11-07-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - सुन्न अवस्था अर्थात अशरीरी बनण्याची हीच वेळ आहे, याच अवस्थेमध्ये राहण्याचा अभ्यास करा’’

प्रश्न:-
सर्वोच्च ध्येय कोणते आहे, ते कसे प्राप्त होईल?

उत्तर:-
संपूर्ण सिव्हीलाइज् (पावन) बनणे, हेच उच्च ध्येय आहे. कर्मेंद्रियांमध्ये जरा देखील चंचलता येऊ नये तेव्हा संपूर्ण पावन बनाल. जेव्हा अशी अवस्था होईल तेव्हा विश्वाची बादशाही मिळू शकते. गायन देखील आहे - ‘चढे तो चाखे…’ अर्थात राजांचाही राजा बनेल, नाहीतर प्रजा. आता चेक करा - माझी वृत्ती कशी आहे? कोणती चूक तर होत नाही ना?

ओम शांती।
आत्म-अभिमानी होऊन बसायचे आहे. बाबा मुलांना समजावून सांगत आहेत की, ‘स्वतःला आत्मा समजा’. आता बाबा ऑलराऊंडरला (दादी गुलजारजींच्या लौकिक मातेला) विचारत आहेत - ‘सतयुगामध्ये आत्म-अभिमानी असतात की देह-अभिमानी?’ तिथे तर आपोआपच आत्म-अभिमानी असतात, वेळो-वेळी आठवण करण्याची गरजच राहत नाही. हो, तिथे असे समजतात की आता हे शरीर मोठे झाले आहे, आता याला सोडून दुसरे नवीन घ्यायचे आहे. जसे सापाचे उदाहरण आहे, तसे आत्मा देखील हे जुने शरीर सोडून नवीन घेते. भगवान उदाहरण देऊन समजावून सांगतात. तुम्हाला, सर्व मनुष्यांना ज्ञानाची भू-भू करून आप समान ज्ञानवान बनवायचे आहे. ज्याद्वारे परिस्तानी निर्विकारी देवता बनतील. उच्च ते उच्च शिक्षण आहे - मनुष्या पासून देवता बनणे. गायन देखील आहे ना - ‘मनुष्य को देवता किये…’ कोणी केले? देवतांनी केले नाही, भगवानच मनुष्यांना देवता बनवतात. मनुष्य या गोष्टींना जाणत नाहीत. तुम्हाला सर्व ठिकाणी विचारतात - ‘तुमचे एम ऑब्जेक्ट काय आहे?’ तर मग का नाही एम ऑब्जेक्टचे छोटे पत्रकच छापून ठेवावे. म्हणजे कोणीही विचारले तर त्यांना हे पत्रक द्या ज्यावरून समजतील. बाबांनी खूप चांगल्या रीतीने समजावून सांगितले आहे - यावेळी ही कलियुगी पतित दुनिया आहे ज्यामध्ये महाभयंकर दुःख आहे. आता आम्हा मनुष्यांना सतयुगी पावन महान सुखधाममध्ये घेऊन जाण्याची सेवा करत आहेत किंवा रस्ता सांगत आहेत. असे नाही की आम्ही अद्वैत नॉलेज देतो. ते लोक शास्त्रांच्या नॉलेजला अद्वैत नॉलेज समजतात. वास्तविक ते काही अद्वैत नॉलेज नाही आहे. अद्वैत नॉलेज लिहिणे देखील चुकीचे आहे. लोकांना स्पष्ट करून सांगायचे आहे, अशी लेखी माहिती छापलेली असावी जेणेकरून लगेच समजतील की यांचे ध्येय काय आहे? कलियुगी पतित भ्रष्टाचारी मनुष्यांना आम्ही अपार दुःखातून बाहेर काढून सतयुगी पवित्र श्रेष्ठाचारी अपार सुखाच्या दुनियेमध्ये घेऊन जातो. बाबा हा निबंध मुलांना देत आहेत. असे क्लियर करून लिहायचे आहे. सर्व ठिकाणी अशी तुमची लेखी माहिती ठेवलेली असावी, लगेचच ती काढून दिली पाहिजे तेव्हा समजतील की, आपण तर दुःखधाममध्ये आहोत. घाणीमध्ये पडलेले आहोत. कोणी मनुष्य असे थोडेच समजतात की आम्ही कलियुगी पतित दुःखधामातील मनुष्य आहोत. हे आपल्याला अपार सुखामध्ये घेऊन जातात. तर असे एक चांगले पत्रक बनवायचे आहे. जसे बाबांनी देखील छापून घेतले होते - ‘सतयुगी आहात कि कलियुगी?’ परंतु मनुष्य समजतात थोडेच. रत्नांना देखील दगड समजून फेकून देतात. हि आहेत ज्ञान रत्ने. ते समजतात शास्त्रांमध्ये रत्ने आहेत. तुम्ही स्पष्ट करून असे सांगा जेणेकरून समजतील इथे तर अपार दुःख आहे. दुःखांची देखील लिस्ट असावी, कमीत-कमी १०१ तर जरूर असावीत. या दुःखधाममध्ये अपार दुःख आहेत, हे सर्व लिहा, सर्व लिस्ट काढा. दुसऱ्या बाजूला मग अपार सुख, तिथे दुःखाचे नाव सुद्धा नसते. आम्ही ते राज्य किंवा सुखधाम स्थापन करत आहोत; तर लोकांचे लगेच तोंड बंद होईल. हे कोणी समजतात थोडेच की यावेळी हे दुःख धाम आहे, यालाच तर ते स्वर्ग समजून बसले आहेत. मोठ-मोठे बंगले, नवीन-नवीन मंदिरे इत्यादी बनवत राहतात, हे थोडेच जाणतात की हे सर्व नष्ट होणार आहे. त्यांना तर लाच खाऊन खूप पैसे मिळतात. बाबांनी सांगितले आहे हा सर्व आहे मायेचा, सायन्स वाल्यांचा अहंकार, मोटार गाड्या, विमाने इत्यादी हा सर्व मायेचा शो आहे. हा देखील नियम आहे, जेव्हा बाबा स्वर्गाची स्थापना करतात तर माया देखील आपला भपका दाखवते. यालाच म्हटले जाते मायेचा थाट.

