11-02-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्हाला भगवान शिकवत आहेत, तुमच्याकडे ज्ञान रत्ने आहेत, याच रत्नांचा
धंदा तुम्हाला करायचा आहे, तुम्ही इथे ज्ञान शिकता, भक्ती नाही”
प्रश्न:-
मनुष्य
ड्रामाच्या कोणत्या वंडरफुल गोष्टीला ईश्वराची लीला समजून त्यांची महिमा करतात?
उत्तर:-
जे ज्यामध्ये भावना ठेवतात, त्याचा त्यांना साक्षात्कार होतो तर समजतात हा ईश्वराने
साक्षात्कार घडवला, परंतु होते तर सर्व ड्रामा अनुसार. एकीकडे ईश्वराची महिमा करतात,
दुसरीकडे सर्वव्यापी म्हणून निंदा करतात.
ओम शांती।
भगवानुवाच - मुलांना हे तर समजावून सांगितले गेले आहे की, मनुष्याला अथवा देवतांना
भगवान म्हटले जात नाही. गातात देखील - ब्रह्मा देवताय नमः, विष्णू देवताय नमः, शंकर
देवताय नमः आणि मग म्हटले जाते शिव परमात्माय नमः. हे देखील तुम्ही जाणता ‘शिव’ना
आपले शरीर नाहीये. मूलवतन मध्ये शिवबाबा आणि शाळीग्राम राहतात. मुले जाणतात की, आता
आम्हा आत्म्यांना बाबा शिकवत आहेत, बाकीचे जे काही सत्संग आहेत वास्तविक ते काही सत्
चा संग नाही आहेत. बाबा म्हणतात तो तर मायेचा संग आहे. तिथे असे कोणी समजणार नाहीत
की आपल्याला भगवान शिकवतात. गीता जरी ऐकतील तरीही श्रीकृष्ण भगवानुवाच समजतील.
दिवसें-दिवस गीतेचा अभ्यास कमी होत जातो कारण आपल्या धर्मालाच जाणत नाहीत.
श्रीकृष्णावर तर सर्वांचे प्रेम आहे, श्रीकृष्णालाच झुलवतात. आता तुम्ही समजता आपण
कोणाला झुलवायचे? मुलांना झुलवले जाते, बाबांना तर झुलवू शकत नाही. तुम्ही
शिवबाबांना झुलवणार का? ते बालक तर बनतच नाहीत, पुनर्जन्मामध्ये येत नाहीत. ते तर
बिंदू आहेत. त्यांना काय झुलवणार. श्रीकृष्णाचा अनेकांना साक्षात्कार होतो.
श्रीकृष्णाच्या मुखामध्ये तर सारे विश्व आहे कारण साऱ्या विश्वाचा मालक बनतात. तर
विश्वरूपी लोणी आहे. ते जे आपसामध्ये युद्ध करतात ते देखील सृष्टीरुपी लोण्यासाठीच
युद्ध करतात. समजतात आपण जिंकावे. श्रीकृष्णाच्या मुखामध्ये लोण्याचा गोळा दाखवतात,
असे देखील अनेक प्रकारचे साक्षात्कार होतात. परंतु अर्थ काहीच समजत नाहीत. इथे
तुम्हाला साक्षात्काराचा अर्थ समजावून सांगितला जातो. मनुष्य असे समजतात की, आम्हाला
ईश्वर साक्षात्कार घडवतात. हे देखील बाबा समजावून सांगतात की, ज्याची आठवण करतात,
समजा कोणी श्रीकृष्णाची नवधा भक्ती करत असेल तर अल्पकाळासाठी त्याची मनोकामना पूर्ण
होते. हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. असे म्हणता येणार नाही की, भगवंताने
साक्षात्कार घडवला. जे ज्या भावनेने ज्याची पूजा करतात त्यांना तो साक्षात्कार होतो.
हे ड्रामामध्ये नोंदलेले आहे. ही तर भगवंताची महिमा करतात की ते साक्षात्कार घडवतात.
एकीकडे इतकी महिमा देखील करतात आणि दुसरीकडे मग म्हणतात - भगवान दगडा-मातीमध्ये आहे.
किती अंधश्रद्धेने भक्ति करतात. समजतात - बस्स, श्रीकृष्णाचा साक्षात्कार झाला,
श्रीकृष्णपुरीमध्ये आपण जरूर जाणार. परंतु श्रीकृष्णपुरी येणार कुठून? हे सर्व
रहस्य बाबा तुम्हा मुलांना आता समजावून सांगतात. श्रीकृष्णपुरीची स्थापना होत आहे.
