11-05-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - बाबा आले आहेत, तुम्हा मुलांना आपल्या सारखे महिमा लायक बनविण्याकरिता. बाबांची जी महिमा आहे ती आता तुम्ही धारण करत आहात”

प्रश्न:-
भक्तिमार्गामध्ये परमात्मा माशूकला पूर्णपणे न जाणता देखील कोणते शब्द अतिशय प्रेमाने बोलतात आणि आठवण करतात?

उत्तर:-
अतिशय प्रेमाने म्हणतात आणि आठवण करतात की, ‘हे माशूक तुम्ही जेव्हा याल तेव्हा आम्ही फक्त तुमचीच आठवण करू आणि सर्वांसोबतचा बुद्धियोग तोडून केवळ तुमच्याशी जोडू’. आता बाबा म्हणतात - ‘मुलांनो, मी आलेलो आहे तर देही-अभिमानी बना’. तुमचे पहिले कर्तव्य आहे - प्रेमाने बाबांची आठवण करणे.

ओम शांती।
परमपिता परमात्मा, ज्यांनी आता शरीराचे लोन घेतले आहे ते गोड-गोड जीव-आत्म्यांना बसून समजावून सांगत आहेत की, ‘मी साधारण वृद्ध तनामध्ये येतो. येऊन असंख्य मुलांना शिकवितो’. ब्रह्मामुखवंशावली ब्राह्मण मुलांनाच समजावून सांगतील. जरूर मुखाद्वारेच समजावून सांगतील अजून कोणाला सांगतील. म्हणतात - मुलांनो, तुम्ही मला भक्तिमार्गामध्ये बोलावत आला आहात - ‘हे पतित-पावन’; खास भारतातील आणि आम दुनियेतील सर्वजण बोलावतात. भारतच पावन होता, बाकी सर्व शांतीधाम मध्ये होते. मुलांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की सतयुग-त्रेता कशाला म्हटले जाते, द्वापर-कलियुग कशाला म्हटले जाते. त्यामध्ये कोण-कोण राज्य करत होते, तुमच्या बुद्धीमध्ये पूर्ण नॉलेज आहे. जसे बाबांना रचनेच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान आहे, तसे तुमच्या बुद्धीमध्ये देखील आहे. बाबा जे ज्ञान देतात ते मुलांमध्ये देखील जरूर असले पाहिजे. बाबा येऊन मुलांना आप समान बनवितात. जितकी बाबांची महिमा आहे तितकीच मुलांची सुद्धा आहे. बाबांनी मुलांना जास्त महिमायोग्य बनविले आहे. नेहमी असेच समजा की, शिवबाबा यांच्याद्वारे शिकवितात. आत्माच एकमेकांशी बोलते. परंतु मनुष्य देह-अभिमानी असल्या कारणाने समजतात, अमका शिकवतो आहे. वास्तविक सर्वकाही आत्माच करते. आत्माच पार्ट बजावते. देही-अभिमानी बनायचे आहे. घडोघडी स्वतःला आत्मा समजायचे आहे. जोपर्यंत स्वतःला आत्मा समजणार नाही, तोपर्यंत बाबांची देखील आठवण करू शकणार नाही. विसरून जातात. तुम्हाला विचारले जाते - तुम्ही कोणाची मुले आहात? तर म्हणता - आम्ही शिवबाबांची मुले आहोत. व्हिजिटर बुकमध्ये सुद्धा लिहिलेले आहे - ‘तुमचा पिता कोण आहे?’ तर लगेच देहाच्या पित्याचे नाव सांगतील. अच्छा - आता देहीच्या (आत्म्याच्या) पित्याचे नाव सांगा. तर कोणी श्रीकृष्णाचे, कोणी हनुमानाचे नाव लिहितील, नाहीतर मग लिहितील - आम्हाला माहित नाही. अरे, तुम्ही लौकिक पित्याला ओळखता आणि पारलौकिक पिता ज्यांची तुम्ही दु:खामध्ये नेहमी आठवण करता, त्यांना ओळखत नाही! म्हणतात देखील, ‘हे भगवान दया करा’, ‘हे भगवान एक बाळ द्या’. मागणं मागता ना. आता बाबा अगदी सोपी गोष्ट सांगतात. तुम्ही देह-अभिमानामध्ये जास्त राहता म्हणून बाबांच्या वारशाचा नशा चढत नाही. तुम्हाला तर खूप नशा चढायला हवा. भक्ती करतातच मुळी भगवंताला भेटण्यासाठी. यज्ञ, तप, दान-पुण्य इत्यादी करणे ही सर्व भक्ती आहे. सर्वजण एका भगवंताची आठवण करतात. बाबा म्हणतात - मी तुमचा पतींचाही पती आहे, पित्यांचाही पिता आहे. सर्व पिता भगवंताची आठवण जरूर करतात. आत्मेच आठवण करतात. भले म्हणतात सुद्धा, ‘भ्रकुटी के बीच में चमकता है अजब सितारा…’ परंतु हे समजून न घेता असेच म्हणतात. रहस्या विषयी काहीच माहित नाही. तुम्ही आत्म्यालाच जाणत नाही, तर आत्म्याच्या पित्याला कसे ओळखू शकणार? साक्षात्कार तर होतो तो भक्तिमार्गातील. भक्तिमार्गामध्ये पूजेसाठी मोठी-मोठी लिंग ठेवतात कारण जर बिंदूच्या रूपामध्ये ठेवले तर कोणाला समजू शकणार नाही. ही आहे सूक्ष्म गोष्ट. परमात्मा ज्यांना अखंड ज्योती स्वरूप म्हणतात, मनुष्य म्हणतात त्यांचे कोणतेतरी खूप मोठे रूप आहे. ब्रह्म समाजाचे मठवाले ज्योतीला परमात्मा म्हणतात. दुनियेमध्ये हे कोणालाच माहीत नाही की परमपिता परमात्मा बिंदू आहे, त्यामुळे सर्व गोंधळून गेलेले आहेत. मुले देखील म्हणतात - ‘बाबा, कोणाची आठवण करायची? आम्ही तर ऐकले होते की ते मोठे लिंग आहे, त्यांची आठवण केली जाते. आता बिंदूची आठवण कशी करायची?’ अरे, तुम्ही आत्मा देखील बिंदू आहात, बाबा देखील बिंदू आहेत. आत्म्याला बोलावतात, तर ते जरूर येथेच येऊन बसतील. भक्तिमार्गामध्ये जे साक्षात्कार इत्यादी होतात, ती आहे सर्व भक्ती. भक्ती देखील एकाचीच करत नाहीत, अनेकांना भगवान बनवले आहे. भक्त जे भक्ती करत राहतात, त्यांना भगवान कसे म्हणणार. जर परमात्मा सर्वव्यापी म्हणतात तर मग भक्ती कोणाची करतात. ती देखील वेगवेगळ्या प्रकारे भक्ती करतात.