आता तुम्ही मुले साऱ्या विश्वामध्ये शांती स्थापन करत आहात. जर कधी मायेची प्रवेशता झाली तर मुलांना आतमध्ये खात राहते. जेव्हा कोणी कोणाच्या नावा-रूपामध्ये फसतात तर बाबा म्हणतात की, हि गुन्हेगारी आहे. कलियुगामध्ये आहे क्रिमिनलायझेशन (गुन्हेगारीपणा). सतयुगामध्ये आहे सिविलायझेशन (सुसंस्कृतपणा). या देवतां समोर सर्वजण डोके टेकतात, ‘तुम्ही निर्विकारी आम्ही विकारी’. यासाठी बाबा म्हणतात प्रत्येकाने आपल्या अवस्थेला पहा. अतिशय चांगल्या महारथींनी स्वतःला पहावे आपली बुद्धी कोणाच्या नावा-रूपामध्ये तर जात नाही? अमकी खूप चांगली आहे, असे करावे - असे काही आतून वाटते का? हे तर बाबा जाणतात यावेळी संपूर्ण सिविलाइज्ड (संपूर्ण पावन) कोणीही नाहीत. जरा देखील चंचलता येऊ नये, खूप मेहनत आहे. कोणी विरळेच असे असतात. डोळे काही ना काही धोका जरूर देतात. ड्रामा इतक्या लवकर कोणाचीही पवित्र दृष्टी बनवणार नाही. खूप पुरुषार्थ करून स्वतःची तपासणी करायची आहे - कुठे माझे डोळे धोका तर देत नाहीत ना? विश्वाचा मालक बनणे हे खूप मोठे ध्येय. ‘चढ़े तो चाखे…’ अर्थात राजांचाही राजा बनत असताना, कोसळलात तर प्रजेमध्ये निघून जाल. आजकाल तर म्हणणार विकारी दुनिया आहे. भले कितीही मोठ्या व्यक्ती आहेत, समजा क्वीन (महाराणी) आहे त्यांना देखील भीती वाटत असेल ना की कुठे कोणी आपल्याला उडवणार तर नाही ना. प्रत्येक मनुष्यामध्ये अशांती आहे. काही-काही मुले देखील किती अशांती पसरवतात. तुम्ही शांती स्थापन करत आहात, तर आधी स्वतः तर शांतीमध्ये रहा, तेव्हा दुसऱ्यांमध्ये देखील ते बळ भराल. तिथे तर अतिशय शांतीचे राज्य चालते. दृष्टी पावन बनते. तर बाबा म्हणतात स्वतःची तपासणी करा - आज मज आत्म्याची वृत्ती कशी राहिली? यामध्ये खूप मेहनत आहे. स्वतःची काळजी घ्यायची आहे. बेहदच्या पित्याला देखील कधी खरे सांगत नाहीत. पावलो-पावली चुका होत राहतात. थोडे जरी त्या क्रिमिनल दृष्टीने पाहिले, चूक झाली, लगेचच नोट करा. जोपर्यंत अभुल (निर्दोष) होत नाहीत तोपर्यंत १०-२० चुका तर रोज होतच असतील. परंतु खरे कोणी सांगतात थोडेच. देह-अभिमानी कडून काही ना काही पाप जरूर होईल. ते आतमध्ये खात राहील. काहींना तर समजतही नाही की चूक कशाला म्हणतात. जनावरांना समजते काय! तुम्ही देखील या ज्ञानाच्या आधी मर्कट-बुद्धी होता. आता कोणी ५० टक्के, कोणी १० टक्के, कोणी किती चेंज होत जातात. हे डोळे तर खूप धोका देणारे आहेत. सर्वात तीक्ष्ण आहेत डोळे.