ही आहे कंसपुरी. कंस, आकासुर, बकासुर, कुंभकर्ण, रावण ही सर्व असुरांची नावे आहेत.
शास्त्रामध्ये काय-काय बसून लिहिले आहे.
हे देखील समजावून
सांगायचे आहे की गुरु दोन प्रकारचे आहेत. एक आहेत भक्ती मार्गातील गुरु, ते भक्तीच
शिकवतात. हे बाबा तर आहेत ज्ञानाचे सागर, यांना सद्गुरु म्हटले जाते. हे कधी भक्ती
शिकवत नाहीत, ज्ञानच शिकवतात. मनुष्य तर भक्तीमध्ये किती आनंदीत होतात. झांज
वाजवतात; बनारसमध्ये तुम्ही बघाल तर सर्व देवतांची मंदिरे बनवली आहेत. ही सर्व आहे
भक्तिमार्गाची दुकानदारी, भक्तीचा धंदा. तुम्हा मुलांचा धंदा आहे ज्ञान रत्नांचा,
याला देखील व्यापार म्हटले जाते. बाबा देखील रत्नांचे व्यापारी आहेत. तुम्ही समजता
की ती कोणती रत्ने आहेत! या गोष्टी त्यांनाच समजतील ज्यांना कल्पापूर्वी समजले आहे,
दुसऱ्या कोणाला समजणारसुद्धा नाही. ज्या कोणी मोठ-मोठ्या हस्ती आहेत त्या शेवटीच
येऊन समजून घेतील. कन्व्हर्ट देखील झाले आहेत ना. राजा जनकाची एक कथा ऐकवतात. जनक
मग अनुजनक बनला. जसे कोणाचे नाव श्रीकृष्ण आहे तर म्हणतील तुम्ही
अनु-दैवी-श्रीकृष्ण बनाल. कुठे तो सर्व गुण संपन्न श्रीकृष्ण, कुठे हे! कोणाचे नाव
लक्ष्मी आहे आणि या लक्ष्मी-नारायणाच्या पुढ्यात जाऊन महिमा गातात. हे थोडेच समजते
की हिच्यामध्ये आणि माझ्यामध्ये फरक काय झाला आहे? आता तुम्हा मुलांना नॉलेज मिळाले
आहे, हे सृष्टीचे चक्र कसे फिरते? तुम्हीच ८४ जन्म घ्याल. हे चक्र अनेकदा फिरत आले
आहे. कधी बंद होऊ शकत नाही. तुम्ही या नाटकामध्ये ॲक्टर्स आहात. मनुष्य इतके जरूर
समजतात की आपण या नाटकामध्ये पार्ट बजावण्यासाठी आलो आहोत. बाकी ड्रामाच्या
आदि-मध्य-अंताला जाणत नाहीत. तुम्ही मुले जाणता आम्हा आत्म्यांचे राहण्याचे ठिकाण
परे ते परे आहे. तिथे सूर्य-चंद्राचा प्रकाश देखील नाही आहे. हे सर्व समजणारी मुले
देखील जास्त करून साधारण गरीबच असतात कारण भारतच सर्वात श्रीमंत होता, आता भारतच
सर्वात गरीब बनला आहे. सारा खेळ भारतावरच आहे. भारता सारखा पावन खंड दुसरा कोणताही
नाही. पावन दुनियेमध्ये पावन खंड असतो, दुसरा कोणताही खंड तिथे असतही नाही. बाबांनी
समजावून सांगितले आहे ही सारी दुनिया एक बेहदचे आयलँड (बेट) आहे. जसे लंका एक बेट
आहे. दाखवतात की रावण लंकेमध्ये राहत होता. आता तुम्ही समजता रावणाचे राज्य तर
साऱ्या बेहदच्या लंकेवर आहे. इथे ही सारी सृष्टी समुद्रावर उभी आहे. हे बेट आहे.
