11-07-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, तुम्हाला स्वतःचे चिंतन करायचे आहे, दुसऱ्यांचे नाही कारण ड्रामा अनुसार जो करेल त्याला मिळेल”

प्रश्न:-
त्रिकालदर्शी बनल्यामुळे आत्म्याला कोणती स्मृती आली आहे?

उत्तर:-
आत्म्याला स्मृती आली आहे की, आपण खरे मूलवतनाचे निवासी या ड्रामामध्ये पार्ट बजावण्याकरिता आलो आहोत, आम्ही मुख्य ॲक्टर बनून ८४ जन्मांचा पार्ट बजावला आहे. आता बाबांच्या सन्मुख आहोत मग त्यांच्या सोबत घरी जाऊ. पावन बनून घरी जायचे आहे आणि मग सुखधाममध्ये यायचे आहे. हा सर्व खेळ भारतावरच बनलेला आहे. ही सर्व स्मृती त्रिकालदर्शी बनल्यामुळे आली आहे.

गीत:-
मरना तेरी गली में...

ओम शांती।
हे गाणे कोणी गायले? मुलांनी. मुले काय म्हणत आहेत! बाबा, आता तर तुमच्या गळ्यातलाच हार बनायचे आहे. हे शरीर तर इथेच सोडून द्यायचे आहे. मुले जाणतात शांतीधाम किंवा निर्वाणधाममध्ये बाबा आणि आपण मुले, आत्मे राहतो. आता बाबा वारंवार सांगत आहेत - स्वतःला आत्मा निश्चय करा. तुम्ही जाणता आम्ही आत्मे बाबांसोबत निर्वाणधाममध्ये राहाणारे होतो, मग हे शरीर धारण करून ८४ जन्मांचे चक्र फिरलो आहोत. मुले जाणतात - खरोखर आम्ही परमधामचे निवासी आहोत. आता मग बाबा आले आहेत. तुम्ही बसलेले आहात, बघत आहात बाबा समोर बसलेले आहेत. इथे आहेत लौकिक शरीराची नाती. आपण मुळात आत्मे होतो मग लौकिक नात्याने सुखाचे आणि दुःखाचे जीवन व्यतीत केले. आता तुम्ही आत्मे त्रिकालदर्शी बनले आहात. बाबा देखील तिन्ही काळांना, तिन्ही लोकांना जाणणारे आहेत. तुम्ही देखील नंबरवार पुरुषार्था नुसार जाणता. अभ्यासाची आठवण तर राहिली पाहिजे ना. आता स्मृती आली आहे. बाबांनी समजावून सांगितले आहे तुम्ही मूलवतनमध्ये राहणारे आहात, आता तुम्ही बापदादांद्वारे त्रिकालदर्शी बनले आहात. तुम्ही जाणता - आपण या ड्रामातील मुख्य ॲक्टर्स आहोत. ड्रामाचे सर्व नॉलेज आता तुमच्या बुद्धीमध्ये आहे.

स्मृती आली आहे - आपण अर्धेकल्प सुखधाममध्ये राहतो. तिथे रावण असत नाही. आम्ही आत्मे पूर्ण ८४ जन्मांचे चक्र फिरतो. आता बाबा सन्मुख बसलेले आहेत. तुमच्या श्रीमतानुसार चालून आम्ही तुमच्या सोबत येणार. जितके शक्य आहे तुमची आठवण करू. जर का त्रिकालदर्शी बनले आहात तर तुम्हा मुलांना पूर्ण दिवस हाच विचार राहिला पाहिजे. उच्च ते उच्च आहेत - भगवान. त्यांच्यासोबत तुम्ही मुले देखील सर्वोच्च जागी रहाणारे आहात. आता तुम्हा मुलांना घराची आठवण आली आहे. आम्ही पवित्र बनून आपल्या परमधाम-घरी जाणार. पिता, शिव यांची पूजा होते तर शाळीग्रामांची देखील पूजा होते. बाबाच येऊन आत्म्यांना पावन बनवतात. आत्म्यांना पवित्र बनविणारे एक बाबाच आहेत, इतर कोणीही बनवू शकत नाही.

