11-09-2024
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्ही बाबांकडे आले आहात आपले आचरण सुधारण्यासाठी, तुम्हाला आता दैवी
गुण धारण करायचे आहेत”
प्रश्न:-
तुम्हा मुलांना
डोळे बंद करून बसण्यासाठी मनाई का केली जाते?
उत्तर:-
कारण नजरेने निहाल करणारे (दृष्टीने तृप्त करणारे) बाबा तुमच्या सन्मुख आहे. जर डोळे
बंद कराल तर निहाल कसे होणार. शाळेमध्ये डोळे बंद करून बसत नाहीत. डोळे बंद केले तर
झोप येईल. तुम्ही मुले तर शाळेत शिकत आहात, हे सोर्स ऑफ इनकम (कमाईचे साधन) आहे.
लाखों, पद्मांची कमाई होत आहे, कमाई करताना आळस, उदासीनता येऊ शकत नाही.
ओम शांती।
गोड-गोड रुहानी मुलांप्रती बाबा समजावून सांगत आहेत. हे तर मुले जाणतात कि रुहानी
बाबा परमधामहून येऊन आम्हाला शिकवत आहेत. काय शिकवत आहेत? बाबांसोबत आत्म्याचा योग
लावणे शिकवतात ज्याला आठवणीची यात्रा म्हटले जाते. हे देखील सांगितले आहे - बाबांची
आठवण करता-करता गोड रुहानी मुलांनो तुम्ही पवित्र बनून आपल्या पवित्र शांतीधाममध्ये
पोहोचाल. किती सोपे विश्लेषण आहे. स्वतःला आत्मा समजा आणि आपल्या प्रीतम बेहदच्या
बाबांची आठवण करा तर तुमची जन्म-जन्मांतरीची पापे जी आहेत, ती भस्म होत जातील.
यालाच योग अग्नी म्हटले जाते. हा भारताचा प्राचीन राजयोग आहे, जो बाबाच दर ५ हजार
वर्षांनी येऊन शिकवतात. बेहदचे बाबाच भारतामध्ये, या साधारण तनामध्ये येऊन तुम्हा
मुलांना समजावून सांगतात. या आठवणीनेच तुमची जन्म-जन्मांतरीची पापे नष्ट होतील कारण
बाबा पतित-पावन आहेत आणि सर्वशक्तीमान आहेत. तुमच्या आत्म्याची बॅटरी आता तमोप्रधान
बनली आहे. जी सतोप्रधान होती आता तिला पुन्हा सतोप्रधान कसे बनवावे, जेणेकरून तुम्ही
सतोप्रधान दुनियेमध्ये जाऊ शकाल किंवा शांतीधाम आपल्या घरी जाऊ शकाल. मुलांना हे
खूप चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे आहे. बाबा मुलांना हा डोस देतात. ही आठवणीची
यात्रा उठता-बसता, चालता-फिरता तुम्ही करू शकता. जितके शक्य आहे गृहस्थ
व्यवहारामध्ये राहत असताना कमलपुष्प समान पवित्र रहायचे आहे. बाबांची सुद्धा आठवण
करायची आहे आणि सोबतच दैवीगुण देखील धारण करायचे आहेत कारण दुनियावाल्यांचे तर आसुरी
कॅरेक्टर्स (आसुरी गुण) आहेत. तुम्ही मुले इथे आले आहात दैवीगुण धारण करण्यासाठी.
या लक्ष्मी-नारायणाचे गुण खूप गोड होते. भक्तिमार्गामध्ये त्यांचीच महिमा गायली गेली
आहे. भक्तिमार्ग केव्हापासून सुरु होतो, हे देखील कोणाला माहित नाही आहे. आता
तुम्हाला समजले आहे आणि रावणराज्य केव्हापासून सुरु झाले, हे देखील आता समजले आहे.
