरला (श्राद्ध करणाऱ्या ब्राह्मणाला) देऊन टाकतात. मग बाबा तर बेहदचे करणीघोर आहेत, धोबी सुद्धा आहेत. तुमच्याकडून घेतात काय आणि देतात काय? तुम्ही जे काही थोडे-फार धन जरी देता तर ते देखील नष्ट होणारच आहे. तरीसुद्धा बाबा म्हणतात हे धन तुमच्याकडेच ठेवा. फक्त यातून मोह काढून टाका. बाबांना हिशोब देत रहा. मग डायरेक्शन (मार्गदर्शन) मिळत राहील. तुमचे हे कखपन (कवडीमोल धन) जे आहे, ते युनिव्हर्सिटीमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये हेल्थ आणि वेल्थसाठी वापरतात. हॉस्पिटल असते पेशंटसाठी, युनिव्हर्सिटी असते शिकविण्यासाठी. हे तर कॉलेज आणि हॉस्पिटल दोन्ही एकत्र आहे. यांच्यासाठी तर फक्त ३ पावले जमीन पाहिजे. ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांनी फक्त ३ पावले जमीन द्यावी. त्यात क्लास सुरू करावे. ३ पावले जमीन तर फक्त बसण्याएवढी जागा झाली ना. आसन ३ पावलांचेच असते. ३ पावले जमिनीवर कोणीही येईल, चांगल्या प्रकारे समजून घेईल आणि जाईल. कोणी आला, आसनावर बसवले आणि बाबांचा परिचय दिला! सेवेसाठी खूप बॅजेस देखील बनवून घेत आहेत, हे तर खूपच सोपे आहे. चित्रे देखील खूप चांगली आहेत, पूर्ण स्पष्टीकरण देखील लिहिलेले आहे. यांच्यामुळे तुमची भरपूर सेवा होईल. दिवसेंदिवस जेवढी संकटे येत राहतील तेवढे लोकांना देखील वैराग्य येईल आणि बाबांची आठवण करु लागतील - आपण आत्मे अविनाशी आहोत, आपल्या अविनाशी बाबांची आठवण करा. बाबा स्वतः म्हणतात - ‘माझी आठवण करा तर तुमची जन्म-जन्मांतरीची पापे नाहिशी होतील. स्वतःला आत्मा समजा आणि संपूर्ण प्रेम बाबांवर करा. देह-अभिमानामध्ये येऊ नका. हो, बाहेरचे प्रेम भलेही मुले इत्यादींवर करा परंतु आत्म्याचे खरे प्रेम रूहानी बाबांवर असावे. त्यांच्या आठवणीनेच विकर्मे विनाश होतील. मित्र-नातेवाईक, मुले इत्यादींना बघत असताना देखील बुद्धी बाबांच्या आठवणीमध्ये गुंतलेली असावी. तुम्ही मुले जणूकाही आठवणीच्या फाशीवर लटकलेले आहात. आत्म्याने आपला पिता परमात्म्याचीच आठवण करायची आहे. बुद्धी वरती लटकलेली असावी. बाबांचे घरसुद्धा वरती आहे ना. मूलवतन, सूक्ष्मवतन आणि हे स्थूलवतन आहे. आता पुन्हा परत जायचे आहे.