बाबा समजवतात - मुलांनो, असे समजू नका की, आपल्याला अनेक वर्षे जगायचे आहे. आता तर वेळ खूप जवळ येत चालली आहे. निश्चय ठेवायचा आहे, बाबांना ब्रह्माद्वारे स्थापना करवून घ्यायची आहे. बाबा स्वतः म्हणतात - मी याच्याद्वारे (ब्रह्मा द्वारे) तुम्हाला सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य सांगतो. गातात देखील - ब्रह्माद्वारे स्थापना. हे जाणत नाहीत की, नवीन दुनियेला विष्णूपुरी म्हटले जाते अर्थात विष्णूची दोन रूपे राज्य करत होती. कोणालाच माहीत नाही की विष्णू कोण आहे. तुम्ही जाणता की हे ब्रह्मा-सरस्वतीच नंतर विष्णूची दोन रूपे लक्ष्मी-नारायण बनून पालना करतात. ब्रह्माद्वारे स्थापना, विष्णूपुरी अर्थात स्वर्गाची मग पालना करतील. तुमच्या बुद्धीमध्ये हे आले पाहिजे - बाबा ज्ञानाचा सागर आहेत. मनुष्य सृष्टीचे बीजरूप आहेत. ते या ड्रामाच्या आदि-मध्य-अंताला जाणतात. तेच पतित-पावन आहेत, जो बाबांचा धंदा आहे, तोच तुमचा आहे. तुम्ही देखील पतितापासून पावन बनवता. दुनियेमध्ये एका पित्याची ३-४ मुले असतील, एखादे मूल खूप उच्च पदावर पोहोचलेले असते, एखादे अगदी खालच्या पदावर असते. इथे बाबा तुम्हाला एकच धंदा शिकवतात की, तुम्ही पतितांना पावन बनवा. सर्वांना हे लक्ष्य द्या की, शिवबाबा म्हणतात - माझी आठवण करा. गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवानुवाच असे लिहिले आहे. तुम्हाला समजावून सांगायचे आहे - ‘भगवान तर निराकार, पुनर्जन्म रहित आहे’. बस्स, हीच चूक आहे. आता तुम्ही मुले श्रीकृष्णपुरीचे मालक बनत आहात. कोणी राजधानीमध्ये येतात, कोणी प्रजेमध्ये. श्रीकृष्णपुरी म्हटले जाते, कारण श्रीकृष्ण सर्वांचा खूपच लाडका आहे. मुले लाडकी असतात ना. मुले देखील आई-वडिलांवर प्रेम करतात. त्यांचे हे प्रेम नंतर अनेकांमध्ये विभागले जाते. आता बाबा समजावून सांगतात - तुम्ही स्वतःला शरीर समजू नका. घडोघडी स्वतःला आत्मा निश्चय करा. आत्म-अभिमानी बना. बाबा देखील निराकार आहेत. इथे देखील शरीर लोनवर घ्यावे लागते - समजावून सांगण्यासाठी. शरीराशिवाय काही समजावून सांगू शकणार नाहीत. तुम्हाला तर आपले स्वतःचे शरीर आहे, बाबा मग लोन घेतात. बाकी यामध्ये प्रेरणा इत्यादीची गोष्टच नाही. बाबा स्वतः म्हणतात - मी हे शरीर धारण करून मुलांना शिकवतो कारण तुमची आत्मा जी आता तमोप्रधान बनली आहे, तिला सतोप्रधान बनवायचे आहे. गातात देखील - ‘पतित-पावन या’, परंतु अर्थ समजत नाहीत. आता तुम्हाला समजते आहे की, बाबा कसे येऊन पावन बनवितात. हे देखील तुम्ही जाणता. सतयुगामध्ये फक्त आपलेच छोटे झाड असेल, तुम्ही स्वर्गामध्ये जाल. बाकी जे इतके खंड आहेत त्यांचे नामोनिशाणही नसेल. भारत खंडच स्वर्ग असेल. परमपिता परमात्माच येऊन हेवनची स्थापना करतात. आता हेल (नरक) आहे. प्राचीन भारतखंडच असा आहे जिथे देवतांचे राज्य होते, आता नाहीये. त्यांची इथे मंदिरे आहेत, चित्रे आहेत. तर ही भारताचीच गोष्ट झाली. हे कोणत्याही भारतवासीयांच्या बुद्धीमध्ये येत नाही की भारत स्वर्ग होता, हे लक्ष्मी-नारायण मालक होते, दुसरा कोणताही खंड नव्हता. आता तर अनेक धर्म आले आहेत. भारतवासी धर्म-भ्रष्ट, कर्म-भ्रष्ट बनले आहेत. श्रीकृष्णाला श्याम-सुंदर म्हणतात परंतु अर्थ समजत नाहीत. बरोबर तो सावळा होता ना. म्हणतात - श्रीकृष्णाला साप डसला म्हणून तो सावळा झाला. आता तो तर सतयुगाचा प्रिन्स होता, मग काळा कसा झाला. आता तुम्ही या गोष्टी समजता. श्रीकृष्णाचे आई-वडील देखील आता शिकत आहेत. आई-वडीलांपेक्षा श्रेष्ठ, असे श्रीकृष्णाचे गायन आहे. त्याच्या आई-वडीलांचे काही इतके नाव नाहीये. नाहीतर ज्या आई-वडिलांनी अशा मुलाला जन्म दिला ते आई-वडिल देखील सर्वांना प्रिय वाटले पाहिजेत. परंतु नाही, महिमा सारी राधा-कृष्णाची आहे. आई-वडिलांची नाही. तुमच्या बुद्धीमध्ये ज्ञान आहे. ज्ञान आहे - दिवस, भक्ती आहे - रात्र. रात्रीच्या अंधारामध्ये ठोकरा खात राहतात.