बाबा म्हणतात तुम्ही आत्मा अशरीरी आला होतात. शरीर नव्हते. तुम्हाला आता माहित आहे काय की आपण पुढे दुसरे कोणते शरीर घेणार, कोणत्या संबंधांमध्ये जाणार? हे काहीच माहित होत नाही. गर्भामध्ये सुन्नच सुन्न असतात. आत्मा एकदमच सुन्न होते. जेव्हा शरीर मोठे होते तेव्हा समजणार. तर तुम्हाला असे बनून जायचे आहे. बस, हे जुने शरीर सोडून आपल्याला जायचे आहे मग जेव्हा शरीर घेणार तेव्हा स्वर्गामध्ये आपला पार्ट बजावणार. आता सुन्न होण्याची वेळ आहे. भले आत्मा संस्कार घेऊन जाते, जेव्हा शरीर मोठे होते तेव्हा संस्कार इमर्ज होतात. आता तुम्हाला घरी जायचे आहे म्हणून जुन्या दुनियेचे, या शरीराचे भान काढून टाकायचे आहे. कशाचीही आठवण येऊ नये. खूप संयम ठेवायचा आहे. जे आतमध्ये असेल तेच बाहेर निघेल. शिवबाबांमध्ये देखील ज्ञान आहे, माझा देखील पार्ट आहे. माझ्यासाठीच म्हणतात - ‘ज्ञानाचा सागर…’ महिमा गातात, अर्थ काहीच जाणत नाहीत. आता तुम्ही अर्थासहित जाणता. बाकी आत्म्याची बुद्धी अशी वर्थ नाट ए पेनी होते. आता बाबा किती बुद्धिवान बनवतात. लोकांकडे तर कोटी, पद्म आहेत. हा मायेचा थाट आहे ना. सायन्समध्ये ज्या आपल्या कामाच्या वस्तू आहेत, त्या तिथे देखील असतील. ते बनविणारे तिथे देखील जातील. राजा तर बनणार नाहीत. हे लोक शेवटी तुमच्याकडे येतील मग इतरांना देखील शिकवतील. एका बाबांकडून तुम्ही किती शिकता. एक बाबाच दुनियेला कशा पासून काय बनवतात. नेहमी एक शोध लावतात आणि मग त्याचा प्रसार करतात. बॉम्ब बनविणारा देखील अगोदर एकच होता. कळले की याने दुनियेचा विनाश होणार. तर मग आणखी बनवत गेले. तिथे देखील सायन्स तर पाहिजे ना. वेळ बाकी आहे, शिकून हुशार होतील. बाबांची ओळख मिळाली मग स्वर्गामध्ये येऊन नोकर-चाकर बनतील. तिथे सर्व सुखाच्या गोष्टी असतात. जे सुखधाममध्ये होते ते पुन्हा असेल. तिथे काही आजार-दु:ख इत्यादीची गोष्ट नाही. इथे तर अपार दुःख आहे. तिथे अपार सुख आहे. आता आपण हे स्थापन करत आहोत. दुःखहर्ता, सुखकर्ता एक बाबाच आहेत. आधी तर स्वतःची देखील अशी अवस्था पाहिजे, केवळ पांडित्य नको आहे. अशी एका पंडिताची कथा आहे - म्हणाला, ‘रामाचे नाव घेतल्याने पार व्हाल…’ ही या वेळचीच गोष्ट आहे. तुम्ही बाबांच्या आठवणीमध्ये विषय सागरातून क्षीरसागरामध्ये जाता. इथे तुम्हा मुलांची अवस्था खूप चांगली पाहिजे. योगबळ नसेल, विकारी दृष्टी असेल तर त्यांचा तिर लागू शकत नाही (त्याने सांगितलेली गोष्ट काळजाला भिडणार नाही). दृष्टी पावन पाहिजे. बाबांच्या आठवणीमध्ये राहून कोणाला ज्ञान द्याल तर तीर लागेल. ज्ञान तलवारीमध्ये योगाची धार (शक्ती) पाहिजे. नॉलेज द्वारे धनाची कमाई होते. ताकद आहे आठवणीची. बरीच मुले तर अजिबात आठवणच करत नाहीत, जाणतच नाहीत. बाबा म्हणतात - ‘लोकांना समजावून सांगायचे आहे की, हे आहे दुःखधाम, सतयुग आहे सुखधाम’. कलियुगामध्ये सुखाचे नाव सुद्धा नाही. जरी असले तरी ते देखील कागविष्ठे समान आहे. सतयुगामध्ये तर अपार सुख आहे. मनुष्य अर्थ समजत नाहीत. मुक्तीसाठीच डोकेफोड करत राहतात. जीवनमुक्तीला तर कोणी जाणतही नाहीत. तर मग ज्ञान तरी कसे देऊ शकतील. ते येतातच रजोप्रधान वेळेमध्ये मग ते राजयोग कसा बरे शिकवतील! इथे तर सुख आहे कागविष्ठे समान. राजयोगाने काय झाले होते - हे देखील जाणत नाहीत. तुम्ही मुले जाणता हा देखील सर्व ड्रामा सुरू आहे. वर्तमानपत्रांमध्ये देखील तुमच्यावर टीका करतात, हे तर होणारच आहे. अबलांवर विविध अत्याचार होतात. दुनियेमध्ये अनेक दुःख आहेत. आता काही सुख थोडेच आहे. भले कितीही मोठा श्रीमंत आहे, आजारी पडला, आंधळा झाला तर दु:ख तर होते ना. दु:खाच्या लिस्टमध्ये सर्व लिहा. रावण राज्य कलियुगाच्या अंतामध्ये या सर्व गोष्टी आहेत. सतयुगामध्ये एकही दुःखाची गोष्ट नसते. सतयुग तर होऊन गेले आहे ना. आता आहे संगमयुग. बाबा देखील संगमावरच येतात. आता तुम्ही जाणता ५ हजार वर्षांमध्ये आपण कोण-कोणते जन्म घेतो. कसे मग सुखातून दुःखामध्ये येतो. ज्यांना संपूर्ण ज्ञान बुद्धीमध्ये आहे, धारणा आहे ते समजू शकतात. बाबा तुम्हा मुलांची झोळी भरतात. गायन देखील आहे - ‘धन दिये धन ना खुटे’ . धन दान करत नाहीत म्हणजे जणू त्यांच्याकडे नाहीच आहे. तर मग मिळणार देखील नाही. हिशोब आहे ना! देतच नाहीत तर मिळणार तरी कुठून. वृद्धी कशी होणार. हि सर्व आहेत अविनाशी ज्ञान रत्ने. नंबरवार तर प्रत्येक गोष्टीमध्ये असतात ना. ही देखील तुमची रुहानी सेना आहे. कोणती आत्मा जाऊन उच्च पद प्राप्त करेल, कोणती आत्मा प्रजा पद प्राप्त करेल. जसे कल्पापूर्वी प्राप्त केले होते. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती नंबरवार पुरुषार्थानुसार बापदादा आणि मात-पित्याची अंतःकरणापासून, उत्कट प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) आपली काळजी घेण्यासाठी पावलो-पावली तपासणी करायची आहे की:- अ) आज मज आत्म्याची वृत्ती कशी होती? ब) पवित्र दृष्टी होती का? क) देह-अभिमान वश कोणते पाप झाले?

