11-03-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - आठवणीच्या यात्रेमध्ये रेस करा तर पुण्य आत्मा बनाल, स्वर्गाची बादशाही मिळेल”

प्रश्न:-
ब्राह्मण जीवनामध्ये जर अतींद्रिय सुखाचा अनुभव होत नसेल तर काय समजले पाहिजे?

उत्तर:-
जरूर सूक्ष्ममध्ये देखील काही ना काही पापे होतात. देह-अभिमानामध्ये राहिल्यानेच पापे होतात, ज्या कारणामुळे त्या सुखाची अनुभूती करू शकत नाही. स्वतःला गोप-गोपिका समजत असताना देखील अतींद्रिय सुखाची भासना येत नाही, जरूर काहीतरी चूक होत असेल, त्यामुळे बाबांना सत्य सांगून श्रीमत घेत रहा.

ओम शांती।
निराकार भगवानुवाच. आता निराकार भगवान म्हटलेच जाते शिवाला, त्यांची नावे भले भक्तिमार्गामध्ये कितीही ठेवली आहेत, असंख्य नावे आहेत म्हणून तर विस्तार आहे. बाबा स्वतः येऊन सांगतात की, ‘माझ्या मुलांनो, मज आपल्या शिव पित्याची तुम्ही आठवण करत आला आहात - ‘हे पतित-पावन’, नाव तर जरूर एकच असेल. अनेक नावे चालू शकणार नाहीत. ‘शिवाए नमः’ म्हणतात तर ‘शिव’ हे एकच नाव झाले. रचता देखील एकच झाला. अनेक नावांमुळे तर गोंधळून जातील. जसे तुझे नाव पुष्पा आहे त्याऐवजी तुला शीला म्हटले तर तू प्रतिसाद देशील का? नाही. समजशील की दुसऱ्या कोणाला बोलावत आहेत. ही देखील अशीच गोष्ट झाली. त्यांचे नाव एक आहे, परंतु भक्तिमार्ग असल्या कारणाने, अनेक मंदिरे बनविल्यामुळे तऱ्हेतऱ्हेची नावे दिली आहेत. नाहीतर प्रत्येकाचे एकच नाव असते. गंगा नदीला यमुना नदी म्हणणार नाही. कोणत्याही गोष्टीचे एक नाव प्रसिद्ध असते. हे ‘शिव’ नाव देखील प्रसिद्ध आहे. शिवाए नमः गायले गेले आहे. ब्रह्मा देवताए नमः, विष्णु देवताए नमः, आणि मग म्हणतात - शिव परमात्माए नमः कारण ते आहेत उच्च ते उच्च. मनुष्यांच्या बुद्धीमध्ये असते की उच्च ते उच्च निराकाराला म्हणतात. त्यांचे नाव एकच आहे. ब्रह्माला ब्रह्मा, विष्णूला विष्णूच म्हणणार. अनेक नावे ठेवल्याने गोंधळून जातील. प्रतिसादच मिळत नाही आणि त्यांच्या रूपाला देखील जाणत नाहीत. बाबा येऊन मुलांशीच बोलतात. शिवाए नमः म्हणतात तर एक नाव ठीक आहे. शिव-शंकर म्हणणे देखील राँग होते. शिव-शंकर ही खरेतर वेगवेगळी नावे आहेत. जसे लक्ष्मी-नारायण नाव वेगवेगळे आहे. तिथे नारायणाला काही लक्ष्मी-नारायण म्हणणार नाही. आजकाल तर स्वतःला दोन-दोन नावे देखील देतात. देवतांची अशी डबल नावे नव्हती. राधेचे वेगळे, श्रीकृष्णाचे वेगळे, इथे तर एकाचेच नाव राधाकृष्ण, लक्ष्मीनारायण ठेवतात. बाबा बसून समजावत आहेत क्रिएटर एकच आहेत, त्यांचे नाव देखील एकच आहे. त्यांनाच जाणून घ्यायचे आहे. म्हणतात - ‘आत्मा एका ताऱ्याप्रमाणे आहे’, ‘भ्रकुटी के बीच में चमकता है सितारा’ आणि मग म्हणतात - आत्मा सो परमात्मा. तर परमात्मा देखील तारा झाला ना. असे नाही की आत्मा छोटी किंवा मोठी असते. गोष्टी खूप सोप्या आहेत.

