11-03-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - बाबा आले आहेत तुम्हा मुलांना सुख-चैन (सुख-शांतीच्या) दुनियेमध्ये घेऊन जाण्याकरिता, चैन आहेच फक्त शांतीधाम आणि सुखधाममध्ये”

प्रश्न:-
या युद्धाच्या मैदानामध्ये माया सर्वात पहिला वार कोणत्या गोष्टीवर करते?

उत्तर:-
निश्चयावर. चालता-चालता निश्चयच तोडून टाकते त्यामुळे हार खातात. जर पक्का निश्चय असला की, बाबा जे सर्वांचे दुःख दूर करून सुख देणारे आहेत, तेच आम्हाला श्रीमत देत आहेत, आदि-मध्य-अंताचे ज्ञान ऐकवत आहेत, तर मग मायेकडून कधीही हार होऊ शकत नाही.

गीत:-
इस पाप की दुनिया से...

ओम शांती।
हे कोणासाठी म्हटले जाते की, ‘कहाँ ले चलो, कैसे ले चलो…’ हे दुनियेमध्ये कोणीही जाणत नाही. तुम्ही ब्राह्मण कुलभूषण नंबरवार पुरुषार्थानुसार जाणता. तुम्ही मुले जाणता की, यांच्यामध्ये (ब्रह्मा तनामध्ये) ज्यांचा प्रवेश आहे, जे आम्हाला आपला स्वतःचा आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान ऐकवत आहेत ते सर्वांचे दुःख दूर करून सर्वांना सुखदायी बनवत आहेत. ही काही नवीन गोष्ट नाहीये. बाबा कल्प-कल्प येतात, सर्वांना श्रीमत देत आहेत. मुले जाणत आहेत बाबा सुद्धा तेच आहेत, आम्ही सुद्धा तेच आहोत. तुम्हा मुलांना हा निश्चय असला पाहिजे. बाबा म्हणतात मी आलो आहे मुलांना सुखधाम, शांतीधाममध्ये घेऊन जाण्याकरिता. परंतु माया निश्चय टिकू देत नाही. सुखधाममध्ये जाता-जाता मग पराभूत करते. हे युद्धाचे मैदान आहे ना. ती युद्धे तर असतात बाहूबळाची, हे आहे योगबळाचे युद्ध. योगबळ खूप प्रसिद्ध आहे, म्हणूनच सर्व ‘योग-योग’ म्हणत असतात. तुम्ही हा योग एकदाच शिकता. बाकी ते (दुनियेवाले) सर्व अनेक प्रकारचे हठयोग शिकवतात. हे त्यांना माहीतच नाही आहे की बाबा कसे येऊन राजयोग शिकवतात. ते काही प्राचीन योग शिकवू शकणार नाहीत. तुम्ही मुले चांगल्या रीतीने जाणता की, हे तेच बाबा राजयोग शिकवत आहेत, ज्यांची आठवण करतात - ‘हे पतित-पावन या’. अशा ठिकाणी घेऊन चला जिथे चैन (शांती) असेल. चैन आहेच मुळी शांतीधाम, सुखधाम मध्ये. दुख:धाम मध्ये चैन कुठून येणार? चैन नाहीये म्हणूनच तर ड्रामा अनुसार बाबा येतात, हे आहे दुःख-धाम. इथे दुःखच दुःख आहे. दुःखाचे डोंगर कोसळणार आहेत. भले कितीही धनवान असतील किंवा कोणीही असेल, कोणते ना कोणते दुःख जरूर असते. तुम्ही मुले जाणता - आम्ही गोड बाबांसोबत बसलो आहोत, जे बाबा आता आलेले आहेत. ड्रामाच्या रहस्याला सुद्धा आता तुम्हीच जाणता. बाबा आता आलेले आहेत आम्हाला सोबत घेऊन जाणार. बाबा आम्हा आत्म्यांना सांगतात कारण ते आम्हा आत्म्यांचे पिता आहेत ना. ज्यांच्यासाठीच हे गायन आहे - ‘आत्मायें परमात्मा अलग रहे बहुकाल…’ शांतीधाममध्ये सर्व आत्मे एकत्र सोबत राहतात. आता बाबा तर आलेले आहेत; बाकी जे थोडे तिथे (शांतीधाममध्ये) बाकी राहिले आहेत, ते देखील वरून खाली येत राहतात. इथे बाबा तुम्हाला कितीतरी गोष्टी समजावून सांगतात. घरी गेल्यावर तुम्ही विसरून जाता. आहे खूप सोपी गोष्ट आणि बाबा जे सर्वांचे सुख-दाता, शांति-दाता आहेत ते बसून मुलांना समजावून सांगत आहेत. तुम्ही किती थोडे आहात. हळू-हळू वृद्धी होत जाईल. तुमचे बाबांवर गुप्त प्रेम आहे. कुठेही राहा, तुमच्या बुद्धीमध्ये असणार - बाबा मधुबनमध्ये बसले आहेत. बाबा म्हणतात - माझी तिथे (मूलवतनमध्ये) आठवण करा. तुमचे निवासस्थान देखील तिथे आहे तर जरूर बाबांना आठवण करणार, ज्यांना म्हणता - ‘तुम मात-पिता…’ ते आता बरोबर तुमच्याकडे आलेले आहेत. बाबा म्हणतात - ‘मी तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आलो आहे. रावणाने तुम्हाला पतित तमोप्रधान बनवले आहे, आता सतोप्रधान पावन बनायचे आहे. पतित कसे येऊ शकतील. पवित्र तर जरूर बनायचे आहे. आता एकही मनुष्य सतोप्रधान नाही आहे. ही आहे तमोप्रधान दुनिया. ही मानवाचीच गोष्ट आहे. मनुष्यासाठीच सतोप्रधान, सतो, रजो, तमोचे रहस्य सांगितले जाते. बाबा मुलांनाच समजावून सांगतात. हे तर खूप सोपे आहे. तुम्ही आत्मे आपल्या घरी (शांतीधाममध्ये) होता. तिथे तर सर्व पवित्र आत्मे राहतात. अपवित्र काही राहू शकत नाहीत. त्याचे नावच आहे मुक्तिधाम. आता बाबा तुम्हाला पावन बनवून परत पाठवतात. नंतर मग तुम्ही पार्ट बजावण्याकरिता सुखधाम मध्ये येता. सतो, रजो, तमोमध्ये तुम्ही येता.

