11-06-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“ गोड मुलांनो - आता तुम्हाला संपूर्ण बनायचे आहे कारण आता परत घरी जायचे आहे आणि मग पावन दुनियेमध्ये यायचे आहे’’

प्रश्न:-
संपूर्ण पावन बनण्यासाठी कोणती युक्ती आहे?

उत्तर:-
संपूर्ण पावन बनायचे असेल तर पूर्ण बेगर (भिकारी) बना, देहा सहित सर्व नाती विसरून जा आणि माझी आठवण करा तेव्हाच पावन बनाल. आता तुम्ही या डोळ्यांनी जे काही पाहता हे सर्व नष्ट होणार आहे त्यामुळे धन, संपत्ती, वैभव इत्यादी सर्व विसरून बेगर बना. असे बेगरच प्रिन्स बनतात.

ओम शांती।
गोड-गोड रुहानी मुलांप्रती रुहानी बाबा समजावून सांगत आहेत. हे तर मुले चांगल्या रीतीने समजतात की सुरूवातीला सर्व आत्मे पवित्र असतात. आपणच पावन होतो, ‘पतित’ आणि ‘पावन’ हे आत्म्यासाठीच म्हटले जाते. आत्मा पावन आहे तर सुख आहे. बुद्धीमध्ये येते की आपण पावन बनलो तर पावन दुनियेचे मालक बनणार. यासाठीच आम्ही पुरुषार्थ करतो. ५ हजार वर्षांपूर्वी पावन दुनिया होती. त्यामध्ये अर्धा कल्प तुम्ही पावन होता, बाकी राहिले अर्धे कल्प. या गोष्टी इतर कोणीही समजू शकणार नाही. तुम्ही जाणता, ‘पतित आणि पावन’, ‘सुख आणि दुःख’, ‘दिवस आणि रात्र’ अर्धे-अर्धे आहे. ज्यांना चांगली समज आहे, ज्यांनी खूप भक्ती केली आहे, तेच चांगल्या रीतीने समजतील. बाबा म्हणतात - ‘गोड मुलांनो, तुम्ही पावन होता’. नवीन दुनियेमध्ये केवळ तुम्हीच होता. बाकी जे इतके सगळे आहेत ते सर्व शांतिधाममध्ये होते. सुरुवातीला आपण पावन होतो आणि खूप थोडे होतो, नंतर मग नंबरवार मनुष्य सृष्टी वृद्धीला प्राप्त होते. आता तुम्हा गोड मुलांना कोण समजावून सांगत आहे? बाबा. आत्म्यांना परमात्मा पिता समजावून सांगत आहेत, याला म्हटले जाते संगम. यालाच कुंभ म्हटले जाते. मनुष्य या संगमयुगाला विसरले आहेत. बाबांनी समजावून सांगितले आहे - ४ युगे आहेत, पाचवे हे छोटेसे लीप संगमयुग आहे. त्याचे आयुष्य कमी असते. बाबा म्हणतात - ‘मी यांच्या (ब्रह्मा बाबांच्या) वानप्रस्थ अवस्थेमध्ये प्रवेश करतो, खूप जन्माच्या अंताच्या देखील अंतामध्ये’. मुलांना देखील ही खात्री आहे ना. बाबांनी यांच्यामध्ये प्रवेश केला आहे, यांची (ब्रह्मा बाबांची) देखील बायोग्राफी (जीवन चरित्र) ऐकवले आहे. बाबा म्हणतात - ‘मी आत्म्यांशीच बोलतो. आत्मा आणि शरीर दोघांचा पार्ट एकत्र असतो. यालाच म्हटले जाते जीव-आत्मा’. पवित्र जीव-आत्मा, अपवित्र जीव-आत्मा. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे की सतयुगामध्ये देवी-देवता फार थोडे असतात. मग आपल्या स्वतःसाठी देखील म्हणतील आम्ही जीवात्मे जे सतयुगामध्ये पावन होतो ते मग ८४ जन्मा नंतर पतित बनलो आहोत. पतिता पासून पावन, पावन पासून पतित - हे चक्र फिरतच राहते. आठवण देखील त्या पतित-पावन बाबांची करतात. तर प्रत्येक ५ हजार वर्षानंतर बाबा एकदाच येतात, येऊन स्वर्गाची स्थापना करतात. भगवान एकच आहेत, जरूर तेच जुन्या दुनियेला नवीन बनवतील. मग नव्याला जुने कोण बनवतो? रावण; कारण रावणच देह-अभिमानी बनवतो. शत्रूला जाळले जाते, मित्राला जाळले जात नाही. सर्वांचा मित्र एक बाबाच आहेत, जे सर्वांची सद्गती करतात. त्यांची सर्वजण आठवण करतात कारण ते आहेतच सर्वांना सुख देणारे. तर जरूर दुःख देणारा देखील कोणी असेल. तो आहे ५ विकार रुपी रावण. अर्धा कल्प राम राज्य, अर्धा कल्प रावण राज्य. स्वस्तिक काढतात ना. याचा देखील अर्थ बाबा समजावून सांगतात. यामध्ये पूर्ण चार भाग आहेत. जरा देखील कमी-जास्त नाही. हा ड्रामा एकदम ॲक्युरेट आहे. काहीजण असे समजतात की, आपण ड्रामामधून निघून जावे, खूप दुःखी आहोत, यापेक्षा तर जाऊन ज्योती ज्योत सामावून जावे किंवा ब्रह्ममध्ये लीन व्हावे. परंतु असे कोणीही जाऊ शकत नाही. काय-काय विचार करतात. भक्ती मार्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करतात. संन्यासी शरीर सोडतील तर असे कधी म्हणणार नाहीत की, स्वर्गवासी झाला किंवा वैकुंठवासी झाला. प्रवृत्ती मार्गवाले म्हणतील अमका स्वर्गवासी झाला (स्वर्गात गेला). आत्म्यांना स्वर्ग लक्षात आहे ना. तुम्हाला तर सर्वात जास्त लक्षात आहे. तुम्हाला दोघांच्याही इतिहास-भूगोलाची माहिती आहे, इतर कोणालाच माहिती नाही. तुम्हाला देखील माहित नव्हते. बाबा बसून मुलांना सर्व रहस्ये समजावून सांगतात.