आता तुम्ही संपूर्ण ड्रामाच्या खेळाला जाणले आहे. समजता की, हा खेळ भारतावरच बनलेला आहे. तर आता तुम्हा मुलांना बाबा सन्मुख बसून समजावून सांगत आहेत. प्रत्येक जीवाची आत्मा जाणते बाबा ज्ञानाचा सागर आहेत. त्यांना भक्तिमार्गामध्ये बोलावत आले आहेत आणि प्रतिज्ञा करत आले आहेत - ‘बाबा, तुम्ही याल तेव्हा आम्ही जरूर तुमच्या श्रीमतानुसार चालू’. ही काही लौकिक नात्याची गोष्ट नाहीये. तुम्हाला देही-अभिमानी बनून हा विचार करायचा आहे की, आम्हाला एका बेहदच्या बाबांच्या श्रीमतावर चालायचे आहे; त्यांचेच ऐकायचे आहे. ते तर खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगतात. आता तुमचा ज्ञानाचा तिसरा नेत्र उघडला आहे. हे ज्ञान तुम्हाला इथेच आहे की, मूलवतनमध्ये बाबा आणि मुले राहतात. तिथे कोणालाही हे माहीत नसते. आता तुम्हा मुलांना बाबा आपला अंत देतात (आपल्याकडील सखोल आणि संपूर्ण ज्ञान देतात). तेच ज्ञानाचा सागर आहेत; इतर कोणत्याही सत्संगांमध्ये असे म्हणणार नाहीत की, बाबा आम्हा आत्म्यांना शिकवत आहेत; हे फक्त तुम्हीच जाणता. घडोघडी तुम्हाला सांगावे लागते - देही-अभिमानी बना. आत्मा या ड्रामामध्ये ॲक्टर आहे, पार्ट बजावत आहे. मी आत्म्याने वस्त्र (शरीर) धारण केले आहे; ते (दुनियावाले) ॲक्टर्स कपडे बदलतात. तुम्ही आत्मे निराकारी दुनियेतून इथे येऊन हे शरीररुपी वस्त्र घेता. ते फक्त आपले कपडे बदलतात. आम्हा आत्म्यांना बाबा पुन्हा येऊन राजयोग शिकवत आहेत.

आता तुम्ही मुले समजता - बाबा आलेले आहेत तर आम्ही जरूर बाबांचे मदतगार बनणार. पवित्र बनून सर्व भारताला पवित्र बनवू. आम्हाला श्रीमतानुसारच चालायचे आहे. श्रीमत म्हणते - ‘बाबांची आठवण करायची आहे’. जे करतील ते मिळवतील. सर्वच तर येऊन पुरुषार्थ करणार नाहीत. ज्यांनी कल्पापूर्वी पुरुषार्थ केला आहे, तेच करतील. आता परत जायचे आहे त्यामुळे पुरुषार्थ करून पवित्र जरूर बनायचे आहे. आपण वरती मूलवतनामध्ये राहणारे आहोत. सर्वप्रथम आपण स्वर्गामध्ये आलो होतो आणि मग शिडी उतरत खाली आलो.

बाबा सांगतात देखील भारतवासीयांनाच. भारतातच येतात. त्यांची आठवण देखील भारतातच करतात की, ‘येऊन आम्हाला पावन बनवा. शरीर धारण करून आम्हाला श्रेष्ठ कर्म शिकवा’. शरीराचे नाव देखील प्रसिद्ध आहे. हा भाग्यशाली रथ आहे. बाबा देखील म्हणतात - मी सामान्य शरीरात प्रवेश करतो. पूर्वी देखील सांगितले होते - तुम्हां मुलांना आता स्मृती आली आहे - खरोखर, ५ हजार वर्षांपूर्वी देखील बाबांनी हेच सांगितले होते, ही गोष्ट इतर कोणीही सांगू शकणार नाही. बाबाच म्हणतात ५ हजार वर्षांपूर्वी देखील मी या शरीरामध्ये प्रवेश करून तुम्हाला समजावून सांगितले होते. आता पुन्हा तुम्हा मुलांना सांगत आहे - आत्म-अभिमानी बना. जसे नाटकवाल्यांना माहीत असते ना - आम्ही कोणते कपडे घालून, काय-काय पार्ट बजावतो. परंतु ते तर आहेत देह-अभिमानी. ही बेहदची गोष्ट आहे. देही-अभिमानी बनायचे आहे. आपण मूलतः आत्मेच आहोत. आता आमचा पार्ट पूर्ण होत आहे. बाबा सन्मुख बसून तुम्हाला सर्व काही समजावून सांगत आहेत, हे विसरून जायचे नाही. माया किती विघ्न आणते. बाबा समजावून सांगत आहेत - मुलांनो, तुम्ही कोणतेही विकर्म करायचे नाही. मनसा भले खूप वादळे येतील. स्वतःची परीक्षा घ्यायची आहे. माझी कर्मेंद्रिये चलायमान तर होत नाहीत ना? मी काम-विकाराला जिंकू शकतो का? तुमच्यासाठी तर खूप सोपे आहे. आपण आत्मे आहोत, एका पित्याची मुले आहोत. बाबांशीच योग लावायचा आहे. कर्मेंद्रियांमध्ये चंचलता येणे हा देखील देह-अभिमान झाला ना.