बोलावतात देखील - बाबा आम्हाला तिथे घेऊन चला जिथे चैन (शांती) आहे. साधु-संत इत्यादी कोणालाही हे माहीत नाही आहे की चैन कुठे मिळू शकते? आता तुम्ही मुले जाणता सुख-शांतीची चैन आपल्याला कुठे मिळणार. बाबा आता आम्हाला २१ जन्मांसाठी सुख देण्यासाठी आलेले आहेत. आणि जे शेवटी येतात त्या सर्वांना मुक्ती देण्यासाठी आले आहेत. जे उशिराने येतात त्यांचा पार्टच फार थोडा आहे. तुमचा पार्ट सर्वात मोठा आहे. तुम्ही जाणता आपण ८४ जन्मांचा पार्टबजावून पूर्ण केला आहे. आता चक्र पूर्ण होत आहे. साऱ्या जुन्या झाडाचा आता संपूर्ण नाश व्हायचा आहे. आता तुमचे हे गुप्त गव्हर्मेंट दैवी झाडाचे कलम लावत आहे. ते लोक (दुनियावाले) तर जंगली झाडाचे कलम लावत असतात. इथे बाबा काट्यांपासून बदलून दैवी फुलांचे झाड बनवत आहेत. ते देखील गव्हर्मेंट आहे, आणि हे देखील गुप्त गव्हर्मेंट आहे. ते काय करतात आणि हे काय करतात! फरक तर पहा किती आहे. ते लोक काहीही समजत नाहीत. झाडाचे कलम लावत राहतात, ती जंगली झाडे तर अनेक प्रकारची आहेत. कोणी कसले कलम लावतात, तर कोणी कसले. आता तुम्हा मुलांना बाबा पुन्हा देवता बनवत आहेत. तुम्ही सतोप्रधान देवता होता मग ८४ चे चक्र फिरून आता तमोप्रधान बनले आहात. कोणी कायमचे सतोप्रधान राहील, असे कधी घडतही नाही. प्रत्येक चीज नव्यापासून मग जुनी होतेच. तुम्ही २४ कॅरेट शुद्ध सोने होता, आता नऊ कॅरेट सोन्याचे दागिने बनले आहात, पुन्हा २४ कॅरेट बनायचे आहे. आत्मे असे बनले आहेत ना. जसे सोने तसा दागिना असतो. आता सगळेच काळे-सावळे बनले आहेत. आदर ठेवण्यासाठी म्हणून काळा असा शब्दप्रयोग न करता सावळा म्हणतात. आत्मा सतोप्रधान पवित्र होती आणि आता किती भेसळ पडली आहे. आता पुन्हा पवित्र होण्यासाठी बाबा युक्ती देखील सांगतात. हा आहे योग अग्नी यामुळेच तुमच्यातील भेसळ निघून जाईल. बाबांची आठवण करायची आहे. बाबा स्वतः म्हणतात - अशा प्रकारे माझी आठवण करा. मीच पतित-पावन आहे. तुम्हाला अनेकदा मी पतितापासून पावन बनवले आहे. हे देखील तुम्ही आधी जाणत नव्हता. आता तुम्हाला समजले आहे - आज आपण पतित आहोत, उद्या पावन बनणार. त्यांनी तर कल्पाची आयु लाखो वर्षे लिहून लोकांना घोर अंधारामध्ये टाकले आहे. बाबा येऊन चांगल्या रीतीने सर्व गोष्टी समजावून सांगतात. तुम्ही मुले जाणता आम्हाला कोण शिकवत आहेत, ज्ञानाचे सागर पतित-पावन बाबा जे सर्वांचे सद्गती