हा मनुष्य सृष्टी रूपी वृक्ष आहे. वृक्षाचे जरूर बीज देखील असायला हवे. बाबाच समजावून सांगतात - ‘पावन दुनिया कशी पतित बनते, मग मी त्याला कसे पावन बनवतो.’ पावन दुनियेला म्हटले जाते स्वर्ग. स्वर्ग पास्ट (भूतकाळ) झाला आता पुन्हा नक्कीच रिपीट होणार आहे म्हणूनच म्हटले जाते - वर्ल्डची हिस्ट्री रिपीट होते अर्थात दुनिया जुन्या पासून नवीन, नवीन पासून जुनी होते. रिपीट म्हणजेच ड्रामा आहे. ‘ड्रामा’ शब्द खूप चांगला आहे, सूट होतो. चक्र हुबेहूब फिरतच राहते, नाटकाला हुबेहूब म्हटले जात नाही. कोणी आजारी पडतात तर सुट्टी घेतात. तर तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे - आपण पूज्य देवता होतो मग पुजारी बनलो. बाबा येऊन पतिता पासून पावन बनण्याची युक्ती सांगत आहेत, जी ५ हजार वर्षांपूर्वी सांगितली होती. फक्त एवढेच सांगतात - ‘मुलांनो, माझी आठवण करा’. बाबा सर्वप्रथम तुम्हाला आत्म-अभिमानी बनवितात. सर्वात पहिला हा धडा शिकवतात - ‘मुलांनो, स्वतःला आत्मा समजा, बाबांची आठवण करा’. इतकी तुम्हाला आठवण करून देतो, तरी देखील तुम्ही विसरून जाता! ड्रामाचा अंत येईपर्यंत विसरतच रहाल. अंतामध्ये जेव्हा विनाशाची वेळ असेल तेव्हा शिक्षण पूर्ण होईल मग तुम्ही शरीर सोडाल. ज्याप्रमाणे सर्प देखील एक जुनी कात टाकून देतो ना. तर बाबा देखील समजावून सांगत आहेत कि तुम्ही जेव्हा बसता किंवा चालता-फिरताना, देही-अभिमानी होऊन रहा. पूर्वी तुम्हाला देह-अभिमान होता. आता बाबा म्हणतात, आत्म-अभिमानी बना. देह-अभिमानामध्ये आल्याने तुम्हाला ५ विकार पकडतात. आत्म-अभिमानी बनल्याने तुम्हाला कोणताही विकार पकडणार नाही. देही-अभिमानी बनून बाबांची अतिशय प्रेमाने आठवण करायची आहे. आत्म्यांना परमात्मा पित्याचे प्रेम मिळते या संगमयुगावर. याला कल्याणकारी संगम असे म्हटले जाते, जेव्हा की पिता आणि मुले येऊन भेटतात. तुम्ही आत्मे देखील शरीरामध्ये आहात. बाबा देखील शरीरामध्ये येऊन तुम्हाला आत्मा निश्चय करायला लावतात. बाबा एकदाच येतात, जेव्हा की सर्वांना परत घेऊन जायचे असते. समजावून देखील सांगतात की, मी तुम्हाला कसे परत घेऊन जाणार आहे. तुम्ही म्हणता देखील - ‘आम्ही सर्व पतित आहोत, तुम्ही पावन आहात.’ तुम्ही येऊन आम्हाला पावन बनवा. तुम्हा मुलांना माहीत नाही आहे की बाबा कसे पावन बनवतील. जोपर्यंत बनवणार नाहीत तोपर्यंत कसे समजणार. हे देखील तुम्ही समजता कि आत्मा छोटासा तारा आहे. बाबा देखील छोटा तारा आहेत. परंतु ते ज्ञानाचा सागर, शांतीचा सागर आहेत. तुम्हाला देखील आप समान बनवितात. हे ज्ञान तुम्हा मुलांना आहे जे तुम्ही मग सर्वांना समजावून सांगता. मग सतयुगामध्ये जेव्हा तुम्ही असाल तेव्हा तुम्हाला हे ज्ञान ऐकवतील काय? नाही. ज्ञान सागर बाबा तर एकच आहेत जे तुम्हाला आता शिकवत आहेत. जीवन कहाणी तर सर्वांची पाहिजे ना. ती तर बाबा सांगतच राहतात. परंतु तुम्ही वेळो-वेळी विसरून जाता, तुमचे माये सोबत युद्ध आहे. तुम्ही फील करता (जाणीव होते) आपण बाबांची आठवण करतो, आणि मग विसरून जातो. बाबा म्हणतात - मायाच तुमची शत्रू आहे, जी तुम्हाला विसरायला लावते अर्थात बाबांपासून बेमुख करते. तुम्ही मुले एकदाच बाबांच्या सन्मुख असता. बाबा एकदाच वारसा देतात. त्या नंतर मग बाबांना सन्मुख येण्याची आवश्यकताच नाही. तुम्हाला आता पाप आत्म्या पासून पुण्य आत्मा, स्वर्गाचा मालक बनविले. बस्स. मग पुन्हा येऊन काय करणार. तुम्ही बोलावलेत आणि मी एकदम वेळ पूर्ण झाल्यावर आलो. दर ५ हजार वर्षा नंतर मी माझ्या वेळेवर येतो. हे कोणालाही माहिती नाहीये. शिवरात्री कशासाठी साजरी करतात, त्यांनी (शिवबाबांनी) काय केले? कोणालाच माहित नाही त्यामुळे शिवरात्रीची सुट्टी इत्यादी काहीच देत नाहीत. इतर सर्वांचा हॉलीडे करतात, परंतु शिवबाबा येतात, इतका पार्ट बजावतात, हे कोणालाही समजून येत नाही. अर्थच जाणत नाहीत. भारतामध्ये किती अज्ञान आहे.