तुम्हा मुलांना हे सारे नॉलेज लक्षात ठेवायचे आहे. तुम्ही जाणता कि आपण ज्ञानसागर
रुहानी पित्याची संतान आहोत, आता रुहानी बाबा आम्हाला शिकवण्यासाठी येतात. हे देखील
जाणता हे कोणी साधारण पिता नाही आहेत. हे आहेत रुहानी पिता, जे आम्हाला शिकवण्यासाठी
आले आहेत. त्यांचे निवासस्थान कायम ब्रह्मलोकमध्ये आहे. लौकिक पिता तर सर्वांचे इथे
आहेत. मुलांनी हा दृढ विश्वास ठेवायचा आहे - आम्हा आत्म्यांना शिकवणारे परमपिता
परमात्मा आहेत, जे बेहदचे बाबा आहेत. भक्तीमार्गामध्ये लौकिक पिता असताना देखील
परमपिता परमात्म्याला बोलावतात. त्यांचे एकच यथार्थ नाव ‘शिव’ आहे. बाबा स्वतः
समजावून सांगतात - ‘गोड-गोड मुलांनो, माझे नाव एकच ‘शिव’ आहे’. जरी अनेक नावे अनेक
मंदिरे बनवली आहेत परंतु ती सारी आहे भक्ती मार्गाची सामुग्री. माझे यथार्थ नाव एकच
‘शिव’ आहे. तुम्हा मुलांना आत्माच म्हणतात, शाळीग्राम म्हटले तरीही हरकत नाही.
अनेकानेक शाळीग्राम आहेत. शिव एकच आहेत. ते आहेत बेहदचे पिता, बाकी सर्व आहेत मुले.
यापूर्वी तुम्ही हदची मुले, हदच्या बाबांकडे राहत होता. ज्ञान तर नव्हते. बाकी अनेक
प्रकारची भक्ती करत होता. अर्धा कल्प भक्ती केली आहे, द्वापर पासून भक्ती सुरू होते.
रावण राज्य देखील सुरु झाले आहे. ही आहे खूप सोपी गोष्ट. परंतु इतकी सोपी गोष्ट
देखील समजणे काहींना अवघड वाटते. रावण राज्य कधीपासून सुरु होते, हे देखील कोणी
जाणत नाही. तुम्ही गोड मुले जाणता - बाबाच ज्ञानाचे सागर आहेत. जे त्यांच्याकडे आहे
ते येऊन मुलांना देतात. शास्त्र तर आहेत भक्तिमार्गाची.
आता तुम्हाला समजले
आहे - ज्ञान, भक्ती आणि मग आहे वैराग्य. हे ३ मुख्य आहेत. संन्यासी लोक देखील
जाणतात - ज्ञान भक्ती आणि वैराग्य. परंतु सन्याशांचे आहे आपले हदचे वैराग्य. ते
बेहदचे वैराग्य शिकवू शकत नाही. दोन प्रकारचे वैराग्य आहे - एक आहे हदचे, दुसरे आहे
बेहदचे. ते आहे हठयोगी सन्याशांचे वैराग्य. हे आहे बेहदचे. तुमचा आहे राजयोग, ते
घरदार सोडून जंगलात निघून जातात तर त्यांचे नावच पडते - संन्यासी. हठयोगी घरदार
सोडतात पवित्र राहण्यासाठी. हे देखील चांगले आहे. बाबा म्हणतात - भारत तर खूप
पवित्र होता. इतका पवित्र खंड दुसरा कोणता असत नाही. भारताची तर खूप उच्च महिमा आहे
जी भारतवासी स्वतःच जाणत नाहीत. बाबांना विसरल्यामुळे सर्वकाही विसरून जातात अर्थात
नास्तिक, निधनके (अनाथ) बनतात. सतयुगामध्ये किती सुख-शांती होती. आता किती
दुःख-अशांती आहे! मूलवतन तर आहेच शांतीधाम, जिथे आपण आत्मे राहतो. आत्मे आपल्या
घरून इथे येतात बेहदचा पार्ट बजावण्यासाठी. आता हे आहे पुरुषोत्तम संगमयुग जेव्हा
बेहदचे बाबा येतात नव्या दुनियेमध्ये घेऊन जाण्यासाठी. बाबा येऊन उत्तम ते उत्तम
बनवतात. उच्च ते उच्च भगवान म्हटले जाते. परंतु ते कोण आहेत, कोणाला म्हटले जाते,
हे काहीच समजत नाहीत. एक मोठे लिंग ठेवले आहे. समजतात हे निराकार परमात्मा आहेत.