बाबा म्हणतात, तुम्ही बोलावत होता की, ‘हे पतित-पावन या’. परंतु ते कसे पावन बनवतात, हे कोणीही जाणत नाही. गंगेला पतित-पावनी समजतात. पतित-पावन तर एक बाबाच आहेत. बाबा म्हणतात - मी या पूर्वी देखील सांगितले होते - मनमनाभव, मामेकम् (मज एकाची) आठवण करा. फक्त नाव बदलले आहे. मुले समजतात की बाबांची आठवण केल्याने वारसा अंडरस्टुड आहे. मनमनाभव म्हणण्याची देखील गरज नाही. परंतु बाबांना आणि वारशाला पूर्णपणे विसरून गेले आहेत; म्हणूनच सांगतो - ‘मज पित्याची आणि वारशाची आठवण करा’. बाबा आहेत स्वर्गाचे रचयिता तर जरूर बाबांची आठवण केल्याने आपल्याला स्वर्गाची बादशाही मिळेल. मुलगा जन्माला आला आणि पिता म्हणेल वारस आला. मुलीसाठी असे म्हणणार नाहीत. तुम्ही सर्व आत्मे तर संतान आहात. म्हणतात देखील की, आत्मा एक तारा आहे. मग अंगुष्ठाकार कशी काय असू शकते. आत्मा इतकी सूक्ष्म चीज आहे, या डोळ्यांनी पाहता येत नाही. हो, तिला दिव्य दृष्टीद्वारे पाहिले जाऊ शकते कारण अव्यक्त चीज आहे. म्हणतात - दिव्य दृष्टीमध्ये चैतन्य असल्या प्रमाणे दिसून आला आणि मग गायब झाला. मिळाले तर काहीच नाही, फक्त खुश होतात. याला म्हणणार भक्तीचे अल्प सुख. हे आहे भक्तीचे फळ. ज्यांनी खूप भक्ती केली आहे त्यांना ऑटोमॅटिकली नियमानुसार या ज्ञानाद्वारे फळ मिळायचेच असते. ब्रह्मा आणि विष्णू एकत्र दाखवतात. ब्रह्मा सो विष्णू, भक्तीचे फळ विष्णूच्या रूपात मिळत आहे, राजाईचे. विष्णूचा किंवा श्रीकृष्णाचा साक्षात्कार तर खूपदा केला असेल. परंतु लक्षात येते की, भिन्न-भिन्न नावा-रूपामध्ये भक्ती केली आहे. साक्षात्काराला योग अथवा ज्ञान म्हटले जात नाही. नवधा भक्तीने साक्षात्कार झाला. आता साक्षात्कार नाही जरी झाला तरी काही हरकत नाही. एम ऑब्जेक्ट आहेच मनुष्यापासून देवता बनण्याचे. तुम्ही देवी-देवता धर्माचे बनता. बाकी पुरुषार्थ करवून घेण्यासाठी बाबा फक्त एवढेच सांगतात - इतरांमधील बुद्धीचा योग काढून टाका, देहामधूनही बुद्धीचा योग काढून बाबांची आठवण करा. जसे आशिक-माशूक काम देखील करत राहतात परंतु मन माशूकमध्ये गुंतलेले असते. बाबा देखील म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा तरी देखील बुद्धी इतरत्र धावत असते. आता तुम्ही जाणता की, आपल्याला उतरण्यासाठी पूर्ण एक कल्प लागले आहे. सतयुगापासून शिडी उतरतो. थोडी-थोडी खाद (भेसळ) पडत राहते. सतो पासून तमो बनता. मग आता तमो पासून सतो बनण्याकरिता बाबा उडी मारायला लावतात. सेकंदामध्ये तमोप्रधानापासून सतोप्रधान.