२) बुद्धीमध्ये अविनाशी ज्ञान-धन धारण करून मग दान करायचे आहे. ज्ञान तलवारीमध्ये आठवणीचे जौहर (शक्ती) जरूर भरायची आहे.

वरदान:-
सत्यतेच्या ऑथॉरिटीला धारण करून सर्वांना आकर्षित करणारे निर्भय आणि विजयी भव

तुम्ही मुले सत्यतावाले शक्तिशाली श्रेष्ठ आत्मे आहात. सत्य ज्ञान, सत्य पिता, सत्य प्राप्ती, सत्य आठवण, सत्य गुण, सत्य शक्ति सर्व प्राप्त आहे. एवढ्या मोठ्या ऑथॉरिटीचा नशा राहीला तर ही सत्यतेची ऑथॉरिटी प्रत्येक आत्म्याला आकर्षित करत राहील. झूठ खंडामध्ये देखील अशी सत्यतेची शक्ती असणारे विजयी बनतात. सत्यतेची प्राप्ती - खुशी आणि निर्भयता आहे. सत्य बोलणारा निर्भय असेल. त्याला कधीही भीती वाटू शकत नाही.

बोधवाक्य:-
वायुमंडळाला परिवर्तन करण्याचे साधन आहे - पॉझिटिव्ह संकल्प (सकारात्मक विचार) आणि शक्तिशाली वृत्ती.