आता तुम्हा मुलांना सांगितले जाते - घरी रहा, ही सेवा देखील करत रहा. कोणालाही समजावून सांगा की, तुम्ही अर्ध्या कल्पाचे आशिक आहात, एका माशूकचे. भक्तिमार्गामध्ये सर्वजण त्यांचीच आठवण करतात तर आशिक झाले ना. परंतु माशूकला पूर्णपणे जाणत नाहीत. आठवण खूप प्रेमाने करतात, ‘हे माशूक, तुम्ही जेव्हा याल तेव्हा आम्ही फक्त तुमचीच आठवण करू, बाकी सर्वांसोबतचा बुद्धियोग तोडून तुमच्याशी जोडू’. असे गात तर होते ना, परंतु बाबांकडून आपल्याला कोणता वारसा मिळतो, हे कोणालाच माहीत नाही. आता बाबा म्हणतात - तुम्ही देही-अभिमानी बना. बाबांची आठवण करणे हे तुम्हा मुलांचे पहिले कर्तव्य आहे. मुलगा नेहमी बाबांची, मुलगी आईची आठवण करते. हमजीन्स (बरोबरीचे) आहेत ना. मुलगा समजतो - मी वडिलांचा वारसदार बनणार. मुलगी असे थोडेच म्हणेल, ती तर समजते की आपल्याला माहेरून सासरी जायचे आहे. आता तुमचे निराकार आणि साकार हे माहेरघर आहे. बोलावतात देखील - ‘हे परमपिता परमात्मा दया करा. दुःख हरण करा सुख द्या, आम्हाला लिबरेट करा, आमचे गाईड बना’. परंतु त्याचा अर्थ मोठे-मोठे विद्वान आचार्य देखील जाणत नाहीत. बाबा तर सर्वांचे लिबरेटर आहेत, तेच सर्वांचे कल्याणकारी आहेत. बाकी जे स्वतःचेच कल्याण करू शकत नाहीत ते इतरांचे काय करणार. इथे बाबा म्हणतात - मी गुप्तपणे येतो, खुदा-दोस्तची गोष्ट ऐकली आहे ना. आता हा कलियुग आणि सतयुगाच्या मधला पूल आहे, त्याच्या पलीकडे जायचे आहे. आता ‘खुदा’ तर बाबा आहेत, ‘दोस्त’ देखील आहेत. माता, पिता, शिक्षकाचा पार्ट देखील बजावतात. इथे तुम्हाला साक्षात्कार झाला तर त्याला जादू-जादू म्हणतात. साक्षात्कार तर नवधा भक्ती करणाऱ्यांना देखील होतात, खूप कडक भक्त असतात. दर्शन द्या नाहीतर मी माझा गळा कापून टाकतो, तेव्हा साक्षात्कार होतो, त्याला नवधा भक्ती म्हटले जाते. इथे नवधा भक्तीचा प्रश्नच नाही. घरी बसल्या-बसल्या देखील अनेकांना साक्षात्कार होत राहतात. दिव्य दृष्टीची चावी माझ्याकडे आहे. अर्जुनाला देखील मीच दिव्य दृष्टी दिली ना. हा विनाश बघ, आपले राज्य बघ. आता मामेकम् (मज एकाची) आठवण कर, तर असा बनशील. आता तुम्ही समजता - विष्णू कोण आहे? मंदिर बांधणारे तर स्वतःच हे जाणत नाहीत. विष्णूद्वारे पालना, ४ भुजांचा अर्थच हा आहे - २ भुजा पतीच्या, २ पत्नीच्या. विष्णूची दोन रूपे लक्ष्मी-नारायण आहेत. परंतु काहीच समजत नाहीत. कशाचेच ज्ञान नाही. ना शिवबाबांचे, ना विष्णूचे. सुरुवातीला बाबांचे खूप आकर्षण होते, खूप जण येत असत. सुरुवातीला सर्व अंगण भरून जात होते. जज, मॅजिस्ट्रेट सर्व येत होते. मग विकारावरून भांडण सुरू झाले, म्हणू लागले मुले जन्माला आली नाहीत तर सृष्टी कशी चालणार. हा तर सृष्टीची वृद्धी होण्यासाठी नियम आहे. गीतेतील गोष्टच विसरले आहेत की, ‘भगवानुवाच - काम महाशत्रू आहे, त्यावर विजय मिळवायचा आहे’. म्हणू लागले - पती-पत्नी दोघेही एकत्र आले तरच त्यांना ज्ञान द्या, एकालाच देऊ नका. आता दोघेही येतील तर देणार ना. पहा, दोघांना एकत्र सुद्धा ज्ञान देतो, तरीही त्यातला एक कोणीतरी ज्ञान घेतो, दुसरा नाही घेत. नशिबातच नसेल तर काय करू शकतो. एक हंस आणि एक बगळा बनतात. इथे तुम्ही ब्राह्मण, देवतांपेक्षाही उत्तम आहात. जाणता - आपण ईश्वरीय संतान आहोत, शिवबाबांची मुले आहोत. तिथे स्वर्गामध्ये तुम्हाला हे ज्ञान असणार नाही, आणि जेव्हा निराकारी दुनिया मुक्तिधाम मध्ये असाल तेव्हा देखील हे ज्ञान तुम्हाला असणार नाही. हे ज्ञान शरीरासोबतच नष्ट होते. आता तुम्हाला ज्ञान आहे, एक बाबा शिकवत आहेत. आता हा खेळ पूर्ण होत आहे, सर्व ॲक्टर्स हजर आहेत. बाबा देखील आले आहेत. राहिलेले आत्मे देखील येत राहतात. जेव्हा सर्व येतील तेव्हा विनाश होईल; नंतर मग बाबा सर्वांना सोबत घेऊन जातील. सर्वांना जायचेच आहे, या पतित दुनियेचा विनाश होणार आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) बाबांचा जो पतितांना पावन बनविण्याचा धंदा आहे, तोच धंदा करायचा आहे. सर्वांना हे लक्ष्य द्यायचे आहे की, बाबांची आठवण करा आणि पावन बना.