आम्हा आत्म्याचे ते पिता आहेत - हे देखील समजत नाहीत, फक्त पूजा करतात. कायम
‘शिवबाबा’ म्हणतात, ‘रुद्र बाबा’ किंवा ‘बबुलनाथ बाबा’ म्हणणार नाहीत. तुम्ही लिहिता
देखील शिवबाबांची आठवण आहे? वारसा लक्षात आहे? ही स्लोगन्स घराघरात लावली पाहिजेत -
‘शिवबाबांची आठवण करा तर पापे भस्म होतील’, कारण पतित-पावन एक बाबाच आहेत. या पतित
दुनियेमध्ये तर एकही पावन असू शकत नाही. पावन दुनियेमध्ये मग एकही पतित असू शकत नाही.
शास्त्रांमध्ये तर सर्व ठिकाणी ‘पतित’ असे लिहून ठेवले आहे. त्रेतामध्ये देखील
म्हणतात रावण होता, सीतेचे हरण झाले. श्रीकृष्णा सोबत कंस, जरासंध, हिरण्यकश्यप
इत्यादी दाखवले आहेत. श्रीकृष्णावर कलंक लावले आहेत. आता सतयुगामध्ये हे सारे असू
शकत नाहीत. किती खोटे कलंक लावले आहेत. बाबांवरसुद्धा कलंक लावले आहेत तर
देवतांवरसुद्धा कलंक लावले आहेत. सर्वांची निंदा करत राहतात. तर आता बाबा म्हणतात
ही आठवणीची यात्रा आहे आत्म्याला पवित्र बनविण्याची. पवित्र बनवून मग पावन
दुनियेमध्ये जायचे आहे. बाबा ८४ च्या चक्राविषयी देखील समजावून सांगतात. आता तुमचा
हा अंतिम जन्म आहे मग परत घरी जायचे आहे. घरी शरीर तर जाणार नाही. सर्व आत्मे जाणार
आहेत त्यामुळे ‘माझ्या गोड-गोड रुहानी मुलांनो, स्वतःला आत्मा समजून बसा, देह समजू
नका’. इतर सत्संगांमध्ये तर तुम्ही देह-अभिमानी होऊन बसता. इथे बाबा म्हणतात
देही-अभिमानी होऊन बसा. जसे माझ्यामध्ये हे संस्कार आहेत, मी ज्ञानाचा सागर आहे…
तुम्हा मुलांना देखील असे बनायचे आहे. बेहदचा पिता आणि हदचा पिता यातील फरक देखील
सांगतात. बेहदचे बाबा बसून तुम्हाला सर्व ज्ञान समजावून सांगतात. आधी जाणत नव्हता.
आता सृष्टीचे चक्र कसे फिरते, त्याचा आदि-मध्य-अंत आणि चक्राची आयु किती आहे,
सर्वकाही सांगतात. भक्तिमार्गामध्ये तर कल्पाची आयु लाखों वर्षे सांगून घोर
अंधारामध्ये टाकले आहे. खालीच उतरत आले आहेत. म्हणतात देखील ना - ‘जितकी आपण भक्ती
करू तितके बाबांना खाली खेचणार’. बाबा येऊन आम्हाला पावन बनवतील. बाबांना खेचतात
कारण पतित आहेत, खूप दुःखी बनतात. मग म्हणतात - आम्ही बाबांना बोलावतो. बाबा देखील
बघतात एकदम दुःखी तमोप्रधान बनले आहेत, ५ हजार वर्ष पूर्ण झाली तेव्हा मग येतात. हे
शिक्षण काही या जुन्या दुनियेकरिता नाहीये. तुमची आत्मा धारण करून सोबत घेऊन जाईल.
जसा मी ज्ञानाचा सागर आहे, तुम्ही देखील ज्ञान नद्या आहात. हे ज्ञान काही या
दुनियेसाठी नाहीये. ही तर छी-छी दुनिया, छी-छी शरीर (पतित दुनिया, पतित शरीर) आहे,
यांना तर सोडायचे आहे. शरीर तर इथे पवित्र होऊ शकत नाही. मी आत्म्यांचा पिता आहे.
आत्म्यांनाच पवित्र बनविण्यासाठी आलो आहे. या गोष्टींना मनुष्य तर अजिबात समजू शकत
नाहीत, अगदीच पत्थर-बुध्दी, पतित आहेत; यासाठीच गातात ‘पतित-पावन…’. आत्माच पतित
बनली आहे. आत्माच सर्व काही करते. भक्ती देखील आत्माच करते, शरीर देखील आत्माच घेते.