आता तुमचा प्रवास पूर्ण झाला आहे. तुम्ही आता प्रवासावरून परत येत आहात. तर आपले घर किती प्रिय वाटते. ते आहे बेहदचे घर. परत आपल्या घरी जायचे आहे. मनुष्य भक्ती करतात - घरी जाण्याकरिता, परंतु पूर्ण ज्ञान नसेल तर घरी जाता येत नाही. भगवंताकडे जाण्याकरिता अथवा निर्वाण धाममध्ये जाण्याकरिता किती तीर्थयात्रा वगैरे करतात, कष्ट करतात. संन्यासी लोक फक्त शांतीचा मार्गच सांगतात. सुखधामला तर जाणतही नाहीत. सुखधामचा रस्ता फक्त बाबाच सांगतात. पहिल्यांदा जरूर निर्वाणधामात, वानप्रस्थमध्ये जायचे आहे ज्याला ब्रह्मांड देखील म्हणतात. ते मग ब्रह्मलाच ईश्वर समजले आहेत. आपण आत्मा बिंदू आहोत. आपले राहण्याचे स्थान ब्रह्मांड आहे. तुमची देखील पूजा तर होते ना. आता बिंदूची पूजा कशी करणार. जेव्हा पूजा करतात तेव्हा शाळिग्राम बनवून प्रत्येक आत्म्याचे पूजन करतात. बिंदूची पूजा कशी होईल म्हणून मोठे-मोठे शाळीग्राम बनवतात. बाबांना देखील स्वतःचे शरीर तर नाहीये. या गोष्टी आता तुम्हीच जाणता. चित्रांमध्ये सुद्धा तुम्हाला मोठे रूप दाखवावे लागेल. बिंदू दाखवाल तर समजणार कसे? तसे तर बनविले पाहिजे ताऱ्याप्रमाणे. अशा प्रकारे टिळा देखील खूप माता लावतात, सफेद रंगाचे तयार मिश्रण मिळते. आत्मा देखील ताऱ्याप्रमाणे सफेद असते ना. ही देखील एक खूण आहे. भृकुटीमध्ये आत्मा राहते. बाकी अर्था विषयी तर कोणाला माहित सुद्धा नाहीये. हे बाबा समजावून सांगतात इतक्या छोट्या आत्म्यामधे किती ज्ञान आहे. किती बॉम्ब्स इत्यादी बनवत राहतात. आश्चर्य आहे, एवढा सर्व पार्ट आत्म्यामध्ये भरलेला आहे. या अतिशय गूढ गोष्टी आहेत. इतकी छोटीशी आत्मा शरीराद्वारे किती काम करते. आत्मा अविनाशी आहे, तिचा पार्ट कधीही विनाश होत नाही, ना कर्म बदलतात. आता खूप मोठे झाड झाले आहे. सतयुगामध्ये झाड किती छोटे असते. जुने तर नसते. गोड छोट्या झाडाचे कलम आता लावले जात आहे. तुम्ही पतित बनला होतात, आता पुन्हा पावन बनत आहात. छोट्याशा आत्म्यामध्ये केवढा पार्ट आहे. प्रकृतीचा चमत्कार हा आहे, अविनाशी पार्ट चालत रहातो. तो कधीही संपत नाही, अविनाशी गोष्ट आहे, त्यामध्ये अविनाशी पार्ट भरलेला आहे. हे आश्चर्य आहे ना. बाबा समजावून सांगत आहेत - ‘मुलांनो, देही-अभिमानी बनायचे आहे. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा, यामध्ये मेहनत आहे, जास्त पार्ट तुमचा आहे. बाबांचा इतका पार्ट नाहीये, जितका तुमचा आहे’. बाबा म्हणतात - तुम्ही स्वर्गामध्ये सुखी बनता तेव्हा मी विश्रांती घेत बसतो. माझा काही पार्ट नाहीये. या वेळी खूप सेवा करतो ना. हे ज्ञान इतके अद्भुत आहे, तुमच्या व्यतिरिक्त इतर कोणीही जरा सुद्धा जाणत नाहीत. बाबांच्या आठवणीमध्ये राहिल्याशिवाय धारणा देखील होणार नाही. खाणे-पिणे इत्यादीचा फरक पडल्याने धारणेमध्ये फरक पडतो, यामध्ये पवित्रता, खूप चांगली पाहिजे. बाबांची आठवण करणे खूप सोपे आहे. बाबांची आठवण करायची आहे आणि वारसा मिळवायचा आहे म्हणून बाबांनी सांगितले होते तुम्ही स्वतःजवळ सुद्धा चित्र ठेवा. योगाचे आणि वारशाचे चित्र बनवा तेव्हा नशा राहील. आपण ब्राह्मण सो देवता बनत आहोत. नंतर आपण देवता सो क्षत्रिय बनू. ब्राह्मण आहेत पुरुषोत्तम संगमयुगी. तुम्ही पुरुषोत्तम बनता ना. मनुष्यांना या गोष्टी बुद्धीमध्ये पक्क्या करण्यासाठी किती मेहनत करावी लागते. दिवसेंदिवस जितके ज्ञान समजत जाल तितका आनंद सुद्धा वाढेल.