तर गोड-गोड मुलांना पुरुषार्थ करावा लागेल. बाबा तर शिकवण देतच राहतात. चांगली-चांगली हुशार मुले स्वतः अनुभव करतात - खरोखर खूप अवघड आहे. कोणी सांगतात, कोणी तर मुळीच सांगत नाहीत. आपल्या अवस्थे विषयी सांगितले पाहिजे. बाबांची आठवणच करत नाहीत तर वारसा कसा मिळणार. नियमानुसार आठवण करत नाहीत, समजतात आम्ही तर शिवबाबांचे आहोतच. आठवण न केल्याने मग खाली कोसळतात. बाबांची निरंतर आठवण केल्याने खाद (भेसळ) निघून जाते, अटेन्शन द्यावे लागते. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत पुरुषार्थ चालत राहील. बुद्धी देखील सांगते - घडोघडी आठवण विसरायला होते. या योगबलाद्वारे तुम्ही बादशाही प्राप्त करता. सगळेच काही सारख्याच वेगाने धाव घेऊ शकत नाहीत, तसे कायदा सांगत नाही. शर्यतीमध्ये देखील थोडासा फरक तर पडतोच. नंबरवन, आणि मग प्लस मध्ये येतात. इथे देखील मुलांची रेस (शर्यत) आहे. मुख्य गोष्ट आहे आठवण करण्याची. हे तर समजता की आपण पाप-आत्म्यापासून पुण्य-आत्मा बनत आहोत. बाबांनी डायरेक्शन दिले आहे, आता पाप केल्याने ते शंभर पट होईल. असे बरेचजण आहेत जे पाप करतात, सांगत नाहीत. आणि मग वृद्धी होत जाते. शेवटी मग फेल होतात. सांगायला लाज वाटते. सत्य न सांगितल्यामुळे स्वतःलाच धोका देतात. कोणाला मग भीती वाटते की, बाबा आमची ही गोष्ट ऐकतील तर काय म्हणतील. कोणी तर छोटीशी चूक देखील सांगण्यासाठी येतात. परंतु बाबा त्यांना म्हणतात, मोठ्या-मोठ्या चुका तर खूप चांगली-चांगली मुले करतात. चांगल्या-चांगल्या महारथींना देखील माया सोडत नाही. माया पैलवानांनाच आपल्या फेऱ्यामध्ये आणते, यामध्ये बहाद्दूर बनावे लागेल. खोटे तर चालू शकणार नाही. खरे सांगितल्यामुळे हलके व्हाल. कितीही बाबा समजावून सांगतात तरी देखील काही ना काही चालतच राहते. अनेक प्रकारच्या गोष्टी असतात. आता जेव्हा बाबांकडून राज्य घ्यायचे आहे तर बाबा म्हणतात की बुद्धी इतर सर्व गोष्टींमधून काढून टाका. तुम्हा मुलांना आता नॉलेज मिळाले आहे, ५ हजार वर्षांपूर्वी भारत स्वर्ग होता. तुम्ही आपल्या जन्मांना देखील जाणले आहे. कोणाचा उलटा-सुलटा जन्म होतो, त्याला डिफेक्टेड म्हटले जाते. आपल्या कर्मानुसारच असे होते. बाकी मनुष्य तर मनुष्यच असतात. तर बाबा समजावून सांगतात की, एक तर पवित्र राहायचे आहे, दुसरे - खोटेपणा, पाप काहीही करायचे नाही, नाहीतर खूप नुकसान होईल. पहा एकाकडून थोडी चूक झाली, तर आला बाबांकडे म्हणाला - ‘बाबा, क्षमा करा. असे काम पुन्हा कधीही करणार नाही’. बाबा म्हणाले - ‘अशा चुका बऱ्याच जणांकडून होतात, तू तर सत्य सांगत आहेस, बरेचजण तर सांगत देखील नाहीत. काही-काही फर्स्टक्लास मुली आहेत, कधीही कुठे बुद्धी जात नाही. जसे मुंबईमध्ये डॉक्टर निर्मला आहे, नंबर वन आहे. एकदम स्वच्छ मन, मनामध्ये कधीही उलटा विचार येणार नाही म्हणूनच हृदयामध्ये स्थान मिळवले आहे. अशा अजूनही काही मुली आहेत. तर बाबा समजावून सांगतात - फक्त सच्च्या मनाने बाबांची आठवण करा. कर्म तर करायचेच आहे. बुद्धियोग बाबांसोबत लागलेला असावा. हात कामाकडे मन ईश्वराकडे. ती अवस्था शेवटची आहे. ज्यासाठीच गातात - अतींद्रिय सुख गोप-गोपिकांना विचारा, जे या अवस्थेला प्राप्त करतात. जे पाप कर्म करतात त्यांची ही अवस्था होत नाही. बाबा चांगल्या प्रकारे जाणतात तेव्हाच तर भक्तिमार्गामध्ये देखील चांगल्या किंवा वाईट कर्माचे फळ मिळते. देणारे तर बाबा आहेत ना. जे कोणालाही दुःख देतील तर नक्कीच दुःख भोगतील. जसे कर्म केले आहे तर ते भोगावेच लागेल. इथे तर बाबा स्वतः हजर आहेत, समजावून सांगत असतात तरी देखील गव्हर्नमेंट आहे, धर्मराज तर माझ्यासोबत आहे ना. यावेळी माझ्यापासून काहीही लपवू नका. असे नाही की बाबा