आता बाबा म्हणतात -
मी तुम्हा आत्म्यांना घेऊन जाण्यासाठी आलो आहे. मी बेहदचा पिता तुम्हा आत्म्यांच्या
आमंत्रणावरून आलो आहे. तुम्ही किती हाका मारल्या आहेत. अजून पर्यंत बोलावत राहतात -
‘हे पतित-पावन, ओ गॉडफादर येऊन या जुन्या दुनियेतील दुःखांपासून, डेव्हिलपासून
लिबरेट करा (सैतानापासून मुक्त करा) जेणेकरून आम्ही सर्व घरी जाऊ शकू. बाकी तर
कोणाला माहीतही नाही आहे की, आपले घर कुठे आहे, घरी कसे आणि कधी जाणार. मुक्तीमध्ये
जाण्यासाठी किती डोकेफोड करतात, किती गुरु करतात. जन्म-जन्मांतर डोकेफोड करत आले
आहेत. ते गुरु लोक जीवनमुक्तीच्या सुखाला तर जाणतही नाहीत. त्यांना हवी असते मुक्ती.
म्हणतात देखील की, विश्वामध्ये शांती कशी होईल? संन्यासी देखील मुक्तीलाच जाणतात.
जीवनमुक्तीला तर जाणतही नाहीत. परंतु मुक्ती-जीवनमुक्ती दोन्ही वारसे बाबाच देतात.
तुम्ही जेव्हा जीवनमुक्तीमध्ये असता तेव्हा बाकी सर्व मुक्तीमध्ये निघून जातात. आता
तुम्ही मुले ज्ञान घेत आहात, हे बनण्यासाठी. तुम्हीच सर्वात जास्त सुख पाहिले आहे
मग सर्वात जास्ती दुःख देखील तुम्हीच पाहिले आहे. तुम्हीच आदि सनातन देवी-देवता
धर्मवाले मग धर्म-भ्रष्ट, कर्म-भ्रष्ट झाले आहात. तुम्ही पवित्र प्रवृत्तीमार्गवाले
होता, हे लक्ष्मी-नारायण पवित्र प्रवृत्ती मार्गाचे आहेत. घरदार सोडणे हा
संन्याशांचा धर्म आहे. संन्यासी देखील सुरुवातीला चांगले होते. तुम्ही देखील आधी
खूप चांगले होता, आता तमोप्रधान बनले आहात. बाबा म्हणतात - ‘हा ड्रामाचा खेळ आहे’.
बाबा समजावून सांगत आहेत - ‘हे शिक्षण आहेच मुळी नवीन दुनियेसाठी. मला पतित शरीर,
पतित दुनियेमध्ये ड्रामा अनुसार पुन्हा ५ हजार वर्षांनंतर यावे लागते. ना कल्प लाखो
वर्षांचे आहे, ना मी सर्वव्यापी आहे. ही तर तुम्ही माझी निंदा करत आले आहात.
तरीदेखील मी तुमच्यावर किती उपकार करतो. जेवढी शिवबाबांची निंदा केली आहे, तितकी
अजून कोणाची केलेली नाही. जे बाबा तुम्हाला विश्वाचा मालक बनवतात त्यांच्यासाठी
तुम्ही म्हणत राहता - सर्वव्यापी आहेत. जेव्हा निंदा करण्याची देखील हद्द पार होते,
तेव्हा मग मी येऊन उपकार करतो. हे आहे पुरुषोत्तम संगमयुग, कल्याणकारी युग. तर मी
तुम्हाला पवित्र बनविण्यासाठी येतो. पवित्र बनण्याकरिता किती सोपी युक्ती सांगतात.
तुम्ही भक्तीमार्गामध्ये खूप त्रास सहन केला आहे, तलावामध्ये देखील स्नान करण्यासाठी
जातात, समजतात याने आपण पावन बनणार. आता कुठे ते पाणी आणि कुठे हे पतित-पावन बाबा.
तो सर्व आहे भक्तीमार्ग, हा आहे ज्ञानमार्ग. मनुष्य किती घोर अंधारामध्ये आहेत.