२) हे ब्राह्मण जीवन देवतांपेक्षाही उत्तम जीवन आहे, याच नशेमध्ये राहायचे आहे. इतर सर्वांशी असलेला बुद्धीचा योग तोडून एका माशूकची आठवण करायची आहे.

वरदान:-
त्याग आणि स्नेहाच्या शक्तीद्वारे सेवेमध्ये सफलता प्राप्त करणारे स्नेही सहयोगी भव

जसे सुरुवातीला नॉलेजची शक्ती कमी होती परंतु त्याग आणि स्नेहाच्या आधारावर सफलता मिळाली. बुद्धीमध्ये रात्रं-दिवस बाबा आणि यज्ञाकडेच ओढ होती, हृदयापासून शब्द निघत होते - बाबा आणि यज्ञ. याच स्नेहाने सर्वांना सहयोगासाठी प्रवृत्त केले. याच शक्तीमुळे सेंटर्स बनली. साकार स्नेहामुळेच मनमनाभव बनले, साकार स्नेहानेच सहयोगी बनविले. आता देखील त्याग आणि स्नेहाच्या शक्तीद्वारे वेढा घाला (शक्तिशाली वायुमंडळ पसरवा) तर सफलता मिळेल.

बोधवाक्य:-
फरिश्ता बनायचे असेल तर व्यर्थ बोल अथवा डिस्टर्ब करणाऱ्या बोलांपासून मुक्त बना.

हे अव्यक्त इशारे - सदैव अचल, अडोल एकरस स्थितीचा अनुभव करा.

कोणतीही गोष्ट घडली, मग ती प्रकृतीची असो किंवा व्यक्तीची, दोन्ही गोष्टी तुमच्या अचल स्थितीच्या आसनाला जराही हलवू शकणार नाहीत, इतके पक्के आहात ना! जसे पहा शरीर आसनावर टिकू शकले नाही तर ते डळमळू लागेल ना! तसे मन डळमळीत तर होत नाही ना? सदैव अचल अडोल, जरा सुद्धा डळमळू नये. जर कधी डळमळीत होत असाल आणि कधी अचल असाल, तर सिंहासन देखील कधी मिळेल, कधी मिळणारही नाही.