तुम्ही कोणालाही घाबरायचे नाही. निर्भय बनायचे आहे. कधीही कुठे गेलात तर साक्षी होऊन बघायचे आहे. आम्ही तर आत्मा आहोत. या खेळाला तुम्ही पूर्णपणे जाणले आहे. उच्च ते उच्च बाबा आहेत, हे बुद्धीत आले आहे, त्यांना बिंदू म्हटले जाते. निराकारी दुनियेमध्ये आत्म्यांचे झाड आहे. बीजातून झाड उत्पन्न होते नंतर मग नंबरवार पाने येतात, हे देखील असेच आहे. वरून आत्मे नंबरवार येतात. आत्मा प्रवेश कशी करते, कशी देहातून बाहेर पडते हे कोणीही पाहू शकत नाही. आता बाबा समजावून सांगत आहेत - तुमची आत्मा पतित बनली आहे, तिला पावन बनवा. बाबा बसून यांच्याद्वारे (ब्रह्मा बाबांद्वारे) समजावून सांगतात. बोलणे तर कर्मेंद्रियांद्वारे करतात ना. आत्मा बिंदू या शरीरामध्ये नसेल तर कर्मेंद्रिये काहीही करू शकत नाहीत. इतका छोटासा बिंदू किती शक्तिशाली आहे, तिच्यामध्ये सर्व नॉलेज आहे. बाबा ज्ञानाचा सागर आहेत जे तुम्हाला बसून समजावून सांगतात. त्यांच्यामध्ये सर्व ज्ञान आहे. हा त्यांचा देखील पार्ट नोंदलेला आहे. तुमच्या आत्म्यामध्ये देखील ८४ जन्मांचा पार्ट आहे. तुम्ही सुख-दुःखाचा पार्ट बजावता. दुःखामध्ये खूप अडचणींना सामोरे जाता. बाबा म्हणतात - मी काही पुनर्जन्मामध्ये येत नाही, तुम्ही ८४ जन्म घेता. मी काही घेत नाही. मी येऊन तुम्हा मुलांना सोपी युक्ती सांगतो की, माझी आठवण करा तर पावन बनाल. अर्धे कल्प तुम्ही काम-चितेवर बसून तमोप्रधान बनले आहात. बाबा आत्म्यांशीच बोलतात. आत्म्याचे अवयव आधी छोटे असतात मग मोठे होतात. आत्मा काही लहान-मोठी होत नाही. आत्माच म्हणते - ‘हे पतित पावन या’. आत्मा बाबांना बोलावते. बाबा म्हणतात - ‘मी कल्प-कल्प तुम्हा पतितांना पावन बनविण्याकरिता येतो’. आता तुम्ही जाणता आत्मा कशी येते आणि जाते. मनुष्य खूप डोकेफोड करतात. बघू आत्मा शरीरातून कशी निघून जाते, परंतु कोणालाही कळत नाही कारण ती अति सूक्ष्म आहे. इतक्या छोट्याशा आत्म्यामध्ये किती मोठा पार्ट आहे. जसे बीजामध्ये सर्व ज्ञान आहे, ते तर बीज जड (निर्जीव) आहे. वडाचे झाड असते त्याचे बीज किती छोटे असते, त्याच्यापासून झाड किती मोठे उंच उगवते. कलकत्त्याचे वडाचे झाड कित्येक जणांनी बघितले असेल. खूप मोठे झाड आहे. आता त्याचे फाउंडेशन पूर्णपणे सडले आहे, बाकी झाड उभे आहे. हे देखील असेच आहे. देवता धर्माचे फाउंडेशन राहिलेले नाही. झाडाची देखील आता जडजडीभूत अवस्था आहे. हे देखील तुम्ही जाणता तेव्हाच तर गव्हर्मेंटला देखील म्हणता की, आम्ही एवढ्या वेळामध्ये दुनियेला पावन बनवून दाखवू. मनुष्य या गोष्टींना समजत नाहीत. तुम्हाला तर निश्चय आहे की, आम्ही या भारताला जरूर श्रेष्ठाचारी बनवू, तेव्हाच तर भ्रष्टाचारी दुनियेचा विनाश होईल. यांची जी इच्छा आहे शांती व्हावी. आत्मा पार्ट बजावता-बजावता थकली आहे म्हणून बोलावते - ‘हे शांती देवा’. हे थोडेच समजतात की, आत्मा शांत स्वरूप आहे. परंतु इथे आत्म्याला कर्मेंद्रियांद्वारे कर्म तर जरूर करायचेच आहे. ‘शांती द्या’, म्हणतात. हे कोणाला ठाऊक नाहीये की, शांतीधाम वेगळे आहे, सुखधाम वेगळे आहे. सुखधाममध्ये फार थोडे मनुष्य असतात. ती आहेच पवित्र दुनिया. तिथे काही कोणी शांती तर मागत नाही. कर्म तर तिथे देखील करतात, परंतु तिथे अशांती नसते. जीवनमुक्तीधाम अथवा शांतीधाम दोन्ही वेगवेगळे आहेत. सतयुगामध्ये जीव-आत्म्यांना सुख देखील आहे आणि शांती देखील आहे. एव्हरहेल्दी, वेल्दी असतात.