यावर रावणाचे राज्य आहे. या सर्व सीता रावणाच्या जेलमध्ये आहेत. त्यांनी (दुनियावाल्यांनी)
तर हदच्या कथा बनवलेल्या आहेत. आहे ही सर्व बेहदची गोष्ट, बेहदचे नाटक आहे,
त्यामध्येच मग छोटी-छोटी नाटके बसून बनवली आहेत. हे चित्रपट इत्यादी देखील आता बनले
आहेत, त्यामुळे बाबांना देखील समजावून सांगण्यासाठी सोपे होते. बेहदचा संपूर्ण
ड्रामा तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे. मूलवतन, सूक्ष्मवतन दुसऱ्या कोणाच्याही
बुद्धीमध्ये असू शकत नाही. तुम्ही जाणता आपण आत्मे मूलवतनचे रहिवासी आहोत. देवता
आहेत सूक्ष्मवतनवासी, त्यांना फरिश्ता देखील म्हणतात. तिथे हाडा-मासाचा पिंजरा असत
नाही. हा सूक्ष्मवतनचा पार्ट देखील थोड्या वेळासाठी आहे. आता तुम्ही सूक्ष्मवतनमध्ये
येता-जाता पुन्हा कधी जाणार नाही. तुम्ही जेव्हा मूलवतन मधून येता तेव्हा व्हाया
सूक्ष्मवतन येत नाही, सरळ येता. आता व्हाया सूक्ष्म वतन जाता. आता सूक्ष्मवतनचा
पार्ट आहे. हे सर्व रहस्य मुलांना समजावून सांगतात. बाबा जाणतात की मी आत्म्यांना
समजावून सांगत आहे. साधु-संत इत्यादी कोणीही या गोष्टींना जाणत नाहीत. ते कधी अशा
गोष्टी करू शकत नाहीत. बाबाच मुलांसोबत बोलतात. ऑर्गन्स शिवाय तर बोलू शकणार नाहीत.
म्हणतात - ‘मी या शरीराचा (ब्रह्मा तनाचा) आधार घेऊन तुम्हा मुलांना शिकवतो’. तुम्हा
आत्म्यांची दृष्टी देखील बाबांकडे जाते. या आहेत सर्व नवीन गोष्टी. निराकार बाबा,
त्यांचे नाव आहे - शिवबाबा. तुम्हा आत्म्यांचे नाव तर आत्माच आहे. तुमच्या शरीराची
नावे बदलतात. लोक म्हणतात परमात्मा नावा-रुपा पासून न्यारे आहेत, परंतु नाव तर
‘शिव’ म्हणतात ना. शिवाची पुजा देखील करतात. समजतात एक, करतात दुसरेच. आता तुम्ही
बाबांचे नाव, रूप, देश, काळ देखील समजले आहात. तुम्ही जाणता कोणतीही वस्तू नाव-रूपा
शिवाय असू शकत नाही. या देखील अति सूक्ष्म समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. बाबा
सांगतात - गायन देखील आहे की, सेकंदामध्ये जीवनमुक्ती अर्थात मनुष्य नरापासून
नारायण बनू शकतात. जेव्हा की बाबा हेविनली गॉड फादर आहेत, आपण त्यांची संतान बनलो
आहोत तरीही स्वर्गाचे मालक आहोत. परंतु हे देखील समजत नाहीत. बाबा म्हणतात -
‘मुलांनो, तुमचे एम ऑब्जेक्टच हे आहे, नरापासून नारायण बनणे. राजयोग आहे ना.
अनेकांना चतुर्भुजचा साक्षात्कार होतो, यावरून हे सिद्ध आहे विष्णुपुरीचे आपण मालक
बनणारे आहोत. तुम्हाला माहित आहे - स्वर्गामध्ये देखील लक्ष्मी-नारायणाच्या
तख्ताच्या पाठीमागे विष्णूचे चित्र लावतात अर्थात विष्णुपुरीमध्ये यांचे राज्य आहे.
हे लक्ष्मी-नारायण विष्णुपुरी चे मालक आहेत. ती आहे श्रीकृष्ण पुरी, ही आहे कंस पुरी.
ही नावे देखील ड्रामा अनुसार दिली गेली आहेत. बाबा समजावून सांगतात - ‘माझे रूप अति
सूक्ष्म आहे. कोणीही जाणू शकत नाही’. म्हणतात की आत्मा एक तारा आहे परंतु मग लिंग
बनवतात. नाही तर पूजा कशी होणार. रुद्र यज्ञ रचतात तेव्हा अंगठ्याप्रमाणे शाळीग्राम
बनवतात. दुसरीकडे त्यांना अजब सितारा म्हणतात. आत्म्याला पाहण्यासाठी खूप प्रयत्न
करतात परंतु कोणीही पाहू शकत नाही. रामकृष्ण, विवेकानंद यांच्या विषयी देखील
दाखवतात ना, त्यांनी पाहिले आत्मा त्यांच्यातून निघून माझ्यामध्ये विलीन झाली. आता
त्यांना कोणाचा साक्षात्कार झाला असेल? आत्मा आणि परमात्म्याचे रूप तर एकच आहे.