दाता आहेत. मनुष्य भक्ती मार्गामध्ये किती महिमा गातात परंतु त्याचा अर्थ मात्र काहीच जाणत नाहीत. स्तुती करतात ती देखील सर्वांना मिक्स करून करतात. जसे गुडगुडधानी करतात (सर्वच मिक्स करतात), ज्याने जे शिकवले ते तोंडपाठ केले. आता बाबा म्हणतात - जे काही शिकले आहात, त्या सर्व गोष्टी विसरून जा. जिवंतपणी माझे बना. गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना देखील युक्तीने चालायचे आहे. आठवण एका बाबांचीच करायची आहे. त्यांचा तर आहेच हठयोग. तुम्ही आहात राजयोगी. घरातल्यांना सुद्धा हे शिक्षण (ज्ञान) द्यायचे आहे. तुमचे वर्तन पाहून तुम्हाला फॉलो करतील. कधीही आपसामध्ये भांडायचे नाही. जर भांडत बसाल तर बाकीचे सर्वजण काय समजतील, यांच्यामध्ये तर खूप क्रोध आहे. तुमच्यामध्ये कोणताही विकार राहता कामा नये. मनुष्यांच्या बुद्धीला भ्रष्ट करणारा आहे सिनेमा, हा जसा एक नरक आहे. तिथे गेल्यानेच बुद्धी भ्रष्ट होते. दुनियेमध्ये किती घाण (विकार) आहे. एका बाजूला गव्हर्मेंट कायदे पास करते की १८ वर्षाखालील कोणीही विवाह करू नये; तरीही पुष्कळ विवाह होतच असतात. मुलाला मांडीवर बसवून लग्न लावून देत असतात. आता तुम्ही जाणता बाबा आम्हाला या घाणेरड्या (विकारी) दुनियेमधून घेऊन जातात. आम्हाला स्वर्गाचा मालक बनवतात. बाबा म्हणतात - नष्टोमोहा बना, फक्त माझी आठवण करा. कुटुंब परिवारामध्ये राहत असताना माझी आठवण करा. थोडी मेहनत कराल तेव्हाच तर विश्वाचे मालक बनाल. बाबा म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा आणि आसुरी गुण सोडा. रोज रात्री आपला पोतामेल काढा. हा तुमचा व्यापार आहे. हा व्यापार विरळाच कोणी करेल. एका सेकंदामध्ये गरीबाला मुकुटधारी बनवतात, ही जादूच झाली ना. अशा जादूगाराचा तर हातच पकडला पाहिजे. जे आम्हाला योगबळाद्वारे पतितापासून पावन बनवतात. दुसरे कोणीही बनवू शकत नाही. गंगेपासून कोणी पावन बनू शकत नाही. तुम्हा मुलांमध्ये आता किती ज्ञान आहे. तुम्हाला आतून आनंद झाला पाहिजे - बाबा पुन्हा आलेले आहेत. देवींची देखील किती चित्रे इत्यादी बनवतात, त्यांच्या हातामध्ये शस्त्रास्त्रे देऊन भयंकर बनवतात. ब्रह्माला देखील किती भुजा दाखवतात, आता तुम्ही समजता ब्रह्माच्या भुजा तर लाखो असणार. इतके सर्व ब्रह्माकुमार-कुमारी ही सर्व बाबांची उत्पत्ती आहे ना, तर प्रजापिता ब्रह्माच्या इतक्या भूजा आहेत.