कुंभकर्णाच्या झोपेमध्ये झोपलेले आहेत. हे तर तुम्ही जाणता - गायले देखील जाते -
‘विनाशकाले विपरीत बुद्धि विनश्यन्ति’. आता तुमची नंबरवार पुरुषार्थानुसार
प्रीत-बुद्धी आहे. पूर्ण नाही आहे, कारण माया क्षणो-क्षणी विसरायला लावते. हे आहे ५
विकारांचे युद्ध. ५ विकारांना रावण म्हटले जाते. रावणावर गाढवाचे डोके दाखवतात.
बाबांनी हे देखील
समजावून सांगितले आहे - शाळेमध्ये कधी डोळे बंद करून बसायचे नसते. ते तर
भक्तीमार्गामध्ये ईश्वराची आठवण करण्याची शिकवण देतात कि डोळे बंद करून बसा. इथे तर
बाबा म्हणतात - ‘ही शाळा आहे’. ऐकले देखील आहे - ‘नज़र से निहाल…’. म्हणतात हा
जादूगार आहे. अरे, ते तर गायन देखील आहे. देवता देखील नजरेने निहाल होतात. नजरेने
मनुष्याला देवता बनविणारा जादूगार झाला ना. बाबा बसून बॅटरी चार्ज करतील आणि मुले
डोळे बंद करून बसले तर काय म्हणावे! शाळेमध्ये डोळे बंद करून बसत नाहीत. नाहीतर झोप
येते. शिक्षण तर आहे - सोर्स ऑफ इन्कम (कमाईचे साधन). लाखों, पद्मांची कमाई आहे.
कमाईमध्ये कधी जांभई देणार नाहीत. इथे आत्म्यांना सुधारायचे आहे. हे एम ऑब्जेक्ट उभे
आहे. त्यांची राजधानी बघायची असेल तर जा दिलवाला मंदिरामध्ये. ते आहे जड़, हे आहे
चैतन्य दिलवाला मंदिर. देवता देखील आहेत, स्वर्ग देखील आहे. सर्वांचे सद्गती दाता
अबूमध्येच येतात, म्हणूनच मोठ्यात मोठे तीर्थस्थान अबू आहे. जे काही धर्मस्थापक अथवा
गुरु लोक आहेत, सर्वांची सद्गती बाबा इथे येऊन करतात. हे सर्वात मोठे तीर्थस्थान आहे,
परंतु गुप्त आहे. याला कोणीही जाणत नाहीत. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) जे संस्कार
बाबांमध्ये आहेत, तेच संस्कार धारण करायचे आहेत. बाप समान ज्ञानाचा सागर बनायचे आहे.
देही-अभिमानी होऊन राहण्याचा अभ्यास करायचा आहे.
२) आत्मारुपी बॅटरीला
सतोप्रधान बनविण्यासाठी चालता-फिरता आठवणीच्या यात्रेमध्ये रहायचे आहे. दैवी गुण
धारण करायचे आहेत. अतिशय गोड बनायचे आहे.
वरदान:-
त्रिकालदर्शी
बनून दिव्य बुद्धीच्या वरदानाला कार्यामध्ये लावणारे सफलता संपन्न भव
बापदादांनी प्रत्येक
मुलाला दिव्य बुद्धीचे वरदान दिले आहे. दिव्य बुद्धीद्वारेच बाबांना, स्वतःला आणि
तीनही काळांना स्पष्टपणे जाणू शकता. सर्व शक्तींना धारण करू शकता. दिव्य-बुद्धीवाली
आत्मा कोणत्याही संकल्पाला कर्म किंवा वाणीमध्ये आणण्यापूर्वी प्रत्येक बोल किंवा
कर्माचे तीनही काळ जाणून प्रॅक्टिकलमध्ये येते. त्यांच्या समोर भूतकाळ आणि
भविष्यकाळ सुद्धा इतका स्पष्ट असतो जितके वर्तमान स्पष्ट आहे. असे दिव्य-बुद्धीवाले
त्रिकालदर्शी असल्याकारणाने सदैव सफलता संपन्न बनतात.
बोधवाक्य:-
संपूर्ण
पवित्रतेला धारण करणारेच परमानंदाचा अनुभव करू शकतात.