बिंदू दिसला, परंतु काहीच समजले नाही. आत्म्याचा साक्षात्कार व्हावा अशी कोणाची
इच्छा नसते. इच्छा ठेवतात की परमात्म्याचा साक्षात्कार घडावा. ते (विवेकानंद) बसले
होते की, गुरुद्वारे परमात्म्याचा साक्षात्कार व्हावा. बस्स, म्हणाले - ज्योती होती
ती माझ्यामध्ये विलीन झाली. यामध्येच ते खूप खुश झाले. समजले हेच परमात्म्याचे रूप
आहे. गुरुंमध्ये भगवंताचा साक्षात्कार व्हावा अशी भावना असते. समजत काहीच नाहीत. भले
भक्तिमार्गामध्ये समजावून सांगणार तरी कोण? आता बाबा बसून समजावून सांगतात -
ज्या-ज्या रूपामध्ये जशी भावना ठेवतात, जो चेहरा पाहतात, तसा साक्षात्कार होतो. जसे
कोणी गणेशाची खूप पूजा करतात तर त्यांना त्याचा चैतन्य रूपामध्ये साक्षात्कार होतो.
नाहीतर त्यांचा विश्वास कसा बसणार. तेजोमय रूप पाहून समजतात की, आम्ही भगवंताचा
साक्षात्कार केला. यामध्येच खुश होतात. हा सर्व आहे भक्तिमार्ग, उतरती कला. पहिला
जन्म चांगला असतो, मग कमी होत-होत अंतामध्ये येतो. मुलेच या गोष्टींना समजतात,
ज्यांना कल्पापूर्वी ज्ञान समजावून सांगितले होते त्यांनाच आता समजावून सांगत आहेत.
कल्पापूर्वीचेच येतील, बाकीच्यांचा तर धर्मच वेगळा आहे. बाबा समजावून सांगत आहेत
प्रत्येक चित्रामध्ये ‘भगवानुवाच’ लिहा. अतिशय युक्तीने समजावून सांगावे लागते.
भगवानुवाच आहे ना - ‘यादव, कौरव आणि पांडव क्या करत भये’, त्याचे हे चित्र आहे.
तुम्ही त्यांना विचारा की, ‘तुम्ही सांगा, आपल्या पित्याला ओळखता का? जर माहित नसेल
तर याचा अर्थ, तुमचे आपल्या पित्यावर प्रेम नाही आहे, तर विपरीत-बुद्धी झालात’.
बाबांवर प्रेम नसेल तर नष्ट व्हाल. ‘प्रीत बुद्धी विजयन्ती, सत्यमेव जयते’ - यांचा
अर्थ देखील बरोबर आहे. बाबांची आठवणच नसेल तर विजय प्राप्त करू शकणार नाही.
आता तुम्ही सिद्ध
करून सांगता – गीता, शिव भगवानाने ऐकवली आहे. त्यांनीच ब्रह्माद्वारे राजयोग शिकवला
आहे. हे तर श्रीकृष्ण भगवानाची गीता समजून शपथ घेतात. त्यांना विचारले पाहिजे -
श्रीकृष्णाला हाजिर-नाजिर समजले पाहिजे की, भगवंताला? म्हणतात ईश्वराला हाजिर-नाजिर
समजून (ईश्वराला उपस्थित आहेत आणि साऱ्या घटना पहात देखील आहेत असे समजून) खरे बोला.
घोटाळा झाला ना. तर शपथ देखील खोटी ठरते. सेवा करणाऱ्या मुलांना गुप्त नशा असायला
हवा. नशेमध्ये समजावून सांगाल तर सफलता होईल. तुमचे हे शिक्षण देखील गुप्त आहे.
शिकवणारे देखील गुप्त आहेत. तुम्ही जाणता आपण नवीन दुनियेमध्ये जाऊन हे बनणार.