तुम्ही मुले जाणता की शिवबाबा उच्च ते उच्च आहेत तर जरूर मनुष्यांना उच्च ते उच्च बनवतील. बाबा म्हणतात - ‘मी यांना ज्ञान दिले, योग शिकवला आणि मग ते नरापासून नारायण बनले. त्यांनी हे नॉलेज ऐकले आहे’. हे ज्ञान तुमच्यासाठीच आहे, इतर कोणालाही शोभत नाही. पुन्हा तुम्हालाच बनायचे आहे, बाकी कोणीही बनत नाहीत. ही आहे नरा पासून नारायण बनण्याची कथा. ज्यांनी धर्म स्थापन केले, ते सर्व पुनर्जन्म घेत-घेत तमोप्रधान बनले आहेत पुन्हा त्या सर्वांना सतोप्रधान बनायचे आहे. त्या पदानुसार पुन्हा रिपीट करायचे आहे. श्रेष्ठ पार्टधारी बनण्यासाठी तुम्ही किती पुरुषार्थ करत आहात. पुरुषार्थ कोण करून घेत आहेत? बाबा. तुम्ही श्रेष्ठ बनता आणि नंतर मग कधी आठवणही करत नाही. स्वर्गामध्ये थोडेच आठवण कराल. श्रेष्ठ ते श्रेष्ठ बाबा आहेत, मग बनवितात देखील श्रेष्ठ. नारायणाच्याही अगोदर तर श्रीकृष्ण आहे. मग तुम्ही असे का म्हणता की नरा पासून नारायण बनावे? का नाही म्हणत नरा पासून श्रीकृष्ण बनावे? अगोदर नारायण थोडेच बनणार? पहिले तर तुम्ही प्रिन्स श्रीकृष्ण बनणार ना. बाळ तर फुला समान असते, ते तर (लक्ष्मी-नारायण) तरीही युगल बनतात. महिमा ब्रह्मचारीची असते. छोट्या बालकाला सतोप्रधान म्हटले जाते, तुम्हा मुलांना हा विचार आला पाहिजे - आपण सर्वात पहिले जरूर प्रिन्स बनणार. गायले देखील जाते - बेगर टू प्रिन्स. बेगर कोणाला म्हटले जाते? आत्म्यालाच शरीरा सोबत बेगर किंवा श्रीमंत म्हणतात. यावेळी तुम्ही जाणता सर्व बेगर्स बनतात. सर्व नष्ट होते. तुम्हाला या वेळीच शरीरा सहित बेगर बनायचे आहे. धनदौलत जे काही आहे सर्व नष्ट होणार आहे. आत्म्याला बेगर बनायचे आहे, सर्व काही सोडायचे आहे. नंतर मग प्रिन्स बनायचे आहे. तुम्ही जाणता धन दौलत इत्यादी सर्व सोडून बेगर बनून आपण घरी जाणार. मग नवीन दुनियेमध्ये प्रिन्स बनून येणार. जे काही आहे, ते सर्वकाही सोडायचे आहे. ही जुनी चीज काहीही कामाची नाही. आत्मा पवित्र होईल मग इथे येईल पार्ट बजावण्यासाठी. कल्पा पूर्वीप्रमाणे. जसजशी तुम्ही धारणा कराल तितके तुम्हाला उच्च पद मिळेल. भले यावेळी कोणाकडे ५ करोड आहेत, परंतु ते सर्व नष्ट होणार. आपण पुन्हा आपल्या नवीन दुनियेमध्ये जातो. इथे तुम्ही येता नवीन दुनियेमध्ये जाण्यासाठी. इतर कोणताही असा सत्संग नाहीये जिथे कोणी असे समजतील की, आपण नवीन दुनियेसाठी शिकत आहोत. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे बाबा आपल्याला पहिले बेगर बनवून मग प्रिन्स बनवितात. देहाचे सर्व संबंध सोडले म्हणजेच बेगर झाला ना. काहीच नाही आहे. आता भारतामध्ये काहीही राहिलेले नाही आहे. भारत आता बेगर, पतित आहे. मग पावन होईल. कोण बनतात? आत्मा शरीर द्वारे बनते. आता राजा-राणी सुद्धा नाही आहे. ते देखील अपवित्र आहेत, राजा राणीचा मुकुट देखील नाही. ना तो लाईटचा मुकुट आहे, ना रत्नजडित मुकुट आहे. अंधेरी नगरी आहे, सर्वव्यापी म्हणतात. जणू सर्वांमध्ये भगवान आहे. सर्व एकसारखे आहेत, कुत्रा-मांजर सर्वांमध्ये आहे, यालाच म्हटले जाते - ‘अन्धेर नगरी…’ तुम्हा ब्राह्मणांची रात्र होती. आता समजता दिवस येत आहे. सतयुगामध्ये सर्व जागती ज्योत आहेत. आता दिवा एकदम डल झाला आहे. भारतामध्येच दिवा प्रज्वलित करण्याचा रिवाज आहे. इतर कोणी थोडाच दिवा प्रज्वलित करतात. तुमची ज्योत विझलेली आहे. सतोप्रधान विश्वाचे मालक होते, ती ताकद कमी होत-होत आता काहीच ताकद राहिलेली नाहीये. तर पुन्हा बाबा आले आहेत तुम्हाला ताकद देण्यासाठी. बॅटरी भरते. आत्म्याला परमात्मा बाबांची आठवण राहिल्याने बॅटरी भरते. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) आता नाटक पूर्ण होत आहे, आपल्याला परत जायचे आहे म्हणून आत्म्याला बाबांच्या आठवणी द्वारे सतोप्रधान, पावन जरूर बनवायचे आहे. बाप समान ज्ञानाचा सागर, शांतीचा सागर आताच बनायचे आहे.