आता तुम्ही जाणता स्वर्ग कशाला म्हणतात. दुनियेमध्ये हे कोणालाच ठाऊक नाहीये की, स्वर्ग काय आहे. ही (लक्ष्मी-नारायण) मुले आहेत ना? या मुलांना देखील सुख कोणी दिले? सुख देणारा कोणीतरी आहे ना. आता पुन्हा यांचे राज्य येणार आहे काय? स्वर्ग जरूर पुन्हा रिपीट होईल. स्वर्गामध्ये जेव्हा असाल तेव्हा तिथे तुम्ही असे म्हणणार नाही की, नरक पुन्हा रिपीट करणार. आता म्हणता पवित्रता सुख-शांतीची नवीन दुनिया पुन्हा रिपीट होईल. ही जुनी दुनिया तर दुःखधाम आहे, याला आयर्न एज्ड म्हटले जाते. नवी दुनिया सुद्धा होती तर खरी ना! त्याला स्वर्ग म्हणतात. हे ज्ञान तुमच्या बुद्धीमध्ये भरून राहिले आहे. खरोखर आपण पुन्हा एकदा देवी-देवता बनत आहोत. तुमचे एम-ऑब्जेक्टच हे आहे. आम्ही पुन्हा स्वर्गाची बादशाही घेत आहोत. बेहदच्या बाबांकडून वारसा जरूर मिळवणार. हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे. आम्ही आत्मे तिथे राहतो, मग आपण पार्ट बजावण्यासाठी इथे आलो आहोत. आता आम्ही ८४ जन्म कसे घेतो - याची स्मृती आली आहे. बाबा सांगतात देखील तुम्हा ब्रह्मामुखवंशावली ब्राह्मणांना. ब्राह्मण बनल्याशिवाय, प्रजापिता ब्रह्माचा मुलगा बनल्याशिवाय शिवबाबांकडून वारसा कसा घेणार. प्रजापिता ब्रह्मा तर प्रसिद्ध आहे ना. ब्रह्मा द्वारे नव्या दुनियेची स्थापना करतात, तर नवीन दुनियेचे राज्य देखील जरूर त्यांनाच मिळाले असेल. ५ हजार वर्षांपूर्वी देखील ब्रह्माद्वारे विष्णुपुरीची स्थापना केली होती. आता पुन्हा रिपीट होईल. त्याच्यासाठी तुम्ही तयारी करत आहात. बरीच मुले विचारतात - ड्रामा मोठा मानावा की पुरुषार्थ मोठा मानावा? यावर समजावून सांगितले जाते की, पुरुषार्थ तर जरूर करायचाच आहे. पुरुषार्थाशिवाय प्रारब्ध कसे मिळेल? पूर्ण पुरुषार्थ करायचा आहे. कोणी चांगल्या रीतीने पुरुषार्थ करतात तर सांगितले जाते ड्रामा अनुसार यांचा पुरुषार्थ चांगला चालू आहे. पद सुद्धा चांगले मिळवतील. त्यांचा पुरुषार्थ खूप वेगाने चालला आहे. मग चालता-चालता कोणाचे पद कमी दर्जाचे सुद्धा होते. ब्राह्मणीं जाणतात, ब्राह्मणींकडे येणारे देखील जाणतात, अमका खूप चांगला चालत होता, आज-काल येत नाहीये. म्हणतात - ‘माहीत नाही, माझ्या बुद्धीमध्ये का राहत नाहीये, बाबांची मी आठवणच करू शकत नाही. बस्स, मी अजून चालू शकणार नाही. खूप मोठे ध्येय आहे’; असे लिहितात. मूळ गोष्ट आहेच निर्विकारी बनणे, विकारांना सोडणे खूप अवघड आहे. तुम्ही जाणता ड्रामा अनुसार कल्पापूर्वी प्रमाणे यांची कायम अशीच अवस्था राहिलेली आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) या बेहदच्या खेळाला साक्षी होऊन बघायचे आहे. कोणालाही घाबरायचे नाही. निर्भय बनण्याकरिता ‘मी आत्मा आहे’ हा पाठ पक्का करायचा आहे.