महाभारत युद्धा नंतर नवीन दुनिया स्थापन होते . मुलांना आता नॉलेज मिळाले आहे. ते
देखील नंबरवार धारण करतात. योगामध्ये देखील नंबरवार असतात. ही देखील तपासणी केली
पाहिजे की, आपण किती आठवणीमध्ये राहतो? बाबा म्हणतात - हा आता तुमचा पुरुषार्थ
भविष्य २१ जन्मांसाठी होईल. आता नापास झालात तर कल्प-कल्पांतर नापास होत रहाल, उच्च
पद प्राप्त करू शकणार नाही. पुरुषार्थ केला पाहिजे उच्च पद प्राप्त करण्याचा. असे
देखील कितीतरीजण सेंटरवर येतात जे विकारामध्ये जात राहतात आणि मग सेंटरवर येत
राहतात. समजतात ईश्वर तर सर्व पाहतो, जाणतो! आता बाबांना काय पडले आहे जे बसून हे
बघतील. तुम्ही खोटे बोलाल, विकर्म कराल तर तुमचेच नुकसान कराल. हे तर तुम्ही देखील
समजता, काळे तोंड करतो तर उच्च पद प्राप्त करू शकणार नाही. हेच बाबांनी ओळखले तरी
देखील गोष्ट तर एकच झाली ना. त्यांना काय गरज पडली आहे. आपलेच मन खात राहिले पाहिजे
- मी असे कर्म केले तर दुर्गतीला प्राप्त होईन. बाबा का सांगतील? हो, ड्रामामध्ये
आहे त्यामुळे सांगतात देखील. बाबांपासून लपविणे म्हणजे जणू आपलाच सत्यानाश करणे आहे.
पावन बनण्यासाठी बाबांची आठवण करायची आहे, तुम्हाला हीच चिंता लागून राहिली पाहिजे
की आपण चांगल्या रीतीने शिकून उच्च पद प्राप्त करावे. कोणी मेला किंवा जगला, त्याची
काळजी नको. चिंता करायची आहे की, बाबांकडून वारसा कसा मिळवायचा? तर कोणालाही
थोडक्यात समजावून सांगायचे आहे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) गुप्त
नशेमध्ये राहून सेवा करायची आहे. असे कोणतेही कर्म करायचे नाही ज्याने मन खात राहील.
स्वतःला तपासायचे आहे की, आपण किती आठवणीमध्ये राहतो?
२) नेहमी हीच चिंता
रहावी की आपण चांगल्या रीतीने शिकून उच्च पद प्राप्त करावे. कोणतेही विकर्म करून,
खोटे बोलून आपलेच नुकसान करायचे नाही.
वरदान:-
‘मनमनाभव’च्या
महामंत्राद्वारे सर्व दुःखांपासून दूर रहाणारे सदा सुख स्वरूप भव
जेव्हा कोणत्याही
प्रकारचे दुःख आले तर मंत्र घ्या ज्यामुळे दुःख पळून जाईल. स्वप्नामध्ये देखील जराही
दुःखाचा अनुभव होऊ नये, शरीर रोगी झाले, धन वर-खाली झाले, काहीही होवो परंतु दुःखाची
लाट आतमध्ये येता कामा नये. जसे सागरामध्ये लाटा येतात आणि निघून जातात परंतु
ज्यांना त्या लाटांमध्ये पोहता येते ते त्यामध्ये सुखाचा अनुभव करतात. लाटेवरून जंप
मारून असे क्रॉस करतात, जसे काही खेळत आहेत. तर सागराची मुले सुख स्वरूप आहात,
दुःखाची लाटसुद्धा येऊ नये.
बोधवाक्य:-
प्रत्येक
संकल्पामध्ये दृढतेच्या विशेषतेला प्रॅक्टिकलमध्ये आणा तर प्रत्यक्षता होईल.
अव्यक्त इशारे -
एकांत प्रिय बना एकता आणि एकाग्रतेला धारण करा:-
स्व-उन्नतीमध्ये,
सेवेच्या उन्नतीमध्ये एकाने म्हटले, दुसऱ्याने हांजी केले, असे सदैव एकतेने आणि
दृढतेने पुढे जात रहा. जसे दादींचे एकतेचे आणि दृढतेचे संघटन पक्के आहे, तसे आदि
सेवेच्या रत्नांचे संघटन पक्के असावे, याची खूप-खूप आवश्यकता आहे.