जाणतात, आम्ही शिवबाबांकडून मनातल्या मनात क्षमा मागतो, अजिबात क्षमा मिळणार नाही. पाप कधीही कोणाचे लपून राहणार नाही. पाप केल्यामुळे दिवसेंदिवस पापात्मा बनत जातात. नशिबात नसेल तर मग असेच होते. रजिस्टर खराब होते. एकदा खोटे बोलतात, खरे काय ते सांगत नाहीत, समजून येते असे काम करतच राहतील. खोटे कधीही लपू शकत नाही. तरीही बाबा मुलांना समजावून सांगतात - एका पैशाची चोरी करणारा लाखाची चोरी करणाऱ्या सारखा आहे असे म्हटले जाते; म्हणूनच बाबांना सांगितले पाहिजे ना की, माझ्याकडून ही-ही चूक झाली. जेव्हा बाबा विचारतात तेव्हा म्हणतात चूक झाली, आपणहून स्वतः का नाही सांगत. बाबा जाणतात भरपूर मुले लपवतात. बाबांना सांगितल्याने श्रीमत मिळेल. कुठून तरी चिठ्ठी येते तर तुम्ही बाबांना आधी विचारा की, त्यांना काय उत्तर द्यायचे आहे. विचारल्याने श्रीमत मिळेल. पुष्कळ जणांमध्ये एखादी घाणेरडी सवय असते - तर ती लपवतात. कोणाला लौकिक घरातून काही मिळते. तर बाबा म्हणतात - भले वापरा म्हणजे मग बाबा रिस्पॉन्सिबल झाले. अवस्था पाहून कोणाला सांगतो यज्ञामध्ये पाठवून द्या. तुम्हाला बदलून दिले तर बरे होईल, नाहीतर तेच आठवणीत राहील, बाबा खूप सावध करतात. मार्ग खूप उच्च आहे. पावलोपावली सर्जनचा सल्ला घ्यायचा आहे. बाबा शिकवणच देतील की, अशा प्रकारे चिठ्ठी लिहा तर तीर लागेल, परंतु देह-अभिमान खूप जणांमध्ये आहे. श्रीमतावर न चालल्याने आपले खाते खराब करतात. श्रीमतावर चालल्याने प्रत्येक परिस्थितीमध्ये फायदाच आहे. रस्ता किती सोपा आहे. केवळ आठवणीद्वारे तुम्ही विश्वाचे मालक बनता. वृद्ध मातांकरिता तर बाबा म्हणतात - फक्त बाबांची आणि वारशाची आठवण करा. जर तुम्ही प्रजा बनवत नसाल तर मग राजा-राणी देखील बनू शकणार नाही. तरीही जे लपवतात, त्यांच्यापेक्षाही उच्च पद मिळवू शकतात. बाबांचे कर्तव्य आहे समजावून सांगणे, जेणेकरून पुन्हा असे कोणी म्हणू नयेत की, आम्हाला माहित नव्हते. बाबा सर्व डायरेक्शन देतात. चुक झाली तर ताबडतोब सांगितले पाहिजे. काही हरकत नाही; परंतु पुन्हा करू नकोस. यामध्ये घाबरण्याचा प्रश्नच नाही. प्रेमाने समजावून सांगितले जाते. बाबांना सांगण्यामध्ये कल्याण आहे. बाबा चुचकारून प्रेमाने समजावून सांगतील. नाहीतर मनातून एकदम खचून जातात. यांच्या (ब्रह्मा बाबांच्या) मनातून उतरला तर शिवबाबांच्या मनातून देखील उतरला. असे नाही की आम्ही डायरेक्ट न विचारता कोणती वस्तू घेऊ शकतो, काहीही होणार नाही. जेवढे सांगितले जाते बाबांची आठवण करा, तेवढी बुद्धी बाहेरच्या बाजूला पळत राहते. या सर्व गोष्टी बाबा डायरेक्ट बसून समजावून सांगतात, ज्यांची नंतर शास्त्रे बनतात. यामध्ये गीताच भारताचे सर्वोत्तम शास्त्र आहे. गायले देखील आहे - सर्वशास्त्रमई शिरोमणी गीता, जी भगवंताने गायली. बाकीचे सर्व धर्म तर नंतर येतात. गीता झाली मात पिता, बाकी सर्व झाली मुले. गीतेमध्येच भगवानुवाच आहे. श्रीकृष्णाला तर दैवी संप्रदाय म्हणणार. देवता तर फक्त ब्रह्मा, विष्णू, शंकर आहेत. भगवान तर देवतांपेक्षाही श्रेष्ठ झाले. ब्रह्मा, विष्णू, शंकर तिघांना रचणारा शिव आहे. अगदी स्पष्ट आहे, ब्रह्माद्वारे स्थापना, असे तर कधी म्हणत नाहीत की, श्रीकृष्णद्वारे स्थापना. ब्रह्माचे रूप दाखवले आहे. कशाची स्थापना? विष्णुपुरीची. हे चित्र तर मनावर छापले गेले पाहिजे. आम्ही शिवबाबांकडून यांच्याद्वारे वारसा घेतो. बाबांशिवाय दादेचा (आजोबांचा) वारसा मिळू शकत नाही. जेव्हा कोणीही भेटते तेव्हा हे सांगा की, बाबा म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) ध्येय खूप उच्च आहे त्यामुळे पावलोपावली सर्जनकडून सल्ला घ्यायचा आहे. श्रीमतावर चालण्यातच फायदा आहे, बाबांपासून काहीही लपवायचे नाही.