२) या देहा पासून देखील पूर्णपणे बेगर बनण्यासाठी हे बुद्धीमध्ये रहावे की या डोळ्यांनी जे काही पाहतो आहोत, ते सर्व नष्ट होणार आहे. आपल्याला बेगर पासून प्रिन्स बनायचे आहे. आपले शिक्षण आहेच नवीन दुनियेसाठी.

वरदान:-
चमत्कार दाखविण्या ऐवजी अविनाशी भाग्याचा चमकणारा सितारा बनविणारे सिद्धी स्वरूप भव

आज-काल जे अल्पकालीन सिद्धीवाले आहेत ते शेवटी वरून आल्या कारणामुळे सतोप्रधान स्टेज प्रमाणे पवित्रतेच्या फलस्वरूपामध्ये अल्पकाळाचे चमत्कार दाखवतात परंतु ती सिद्धी सदाकाळ राहत नाही कारण थोड्या वेळामध्येच ते सतो, रजो, तमो तीनही स्टेजेस मधून पार होतात. तुम्ही पवित्र आत्मे सदैव सिद्धी स्वरूप आहात, चमत्कार दाखविण्या ऐवजी चमकणारी ज्योती स्वरूप बनविणारे आहात. अविनाशी भाग्याचा चमकणारा सितारा बनविणारे आहात, म्हणून सर्व तुमच्याकडेच अंचली (सकाश) घेण्यासाठी येतील.

बोधवाक्य:-
बेहदच्या वैराग्य वृत्तीचे वायुमंडळ असेल तर सहयोगी सहज योगी बनाल.