२) स्वतःची तपासणी करून आपणच आपली परीक्षा घ्यायची आहे की, कोणतेही कर्मेंद्रिय चलायमान तर होत नाही ना? कामविकारावर विजय मिळवला आहे का? देही-अभिमानी कुठपर्यंत बनलो आहे?

वरदान:-
एका बाबांच्या स्मृतीमुळे खऱ्या सौभाग्याचा अनुभव करणारे भाग्यवान आत्मा भव

जे कोणत्याही आत्म्याचे शब्द ऐकूनही ऐकत नाहीत (त्याच्या प्रभावामध्ये येत नाहीत), अन्य कोणत्याही आत्म्याला स्मृतीमध्ये, संकल्पामध्ये अथवा स्वप्नामध्ये सुद्धा स्थान देत नाहीत अर्थात कोणत्याही देहधारीच्या प्रभावाखाली येत नाहीत, ‘एक बाबा दुसरा न कोई’ याच स्मृतीमध्ये राहतात त्यांना अविनाशी सौभाग्याचा तिलक लावला जातो. असे खरे सौभाग्य असणारेच भाग्यवान आहेत.

बोधवाक्य:-
आपली स्थिती श्रेष्ठ बनवायची असेल तर अंतर्मुखी बनून नंतर मग बाह्यमुखतेमध्ये या.

हे अव्यक्त इशारे - ज्वालास्वरूप स्थितीमध्ये राहून शक्तिशाली आठवणीचा अनुभव करा.

जसे अग्नीमध्ये कोणती गोष्ट टाका तर तिचे नाव, रूप, गुण सर्वकाही बदलून जाते; अगदी तसेच जेव्हा बाबांच्या आठवणीमध्ये दृढ विश्वासाच्या अग्नीमध्ये स्वतःला झोकून देता तेव्हा परिवर्तन होते. मनुष्यापासून ब्राह्मण बनता, आणि मग ब्राह्मणापासून फरिश्ता सो देवता बनता. दृढ विश्वासाच्या अग्नीमुळे असे परिवर्तन होते ज्यामुळे कोणत्याही प्रकारचा ‘माझे’पणा राहत नाही, आणि म्हणूनच आठवणीला ज्वाला-रूप म्हटले आहे.