२) देह आणि देहधाऱ्यांपासून बुद्धीचा योग काढून एका बाबांसोबत लावायचा आहे. कर्म करत असताना देखील एका बाबांच्या आठवणीमध्ये राहण्याचा पुरुषार्थ करायचा आहे.

वरदान:-
सदैव एकरस संपन्न मूडमध्ये राहणारे पुरुषार्थी सो प्रारब्धी स्वरूप भव

बापदादा वतनमधून बघत असतात की बऱ्याच मुलांचे मूड खूपच बदलत असत, कधी आश्चर्यकारक मूड, कधी प्रश्नात्मक मूड, कधी गोंधळलेला मूड, कधी टेन्शन, कधी अटेन्शनचा झुला... परंतु संगमयुग प्रारब्धी युग आहे, पुरुषार्थी युग नाही; त्यामुळे जे बाबांचे गुण तेच मुलांचे, जी बाबांची स्टेज तीच मुलांची - हेच संगमयुगाचे प्रारब्ध आहे. तर सदैव एकरस एकाच संपन्न मूडमध्ये रहा तेव्हाच म्हणणार बाप समान अर्थात् प्रारब्धी स्वरूप असणारे.

बोधवाक्य:-
बापदादांच्या हातामध्ये बुद्धी रुपी हात असेल तर परीक्षा रुपी सागरमध्ये डगमगणार नाही.

हे अव्यक्त इशारे - “निश्चयाच्या फाउंडेशनला मजबूत करून सदैव निर्भय आणि निश्चिंत रहा” फेथफुल (विश्वासू) असल्याची पहिली निशाणी आहे - प्रत्येक सेकंद प्रत्येक पाऊल श्रीमतानुसार ॲक्युरेट चालणे. ॲक्युरेट मूर्ती बनणे अर्थात हातोड्याचे घाव सोसणे. हातोड्यानेच तर तिला ठोकून-ठोकून व्यवस्थित करतात. तुम्ही लोक तर हातोड्याचे घाव सोसण्याच्या बाबतीत अनुभवी झाला आहात, नथिंग न्यू. खेळ वाटतो ना. बघत राहता आणि हसत राहता, आशीर्वाद देत राहता. हिरो ॲक्टर अर्थात ॲक्युरेट पार्ट बजावणारे, निश्चयबुद्धी निश्चिंत आत्मा.

नोट:- आज आम्हा सर्वांच्या अति प्रिय बापदादांच्या नयनांतील नूर, आपल्या हृदयसिंहासनावर बापदादांना बसविणाऱ्या गोड दादी गुलजारजी यांच्या पुण्यस्मृती दिनानिमित्त आपण सर्व ब्राह्मण कुलभूषण भाऊ-बहिणी त्यांच्याद्वारे लाडक्या अव्यक्त बापदादांची जी पालना मिळाली आहे, त्या पालनेचे रिटर्न देण्यासाठी शुभ संकल्प करूया. ज्याप्रमाणे दादीजींनी प्रत्येक पाऊल श्रीमतावर ॲक्युरेट चालून, सदैव आपल्या हसऱ्या चेहऱ्याने सर्वांना आशीर्वाद दिले आणि आशीर्वाद घेतले, ॲक्युरेट पार्ट बजावला. तसा आपण सर्वांनी त्यांच्या पाऊल खुणांवरून चालून त्यांना आपले स्नेह सुमन अर्पण करावे, हीच त्यांच्याप्रती खरी श्रद्धांजली आहे. ओम् शांती.