आता तुम्ही आहात रूप-बसंत. तुमच्या मुखावाटे सदैव रत्नेच निघाली पाहिजेत. ज्ञान रत्नांव्यतिरिक्त इतर दुसरी कोणतीही गोष्ट नको. या रत्नांचे मूल्य कोणीही करू शकत नाही. बाबा म्हणतात - मनमनाभव. बाबांची आठवण करा तर तुम्ही देवता बनाल. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

रात्री क्लास ११-३-१९६८ -

तुमच्याकडे प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यासाठी मोठ-मोठ्या व्यक्ती येतात, ते फक्त इतके समजतात की भगवंताच्या प्राप्तीसाठी यांनी हा चांगला मार्ग काढला आहे. जसे भगवंताच्या प्राप्तीसाठी सत्संग इत्यादी करतात, वेद पठण करतात तसेच हे देखील; यांनी हा मार्ग स्विकारला आहे. बाकी हे समजत नाहीत की यांना स्वयं भगवान शिकवत आहेत. फक्त चांगली कर्म करतात, पवित्रता आहे आणि भगवंताची भेट घालून देतात. या देवींनी चांगला मार्ग शोधून काढला आहे, बस्स. ज्यांच्याकडून उद्घाटन केले जाते ते तर स्वतःला खूप उच्च समजतात. काही बड्या हस्ती बाबांच्या बाबतीत समजतात की हा कोणी महान पुरुष आहे, त्यांना जाऊन भेटूया. बाबा तर म्हणतात - पहिले तर फॉर्म भरून पाठवा. तुम्हा मुलांनी प्रथम त्यांना बाबांचा पूर्ण परिचय द्या. परिचयाशिवाय येऊन काय करणार! शिवबाबांना तर तेव्हा भेटू शकतील जेव्हा आधी पूर्ण निश्चय असेल. ओळखल्याशिवाय भेटून काय करणार! बरेच असे श्रीमंत येतात, समजतात आपण यांना काही मदत करावी. गरीब कोणी एक रुपया देतात, श्रीमंत १०० रुपये देतात, गरिबांचा एक रुपया जास्त मोलाचा ठरतो. ते श्रीमंत लोक तर आठवणीच्या यात्रेमध्ये यथार्थरीत्या राहू शकत नाहीत, ते आत्म-अभिमानी बनू शकत नाहीत. पहिले तर पतितापासून पावन कसे बनायचे आहे, ते लिहून द्यायचे आहे. तमोप्रधानापासून सतोप्रधान बनायचे आहे. यामध्ये प्रेरणा इत्यादीचा काही प्रश्नच नाही. बाबा म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर गंज निघून जाईल. प्रदर्शनी इत्यादी पहायला येतात परंतु दोन-तीन वेळा येऊन समजून घेईल तेव्हा समजले पाहिजे की, यांना काहीतरी तीर लागला आहे. देवता धर्माचा आहे, याने चांगली भक्ती केली आहे. भले कोणाला चांगले वाटते परंतु अंतीम ध्येयच समजले नसेल, तर मग तो काय कामाचा. हे तर तुम्ही मुले जाणता ड्रामा तर चालूच राहतो. जे काही चालू आहे बुद्धीने समजतात की, काय होत आहे! तुमच्या बुद्धीमध्ये चक्र फिरत असते, रिपीट होत राहते. ज्यांनी जे काही केले आहे ते करत राहतात. बाबा कोणाकडून घेतील, न घेतील ते त्यांच्या हातामध्ये आहे. भले आता सेंटर्स इत्यादी उघडतात, पैसे कामी येतात. जेव्हा तुमचा प्रभाव पडेल, तेव्हा पैसे काय करणार! मुख्य गोष्ट आहे पतितापासून पावन बनणे. ते तर खूप अवघड आहे, तर मग यामध्ये गुंतून जावे. आपल्याला तर बाबांची आठवण करायची आहे. भाकरी खावी आणि बाबांची आठवण करावी. समजतील पहिले तर आपण बाबांकडून वारसा तर घेऊ. अगोदर तर ‘मी आत्मा आहे’ हे पक्के केले पाहिजे. असे जेव्हा कोणी निघतील तेव्हाच वेगाने धाव घेऊ शकतील. वास्तविक तुम्ही मुले साऱ्या विश्वाला योगबळाने पवित्र बनवता तर मुलांना किती नशा राहिला पाहिजे. मूळ गोष्ट आहेच पवित्रतेची. इथे शिकवले देखील जाते आणि पवित्र सुद्धा बनायचे असते, स्वच्छ सुद्धा रहायचे असते. आतमध्ये दुसरी कोणतीही गोष्ट लक्षात राहता कामा नये. मुलांना समजावून सांगितले जाते - अशरीरी भव. इथे तुम्ही पार्ट बजावण्यासाठी आले आहात. सर्वांना आपापला पार्ट बजावायचाच आहे. हे ज्ञान बुद्धीमध्ये लक्षात राहिले पाहिजे. शिडीच्या चित्रावर सुद्धा तुम्ही समजावून सांगू शकता. रावणराज्य आहेच - पतित, रामराज्य आहे - पावन. तर मग पतितापासून पावन कसे बनावे, अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये रमून गेले पाहिजे, यालाच विचार सागर मंथन म्हटले जाते. ८४ चे चक्र लक्षात राहिले पाहिजे. बाबांनी सांगितले आहे - माझी आठवण करा. ही आहे रूहानी यात्रा. बाबांच्या आठवणीनेच विकर्म विनाश होतात. त्या भौतिक यात्रा केल्याने तर अजूनच विकर्म बनतात. बोला, हा ताईत आहे. हे समजून घ्याल तर सर्व दुःख दूर होतील. ताईत बांधतातच मुळी दुःख दूर होण्यासाठी. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि शुभ रात्री.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) नष्टोमोहा बनून बाबांची आठवण करायची आहे. कुटुंब परिवारामध्ये राहत असताना विश्वाचा मालक बनण्यासाठी मेहनत करायची आहे. अवगुणांना काढून टाकत जायचे आहे.