तुम्ही मुले जाणता बाबा आमचे खूप कल्याण करतात. कल्प-कल्प आपली चढती कला होते. इथे रहात असताना उदरनिर्वाह अर्थ देखील सर्व काही करावे लागते. बुद्धीमध्ये राहिले पाहिजे की, आम्ही शिवबाबांच्या भंडाऱ्यातून खातो, शिवबाबांची आठवण करत रहाल तर काळ कंटक सर्व दूर होतील. मग हे जुने शरीर सोडून निघून जाऊ. मुले समजतात - बाबा काहीही घेत नाहीत. ते तर दाता (देणारे) आहेत. बाबा म्हणतात - माझ्या श्रीमतानुसार चाला. तुम्हाला पैशांचे दान कोणाला करायचे आहे, या गोष्टीकडे पूर्णपणे लक्ष द्यायचे आहे. जर कोणाला पैसे दिले आणि त्याने जाऊन दारू इत्यादी प्यायली, वाईट कृत्ये केली तर त्याचे पाप तुमच्यावर येईल. पापात्म्यांशी देवाण-घेवाण करता-करता पाप आत्मा बनतात. किती फरक आहे. पाप-आत्मे पाप-आत्म्यांशीच देवाण-घेवाण करून पाप-आत्मे बनतात. इथे तर तुम्हाला पुण्यात्मा बनायचे आहे त्यामुळे पापात्म्यांशी देवाण-घेवाण करायची नाहीये. बाबा म्हणतात - ‘कोणालाही दुःख द्यायचे नाही, कोणामध्ये मोह ठेवायचा नाही. बाबा देखील सॅक्रीन बनून येतात. जुने कखपण (अवगुण) घेतात आणि किती व्याज देतात. खूप जबरदस्त व्याज मिळते. किती भोळे आहेत, दोन मुठीच्या बदल्यात महाल देऊन टाकतात. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) आता प्रवास संपला आहे, आपल्याला परत घरी जायचे आहे त्यामुळे या जुन्या दुनियेपासून बेहदचे वैराग्य बाळगून बुद्धियोग बाबांच्या आठवणीमध्ये वर लटकवून ठेवायचा आहे.

२) संगमयुगामध्ये बाबांनी जो यज्ञ रचला आहे, या यज्ञाची काळजी घेण्यासाठी सच्चा-सच्चा पवित्र ब्राह्मण बनायचे आहे. कामकाज करत असताना देखील बाबांच्या आठवणीमध्ये रहायचे आहे.

वरदान:-
आदि रत्नाच्या स्मृतीद्वारे आपल्या जीवनाचे मूल्य जाणणारे सदा समर्थ भव

जसे ब्रह्मा आदि देव आहेत, तसे ब्रह्माकुमार-कुमारी देखील आदि रत्न आहेत. आदि देवाची मुले मास्टर आदि देव आहेत. आदि रत्न समजल्यानेच आपल्या जीवनाचे मूल्य जाणू शकाल; कारण ‘आदि रत्न’ अर्थात प्रभूची रत्ने, ईश्वरीय रत्ने - तर किती मौल्यवान झाली, म्हणून सदैव स्वतःला आदि देवाची मुले मास्टर आदि देव, आदिरत्न समजून प्रत्येक कार्य करा तर ‘समर्थ भव’चे वरदान मिळेल. काहीही व्यर्थ जाऊ शकत नाही.

बोधवाक्य:-
ज्ञानी तू आत्मा तो आहे; जो फसवणूक होण्यापूर्वीच पारखून स्वतःला वाचवेल.

आपल्या शक्तीशाली मन्सा द्वारा सकाश देण्याची सेवा करा:-

आता सेवेमध्ये सकाश देऊन, बुद्धींचे परिवर्तन करण्याच्या सेवेचा समावेश करा. मग बघा यश स्वतः तुमच्या समोर झुकेल. सेवेमध्ये जी विघ्ने येतात त्या विघ्नांच्या आवरणाच्या आतमध्ये कल्याणाचे दृश्य लपलेले आहे. फक्त मन्सा-वाचेच्या शक्तीद्वारे विघ्नाचे आवरण दूर करा तेव्हा ते आतील कल्याणाचे दृष्य दिसून येईल.