२) आपले वर्तन असे ठेवायचे आहे की सर्वजण पाहून फॉलो करतील. कोणताही विकार आतमध्ये राहू नये, याची तपासणी करायची आहे.

वरदान:-
डबल सेवेद्वारे अलौकिक शक्तीचा साक्षात्कार करविणारे विश्व सेवाधारी भव

जसे बाबांचे स्वरूपच आहे विश्व सेवक, तसेच तुम्ही देखील बाप समान विश्व सेवाधारी आहात. शरीराने स्थूल सेवा करत असताना मनसाद्वारे विश्व परिवर्तनाच्या सेवेमध्ये तत्पर रहा. एकाच वेळी तनाने आणि मनाने एकत्रित सेवा व्हावी. जे मनसा आणि कर्मणा दोन्ही सेवा एकत्र करतात, त्यांच्याद्वारे पाहणाऱ्यांना अनुभव आणि साक्षात्कार होतो की या कोणी अलौकिक शक्ती आहेत. त्यामुळे या अभ्यासाला निरंतर आणि नैसर्गिक बनवा. मनसा सेवेसाठी विशेष एकाग्रतेचा अभ्यास वाढवा.

बोधवाक्य:-
सर्वांप्रती गुणग्राहक बना परंतु फॉलो ब्रह्मा बाबांना करा.

अव्यक्त इशारे - सत्यता आणि सभ्यता रुपी कल्चरला धारण करा:-

सर्व स्वच्छता आणि निर्भयतेच्या आधारे सत्यतेद्वारे प्रत्यक्षता करा. मुखावाटे सत्यतेची ऑथॉरिटी स्वतःच बाबांची प्रत्यक्षता करेल. आता परमात्म बॉम्बद्वारे (सत्य ज्ञानाद्वारे) धरणीला परिवर्तन करा. याचे सोपे साधन आहे - सदैव वाणीमध्ये अथवा संकल्पामध्ये निरंतर माळेप्रमाणे परमात्म स्मृती असावी. सर्वांमध्ये एकच धून असावी - “मेरा बाबा”. संकल्प, कर्म आणि वाणीमध्ये हीच अखंड धून असावी, हाच अजपाजप असावा. जेव्हा हा अजपाजप होईल तेव्हा बाकी सर्व गोष्टी स्वतःच समाप्त होतील.